12-07-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला साहेबजादे सो शहजादे बनायचे आहे, म्हणून आठवणीच्या यात्रेद्वारे
आपली विकर्म भस्म करा”
प्रश्न:-
कोणत्या एका
विधिद्वारे तुमची सर्व दुःखे दूर होतील?
उत्तर:-
जेव्हा तुम्ही आपली नजर बाबांच्या नजरेला मिळवता तेव्हा तुमची सर्व दुःखे दूर होतात
कारण स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात. हीच तुमची
आठवणीची यात्रा आहे. तुम्ही देहाचे सर्व धर्म सोडून बाबांची आठवण करता, ज्याद्वारे
आत्मा सतोप्रधान बनते, तुम्ही सुखधामचे मालक बनता.
ओम शांती।
शिव भगवानुवाच, स्वतःला आत्मा समजून बसा. बाबा म्हणतात शिवभगवानुवाच अर्थात शिवबाबा
समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजून बसा कारण तुम्ही सर्व भाऊ-भाऊ
आहात’. एकाच पित्याची मुले आहात. एकाच बाबांकडून वारसा घ्यायचा आहे, हुबेहूब जसा ५
हजार वर्षांपूर्वी बाबांकडून घेतला होता. आदि सनातन देवी-देवतांच्या राजधानीमध्ये
होता. बाबा बसून समजावून सांगत आहेत की, तुम्ही सूर्यवंशी अर्थात विश्वाचे मालक कसे
बनू शकता. माझी आपल्या पित्याची आठवण करा. तुम्ही सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहात. उच्च ते
उच्च भगवान एकच आहे. त्या सच्च्या साहेबाची मुले साहेबजादे (भगवंताची मुले) आहात.
हे बाबा बसून समजावून सांगतात, त्यांच्या श्रीमता नुसार बुद्धीचा योग लावाल तर तुमची
सर्व पापे नष्ट होतील. सर्व दुःखे दूर होतील. बाबांशी जेव्हा आपली दृष्टी भेट होते
तेव्हा सर्व दुःखे दूर होतात. दृष्टी भेट करण्याचा देखील अर्थ समजावून सांगतात.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, हि आहे आठवणीची यात्रा. याला ‘योग अग्नी’
सुद्धा म्हटले जाते. या योग अग्नी द्वारे तुमची जी जन्म-जन्मांतरीची पापे आहेत, ती
भस्म होतील. हे आहेच दु:खधाम. सगळे नरकवासी आहेत. तुम्ही खूप पापे केली आहेत, याला
म्हटले जाते रावण राज्य. सतयुगाला म्हटले जाते - रामराज्य. तुम्ही असे समजावून सांगू
शकता. भले कितीही मोठी सभा बसली असेल, भाषण करण्यासाठी थोडाच विरोध केला जातो.
तुम्ही तर भगवानुवाच सांगत असता. शिव भगवानुवाच - आपण सर्व आत्मे त्यांची संतान
आहोत, भाऊ-भाऊ आहोत. बाकी असे म्हणणार नाही की, श्रीकृष्णाची कोणी मुले होती आणि
इतक्या राण्या सुद्धा नव्हत्या. श्रीकृष्णाचे तर जेव्हा स्वयंवर होते, तेव्हा त्याचे
नावच बदलते. हां, असे म्हणता येईल कि लक्ष्मी-नारायणाची मुले होती. राधे-कृष्णच
स्वयंवरा नंतर लक्ष्मी-नारायण बनतात, त्यावेळी एक मुलगा असतो. मग त्यांचे घराणे सुरु
होते. तुम्हा मुलांना आता मामेकम् (मज एकाची) आठवण करायची आहे. देहाचे सर्व धर्म
सोडा, बाबांची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. सतोप्रधान बनून स्वर्गामध्ये जाल.
स्वर्गामध्ये काही दुःख असत नाही. नरकामध्ये खूप दुःख आहे. सुखाचे नामोनिशाण नाही.
असे युक्तीने सांगितले पाहिजे. शिव भगवानुवाच - माझ्या मुलांनो, या वेळी तुम्ही
आत्मे पतित आहात, आता पावन कसे बनणार? मला बोलावलेच आहे - ‘हे पतित पावन या’. पावन
असतातच मुळी सतयुगामध्ये, पतित असतात कलियुगामध्ये. कलियुगा नंतर पुन्हा सतयुग जरूर
बनणार आहे. नवीन दुनियेची स्थापना जुन्या दुनियेचा विनाश होतो. गायन देखील आहे
ब्रह्मा द्वारा स्थापना. आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी दत्तक मुले आहोत. आपण आहोत
ब्राह्मण चोटी (शिखा). विराट रूप देखील आहे ना. तर जरूर पहिले ब्राह्मण बनावे लागेल.
ब्रह्मा देखील ब्राह्मण आहे. देवता आहेतच सतयुगामध्ये. सतयुगामध्ये कायम सुख आहे.
दुःखाचे नामोनिशाण नाही. कलियुगामध्ये अमाप दुःख आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. असा
कोणीही नसेल कि ज्याला दुःख नसेल. हे आहे - रावण राज्य. हा रावण, भारताचा एक नंबरचा
शत्रू आहे. प्रत्येकामध्ये ५ विकार आहेत. सतयुगामध्ये कोणतेही विकार नसतात. तो आहे
पवित्र गृहस्थ धर्म. आता तर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत, अजूनही कोसळणार आहेत. हे
इतके सगळे बॉम्ब्स इत्यादी बनवत आहेत, ठेवण्यासाठी थोडेच आहेत. खूप सुधारणा करत
आहेत मग रिहर्सल होईल, त्यानंतर मग फायनल होईल. आता वेळ खूप कमी आहे, ड्रामा तर
आपल्या वेळेवर संपणार ना.
सर्वात पहिले तर
शिवबाबांचे ज्ञान असले पाहिजे. काहीही भाषण इत्यादी सुरु करता तर सर्वात आधी ‘शिवाए
नम:’ म्हणायचे आहे, कारण शिवबाबांची जी महिमा आहे ती इतर कोणाची असू शकत नाही.
शिवजयंतीच हिरे तुल्य आहे. श्रीकृष्णाचे चरित्र इत्यादी काहीच नाहीये. सतयुगामध्ये
तर छोटी मुले देखील सतोप्रधान असतात. मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची चंचलता इत्यादी
नसते. श्रीकृष्णासाठी असे दाखवतात - लोणी खात होता, हे करत होता, हि तर महिमा करण्या
ऐवजी अजूनच निंदा करतात. किती ख़ुशीमध्ये येऊन म्हणतात कि, ‘ईश्वर सर्वव्यापी आहे.
तुझ्यामध्ये देखील आहे, माझ्यामध्ये देखील आहे’. हि खूप मोठी निंदा आहे परंतु
तमोप्रधान मनुष्य या गोष्टींना समजू शकत नाहीत. तर सर्व प्रथम बाबांचा परिचय दिला
पाहिजे - ते निराकार पिता आहेत, ज्यांचे नावच आहे कल्याणकारी शिव, सर्वांचे सद्गती
दाता. ते निराकार पिता सुखाचा सागर आहेत, शांतीचा सागर आहेत. आता इतके दुःख का झाले
आहे? कारण रावण राज्य आहे. रावण आहे सर्वांचा शत्रू, त्याला मारतात देखील, परंतु
मरतच नाही. इथे काही एकच दुःख नाहीये, अमाप दु:ख आहे. सतयुगामध्ये आहे अमाप सुख. ५
हजार वर्षांपूर्वी बेहदच्या बाबांची संतान बनलो होतो आणि हा वारसा बाबांकडून घेतला
होता. शिवबाबा येतात जरूर, काहीतरी येऊन करतात ना. अचूक करतात तेव्हाच तर त्यांची
महिमा गायली जाते. ‘शिव-रात्री’ सुद्धा म्हणतात मग आहे श्रीकृष्णाची रात्री. आता
शिवरात्री आणि श्रीकृष्णाची रात्री याला देखील समजून घेतले पाहिजे. शिव तर येतातच
मुळी बेहदच्या रात्रीमध्ये. श्रीकृष्णाचा जन्म अमृतवेलेला होतो, रात्रीचा नाही.
शिवाची रात्री साजरी करतात परंतु त्यांची कोणती तिथी तारीख नाही आहे. श्रीकृष्णाचा
जन्म होतो अमृतवेलेला. अमृतवेला सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. ती लोकं
श्रीकृष्णाचा जन्म १२ वाजता साजरा करतात परंतु ती काही पहाट तर नाहीये. पहाट सकाळी
२-३ वाजताच्या सुमाराला म्हटले जाते ज्यावेळी आठवण देखील करू शकतील. असे थोडेच आहे
कि १२ वाजता विकारातून उठून कोणी भगवंताचे नाव तरी घेत असतील, अजिबात नाही. १२ च्या
सुमाराला अमृतवेला म्हटले जात नाही. त्या वेळी तर मनुष्य पतित, घाणेरडे असतात. सारे
वातावरणच दूषित असते. अडीज वाजता थोडेच कोणी उठते. ३-४ वाजताचा वेळ अमृतवेला आहे.
त्यावेळी उठून मनुष्य भक्ती करतात. श्रीकृष्णाचा रात्री १२ चा जन्म हि वेळ तर
मनुष्यांनी बनवली आहे, परंतु ती काही वेळ नाही आहे. तर तुम्ही श्रीकृष्णाची वेला (जन्म
वेळ) काढू शकता. ‘शिव’ची वेला (जन्म वेळ) काही काढू शकत नाही. हे तर स्वतः येऊन
समजावून सांगतात. सर्वात पहिली महिमा सांगायची आहे शिवबाबांची. गाणे नंतर नाही
सुरवातीला वाजवले पाहिजे. शिवबाबा सर्वात गोड बाबा आहेत, त्यांच्याकडून बेहदचा वारसा
मिळतो. आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी हा श्रीकृष्ण सतयुगाचा पहिला राजकुमार होता.
तिथे अपार सुख होते. अजूनही स्वर्गाचे गायन करत असतात. कोणाचा मृत्यू झाला कि
म्हणतात अमका स्वर्गात गेला. अरे, आता तर नरक आहे. स्वर्ग असेल तर स्वर्गामध्ये
पुनर्जन्म घेऊ शकेल.
समजावून सांगितले
पाहिजे कि आमच्याजवळ इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तो फक्त १५ मिनटामध्ये समजावून
सांगू शकणार नाही, त्यासाठी वेळ पाहिजे. सर्वात आधी तर एका सेकंदाची गोष्ट सांगतो,
बेहदचे बाबा जे दुःख हर्ता, सुखकर्ता आहेत, त्यांचा परिचय देतो. ते आम्हा सर्व
आत्म्यांचे पिता आहेत. आम्ही सर्व बी. के. शिवबाबांच्या श्रीमतावर चालतो. बाबा
म्हणतात - ‘तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात, मी तुमचा पिता आहे. मी ५ हजार वर्षांपूर्वी
आलो होतो, तेव्हाच तर शिवजयंती साजरी करता’. स्वर्गामध्ये काही साजरी केली जात नाही.
शिवजयंती असते, ज्याची मग भक्ती मार्गामध्ये यादगार (स्मृती) साजरी केली जाते. तो
गीता एपिसोड आता चालू आहे. ब्रह्मा द्वारे नवीन दुनियेची स्थापना, शंकरा द्वारे
जुन्या दुनियेचा विनाश. आता या जुन्या दुनियेचे वातावरण तर तुम्ही पाहत आहात, या
पतित दुनियेचा विनाश तर नक्कीच होणार आहे, म्हणूनच तर म्हणतात - ‘पावन दुनियेमध्ये
घेऊन चला’. प्रचंड दुःख आहे - युद्ध, मृत्यू, वैधव्य, आत्महत्या करणे... सतयुगामध्ये
तर अपार सुखाचे राज्य होते. हे एम ऑब्जेक्ट (लक्ष्मी-नारायणाचे) चित्र तर जरूर तिथे
घेऊन गेले पाहिजे. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. ५ हजार वर्षांची गोष्ट
सांगत आहेत - यांनी (लक्ष्मी-नारायणाने) हा जन्म कसा घेतला? अशी कोणती कर्म केली
ज्यामुळे हे बनले? कर्म-अकर्म-विकर्माची गति बाबाच समजावून सांगतात. सतयुगामध्ये
कर्म, अकर्म होतात. इथे तर रावण राज्य असल्यामुळे कर्म, विकर्म बनतात, म्हणूनच याला
पाप-आत्म्यांची दुनिया म्हटले जाते. देवाण-घेवाण देखील पाप-आत्म्यांशीच केली जाते.
पोटात बाळ असते तर लगेच सगाई करतात. किती क्रिमिनल दृष्टि (विकारी दृष्टी) आहे. इथे
आहेच विकारी दृष्टी. सतयुगाला म्हटले जाते सिव्हिलाइज्ड (पावन दृष्टी). इथे दृष्टी
खूप पाप करते. तिथे (सतयुगामध्ये) कोणी पाप करत नाहीत. सतयुगापासून कलियुग
अंतापर्यंत हिस्ट्री-जिओग्राफी रिपीट होते. हे तर जाणून घेतले पाहिजे ना. दु:ख धाम,
सुख धाम असे का म्हटले जाते? सर्व काही पतित आणि पावन होण्यावर अवलंबून आहे, म्हणून
बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे, याला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल. अर्धा कल्प
पवित्र दुनिया होती, जिथे श्रेष्ठ देवता होते. आता तर भ्रष्टाचारी आहेत. एकिकडे
म्हणतात कि, हि भ्रष्टाचारी दुनिया आहे आणि मग सर्वांना ‘श्री श्री’ म्हणत राहतात,
जे येते ते बोलतात. हे सगळे समजले पाहिजे. आता तर मृत्यू समोर उभा आहे. बाबा
म्हणतात मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पापे नष्ट होतील. तुम्ही सतोप्रधान बनाल.
सुखधामचे मालक बनाल. आता तर आहेच दुःख. कितीही त्या लोकांनी परिषदा घेतल्या, संघटना
केल्या परंतु यामुळे काहीही होणार नाही. शिडी खालीच उतरत जातात (पतनच होत जाते).
बाबा आपले कार्य आपल्या मुलांद्वारे करत आहेत. तुम्ही बोलावले आहे - ‘पतित पावन
या’, तर मी आपल्या वेळेवर आलेलो आहे. ‘यदा यदाहि धर्मस्य...’ याचा अर्थ सुद्धा जाणत
नाहीत. बोलवतात तर जरूर ते स्वतः पतित आहेत. बाबा म्हणतात - ‘रावणाने तुम्हाला पतित
बनविले आहे, आता मी पावन बनविण्यासाठी आलो आहे’. ती दुनिया (सतयुग) पावन दुनिया होती.
आता पतित आहे. ५ विकार सर्वांमध्ये आहेत, अपार दुःख आहे. सर्वत्र अशांतीच-अशांती आहे.
जेव्हा तुम्ही एकदम तमोप्रधान, पाप-आत्मा बनता त्यावेळी मी येतो. जे मला सर्वव्यापी
म्हणून माझ्यावर अपकार करतात त्यांच्यावर देखील मी उपकार करण्यासाठी येतो. मला
तुम्ही निमंत्रण देता कि, या पतित रावणाच्या दुनियेमध्ये या. पतित शरीरामध्ये या.
मला देखील रथ (देह) तर पाहिजे ना. पावन रथ तर नको आहे. रावण राज्यामध्ये आहेतच पतित,
पावन कोणीही नाही. सगळे विकारातूनच जन्म घेतात. हे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया) आहे
ते आहे व्हाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया) आहे. आता तुम्ही तमोप्रधाना पासून
सतोप्रधान कसे बनणार? पतित-पावन तर मीच आहे. माझ्यासोबत योग लावा, भारताचा प्राचीन
राजयोग हा आहे. येणार देखील जरूर गृहस्थ मार्गामध्ये. कसे अद्भुत रित्या येतात, हे
पिता देखील आहेत तर माता सुद्धा आहेत कारण गोमुख पाहिजे, ज्यातून अमृत निघेल. तर हे
माता-पिता आहेत, आणि मग मातांना सांभाळण्यासाठी सरस्वतीला (मम्माला) हेड बनवले आहे,
तिला म्हटले जाते - ‘जगत अंबा’. ‘काली माता’ म्हटले जाते. अशी कोणती काळी शरीरे
असतात काय! श्रीकृष्णाला काळे बनवले आहे, कारण काम चितेवर बसून काळे बनले आहेत.
श्रीकृष्णच काळा मग पुन्हा गोरा बनतो. या सर्व गोष्टी समजण्यासाठी देखील वेळ पाहिजे.
कोटींमध्ये कोणी, आणि कोणीमध्ये सुद्धा कोणाच्या बुद्धीमध्ये राहत असेल कारण
सर्वांमध्ये ५ विकारांची प्रवेशता आहे. तुम्ही हि गोष्ट सभेमध्ये सुद्धा समजावून
सांगू शकता कारण कुणालाही बोलण्याचा हक्क आहे, अशी संधी घेतली पाहिजे. अधिकृत
सभेमध्ये कोणी मधेच प्रश्न इत्यादी करत नाहीत. ऐकायचे नसेल तर शांतीने निघून जा,
आवाज करू नका. अशाप्रकारे समजावून सांगा. आता तर अपार दुःख आहे. दुःखाचे डोंगर
कोसळतील. आम्ही बाबांना आणि रचनेला जाणतो. तुम्ही तर कोणाच्याही जीवन चरित्राला
जाणत नाही, बाबांनी भारताला स्वर्ग कधी आणि कसे बनवले - हे तुम्ही जाणत नाही, याल
तर आम्ही तुम्हाला समजावून सांगू. ८४ जन्म कसे घेतो? ७ दिवसांचा कोर्स करा, तर
तुम्ही २१ जन्मांसाठी पाप आत्म्यापासून पुण्य-आत्मा बनाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
कर्म-अकर्म-विकर्माची गुह्य गती जी बाबांनी समजावून सांगितली आहे, ती बुद्धीमध्ये
ठेऊन पाप आत्म्यांशी आता देवाण-घेवाण करायची नाही.
२) श्रीमतानुसार आपला
बुद्धियोग एका बाबांसोबत लावायचा आहे. सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
दुःख धामला सुख-धाम बनविण्यासाठी पतितापासून पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टीला) बदलायचे आहे.
वरदान:-
नॉलेजफुल बनून
सर्व व्यर्थ प्रश्नांना यज्ञामध्ये स्वाहा करणारे निर्विघ्न भव
जेव्हा काही विघ्न
येतात तर ‘का, कशाला’ अशा अनेक प्रश्नांमध्ये जाता; प्रश्नचित्त बनणे अर्थात चिंतीत
होणे. नॉलेजफुल बनून सर्व व्यर्थ प्रश्नांना यज्ञामध्ये स्वाहा करा तर तुमचा देखील
वेळ वाचेल आणि दुसऱ्यांचा सुद्धा वेळ वाचेल, यामुळे सहजच निर्विघ्न बनाल. ‘निश्चय’
आणि ‘विजय’ जन्मसिद्ध अधिकार आहे - या शानमध्ये (शुद्ध गर्वामध्ये) रहा तर कधीही
चिंतीत होणार नाही.
बोधवाक्य:-
नेहमी
उत्साहामध्ये राहणे आणि इतरांना देखील उत्साह देणे - हेच तुमचे ऑक्यूपेशन (काम) आहे.