12-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही खूप मोठे ज्वेलर आहात, तुम्हाला अविनाशी ज्ञानरत्न रुपी दागिने देऊन सर्वांना श्रीमंत बनवायचे आहे”

प्रश्न:-
आपल्या जीवनाला हिऱ्यासमान बनविण्यासाठी कोणत्या गोष्टीची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे?

उत्तर:-
संगतीची. मुलांनी त्यांची संगत केली पाहिजे जे चांगली ज्ञानाची वर्षा करतात. जे वर्षा करत नाहीत, त्यांची संगत ठेऊन फायदाच काय! संगतीचा दोष खूप लागतो, कोणी कोणाच्या संगतीने हिऱ्यासारखे बनतात आणि कोणी मग कोणाच्या संगतीने पत्थर बनतात. जे ज्ञानवान असतील ते आप समान जरूर बनवतील. संगतीपासून आपला सांभाळ करतील.

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांना संपूर्ण सृष्टी, सर्व ड्रामा चांगल्या प्रकारे बुद्धीमध्ये लक्षात आहे. कॉन्ट्रास्ट (विरोधाभास) देखील बुद्धीमध्ये आहे. हे सर्व बुद्धीमध्ये पक्के राहिले पाहीजे की सतयुगामध्ये सर्व श्रेष्ठाचारी, निर्विकारी, पावन, साल्वेंट होते. आता तर दुनिया भ्रष्टाचारी, विकारी, पतित इनसाल्वेंट आहे. आता तुम्ही मुले संगमयुगावर आहात. तुम्ही पलीकडे जात आहात. जसे नदी आणि सागराचे जिथे मिलन होते, त्याला संगम म्हणतात. एका बाजूला गोड पाणी, एका बाजूला खारट पाणी असते. आता हा देखील आहे संगम. तुम्ही जाणता की खरोखर सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, आणि मग असे चक्र फिरले. आता आहोत संगम कलियुगाच्या अंताला सर्व दुःखी आहेत, याला जंगल म्हटले जाते. सतयुगाला बगीचा म्हटले जाते. आता तुम्ही काट्यापासून फूल बनत आहात. ही स्मृति तुम्हा मुलांना राहिली पाहिजे. आम्ही बेहदच्या बाबांकडून वारसा घेत आहोत. हे बुद्धीमध्ये लक्षात ठेवायचे आहे. ८४ जन्मांची कहाणी तर अगदी कॉमन आहे. समजता - आता ८४ जन्म पूर्ण झाले. तुमची बुद्धी तरतरीत झाली आहे की, आपण आता सतयुगी बगीच्यामध्ये जात आहोत. आता आमचा जन्म या मृत्युलोकमध्ये होणार नाही. आमचा जन्म होईल अमरलोक मध्ये. शिवबाबांना अमरनाथ देखील म्हणतात. ते आम्हाला अमरकथा ऐकवत आहेत, तिथे आपण शरीर असताना देखील अमर असणार. आपल्या इच्छेनुसार वेळेवर शरीर सोडणार, त्याला मृत्युलोक म्हटले जात नाही. तुम्ही कोणालाही समजावून सांगाल तर समजतील - खरोखर यांच्यामध्ये तर पूर्ण ज्ञान आहे. सृष्टीचा आदि आणि अंत तर आहे ना. छोटा मुलगा देखील तरुण आणि वृद्ध होतो मग शेवट होतो, मग पुन्हा बाळ बनते. सृष्टी देखील नवीन बनते मग क्वार्टर (१/४) जुनी, मग अर्धी जुनी आणि नंतर मग पूर्ण जुनी होते. पुन्हा नवीन होईल. या सर्व गोष्टी इतर कोणीही एक-दोघांना ऐकवू शकणार नाही. अशी चर्चा कोणी करू शकत नाहीत. तुम्हा ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाला रुहानी नॉलेज (आत्मिक ज्ञान) मिळू शकत नाही. ब्राह्मण वर्णामध्ये येतील तेव्हा ऐकतील. फक्त ब्राह्मणच जाणतात. ब्राह्मणांमध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी यथार्थ रीतीने ऐकवू शकतात, कोणी ऐकवू शकत नाहीत तर त्यांना काहीच मिळत नाही. ज्वेलर्समध्ये देखील बघाल कोणाकडे तर करोडोंचा माल असतो, कोणाकडे तर १० हजाराचा सुद्धा माल नसेल. तुमच्यामध्ये देखील असे आहेत. जसे बघा ही जनक आहे (जानकी दादी), या चांगल्या ज्वेलर आहेत. यांच्याकडे मौल्यवान रत्ने आहेत. कोणाला देऊन चांगला श्रीमंत बनवू शकतात. कोणी छोटा ज्वेलर आहे, जास्त देऊ शकत नाही (ज्ञान देऊ शकत नाही) तर त्याचे पद देखील कमी होते. तुम्ही सर्व ज्वेलर्स आहात, हे अविनाशी ज्ञानरत्नांचे दागिने आहेत. ज्यांच्याकडे चांगली रत्ने असतील ते श्रीमंत बनतील, इतरांना देखील बनवतील. असे तर नाही की, सर्व चांगलेच ज्वेलर्स असतील. चांगले-चांगले ज्वेलर्स मोठ्या-मोठ्या सेंटरवर पाठवून देतात. मोठ्या व्यक्तींना चांगली रत्ने दिली जातात. मोठ्या-मोठ्या दुकानांमध्ये एक्सपर्ट असतात. बाबांना देखील म्हटले जाते - सौदागर, रत्नागर. रत्नांचा सौदा करतात आणि मग जादूगार देखील आहेत कारण त्यांच्याकडेच दिव्य दृष्टीची चावी आहे. कोणी नवधा भक्ती करतात तर त्यांना साक्षात्कार होतो. इथे ती गोष्ट नाहीये. इथे तर अनायास घर बसल्या देखील खूप जणांना साक्षात्कार होतो. दिवसेंदिवस सोपे होत जाईल. कित्येकांना ब्रह्माचा आणि श्रीकृष्णाचा देखील साक्षात्कार होतो. त्यांना म्हणतात ब्रह्माकडे जा. त्यांच्याकडे जाऊन प्रिन्स बनण्याचे शिक्षण घ्या. हे पवित्र प्रिन्स-प्रिन्सेस चालत आले आहेत ना. प्रिन्सला पवित्र देखील म्हणू शकता. पवित्रतेने जन्म होतो ना. पतितला भ्रष्टाचारी म्हणणार. पतितापासून पावन बनायचे आहे, हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे जेणेकरून कोणालाही समजावून सांगू सुद्धा शकाल. लोक समजतील, हे तर खूप हुशार आहेत. बोला - आमच्याकडे कोणते शास्त्र इत्यादींचे नॉलेज नाहीये. हे आहे रुहानी नॉलेज, जे रुहानी बाबा समजावून सांगतात. हे आहेत त्रिमूर्ति ब्रह्मा, विष्णू, शंकर. ही देखील रचना आहे. रचयिता एक बाबा आहेत, ते (दुनियेतील) असतात हदचे क्रियेटर; हे (शिवबाबा) आहेत बेहदचे बाबा, बेहदचे क्रियेटर. बाबा बसून शिकवतात, मेहनत करायची असते. बाबा गुल-गुल (फूल) बनवतात. तुम्ही आहात ईश्वरीय कुळाचे, तुम्हाला बाबा पवित्र बनवतात. आणि पुन्हा जर अपवित्र बनतात तर कुल-कलंकित बनतात. बाबा तर जाणतात ना. मग धर्मराजाद्वारे खूप सजा देतील. बाबांसोबत धर्मराज देखील आहे. धर्मराजाची ड्युटी देखील आता पूर्ण होते. सतयुगामध्ये तर असणारच नाही. नंतर द्वापर पासून सुरु होते. बाबा बसून कर्म, अकर्म, विकर्माची गती समजावून सांगतात. म्हणतात ना - यांनी अगोदरच्या जन्मामध्ये अशी कर्मे केली आहेत, ज्याचे हे भोग आहेत. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही. वाईट कर्मांचे तिथे नाव सुद्धा नसते. इथे तर चांगले-वाईट दोन्ही आहेत. सुख-दुःख दोन्ही आहे. परंतु सुख फार थोडे आहे. तिथे मग दुःखाचे नाव नाही. सतयुगामध्ये दुःख कुठून आले! तुम्ही बाबांकडून नवीन दुनियेचा वारसा घेता. बाबा आहेतच दुःखहर्ता सुखकर्ता. दुःख केव्हापासून सुरू होते, हे देखील तुम्ही जाणता. शास्त्रांमध्ये तर कल्पाचा कालावधीच लांबलचक लिहिला आहे. आता तुम्ही जाणता अर्ध्या कल्पासाठी आमचे दुःख दूर होईल आणि आम्हाला सुख मिळेल. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते, यावर समजावून सांगणे खूप सोपे आहे. या सर्व गोष्टी तुमच्या शिवाय आणखी कोणाच्याही बुद्धिमध्ये असू शकत नाहीत. लाखो वर्षे म्हटल्याने सर्व गोष्टी बुद्धितून निघून जातात.

आता तुम्ही जाणता - हे चक्र ५ हजार वर्षांचे आहे. कालची गोष्ट आहे जेव्हा या सूर्यवंशी - चंद्रवंशींचे राज्य होते. म्हणतात देखील ब्राह्मणांचा दिवस, असे नाही की, शिवबाबांचा दिवस म्हणणार. ब्राह्मणांचा दिवस आणि मग ब्राह्मणांची रात्र. ब्राह्मण मग भक्तीमार्गामध्ये देखील चालत आले आहेत. आता आहे संगम. ना दिवस आहे, ना रात्र आहे. तुम्ही जाणता आम्ही ब्राह्मण पुन्हा देवता बनणार मग त्रेतामध्ये क्षत्रिय बनणार. हे तर बुद्धीमध्ये पक्के लक्षात ठेवा. या गोष्टींना दुसरे कोणीही जाणत नाहीत. ते तर म्हणतील शास्त्रांमध्ये तर एवढी आयु लिहिली आहे, तुम्ही मग हा हिशोब कुठून आणला? हा अनादि ड्रामा पूर्वनियोजित आहे, हे कोणीही जाणत नाही. तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये आहे, अर्धाकल्प आहे सतयुग-त्रेता मग अर्ध्यापासून भक्ती सुरू होते. तो होतो त्रेता आणि द्वापरचा संगम. द्वापरमध्ये देखील ही शास्त्रे इत्यादी हळू-हळू बनतात. भक्ती मार्गातील सामग्रीची लिस्ट खूप लांब-लचक आहे. जसे झाड किती विस्तृत आहे. याचे बीज आहे बाबा. हे उलटे झाड आहे. सर्वात पहिला आहे आदि सनातन देवी-देवता धर्म. या गोष्टी ज्या बाबा ऐकवत आहेत, या आहेत एकदम नवीन. या देवी-देवता धर्माच्या स्थापकाला कोणीही जाणत नाहीत. श्रीकृष्ण तर बाळ आहे. ज्ञान ऐकविणारे आहेत बाबा. तर पित्याचे नाव काढून मुलाचे नाव घातले आहे. श्रीकृष्णाचीच चरित्र इत्यादी बसून दाखवली आहेत. बाबा म्हणतात - लीला काही श्रीकृष्णाच्या नाहीत. गातात देखील - हे प्रभू तुझी लीला अपरमअपार आहे. लीला एकाचीच असते. शिवबाबांची महिमा फार वेगळी आहे. ते तर आहेत सदैव पावन राहणारे, परंतु ते पावन शरीरामध्ये तर येऊ शकत नाहीत. त्यांना बोलावतातच - येऊन पतित दुनियेला पावन बनवा. तर बाबा म्हणतात - मला देखील पतित दुनियेमध्ये यावे लागते. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये येऊन प्रवेश करतो. तर बाबा म्हणतात मुख्य गोष्ट आहे - अल्फची (बाबांची) आठवण करा, बाकी हा सारा आहे विस्तार. ते सर्वच काही धारण करू शकणार नाहीत. जे धारण करू शकतात, त्यांना मी समजावून सांगतो. बाकीच्यांना तर सांगतो - मनमनाभव. बुद्धी नंबरवार तर असते ना. काही ढग तर खूप वर्षाव करतात, काही थोडा वर्षाव करून निघून जातात. तुम्ही देखील ढग आहात ना. काही तर अजिबातच वर्षाव करत नाहीत. ज्ञानाला आत्मसात करण्याची ताकद नाही. मम्मा-बाबा चांगले ढग आहेत ना. मुलांनी त्यांची संगत केली पाहिजे जे चांगली वर्षा करतात. जे वर्षावच करत नाहीत त्यांच्याशी संगत ठेवल्याने काय होणार? संगतीचा दोष देखील खूप लागतो. कोणी तर कोणाच्या संगतीने हिऱ्या समान बनतात, कोणी मग कोणाच्या संगतीने पत्थर बनतात. चांगल्याची पाठ धरली पाहिजे. जो ज्ञानवान असेल तो आप समान फूल बनवेल. सत्य बाबांकडून जे ज्ञानवान आणि योगी बनले आहेत त्यांची संगत केली पाहिजे. असे समजू नका की, आम्ही अमक्याची शेपूट पकडून (संगत केल्याने) पार होऊन जाऊ. असे बरेचजण म्हणतात. परंतु इथे तर तशी गोष्ट नाहीये. स्टुडंट कोणाची शेपूट पकडल्याने (संगत केल्याने) पास होतील का! अभ्यास करावा लागेल ना. बाबा सुद्धा येऊन नॉलेज देतात. यावेळी ते जाणतात की, आपल्याला ज्ञान द्यायचे आहे. भक्ती मार्गामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी नसतात की, आपल्याला जाऊन ज्ञान द्यायचे आहे. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा काही करत नाहीत. ड्रामामध्ये दिव्य दृष्टी मिळण्याचा पार्ट आहे त्यामुळे साक्षात्कार होतो. बाबा म्हणतात - असे नाही की, मी बसून साक्षात्कार घडवतो. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जर कोणी देवीचा साक्षात्कार करू इच्छितात, स्वतः देवी तर घडवणार नाही ना. म्हणतात - हे ईश्वरा, आम्हाला साक्षात्कार घडवा. बाबा म्हणतात - ड्रामामध्ये नोंदलेले असेल तर होईल. मी देखील ड्रामामध्ये बांधला गेलो आहे.

बाबा म्हणतात - मी या सृष्टीवर आलो आहे. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) मुखावाटे मी बोलत आहे, यांच्या डोळ्यांनी तुम्हाला बघत आहे. जर हे शरीर नसेल तर मी बघू कसे शकणार? पतित दुनियेमध्येच मला यावे लागते. स्वर्गामध्ये तर मला बोलावतच नाहीत. मला बोलावतातच संगमावर. जेव्हा संगम युगावर येऊन शरीर घेतो तेव्हाच बघतो. निराकार रूपामध्ये तर काही पाहू शकत नाही. कर्मेंद्रियांशिवाय आत्मा काहीही करू शकत नाही. बाबा म्हणतात - मी शरीराशिवाय पाहू कसे शकणार, हालचाल कशी करू शकणार. ही तर अंधश्रद्धा आहे, ज्यामुळे म्हणतात - ईश्वर सर्व काही बघतो, सर्व काही ते करतात. परंतु बघणार तरी कसे? जेव्हा कर्मेंद्रिये मिळतील तेव्हा बघतील ना. बाबा म्हणतात - चांगले किंवा वाईट काम ड्रामानुसार प्रत्येकजण करतो. नोंदलेले आहे. मी थोडाच इतक्या करोडों लोकांचा बसून हिशोब ठेवेन, मला शरीर असते तेव्हाच मी सर्वकाही करतो. करनकरावनहार देखील तेव्हाच म्हणतात, अन्यथा असे म्हणू शकत नाही. मी जेव्हा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करेन तेव्हाच येऊन पावन बनवणार. वरती (परमधाम मध्ये) आत्मा काय करेल? शरीराद्वारेच पार्ट बजावेल ना. मी देखील इथे येऊन पार्ट बजावतो. सतयुगामध्ये माझा पार्टच नाही आहे. पार्ट शिवाय कोणी काहीही करू शकत नाही. शरीराशिवाय आत्मा काही करू शकत नाही. आत्म्याला बोलावले जाते तर ती देखील शरीरामध्ये येऊनच बोलेल ना. कर्मेंद्रियांशिवाय काहीही करू शकत नाही. हे आहे विस्तृत स्पष्टीकरण. मुख्य गोष्ट तर म्हटली जाते - बाबांची आणि वारशाची आठवण करा. बेहदचे बाबा इतके मोठे आहेत, त्यांच्याकडून वारसा कधी मिळत असेल - हे कोणीही जाणत नाहीत. म्हणतात - येऊन दुःख हरण करा (दुःख दूर करा) सुख द्या, परंतु कधी? हे कोणालाच माहीत नाही. तुम्ही मुले आता नवीन गोष्टी ऐकत आहात. तुम्ही जाणता - आपण आता अमर बनत आहोत, अमरलोकमध्ये जात आहोत. तुम्ही अमरलोक मध्ये किती वेळा गेला आहात? अनेक वेळा. याचा कधी अंत होत नाही. अनेकजण म्हणतात - मोक्ष मिळू शकत नाही काय? बोला - ‘नाही, हा अनादि अविनाशी ड्रामा आहे, हा कधीही विनाश होऊ शकत नाही. हे तर अनादि चक्र फिरतच राहते. तुम्ही मुले यावेळी ‘सच्च्या साहेबांना’ (शिवबाबांना) जाणता. तुम्ही संन्यासी आहात ना. ते (दुनियेतील) फकीर नाही. संन्याशांना फकीर देखील म्हटले जाते. तुम्ही राजऋषी आहात, ऋषीला संन्यासी म्हटले जाते. आता पुन्हा तुम्ही श्रीमंत बनता. भारत किती श्रीमंत होता, आता कसा गरीब बनला आहे. बेहदचे बाबा येऊन बेहदचा वारसा देत आहेत. गाणे देखील आहे - ‘बाबा आप जो देते है सो कोई दे न सके’. तुम्ही आम्हाला विश्वाचे मालक बनवता, ज्याला कोणी लुटू शकणार नाही. अशा प्रकारची गाणी बनवणारे अर्थाचा विचार करत नाहीत. तुम्ही जाणता तिथे पार्टीशन इत्यादी काहीही होणार नाही. इथे तर किती पार्टीशन आहेत. तिथे धरती-आकाश संपूर्ण तुमचीच असते. तर इतका आनंद मुलांना झाला पाहिजे. नेहमी समजा शिवबाबा ऐकवत आहेत कारण ते कधी सुट्टी घेत नाहीत, कधी आजारी पडत नाहीत. आठवण शिवबाबांचीच राहिली पाहिजे. यांना म्हटले जाते - निरहंकारी. ‘मी असे करतो, मी तसे करतो’, असा अहंकार येता कामा नये. सेवा करणे तर कर्तव्य आहे, यामध्ये अहंकार येता कामा नये. अहंकार आला आणि हा कोसळला. सेवा करत रहा, ही आहे रुहानी सेवा. बाकी सर्व भौतिक आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबा जे शिकवतात, त्याचे रिटर्न म्हणून गुल-गुल (फूल) बनून दाखवायचे आहे. मेहनत करायची आहे. कधीही ईश्वरीय कुळाचे नाव बदनाम करायचे नाही, जे ज्ञानवान आणि योगी आहेत, त्यांचीच संगत करायची आहे.

२) मी-पणाचा त्याग करून निरहंकारी बनून रुहानी सेवा करायची आहे, याला आपले कर्तव्य समजायचे आहे. अहंकारामध्ये यायचे नाही.

वरदान:-
व्यर्थला देखील शुभ भाव आणि श्रेष्ठ भावनेद्वारे परिवर्तन करणारे सच्चे मरजीवा भव बापदादांचे श्रीमत आहे - मुलांनो, व्यर्थ गोष्टी ऐकू नका, ऐकवू नका आणि विचारही करू नका. सदैव शुभ भावनेने विचार करा, शुभ बोल बोला. व्यर्थला देखील शुभ भावनेने ऐका. शुभचिंतक बनून बोलण्याच्या भावाला परिवर्तन करा. सदैव भाव आणि भावना श्रेष्ठ ठेवा, स्वतःला परिवर्तन करा, दुसऱ्यांच्या परिवर्तनाचा विचार करु नका. स्वतःचे परिवर्तनच इतरांचे परिवर्तन आहे, यामध्ये ‘पहिला मी’ - असे मरजीवा बनण्यामध्येच मजा आहे, यालाच महाबली म्हटले जाते. यामध्ये आनंदाने मरा - हे मरणेच जगणे आहे, हेच खरे जीवनदान आहे.

बोधवाक्य:-
संकल्पांची एकाग्रता श्रेष्ठ परिवर्तनामध्ये फास्ट गती आणते.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- संघटनेची शक्ती जे हवे ते करू शकते. संघटनच्या निशाणीचे प्रतीक आहे - पाच पांडव. एकतेची शक्ती, हां जी, हां जी, विचार दिला, आणि मग एकतेच्या बंधनामध्ये बांधला गेला. हीच एकता सफलतेचे साधन आहे.