12-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा त्या रथामध्ये येतात, ज्याने सर्वात पहिली भक्ती सुरू केली, जो नंबरवन पूज्य होता मग पुजारी बनला आहे, हे रहस्य सर्वांना उलगडून सांगा”

प्रश्न:-
बाबा आपल्या वारसदार मुलांना कोणता वारसा देण्यासाठी आले आहेत?

उत्तर:-
बाबा सुख, शांती, प्रेमाचे सागर आहेत. हाच सर्व खजिना ते तुम्हाला विल करतात (स्वेच्छेने देतात). असे विल करतात ज्यामुळे तुम्ही २१ जन्म खात रहा तरीही संपू शकणार नाही. तुम्हाला कवडी पासून हिरा बनवतात. तुम्ही बाबांचा सर्व खजिना योगबलाने घेता. बिना योग, खजिना मिळू शकणार नाही.

ओम शांती।
शिवभगवानुवाच. आता निराकार शिव भगवानला तर सर्वच मानतात. एकच निराकार शिव आहेत, ज्यांची सर्वजण पूजा करतात. बाकी जे कोणी देहधारी आहेत त्यांचे आपले साकार रूप आहे. आत्मा सर्वात आधी निराकार होती मग साकार बनली आहे. साकार बनते, शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा तिचा पार्ट सुरू होतो. मूलवतन मध्ये तर काही पार्ट नाहीये. जसे ॲक्टर घरी असतो तेव्हा त्याचा नाटकामध्ये पार्ट नसतो. स्टेजवर आल्या नंतर पार्ट बजावतात. आत्मे सुद्धा इथे येऊन शरीराद्वारे पार्ट बजावतात. सर्व काही पार्टवरच अवलंबून आहे. आत्म्यामध्ये तर काही बदल नसतो. जशी तुम्हा मुलांची आत्मा आहे, तशी यांची (शिवबाबांची) आत्मा आहे. बाबा परम आत्मा काय करतात? त्यांचे ऑक्युपेशन (जीवन-चरित्र) काय आहे, हे जाणून घ्यायचे आहे. कोणी राष्ट्रपती आहे, कोणी राजा आहे, हे आत्म्याचे ऑक्युपेशन आहे ना. हे पवित्र देवता आहेत त्यामुळे त्यांचे पूजन केले जाते. आता तुम्हाला समजले आहे की, हा अभ्यास शिकून लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक बनले आहेत. कोणी बनवले? परम आत्म्याने. तुम्ही आत्मे सुद्धा शिकवता. मोठेपणा हा आहे की बाबा येऊन तुम्हा मुलांना शिकवतात आणि राजयोग सुद्धा शिकवतात. किती सोपे आहे. याला म्हटले जाते - राजयोग. बाबांची आठवण केल्यामुळे आम्ही सतोप्रधान बनतो. बाबा तर आहेतच सतोप्रधान. त्यांची किती महिमा करतात. भक्तीमार्गामध्ये किती फळे, दूध इत्यादी अर्पण करतात. समजत काहीच नाही. देवतांची पूजा करतात, शिवलिंगावर दूध, फुले इत्यादी अर्पण करतात, माहीत तर काहीच नाही आहे. देवतांनी राज्य केले. अच्छा, शिवालाच का अर्पण करता? त्यांनी असे कोणते कार्य केले आहे की इतके पूजन करतात? देवतांविषयी तरीसुद्धा माहीत आहे, ते आहेत स्वर्गाचे मालक. त्यांना कोणी बनवले, हे सुद्धा माहीत नाही. शिवाची पूजा देखील करतात परंतु हे लक्षातही येत नाही की हे स्वयं भगवान आहेत. भगवंताने यांना (देवतांना) असे बनवले आहे. किती भक्ती करतात. सगळेच अजाण आहेत. तुम्ही सुद्धा शिवाची पूजा केली असेल, आता तुम्हाला समजते आहे, पूर्वी आपण काहीही जाणत नव्हतो. त्यांचे जीवन-चरित्र काय आहे, कोणते सुख देतात, काहीही माहीत नव्हते. या देवता सुख देतात का? भले राजा-राणी, प्रजेला सुख देतात परंतु त्यांना तर शिवबाबांनी असे बनवले ना. समर्पण त्यांचे आहे. हे (देवता) तर फक्त राज्य करतात, प्रजा देखील बनते. बाकी हे कोणाचे कल्याण करत नाहीत. जरी केले तरी अल्पकाळासाठी. आता तुम्हा मुलांना बाबा बसून शिकवत आहेत. त्यांना म्हटले जाते - कल्याणकारी. बाबा स्वतःचा परिचय देतात, माझ्या लिंगाची तुम्ही पूजा करत होता, त्यांना परम आत्मा म्हणत होता. परम-आत्माचे ‘परमात्मा’ होते. परंतु हे जाणत नाहीत की हे काय करतात. बस्स, फक्त म्हणतील की ते सर्वव्यापी आहेत. नावा-रूपा पासून न्यारे आहेत. मग त्यांच्यावर दूध वगैरे अर्पण करणे शोभत नाही. आकार आहे म्हणून तर त्यांच्यावर अर्पण करतात. त्यांना निराकार तर म्हणू शकत नाही. तुमच्याशी मनुष्य खूप वाद घालतात, बाबांसमोर येऊन देखील वादच घालतील. फुकटचे डोके खातात. फायदा काहीच नाही. हे समजावून सांगणे तर तुम्हा मुलांचे काम आहे. तुम्ही मुले जाणता बाबांनी आपल्याला किती श्रेष्ठ बनवले आहे. हे शिक्षण आहे. बाबा शिक्षक बनून शिकवतात. तुम्ही मनुष्या पासून देवता बनण्यासाठी शिकत आहात. देवी-देवता आहेत सतयुगामध्ये. कलियुगामध्ये असत नाहीत. रामराज्यच नाहीये जेणेकरून पवित्र राहू शकतील. देवी-देवता होते नंतर मग वाम मार्गाला लागतात. बाकी जसे चित्रात दाखवतात तसे नाही आहेत. जगन्नाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही पहाल तर काळी चित्रे (मुर्त्या) आहेत. बाबा म्हणतात - मायेला जिंकून जगतजीत बना. तर त्यांनी मग ‘जगत-नाथ’ नाव ठेवले आहे. वरती सर्व घाणेरडी चित्रे काढली आहेत, देवता वाममार्गाला लागल्यामुळे काळे बनले. त्यांची सुद्धा पूजा करत राहतात. मनुष्यांना तर काहीच माहित नाही कि, आपण कधी पूज्य होतो? ८४ जन्मांचा हिशोब कोणाच्याही डोक्यामध्ये नाहीये. पहिले पूज्य सतोप्रधान, मग ८४ जन्म घेता-घेता तमोप्रधान पुजारी बनतात. रघुनाथाच्या मंदिरामध्ये काळे चित्र दाखवतात, त्याचा अर्थ तर काहीही समजत नाहीत. आता तुम्हा मुलांना बाबा बसून समजावून सांगत आहेत. ज्ञान चितेवर बसून गोरे बनता, काम चितेवर बसून काळे बनता. देवता वाममार्गामध्ये जाऊन विकारी बनले मग त्यांचे नाव देवता तर ठेवू शकत नाही. वाममार्गामध्ये गेल्यामुळे काळे बनले आहात, ही त्याची निशाणी दाखवली आहे. तुम्ही जाणता की शिवबाबा तर काळे बनतच नाहीत. ते तर हिरा आहेत, जे तुम्हाला देखील हिऱ्या समान बनवतात. ते तर काळे बनत नाहीत, मग त्यांना काळे का बनवले आहे! कोणी काळा असणार, त्याने बसून हे चित्र काळे बनवले असणार. शिवबाबा म्हणतात - ‘मी काय चूक केली ज्यासाठी मला काळा बनवले आहे. मी तर येतोच सर्वांना गोरे बनविण्यासाठी, मी तर सदैव गोरा आहे. मनुष्यांची अशी बुद्धी बनली आहे की ते काहीही समजत नाहीत. शिवबाबा तर आहेतच सर्वांना हिरा बनविणारे. मी तर कायमच गोरा प्रवासी आहे. मी काय केले ज्यामुळे मला काळा बनवले आहे. आता तुम्हाला सुद्धा गोरे बनायचे आहे उच्च पद प्राप्त करण्यासाठी. उच्च पद कसे मिळवायचे? ते तर बाबांनी सांगितले आहे - फॉलो फादर. जसे याने (ब्रह्मा बाबांनी) सर्व काही बाबांच्या स्वाधीन केले. बाबांना बघा कसे सर्व काही देऊन टाकले. भले साधारण होते, ना फार गरीब, ना अति श्रीमंत होते. बाबा आता देखील म्हणतात - तुमचे रहाणीमान मध्यमवर्गीय असले पाहिजे. ना अति श्रीमंतीचे, ना फार गरीबीचे. बाबाच सर्व शिकवण देतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील दिसण्यात तर सर्वसामान्य वाटतात. तुम्हाला म्हणतात भगवान कुठे आहे, दाखवा. अरे, आत्मा बिंदू आहे, तिला बघणार का! हे तर जाणता की आत्म्याचा साक्षात्कार या डोळ्यांनी होत नाही. तुम्ही म्हणता भगवान शिकवतात तर जरूर कोणीतरी शरीरधारी असेल. निराकार कसे शिकवणार. मनुष्यांना तर काहीच माहिती नाही आहे. जसे तुम्ही आत्मा आहात, शरीराद्वारे पार्ट बजावता. आत्माच पार्ट बजावते. आत्माच बोलते, शरीराद्वारे. तर आत्मा उवाच (आत्मा बोलते). परंतु आत्मा उवाच म्हणणे बरोबर वाटत नाही. आत्मा तर वानप्रस्थ, बोलण्यापासून अलिप्त आहे, उवाच (बोलणे) तर शरीराद्वारेच करेल. वाणी पासून परे (अलिप्त) फक्त आत्माच रहाते. वाणीमध्ये यायचे असेल तर जरूर शरीर पाहिजे. बाबा देखील ज्ञानाचे सागर आहेत तर नक्कीच कोणाच्या तरी शरीराचा आधार घेतील ना. त्याला रथ म्हटले जाते. नाही तर ऐकवणार कसे? बाबा पतिता पासून पावन बनण्यासाठी शिकवण देतात. प्रेरणेची गोष्टच नाही. ही तर ज्ञानाची गोष्ट आहे. ते कसे आले? कोणाच्या शरीरामध्ये आले? येणार तर जरूर मनुष्यामध्येच. कोणत्या मनुष्यामध्ये आले? हे मात्र तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही माहीत नाही. रचयिता स्वतःच बसून आपला परिचय देतात की, मी कसा आणि कोणत्या रथामध्ये येतो. मुले तर जाणतात की बाबांचा रथ कोणता आहे. बरेच मनुष्य गोंधळून गेले आहेत. कसला-कसला म्हणून रथ बनवतात. जनावर इत्यादी मध्ये तर येणार नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी कोणत्या मनुष्यामध्ये येणार, हे तर समजू शकत नाहीत. येणे देखील भारतामध्येच होते. भारतवासीयांमध्ये देखील कोणाच्या शरीरामध्ये येऊ; काय राष्ट्रपती किंवा साधू महात्म्याच्या रथामध्ये येतील? असेही नाही की पवित्र रथामध्ये यायचे आहे. हे तर आहेच रावण राज्य. गायन देखील आहे - ‘दूर देश का रहने वाला… ’.

मुलांना हे देखील माहित आहे की भारत अविनाशी खंड आहे. त्याचा कधी विनाश होत नाही. अविनाशी बाबा अविनाशी भारत खंडामध्येच येतात. कोणत्या शरीरामध्ये येतात, हे ते स्वतःच सांगतात. इतर कोणी तर जाणू शकत नाही. तुम्ही जाणता कोणा साधू-महात्म्यामध्ये देखील येऊ शकत नाहीत. ते आहेत हठयोगी, निवृत्ती मार्गवाले. बाकी राहिले भारतवासी भक्त. आता भक्तांमध्ये सुद्धा कोणत्या भक्तामध्ये येतात? भक्त जुना पाहिजे, ज्याने खूप भक्ती केली आहे. भक्तीचे फळ देण्यासाठी परमेश्वराला यावे लागते. भारतात भक्त तर पुष्कळ आहेत. म्हणतील हा मोठा भक्त आहे, याच्यामध्ये यायला हवे. असे तर खूप भक्त बनतात. उद्यासुद्धा कोणाला वैराग्य आले, तर भक्त बनेल. तो तर फक्त या जन्माचा भक्त झाला ना. त्याच्यामध्ये येणार नाही. मी त्याच्यामध्येच येतो, ज्याने सर्वात पहिली भक्ती सुरू केली. द्वापर पासून भक्ती सुरू झाली आहे. हा हिशोब कोणालाही समजू शकणार नाही. किती गुप्त गोष्टी आहेत. मी त्याच्यामध्ये येतो, जो सर्वात पहिली भक्ती सुरू करतो. नंबरवन जो पूज्य होता तोच मग नंबरवन पुजारीसुद्धा बनेल. बाबा स्वतःच म्हणतात - हाच रथ पहिल्या नंबरमध्ये येतो. मग ८४ जन्मसुद्धा हेच घेतात. मी यांच्याच अनेक जन्मांतील अंतिम जन्माच्या अंतामध्ये प्रवेश करतो. यांनाच मग नंबरवन राजा बनायचे आहे. हेच खूप भक्ती करत होते. भक्तीचे फळ देखील यांनाच मिळाले पाहिजे. बाबा मुलांना दाखवतात की बघा, हे (ब्रह्मा बाबा) माझ्यावर कसे समर्पित झाले. सर्व काही देऊन टाकले. इतक्या भरपूर मुलांना शिक्षण देण्यासाठी धन देखील पाहिजे. ईश्वराने यज्ञ रचला आहे. ईश्वर यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बसून रुद्र ज्ञान यज्ञ रचतात, याला शिक्षण देखील म्हटले जाते. रुद्र शिवबाबा जे ज्ञानाचा सागर आहेत, त्यांनी ‘यज्ञ’ रचला आहे ज्ञान देण्याकरीता. शब्द अगदी बरोबर आहे. राजस्व, स्वराज्य मिळविण्यासाठी यज्ञ. याला ‘यज्ञ’ का म्हणतात? यज्ञामध्ये तर ते लोक आहुती वगैरे खूप टाकतात. तुम्ही तर शिकता, आहुती कोणती टाकता? तुम्ही जाणता, आपण शिकून हुषार होणार. मग ही सारी दुनिया यामध्ये स्वाहा होईल. यज्ञामध्ये शेवटच्या वेळी जी काही सामुग्री असते, ती सर्व यज्ञात टाकून देतात.

तुम्ही मुले आता जाणता आम्हाला बाबा शिकवत आहेत. बाबा तर आहेत अतिशय साधारण. मनुष्य काय जाणतील. त्या मोठ-मोठ्या लोकांची तर खूप जास्त महिमा केली जाते. बाबा तर अतिशय साधेपणाने बसले आहेत. मनुष्यांना कसे कळणार. हे दादा तर हिऱ्यांचे व्यापारी होते, शक्ती तर कोणती दिसून येत नाही. फक्त इतके म्हणतात यांच्यात काही तरी शक्ती आहे. बस्स. हे समजत नाहीत की, यांच्यामध्ये सर्वशक्तीमान बाबा आहेत. यांच्यामध्ये शक्ती आहे, परंतु ती शक्ती सुद्धा आली कुठून? बाबांनी प्रवेश केला ना. त्यांचा जो खजिना आहे तो असाच थोडेच देतात. तुम्ही योगबलाने घेता. ते तर आहेतच सर्वशक्तिमान. त्यांची शक्ती कुठे जात नाही. परमात्म्याला सर्वशक्तिमान का म्हटले जाते, हे देखील कोणाला माहित नाही. बाबा येऊन सर्व गोष्टी समजावून सांगतात. बाबा म्हणतात मी ज्याच्यामध्ये प्रवेश करतो, त्याच्यामध्येच तर पूर्ण गंज चढलेला होता - जुना देश, जुने शरीर, त्यांच्या अनेक जन्मांच्या शेवटी येतो, जो गंज चढला आहे तो कोणीही काढू शकत नाही. गंज काढणारा एकच सद्गुरु आहे, तो एव्हर प्युअर (सदा पावन) आहे. हे तुम्ही समजता. हे सर्व बुद्धीमध्ये बिंबविण्यासाठी देखील वेळ पाहिजे. तुम्हा मुलांना बाबा सर्व विल करतात (स्वेच्छेने देऊन टाकतात). बाबा ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर आहेत, सर्व काही मुलांना देऊन टाकतात. येतात सुद्धा जुन्या दुनियेमध्ये. प्रवेश सुद्धा त्याच्यामध्ये करतात, जो हिऱ्यासारखा होता मग कवडी समान बनला आहे. ते (दुनियावाले) भले या वेळी करोडपती आहेत, परंतु अल्पकाळासाठी. सर्वांचे सर्वकाही नष्ट होईल. वर्थ पाउंड (अमूल्य) तर तुम्ही बनता. आता तुम्ही देखील विद्यार्थी आहात. हे (ब्रह्मा बाबा) देखील विद्यार्थी आहेत, हे सुद्धा अनेक जन्मांच्या शेवटी आहेत. गंज चढला आहे. जे चांगल्या प्रकारे शिकतात, त्यांच्यातच गंज चढलेला आहे. जे सर्वात जास्त पतित बनतात, त्यांनाच मग पावन बनायचे आहे. हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. बाबा तर खरी गोष्ट सांगतात. बाबा आहेत सत्य. ते कधी चुकीचे सांगत नाहीत. या सर्व गोष्टी कोणी मनुष्य समजू शकत नाही. तर तुम्हा मुलांशिवाय लोकांना कसे कळणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्रेष्ठ पद मिळविण्यासाठी पूर्णपणे फॉलो फादर करायचे आहे. सर्व काही बाबांच्या हवाली करून ट्रस्टी होऊन सांभाळायचे आहे, पूर्णत: समर्पित व्हायचे आहे. खाणे-पिणे, रहाणीमान मध्यमवर्गियां प्रमाणे ठेवायचे आहे. राहणीमान ना अति श्रीमंतीवाले, ना फार गरीबीवाले असावे.

२) बाबांनी जो सुख-शांती, ज्ञानाचा खजिना विल केला आहे, तो इतरांना देखील द्यायचा आहे, कल्याणकारी बनायचे आहे.

वरदान:-
पवित्रतेच्या गुह्यतेला जाणून सुख-शांती संपन्न बनणारी महान आत्मा भव

पवित्रतेच्या शक्तीची महानता जाणून पवित्र अर्थात पूज्य देव आत्मे आत्तापासून बना. असे नको की शेवटी बनू. ही दीर्घ काळापासून जमा केलेली शक्ती शेवटी उपयोगी येईल. पवित्र बनणे काही साधी गोष्ट नाहीये. ब्रह्मचारी राहतो, पवित्र बनलो आहोत… परंतु पवित्रता जननी आहे; भले संकल्पाद्वारे, वृत्तीद्वारे, वायुमंडळाद्वारे, वाणीद्वारे, संपर्काद्वारे सुख-शांतीची जननी बनणे - याला म्हणतात महान आत्मा.

बोधवाक्य:-
श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित होऊन सर्व आत्म्यांना दयेची दृष्टी द्या, व्हायब्रेशन (स्पंदने) पसरवा.