11-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही साऱ्या दुनियेचे खरे-खरे मित्र आहात, तुमचे कोणाशीही शत्रुत्व असता कामा नये”

प्रश्न:-
तुम्ही रुहानी मिलिट्रीआहात, तुम्हाला बाबांचे कोणते डायरेक्शन मिळालेले आहे, ज्याला अंमलात आणायचे आहे?

उत्तर:-
तुम्हाला डायरेक्शन मिळालेले आहे की, बॅज नेहमी लावून ठेवा. कोणीही विचारले हे काय आहे? तुम्ही कोण आहात? तर बोला, आम्ही आहोत साऱ्या दुनियेतील काम अग्नीला विझविणारे फायर बिग्रेड. यावेळी साऱ्या दुनियेमध्ये काम अग्नी लागलेला आहे, आम्ही सर्वांना संदेश देतो की, ‘आता पवित्र बना, दैवी गुण धारण करा तर बेडा पार होईल (जीवन रुपी नौका पार होईल)’.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले सहज आठवणीमध्ये बसली आहेत. कोणाकोणाला कठीण वाटते. खूप गोंधळून जातात - आपण एकदम ताठ अथवा सरळ होऊन बसावे. बाबा म्हणतात - अशी काही गरज नाही, कसेही बसा. फक्त बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये अवघड वाटण्यासारखे काहीच नाही. ते हठयोगी असे ताठ होऊन बसतात. पायावर, पाय चढवतात (पद्मासन घालून बसतात). इथे तर बाबा म्हणतात आरामात बसा. बाबांची आणि ८४ च्या चक्राची आठवण करा. ही आहेच सहज आठवण. उठता-बसता बुद्धीमध्ये असावे. जसे बघा हा छोटा मुलगा वडिलांच्या बाजूला बसला आहे, याच्या बुद्धीमध्ये आई-वडिलांचीच आठवण असेल. तुम्ही देखील मुले आहात ना. बाबांची आठवण करणे तर खूप सोपे आहे. आपण बाबांची मुले आहोत. बाबांकडूनच वारसा घ्यायचा आहे. शरीर निर्वाह अर्थ भले गृहस्थ व्यवहारामध्ये रहा. फक्त बाकी सर्वांची आठवण बुद्धीतून काढून टाका. कोणी हनुमानाची, कोणी कोणाची, साधू इत्यादींची आठवण करत होते, आता ती आठवण सोडून द्यायची आहे. आठवण तर करतात ना, पूजेसाठी पुजारीला मंदिरामध्ये जावे लागते, यामध्ये कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कोणीही भेटले तर बोला, शिवबाबांचे म्हणणे आहे की, ‘मज एका पित्याची आठवण करा’. शिवबाबा तर आहेत निराकार. जरूर ते साकारमधेच येऊन म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची ) आठवण करा’. मी पतित-पावन आहे. हा तर राईट शब्द आहे ना. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. तुम्ही सर्व पतित आहात. ही पतित तमोप्रधान दुनिया आहे ना म्हणून बाबा म्हणतात कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. ही तर चांगली गोष्ट आहे ना. कोणत्या गुरु इत्यादीची महिमा करत नाहीत. बाबा फक्त म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. हे आहे योग-बळ अथवा योग-अग्नी. बेहदचे बाबा तर सत्य सांगतात ना - गीतेचे भगवान निराकारच आहेत. श्रीकृष्णाची गोष्ट नाही. भगवान म्हणतात - फक्त माझी आठवण करा दुसरा कोणताही उपाय नाही. पावन होऊन गेल्याने उच्च पद प्राप्त कराल. नाही तर पद कमी होईल. आम्ही तुम्हाला बाबांचा संदेश देतो. मी संदेशी आहे. हे समजून सांगण्यामध्ये काहीच अडचण नाही. माता, अहिल्या, कुब्जा देखील उच्च पद मिळवू शकतात. इथे राहणारे आहात, नाहीतर घर-गृहस्थीमध्ये राहणारे आहात, असे नाही की इथे राहणारे जास्त आठवण करू शकतात. बाबा म्हणतात - बाहेर राहणारे देखील खूप आठवणीमध्ये राहू शकतात. खूप सेवा करू शकतात. इथे देखील बाबांकडून रिफ्रेश होऊन परत जातात तर आतून किती आंनद झाला पाहिजे. या छी-छी (विकारी) दुनियेमध्ये तर थोडे दिवस बाकी आहेत. मग जाणार श्रीकृष्ण पुरीमध्ये. श्रीकृष्णाच्या मंदिराला देखील सुखधाम म्हणतात. तर मुलांना अपार आनंद झाला पाहिजे. जेव्हा की तुम्ही बेहदच्या बाबांचे बनले आहात. तुम्हालाच स्वर्गाचा मालक बनवले होते. तुम्ही देखील म्हणता बाबा ५००० वर्षांपूर्वी देखील आम्ही तुम्हाला भेटलो होतो आणि पुन्हा भेटणार. आता बाबांची आठवण करून मायेवर विजय मिळवायचा आहे. आता या दुःखधाम मध्ये तर राहायचे नाहीये. तुम्ही शिकताच मुळी सुखधाम मध्ये जाण्याकरिता. सर्वांना हिशोब चुकता करून परत जायचे आहे. मी आलोच आहे नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी. बाकी सर्व आत्मे निघून जातील मुक्तिधाम मध्ये. बाबा म्हणतात - मी काळांचा काळ आहे. सर्वांना शरीरातून सोडवतो आणि आत्म्यांना घेऊन जाईन. सर्वजण म्हणतात देखील आपण लवकर जावे. इथे तर राहायचे नाहीये. ही तर जुनी दुनिया, जुने शरीर आहे. आता बाबा म्हणतात - मी सर्वांना घेऊन जाणार. कोणालाच सोडणार नाही. तुम्ही सर्वांनी बोलावलेच आहे - हे पतित-पावन या. भले आठवण करत राहतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. ‘पतित-पावन’ची किती धून लावतात. मग म्हणत राहतात - ‘रघुपति राघव राजा राम’. आता शिवबाबा तर राजा बनत नाहीत, राज्य करत नाहीत. त्यांना राजा राम म्हणणे चुकीचे आहे. माळा जेव्हा जपतात तेव्हा ‘राम-राम’ म्हणतात. त्यामध्ये भगवंताची आठवण येते. भगवान तर आहेतच - शिव. मनुष्यांची नावे खूप ठेवली आहेत. श्रीकृष्णाला देखील श्याम-सुंदर, वैकुंठ नाथ, माखन चोर इत्यादी-इत्यादी खूप नावे देतात. तुम्ही आता श्रीकृष्णाला माखन चोर म्हणाल का? अजिबात नाही. तुम्ही आता समजता भगवान तर एक निराकार आहेत, कोणत्याही देहधारीला भगवान म्हणू शकत नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील म्हणू शकत नाही तर मग मनुष्य स्वतःला भगवान कसे बरे म्हणू शकतात. वैजयंती माळा फक्त १०८ ची गायली जाते. शिवबाबांनी स्वर्ग स्थापन केला, त्याचे हे मालक आहेत. जरूर त्याच्यापूर्वी त्यांनी हा पुरुषार्थ केला असेल. त्याला म्हटले जाते कलियुगाचा अंत आणि सतयुग आदि यांचे संगमयुग. हे आहे कल्पाचे संगमयुग. मनुष्यांनी मग युगे-युगे म्हटले आहे, अवतार हे नाव देखील विसरून मग त्यांना दगड-धोंड्यामध्ये, कणा-कणामध्ये आहेत असे म्हटले आहे. हा देखील ड्रामा आहे. जी गोष्ट पास्ट होते (घडून जाते) त्याला म्हटले जाते - ड्रामा. कोणासोबत भांडण इत्यादी झाले, होऊन गेले, त्याचे चिंतन करायचे नाही. अच्छा कोणी काही कमी-जास्त बोलले, तुम्ही त्याला विसरून जा. कल्पापूर्वी देखील असे बोलला होता. त्या गोष्टी आठवत राहिल्याने मग चिडचिड करत रहाल. ती गोष्ट परत कधी बोलू सुद्धा नका.

तुम्हा मुलांना सेवा तर करायची आहे ना. सेवेमध्ये कोणतेही विघ्न पडता कामा नये. सेवेमध्ये दुबळेपणा दाखवायचा नाही. शिव-बाबांची सेवा आहे ना. त्यामध्ये कधी जरा सुद्धा नाही म्हणायचे नाही. नाहीतर आपले पद भ्रष्ट करून घ्याल. बाबांचे मदतगार बनला आहात तर पूर्णत: मदत द्यायची आहे. बाबांची सेवा करण्यामध्ये जरासुद्धा फसवणूक करायची नाही. संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचाच आहे. बाबा सांगत असतात म्युझियमचे नाव असे ठेवा ज्यामुळे मनुष्य ते पाहूनच आतमध्ये घुसतील आणि येऊन समजून घेतील, कारण ही नवीन गोष्ट आहे ना. मनुष्य नवीन गोष्ट बघून आतमध्ये घुसतात. आजकाल बाहेरून (परदेशातून) भारताचा प्राचीन योग शिकण्याकरिता येतात. आता प्राचीन अर्थात जुन्यात जुना, तो तर भगवंतानेच शिकविला आहे, ज्याला ५००० वर्षे झाली आहेत. सतयुग-त्रेतामध्ये योग असत नाही, ज्यांनी शिकवला ते तर निघून गेले पुन्हा जेव्हा ५००० वर्षानंतर येतील तेव्हाच येऊन राजयोग शिकवतील. प्राचीन अर्थात ५००० वर्षांपूर्वी भगवंताने शिकविला होता. तेच भगवान पुन्हा संगमावरच येऊन राजयोग शिकवतील, ज्याद्वारे पावन बनू शकतो. यावेळी तर तत्व देखील तमोप्रधान आहेत. पाणी देखील किती नुकसान करते. उपद्रव होत राहतात, जुन्या दुनियेमध्ये. सतयुगामध्ये उपद्रवाची गोष्टच नाही. तिथे तर प्रकृती दासी बनते. इथे प्रकृती शत्रू बनून दुःख देते. या लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये दुःखाची गोष्टच नव्हती. सतयुग होते. आता परत ते स्थापन होत आहे. बाबा प्राचीन राजयोग शिकवत आहेत. पुन्हा ५००० वर्षानंतर शिकवतील, ज्याचा पार्ट आहे तोच बजावतील. बेहदचे बाबा देखील पार्ट बजावत आहेत. बाबा म्हणतात - ‘मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून, स्थापना करून निघून जातो’. हाहाकारा नंतर मग जयजयकार होतो. जुनी दुनिया नष्ट होईल. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा जुनी दुनिया अस्तित्वात नव्हती. ५००० वर्षांची गोष्ट आहे. लाखो वर्षांची गोष्ट असू शकत नाही. तर बाबा म्हणतात - स्वतःचे कल्याण करण्यासाठी बाकी सर्व गोष्टींना सोडून या सेवेला लागा. नाराज होऊन सेवेमध्ये फसवणूक करता कामा नये. ही आहे ईश्वरीय सेवा. मायेची वादळे खूप येतील. परंतु बाबांच्या ईश्वरीय सेवेमध्ये फसवणूक करायची नाही. बाबा सेवा अर्थ डायरेक्शन तर देत राहतात. मित्र-संबंधी इत्यादी जे कोणी येतील, सर्वांचे खरे मित्र तर तुम्ही आहात. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी तर साऱ्या दुनियेचे मित्र आहात कारण तुम्ही बाबांचे मदतगार आहात. मित्रांमध्ये कोणतेही शत्रुत्व असता कामा नये. अशी कोणतीही गोष्ट झाली तर बोला, शिवबाबांची आठवण करा. बाबांच्या श्रीमताचे पालन केले पाहिजे. नाही तर आपलेच नुकसान कराल. ट्रेनमधून तुम्ही येता तिथे तर सगळे फ्री असतात. सेवेचा खूप चांगला चान्स असतो. बॅज तर खूप चांगली वस्तू आहे. प्रत्येकाने लावून ठेवायचा आहे. कोणी विचारले तुम्ही कोण आहात तर बोला, आम्ही आहोत फायर ब्रिगेड, जसे ते फायर ब्रिगेड असते, आगीला विझविण्यासाठी. तर यावेळी साऱ्या सृष्टीमधील सर्वजण काम अग्नीमध्ये जळून गेले आहेत. आता बाबा म्हणतात - ‘काम महाशत्रूवर विजय प्राप्त करा. बाबांची आठवण करा, पवित्र बना, दैवी गुण धारण करा तर बेडा (जीवन रुपी नौका) पार होईल. हे बॅज श्रीमतानुसारच तर बनले आहेत. फार थोडी मुले आहेत जी बॅजवर सेवा करतात. बाबा मुरल्यांमध्ये किती समजावून सांगत असतात. प्रत्येक ब्राह्मणाकडे हा बॅज असला पाहिजे, कोणीही भेटले तर त्यांना यावर समजावून सांगायचे आहे - हे आहेत बाबा, यांची आठवण करायची आहे. आम्ही साकारची महिमा करत नाही. सर्वांचे सद्गतीदाता एक निराकार बाबाच आहेत, त्यांची आठवण करायची आहे. आठवणीच्या बळानेच तुमची पापे नष्ट होतील. मग अंत मति सो गती होईल. दुःख धाममधून सुटाल. मग तुम्ही विष्णुपुरी मध्ये याल. किती मोठी आनंदाची बातमी आहे. लिटरेचर सुद्धा देऊ शकता. बोला, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला हे फ्री देऊ शकतो. श्रीमंतांनी तर पैसे दिलेच पाहिजेत कारण हे तर खूप छापावे लागतात. ही गोष्ट अशी आहे ज्यामुळे तुम्ही फकीरापासून विश्वाचा मालक बनाल. स्पष्टीकरण तर मिळत असते. कोणत्याही धर्माचा असो, बोला, वास्तवामध्ये तुम्ही आत्मा आहात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आता विनाश समोर उभा आहे, ही दुनिया बदलणार आहे. शिवबाबांची आठवण कराल तर विष्णुपुरीमध्ये याल. बोला, ही तुम्हाला करोडो पद्मांची गोष्ट देत आहोत.

बाबांनी कितीदा समजावून सांगितले आहे - बॅज वर सेवा करायची आहे परंतु बॅज लावतच नाहीत. लाज वाटते. ब्राह्मणी ज्या पार्टी घेऊन येतात किंवा कुठे ऑफिस इत्यादी ठिकाणी एकट्या जातात, तर हा बॅज जरूर लावलेला असला पाहिजे, ज्यांना तुम्ही यावर समजावून सांगाल तर ते खूप खुश होतील. बोला, आम्ही एका बाबांनाच मानतो, तेच सर्वांना सुख-शांती देणारे आहेत, त्यांची आठवण करा. पतित आत्मा तर जाऊ शकत नाही. आता ही जुनी दुनिया बदलत आहे. अशा प्रकारे रस्त्याने सेवा करत आले पाहिजे. तुमचे खूप नाव होईल, बाबा समजतात बहुतेक यांना लाज वाटते म्हणून बॅज लावून सेवा करत नाहीत. एक तर बॅज, शिडीचे चित्र अथवा त्रिमूर्ती, गोळा आणि झाडाचे चित्र सोबत असावे, आपसात बसून एकमेकांना समजावून सांगा तर आजूबाजूचे सर्व गोळा होतील. विचारतील हे काय आहे? बोला, शिवबाबा यांच्याद्वारे ही नवीन दुनिया स्थापन करत आहेत. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा, पवित्र बना. अपवित्र काही परत जाऊ शकणार नाहीत. अशा गोड-गोड गोष्टी ऐकवल्या पाहिजेत. तर आनंदाने सर्वजण ऐकतील. परंतू कोणाच्या लक्षातच येत नाही. सेन्टरवर क्लासला जाता तेव्हा देखील बॅज लावलेला असावा. मिलिट्रीवाल्यांचा इथे बिल्ला (बॅज) लावलेला असतो. त्यांना कधी लाज वाटते का? तुम्ही देखील रुहानी मिलिट्री आहात ना. बाबा डायरेक्शन देतात मग अंमलात का आणत नाही. बॅज लावलेला असेल तर शिवबाबांची आठवण देखील राहील - आपण शिवबाबांची संतान आहोत. दिन-प्रतिदिन सेंटर्स देखील उघडत जातील. कोणी ना कोणी समोर येतील. म्हणतील - अमक्या शहरामध्ये तुमची शाखा नाही आहे. बोला, कोणीतरी घर इत्यादीचा प्रबंध करा, निमंत्रण द्या म्हणजे आम्ही येऊन सेवा करू शकतो. ‘हिम्मते बच्चे मददे बाप’, बाबा तर मुलांनाच म्हणतील - सेंटर्स उघडा, सेवा करा. ही सर्व शिवबाबांची दुकाने आहेत ना. मुलांद्वारे चालवत आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कधीही आपसामध्ये नाराज होऊन सेवेमध्ये फसवणूक करायची नाही. विघ्न रूप बनायचे नाही. आपला दुबळेपणा दाखवायचा नाही. बाबांचे पूर्णत: मदतगार बनायचे आहे.

२) कधीही कोणासोबत भांडण वगैरे झाले तर, होऊन गेले, त्याचे चिंतन करायचे नाही. कोणी कमी-जास्त बोलले, तुम्ही त्याला विसरून जा. कल्पापूर्वी देखील असे बोलला होता. ती गोष्ट परत कधी बोलू देखील नका.

वरदान:-
शांतीचे दूत बनून सर्वांना शांतीचा संदेश देणारे मास्टर शांती, शक्ती दाता भव

तुम्ही मुले शांतीचे मेसेंजर शांतीचे दूत आहात. कुठेही राहत असताना स्वतःला नेहमी शांतीचे दूत समजून रहा. शांतीचे दूत आहोत, शांतीचा संदेश देणारे आहोत; यामुळे स्वतः देखील शांत स्वरूप शक्तिशाली रहाल आणि इतरांना देखील शांती देत रहाल. ते अशांती देतील, तुम्ही शांती द्या. ते आग लावतील, तुम्ही पाणी टाका. हेच तुम्हा शांतीचे मेसेंजर, मास्टर शांती, शक्ती दाता मुलांचे कर्तव्य आहे.

बोधवाक्य:-
जसे आवाजामध्ये येणे सोपे वाटते तसे आवाजापासून परे (दूर) जाणे देखील सोपे वाटावे.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

योगामध्ये सदैव लाइट हाऊस आणि माइट हाऊस स्थितीचा अनुभव करा. ज्ञान आहे लाइट आणि योग आहे माइट. ज्ञान आणि योग - दोन्ही शक्ती लाइट आणि माइट संपन्न असाव्यात, याला म्हणतात - मास्टर सर्वशक्तिमान. असे शक्तिशाली आत्मे कोणत्याही परिस्थितीला सेकंदामध्ये पार करतात.