12-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड सेन्सीबुल (बुद्धिमान) मुलांनो, नेहमी हे लक्षात ठेवा की, मी एक अविनाशी आत्मा आहे, मला आता बाबांसोबत पहिल्या मजल्यावर (परमधाम मध्ये) जायचे आहे”

प्रश्न:-
तुम्हा प्रत्येक मुलाला कोणती एक मेहनत अवश्य करायची आहे?

उत्तर:-
बाबा तुम्हाला इतके ज्ञान देत आहेत ते आपल्या हृदयामध्ये जपून ठेवा. त्याचे आतल्या आत मनन करून पचवा (धारण करा), ज्यामुळे शक्ती मिळेल. ही मेहनत प्रत्येकाने अवश्य केली पाहिजे. जे अशी गुप्त मेहनत करतात ते सदैव हर्षित राहतात, त्यांना नशा असतो की, आम्हाला शिकवणारे कोण आहेत! आम्ही कोणाच्या समोर बसलो आहोत!

ओम शांती।
हे कोणी म्हटले? दोनदा म्हणतात ओम् शांती, ओम् शांती. एक शिवबाबांनी म्हटले, एक ब्रह्माबाबांनी. हे बापदादा एकत्र आहेत. त्यामुळे दोघांनाही बोलावे लागेल ओम् शांती, ओम् शांती. आता आधी कोणी म्हटले? नंतर कोणी म्हटले? आधी शिवबाबांनी म्हटले - ओम् शांती. मी शांतीचा सागर आहे; नंतर कोणी म्हटले? दादांच्या आत्म्याने म्हटले. मुलांना आठवण करून देतात ओम् शांती, मी तर सदैव देही-अभिमानी आहे, कधीही देह-अभिमानामध्ये येत नाही. एकच बाबा आहेत जे सदैव देही-अभिमानी राहतात. ब्रह्मा, विष्णू, शंकर मात्र असे म्हणणार नाहीत. तुम्ही जाणता की ब्रह्मा, विष्णू, शंकराचे देखील सूक्ष्म रूप आहे. तर ओम् शांती म्हणणारे एक शिवबाबा आहेत, ज्यांना कोणतेही शरीर नाही. बाबा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगतात आणि म्हणतात - मी एकदाच येतो, मी सदैव देही-अभिमानी आहे. मी पुनर्जन्मामध्ये येत नाही, त्यामुळे माझी महिमाच न्यारी आहे. मला म्हणतात - निराकार परमपिता परमात्मा. भक्तिमार्गातही शिवासाठी म्हणतील - निराकार परमपिता परमात्मा आहेत. निराकाराची पूजा होते. ते कधीही देहामध्ये येत नाहीत अर्थात देह-अभिमानी बनत नाहीत. बरं, मग त्याच्या खाली या सूक्ष्मवतनमध्ये, जिथे ब्रह्मा-विष्णू-शंकर राहतात. शिवाचे नाम-रूप तर दिसून येत नाही. चित्रे बनतात परंतु ते आहेत निराकार, ते कधी साकार बनतच नाहीत. पूजा देखील निराकाराचीच होते. मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान राहते. भक्ती तर केली आहे. चित्र मुलांनी पाहिले आहे, तुम्ही जाणता की सतयुग-त्रेतामध्ये ना चित्रांची (मुर्तींची) भक्ती केली जाते, ना विचित्रची. बुद्धीमध्ये येते की परमपिता परमात्मा विचित्र आहेत. त्यांचे ना सूक्ष्म चित्र (सूक्ष्म रूप) आहे, ना स्थूल चित्र आहे. त्यांची महिमा गायली जाते - ‘दुःख हर्ता, सुख कर्ता, पतित-पावन’. तुम्ही इतर कोणाच्याही चित्राला (रुपाला) पतित-पावन म्हणणार नाही. असा कोणताही मनुष्य नाही ज्याच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट असेल. ब्रह्मा-विष्णू-शंकर आहेत सूक्ष्मवतनवासी. पहिला तबका (मजला), मग दुसरा मजला. सर्वात उंच आहे मूलवतन, त्या मजल्यावर राहणारे आहेत - परमपिता परमात्मा. सेकंड नंबरच्या मजल्यावर सूक्ष्म शरीर असणारे आहेत. तिसऱ्या मजल्यावर स्थूल शरीरधारी आहेत, यामध्ये गोंधळून जायचे नाही. या गोष्टी परमपिता परमात्म्याशिवाय कोणीही समजावून सांगू शकणार नाही. वरती सृष्टी आहे आत्म्यांची. त्याला म्हटले जाते - निराकारी दुनिया, आम्हा सर्व आत्म्यांची दुनिया, इनकारपोरियल वर्ल्ड. मग आपण आत्मे कारपोरियल वर्ल्डमध्ये (साकारी दुनियेमध्ये) येतो. तिथे (निराकारी दुनियेमध्ये) आहेत - आत्मे, इथे (साकारी दुनियेमध्ये) आहेत - जीवात्मे. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. बरोबर आपण निराकारी बाबांची मुले आहोत. आपणही आधी निराकार बाबांपाशी राहत होतो. आत्मे निराकारी दुनियेमधेच राहतात. जे अजूनपर्यंत साकारमध्ये पार्ट बजावण्यासाठी येत राहतात. ते झाले निराकार बाबांचे वतन. आपण आत्मा आहोत, हा नशा असायला हवा. अविनाशी गोष्टीचा नशा असला पाहिजे. विनाशी गोष्टीचा थोडाच असायला हवा. देहाचा नशा असणाऱ्याला देह-अभिमानी म्हटले जाते. देह-अभिमानी चांगले की आत्म-अभिमानी चांगले? सेन्सीबुल (बुद्धिमान) कोण? आत्म-अभिमानी. आत्माच अविनाशी आहे, देह तर विनाशी आहे. आत्मा म्हणते - मी ८४ देह घेते. आपण आत्मे परमधाममध्ये बाबांसोबत राहणारे आहोत. तिथून इथे पार्ट बजावण्याकरिता येतो. आत्मा म्हणते ओ बाबा. साकारी सृष्टीमध्ये आहेत साकारी बाबा. निराकारी सृष्टीमध्ये निराकार बाबा. ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. आता ब्रह्माला म्हणतात - प्रजापिता ब्रह्मा. ते तर इथेच झाले ना. तिथे आपण सर्व आत्मे एकाच पित्याची मुले भाऊ-भाऊ आहोत. शिव-पित्या सोबत राहणारे आहेत. परमात्म्याचे नाव आहे - शिव. आत्म्याचे नाव आहे - शाळीग्राम. आत्म्याचा देखील रचयिता हवा ना. मनामध्ये नेहमी बोलत राहा. जे ज्ञान मिळाले आहे ते आपल्या हृदयामध्ये जपून ठेवण्यासाठी मेहनत करायची आहे. आत्माच विचार करते. सर्वात आधी तर हा निश्चय करा की, आपण आत्मे बाबांसोबत राहणारे आहोत. आपण त्यांची संतान आहोत तर जरूर वारसा मिळाला पाहिजे. हे देखील तुम्ही जाणता की, हे जे आत्म्यांचे झाड आहे त्याच्या आधी नक्कीच बीज असते. जसा सिजरा (वंशावळ) बनवतात. मोठे वडील मग त्यांच्यापासून २-४ मुले जन्मली, मग त्यांच्यापासून आणखी जन्मली. एक-दोन वाढता-वाढता झाड मोठे होते. घराण्याचा नकाशा असतो. अमक्यापासून अमका जन्मला.

तुम्ही मुले जाणता की, सर्व आत्मे मूलवतनमध्ये राहतात. त्यांचे देखील चित्र आहे. उच्च ते उच्च आहेत बाबा. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - बाबा या शरीरामध्ये आलेले आहेत. रुहानी बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन आत्म्यांना शिकवत आहेत. सूक्ष्मवतनमध्ये तर शिकवणार नाहीत. सतयुगामध्ये तर हे ज्ञान कोणालाच नसते. बाबाच या संगमयुगावर येऊन हे ज्ञान देतात. या मनुष्य सृष्टी रूपी झाडाचे ज्ञान कोणालाच नाहीये. कल्पाचे आयुष्य खूप प्रदीर्घ लिहून ठेवले आहे. आता बाबा तुम्हाला समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, आता तुम्हाला पुन्हा घरी जायचे आहे’. ते आहे आत्म्यांचे घर. बाबा आणि मुले राहतात, सर्व ब्रदर्स (भाऊ-भाऊ) आहेत. भाऊ आणि बहिण तेव्हा म्हटले जाते जेव्हा इथे शरीर धारण करतात. आपण आत्मे सर्व भाऊ-भाऊ आहोत. भावांचा जरूर पिता देखील असेल ना. ते आहेत - परमपिता परमात्मा. सर्व आत्मे शरीरामध्ये राहून त्यांची आठवण करतात. सतयुग-त्रेतायुगामध्ये कोणीही आठवण करत नाही. पतित दुनियेमध्ये सर्वजण त्यांची आठवण करतात कारण सर्वजण रावणाच्या जेलमध्ये आहेत. सीता आळवणी करत असे - ‘हे राम’. बाबा म्हणतात - राम काही त्रेतामधला आठवत नाही. परमपिता परमात्म्याला, राम समजून आठवण करत राहतात. आत्मा बोलावते. आता तुम्ही जाणता - अर्धा कल्प मग आपण कोणाचीही अशी आळवणी करणार नाही कारण सुखधाममध्ये असणार. या वेळी बाबाच समजावून सांगतात, दुसरा कोणी जाणतच नाही. ते तर म्हणतात की आत्मा सो परमात्मा, आत्मा परमात्म्यामध्ये लीन होते. बाबा समजावून सांगत आहेत - आत्मा तर अविनाशी आहे. एकाही आत्म्याचा विनाश होऊ शकत नाही. जसे बाबा अविनाशी तशी आत्मा देखील अविनाशी आहे. इथे आत्मा पतित तमोप्रधान बनते, मग बाबा सतोप्रधान पवित्र बनवतात. संपूर्ण दुनियेला तमोप्रधान बनायचेच आहे. आणि पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. पतित दुनियेला पावन बनविण्याकरिता बाबांना यावे लागते. त्यांना म्हटलेच जाते - गॉडफादर. बाबा देखील अविनाशी आहेत, आपण आत्मे देखील अविनाशी आहोत, हा ड्रामा देखील अविनाशी आहे. तुम्ही मुले जाणता की या वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी कशी रिपीट होते (या जगाच्या इतिहास-भूगोलाची कशी पुनरावृत्ती होते). या चारही युगांमध्ये आपला पार्ट चालतो. आपण सूर्यवंशी मग चंद्रवंशी बनतो. चंद्रवंशी जसे सेकंड ग्रेडमध्ये येतात. १४ कला असणाऱ्यांना सूर्यवंशी म्हणू शकत नाही. खरेतर त्यांना देवी-देवता सुद्धा म्हणू शकत नाही. देवी-देवता संपूर्ण निर्विकारी, १६ कला संपूर्ण असणाऱ्यांना म्हटले जाते. रामाला १४ कला संपन्न म्हटले जाईल. तुमच्याच ८४ जन्मांचा हिशोब समजावून सांगितला जातो. नवीन वस्तू नंतर जुनी होते तेव्हा मग तो आनंद राहत नाही. आधी संपूर्ण पवित्र असतात, आणि मग काही वर्षे निघून गेली की थोडे जुने म्हणणार. घराचे उदाहरण देखील दिले जाते. असे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत घडते. ही दुनिया देखील एक खूप मोठा मंडप आहे. हे आकाश तत्व खूप मोठे आहे, याचा कोणताही अंत नाही. याचा अंत कुठे आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. चालत राहा, अंत सापडूच शकणार नाही. ब्रह्म महत्-तत्वाचा देखील काही अंत असू शकत नाही. तसे तर वैज्ञानिक अंत शोधण्याचा किती प्रयत्न करतात परंतु असे जाऊ शकत नाहीत, अंत सापडू शकत नाही. ब्रह्म तत्व अति विशाल आणि अनंत आहे. आपण आत्मे अतिशय छोट्या जागेमध्ये राहतो. इथे किती गगनचुंबी इमारती बांधतात. पृथ्वीवर धरतीची व्याप्ती खूप मोठी आहे. शेतजमीन इत्यादी तर पाहिजे ना. तिथे तर फक्त आत्मे राहतात. आत्मा शरीराशिवाय खाणार कशी? तिथे (परमधाममध्ये) तर आत्मा अभोक्ता आहे. खाण्याची अथवा उपभोगण्याची कोणतीही वस्तू तिथे नसते. बाबा समजावून सांगत आहेत की, हे ज्ञान तुम्हा मुलांना एकदाच मिळते. पुन्हा मग कल्पानंतरच तुम्हा मुलांना दिले जाते. तर हा नशा असला पाहिजे. आपण देवता धर्माचे होतो. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी आम्ही तुमच्याकडे शूद्रापासून ब्राह्मण बनण्याकरिता आलो होतो. आता पुन्हा आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. ते निराकार असल्याकारणाने तुम्ही म्हणाल की दादांकडे (ब्रह्मा बाबांकडे) आलो आहोत. बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. बाबा म्हणतात - जसे तुम्ही ऑर्गन्स घेऊन (शरीर धारण) करून पार्ट बजावता तसा मी देखील ऑर्गन्सचा (शरीराचा) आधार घेतो. नाहीतर मी पार्ट कसा बजावणार? मनुष्य शिवजयंती सुद्धा साजरी करतात, परंतु शिव तर निराकार आहेत. त्यांची जयंती कशी असू शकते? मनुष्य तर एक शरीर सोडून दुसरे घेतात. बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हा मुलांना राजयोग कसा शिकवू शकेन? मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी राजयोग, बाबाच येऊन शिकवतात. मलाच पतित-पावन, ज्ञानाचा सागर म्हणतात. मला झाडाच्या आदि-मध्य-अंता विषयीची माहिती आहे.

तुम्ही मुले समजता की बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून आपल्याला सर्व नॉलेज समजावून सांगतात. ब्रह्मा-विष्णू-शंकर यांच्या पार्टला देखील समजून घेतले पाहिजे. बाबांना तर समजून घेतले आहे की ते पतित-पावन आहेत. प्रत्येकाची महिमा वेगवेगळी, ड्युटी वेगवेगळी असते. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर इत्यादी बनतात. आत्मा म्हणते हे माझे शरीर आहे. मी प्राईम मिनिस्टर आहे. आत्मा शरीरासोबत नसेल तर बोलू शकणार नाही. शिवबाबा देखील आहेत निराकार. त्यांना देखील बोलण्यासाठी कर्मेंद्रियांचा आधार घ्यावा लागतो, म्हणूनच दाखवतात - गो-मुखातून गंगा प्रकटली. आता शिव तर आहेत बिंदू स्वरूप. त्यांना मुख कुठून आले? तर ते यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) येऊन बसतात, त्या मुखाद्वारे ज्ञान-गंगा वाहू लागते (ज्ञान सांगू लागतात). सर्वजण बाबांचीच आठवण करतात - ‘हे पतित-पावन या. आम्हाला या दुःखातून सोडवा’. तेच मोठ्यात मोठे सर्जन आहेत. त्यांच्यामधेच पतितांना पावन बनविण्याचे ज्ञान आहे. सर्व पतितांना पावन बनविणारे ते एकच सर्जन आहेत. सतयुगामध्ये सर्व निरोगी असतात. हे लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक आहेत. यांना अशी कर्मे कोणी शिकवली ज्यामुळे ते असे निरोगी बनले. बाबाच येऊन श्रेष्ठ कर्म शिकवतात. इथे तर लोक कर्म कूटत बसतात (पश्चाताप करत राहतात). सतयुगामध्ये असे म्हणणार नाहीत की, कर्मच अशी आहेत. तिथे कोणतेही दुःख, रोगराई नसते. इथे तर एकमेकांना दुःखच देत राहतात. सतयुग-त्रेतायुगामध्ये दुःखाची गोष्टच नसते, ज्यामुळे म्हटले जाईल की, हा कर्मांचा भोग आहे. कर्म-अकर्म-विकर्म यांचा अर्थ कोणीही समजूच शकत नाही. तुम्ही जाणता प्रत्येक गोष्ट आधी सतोप्रधान, मग सतो, रजो, तमो बनते. सतयुगामध्ये ५ तत्वे देखील सतोप्रधान असतात. आपली शरीरे देखील सतोप्रधान प्रकृतीची असतात नंतर मग आत्म्याच्या दोन कला कमी झाल्याने शरीर देखील तसेच बनते. सृष्टीच्या देखील दोन कला कमी होतात. हे सर्व बाबाच बसून समजावून सांगतात, दुसरा कोणीही सांगू शकणार नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता पासूनच बाबांच्या श्रीमतावर अशी श्रेष्ठ कर्म करायची आहेत, जेणेकरून नंतर कधीही कर्म कुटावी लागू नयेत (पश्चाताप करावा लागू नये) अर्थात कर्मांची शिक्षा भोगावी लागू नये.

२) कोणत्याही विनाशी वस्तूचा नशा ठेवायचा नाही. हा देह सुद्धा विनाशी आहे, याचा देखील नशा ठेवायचा नाही, सेन्सीबुल (बुद्धिमान) बनायचे आहे.

वरदान:-
या जुन्या दुनियेला परदेश समजून याच्यापासून उपराम (अलिप्त) राहणारे स्वदेशी भव

जसे बरीच माणसे परदेशातील वस्तूंना स्पर्श सुद्धा करत नाहीत, समजतात की आपल्या देशातील वस्तूंचाच वापर करावा. तसेच तुम्हा लोकांसाठी ही जुनी दुनिया देखील परदेश आहे, याच्यापासून उपराम राहा अर्थात जुन्या दुनियेतील ज्या गोष्टी आहेत, स्वभाव-संस्कार आहेत त्यांच्याकडे जरा सुद्धा आकर्षित होऊ नका. स्वदेशी बना अर्थात आत्मिक रूपामध्ये आपल्या अत्युच्च देश परमधामच्या आणि या ईश्वरीय परिवाराच्या हिशोबाने मधुबन देशाचे निवासी समजा आणि याच नशेमध्ये राहा.

बोधवाक्य:-
उचापतींमध्ये अडकून पडण्याऐवजी सदैव परमात्म भेटीच्या सोहळ्यामध्ये राहा.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

होली-हंसाची विशेषता आहे - सरळ-चित्त, सरळ वाणी, सरळ वृत्ती, सरळ दृष्टी. बापदादांना सर्वात प्रिय, सर्वात समीप साफ मनाचे लाडके आहेत. साफ मनाचे सदैव बापदादांच्या दिलतख्तनशीन, सर्व श्रेष्ठ संकल्प पूर्ण झाल्याकारणाने वृत्तीमध्ये, दृष्टीमध्ये, बोलण्यामध्ये आणि संबंध-संपर्कामध्ये सरळ आणि स्पष्ट एकसमान दिसून येतात.