11-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे कर्तव्य आहे सर्वांना स्थायी सुख आणि शांतीचा रस्ता सांगणे, शांती
मध्ये राहा आणि शांतीचे बक्षीस द्या”
प्रश्न:-
कोणत्या गुह्य
रहस्याला समजण्यासाठी बेहदची बुद्धी पाहिजे?
उत्तर:-
ड्रामाचा जो सिन ज्या वेळी चालणार आहे, त्याच वेळी चालेल. याची ॲक्युरेट आयु आहे,
बाबा देखील आपल्या ॲक्युरेट वेळेवर येतात, यामध्ये एका सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत
नाही. पूर्ण ५ हजार वर्षांनंतर बाबा येऊन प्रवेश करतात, हे गुह्य रहस्य समजण्यासाठी
बेहदची बुद्धी पाहिजे.
गीत:-
बदल जाए दुनिया
न बदलेंगे हम…
ओम शांती।
रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगतात. मुलांना रस्ता सांगतात -
शांतीधाम आणि सुखधामाचा. यावेळी सर्व मनुष्य विश्वामध्ये शांती इच्छितात. प्रत्येक
व्यक्तीला देखील शांती हवी आहे आणि विश्वामध्ये देखील शांतीची अपेक्षा करतात.
प्रत्येक जण म्हणतो मनाची शांती हवी. आता ती देखील कुठून मिळू शकते. शांतीचा सागर
तर बाबाच आहेत, ज्यांच्याकडून वारसा मिळू शकतो. प्रत्येकाला स्वतंत्र सुद्धा मिळतो
आणि होलसेल मध्ये देखील मिळतो. अर्थात सर्वांना मिळतो. जी मुले शिकतात ती हे समजू
शकतात की, आम्ही शांतीचा वारसा घेण्यासाठी आपलाही पुरुषार्थ करत आहोत आणि इतरांना
देखील रस्ता सांगतो. विश्वामध्ये शांती तर होणारच आहे. भले कुणी वारसा घ्यायला येवो
न येवो. मुलांचे कर्तव्य आहे, सर्व मुलांना शांती द्यायची आहे. हे समजू शकत नाहीत,
२-४ जणांना वारसा मिळाल्याने काय होईल. कोणाला रस्ता सांगितला जातो, परंतु निश्चय
नसल्या कारणाने दुसऱ्यांना आप समान बनवू शकत नाहीत. जे निश्चयबुद्धी आहेत ते समजतात
बाबांकडून आम्हाला वर मिळत आहेत. वरदान देतात ना - आयुष्यमान भव, धनवान भव देखील
म्हणतात. फक्त म्हटल्याने तर आशीर्वाद मिळू शकत नाही. आशीर्वाद मागतात तर त्यांना
सांगितले जाते तुम्हाला शांती पाहिजे तर असा पुरुषार्थ करा. मेहनतीने सर्व काही
मिळेल. भक्तीमार्गामध्ये किती आशीर्वाद घेतात. आई, वडील, टीचर, गुरु इत्यादी
सर्वांकडून आशीर्वाद मागतात की आम्ही सुखी आणि शांत राहावे. परंतु राहू शकत नाहीत.
कारण इतके असंख्य मनुष्य आहेत, तर त्यांना सुख-शांती कशी मिळू शकणार. गातात देखील -
‘शांती देवा’. बुद्धीमध्ये येते - हे परमपिता परमात्मा, आम्हाला शांतीचे बक्षीस द्या.
वास्तविक बक्षीस त्याला म्हटले जाते जी वस्तू एखाद्याला दिली जाते. म्हणतील - हे
तुम्हाला बक्षीस दिले आहे, इनाम आहे. बाबा म्हणतात - बक्षीस कोणी कितीही देतात,
धनाचे, घराचे, कपडे इत्यादींचे देतात, ते झाले दान-पुण्य अल्पकाळासाठी. मनुष्य,
मनुष्याला देतात. श्रीमंत गरिबाला अथवा श्रीमंत, श्रीमंताला देत आले आहेत. परंतु ही
तर शांती आणि सुख स्थायी आहे. इथे तर एका जन्मासाठी देखील कोणी सुख शांती देऊ शकत
नाहीत कारण त्यांच्याकडेच नाही आहे. देणारे एक बाबाच आहेत. त्यांना
सुख-शांती-पवित्रतेचा सागर म्हटले जाते. उच्च ते उच्च भगवंताचीच महिमा गायली जाते.
समजतात त्यांच्याकडूनच शांती मिळेल. मग ते साधू-संत इत्यादींकडे जातात कारण
भक्तीमार्ग आहे ना तर फेऱ्या मारत राहतात. तो सर्व आहे अल्पकाळासाठी पुरुषार्थ.
तुम्हा मुलांचे आता ते सर्व बंद होते. तुम्ही लिहिता देखील बेहदच्या बाबांकडून १००
टक्के पवित्रता, सुख, शांतीचा वारसा प्राप्त करू शकता. इथे १०० टक्के अपवित्रता,
दुःख, अशांती आहे. परंतु मनुष्य समजत नाहीत. म्हणतात ऋषी-मुनी इत्यादी तर पवित्र
आहेत. परंतु उत्पत्ती तर तरीही विषातून (विकारातून) होते ना. मूळ गोष्टच ही आहे.
रावण राज्यामध्ये पवित्रता असू शकत नाही. पवित्रता-सुख इत्यादी सर्वांचा सागर एक
बाबाच आहेत.
तुम्ही जाणता आम्हाला
शिवबाबांकडून २१ जन्म अर्थात अर्धाकल्प २५०० वर्षांसाठी वारसा मिळतो. ही गॅरंटी आहे.
अर्धा कल्प सुखधाम, अर्धा कल्प दुःख धाम. सृष्टीचे दोन भाग आहेत - एक नवी, एक जुनी.
परंतु नवीन कधी होते, जुनी कधी होते, हे देखील जाणत नाहीत. झाडाची आयु इतकी ॲक्युरेट
सांगू शकणार नाहीत. आता बाबांद्वारे तुम्ही या झाडाला जाणता. हे ५ हजार वर्षांचे
जुने झाड आहे, याच्या ॲक्युरेट आयु बद्दल तुम्हाला माहित आहे, इतर जी झाडे असतात
त्यांच्या आयु विषयी कोणाला माहित नसते, अंदाजे सांगतात. वादळ आले, झाड कोसळले,
आयुष्य संपले. मनुष्यांचा देखील अचानक मृत्यू होत राहतो. या बेहदच्या झाडाचे पूर्ण
आयुष्य ५ हजार वर्षांचे आहे. यामध्ये एक दिवस ना कमी होऊ शकत, ना जास्त होऊ शकत. हे
तयार झाड आहे. यामध्ये फरक पडू शकत नाही. ड्रामामध्ये जो सिन ज्यावेळी चालणार आहे,
त्याचवेळी चालेल. हुबेहूब रिपीट होणार आहे. आयु देखील ॲक्युरेट आहे. बाबांना देखील
नवी दुनिया स्थापन करण्यासाठी यायचे आहे. ॲक्युरेट वेळेवर येतात. त्यामध्ये एका
सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत नाही. ही देखील आता तुमची बेहदची बुद्धी झाली. तुम्हीच
समजू शकता पूर्ण ५ हजार वर्षानंतर बाबा येऊन प्रवेश करतात, म्हणून शिवरात्री
म्हणतात. कृष्णासाठी जन्माष्टमी म्हणतात. शिवाची जन्माष्टमी म्हणत नाहीत, शिवाची
रात्री म्हणतात कारण जर जन्म झाला तर मृत्यू देखील होईल. मनुष्यांचा ‘जन्म दिवस’
म्हटले जाईल. शिवासाठी कायम शिवरात्री म्हणतात. दुनियेमध्ये या गोष्टींबद्दल काहीच
ठाऊक नाही आहे. तुम्ही समजता ‘शिवरात्री’ का म्हणतात, ‘जन्माष्टमी’ का म्हणत नाहीत.
त्यांचा जन्म दिव्य अलौकिक आहे, जो इतर कोणाचा असू शकत नाही. हे कोणीही जाणत नाही -
शिवबाबा कधी, कसे येतात. शिवरात्रीचा अर्थ काय आहे, हे तुम्हीच जाणता. ही आहे बेहदची
रात्र. भक्तीची रात्र पूर्ण होऊन दिवस होतो. ब्रह्माची रात्र आणि दिवस तर मग
ब्राह्मणांचा देखील झाला. एका ब्रह्माचा खेळ थोडाच चालतो. आता तुम्ही जाणता, आता
दिवस सुरू होणार आहे. शिकता-शिकता जाऊन आपल्या घरी पोहोचणार, मग दिवसामध्ये येणार.
अर्धा कल्प दिवस आणि अर्धा कल्प रात्र गायली जाते परंतु कोणाच्याही बुद्धीमध्ये येत
नाही. ते लोक तर म्हणतील की कलियुगाचे आयुष्य अजून ४० हजार वर्षे बाकी आहे, सतयुगाची
लाखो वर्षे आहेत मग अर्ध्या-अर्ध्याचा हिशोब जमत नाही. कल्पाच्या आयु विषयी कोणीही
जाणत नाही. तुम्ही साऱ्या विश्वाच्या आदि-मध्य-अंताला जाणता. हे तर दर ५ हजार
वर्षानंतर सृष्टी चक्र फिरत राहते. विश्व तर आहेच, त्यामध्ये पार्ट बजावता-बजावता
मनुष्यच त्रस्त होऊन जातात. हे कसले आवागमन आहे. जर ८४ लाख जन्मांचे आवागमन असते तर
माहित नाही काय झाले असते. न जाणल्या कारणाने कल्पाचे आयुष्य देखील वाढवले आहे. आता
तुम्ही मुले बाबांकडून सन्मुख शिकत आहात. आतमध्ये भासना येते - आम्ही प्रॅक्टिकल
मध्ये (प्रत्यक्षात) बसलो आहोत. पुरुषोत्तम संगमयुगाला देखील जरूर यायचे आहे. केव्हा
येते, कसे येते - हे कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता तर किती गदगद व्हायला हवे.
तुम्ही कल्प-कल्प बाबांकडून वारसा घेता अर्थात मायेवर विजय प्राप्त करता नंतर मग
हरता. ही आहे बेहदची हार आणि जीत. त्या राजांची (या दुनियेतील) तर अनेकदा हार-जीत
होत असते. अनेक लढाया होत राहतात. छोटीशी लढाई झाली तर म्हणतात आता आम्ही जिंकले.
काय जिंकले? थोडासा तुकडा जिंकला. मोठ्या लढाईमध्ये हरतात तर मग झेंडा खाली घेतात.
सर्वप्रथम तर एक राजा असतो मग अजून-अजून वृद्धी होत जाते. सर्वप्रथम या
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते मग इतर राजे येणे सुरू झाले. जसे पोपचे दाखवतात.
अगोदर एक होता नंतर मग नंबरवार इतर पोप देखील बसत गेले. कोणाच्या मृत्यूचा तर
भरवसाच नाही आहे ना.
तुम्ही मुले जाणता
आम्हाला बाबा अमर बनवत आहेत. अमरपुरीचे मालक बनवत आहेत, किती आनंद झाला पाहिजे. हा
आहे मृत्यू-लोक. तो आहे अमर-लोक. या गोष्टींना नवीन कोणीही समजू शकणार नाही. त्यांना
मजा येणार नाही, जितकी जुन्या लोकांना येईल. दिवसेंदिवस वृद्धी होत जाते. निश्चय
पक्का होतो. यामध्ये सहनशीलता देखील खूप असली पाहिजे. ही तर आसुरी दुनिया आहे, दुःख
द्यायला वेळ लावत नाहीत. तुमची आत्मा म्हणते - आम्ही आता बाबांच्या श्रीमतावर चालत
आहोत. आम्ही संगमयुगावर आहोत. बाकी सर्व कलियुगामध्ये आहेत. आम्ही आता पुरुषोत्तम
बनत आहोत. पुरुषांमध्ये उत्तम पुरुष शिक्षणाद्वारेच बनतात. शिक्षणाद्वारेच चीफ
जस्टिस (मुख्य न्यायाधीश) इत्यादी बनतात ना. तुम्हाला बाबा शिकवतात. या
शिक्षणाद्वारेच तुम्ही आपल्या पुरुषार्थानुसार पद प्राप्त करता. जितके जे शिकतील
तितकी ग्रेड मिळेल. यामध्ये राजाईची ग्रेड आहे. तशी त्या शिक्षणामध्ये राजाईची
ग्रेड नसते. तुम्ही जाणता आम्ही राजांचाही राजा बनत आहोत. तर आतून किती आनंद झाला
पाहिजे. आम्ही डबल मुकुटधारी खूप श्रेष्ठ बनतो. स्वयं ईश्वर पिता आम्हाला शिकवत
आहेत. कधी कोणी समजू शकणार नाही की निराकार बाबा कसे येऊन शिकवतात. मनुष्य बोलावतात
देखील - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. तरी देखील पावन बनत नाहीत. बाबा
म्हणतात - काम विकार महाशत्रू आहे. तुम्ही एकीकडे बोलावता की, ‘पतित-पावन या’, आता
मी आलो आहे, सांगतो आहे - ‘मुलांनो, पतीतपणा सोडून द्या’, तर तुम्ही सोडत का नाही.
असे थोडेच बाबा तुम्हाला पावन बनवतील आणि तुम्ही पतित बनत रहाल. असे पुष्कळजण पतित
बनतात. कोणी मग खरे बोलतात, ‘बाबा, ही चूक झाली’. बाबा म्हणतात - कोणतेही पापकर्म
झाले तर लगेच सांगा. कुणी खरे, कुणी खोटे बोलतात. कोण विचारतात? मी थोडाच
प्रत्येकाच्या मनातले ओळखत बसणार, हे तर होऊ शकत नाही. मी येतोच फक्त सल्ला
देण्यासाठी. पावन बनला नाहीत तर तुमचेच नुकसान आहे. मेहनत करून पावन बनलेले पुन्हा
जर पतित बनलात, तर केलेली कमाई नष्ट होईल. लाज वाटेल आम्ही स्वतःच पतित बनलो आहोत
मग दुसऱ्यांना कसे सांगणार की पावन बना. आतून मन खाईल की आम्ही किती आदेशाचे
उल्लंघन केले. इथे तुम्ही बाबांसमोर डायरेक्ट प्रतिज्ञा करता, जाणता बाबा आम्हाला
सुखधाम-शांतीधामचे मालक बनवत आहेत. हाजिर-नाजिर आहेत (उपस्थित आहेत आणि साऱ्या घटना
पाहत देखील आहेत), आपण त्यांच्या सन्मुख बसलो आहोत. यांच्यामध्ये अगोदर हे ज्ञान
थोडेच होते. कोणता गुरु सुद्धा नव्हता - ज्याने नॉलेज दिले. जर गुरु असता तर फक्त
एकालाच ज्ञान देतील का. गुरूंचे फॉलोअर्स तर खूप असतात ना. एकटा थोडाच असेल. या
समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. सद्गुरु आहेच एक. ते आम्हाला रस्ता सांगतात. आम्ही
मग इतरांना सांगतो. तुम्ही सर्वांना म्हणता - बाबांची आठवण करा. बस्स. उच्च ते उच्च
पित्याची आठवण केल्यानेच उच्च पद मिळेल. तुम्ही राजांचाही राजा बनता. तुमच्याकडे
अगणित धन असेल. तुम्ही आपली झोळी भरता ना. तुम्ही जाणता बाबा आमची झोळी भरपूर भरत
आहेत. असे म्हणतात - कुबेराकडे प्रचंड धन होते. वास्तविक तुम्ही प्रत्येक जण कुबेर
आहात. तुम्हाला वैकुंठ रुपी खजिना मिळतो. खुदा-दोस्तची देखील कहाणी आहे. त्यांना
पहिला जोकोणी भेटत असे त्याला ते एका दिवसासाठी बादशाही देत असत. हे सर्व दृष्टांत
आहेत. अल्लाह अर्थात पिता, ते अवलदिन रचता आहेत. मग साक्षात्कार होतो. तुम्ही जाणता
बरोबर आम्ही योगबलाने विश्वाची बादशाही घेतो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या आसुरी
दुनियेमध्ये खूप-खूप सहनशील बनून रहायचे आहे. कोणी शिव्या दिल्या, दुःख दिले तरीही
सहन करायचे आहे. बाबांचे श्रीमत कधीही सोडायचे नाही.
२) डायरेक्ट बाबांनी
पावन बनण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे कधीही पतित बनायचे नाही. कधी कोणते पाप झाले
तर लपवायचे नाहीये.
वरदान:-
एकनामी आणि
इकॉनॉमीच्या पाठाद्वारे भयग्रस्त वायुमंडळामध्ये देखील अचल-अडोल भव
समयानुसार अशांती आणि
भयग्रस्त वायुमंडळ वाढत जात आहे, अशावेळी अचल-अडोल राहण्यासाठी बुद्धीची लाईन खूप
क्लियर असायला हवी. यासाठी समयानुसार टचिंग आणि कॅचिंग पॉवरची आवश्यकता आहे याला
वाढविण्याकरिता ‘एकनामी’ आणि ‘इकॉनॉमी’ वाले बना. एकनामी आणि इकॉनॉमी करणाऱ्या
मुलांची लाईन क्लिअर असल्याकारणाने बापदादांच्या डायरेक्शनला सहजच कॅच करून अशांत
वायुमंडळामध्ये देखील अचल-अडोल राहतात.
बोधवाक्य:-
स्थूल आणि
सूक्ष्म इच्छांचा त्याग करा तेव्हाच कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकाल.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
आता मनसाची क्वालिटी
वाढवा तेव्हाच क्वालिटीवाले आत्मे जवळ येतील, यामध्ये डबल सेवा आहे - स्वतःची देखील
आणि इतरांची देखील. स्वतःसाठी वेगळी मेहनत करावी लागणार नाही. प्रारब्ध प्राप्तच आहे,
अशी स्थिती अनुभव होईल. या वेळचे श्रेष्ठ प्रारब्ध आहे - “सदैव स्वतः
सर्वप्राप्तींनी संपन्न राहणे आणि संपन्न बनविणे”.