11-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांचे मदतगार बनून या आयरन एजड् (कलियुगी) पर्वताला गोल्डन एजड् (सतयुगी) बनवायचे आहे, पुरूषार्थ करून नव्या दुनियेसाठी फर्स्टक्लास सीट रिझर्व्ह करायची आहे”

प्रश्न:-
बाबांचे कर्तव्य कोणते आहे? कोणते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी संगमयुगामध्ये बाबांना यावे लागते?

उत्तर:-
आजारी आणि दुःखी मुलांना सुखी बनविणे, मायेच्या सापळ्यातून सोडवून भरभरून सुख देणे - हे बाबांचे कर्तव्य आहे, जे संगमयुगामध्येच बाबा पूर्ण करतात. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हा सर्वांचे रोग नष्ट करण्यासाठी, सर्वांवर कृपा करण्यासाठी. आता पुरूषार्थ करून २१ जन्मांकरिता आपले भाग्य श्रेष्ठ बनवा.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
भोलानाथ शिव भगवानुवाच - ब्रह्मा मुखकमला द्वारे बाबा म्हणतात - ‘हे व्हरायटी विविध धर्मांचे मनुष्य सृष्टीरुपी झाड आहे ना. या कल्पवृक्षाचे अथवा सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य मुलांना समजावून सांगत आहे’. गीतेमध्ये देखील यांची महिमा आहे. शिवबाबांचा जन्म इथे आहे, बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे भारतामध्ये’. मनुष्य हे जाणत नाहीत की शिवबाबा केव्हा आले होते? कारण गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. द्वापरयुगाची तर गोष्टच नाही. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, ५ हजार वर्षांपूर्वी देखील मी येऊन हे ज्ञान दिले होते’. या झाडावरून सर्वांना माहित होते. झाड व्यवस्थितपणे बघा. सतयुगामध्ये बरोबर देवी-देवतांचे राज्य होते, त्रेतायुगामध्ये राम-सीतेचे आहे. बाबा आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगतात. मुले विचारतात - ‘आम्ही मायेच्या सापळ्यात केव्हा अडकलो?’ बाबा म्हणतात - द्वापर पासून. नंतर मग नंबरवार दुसरे धर्म येतात. मग हिशोब केल्यावर समजू शकता की आपण पुन्हा या दुनियेमध्ये केव्हा येऊ. शिवबाबा म्हणतात - ‘मी ५ हजार वर्षांनंतर संगमावर माझे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आलो आहे. सर्व जे काही मनुष्यमात्र आहेत, सगळे दुःखी आहेत, त्यातूनही विशेष भारतवासी दुःखी आहेत. ड्रामा अनुसार भारतालाच मी सुखी बनवितो’. वडिलांचे कर्तव्य असते मुले आजारी पडली तर त्यांना औषध-पाणी करणे. हा खूप मोठा आजार आहे. सर्व रोगांचे मूळ हे ५ विकार आहेत. मुले विचारतात हे केव्हापासून सुरू झाले? द्वापर पासून. रावणा बद्दल समजावून सांगायचे आहे. रावण काही दिसून येत नाही. बुद्धीद्वारे समजते. बाबांना देखील बुद्धीद्वारे जाणून घेतले जाते. आत्मा मन-बुद्धी सहित आहे. आत्मा जाणते की परमात्मा आपले पिता आहेत. सुख-दुःखा मध्ये, कर्माच्या प्रभावामध्ये आत्मा येते. जेव्हा शरीर असते तेव्हा आत्म्याला दुःख होते. असे म्हणत नाहीत की, ‘मज परमात्म्याला दुःखी करू नका’. बाबा देखील समजावून सांगतात की, ‘माझा देखील पार्ट आहे, कल्प-कल्प संगमावर येऊन मी पार्ट बजावतो. ज्या मुलांना मी सुखामध्ये पाठवले होते, ते दुःखी बनले आहेत त्यामुळे मग ड्रामा अनुसार मला यावे लागते’. बाकी कूर्मावतार-मत्स्यावतार अशा काही गोष्टी नाही आहेत. म्हणतात परशुरामाने परशूने क्षत्रियांचा वध केला. या सर्व आहेत दंतकथा. तर आता बाबा समजावून सांगत आहेत - ‘माझी आठवण करा’.

हे आहेत जगत अंबा आणि जगत पिता. माता-पिता देश असे म्हणतात ना. भारतवासी आठवण देखील करतात - ‘तुम्ही मात-पिता… तुम्हारी कृपा से सुख घनेरे’ तर खरोखर ते सुख मिळत आहे; परंतु जे इतका पुरुषार्थ करतील. जसे चित्रपट बघायला जातात तर फर्स्ट क्लासचे रिझर्वेशन करतात ना. बाबा देखील म्हणतात पाहिजे तर सूर्यवंशीमध्ये, पाहिजे तर चंद्रवंशीमध्ये तिकीट रिझर्व्ह करा, जितका जे पुरुषार्थ करतील तितके चांगले पद मिळवू शकतात. तर सर्व रोग नष्ट करण्यासाठी बाबा आलेले आहेत. रावणाने सर्वांना खूप दुःख दिले आहे. कोणीही मनुष्य मनुष्याची सद्गती करू शकत नाही. हा तर आहेच कलियुगाचा शेवट. गुरू लोक शरीर सोडतात आणि पुन्हा इथेच पुनर्जन्म घेतात, तर ते मग दुसऱ्यांची सद्गती कशी करणार? इतके सगळे गुरू मिळून सृष्टीला पावन बनवतील काय? ‘गोवर्धन पर्वत’ असे म्हणतात ना. या माता आयरन-एजड् पर्वताला गोल्डन-एज बनवतात. गोवर्धन पर्वताची मग पूजा देखील करतात, ती आहे तत्वाची पूजा. संन्यासी देखील ब्रह्म किंवा तत्त्वाची आठवण करतात. समजतात तोच परमात्मा आहे, ब्रह्म भगवान आहे. बाबा म्हणतात - ‘हा तर भ्रम आहे. ब्रह्मांडामध्ये तर आत्मे अंड्याप्रमाणे राहतात, निराकारी झाड देखील दाखवले गेले आहे. प्रत्येकाचा आपापला सेक्शन (विभाग) आहे. या झाडाचे फाउंडेशन (पाया) आहे - भारताचे सूर्यवंशी-चंद्रवंशी घराणे. मग वाढ होते. मुख्य आहेत ४ धर्म’. तर मग हिशोब केला पाहिजे कोण-कोणते धर्म केव्हा येतात? जसे गुरूनानक ५०० वर्षांपूर्वी आले. असे तर नाही की शीख लोक ८४ जन्मांचा पार्ट बजावतात. बाबा म्हणतात ८४ जन्म फक्त तुम्हा ऑलराऊंडर ब्राह्मणांचे आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे की, तुमचाच ऑलराऊंड पार्ट आहे. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तुम्ही बनता. जे प्रथम देवी-देवता बनतात तेच चक्र पूर्ण करतात.

बाबा म्हणतात - ‘तुम्ही वेद-शास्त्र खूप ऐकली आहेत. आता हे ऐका आणि निर्णय करा की शास्त्रे बरोबर आहेत की गुरू लोक बरोबर आहेत की बाबा जे सांगतात ते सत्य आहे?’ बाबांना म्हणतातच ट्रूथ. मी सत्य सांगतो ज्यामुळे सतयुग बनते आणि द्वापर पासून तुम्ही असत्यच ऐकत आले आहात त्यामुळेच तर नरक बनला आहे.

बाबा म्हणतात - मी तुमचा गुलाम आहे, भक्तीमार्गामध्ये तुम्ही गात आला आहात - ‘मैं गुलाम, मैं गुलाम तेरा…’ आत्ता मी तुम्हा मुलांच्या सेवेकरिता आलो आहे. बाबांचे ‘निराकारी’, ‘निरहंकारी’ असे गायन केले जाते. तर बाबा म्हणतात - तुम्हा मुलांना कायमचे सुखी बनविणे माझे कर्तव्य आहे. गाण्यामध्ये देखील आहे - ‘अगम-निगम का भेद खोले…’ बाकी डमरू इत्यादी वाजवण्याचा काहीच संबंध नाहीये. हा तर आदि-मध्य-अंताचा सर्व समाचार ऐकवतात. बाबा म्हणतात तुम्ही सर्व मुले ॲक्टर्स आहात, मी यावेळी करन-करावनहार (कर्ता-करविता) आहे. मी यांच्याद्वारे (ब्रह्माद्वारे) स्थापना करवून घेतो. बाकी गीतेमध्ये जे काही लिहिले आहे, तसे तर काहीच नाही आहे. आत्ता तर प्रॅक्टिकलमध्ये (प्रत्यक्षातील) गोष्ट आहे ना. मुलांना हे सहज ज्ञान आणि सहजयोग शिकवतो, योग लावून घेतो. म्हटले आहे ना - ‘योग लावून घेणारे, झोळी भरणारे, रोगांचा नाश करणारे…’ गीतेचा देखील पूर्ण अर्थ समजावून सांगतात. योग शिकवतो आणि शिकवून देखील घेतो. मुले योग शिकून मग इतरांना शिकवतात ना. म्हणतात - ‘योग से हमारी ज्योत जगाने वाले…’ अशी गाणी जरी कोणी घरी बसून ऐकली तरी देखील सर्व ज्ञानच बुद्धीमध्ये घोळू लागेल. बाबांच्या आठवणीने वारशाचा देखील नशा चढेल. फक्त परमात्मा किंवा भगवान म्हटल्याने तोंड गोड होत नाही. बाबा म्हणजेच वारसा.

आता तुम्ही मुले बाबांकडून आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकून मग इतरांना ऐकवता, यालाच शंखध्वनी म्हटले जाते. तुमच्या हातामध्ये पुस्तक वगैरे काहीच नाहीये. मुलांनी फक्त धारणा करायची असते. तुम्ही आहात खरे रूहानी ब्राह्मण, रूहानी बाबांची मुले. सच्च्या गीतेमुळे भारत स्वर्ग बनतो. त्या तर बसून फक्त कहाण्या रचल्या आहेत. तुम्ही सर्वजण पार्वती आहात, तुम्हाला ही अमरकथा ऐकवत आहे. तुम्ही सर्व द्रौपदी आहात. तिथे कोणी विवस्त्र होत नाही. तर म्हणतात - ‘मग मुले कशी जन्माला येतील?’ अरे, तिथे आहेतच निर्विकारी तर विकाराची गोष्ट कशी असू शकते? तुम्ही समजू शकणार नाही की योगबलाने मुले कशी जन्म घेतील! तुम्ही वाद घालाल. परंतु या तर शास्त्रीय गोष्टी आहेत ना. ती आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. ही आहे विकारी दुनिया. मी जाणतो ड्रामा अनुसार माया पुन्हा तुम्हाला दुःखी करेल. मी कल्प-कल्प माझे कर्तव्य पालन करण्याकरिता येतो. मी जाणतो कल्पा पूर्वीचे सिकीलधेच (खूप-खूप वर्षानंतर भेटलेली लाडकी मुलेच) येऊन आपला वारसा घेतील. लक्षणे देखील दाखवतात. ही तीच महाभारत लढाई आहे. तुम्हाला पुन्हा देवी-देवता अथवा स्वर्गाचे मालक बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. यामध्ये स्थूल युद्धाची काही गोष्टच नाही. ना काही असुर आणि देवतांचे युद्ध झाले आहे. तिथे (स्वर्गामध्ये) तर मायाच अस्तित्वात नाही जे युद्ध करतील. अर्धा कल्प ना कोणते युद्ध, ना कोणती रोगराई, ना दुःख-अशांती. अरे, तिथे तर कायम सुख, आनंद, वसंत ऋतू असतो. हॉस्पिटल्स नसतात, बाकी शाळेत शिकायचे तर असतेच. आता तुम्ही प्रत्येक जण इथून वारसा घेऊन जाता. मनुष्य शिक्षणामुळे आपल्या पायावर उभे राहतात. याच्यावर एक गोष्ट देखील आहे - ‘कोणी विचारले तू कोणाचे खातेस? तर म्हणाली माझ्या नशिबाचे खाते’. ते असते हदचे नशीब. आता तुम्ही आपले बेहदचे नशीब बनवत आहात. तुम्ही असे नशीब बनवता ज्यामुळे २१ जन्म मग आपलेच राज्य भाग्य उपभोगता. हा आहे बेहदच्या सुखाचा वारसा, आता तुम्ही या विरोधाभासाला चांगल्या प्रकारे जाणता, भारत किती सुखी होता. आता काय हालत झाली आहे! ज्यांनी कल्पापूर्वी राज्य भाग्य घेतले होते तेच आता घेतील. असेही नाही की जे ड्रामामध्ये असेल ते मिळेल, मग तर उपाशी मराल. हे ड्रामाचे रहस्य पूर्ण समजून घ्यायचे आहे. शास्त्रांमध्ये तर कोणी किती आयुर्मान, कोणी किती लिहिले आहे. अनेकानेक मत-मतांतरे आहेत. कोणी मग म्हणतात आम्ही तर कायम सुखीच आहोत. अरे, तुम्ही कधी आजारी पडत नाही का? ते तर म्हणतात रोग इत्यादी तर शरीराला होतात, आत्मा निर्लेप आहे. अरे, दुखापत इत्यादि होते तेव्हा दुःख आत्म्याला होते ना - या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ही शाळा आहे, एकच टीचर शिकवतात. नॉलेज एकच आहे. नरापासून नारायण बनण्याचे एम ऑब्जेक्ट एकच आहे. जे नापास होतील ते चंद्रवंशीमध्ये निघून जातील. जेव्हा देवता होते तेव्हा क्षत्रिय नव्हते, जेव्हा क्षत्रिय होते तेव्हा वैश्य नव्हते, जेव्हा वैश्य होते तेव्हा शूद्र नव्हते. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मातांकरिता देखील अगदी सोपे आहे. एकच परीक्षा आहे. असे देखील समजू नका की उशिरा आलेले कसे शिकतील. परंतु आता तर नवीन आलेले वेगाने पुढे जात आहेत. प्रत्यक्षात आहेत. बाकी माया-रावणाचे कोणतेही रूप नाहीये, म्हणतील यांच्यामध्ये काम विकाराचे भूत आहे. बाकी रावणाचा काही पुतळा किंवा शरीर असे काही नाही आहे.

अच्छा, सर्व गोष्टींचे सॅक्रीन आहे - ‘मनमनाभव’. म्हणतात - ‘माझी आठवण करा तर या योग अग्नीद्वारे विकर्म विनाश होतील’. बाबा गाईड बनून येतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी तर तुम्हा मुलांना सन्मुख शिकवत आहे’. कल्प-कल्प माझे कर्तव्य पालन करतो’. पारलौकिक बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांच्या मदतीने माझे कर्तव्य पार पाडण्याकरिता आलो आहे. मदत द्याल तेव्हाच तर तुम्ही देखील पद मिळवाल. मी किती महान पिता आहे. किती मोठा यज्ञ रचला आहे. ब्रह्माची मुखवंशावली तुम्ही सर्व ब्राह्मण-ब्राह्मणी भाऊ-बहीणी आहात. जेव्हा भाऊ-बहीण बनाल तेव्हा पती-पत्नीची दृष्टी बदलेल. बाबा म्हणतात या ब्राह्मण कुळाला कलंकित करायचे नाही, पवित्र राहण्याच्या युक्त्या आहेत. मनुष्य म्हणतात असे कसे होईल? एकत्र रहातील आणि आग लागणार नाही असे होऊ शकत नाही! बाबा म्हणतात - ‘मध्ये ज्ञान-तलवार असल्यावर कधीही आग लागू शकत नाही, परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा दोघेही मनमनाभव राहतील, शिवबाबांची आठवण करत राहतील, स्वतःला ब्राह्मण समजतील’. मनुष्य तर या गोष्टींना समजू न शकल्यामुळे गोंधळ माजवतात, अशा शिव्या देखील खाव्या लागतात. श्रीकृष्णाला थोड्याच कोणी शिव्या देऊ शकेल? श्रीकृष्ण असा आला तर परदेश इत्यादीवरुन एकदम विमानाने धाव घेतील, गर्दी होईल. भारतात माहीत नाही काय होईल.

अच्छा, आज भोग आहे - हे आहे माहेर आणि ते आहे सासर. संगमयुगावर भेट होते. कोणी-कोणी याला जादू समजतात. बाबांनी समजावून सांगितले आहे की हा साक्षात्कार काय आहे. भक्तीमार्गामध्ये साक्षात्कार कसे होतात, याबाबतीत संशय बुद्धी व्हायचे नाही. हा रिवाज आहे. शिवबाबांचा भंडारा आहे तर त्यांची आठवण करून भोग लावला पाहिजे. योगामध्ये राहणे तर चांगलेच आहे. बाबांची आठवण राहील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वतःला ब्रह्मा मुखवंशावली समजून पक्का पवित्र ब्राह्मण बनायचे आहे. कधी आपल्या या ब्राह्मण कुळाला कलंकित करायचे नाही.

२) बाप समान निराकारी, निरहंकारी बनून आपले कर्तव्य-पालन पूर्ण करायचे आहे. रूहानी सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे.

वरदान:-
स्नेहाच्या शक्तीने मायेच्या शक्तीला नष्ट करणारे संपूर्ण ज्ञानी भव

स्नेहामध्ये बुडून जाणे हेच संपूर्ण ज्ञान आहे. स्नेह ब्राह्मण जन्माचे वरदान आहे. संगमयुगावर स्नेहाचा सागर स्नेहाच्या हिरे-मोत्यांच्या थाळ्या भरभरून देत आहेत, तर स्नेहामध्ये संपन्न बना. स्नेहाच्या शक्तीने परिस्थिती रूपी पहाड परिवर्तन होऊन पाण्यासारखा हलका बनेल. मायेचे कसेही विक्राळ रूप किंवा रॉयल रूप समोर आले तर सेकंदामध्ये स्नेहाच्या सागरामध्ये बुडून जा तर स्नेहाच्या शक्तीद्वारे मायेची शक्ती नष्ट होईल.

बोधवाक्य:-
तन-मन-धन, मन-वाणी आणि कर्माने बाबांच्या कर्तव्यामध्ये सदैव सहयोगी असणारेच योगी आहेत.