12-04-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2009 ओम शान्ति
मधुबन
बाबांचे अथवा सर्वांचे
प्रिय होण्यासाठी संतुष्टमणी बनून प्रत्येक परिस्थितीच्या प्रभावापासून मुक्त राहा
आज चोहो बाजूंच्या
संतुष्ट आत्म्यांना पाहत आहेत. संतुष्ट मणी आपल्या मण्याचे तेज चोहो बाजूला पसरवत
आहेत. सर्वात उत्तम ते उत्तम स्थिती आहेच संतुष्टतेची. सदैव संतुष्ट असणारे सर्वांना
प्रिय वाटतात, बाबांना तर प्रिय आहेतच. सदैव संतुष्ट तोच राहू शकतो ज्याच्याकडे
सर्व प्राप्ती आहेत. प्राप्तींचा आधार संतुष्टता आहे म्हणूनच असे आत्मे सर्व
ब्राह्मण आत्म्यांचे प्रिय आहेत. सर्व प्राप्ती अर्थात सदैव संतुष्ट. संतुष्ट
आत्म्याचा वायुमंडळावर देखील प्रभाव पडतो आणि सर्व प्राप्ती परमात्म्याची देणगी आहे.
परमात्मा बाबांद्वारे सर्व शक्ती, सर्व गुण, सर्व खजिने प्राप्त केलेली आत्मा सदैव
संतुष्ट राहते. संतुष्ट आत्म्याची स्थिती सदैव प्रगतिशील असते. संतुष्ट आत्म्यावर
परिस्थिती प्रभाव टाकू शकत नाही कारण जिथे संतुष्टता आहे तिथे सर्व शक्ती, सर्व गुण
आपोआपच येतात. एक संतुष्टता अनेक गुणांना आपलेसे करते. तर प्रत्येकाने स्वतःला
विचारा की मी सदैव संतुष्ट आत्मा राहतो का! संतुष्ट आत्मा सदैव सर्वांच्या,
बाबांच्या समीप आणि समान स्थितीमध्ये राहते. परंतु या स्थितीमध्ये राहण्यासाठी खूप
चांगली साक्षी दृष्टा अवस्था पाहिजे, त्रिकालदर्शी अवस्था पाहिजे. प्रत्येक कर्म
त्रिकालदर्शी अर्थात प्रत्येक गोष्टीच्या तिन्ही काळांना पारखून मग कर्म करणारे.
यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. त्या दोन गोष्टी आहेत संबंध आणि संपत्ती. संबंध
देखील अविनाशी आणि संपत्तीही अविनाशी. ते प्राप्त होते अविनाशी बाबांद्वारे. जेव्हा
अविनाशी संपत्ती आणि संबंध प्राप्त होतात तेव्हा आत्मा सदैव संतुष्ट होते
त्याचबरोबर ती बाबांची आणि सर्व आत्म्यांची अति प्रिय होते. मायेच्या रूपामध्ये
कोणतीही परिस्थिती आली तरी ते घाबरत नाहीत. असे वाटते जणूकाही बेहदच्या पडद्यावर
‘मिकी माऊस’चा खेळ चालला आहे. निराश होत नाहीत, मिकी माऊसचा खेळ पाहून मनोरंजन
करतात. मायेची भिन्न-भिन्न रूपे, भिन्न-भिन्न मिकी माऊस च्या रूपामध्ये अनुभव करतात.
अशा स्थितीचा अनुभव बाबांद्वारे सर्वांना प्राप्त करायचाच आहे आणि केला देखील आहे.
बापदादा पाहतात -
निर्भय, एकाग्र बुद्धी बनून विजयी आत्मे कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाहीत.
बाबांची जी प्रत्येक मुलाकडून शुभ आशा आहे की प्रत्येक मुलाने सदैव विजयी बनून
बाबांना आपले विजयाचे स्वरूप दाखवावे, तर प्रत्येकाने स्वतःला विचारा की, ‘मी कोण?’
बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, ‘कधी-कधी’ हा शब्द समयानुसार आता
ब्राह्मण डिक्शनरीमधून काढून टाका. जेव्हा बाबांकडून ‘सदैव’चा वारसा घ्यायचा आहे तर
प्रत्येक प्राप्ती सदैव प्राप्त व्हावी; कारण बाबांच्या मनातील आशा पूर्ण करणारे
तुम्ही आशेचे दिपक आहात. त्यांच्या संकल्पामध्ये देखील ‘कधी-कधी’ शब्द येऊ शकत नाही,
असे का? सदैव बाबांच्या सोबत आणि बाबांचे सोबती आहात. सोबत राहणारे देखील आहात आणि
सोबती बनून विश्व परिवर्तनाचे कार्य करणारे देखील आहात.
तर बोला, हे ‘सदैव’चे
वरदान बापदादांद्वारे प्राप्त केले आहे ना! हे तर जन्म घेताच बापदादा प्रत्येक
मुलाला नेहमी हेच वरदान देतात - ‘सदा योगी भव, पवित्र भव’. त्या वरदानाद्वारे ज्या
काही प्राप्ती होतात त्या सदाकाळासाठी असतात. कधी-कधी साठी नाहीत. तर सर्व मुले
‘सदैव’चे अधिकारी आहेत कारण बाबांचे प्रत्येक मुलावर भले मग तो लास्टचा मुलगा का
असेना परंतु बाबांचे प्रत्येक मुलावर हृदयापासून प्रेम आहे कारण ज्या मोठमोठ्या
हस्ती आहेत, ज्या स्वतःला खूप बुद्धिवान समजतात त्या देखील बाबांना ओळखू शकलेल्या
नाहीत, परंतु बापदादांच्या लास्ट मुलाने देखील बाबांना ओळखले आहे. मनापासून म्हणतात
- ‘माझे बाबा’ म्हणूनच बाबांचे प्रत्येक मुलावर अविनाशी प्रेम आहे म्हणून प्रत्येक
मुलाला बाबांचे वरदान आहे. मुले जरी नंबरवार असली, तरी बापदादा रोज एकाच वेळी, एकच
वरदान सर्व मुलांना एकत्रितपणे देतात. बापदादांचे प्रत्येक मूल भले नंबरवार असेल
परंतु ‘माझे बाबा’ म्हटले तर दररोज वरदानाचा अधिकारी बनला. प्रत्येक मुलाला भले मग
तो कुठेही राहत असेल, इंडियामध्ये राहत असेल नाहीतर फॉरेनमध्ये राहत असेल परंतु
सर्वांना वरदान एकाच बापदादांकडून मिळते आणि वरदानाला प्राप्त करून आनंदीतही होतात
परंतु दोन प्रकारची मुले आहेत, एक ती मुले आहेत जी वरदान पाहून खुश जरूर होतात परंतु
पुढचा नंबर तेच घेतात जे फक्त वरदानाला पाहून आनंदी होत नाहीत, वर्णन करत नाहीत की,
हे माझे वरदान आहे; परंतु ते वरदानाला फलीभूत करतात. वरदानाचा लाभ घेऊन वरदानाचे फळ
काढतात. बीज आहे परंतु बीजाला फलीभूत केले नाही, फळ काढले नाही तर फक्त आनंद होतो,
वरदानातून फळ काढण्यासाठी जसे कोणतेही बीज असते, त्यातून फळ काढण्यासाठी त्याला पाणी
आणि ऊन पाहिजे तेव्हाच फळ तयार होते. तसेच इथे देखील प्रत्येक मुलाला जेव्हा
वरदानाचे फळ काढायचे आहे, ज्यामुळे विस्तार होत जाईल, स्वतःच्याच मनामध्ये
वरदानाच्या फळाद्वारे वृद्धी होत जावी, तर इथे देखील बाबा म्हणतात की, वरदान फलीभूत
करण्यासाठी वारंवार वरदानाला स्मृतीमध्ये आणा. स्मृती स्वरूप स्थितीमध्ये स्थित राहा.
वारंवार आठवण करायची नाही परंतु कायम स्मृती रहावी, हे आहे पाणी देणे आणि
स्वरूपामध्ये स्थित होणे हे आहे ऊन देणे. तर असे फलीभूत झाल्यामुळे स्वतःमध्ये
देखील खूप शक्ती भरते आणि इतरांना देखील त्या फळाद्वारे शक्तीचा अनुभव करवू शकता.
बापदादा आता काय
इच्छितात? कारण बापदादा काही काळापासून वेळेची वॉर्निंग देत आहेत, प्रत्येक मुलाच्या
अभ्यासाच्या रिझल्टची वेळ अचानक येणार आहे, त्यासाठी सदैव एव्हररेडी. त्याचसोबत
बापदादा असा देखील इशारा देत आहेत की आताची वेळ आहे उडत्या कलेच्या तीव्र
पुरुषार्थाची. ‘चालत आहोत’ असे नाही, उडत आहोत. साधारण रितीने आपली दिनचर्या व्यतीत
करणे, आता तो कॉमन पुरुषार्थाचा काळ निघून गेला आहे म्हणूनच बापदादा इशारा देत आहेत,
प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प चेक करा. समजा, आपला तीव्र पुरुषार्थ न करता एक
तास साधारण पुरुषार्थामध्ये राहिलात आणि एका तासामध्येच जर अचानक फाइनल पेपरची वेळ
आली तर अंत मते सो गती, तो एका तासाचा साधारण पुरुषार्थ किती नुकसान करेल! म्हणूनच
बापदादा वेळोवेळी प्रत्येक मुलाला, प्रत्येक संकल्प, प्रत्येक सेकंद, वेळेच्या
महत्त्वा बद्दल इशारा देत आहेत. हलचलच्या वेळी अचल राहण्याचा पुरुषार्थ तीव्र
पुरुषार्थीच करू शकतो. साधारण पुरुषार्थी एव्हररेडी बनण्यामध्ये वेळ लावेल आणि
बापदादांनी सांगितले आहे की, सेकंदामध्ये बिंदू अर्थात फुलस्टॉप. जर तीव्र
पुरुषार्थ नसेल तर काय होते? अनुभवी तर आहातच. फुलस्टॉपच्या ऐवजी क्वेश्चन मार्क तर
बनणार नाही ना! बिंदू किती सोपा आहे आणि प्रश्नचिन्ह किती वेडेवाकडे आहे. फुलस्टॉप
म्हटले तर फुलस्टॉपच लागावा. कॉमाची सुद्धा मात्रा नसावी, आश्चर्याची मात्रा देखील
नसावी. ‘काय करू!’ असा विचार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही. तर कोणताही बच्चा
असा विचार करू शकत नाही की एवढा फास्ट पुरुषार्थ करणे म्हणजेच परीक्षेत पास होणे आहे.
बापदादा पाहतात की
काही मुलांच्या रोजच्या चार्टमध्ये ‘का, काय, कसे, असे…’ हे शब्द अजूनही कारणे
अकारणे दिसून येतात. अनेकांच्या चार्टमध्ये बापदादांनी पाहिले आहे की व्यर्थ
संकल्पांची लाट वेळ वाया घालवते आणि वेस्टचा वेग इतका तीव्र असतो जो साधारण
संकल्पाचा एक तास आणि फास्ट संकल्पाचे एक मिनिट बरोबरीचे आहे; म्हणून आज हे पाहत
होते की सर्वांचे प्रिय, बापदादांचे प्रिय संतुष्ट आत्मे कोण-कोण आहेत? संतुष्ट
आत्म्याच्या संकल्पामध्ये देखील हे ‘का, काय’ ची भाषा स्वप्नामध्ये देखील येणार नाही
कारण त्या आत्म्याला विशेष या तीन गोष्टी, तीन बिंदू लक्षात राहतात - आत्मा,
परमात्मा आणि ड्रामा; ते या तिन्ही गोष्टी योग्य वेळी कार्यामध्ये लावू शकतात कारण
अशा वेळी सर्व शक्तींचा खजिना गरजेचा असतो. आणि मास्टर सर्वशक्तिवान तोच आहे जो ज्या
वेळी ज्या शक्तीला ऑर्डर करेल ती हजर होईल. हवी आहे सहनशक्ती आणि आली सामना करण्याची
शक्ती, तर शक्ती आहे परंतु त्या वेळी ती उपयोगाची नाही. तर सर्व खजिन्यांची चावी आहे
तीन बिंदू - तुम्ही आत्मा, बाबा आणि ड्रामा.
तर बापदादांचा एक
संकल्प आहे, सांगू का? करावे लागेल. जे करण्यासाठी तयार आहेत, त्यांनी हात वर करा.
करावे लागेल. अच्छा, सर्व हात वर करत आहेत. मनाचा हात वर करत आहात की शरीराचा हात
वर करत आहात? मनाचा हात पक्का असतो. बापदादा समयानुसार प्रत्येक मुलाकडून ही शुभ आशा
ठेवत आहेत की, १५ दिवसानंतर पुन्हा बाबांचे भेटणे होते, तर हे जे १५ दिवस जातील
त्यामध्ये हा विशेष अभ्यास ट्रायल म्हणून करा, खरे तर तुम्हाला कायम असेच राहायचे
आहे, परंतु १५ दिवस ट्रायल करा आणि आपापल्या कनेक्शनमधल्या सेंटर्स कडून देखील
करवून घ्या, एखादी फेरी मारून, फोन करून त्यांना आठवण करून द्या की होमवर्क करत
आहात ना? होमवर्क काय आहे? इझी आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितींना पार तर
करतातच परंतु हे १५ दिवस प्रत्येकाने संकल्प, वाणी आणि कर्मामध्ये कमीत कमी ८० टक्के
मार्क्स मिळवायचे आहेत. तरी देखील बापदादा २० टक्के सवलत देत आहेत. आहे मंजूर?
मंजूर आहे? देऊ? हे काम देऊ? अच्छा १५ दिवस, माया सुद्धा ऐकत आहे. गोष्टी तर येतीलच,
गोष्टींकडे बघायचे नाही, पास व्हायचे आहे, हे लक्षात ठेवा. १५ दिवस काही मोठी गोष्ट
नाहीये परंतु प्रत्येकाने सच्च्या मनाने, स्वच्छ मनाने स्वप्नामध्ये देखील संकल्प,
वाणी आणि कर्मामध्ये पास होऊन दाखवायचे आहे. होऊ शकते? होऊ शकते का? टीचर्स सांगा
बरे होऊ शकते का? १५ दिवस तर काहीच नाहीत परंतु बापदादा ट्रायलसाठी सांगत आहेत की
संकल्प देखील व्यर्थ
नको, युद्ध नको विजयी. १५ दिवसांचे पूर्ण विजयी. अवघड आहे की सोपे आहे? सोपे आहे,
हात वर करा. सोपे आहे? तर बापदादा या १५ दिवसांचा रिझल्ट पाहतील. मग पुढे वाढवतील.
१५ दिवस तर कोणीही करू शकतो ना! करू शकता ना! मधुबन वाले, मधुबन वाले हात वर करा.
हे समोर पुढे मधुबनवाले बसले आहेत. खूप छान आहेत. फॉरेनर्स असोत किंवा इंडियावाले,
सर्वांना करायचे आहे. गावातील असोत किंवा मोठ्या शहरातील सर्वांना १५ दिवसांचे
रेकॉर्ड ठेवायचे आहे. ‘काय, का’, चा प्रश्न मनात उत्पन्न होऊ नये. ‘काय करू गोष्टच
अशी झाली’ हे सांगायचे नाही. ८० टक्के मिळवायचेच आहेत. तरी देखील बापदादा सवलत देत
आहेत, २० टक्के सोडून देत आहेत कारण बापदादा पाहतात की काही वेळा चालता-चालता माया
निष्काळजीपणा आणि आळसामध्ये घेऊन येते. रॉयल आळस आहे - ‘असे होते, तसे होते’, हा
रॉयल आळस, निष्काळजीपणा या तीव्र पुरुषार्थामध्ये कमतरता निर्माण करतो कारण आता
बापदादा सर्व स्टुडंट जे आहेत, त्या प्रत्येक स्टुडंटकडून आधी या १५ दिवसांची
रिहर्सल करून घेऊन काही काळ असाच अभ्यास करून घेऊ इच्छित आहेत, जे सर्वांकडून हात
वर करून घेतील, एव्हररेडी म्हटले तर सगळेच हात वर करू शकतील. यासाठी दीर्घकाळाचा
अभ्यास पाहिजे. म्हणून आता हा थोडासा अभ्यास करून घेत आहेत. अच्छा.
पहिल्यांदाच कितीजण
आले आहेत, त्यांनी उठा:-
छान आहे, तुम्हाला
बापदादांच्या समोर येण्याच्या दिवसाची खूप-खूप मुबारक असो, मुबारक असो. बाबांची नजर
मुलांवर पडली आणि मुलांची नजर बाबांवर पडली. त्यामुळे खूप-खूप अभिनंदन आहे. छान. आणि
केक तर नाहीये परंतु आनंदाचा केक खाऊन घ्या. छान आहे, आता उशिरा आला आहात परंतु
फास्ट जाऊन पुढचा नंबर घेऊ शकता म्हणून बापदादांच्या वतीने आणि तुमच्या सर्व साथी
बहिणींच्या आणि भावांच्या, सर्वांच्या शुभेच्छा, शुभेच्छा आहेत. असे उदाहरण बनेल जो
लास्ट येणारा देखील फास्ट जाऊन फर्स्ट लाईनमध्ये येऊ शकतो. अच्छा.
चोहो बाजूंच्या
बापदादांच्या आशा पूर्ण करणारे आशेचे दीपक, ‘का, काय’ च्या भाषेपासून न्यारे राहणारे
सदैव एकरस, सदैव ‘एक बाबा दुसरे ना कोणी’, बाबांशीच विशेष जीवनातील तीन नाती, पिता,
शिक्षक, सद्गुरू अनुभव करणारे, बाबांकडून वारसा, टीचर कडून शिक्षणाचा वारसा आणि
सद्गुरूं कडून वरदानांचा वारसा प्राप्त करणाऱ्या पदमपटीने भाग्यवान असणाऱ्या
प्रत्येक मुलाला बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
दादींसोबत संवाद:-
(यावेळी चोहो बाजूला सेवेचे प्रोग्राम खूप छान झाले आहेत) सर्वांनी सर्वांना मदत
देखील चांगली केली आहे. कोणालाही असा विचार करावा लागला नाही कसे करू, करायचेच आहे.
एकमेकांच्या मदतीने सर्व प्रोग्राम चांगले झाले. आवाज तर पसरला. संदेश तर मिळाला,
आता पुढे चला. (योगामध्ये सर्वांनी खूप चांगली अनुभूती केली) कारण टॉपिकच होता ना
‘वरदान घ्यायचे आहे’. तर योगाच्या प्रोग्राममधून अनुभव केला.
पंजाब झोनच्या
सेवाधारींसोबत संवाद:-
पंजाबला ड्रामा नुसार या संन्याशांच्या, महात्मांच्या सेवेचा चान्स चांगला मिळाला
आहे आणि ते करतही आहेत. पंजाबमध्ये स्थापनेच्या वेळी जशी सेवा सुरू झाली तसेच सहयोगी
आणि वारस क्वालिटीवाले निमित्त बनले. जितके पण गोंधळ घालणारे होते तितकेच शेर
क्वालिटी (सिंहा सारखे) देखील निघाले. आता पंजाबला काय करायचे आहे? ही विशेषता तर
आहे - आता पंजाबवाल्यांनी असा एखादा नामीग्रामी (नावाजलेला) ‘शेर’ तयार करावा, जो
सभेमध्ये माईक बनून आपला अनुभव सांगेल. माईक मोठा असावा, छोटा नाही. जसे
गव्हर्नमेंटचे व्ही.आय.पी. (V.I.P.) तर वेगळे असतात परंतु महात्म्यांमध्ये सुद्धा
व्ही.आय.पी. असतात, असा एखादा मोठा माईक तयार करा, जो आपल्या अनुभवाने इतरांना
उमंग-उत्साहामध्ये आणेल. असा कोणीतरी शोधा, तयारी करा. हे होऊ शकते कारण आजकाल सर्व
जण समजतात की साधू-संतांची सेवा तर द्वापर पासून सुरू झाली परंतु आपसमान असा मोठा
गुरू दुसऱ्याला, शिष्याला बनवेल, असे उदाहरण त्यांच्यामध्ये नसते आणि बापदादांनी
आपल्यापेक्षाही हुशार मुलांना तयार केले आहे, जे पब्लिकमध्ये जाऊ शकतात, म्हणून
पंजाबने काहीतरी नवीनता करून दाखवावी. व्ही.आय.पी. तर सर्व ठिकाणचे येतात परंतु
तुम्ही असा घेऊन या जेणेकरून सर्व जण ऐकून जागे होतील, त्यांना संदेश मिळेल. हे होऊ
शकते? पाहूया. थोडा वेळ तर लागतोच परंतु असा कोणीतरी तयार करून दाखवा. बाकी वृद्धी
तर होतच आहे. अच्छा!
वरदान:-
बाबांचा हात
आणि सोबत यांच्या स्मृतीद्वारे अवघड गोष्टीला सोपी बनविणारे निर्धास्त अथवा
निश्चिंत भव
ज्याप्रमाणे एखाद्या
मोठ्या व्यक्तीच्या हातात हात असतो तेव्हा स्थिती निर्धास्त अथवा निश्चिंत राहते.
तसे प्रत्येक कर्मामध्ये असेच समजले पाहिजे की बापदादा माझ्या सोबतही आहेत आणि
आमच्या या अलौकिक जीवनाचा हात त्यांच्या हातामध्ये आहे अर्थात जीवन त्यांच्या
स्वाधीन आहे, तर जबाबदारी देखील त्यांचीच होते. सर्व ओझे बाबांवर सोपवून स्वतःला
हलके करा. ओझे उतरविण्याचे किंवा अवघड गोष्टीला सोपे करण्याचे साधनच आहे - बाबांचा
हात आणि सोबत.
सुविचार:-
पुरुषार्थामध्ये
खरेपणा असेल तर बापदादांच्या एक्स्ट्रा मदतीचा अनुभव कराल.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
जर तुमच्याशी कोणी
टक्कर घेत असेल तर तुम्ही त्याला आपल्या स्नेहाचे पाणी द्या, तुम्ही आपल्या मधुरता
आणि नम्रतेच्या गुणाला सोडू नका. नम्रतेचा ड्रेस परिधान करून राहा. ही नम्रताच कवच
आहे, जे सेफ्टीचे साधन आहे. संस्कारांची रास जुळविण्याची सर्वात सोपी पद्धत आहे -
स्वतः नम्रचित्त आणि मधुरतेने संपन्न बना, दुसऱ्याला श्रेष्ठ सीट द्या.