12-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आता तुमची पालना करत आहेत, शिकवत आहेत, घर बसल्या सल्ला देत आहेत, तर पदोपदी सल्ला घेत रहा तेव्हाच उच्च पद मिळेल”

प्रश्न:-
सजेपासून सुटण्यासाठी कोणता पुरुषार्थ दीर्घ काळ केलेला असला पाहिजे?

उत्तर:-
नष्टोमोहा बनण्याचा. कशातही ममत्त्व नसावे. आपल्या मनाला विचारायचे आहे - माझा कोणामध्ये मोह तर नाही आहे ना? अंतिम समयी कोणतेही जुने नाते आठवता कामा नये. योगबलाने सर्व हिशोब चुकते करायचे आहेत तरच सजा न भोगता उच्च पद मिळेल.

ओम शांती।
आत्ता तुम्ही कोणाच्या सन्मुख बसला आहात? बापदादांच्या. बाबा देखील म्हणावे लागते आणि दादा सुद्धा म्हणावे लागते. बाबा या दादांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) तुमच्या सन्मुख बसले आहेत. तुम्ही बाहेरच्या ठिकाणी राहता तेव्हा तिथे बाबांची आठवण करावी लागते. पत्र लिहावे लागते. इथे तर तुम्ही सन्मुख आहात. संवाद साधता - कोणासोबत? बापदादांसोबत. या दोन आहेत सर्वोच्च ऑथॉरिटी. ब्रह्मा आहेत साकार आणि शिव आहेत निराकार. आता तुम्ही जाणता सर्वोच्च ऑथॉरिटी असणाऱ्या बाबांना कसे भेटायचे असते! बेहदचे बाबा ज्यांना पतित-पावन असे म्हणून बोलावतात, आता प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या सन्मुख बसले आहात. बाबा मुलांची पालना (संगोपन) करत आहेत, शिकवत आहेत. घर बसल्या देखील मुलांना सल्ला मिळतो की, घरामध्ये अशा प्रकारे वागा. आता बाबांच्या श्रीमताप्रमाणे चालाल तर सर्वश्रेष्ठ बनाल. मुले जाणतात आम्ही सर्वश्रेष्ठ बाबांच्या मताद्वारे उच्च ते उच्च पद मिळवत आहोत. मनुष्य सृष्टीमध्ये उच्च ते उच्च पद या लक्ष्मी-नारायणाचे आहे. हे पूर्वी होऊन गेले आहेत. मनुष्य मग या श्रेष्ठ असणाऱ्यांना जाऊन नमस्कार करतात. मुख्य गोष्ट आहेच पवित्रतेची. मनुष्य तर मनुष्यच आहेत; परंतु कुठे ते विश्वाचे मालक आणि कुठे हे आताचे मनुष्य! हे तुमच्याच बुद्धीमध्ये आहे - भारत बरोबर ५ हजार वर्षांपूर्वी असा होता, आपणच विश्वाचे मालक होतो. दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये हे नाहीये. यांना (ब्रह्मा बाबांना) देखील थोडेच माहीत होते, एकदम घोर अंधारामध्ये होते. आता बाबांनी येऊन सांगितले आहे ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा कसे बनतात. या अतिशय गूढ, मनोरंजक गोष्टी आहेत, ज्या इतर कोणीही समजू शकणार नाही. हे नॉलेज बाबांव्यतिरिक्त दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. निराकार बाबा येऊन शिकवतात. श्रीकृष्ण भगवानुवाच नाही आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला शिकवून सुखी बनवतो आणि मग मी आपल्या निर्वाणधामला निघून येतो’. आता तुम्ही मुले सतोप्रधान बनत आहात, यामध्ये कसलाच खर्च नाही. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. बिना कवडी खर्च करता तुम्ही २१ जन्मांकरता तुम्ही विश्वाचे मालक बनता. पै-पैसे पाठवून देतात, तेही आपले स्वतःचे भविष्य बनविण्याकरिता. कल्पापूर्वी ज्याने जितके खजिन्यामध्ये टाकले आहे, तितकेच आत्ता टाकतील. ना जास्त, ना कमी टाकू शकणार. बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे त्यामुळे चिंता करण्याचा काही प्रश्नच रहात नाही. निश्चिंत होऊन आपण आपली गुप्त राजधानी स्थापन करत आहोत, याचे बुद्धीमध्ये स्मरण करायचे आहे. तुम्हा मुलांनी खूप आनंदामध्ये राहिले पाहिजे आणि मग नष्टोमोहा सुद्धा बनायचे आहे. इथे नष्टोमोहा बनल्यामुळे मग तिथे तुम्ही मोहजीत राजा-राणी बनाल. तुम्ही जाणता ही जुनी दुनिया तर आता नष्ट होणार आहे, आता परत जायचे आहे मग यामध्ये मोह का बरे ठेवायचा. कोणी आजारी असले आणि डॉक्टरांनी सांगितले की हा रुग्ण वाचण्याची आशा नाही तर मग त्याच्यातून मोह निघून जातो. समजतात आत्मा एक शरीर सोडून जाते आणि दुसरे घेते. आत्मा तर अविनाशी आहे ना. आत्मा निघून गेली, शरीर नष्ट झाले मग त्याची आठवण करून काय फायदा? आता बाबा म्हणतात तुम्ही नष्टोमोहा बना. आपल्या मनाला विचारायचे आहे - ‘माझा कोणामध्ये मोह तर नाही ना?’ नाहीतर अंतिम समयी जरूर त्याचीच आठवण येईल. नष्टोमोहा झालात तर हे पद प्राप्त कराल. स्वर्गामध्ये तर सगळे येतील - ती काही मोठी गोष्ट नाहीये. मोठी गोष्ट आहे सजा न खाता, उच्च पद प्राप्त करणे. योगबलाने सर्व हिशोब चुकते कराल तर मग सजा भोगावी लागणार नाही. जुने नातेवाईक सुद्धा आठवता कामा नये. आता तर आपले ब्राम्हणांसोबत नाते आहे नंतर मग आपले देवतांशी नाते असेल. आत्ताचे नाते सर्वात उच्च आहे.

आता तुम्ही ज्ञानसागर बाबांचे बनला आहात. सर्व नॉलेज बुद्धीमध्ये आहे. पूर्वी थोडेच माहित होते की, सृष्टीचक्र कसे फिरते? आता बाबांनी समजावून सांगितले आहे. बाबांकडून वारसा मिळतो म्हणून तर बाबांवर प्रेम आहे ना. बाबांकडून स्वर्गाची बादशाही मिळते. त्यांचा हा रथ (ब्रह्मा तन) ठरलेला आहे. भारतामध्येच भागीरथाचे गायन आहे. बाबा येतात देखील भारतामध्येच. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता ८४ जन्मांच्या शिडीचे ज्ञान आहे. तुम्हाला माहीत झाले आहे हे ८४ चे चक्र आम्हाला फिरायचेच आहे. ८४ च्या चक्रातून सुटू शकत नाही. तुम्ही जाणता की शिडी उतरण्यासाठी खूप वेळ लागतो, चढण्यासाठी फक्त हा शेवटचा जन्म लागतो म्हणून म्हटले जाते तुम्ही त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी बनता. या आधी तुम्हाला माहीत होते का की, आपण त्रिलोकीनाथ बनणार आहोत? आता बाबा मिळाले आहेत, शिकवत आहेत तेव्हा तुम्हाला कळले आहे. बाबांकडे कोणी आले की बाबा त्यांना विचारतात - या ड्रेसमध्ये, याच घरामध्ये यापूर्वी कधी भेटले आहात? म्हणतात - हो बाबा, कल्प-कल्प भेटतो. तर समजले जाते ब्रह्माकुमारीने व्यवस्थित समजावून सांगितले आहे. आता तुम्ही मुले स्वर्गाचे झाड समोर बघत आहात. जवळ आहात ना. मनुष्य बाबांसाठी म्हणतात - नावा-रूपापासून न्यारे आहेत, तर मग मुले कुठून येतील! ते देखील नावा-रूपापासून न्यारे होतील! जो शब्द बोलतात एकदम चुकीचा आहे. ज्यांना कल्पापूर्वी समजले असेल, त्यांच्याच बुद्धीमध्ये बसेल. प्रदर्शनीमध्ये बघा कसली-कसली माणसे येतात. कोणी तर ऐकीव गोष्टींवर लिहून टाकतात की या सर्व कल्पना आहेत. तर समजले जाते हे आपल्या कुळाचे नाहीत. अनेक प्रकारचे मनुष्य आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व झाड, ड्रामा, ८४ चे चक्र आलेले आहे. आता पुरुषार्थ करायचा आहे. तो देखील ड्रामा अनुसारच होतो. ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे. असेही नाही की, ड्रामामध्ये पुरुषार्थ करणे असेल तर करू, असे म्हणणे चुकीचे आहे. ड्रामा पूर्णपणे समजलेला नाही, त्यांना मग नास्तिक म्हटले जाते. ते बाबांवर प्रेम करू शकत नाहीत. ड्रामाच्या रहस्याला उलट्या प्रकारे समजल्यामुळे खाली कोसळतात (पतन होते), मग समजले जाते यांच्या नशीबामध्ये नाही आहे. विघ्न तर अनेक प्रकारची येतील. त्यांची पर्वा करायची नाही. बाबा म्हणतात - ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकवतो त्या ऐका. बाबांची आठवण केल्याने अतिशय आनंदात रहाल. बुद्धीमध्ये आहे आता ८४ चे चक्र पूर्ण होत आहे, आता आपल्या घरी जायचे आहे. अशा प्रकारे स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही पतित तर जाऊ शकणार नाही. पहिले तर जरुर साजण पाहिजे, नंतर वरात. गायले देखील आहे भोलेनाथाची वरात. सर्वांना नंबरवार जायचे तर आहे, इतक्या आत्म्यांची झुंड कशी बरे नंबरवार जात असेल! मनुष्य पृथ्वीवर किती जागा घेतात, किती फर्निचर, मालमत्ता इत्यादी हवी असते. आत्मा तर बिंदू आहे. आत्म्याला काय पाहिजे? काहीच नको. आत्म्याला किती छोटी जागा लागते. या साकारी झाडामध्ये आणि निराकारी झाडामध्ये किती अंतर आहे! ते आहे बिंदूंचे झाड. या सर्व गोष्टी बाबा बुद्धीमध्ये पक्क्या करून घेतात. तुमच्या व्यतिरिक्त या गोष्टी जगात इतर कोणीही ऐकू शकत नाही. बाबा आपल्याला आता आपल्या घराची आणि राजधानीची आठवण करून देतात. तुम्ही मुलांनी रचयित्याला जाणल्यामुळे सृष्टीचक्राच्या आदि-मध्य-अंताला जाणता. तुम्ही त्रिकालदर्शी, आस्तिक बनलात. जगभरात कोणीही आस्तिक नाही. ते आहे हदचे शिक्षण, हे आहे बेहदचे शिक्षण. तिथे (दुनियेमध्ये) अनेक टीचर शिकवणारे आहेत, इथे एकच टीचर शिकवणारे आहेत. जे मग अद्भुत आहेत. हे पिता सुद्धा आहेत, टीचर सुद्धा आहेत तर गुरू देखील आहेत. हे टीचर तर साऱ्या विश्वाचे आहेत. परंतु सर्वांनाच काही शिकायचे नाहीये. बाबांना सर्वांनीच जर ओळखले तर सर्वजण बापदादांना बघण्यासाठी धावत येतील. ग्रेट ग्रेट ग्रँडफादर, एडम यांच्यामध्ये बाबा आले आहेत हे कळले, तर एकदम पळत येतील. बाबांची प्रत्यक्षता तेव्हा होते जेव्हा युद्ध सुरू होते, तेव्हा मग कोणी येऊ देखील शकणार नाहीत. तुम्ही जाणता या अनेक धर्मांचा विनाश देखील होणार आहे. सर्व प्रथम एक भारतच होता दुसरा कोणताही खंड नव्हता. आता तुमच्या बुद्धीमध्ये भक्तीमार्गातील गोष्टीसुद्धा आहेत. बुद्धीने कोणी विसरून थोडेच जातात? परंतु आठवण असून देखील हे ज्ञान आहे, भक्तीचा पार्ट पूर्ण झाला आता तर आपल्याला परत जायचे आहे. या दुनियेमध्ये रहायचे नाही आहे. घरी जाण्यासाठी तर आनंद झाला पाहिजे ना. तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे तुमची आता वानप्रस्थ अवस्था आहे. तुम्ही दोन पैसे हे राज्य स्थापन करण्यामध्ये लावता, ते देखील जे करता, हुबेहूब कल्पापूर्वीप्रमाणे करता. तुम्ही देखील हुबेहूब कल्पापूर्वीवाले आहात. तुम्ही म्हणता - ‘बाबा, तुम्ही देखील कल्पापूर्वीवाले आहात’. आम्ही कल्प-कल्प बाबांकडून शिकतो. श्रीमतावर चालून श्रेष्ठ बनायचे आहे. या गोष्टी इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये असणार नाहीत. तुम्हाला हा आनंद आहे की, श्रीमतानुसार आपण आपली राजधानी स्थापन करत आहोत. बाबा फक्त एवढेच सांगतात - पवित्र बना. तुम्ही पवित्र बनाल तर सारी दुनिया पवित्र बनेल. सर्व परत निघून जातील. बाकी इतर गोष्टींची आपण काळजीच कशाला करायची. कशी सजा भोगतील, काय होईल यामध्ये आमचे काय जाते? आम्हाला आमची काळजी घ्यायची आहे. बाकी इतर धर्मवाल्यांच्या गोष्टींमध्ये आम्ही का पडायचे? आपण आहोत आदि सनातन देवी-देवता धर्माचे. खरे तर याचे नाव ‘भारत’ आहे मग ‘हिंदुस्तान’ नाव ठेवले आहे. हिंदू काही धर्म नाहीये. आपण जेव्हा लिहितो की आम्ही देवता धर्माचे आहोत तरीही ते हिंदू लिहितात कारण जाणतच नाहीत की देवी-देवता धर्म केव्हा होता. कोणीही समजत नाहीत. आता इतके बी. के. आहेत, हे तर कुटुंब झाले आहे ना! घर झाले ना! ब्रह्मा तर आहेत प्रजापिता, सर्वांचा ग्रेट-ग्रेट ग्रँडफादर. सर्व प्रथम तुम्ही ब्राह्मण बनता नंतर मग वर्णांमध्ये येता.

तुमचे हे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी देखील आहे, हॉस्पिटल सुद्धा आहे. गायले जाते - ‘ज्ञान-अंजन सद्गुरु दिया, अज्ञान अंधेर विनाश…’ योगबलाने तुम्ही एव्हरहेल्दी, एव्हरवेल्दी (सदा निरोगी, सदा समृद्ध) बनता. नेचर-क्युअर करतात ना. आता तुमची आत्मा क्योर झाल्याने (पावन झाल्यामुळे) मग शरीर देखील क्योर होईल (पावन होईल). हे स्पिरिच्युअल नेचर-क्युअर आहे. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस (आरोग्य संपत्ती आणि आनंद) २१ जन्मांसाठी मिळतात. वरती नाव लिहा - ‘रूहानी नेचर-क्युअर’. लोकांना पावन बनविण्यासाठीच्या युक्त्या लिहिण्यास काही हरकत नाही. आत्माच पतित बनली आहे म्हणून तर बोलावतात ना. आत्मा आधी सतोप्रधान पवित्र होती मग अपवित्र बनली आहे मग आता पवित्र कसे बनायचे? भगवानुवाच - मनमनाभव, माझी आठवण करा तर मी गॅरंटी करतो की, तुम्ही पवित्र व्हाल. बाबा किती युक्त्या सांगतात - अशा प्रकारे बोर्ड लावा. परंतु कोणीही असे बोर्ड अजूनपर्यंत लावले नाहीत. मुख्य चित्रे ठेवलेली असावीत. आत कोणीही आले तर बोला - ‘तू आत्मा परमधाममध्ये राहणारी आहेस. इथे ही कर्मेंद्रिये मिळाली आहेत पार्ट बजावण्याकरिता. हे शरीर तर विनाशी आहे ना. बाबांची आठवण करा तर विकर्मे नष्ट होतील. आता तुमची आत्मा अपवित्र आहे; पुन्हा पवित्र बना तेव्हाच घरी निघून जाल’. समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. जे कल्पापूर्वीचे असतील तेच येऊन फूल बनतील. यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही. तुम्ही तर चांगली गोष्ट लिहिता. ते गुरू लोकसुद्धा मंत्र देतात ना. बाबा देखील ‘मनमनाभव’चा मंत्र देऊन मग रचयिता आणि रचनेचे रहस्य समजावून सांगतात. गृहस्थव्यवहारामध्ये राहून फक्त बाबांची आठवण करा. इतरांनाही परिचय द्या, लाईट हाऊस सुद्धा बना.

तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनण्याची खूप गुप्त मेहनत करायची आहे. जसे बाबा जाणतात, मी आत्म्यांना शिकवत आहे, तसे तुम्ही मुलांनी देखील आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करा. तोंडाने ‘शिव-शिव’ असे देखील म्हणायचे नाहीये. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे कारण डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. आठवणीनेच तुम्ही पावन बनाल. कल्पापूर्वी जसा-जसा ज्यांनी वारसा घेतला असेल, तेच आपापल्या ठरलेल्या वेळी घेतील. काहीही अदला-बदली होऊ शकत नाही. मुख्य गोष्ट आहेच देही-अभिमानी होऊन बाबांची आठवण करणे, म्हणजे मग मायेची थप्पड खावी लागणार नाही. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे काही ना काही विकर्म होईल मग शंभर पट पाप बनते. शिडी उतरण्यासाठी ८४ जन्म लागले आहेत. आता पुन्हा चढती कला एकाच जन्मामध्ये होते. बाबा आले आहेत तर लिफ्टचा देखील शोध लागला आहे. पूर्वी तर कमरेला हाताचा आधार देऊन शिडी चढत होते. आता सोपी लिफ्ट निघाली आहे. ही देखील लिफ्ट आहे ज्यामुळे मुक्ती आणि जीवनमुक्तीमध्ये एका सेकंदामध्ये जाता. ‘जीवनबंध’पर्यंत येण्यासाठी ५ हजार वर्षे, ८४ जन्म लागतात. जीवनमुक्तीमध्ये जाण्यासाठी एक जन्म लागतो. किती सोपे आहे. तुमच्यापेक्षाही जे मागून येतील ते पटकन चढतील. समजतात हरवलेली वस्तू देण्यासाठी बाबा आले आहेत. त्यांच्या मतानुसार नक्की चालू. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणतीही चिंता न करता श्रीमतानुसार आपली गुप्त राजधानी स्थापन करायची आहे. विघ्नांची पर्वा करायची नाही. बुद्धीमध्ये असावे की, कल्पापूर्वी ज्यांनी मदत केली आहे ते नक्कीच आता देखील करतील, काळजी करण्याची गरज नाही.

२) सदैव आनंद वाटावा की आता आपली वानप्रस्थ अवस्था आहे, आम्ही परत घरी जात आहोत. आत्म-अभिमानी बनण्याची भरपूर गुप्त मेहनत करायची आहे. कोणतेही विकर्म करायचे नाही.

वरदान:-
कोणत्याही विक्राळ समस्येला शांत बनविणारे संपूर्ण निश्चयबुद्धी भव

जसा बाबांवर निश्चय आहे तसा स्वतःवर आणि ड्रामावर देखील संपूर्ण निश्चय असावा. आपल्यामध्ये जर दुबळेपणाचा संकल्प उत्पन्न होत असेल तर दुबळेपणाचे संस्कार बनतात, त्यामुळे व्यर्थ संकल्प रूपी दुबळेपणाच्या किटाणूंना आपल्यामध्ये प्रवेश करू देऊ नका. त्याबरोबरच ड्रामामध्ये जे काही सीन बघता, हादरवून टाकणाऱ्या सीनमध्ये देखील कल्याणाचा अनुभव व्हावा, भयग्रस्त वातावरण असो, विक्राळ समस्या असो; परंतु सदैव निश्चयबुद्धी विजयी बना तेव्हाच विक्राळ समस्या देखील शांत होईल.

बोधवाक्य:-
ज्याचे बाबांवर आणि सेवेवर प्रेम आहे त्याला परिवाराचे प्रेम आपोआप मिळते.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रूपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:-

जसे, ‘परमात्मा एक आहे’ ही विविध धर्मवाल्या सर्वांची मान्यता आहे; तसे यथार्थ सत्य ज्ञान एका बाबांचेच आहे किंवा एकच मार्ग आहे, हा आवाज जेव्हा बुलंद होईल तेव्हाच सर्व आत्म्यांचे अनेक थोड्या-थोड्या मदतीच्या आधाराच्या दिशेने भटकणे बंद होईल. आत्ता हेच समजतात की, हा देखील एक मार्ग आहे, चांगला मार्ग आहे; परंतु शेवटी सुद्धा एका बाबांचा एकच परिचय, एकच मार्ग आहे. ही सत्य परिचयाची अथवा सत्य ज्ञानाच्या शक्तीची लाट पसरवा तेव्हाच प्रत्यक्षतेच्या झेंड्याखाली सर्व आत्मे आधार घेऊ शकतील.