11-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - स्वतःवर बारीक लक्ष ठेवा, कोणतेही बेकायदेशीर वर्तन असू नये, श्रीमताचे उल्लंघन केल्यामुळे खाली याल (अध:पतन होईल)”

प्रश्न:-
पद्मा-पदमपति बनण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?

उत्तर:-
नेहमी हे लक्षात असावे - जसे कर्म आपण करू आपल्याला पाहून इतरही करू लागतील. कोणत्याही गोष्टीचा वृथा अहंकार नसावा. मुरली कधीही मिस होता कामा नये. मनसा-वाचा-कर्मणा आपली काळजी घ्या. जर हे डोळे तुम्हाला धोका देत नसतील तर पद्मांची कमाई जमा करू शकाल. यासाठी अंतर्मुखी होऊन बाबांची आठवण करा आणि विकर्मांपासून दूर सुरक्षित रहा.

ओम शांती।
रुहानी मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे, इथे तुम्हा मुलांना या विचारामध्ये जरूर बसायचे आहे की, हे बाबा देखील आहेत, टीचर आणि सद्गुरु सुद्धा आहेत. आणि तुम्ही हे देखील अनुभव करता - बाबांची आठवण करत-करत पवित्र बनून, पवित्रधाममध्ये जाऊन पोहोचणार. बाबांनी समजावून सांगितले आहे की पवित्रधाममधूनच तुम्ही खाली उतरता. त्याचे नावच आहे पवित्रधाम. सतोप्रधाना पासून मग सतो, रजो, तमो... आता तुम्ही समजता की आपण खाली घसरलेले आहोत अर्थात वेश्यालयामध्ये आहोत. भले तुम्ही संगमयुगावर आहात, परंतु ज्ञानाद्वारे तुम्ही जाणता की आपण जुन्या दुनियेपासून दूर गेलेले आहोत तरीही जर आम्ही शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहिलो तर शिवालय काही दूर नाही. जर शिवबाबांची आठवण करत नसाल तर शिवालय खूप दूर आहे. सजा खावी लागते त्यामुळे शिवालय खूप दूर आहे. तर बाबा मुलांना काही जास्त त्रास देत नाहीत. एक तर वारंवार सांगतात मनसा-वाचा-कर्मणा पवित्र बनायचे आहे. हे डोळे सुद्धा खूप दगा देतात, यांची खूप काळजी घ्यावी लागते. बाबांनी समजावून सांगितले आहे की, ध्यान आणि योग पूर्णतः वेगवेगळे आहेत. योग अर्थात आठवण. डोळे उघडे असताना देखील तुम्ही आठवण करू शकता. ध्यानाला काही योग म्हटले जात नाही. भोग घेऊन जातात तेव्हा देखील डायरेक्शन प्रमाणेच जायचे आहे. यामध्ये माया देखील खूप येते. माया अशी आहे जी एकदम नाकामध्ये दम आणते. जसे बाबा बलवान आहेत, तशी माया देखील खूप बलवान आहे. इतकी बलवान आहे की तिने साऱ्या दुनियेलाच वेश्यालयामध्ये ढकलले आहे त्यामुळे यामध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागते. बाबांची नियमानुसार आठवण पाहिजे. नियमबाह्य काही काम केले तर एकदम खाली पाडते (पतित बनवते). ध्यानामध्ये जाणे इत्यादीची कधीही इच्छा ठेवायची नाही. ‘इच्छा मात्रम् अविद्या…’ बाबा तुमची सर्व मनोकामना न मागताच पूर्ण करतात, जर बाबांच्या आज्ञेवर चाललात तर. जर बाबांची आज्ञा न मानता उलटा रस्ता पकडलात तर असे होऊ शकते की स्वर्गाच्या ऐवजी नरकामध्येच जाऊन पडाल. गायन देखील आहे ‘गज को ग्राह ने खाया’. अनेकांना ज्ञान देणारे, भोग लावणारे आज आहेत कुठे! कारण नियमबाह्य वर्तनामुळे पूर्णत: मायावी बनतात. देवता बनता-बनता असूर बनतात. बाबा जाणतात की, खूप चांगले पुरुषार्थी जे देवता बनणारे होते ते असूर बनून असुरांबरोबर राहतात. ट्रेटर होतात. बाबांचे बनून मग मायेचे बनतात, त्यांना ट्रेटर म्हटले जाते. स्वतःवर लक्ष ठेवावे लागते. श्रीमताचे उल्लंघन केले तर हे कोसळलेच (विकारी बनले). कळणार सुद्धा नाही. बाबा तर मुलांना सावध करतात की, कोणतेही असे वर्तन करू नका जे रसातळाला जाऊन पोहोचाल.

कालही बाबांनी सांगितले - गोप (पांडव) भरपूर आहेत आपसामध्ये कमिटी इत्यादी बनवतात, जे काही करतात, जर ते श्रीमताच्या आधारे करत नसतील तर डिससर्व्हीस करतात. बिना श्रीमत कराल तर खालीच याल (पतनच होईल). बाबांनी सुरुवातीला कमिटी बनवली होती ती मातांची बनवली होती कारण कलश तर मातांनाच मिळतो. ‘वंदे मातरम्’ गायले गेले आहे ना. जर गोप लोक कमिटी बनवत असतील तर ‘वंदे गोप’ असे तर गायन नाही आहे. श्रीमतावर नसेल तर मायेच्या जाळ्यामध्ये अडकतात. बाबांनी मातांची कमिटी बनवली, त्यांच्या हवाली सर्व काही केले. पुरुष बरेचदा दिवाळखोर बनतात, स्त्रिया नाहीत. तर बाबा देखील कलश मातांच्या डोक्यावर ठेवतात. या ज्ञान मार्गामध्ये माता देखील दिवाळखोरीत जाऊ शकतात. जे पद्मा-पदम भाग्यशाली बनणारे असतात, ते मायेकडून हार खाऊन दिवाळखोरीत जाऊ शकतात. यामध्ये स्त्री-पुरुष दोघेही दिवाळखोरीत जाऊ शकतात आणि जातात देखील. कित्येकजण हार खाऊन परत गेले तर जणू दिवाळखोर झाले ना. बाबा सांगतात की, भारतवासी तर पूर्णपणे दिवाळखोर झाले आहेत. माया किती शक्तिशाली आहे. ज्यामुळे समजू शकत नाहीत की आपण काय होतो, आणि आता कुठून इतके खाली आलो आहोत. इथे देखील वर चढता-चढता मग श्रीमताला विसरून आपल्याच मतावर चालू लागतात तर दिवाळखोरीत जातात. ते लोक तर दिवाळखोरीत जातात तर मग ५-७ वर्षानंतर पुन्हा उभे राहतात. इथे तर ८४ जन्मांसाठी दिवाळे निघते. उच्च पद मिळवू शकत नाहीत. दिवाळखोर होतच राहतात. बाबांकडे फोटो असता तर सांगितले असते. तुम्ही म्हणाल - ‘बाबा एकदम बरोबर सांगत आहेत’. हे किती मोठे महारथी होते, खूप जणांना जागे करत होते (ज्ञान देत होते), परंतु ते आज नाही आहेत. दिवाळखोर आहेत. बाबा वारंवार मुलांना सावध करत राहतात. आपल्या मतावर कमिटी इत्यादी बनवणे हे काहीच उपयोगाचे नाही. एकत्र येऊन आपसामध्ये झरमुई झगमूई (व्यर्थ गोष्टी) करणे, ‘हा असे करत होता, अमका असे करत होता…’, पूर्ण दिवसभर हेच करत राहतात. बाबांसोबत बुद्धियोग लावल्यानेच सतोप्रधान बनाल. बाबांचे बनलात आणि बाबांसोबत योग नसेल तर वारंवार घसरत रहाल (पतन होत राहील). कनेक्शनच तुटून जाते. लिंक जर तुटली तर घाबरून जायचे नाही की, माया आम्हाला इतका त्रास का देते. प्रयत्न करून बाबांसोबत लिंक जोडली पाहिजे. नाहीतर मग बॅटरी चार्ज कशी होणार. विकर्म झाल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होते. सुरुवातीला तर कित्येक जण येऊन बाबांचे बनले. भट्टीमध्ये आले परंतु आज कुठे आहेत. खाली कोसळले (पतित झाले) कारण त्यांना जुनी दुनिया आठवली. आता बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला बेहदचे वैराग्य देतो, या जुन्या दुनियेवर मन जडू देऊ नका. मनाला स्वर्गामध्ये गुंतवायचे आहे’. जर असे लक्ष्मी-नारायण बनायचे असेल तर मेहनत करावी लागेल. बुद्धियोग एका बाबांशीच असला पाहिजे. जुन्या दुनियेपासून वैराग्य. सुखधाम आणि शांतीधामची आठवण करा. जितके होईल तितके उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करा. हे तर एकदम सोपे आहे. तुम्ही इथे आलेच आहात नरापासून नारायण बनण्याकरिता. सर्वांना सांगायचे आहे की आता तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे आहे कारण रिटर्न जर्नी (परतीचा प्रवास) आहे. वर्ल्डची हिस्ट्री-जॉग्राफी रिपीट अर्थात नरका पासून स्वर्ग, आणि पुन्हा स्वर्गा पासून नरक. हे चक्र फिरतच राहते.

बाबांनी सांगितले आहे - ‘इथे स्वदर्शन चक्रधारी होऊन बसा. याच आठवणीमध्ये रहा की, आपण किती वेळा चक्र फिरलो आहोत. आता पुन्हा आपण देवता बनत आहोत. दुनियेमध्ये कोणीही या रहस्याला समजत नाहीत. हे ज्ञान देवतांना नाही आहे. ते तर आहेतच पवित्र. त्यांना हे ज्ञानच नाही जे शंख वाजवतील. ते पवित्र आहेत, त्यांना ही निशाणी देण्याची गरज नाही. निशाणी तेव्हा असते जेव्हा दोघे एकत्र असतात. तुम्हालाही निशाणी नाही कारण तुम्ही आज देवता बनता-बनता उद्या असूर बनता. बाबा देवता बनवतात आणि माया असूर बनवते. बाबा जेव्हा सांगतात तेव्हा समजते की खरोखर आमची अवस्था घसरलेली आहे (अध:पतन झाले आहे). बिचारे किती शिवबाबांच्या खजिन्यामध्ये जमा करतात नंतर परत मागून असूर बनतात. यामध्ये पूर्णत: योगाचीच कमतरता आहे. योगानेच पवित्र बनायचे आहे. बोलावता देखील - ‘ओ बाबा या, आम्हाला पतितापासून पावन बनवा, ज्यामुळे आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकू’. आठवणीची यात्रा आहेच पावन बनून उच्च पद प्राप्त करण्यासाठी. जे मरतात (बाबांना सोडून जातात), तरीही थोडे-फार ऐकले तर आहे त्यामुळे, ते शिवालयमध्ये येणार जरूर. पद भले मग कोणतेही मिळू दे. एकदा जरी आठवण केली तरी स्वर्गामध्ये येतील जरूर. परंतु उच्च पद मिळू शकणार नाही. स्वर्गाचे नाव ऐकून आनंदित झाले पाहिजे. नापास होऊन पै-पैशाचे पद मिळवले, यामध्ये खुश होऊन जायचे नाही. फिलिंग (जाणीव) तर होते ना - मी नोकर आहे. नंतर शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील की, आपण काय बनणार, आपल्याकडून कोणती विकर्म झाली आहेत, ज्यामुळे अशी अवस्था झाली आहे. मी महाराणी का बनू नये. पावला-पावलावर काळजीपूर्वक चालल्यामुळे तुम्ही पद्मापदमपति बनू शकता. मंदिरांमध्ये देवतांना ‘पद्म’चे चिन्ह दाखवतात. पदामध्ये फरक होतो. आजच्या राजाईचा किती दबदबा असतो! आहे तर अल्प-काळासाठी. सदाकाळाचे राजा तर बनू शकत नाहीत. तर आता बाबा म्हणतात - ‘तुम्हाला लक्ष्मी-नारायण बनायचे असेल तर पुरुषार्थ देखील तसा पाहिजे. आपण किती दुसऱ्यांचे कल्याण करतो? अंतर्मुखी होऊन किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहतो? आता आम्ही जात आहोत आपल्या स्वीट होम मध्ये. मग येणार सुखधाममध्ये. हे सर्व ज्ञानाचे मंथन आतमध्ये चालत रहावे. बाबांमध्ये ज्ञान आणि योग दोन्ही आहे. तुमच्यामध्ये देखील असायला हवे. जाणता की, शिवबाबा आम्हाला शिकवतात, तर ज्ञान सुद्धा झाले आणि आठवण सुद्धा झाली. ज्ञान आणि आठवण दोन्ही एकाचवेळी चालते. असे नाही, योगामध्ये बसा, बाबांची आठवण करत रहा आणि नॉलेज विसरून जाल. बाबा, योग शिकवतात तर नॉलेज विसरून जातात काय? सर्व नॉलेज त्यांच्यामध्ये असते. तुम्हा मुलांमध्ये देखील नॉलेज असले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. जसे कर्म मी करेन मला पाहून इतरही करतील. मी मुरली वाचली नाही तर बाकीचे सुद्धा वाचणार नाहीत. वृथा अहंकार आला तर माया लगेच वार करते. पावलो-पावली बाबांकडून श्रीमत घेत रहायचे आहे. नाही तर काही ना काही विकर्म बनतात. बरीच मुले चुका करून बाबांना सांगत नाहीत तर आपलाच सत्यानाश करून घेतात. चूक झाल्यामुळे माया थप्पड मारते. वर्थ नॉट ए पेनी (कवडी मोल) बनवते. अहंकारामध्ये आल्यामुळे माया खूप विकर्म करायला लावते. बाबांनी असे थोडेच सांगितले आहे की, अशा प्रकारे पुरुषांच्या कमिट्या बनवा म्हणून. कमिटीमध्ये एक-दोन बुद्धिमान चाणाक्ष मुली जरूर असल्या पाहिजेत. ज्यांच्या सल्ल्यानेच काम होईल. कलश तर लक्ष्मीला दिला जातो ना. गायन देखील आहे, अमृत पाजत होते आणि मग कुठे यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करत होते. अनेक प्रकारची विघ्न आणणारे आहेत. पूर्ण दिवसभर याच झरमुई झगमूईच्या गोष्टी (व्यर्थ गोष्टी) करत राहतात; हे खूप वाईट आहेत. कोणतीही गोष्ट असेल तर बाबांना रिपोर्ट दिला पाहिजे. सुधारणारे तर एक बाबाच आहेत. कायदा तुम्ही आपल्या हातामध्ये घेऊ नका. तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये रहा. सर्वांना बाबांचा परिचय देत रहा तेव्हाच असे बनू शकाल. माया अतिशय कठोर आहे. कोणालाच सोडत नाही. बाबांना नियमित समाचार लिहिला पाहिजे. मार्गदर्शन घेत राहिले पाहिजे. तसे तर डायरेक्शन सदैव मिळत राहते. मुले असा विचार करतात की, बाबांनी तर स्वतःच या गोष्टीवर समजावून सांगितले आहे, बाबा तर अंतर्यामी आहेत. बाबा म्हणतात - ‘नाही, मी तर नॉलेज शिकवतो. यामध्ये अंतर्यामीची गोष्टच नाही. हां, हे जाणतो की ही सर्व माझी मुले आहेत. प्रत्येक शरीरामध्ये माझी मुले आहेत. बाकी असे नाही की बाबा सर्वांमध्ये विराजमान आहेत. मनुष्य तर उलटच समजतात. बाबा म्हणतात - ‘मी जाणतो की, सर्वांच्या तख्तावर आत्मा विराजमान आहे. ही तर किती सोपी गोष्ट आहे. सर्व चैतन्य आत्मे आपल्या-आपल्या तख्तावर बसले आहेत तरी देखील परमात्म्याला सर्वव्यापी म्हणतात, ही आहे एकच चूक. या कारणामुळेच भारत इतका घसरला आहे (अध:पतन झाले आहे). बाबा म्हणतात - ‘तुम्ही माझी खूप निंदा केली आहे. विश्वाचा मालक बनविणाऱ्याला तुम्ही शिवी दिली आहे’; म्हणून बाबा म्हणतात - यदा यदाही…’ बाहेरचे (विदेशी) हे सर्वव्यापीचे ज्ञान भारतवासीयांकडून शिकतात. जसे भारतवासी त्यांच्याकडून कला शिकतात ते मग उलटे शिकतात. तुम्हाला तर एका बाबांचीच आठवण करायची आहे आणि बाबांचा परिचय सुद्धा सर्वांना द्यायचा आहे. तुम्ही आहात आंधळ्यांची काठी. काठीने मार्ग दाखवतात ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रत्येक कार्य बाबांच्या आज्ञे प्रमाणे करायचे आहे. कधीही श्रीमताचे उल्लंघन होऊ नये तेव्हाच सर्व मनोकामना न मागताच पूर्ण होतील. साक्षात्काराची इच्छा ठेवायची नाही, इच्छा मात्रम् अविद्या बनायचे आहे.

२) आपसात एकत्र येऊन झरमुई झगमूईच्या गोष्टी (एक दुसऱ्याचे परचिंतन) करायचे नाही. अंतर्मुखी होऊन स्वतःचे निरीक्षण करायचे आहे की, मी बाबांच्या आठवणीमध्ये किती वेळ राहतो? आतमध्ये ज्ञानाचे मंथन चालते का?

वरदान:-
प्रत्येक आत्म्याच्या संबंध संपर्कामध्ये येत सर्वांना दान देणारे महादानी, वरदानी भव

संपूर्ण दिवसामध्ये जे कोणी संबंध-संपर्कामध्ये येतील त्यांना कोणत्या ना कोणत्या शक्तीचे, ज्ञानाचे, गुणाचे दान द्या. तुमच्याकडे ज्ञानाचा देखील खजिना आहे, तर शक्तींचा आणि गुणांचा सुद्धा खजिना आहे. तर एकही दिवस दान दिल्याशिवाय जाऊ नये तेव्हा म्हटले जाईल - महादानी. २- ‘दान’ या शब्दाचा रुहानी अर्थ (आत्मिक अर्थ) आहे सहयोग देणे. तर आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या वायुमंडळा द्वारे आणि आपल्या वृत्तीच्या वायब्रेशन द्वारे प्रत्येक आत्म्याला सहयोग द्या तेव्हा म्हटले जाईल वरदानी.

बोधवाक्य:-
जे बापदादांच्या आणि परिवाराच्या समीप आहेत त्यांच्या चेहऱ्यावर संतुष्टता, रुहानियत आणि प्रसन्नतेचे हास्य असते.