11-10-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांच्या आठवणी सोबतच ज्ञानधनाने संपन्न बना, जेव्हा बुद्धीमध्ये
संपूर्ण ज्ञान फिरत राहिल तेव्हाच अपार आनंद होईल, सृष्टी चक्राच्या ज्ञानाने
तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल”
प्रश्न:-
१:- कोणत्या
मुलांचे (मनुष्यांचे) प्रेम बाबांवर असू शकत नाही?
उत्तर:-
जे रौरव नरकामध्ये राहतात आणि विकारांवर प्रेम करतात, असे मनुष्य बाबांवर प्रेम करू
शकत नाहीत. तुम्ही मुलांनी बाबांना ओळखले आहे म्हणून तुमचे बाबांवर प्रेम आहे.
प्रश्न:-
२:- कोणाला
सतयुगामध्ये येण्याचा आदेशच नाही आहे?
उत्तर:-
बाबांना देखील सतयुगामध्ये यायचे नाहीये तर मग तिथे काळ सुद्धा येऊ शकत नाही. जसे
रावणाला सतयुगामध्ये येण्याचा आदेश नाही, असेच बाबा म्हणतात - मुलांनो, मला देखील
सतयुगामध्ये येण्याचा आदेश नाही. बाबा तर तुम्हाला सुखधामच्या लायक बनवून घरी (परमधामला)
निघून जातात, त्यांना देखील मर्यादा दिल्या गेल्या आहेत.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. रुहानी मुलांनो, आठवणीच्या
यात्रेमध्ये बसले आहात? आतमध्ये हे ज्ञान आहे ना की आपण आत्मे आठवणीच्या यात्रेवर
आहोत. ‘यात्रा’ हा शब्द तर जरूर मनामध्ये आला पाहिजे. जसे ते (दुनियावाले) हरिद्वार,
अमरनाथला जाण्याची यात्रा करतात. यात्रा पूर्ण झाली की मग परत येतात. इथे मग तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही शांतीधामला जात आहोत. बाबांनी येऊन हात पकडला
आहे. हात पकडून पलीकडे घेऊन जायचे असते ना. म्हणतात देखील - ‘हात पकडा’, कारण विषय
सागरामध्ये अडकून पडले आहेत. आता तुम्ही शिव-बाबांची आठवण करा आणि घराची आठवण करा.
आतून हे आले पाहिजे की, आम्ही आता जात आहोत. यामध्ये मुखावाटे काही बोलायचे देखील
नाहीये. आतून फक्त आठवण रहावी की, ‘बाबा आलेले आहेत घेऊन जाण्यासाठी’. आठवणीच्या
यात्रेवर जरूर रहायचे आहे. या आठवणीच्या यात्रेनेच तुमची पापे भस्म होणार आहेत,
तेव्हाच मग त्या ध्येयापर्यंत पोहोचाल. बाबा किती स्पष्ट करून सांगतात. जसे लहान
मुलांना शिकवले जाते ना. सदैव बुद्धीमध्ये असावे की आम्ही बाबांची आठवण करत आहोत.
बाबांचे कामच आहे पावन बनवून पावन दुनियेमध्ये घेऊन जाणे. मुलांना घेऊन जातात.
आत्म्यालाच यात्रा करायची आहे. आम्हा आत्म्यांना बाबांची आठवण करून घरी जायचे आहे.
घरी पोचलो की मग बाबांचे काम पूर्ण झाले. बाबा येतातच मुळी पतितापासून पावन बनवून
घरी घेऊन जाण्यासाठी. शिक्षण तर इथेच शिकतो. भले हिंडा-फिरा, कोणतेही कामकाज करा,
बुद्धीमध्ये लक्षात राहू द्या. ‘योग’ शब्दावरून यात्रा सिद्ध होत नाही. योग
संन्याशांचा आहे. ती तर सर्व आहेत मनुष्यांची मते. अर्धा कल्प तुम्ही मनुष्यमतावर
चालले आहात. अर्धा कल्प दैवी मतावर चालला होता. आता तुम्हाला मिळत आहे ईश्वरीय मत.
‘योग’ शब्द म्हणू नका,
‘आठवणीची यात्रा’ म्हणा. आत्म्याला ही यात्रा करायची आहे. एक असते भौतिक यात्रा,
शरीरासोबत जातात. यामध्ये (रुहानी यात्रेवर) तर शरीराचे कामच नाही. आत्मा जाणते,
आम्हा आत्म्यांचे ते स्वीट घर आहे. बाबा आम्हाला शिकवण देतात ज्याद्वारे आम्ही पावन
बनतो. आठवण करता-करता तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे आहे. ही यात्रा आहे. आम्ही
बाबांच्या आठवणीमध्ये बसतो कारण घरी बाबांकडे जायचे आहे. बाबा येतातच पावन
बनविण्यासाठी. पावन दुनियेमध्ये तर जायचेच आहे. बाबा पावन बनवतात आणि मग नंबरवार
पुरुषार्था अनुसार तुम्ही पावन दुनियेमध्ये जाल. हे ज्ञान लक्षात राहिले पाहिजे.
आम्ही आठवणीच्या यात्रेवर आहोत. आम्हाला परत या मृत्यूलोकमधे यायचे नाहीये. बाबांचे
काम आहे आम्हाला घरापर्यंत पोहोचवणे. बाबा मार्ग सांगतात, आता तर तुम्ही
मृत्यूलोकमध्ये आहात नंतर मग अमरलोक नवीन दुनियेमध्ये असाल. बाबा लायक बनवूनच
सोडतात. सुखधाममध्ये बाबा घेऊन जाणार नाहीत. त्यांची मर्यादा आहे घरापर्यंत (परमधाम
पर्यंत) पोहोचवणे. हे संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. केवळ बाबांचीच आठवण
करायची नाहीये, त्या सोबतच ज्ञान देखील पाहिजे. ज्ञानाद्वारे तुम्ही धन कमावता ना.
या सृष्टी चक्राच्या नॉलेजद्वारे तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. बुद्धीमध्ये हे ज्ञान
आहे, या सृष्टी चक्रामध्ये फेरी मारलेली आहे. पुन्हा आपण घरी जाणार मग पुन्हा
नव्याने चक्र सुरू होणार. हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये राहिले तर आनंदाचा पारा चढेल.
बाबांची देखील आठवण करायची आहे, शांतीधाम, सुखधामची सुद्धा आठवण करायची आहे. ८४ च्या
चक्राची जर आठवण करत नसाल तर मग चक्रवर्ती राजा कसे बनणार? फक्त एकाचीच आठवण करणे
तर संन्याशांचे काम आहे कारण ते यांना (शिवबाबांना) जाणत नाहीत. ब्रह्म तत्त्वाचीच
आठवण करतात. बाबा तर व्यवस्थित मुलांना समजावून सांगतात. आठवण करत-करतच तुमची पापे
भस्म होणार आहेत. पहिले तर घरी जायचे आहे, ही आहे रुहानी यात्रा. गायन देखील आहे -
‘चारों तरफ लगाये फेरे फिर भी हरदम दूर रहे’ अर्थात बाबांपासून दूर राहिलात. ज्या
बाबांकडून बेहदचा वारसा मिळणार आहे त्यांना तर ओळखतच नाहीत. किती फेऱ्या मारल्या
आहेत. दरवर्षी सुद्धा कितीतरी यात्रा करतात. भरपूर पैसा असतो त्यामुळे यात्रेची आवड
असते. ही तर तुमची आहे रुहानी यात्रा. तुमच्यासाठी नवीन दुनिया तयार होईल मग तर
नवीन दुनियेमध्येच येणार आहात, ज्याला अमरलोक म्हटले जाते. तिथे काळ (मृत्यू) नसतो
जो कोणाला घेऊन जाईल. काळाला नवीन दुनियेमध्ये येण्याचा आदेशच नाही आहे. ही जुनी
दुनिया तर रावणाची आहे ना. तुम्ही बोलावता देखील इथेच. बाबा म्हणतात - मी जुन्या
दुनियेमध्ये जुन्या शरीरामध्ये येतो. मला देखील नवीन दुनियेमध्ये येण्याचा आदेश नाही.
मी तर पतितांना पावन बनविण्यासाठीच येतो. तुम्ही पावन बनून मग इतरांनाही पावन बनवता.
संन्यासी तर घरातून पळून जातात. एकदम नाहीसे होतात. समजतही नाही, कुठे निघून गेला;
कारण ते ड्रेस बदलतात. जसे ॲक्टर्स आपले रूप बदलत असतात. कधी पुरुषाचे स्त्री बनतात,
कधी स्त्रीचे पुरुष बनतात. हे (संन्यासी) सुद्धा रूप बदलतात. सतयुगामध्ये अशा गोष्टी
थोड्याच असणार.
बाबा म्हणतात - मी
येतोच नवीन दुनिया बनविण्यासाठी. अर्धा कल्प तुम्ही मुले राज्य करता मग ड्रामा
प्लॅन अनुसार द्वापर सुरू होते, देवता वाम मार्गामध्ये जातात, त्यांची खूप घाणेरडी
चित्रे देखील जगन्नाथ पुरीमध्ये आहेत. जगन्नाथाचे मंदिर आहे. तशी तर त्यांची राजधानी
होती जे स्वतः विश्वाचे मालक होते. ते मग मंदिरामध्ये जाऊन बंद झाले, त्यांना काळे
दाखवतात. या जगत नाथाच्या मंदिरावर तुम्ही खूप काही सांगू शकता. दुसरे कोणीही याचा
अर्थ समजावून सांगू शकणार नाही. देवताच पूज्य पासून पुजारी बनतात. ते लोक (दुनियावाले)
तर प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतासाठी म्हणतात - ‘आपे ही पूज्य, आपे ही पुजारी’.
तुम्हीच सुख देता, आणि तुम्हीच दु:ख देता. बाबा म्हणतात - ‘मी कोणाला दुःख देतच नाही’.
ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. मूल झाले कि आनंद होतो, मुलाचा मृत्यू झाला तर रडू
लागतात. म्हणतात भगवंताने दुःख दिले. अरे, हे अल्पकाळाचे सुख-दुःख तुम्हाला रावण
राज्यामध्येच मिळते. माझ्या राज्यामध्ये दुःखाची गोष्टच नसते. सतयुगाला म्हटले जाते
- अमरलोक. याचे नावच आहे मृत्यूलोक. अकाली मृत्यु होतो. तिथे तर खूप आनंद साजरा
करतात, दीर्घायुष्य देखील असते. जास्तीत जास्त आयुष्य १५० वर्षांचे असते. कधी-कधी
इथे देखील कोणाचे असे असते परंतु इथे स्वर्ग तर नाही आहे ना. काहीजण शरीराचा खूप
चांगला सांभाळ करतात तर मग आयुष्य देखील वाढते आणि मग मुले सुद्धा किती होतात.
परिवार वाढत जातो, वेगाने वृद्धी होते. जसे झाडाच्या फांद्या निघतात - ५० फांद्या
आणि त्यांच्यापासून मग अजून ५० निघतील, किती वृद्धी होत जाते. इथे देखील असेच आहे
म्हणूनच वडाच्या झाडाचे उदाहरण देतात. संपूर्ण झाड उभे आहे, परंतु फाउंडेशनच नाही
आहे. इथे देखील आदि सनातन देवी-देवता धर्माचे फाउंडेशनच राहिलेले नाही आहे. कोणालाच
माहित नाही की, देवता कधी होते, ते (भक्तिवाले) तर लाखो वर्षे म्हणतात. यापूर्वी
तुम्ही कधी हा विचार सुद्धा केला नव्हता. बाबाच येऊन या सर्व गोष्टी समजावून
सांगतात. तुम्ही आता बाबांना जाणले आहे आणि संपूर्ण ड्रामाचा आदि-मध्य-अंत, त्याचा
कालावधी इत्यादी सर्वकाही जाणले आहे. नवीन दुनिये पासून जुनी, आणि जुन्या पासून
नवीन कशी बनते, हे कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही मुले आठवणीच्या यात्रेमध्ये बसता.
ही यात्रा तर तुमची नियमीत चालणार आहे. हिंडा-फिरा परंतु या आठवणीच्या यात्रेमध्ये
रहा. ही आहे रूहानी यात्रा. तुम्ही जाणता भक्ती मार्गामध्ये आम्ही देखील त्या
यात्रांवर जात होतो. जे पक्के भक्त असतील त्यांनी तर खूप वेळा यात्रा केली असेल.
बाबांनी समजावून सांगितले आहे - एका शिवची भक्ती करणे, ही आहे अव्यभिचारी भक्ती. मग
देवतांची होते, नंतर मग ५ तत्वांची सुद्धा भक्ती करतात. देवतांची भक्ती तरी देखील
चांगली आहे कारण त्यांचे शरीर तसेही सतोप्रधान आहे, मनुष्यांचे शरीर तर पतित आहे
ना. ते (देवता) तर पावन आहेत मग द्वापर पासून सर्व पतित बनले आहेत. खाली घसरतात (अधोगती
होत जाते). तुमच्यासाठी हे शिडीचे चित्र समजावून सांगण्याकरिता खूप चांगले आहे.
जीन्नची कहाणी देखील सांगतात ना. हे सर्व दृष्टांत वगैरे यावेळचेच आहेत. सर्व
तुमच्यावरूनच बनलेले आहेत. भ्रमरीचे उदाहरण देखील तुमचेच आहे जे किड्यांना (विकारी
मनुष्यांना) आप समान ब्राह्मण बनवता. सर्व दृष्टांत इथलेच आहेत.
तुम्ही मुले यापूर्वी
भौतिक यात्रा करत होता. आता मग बाबांद्वारे रूहानी यात्रा शिकत आहात. हे तर शिक्षण
आहे ना. भक्तीमध्ये पहा काय-काय करतात. सर्वांसमोर डोके टेकवत राहतात, एकाच्याही
ऑक्युपेशनला (कार्याला) जाणत नाहीत. हिशोब केला जातो ना. सर्वात जास्त जन्म कोण
घेतात मग कमी-कमी होत जातात. हे ज्ञान देखील तुम्हाला आता मिळते. तुम्ही समजता
खरोखर स्वर्ग होता. भारतवासी तर इतके पत्थर-बुद्धी बनले आहेत, त्यांना विचारा
स्वर्ग केव्हा होता तर लाखो वर्षे म्हणतील. आता तुम्ही मुले जाणता आम्ही विश्वाचे
मालक होतो, किती सुखी होतो आता पुन्हा आम्हाला गरीबा पासून राजकुमार बनायचे आहे.
दुनिया नव्या पासून जुनी होते ना. तर बाबा म्हणतात - मेहनत करा. हे देखील जाणतात
माया वेळोवेळी विसरायला लावते.
बाबा समजावून सांगत
आहेत - बुद्धीमध्ये सदैव आठवण ठेवा आम्ही जात आहोत, या जुन्या दुनियेमधून आमचा
नांगर उचललेला आहे नाव पलीकडे जाणार आहे. गातात ना - ‘नईया हमारी पार ले जाओ’. नाव
कधी पलीकडे जाणार आहे, ते जाणत नाहीत. तर मुख्य आहे आठवणीची यात्रा. बाबांसोबतच
वारसा देखील आठवला पाहिजे. मुले मोठी होतात तेव्हा त्यांना पित्याचा वारसाच बुद्धीत
राहतो. तुम्ही तर मोठे आहातच. आत्मा लगेच समजते, ही गोष्ट तर बरोबर आहे. बेहदच्या
बाबांचा वारसा आहेच मुळी स्वर्ग. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत तर बाबांच्या
श्रीमतावर चालावे लागेल. बाबा म्हणतात - पवित्र जरूर बनायचे आहे. पवित्रतेसाठीच तर
भांडणे होतात. ते तर अगदीच जसे रौरव नरकामध्ये पडलेले आहेत. आजूनच जास्ती
विकारांमध्ये जावू लागतात त्यामुळे बाबांवर प्रेम करू शकत नाहीत. विनाशकाले विपरीत
बुद्धी आहेत ना. बाबा येतातच प्रित-बुद्धी बनविण्यासाठी. असे बरेच आहेत ज्यांची
जरासुद्धा प्रित बुद्धी नाहीये. बाबांची कधी आठवण सुद्धा करत नाहीत. शिवबाबांना
जाणतही नाहीत, आणि मानत सुद्धा नाहीत. मायेचे संपूर्ण ग्रहण लागलेले आहे. आठवणीची
यात्रा तर अजिबातच नाहीये. बाबा मेहनत तर करून घेतात, हे देखील जाणतात सूर्यवंशी,
चंद्रवंशी राजधानी इथे स्थापन होत आहे. सतयुग-त्रेतामध्ये तर कुठलेही धर्म स्थापन
होत नाहीत. राम काही धर्म स्थापन करत नाही. ते तर स्थापना करणाऱ्या बाबांद्वारे असे
बनतात. बाकीचे धर्म संस्थापक आणि बाबांच्या धर्म स्थापनेमध्ये रात्रं-दिवसाचा फरक
आहे. बाबा येतातच संगमयुगावर जेव्हा दुनियेला बदलायचे असते. बाबा म्हणतात -
‘कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगी मी येतो, त्यांनी (भक्ति वाल्यांनी) मग युगे-युगे
असा चुकीचा शब्द लिहिला आहे’. अर्धा कल्प भक्तीमार्ग देखील चालणारच आहे. म्हणून बाबा
म्हणतात - ‘मुलांनो, या गोष्टी विसरू नका’. मुले म्हणतात - बाबा, आम्ही तुम्हाला
विसरून जातो. अरे, पित्याला तर प्राणीसुद्धा विसरत नाहीत. तुम्ही का विसरता? स्वतःला
आत्मा समजत नाही! देह-अभिमानी बनल्यामुळेच तुम्ही बाबांना विसरता. आता बाबा जसे
समजावून सांगत आहेत तसे तुम्ही मुलांनी देखील समजावून सांगण्याची सवय ठेवली पाहिजे.
तुम्ही निर्भयपणे (आत्मविश्वासाने) बोलले पाहिजे. असे नाही की, मोठ्या व्यक्तीसमोर
तुम्ही गडबडून जाल. तुम्ही कुमारीच मोठ-मोठ्या विद्वान, पंडितांसमोर जाता तर
तुम्हाला निर्भय होऊन समजावून सांगायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बुद्धीमध्ये
सदैव हे लक्षात रहावे की आता आम्ही जात आहोत, आमच्या बोटीचा नांगर या जुन्या
दुनियेमधून उचलला गेला आहे. आम्ही आहोत रूहानी यात्रेवर. हीच यात्रा करायची आहे आणि
करवून घ्यायची आहे.
२) कुठल्याही मोठ्या
व्यक्तीसमोर निर्भयपणे बोलायचे आहे, गडबडून जायचे नाही. देही-अभिमानी बनून समजावून
सांगण्याची सवय लावायची आहे.
वरदान:-
व्यर्थ आणि
माये पासून इनोसेंट (निष्पाप) बनून दिव्यतेचा अनुभव करणारे महान आत्मा भव
महान आत्मा अर्थातच
संत आत्मा त्याला म्हणता येईल जी व्यर्थ आणि मायेपासून इनोसेंट (निष्पाप) असेल. जसे
देवता यापासून इनोसेंट होते तर असे आपले ते संस्कार इमर्ज करा, व्यर्थसाठी अविद्या
स्वरूप बना; कारण हा व्यर्थचा जोश बरेचदा सत्यतेचा होश, यथार्थतेचा होश (योग्य-अयोग्यचे
भान) नाहीसा करतो. म्हणूनच समय, श्वास, बोल, कर्म, सर्वांमध्ये व्यर्थ पासून
इनोसेंट बना. जेव्हा व्यर्थची अविद्या होईल तेव्हा दिव्यत्वाची स्वतः अनुभुती होईल
आणि इतरांना अनुभव करवेल.
बोधवाक्य:-
फर्स्ट
डिव्हिजनमध्ये यायचे असेल तर ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवा.