12-01-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.11.2003 ओम शान्ति
मधुबन
“मनाला एकाग्र करून,
एकाग्रतेच्या शक्तीद्वारे फरिश्ता स्थितीचा अनुभव करा”
आज सर्व खजिन्यांचे
मालक आपल्या चोहो बाजूच्या संपन्न मुलांना बघत आहेत. प्रत्येक मुलाला सर्व
खजिन्यांचे मालक बनवले आहे. असा खजिना मिळाला आहे जो इतर कोणीही देऊ शकत नाही. तर
प्रत्येक जण स्वतःला खजिन्यांनी संपन्न अनुभव करता का? सर्वात श्रेष्ठ खजिना आहे
ज्ञानाचा खजिना, शक्तींचा खजिना, गुणांचा खजिना, त्या सोबत बाबा आणि सर्व ब्राह्मण
आत्म्यांच्या द्वारे आशीर्वादांचा खजिना. तर चेक करा हे सर्व खजिने प्राप्त आहेत?
सर्व खजिन्यांनी संपन्न असलेल्या आत्म्याचे लक्षण आहे - सदैव तिच्या दृष्टीद्वारे,
चेहऱ्याद्वारे, चलनद्वारे आनंदाचा अनुभव इतरांना देखील होईल. जी कोणती आत्मा
संपर्कामध्ये जरी आली तरीही ती अनुभव करेल की, ही आत्मा अलौकिक आनंदाने भरपूर,
अलौकिक अद्वितीय दिसत आहे. तुमच्या आनंदाला बघून दुसरे आत्मे देखील थोड्या वेळासाठी
आनंद अनुभव करतील. जसा तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचा सफेद ड्रेस सर्वांना किती वेगळा
आणि आकर्षक वाटतो. स्वच्छता, साधेपणा आणि पवित्रता अनुभव होतो. दुरूनच जाणतात की,
हे ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. तसेच तुम्हा ब्राह्मण आत्म्यांच्या आचरणातून आणि
चेहऱ्याद्वारे सदैव आनंदाची झलक, भाग्यवान असल्याचा नशा दिसून यावा. आज सर्व आत्मे
महान दुःखी आहेत, अशा आत्म्यांना तुमचा खुशनुमा चेहरा पाहून, आचरण पाहून क्षणभरासाठी
तरी आनंदाचा अनुभव करू दे, जसे तहानलेल्या आत्म्याला एक थेंब जरी पाण्याचा मिळाला
तरी किती आनंदीत होतो. अशी आनंदाची ओंजळ आत्म्यांसाठी खूप आवश्यक आहे. असे सर्व
खजिन्यांनी सदैव संपन्न आहात. तर तुम्ही प्रत्येक ब्राह्मण आत्मा स्वतःला सर्व
खजिन्यांनी सदैव भरपूर अनुभव करता कि कधी-कधी करता? खजिने अविनाशी आहेत, देणारा दाता
देखील अविनाशी आहे तर राहिला देखील अविनाशी पाहिजे कारण तुमच्या सारखा अलौकिक आनंद
साऱ्या कल्पामध्ये तुम्हा ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाच प्राप्त होत नाही. हा आत्ताचा
अलौकिक आनंदच अर्धा कल्प प्रारब्धाच्या रूपामध्ये चालतो; तर सर्वजण आनंदी आहात!
यामध्ये तर सर्वांनी हात वर केला, अच्छा - सदैव आनंदात आहात? कधी आनंद नाहीसा तर
होत नाही ना? कधी-कधी आनंद गायब होतो! आनंदी राहता परंतु सदैव एकरस, त्यामध्ये फरक
पडतो. आनंदी राहता परंतु टक्केवारी मध्ये फरक पडतो.
बापदादा ऑटोमॅटिक टी.
व्ही. मध्ये सर्व मुलांचे चेहरे बघत राहतात. तर काय बघायला मिळते? एक दिवस तुम्ही
सुद्धा आपल्या आनंदाचा चार्ट चेक करा - अमृतवेले पासून रात्री पर्यंत आनंदाची
टक्केवारी एक समान राहते का? कि बदलते? चेक तर करता येते ना, आजकाल बघा सायन्सने
देखील चेकिंग करण्याची मशिनरी खूप वेगवान केली आहे. तर तुम्ही देखील चेक करा आणि
अविनाशी बनवा. सर्व मुलांचा बापदादांनी देखील वर्तमान पुरुषार्थ चेक केला.
पुरुषार्थ सर्व करत आहेत - कोणी यथाशक्ति, कोणी शक्तिशाली. तर आज बापदादांनी सर्व
मुलांच्या मनाच्या स्थितीला चेक केले कारण मूळ आहेच मनमनाभव. सेवेमध्ये देखील बघाल
तर मन्सा सेवा श्रेष्ठ सेवा आहे. म्हणता देखील - ‘मन जीत जगतजीत’, तर मनाच्या गतिला
चेक केले. तर काय बघितले? मनाचे मालक बनून मनाला चालवता परंतु कधी-कधी मन तुम्हाला
देखील चालवते. मन परावलंबी सुद्धा बनवते. बापदादांनी देखील पाहिले आहे की, मनाने
धून लावता परंतु मनाची स्थिती एकाग्र राहत नाही.
वर्तमान समय मनाची
एकाग्रता, एकरस स्थितीचा अनुभव करवेल. आत्ता रिझल्ट मध्ये पाहिले की, मनाला एकाग्र
करू इच्छिता परंतु मध्ये-मध्ये भटकते. एकाग्रतेची शक्ति तुम्हाला सहजच अव्यक्त
फरिश्ता स्थितीचा अनुभव देईल. मन भटकते, भले व्यर्थ गोष्टींमध्ये, किंवा व्यर्थ
संकल्पांमध्ये, नाहीतर व्यर्थ कामामध्ये. जसे कोणा-कोणाला शारीरिक दृष्ट्या देखील
एकाग्र होऊन बसण्याची सवय नसते, कोणाला असते. तर मन जिथे पाहिजे, जसे पाहिजे, जितका
वेळ पाहिजे तितका वेळ आणि असे एकाग्र होणे याला म्हटले जाते मन वशमध्ये आहे.
एकाग्रतेची शक्ति, मालक पणाची शक्ति सहजच निर्विघ्न बनविते. युद्ध करावे लागत नाही.
एकाग्रतेच्या शक्तीद्वारे आपोआपच ‘एक बाबा दुसरा न कोई’ - अशी अनुभूती होते. आपोआप
होणार, मेहनत करावी लागणार नाही. एकाग्रतेच्या शक्तीमुळे आपोआपच एकरस फरिश्ता
स्वरूपाची अनुभूति होते. ब्रह्मा बाबांवर प्रेम आहे ना - तर ब्रह्मा बाबांसारखे बनणे
अर्थात फरिश्ता बनणे. एकाग्रतेच्या शक्तीने आपोआपच सर्वांप्रती स्नेह, कल्याण,
आदराची वृत्ती निर्माण होतेच कारण एकाग्रता अर्थात स्वमानाची स्थिती. फरिश्ता स्थिती
स्वमान आहे. जसे ब्रह्मा बाबांना पाहिलेत, वर्णन देखील करता जशी संपन्नतेची वेळ जवळ
येत गेली तर काय बघितले? चालते-फिरते फरिश्ता रूप, देहभान रहीत. देहाची जाणीव होत
होती का? समोर गेल्यावर देह दिसत होता कि फरिश्ता रूपाचा अनुभव होत होता? कर्म
करताना सुद्धा, बातचीत करताना सुद्धा, डायरेक्शन देताना सुद्धा, उमंग-उत्साह
वाढवताना देखील देहापासून अलिप्त, सूक्ष्म प्रकाश रूपाचा अनुभव केला. म्हणता ना की,
ब्रह्मा बाबा बोलता-बोलता असे वाटत असे जसे काही बोलत देखील आहेत परंतु इथे नाही
आहेत, बघत आहेत परंतु दृष्टी अलौकिक आहे, ही स्थूल दृष्टी नाही आहे. देह-भानापासून
न्यारे (अलिप्त), इतरांना देखील देहाचे भान येऊ नये, न्यारे रूप दिसावे, याला म्हटले
जाते देहामध्ये रहात असूनही फरिश्ता स्वरूप. प्रत्येक गोष्टीमध्ये, वृत्तीमध्ये,
दृष्टीमध्ये, कर्मामध्ये न्यारेपणा (अलिप्तपणा) अनुभव व्हावा. हा बोलत आहे परंतु,
निराळा-अलिप्त, हवा-हवासा वाटतो. आत्मिकदृष्ट्या मनमोहक. अशी फरिश्तेपणाची अनुभूती
स्वतः देखील करा आणि इतरांना देखील करवा कारण फरिश्ता बनल्याशिवाय देवता बनू शकत
नाही. फरिश्ता सो देवता आहे. तर नंबरवन ब्रह्माच्या आत्म्याने प्रत्यक्ष साकार
रूपामध्ये देखील फरिश्ता जीवनाचा अनुभव करविला आणि फरिश्ता स्वरूप बनले. त्याच
फरिश्ता रुपा सोबत तुम्हा सर्वांना सुद्धा फरिश्ता बनून परमधाममध्ये जायचे आहे. तर
यासाठी मनाच्या एकाग्रतेवर अटेंशन द्या. ऑर्डरने मनाला चालवा. करायचे असेल तर
मनाद्वारे कर्म व्हावे, नसेल करायचे आणि मन म्हणेल कर, हा काही मालकपणा नाहीये. आता
अनेक मुले म्हणतात इच्छा नव्हती परंतु झाले. विचार नव्हता परंतु होऊन गेले, करता
कामा नये परंतु होते - ही आहे मनाच्या अधीन असलेली अवस्था. तर अशी अवस्था चांगली तर
वाटत नाही ना! फॉलो ब्रह्मा बाबा. ब्रह्मा बाबांना पाहिले समोर उभे असून सुद्धा काय
अनुभव होत असे? फरिश्ता उभा आहे, फरिश्ता दृष्टी देत आहे. तर मनाच्या एकाग्रतेची
शक्ती सहजच फरिश्ता बनवेल. ब्रह्माबाबा देखील मुलांना हेच सांगत आहेत - समान बना.
शिवबाबा म्हणत आहेत - निराकारी बना, ब्रह्माबाबा म्हणत आहेत - फरिश्ता बना. तर काय
समजले? रिझल्टमध्ये काय पाहिले? मनाची एकाग्रता कमी आहे. मन मधून-मधून खूप फेरी
मारते, भटकत राहते. जिथे जायला नको तिथे जाते तर याला काय म्हणाल? भटकणे म्हणणार
ना! तर एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा. मालकपणाच्या स्टेजच्या सीट वर सेट रहा. जेव्हा
सेट असता तेव्हा अपसेट होत नाही, सेट नसता तेव्हा अपसेट होता. तर भिन्न-भिन्न
श्रेष्ठ स्थितींच्या सीट वर सेट रहा, याला म्हटले जाते एकाग्रतेची शक्ती. ठीक आहे?
ब्रह्माबाबांवर प्रेम आहे ना! किती प्रेम आहे? किती आहे? खूप प्रेम आहे! तर बाबांना
प्रेमाचा प्रतिसाद म्हणून काय दिले आहे? बाबांचे देखील प्रेम आहे म्हणूनच तर तुमचे
देखील प्रेम आहे ना! तर रिटर्न काय दिले? समान बनणे - हेच रिटर्न आहे. अच्छा.
डबल विदेशी देखील आले
आहेत. चांगले आहे, डबल विदेशींमुळे देखील मधुबनचा शृंगार होतो. इंटरनॅशनल होते ना!
पहा, मधुबनमध्ये विंग्जची सेवा होते, त्यामुळे आवाज चोहो बाजूला फैलावतो. तुम्ही
पहाल जेव्हा पासून ही विंग्जची सेवा सुरु केली आहे तर आय.पी. क्वालिटीमध्ये (महत्वाची
गुणवत्ता असलेल्या वर्गामध्ये) जास्त आवाज पसरला आहे. व्ही.व्ही.आय.पी. वाल्यांची
तर गोष्टच सोडा, त्यांना वेळच कुठे आहे. आणि मोठे-मोठे प्रोग्राम केले आहेत त्यामुळे
देखील आवाज तर पसरतो. आता दिल्ली आणि कलकत्ता करत आहेत ना! चांगले प्लॅन बनवत आहेत.
मेहनत देखील चांगली करत आहेत. बापदादांकडे समाचार पोहोचत असतो. दिल्लीचा आवाज फॉरेन
पर्यंत पोहोचला पाहिजे. मिडियावाले काय करत आहेत? फक्त भारतापर्यंत. फॉरेन मधून
आवाज यावा की, दिल्लीमध्ये हा प्रोग्राम झाला, कलकत्त्यामध्ये असा प्रोग्राम झाला.
हा तिथला आवाज इंडियामध्ये यावा. इंडियातील कुंभकर्ण तर विदेशीयां मार्फत जागे
होणार आहेत ना! तर विदेशच्या बातमीचे महत्व असते. प्रोग्राम भारतामध्ये होईल आणि
बातमी विदेशातील वर्तमानपत्रांमधून पोहोचावी तेव्हा आवाज पसरेल. भारताचा आवाज
विदेशामध्ये पोहोचावा आणि विदेशाचा आवाज भारतामध्ये पोहोचावा, त्याचा प्रभाव पडतो.
चांगले आहे. प्रोग्राम जे बनवत आहेत, चांगले बनवत आहेत. बापदादा दिल्लीवाल्यांना
देखील प्रेमाने केलेल्या मेहनतीची मुबारक देत आहेत. कलकत्तावाल्यांना देखील इन
ऍडव्हान्स मुबारक आहे कारण सहयोग, स्नेह आणि हिम्मत जेव्हा तिन्ही गोष्टी एकत्र
येतात तेव्हा आवाज बुलंद होतो. आवाज फैलावेल, का नाही फैलावणार. आता मीडियावाले हा
चमत्कार करा, सर्वांनी टी.व्ही. वर बघितले, हे टी.व्ही. मध्ये आले, फक्त एवढेच नाही.
ते तर भारतामध्ये दिसत आहे. आता अजून विदेशापर्यंत पोहोचा. आता बघणार आवाज
फैलावण्याचे हे वर्ष किती हिम्मत आणि धुमधड्याक्यात साजरे करता. बापदादांना समाचार
मिळाला की डबल फॉरेनर्सना खूप उमंग आहे. आहे ना? चांगले आहे. एकमेकांना पाहून आणखी
उमंग येतो, ‘जो ओटे वह ब्रह्मा समान’. छान आहे. तर दादींना सुद्धा संकल्प येतो, बिझी
करण्याची पद्धत चांगली येते. चांगले आहे, निमित्त आहेत ना.
अच्छा - सगळे उडती
कलावाले आहात? उडती कला फास्ट कला आहे. चालती कला, चढती कला या काही फास्ट कला
नाहीत. उडती कला फास्ट देखील आहे आणि फर्स्ट आणणारी सुद्धा आहे. अच्छा -
माता काय करणार?
मातांनो आपल्या हमजीन्सना (बरोबरीच्यांना) जागे करा. कमीत-कमी कोणी माता तरी तक्रार
करणाऱ्या राहू नयेत. नेहमी मातांची संख्या जास्त असते. बापदादांना आनंद होतो आणि या
ग्रुपमध्ये सर्वांची संख्या चांगली आली आहे. कुमारांची संख्या सुद्धा चांगली आली आहे.
पहा, कुमार तुम्ही आपल्या हमजीन्सना जागे करा. चांगले आहे. कुमार हा चमत्कार करून
दाखवा की, स्वप्नात देखील पवित्रतेमध्ये परिपक्व आहोत. बापदादा विश्वामध्ये चॅलेंज
करून सांगतील की ब्रह्माकुमार युथ कुमार, डबल कुमार आहेत ना. ब्रह्माकुमार देखील
आहात आणि शरीराने सुद्धा कुमार आहात. तर पवित्रतेची परिभाषा प्रॅक्टिकलमध्ये असावी.
तर ऑर्डर देऊ, पवित्रतेसाठी तुम्हाला चेक करूया. देऊ ऑर्डर? यामध्ये हात वर करत नाही
आहेत. चेक करण्याचे मशीन असते. स्वप्नामध्ये देखील अपवित्रतेने हिम्मत करू नये.
कुमारींना देखील असे बनायचे आहे. कुमारी अर्थात पूज्य पवित्र कुमारी. कुमार आणि
कुमारींनी बापदादांना हे प्रॉमिस करा की आम्ही सर्व इतके पवित्र आहोत जे
स्वप्नामध्ये देखील संकल्प येऊ शकत नाही, तेव्हा कुमार आणि कुमारींच्या पवित्रतेची
सेरीमनी साजरी करणार. आत्ता थोडे-थोडे आहेत, बापदादांना माहिती आहे. अपवित्रतेची
अविद्या असावी कारण नविन जन्म घेतला आहे ना. अपवित्रता तुमच्या मागच्या जन्मातील
गोष्ट आहे. मरजीवा जन्म, जन्मच ब्रह्मा मुखाद्वारे पवित्र जन्म आहे. तर पवित्र
जन्माची मर्यादा खूप अत्यावश्यक आहे. कुमार कुमारींनी हा झेंडा फडकवला पाहिजे.
पवित्र आहोत, पवित्र संस्कार विश्वामध्ये पसरवणार, हा नारा सुरु व्हावा. ऐकले
कुमारींनी. बघा कुमारी किती आहेत. आता बघणार की, कुमारी हा आवाज पसरवतात कि कुमार?
ब्रह्माबाबांना फॉलो करा. अपवित्रतेचे नामोनिशाण नाही, हा आहे ब्राह्मण जीवनाचा
अर्थ. मातांमध्ये देखील मोह असेल तर अपवित्रता आहे. माता देखील ब्राह्मण आहेत ना.
तर ना मातांमध्ये, ना कुमारींमध्ये, ना कुमारांमध्ये, ना अधर कुमारींमध्ये.
ब्राह्मण अर्थातच पवित्र आत्मा आहे. अपवित्रतेचे जर कोणते काम जरी झाले तर हे मोठे
पाप आहे. या पापाची सजा अतिशय कठोर आहे. असे समजू नका हे तर चालतेच. थोडेफार तर
चालेलच, नाही. हा पहिला सब्जेक्ट आहे. नवीनताच पवित्रतेची आहे. ब्रह्माबाबांनी जर
शिव्या खाल्ल्या तर त्या देखील पवित्रतेच्या कारणाने. झाले, असे म्हणून तुम्ही
सुटणार नाही. यामध्ये निष्काळजी बनू नका. कोणताही ब्राह्मण भले सरेंडर आहे, भले
सेवाधारी आहे, नाहीतर प्रवृत्ती वाला आहे, या गोष्टीमध्ये धर्मराज सुद्धा सोडणार
नाही, ब्रह्माबाबा देखील धर्मराजाला साथ देतील म्हणून कुमार-कुमारी कुठेही असाल,
मधुबनमध्ये असाल, सेंटरवर असाल परंतु याची ठेच, संकल्प मात्र ठेच देखील खूप मोठी
ठेच आहे. गाणे गाता ना - ‘पवित्र मन रखो, पवित्र तन रखो…’ असे गाणे आहे ना तुमचे.
तर मन पवित्र असेल तर जीवन पवित्र आहे यामध्ये ढिले होऊ नका, थोडे केले तर काय आहे!
थोडे नाही आहे, खूप आहे. बापदादा ऑफिशियल इशारा देत आहेत, यामध्ये वाचू शकणार नाहीत.
याचा हिशोब चांगल्या पद्धतीने घेणार, कोणीही असो म्हणून सावधान, अटेंशन. ऐकले -
सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकलेत. दोन्ही कान उघडे ठेवून ऐका. वृत्तीमध्ये देखील टचिंग
नसावी. दृष्टीमध्ये देखील टचिंग नसावी. संकल्पामध्ये नाही तर वृत्ती दृष्टी काय आहे!
कारण की वेळ संपन्नतेच्या जवळ येत आहे, संपूर्ण पावन बनण्याचा. त्यामध्ये मग ही
गोष्ट तर पूर्ण सफेद कागदावर काळा डाग आहे. अच्छा - सर्व ज्या-ज्या काही ठिकाणाहून
आलेले आहेत, सर्व बाजूंनी आलेल्या मुलांना मुबारक असो.
अच्छा - मनाला
ऑर्डरमध्ये चालवा. सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे मन लागावे, टिकावे. ही एक्सरसाइज
करा. (बापदादांनी ड्रिल करवून घेतली)
अच्छा - बऱ्याच ठिकाणी
मुले ऐकत आहेत. आठवण देखील करत आहेत, ऐकत सुद्धा आहेत. हे ऐकून खुश देखील होत आहेत
की सायन्सची साधने वास्तविक सुखदाई तुम्हा मुलांसाठी आहेत.
चोहो बाजूंच्या सर्व
खजिन्यांनी संपन्न मुलांना, सदैव खुशनशिब, खुशनुमा चेहरा आणि चलनद्वारे खुशीची ओंजळ
देणाऱ्या विश्व कल्याणकारी मुलांना, सदैव मनाचे मालक बनून एकाग्रतेच्या शक्तीद्वारे
मनाला कंट्रोल करणाऱ्या मनजीत, जगतजीत मुलांना, सदैव ब्राह्मण जीवनाची विशेषता
पवित्रतेच्या पर्सन्यालिटी मध्ये राहणाऱ्या पवित्र ब्राह्मण आत्म्यांना, सदैव डबल
लाईट बनून फरिश्ता जीवनामध्ये ब्रह्माबाबांना फॉलो करणाऱ्या, अशा ब्रह्माबाप समान
मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. चोहो बाजूला ऐकणाऱ्या, आठवण
करणाऱ्या सर्व मुलांना देखील खूप-खूप मनापासून आशिर्वादांसहित प्रेमपूर्वक आठवण,
सर्वांना नमस्ते.
वरदान:-
साकार बाबांना
फॉलो करून नंबर वन घेणारे संपूर्ण फरिश्ता भव
नंबरवन येण्याचे सहज
साधन आहे - जे नंबरवन ब्रह्मा बाबा आहेत, त्या वन लाच बघा. अनेकांना बघण्यापेक्षा
एकाला बघा आणि एकाला फॉलो करा. ‘हम सो फरिश्ता’ हा मंत्र पक्का करा तर अंतर नाहीसे
होईल मग सायन्सचे यंत्र आपले काम सुरु करेल आणि तुम्ही संपूर्ण फरिश्ते देवता बनून
नवीन दुनियेमध्ये अवतरित व्हाल. तर संपूर्ण फरिश्ता बनणे अर्थात साकार बाबांना फॉलो
करणे.
सुविचार:-
मानाच्या (प्रतिष्ठेच्या)
त्यागामध्येच सर्वांचे माननीय बनण्याचे भाग्य सामावलेले आहे.
आपल्या शक्तिशाली
मन्सा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
जसे बापदादांना दया
येते, तसे तुम्ही मुलांनी देखील मास्टर दयाळू बनून मन्सा आपल्या वृत्तीने
वायुमंडळाद्वारे आत्म्यांना बाबांकडून मिळालेल्या शक्ती द्या. जर फार थोड्या
कालावधीमध्ये साऱ्या विश्वाची सेवा संपन्न करायची आहे, तत्वांसहित सर्वांना पावन
बनवायचे आहे तर तीव्र गतीने सेवा करा.