12-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - आता
विनाशाची वेळ खूप जवळ आली आहे त्यामुळे एका बाबांवर खरे प्रेम करा, कोणा देहधारीवर
नाही”
प्रश्न:-
ज्या मुलांचे
खरे प्रेम एका बाबांवर असेल त्यांची लक्षणे काय असतील?
उत्तर:-
१) त्यांचा
बुद्धीयोग कोणाही देहधारीकडे जाऊ शकत नाही. ते आपापसात एकमेकांचे आशिक-माशूक बनणार
नाहीत. २) ज्यांचे खरे प्रेम आहे ते सदैव विजयी बनतात. विजयी बनणे अर्थात सतयुगाचे
महाराजा-महाराणी बनणे. ३) प्रीत-बुद्धी असणारे सदैव बाबांसोबत सच्चे राहतात. काहीही
लपवू शकत नाहीत. ४) रोज अमृतवेलेला उठून बाबांची प्रेमाने आठवण करतील. ५) दधीचि ऋषी
प्रमाणे सेवेमध्ये आपली हाडे देतात. ६) त्यांची बुद्धी सांसारिक (दुनियावी)
गोष्टींमध्ये भटकू शकत नाही.
गीत:-
न वह हम से
जुदा होंगे…
ओम शांती।
ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण कुलभूषण प्रतिज्ञा ही करत आहेत कारण त्यांचे प्रेम एका
बाबांवर जडलेले आहे. तुम्ही जाणता ही विनाशाची वेळ आहे. बाबा मुलांना समजावून सांगत
आहेत की, विनाश तर होणारच आहे. विनाशकाळात ज्यांची प्रीत बाबांवर असेल, तेच विजय
मिळवतील अर्थात सतयुगाचे मालक बनतील. शिवबाबांनी समजावून सांगितले आहे की, विश्वाचे
मालक तर राजासुद्धा बनतात तसेच प्रजासुद्धा बनते, परंतु पोझिशनमध्ये खूप फरक आहे.
जितके बाबांवर प्रेम कराल, आठवणीमध्ये रहाल तितके उच्च पद प्राप्त कराल. बाबांनी
समजावून सांगितले आहे - बाबांच्या आठवणीद्वारेच तुमच्या विकर्मांचे ओझे भस्म होईल.
तुम्ही लिहू शकता की, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी…’ हे लिहिण्यामध्ये काही घाबरण्याची
गरज नाही. बाबा म्हणतात - मी स्वतःम्हणतो की त्यांचा विनाश होईल आणि प्रीत
बुद्धीवाल्यांचा विजय होईल. बाबा अतिशय स्पष्टपणे सांगत आहेत. या दुनियेमध्ये त्या
ईश्वराशी प्रीत तर कोणाचीही नाही. तुमचीच प्रीत आहे. बाबा म्हणतात - मुलांनो,
परमात्मा आणि श्रीकृष्ण यांची महिमा वेगवेगळी लिहा तेव्हाच हे सिद्ध होईल की, गीतेचा
भगवान कोण आहे. हे तर आवश्यक आहे ना. दुसरे म्हणजे बाबा समजावून सांगत आहेत -
ज्ञानाचा सागर पतित-पावन परमपिता आहेत की पाण्याच्या नद्या? ज्ञानाची गंगा की
पाण्याची गंगा? हे तर खूप सोपे आहे. दुसरी गोष्ट - जेव्हा प्रदर्शन भरवता तेव्हा
सर्वात आधी निमंत्रण गीता पाठशाळा वाल्यांना द्यायला हवे. ते तर भरपूर आहेत. त्यांना
खास निमंत्रण दिले पाहिजे. जे श्रीमत भगवत गीतेचा अभ्यास करतात, त्यांना सर्वात आधी
निमंत्रण द्यायला हवे कारण तेच विसरले आहेत आणि सर्वांना विसरायला लावतात. त्यांना
बोलावले पाहिजे की आता येऊन जज करा (स्वतः पारख करा) आणि मग जे उमजेल त्याप्रमाणे
करा. तर मनुष्य देखील समजतील की, हे गीतेचा उपदेश करणाऱ्यांना बोलावतात. बहुतेक
यांचा प्रचार गीतेवरच आधारित आहे. गीते द्वारेच स्वर्गाची स्थापना झाली आहे. गीतेची
खूप महिमा आहे परंतु ती भक्तिमार्गाची गीता नव्हे.
बाबा म्हणतात - ‘मी
तुम्हाला सत्यच सांगतो. मनुष्य जे अर्थ काढतात ते एकदम चुकीचे आहेत. कोणीही सत्य
सांगत नाहीत, मीच सत्य सांगतो’. परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणे देखील सत्य नाहीये,
हे सर्व विनाशाला प्राप्त होतील आणि कल्प-कल्प होतात देखील. तुम्हाला सर्वप्रथम
मुख्य हीच गोष्ट समजावून सांगायची आहे. बाबा म्हणतात - ‘युरोपवासी यादवांची आहे
विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशासाठी खूप चांगली तयारी करत आहेत परंतु पत्थर-बुद्धी
हे समजू शकत नाहीत’. तुम्ही देखील पत्थर-बुद्धी होता, आता पारस-बुद्धी बनायचे आहे.
पारस-बुद्धी होता मग पत्थर-बुद्धी कसे बनलात! हे देखील एक आश्चर्यच आहे. बाबांना
म्हटलेच जाते नॉलेजफुल, मर्सीफुल. बाकी जे आपले स्वतःचेच कल्याण करणे जाणत नाहीत,
ते दुसऱ्यांचे कल्याण कसे करणार! जे नॉलेजच धारण करत नाहीत तर पद सुद्धा तसेच
मिळवतात, जे सेवाभावी आहेत तेच उच्च पद प्राप्त करतील. बाबा सुद्धा त्यांच्यावरच
प्रेम करतात. नंबरवार पुरुषार्थ अनुसार असतातच. कित्येकजण तर हे देखील समजत नाहीत
की, आमचे बाबांवर प्रेम नाहीये त्यामुळे पद सुद्धा मिळणार नाही. भले मग सख्खे बना
नाहीतर सावत्र बना; विनाशकाले प्रीत-बुद्धी नसेल, बाबांना फॉलो करत नसाल तर जाऊन
कनिष्ठ पद प्राप्त कराल. दैवी गुण देखील पाहिजेत. कधीही खोटे बोलता कामा नये. बाबा
म्हणतात - मी सत्य सांगतो, जे माझ्यावर प्रेम करत नाहीत त्यांना पद सुद्धा मिळणार
नाही. प्रयत्न करून २१ जन्मांचा पूर्ण वारसा घ्यायचा आहे. तर प्रदर्शन, मेळावे
यामध्ये सर्वप्रथम गीता पाठशाळावाल्यांना निमंत्रण द्यायचे आहे, कारण ते भक्त आहेत
ना. गीता-पारायण करणारे जरूर श्रीकृष्णाची आठवण करत असतील, परंतु समजत काहीच नाहीत.
श्रीकृष्णाने मुरली वाजवली, राधा मग कुठे गेली? सरस्वतीला सतार दाखवली आहे, मुरली
मग श्रीकृष्णाला दिली आहे. मनुष्य म्हणतात - आम्हाला अल्लाह ने जन्म दिला, परंतु
‘अल्लाह’ला जाणत नाहीत. भारताचीच गोष्ट आहे. भारतामध्येच देवतांचे राज्य होते,
त्यांची चित्रे मंदिरांमध्ये पूजली जातात. बाकी किंग इत्यादींचे स्टॅचू तर बाहेर
ठेवतात, ज्यावर पक्षी इत्यादी घाण टाकत राहतात. लक्ष्मी-नारायण, राधे-कृष्ण
इत्यादींना किती फर्स्ट क्लास ठिकाणी स्थापन करतात. त्यांना महाराजा-महाराणी
म्हणतात, किंग हा इंग्रजी शब्द आहे. किती लाखो रुपये खर्च करून मंदिर बांधतात कारण
ते महाराजा पवित्र होते. यथा राजा-राणी तथा प्रजा सर्व पूज्य आहेत. तुम्हीच पूज्य
आणि मग पुजारी बनता. तर पहिली गोष्ट आहे, बाबांची आठवण करा. बाबांची आठवण करण्याचा
अभ्यास केल्यामुळे धारणा होईल. प्रेम जर केवळ एकावरच नसेल तर मग अजून कुणा-कुणावर
मन जडते. अशाही काही मुली आहेत, ज्या एकमेकांवर इतके प्रेम करतात जितके शिवबाबांवर
सुद्धा करत नाहीत. शिवबाबा म्हणतात - तुम्हाला बुद्धीयोग माझ्यासोबत लावायचा आहे की
एकमेकांवर आशिक-माशुक बनायचे आहे! मग मला एकदमच विसरून जातात. तुम्हाला तर
माझ्यासोबत बुद्धियोग जोडायचा आहे, यासाठी मेहनत करावी लागते. बुद्धी जुन्या
नात्यांमधून तुटतच नाही. शिवबाबांच्या ऐवजी, दिवस-रात्र एकमेकांचीच आठवण करत राहतात.
‘बाबा’ नाव ऐकले तर मग ट्रेटर (विद्रोही) बनतात, मग शिव्या द्यायला सुद्धा वेळ लावत
नाहीत. या बाबांना (ब्रह्मा बाबांना) शिवी दिली तर शिवबाबा देखील लगेच ऐकतील.
ब्रह्माकडून शिकला नाहीत तर शिवबाबांकडून देखील शिकू शकणार नाही. ब्रह्मा शिवाय तर
शिवबाबा ऐकू देखील शकणार नाहीत, म्हणून म्हणतात - साकारला जाऊन विचारा. कितीतरी
चांगली-चांगली मुले आहेत जी साकारला (ब्रह्मा बाबांना) मानतच नाहीत. समजतात की, हा
तर पुरुषार्थी आहे. पुरुषार्थी तर सगळेच आहेत; परंतु तुम्हाला फॉलो तर
माता-पित्यालाच करायचे आहे. काहीजण तर समजावून सांगितले तर समजून घेतात, आणि
कोणाच्या भाग्यातच नसेल तर त्याला समजतच नाही. सेवायोग्य बनत नाहीत. परंतु बुद्धी
एका बाबांकडे ठेवायची आहे. आज-काल असे खूप निघाले आहेत जे म्हणतात - माझ्यामध्ये
शिवबाबा येतात, यामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे. मायेची खूप प्रवेशता होते,
ज्यांच्यामध्ये पूर्वी श्री नारायण इत्यादी येत होते, ते देखील आज इथे राहिलेले
नाहीत. फक्त प्रवेशता केल्याने काहीच फायदा नाही. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची)
आठवण करा. बाकी माझ्यामध्ये हे येतात, ते येतात… ही सर्व माया आहे. माझी जर आठवणच
केली नाहीत तर प्राप्ती ती काय होणार, जोपर्यंत बाबांशी थेट योग लावत नाही तोपर्यंत
पद तरी कसे मिळवू शकाल, धारणा कशी होईल.
बाबा म्हणतात - तुम्ही
मज एकाची आठवण करा. ब्रह्मा द्वारेच मी समजावून सांगतो, ब्रह्मा द्वाराच स्थापना
झाली आहे. त्रिमूर्ती देखील जरूर पाहिजे. कोणी तर ब्रह्माचे चित्र पाहूनच चिडतात.
कोणी मग श्रीकृष्णाचे ८४ जन्म पाहून चिडतात. चित्र फाडून देखील टाकतात. अरे, ही तर
बाबांनी चित्रे बनवून घेतली आहेत. तर बाबा मुलांना समजावून सांगतात - विसरू नका,
फक्त बाबांची आठवण करत रहा. बंधनात असलेल्यांनी देखील रडत बसायचे नाही. घरात बसून
बाबांची आठवण करत रहा. बंधनात असणाऱ्यांना तर अजूनच उच्च पद मिळू शकते. तुम्हा
मुलांना ज्ञान देणारे आहेतच मुळी एक ज्ञानसागर. स्पिरिचुअल नॉलेज एका बाबांशिवाय
इतर कोणालाच नाहीये. ज्ञानाचे सागर एक परमपिता परमात्माच आहेत, त्यांनाच लिबरेटर
म्हटले जाते, यामध्ये घाबरण्याची काय गरज आहे. बाबा मुलांना समजावून सांगतात,
मुलांनी मग इतरांना समजावून सांगायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तेव्हाच
सद्गतीला प्राप्त कराल. सतयुगामध्ये आहे रामराज्य, कलियुगामध्ये ते नाहीये.
सतयुगामध्ये तर एकच राज्य आहे. या सर्व गोष्टी ज्यांच्या बुद्धीमध्ये धारण होतात असे
तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत, ज्यांच्यामध्ये धारणा होत नाही, त्यांना विनाश
काले विपरीत-बुद्धी म्हणणार, पद मिळवू शकणार नाहीत. विनाश तर सर्वांचा होणारच आहे.
हे शब्द काही कमी आहेत काय! शिवबाबा म्हणतात - विनाश काले प्रीत-बुद्धी बना. हा
तुमचा अंतिम जन्म आहे, यामध्ये जर तुम्ही बाबांवर प्रेम करत नसाल तर पद देखील
मिळणार नाही. सच्चे दिल पर साहेब राजी असतो. दधीचि ऋषी प्रमाणे सेवेमध्ये हाडे
द्यायची आहेत (जीव तोडून सेवा करायची आहे). कधी कोणावर ग्रहचारी बसते तर नशाच उडून
जातो आणि मग अनेक प्रकारची वादळे येत राहतात. मग बोलतात - यापेक्षा तर लौकिक
दुनियेमध्ये निघून जावे, इथे तर अजिबात मजा येत नाही. तिथे तर नाटक, चित्रपट इत्यादी
गोष्टी भरपूर आहेत, ज्यांना या गोष्टींची सवय लागली आहे ते इथे थांबू शकत नाहीत,
खूप मुश्कील आहे. होय, पुरुषार्थाने उच्च पद देखील मिळवू शकतात, आनंदात राहिले
पाहिजे. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः म्हणतात - पहाटे उठून बसलो नाही तर मजाच येत नाही.
पडून राहिल्याने मग कधी-कधी डोळा लागेल. उठून बसल्यामुळे चांगले पॉईंट्स सुचत
राहतात, खूप मजा येते.
आता बाकी थोडे दिवस
आहेत, आपण बाबांकडून विश्वाची बादशाही घेत आहोत. याची जरी बसून आठवण केली तरी देखील
आनंदाचा पारा चढेल. जर पहाटेचे चिंतन केले तर दिवसभर आनंदी सुद्धा राहाल. जर आनंद
होत नसेल तर जरूर बाबांसोबत प्रीत-बुद्धी नाहीये. अमृतवेलेला एकांत चांगला असतो,
जितकी बाबांची आठवण कराल तितका आनंदाचा पारा चढेल. या शिक्षणामध्ये ग्रहचारी बसते
कारण बाबांना विसरतात. बाबांकडून वारसा घ्यायचा असेल तर मनसा-वाचा-कर्मणा सेवा
करायची आहे. या सेवेमध्येच हा अंतिम जन्म व्यतीत करायचा आहे. जर दुनियेतील इतर
गोष्टींमध्ये गुंतून रहाल तर मग ही सेवा केव्हा करणार! उद्या-उद्या करत मरून जाल.
बाबा आलेलेच आहेत स्वर्गामध्ये घेऊन जाण्याकरिता. इथे तर युद्धामध्ये कित्येकजण
मृत्युमुखी पडतात, किती जणांना दुःख होत असेल. तिथे तर युद्ध इत्यादी होणारच नाही.
हे सर्व शेवटचे आहे, सर्व नष्ट होणार आहेत. निधनके (जे बाबांचे बनलेले नाहीत) ते
असेच मरतील, जे धनीचे (बाबांचे बनलेले) असतील ते राज्य भाग्य प्राप्त करतील.
प्रदर्शनीमध्ये देखील
समजावून सांगायचे आहे की, आम्ही आमच्या कमाईतून, आपल्याच तन-मन-धनाने आपले राज्य
स्थापन करत आहोत. आम्ही काही भीक मागत नाही, गरजच नाही. पुष्कळ भाऊ-बहिणी एकत्र
येऊन राजधानी स्थापन करतात. तुम्ही करोडो एकत्र येऊन आपला विनाश करून घेता, आम्ही
तर पैसा-पैसा जमवून विश्वाचे मालक बनतो. किती वंडरफुल गोष्ट आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अमृतवेलेला
एकांतामध्ये बसून बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे. सांसारिक गोष्टींना बाजूला
सारून स्वतःला ईश्वरीय सेवेमध्ये गुंतवायचे आहे.
२) बाबांप्रति खरे
प्रेम ठेवायचे आहे. आपसामध्ये एकमेकांचे आशिक-माशुक बनायचे नाही. प्रीत एका
बाबांशीच जोडायची आहे, कोणत्या देहधारींशी नाही.
वरदान:-
सर्व
शक्तींच्या संपत्तीने संपन्न बनवून दाता बनणारे विधाता, वरदाता भव
जी मुले सर्व शक्तींनी
धनवान आहेत - तीच संपन्न आणि संपूर्ण स्थितीच्या समिपतेचा अनुभव करतात.
त्यांच्यामध्ये कोणत्याही भक्तासारखे अथवा भिकारीपणाचे संस्कार इमर्ज होत नाहीत.
‘बाबांची मदत पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, सहयोग पाहिजे, शक्ती पाहिजे’ - हा ‘पाहिजे’
शब्द दाता विधाता, वरदाता मुलांना शोभतच नाही. ते तर विश्वातील प्रत्येक आत्म्याला
काही ना काही दान अथवा वरदान देणारे असतात.
बोधवाक्य:-
प्रत्येक
आत्म्याला काही ना काही प्राप्ती करून देणारे वचनच ‘सत्-वचन’ आहेत.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
कितीही कोणी हलवेल
परंतु तुम्ही अचल रहा. परिस्थिती श्रेष्ठ आहे का स्वस्थिती श्रेष्ठ आहे? कधी
परिस्थिती वार तर करत नाही ना? विचार करा, की ही परिस्थिती पॉवरफुल आहे का स्वस्थिती
पॉवरफुल आहे? तर या स्मृती द्वारे दुर्बळापासून शक्तिशाली बनाल. जसे तुम्ही तपस्वी
एकरस स्थितीमध्ये एकाग्र होता आणि हठयोगी मग एका पायावर उभे राहतात. तर कुठे ही
एकरस स्थिती आणि कुठे ते एका पायावर स्थिर राहणे, फरक झाला ना!