12-09-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - ब्राह्मण आहे शिखा आणि शूद्र आहेत पाय, जेव्हा शूद्रा पासून ब्राह्मण बनाल तेव्हा देवता बनू शकाल’’

प्रश्न:-
१:- तुमची कोणती शुभ भावना आहे, ज्याला मनुष्य देखील विरोध करतात?

उत्तर:-
तुमची शुभ भावना आहे की, ही जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनिया स्थापन व्हावी; यासाठी तुम्ही म्हणता की, ही जुनी दुनिया आता नष्ट झाली की झाली. याला देखील मनुष्य विरोध करतात.

प्रश्न:-
२:- या इंद्रप्रस्थचा मुख्य नियम कोणता आहे?

उत्तर:-
कोणत्याही पतित शूद्राला या इंद्रप्रस्थ सभेमध्ये घेऊन येऊ शकत नाही. जर कोणी घेऊन येत असेल तर त्यांच्यावर देखील पाप चढते.

ओम शांती।
रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. रुहानी मुले जाणतात - आपण आपल्यासाठी आपले दैवी राज्य पुन्हा स्थापन करत आहोत. कारण तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहात, हे तुम्हीच जाणता. परंतु तुम्हाला देखील हे माया विसरायला लावते. तुम्ही देवता बनू इच्छिता परंतु माया तुम्हाला ब्राह्मणापासून शूद्र बनवते. शिवबाबांची आठवण न केल्याने ब्राह्मण शूद्र बनतात. मुलांना हे माहित आहे की आपण आपले राज्य स्थापन करत आहोत. जेव्हा राज्य स्थापन होईल तेव्हा मग ही जुनी सृष्टी राहणार नाही. सर्वांना या विश्वामधून शांतीधाममध्ये पाठवून देतात. ही आहे तुमची भावना. परंतु तुम्ही जे म्हणता की, ही दुनिया नष्ट होणार आहे तर जरूर लोक विरोध करतील ना. म्हणतील की, ‘ब्रह्माकुमारी मग असे काय म्हणतात. विनाश-विनाश हेच म्हणत राहतात’. तुम्ही जाणता या विनाशामध्येच खास भारत आणि आम दुनियेचे कल्याण आहे. ही गोष्ट दुनियावाले जाणत नाहीत. विनाश झाला तर सर्वजण मुक्तिधाममध्ये निघून जातील. आता तुम्ही ईश्वरीय संप्रदायाचे बनले आहात. आधी आसुरी संप्रदायाचे होता. तुम्हाला ईश्वर स्वतः म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. हे तर बाबा जाणतात की, कोणीही निरंतर आठवणीमध्ये राहू शकत नाही. निरंतर आठवण राहील तर विकर्म विनाश होतील मग तर कर्मातीत अवस्था होईल. आता तर सर्वजण पुरुषार्थी आहेत. जे ब्राह्मण बनतील तेच देवता बनतील. ब्राह्मणांच्या नंतर आहेत देवता. बाबांनी समजावून सांगितले आहे ब्राह्मण आहे शिखा. ज्याप्रमाणे मुले बाजोली (कोलांटी उडीचा खेळ) खेळतात - पहिले येते डोके, शेंडी. ब्राह्मणांना नेहमी शेंडी असते. तुम्ही आहात ब्राह्मण. अगोदर शूद्र होता अर्थात पाय होता. आता बनले आहात ब्राह्मण - शेंडी, नंतर मग देवता बनाल. देवता म्हटले जाते मुखाला, क्षत्रिय भुजांना, वैश्य पोटाला, शूद्र पायाला. शूद्र अर्थात शूद्र-बुद्धि, तुच्छ-बुद्धि. तुच्छ-बुद्धि त्यांना म्हटले जाते जे बाबांना जाणत नाहीत, आणखीनच बाबांची निंदा करत राहतात. म्हणूनच बाबा म्हणतात - ‘जेव्हा-जेव्हा भारतामध्ये ग्लानी होते, तेव्हा मी येतो’. जे भारतवासी आहेत बाबा त्यांच्याशीच बोलतात. ‘यदा यदाहि धर्मस्य…’ बाबा येतातच भारतामध्ये. दुसऱ्या कोणत्या ठिकाणी येतही नाहीत. भारतच अविनाशी खंड आहे. बाबा देखील अविनाशी आहेत. ते कधीही जन्म-मरणामध्ये येत नाहीत. बाबा अविनाशी आत्म्यांनाच बसून ऐकवतात. हे शरीर तर आहे विनाशी. आता तुम्ही शरीराचे भान सोडून स्वतःला आत्मा समजू लागले आहात. बाबांनी समजावून सांगितले होते की होळीला कोकी (गोड पोळी) बनवतात तर कोकी संपूर्ण जळून जाते, धागा जळत नाही. आत्मा कधी नष्ट होत नाही. याच्यावरच एक उदाहरण आहे. हे कोणत्याही मनुष्यमात्राला माहीतच नाही आहे कि आत्मा अविनाशी आहे. ते तर म्हणतात - आत्मा निर्लेप आहे. बाबा म्हणतात - ‘नाही, आत्माच चांगले किंवा वाईट कर्म करते या शरीराद्वारे’. एक शरीर सोडून मग दुसरे घेते आणि कर्मभोग भोगते, तर ती हिशोब (कर्मभोग) घेऊन आली ना, म्हणून आसुरी दुनियेमध्ये मनुष्य अपार दुःख भोगतात. आयुष्य देखील कमी असते परंतु मनुष्य या दुःखांना देखील सुख समजून बसले आहेत. तुम्ही मुले किती सांगता की, निर्विकारी बना, तरीही म्हणतात - विषा शिवाय (विकारा शिवाय) आम्ही राहू शकत नाही; कारण शूद्र संप्रदाय आहे ना. शूद्र-बुद्धि आहेत. तुम्ही बनले आहात ब्राह्मण शिखा. शिखा तर सर्वात उच्च आहे. देवतांपेक्षा सुद्धा उच्च. तुम्ही यावेळी देवतांपेक्षाही उच्च आहात कारण बाबांसोबत आहात. बाबा यावेळी तुम्हाला शिकवत आहेत. बाबा ओबीडीयंट सर्व्हेंट (आज्ञाधारक सेवक) बनले आहेत ना. पिता, मुलांचा ओबिडीयंट सर्व्हेंट असतो ना. मुलांना जन्म देऊन, त्यांचे पालनपोषण करून, शिकवून मोठे करून, जेव्हा आपण वृद्ध होतात तेव्हा सारी संपत्ती मुलांना देऊन स्वतः गुरु करून दूर निघून जातात. वानप्रस्थ घेतात. मुक्तिधामला जाण्यासाठी गुरु करतात. परंतु ते मुक्तीधाममध्ये तर जाऊ शकत नाहीत. तर आई-वडील मुलांचे पालन-पोषण करतात. समजा आई आजारी पडली आणि मुलाने शी केली तर वडिलांना उचलावी लागेल ना. तर आई-वडील मुलांचे सर्व्हेंट झाले ना. सारी संपत्ती मुलांना देतात. बेहदचे बाबा देखील म्हणतात - ‘मी जेव्हा येतो तर मी काही छोट्या मुलांकडे येत नाही. तुम्ही तर मोठे आहात ना.’ तुम्हाला बसून शिकवतात. तुम्ही शिवबाबांची मुले बनता तर ‘बी. के.’ म्हणून संबोधले जाता. त्याच्या पूर्वी शूद्रकुमार-कुमारी होता, वेश्यालयामध्ये होता. आता तुम्ही वेश्यालयामध्ये राहणारे नाही आहात. इथे (यज्ञामध्ये) कोणीही विकारी राहू शकत नाही. आदेश नाही. तुम्ही आहात बी.के. हे स्थान आहेच ब्रह्माकुमार-कुमारींना राहण्यासाठी. काहीजण तर अगदीच अडाणी मुले आहेत जे हेच समजत नाहीत की ‘शूद्र’ म्हटले जाते पतित विकारामध्ये जाणाऱ्याला, त्यांना इथे राहण्याचा आदेश नाही, येऊ शकत नाहीत. इंद्र सभेची गोष्ट आहे ना. इंद्रसभा तर ही आहे, जिथे ज्ञानाची वर्षा होते. कोणी बी.के. ने अपवित्र असणाऱ्याला लपवून सभेमध्ये आणून बसवले तर दोघांनाही शाप मिळाला की, ‘पाषाण बना’. खरे-खरे इंद्रप्रस्थ हे आहे ना. हा काही शूद्र कुमार-कुमारींचा सत्संग नाहीये. पवित्र असतात - देवता आणि पतित असतात - शूद्र. पतितांना बाबा येऊन पावन देवता बनवितात. आता तुम्ही पतिता पासून पावन बनत आहात. तर ही झाली इंद्रसभा. जर कोणी न विचारता एखाद्या विकारीला घेऊन आले तर खूप सजा मिळते. पत्थर-बुद्धि बनतात. इथे पारस-बुद्धि बनत आहात ना. तर त्यांना जे घेऊन येतात, त्यांना देखील शाप मिळतो. ‘तू, विकारी असणाऱ्यांना लपवून का घेऊन आलीस? इंद्र (बाबांना) विचारले देखील नाहीस’. तर किती सजा मिळते. या आहेत गुप्त गोष्टी. आता तुम्ही देवता बनत आहात. खूप कडक नियम आहेत. अवस्थाच बिघडते. एकदम पत्थर-बुद्धि बनतात. आहेत देखील पत्थर-बुद्धि. पारस-बुद्धि बनण्याचा पुरुषार्थच करत नाहीत. या गुप्त गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलेच समजू शकता. इथे बी. के. राहतात, त्यांना बाबा, देवता अर्थात पत्थर-बुद्धि पासून पारस-बुद्धि बनवत आहेत.

बाबा गोड-गोड मुलांना समजावून सांगत आहेत - ‘कोणीही कायदे भंग करू नका. नाही तर त्यांना ५ भूते पकडतील’. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार - हि अर्धाकल्पापासूनची ५ मोठी-मोठी भूते आहेत. तुम्ही इथे भुतांना पळवून लावण्यासाठी येता. आत्मा जी शुद्ध, पवित्र होती ती अपवित्र, अशुद्ध, दु:खी, रोगी बनली आहे. या दुनियेमध्ये अथाह दुःख आहे. बाबा येऊन ज्ञानाची वर्षा करतात. तुम्हा मुलांद्वारेच करतात. तुमच्यासाठी स्वर्ग रचतात. तुम्हीच योगबलाद्वारे देवता बनता. बाबा स्वतः बनत नाहीत. बाबा तर आहेत सेवक. टीचर देखील स्टुडंटचे सेवक असतात. सेवा करुन शिकवतात. टिचर म्हणतात - ‘मी तुमचा मोस्ट ओबिडीयंट सर्व्हंट आहे. कोणाला बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी बनवतात तर सर्व्हंट झाला ना. तसेच गुरु लोक देखील रस्ता सांगतात. सर्व्हंट बनून मुक्तिधाममध्ये घेऊन जाण्याची सेवा करतात. परंतु आजकालचे कोणी गुरु तर घेऊन जाऊ शकत नाहीत कारण ते देखील पतित आहेत. एकच सद्गुरु ‘सदा पवित्र’ आहेत बाकीचे सारे गुरुलोक सुद्धा पतित आहेत. ही सारी दुनियाच पतित आहे. पावन दुनिया म्हटले जाते - सतयुगाला, पतित दुनिया म्हटले जाते - कलियुगाला. सतयुगालाच पूर्ण स्वर्ग म्हणता येईल. त्रेतामध्ये दोन कला कमी होतात. या गोष्टी तुम्ही मुलेच समजून घेता आणि धारण करता. दुनियेतील मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. असेही नाही की, संपूर्ण दुनिया स्वर्गामध्ये जाईल. जे कल्पापूर्वी होते, तेच भारतवासी पुन्हा येतील आणि सतयुग-त्रेतामध्ये देवता बनतील. तेच मग द्वापरपासून स्वतःला हिंदू म्हणू लागतील. असे तर हिंदू धर्मामध्ये आतापर्यंत जे काही आत्मे वरून उतरतात, ते देखील स्वतःला हिंदू म्हणतात परंतु ते काही देवता बनणार नाहीत आणि स्वर्गामध्ये सुद्धा येणार नाहीत. ते तरीही पुन्हा द्वापर नंतर आपल्या वेळेवर उतरतील आणि स्वतःला हिंदू म्हणू लागतील. देवता तर तुम्हीच बनता, ज्यांचा आदि पासून अंतापर्यंत पार्ट आहे. या ड्रामामध्ये मोठी युक्ती आहे. बऱ्याचजणांच्या डोक्यातच शिरत नाही त्यामुळे मग उच्च पद सुद्धा प्राप्त करू शकत नाहीत.

ही आहे सत्य नारायणाची कथा. ते तर खोटी कथा ऐकवतात, त्याने कोणी लक्ष्मी-नारायण थोडेच बनतात. इथे तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये बनता, कलियुगामध्ये आहेच सर्व खोटे. ‘झूठी माया…’ रावणाचे राज्य आहेच खोटे. सत्य-खंड बाबाच बनवतात. हे देखील तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता, ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार कारण शिक्षण आहे, कोणी खूप कमी अभ्यास करतात तर ते फेल होतात. हे शिक्षण तर एकदाच घेऊ शकता. नंतर मग तर शिकणे मुश्किल होईल. सुरुवातीमध्ये जे शिकून शरीर सोडून गेले आहेत तर ते संस्कार घेऊन गेले आहेत. पुन्हा येऊन शिकत असतील. नाव, रूप तर बदलून जाते. आत्म्यालाच संपूर्ण ८४ चा पार्ट मिळालेला आहे, जी विविध नाव, रूप, देश, काळामध्ये पार्ट बजावते. इतकी छोटीशी आत्मा आहे तिला किती मोठे शरीर मिळते. आत्मा तर सर्वांमध्ये असते ना. इतकी छोटी आत्मा इतक्या छोट्या मच्छरामध्ये देखील आहे. या सर्व अतिसूक्ष्म समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जी मुले हे चांगल्या प्रकारे समजतात तेच माळेचे मणी बनतात. बाकीचे तर जाऊन पै-पैशाचे पद प्राप्त करतात. आता तुमचा हा फुलांचा बगीचा बनत आहे. अगोदर तुम्ही काटे होता. बाबा म्हणतात - ‘काम विकाराचा काटा अतिशय वाईट आहे. हा आदि-मध्य-अंत दुःख देतो. दुःखाचे मूळ कारणच आहे - कामविकार. कामविकाराला जिंकल्यानेच जगतजीत बनाल, हेच बऱ्याचजणांना अडचणीचे वाटते. खूप मुश्किलीने पवित्र बनतात. जे कल्पापूर्वी बनले होते तेच बनतील. समजून येते की, कोण पुरुषार्थ करून उच्च ते उच्च देवता बनणार. नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनतात ना. नवीन दुनियेमध्ये पती-पत्नी दोघेही पावन होते. आता पतित आहेत. पावन होते तर सतोप्रधान होते. आता तमोप्रधान बनले आहेत. इथे दोघांनाही पुरुषार्थ करायचा आहे. हे ज्ञान संन्यासी देऊ शकणार नाहीत. तो धर्मच वेगळा आहे, निवृत्ती मार्गाचा. इथे भगवान तर स्त्री-पुरुष दोघांनाही शिकवतात. दोघांनाही सांगतात - आता शुद्रा पासून ब्राह्मण बनून मग लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. सर्व तर बनणार नाहीत. लक्ष्मी-नारायणाची सुद्धा डिनायस्टी असते (घराणे असते). त्यांनी राज्य कसे घेतले - हे कोणीही जाणत नाहीत. सतयुगामध्ये यांचे राज्य होते हे देखील समजतात परंतु सतयुगाला मग लाखों वर्षे दिली आहेत तर हा अज्ञानीपणा झाला ना. बाबा म्हणतात - ‘हे आहेच काट्यांचे जंगल. तो आहे फुलांचा बगीचा. इथे येण्या अगोदर तुम्ही असुर होता. आता तुम्ही असुरा पासून देवता बनत आहात’. कोण बनवतात? बेहदचे बाबा. देवतांचे राज्य होते तेव्हा इतर कोणीही नव्हते. हे देखील तुम्हीच समजता. जे समजत नाहीत, त्यांनाच पतित म्हटले जाते. ही आहे ब्रह्माकुमार-कुमारींची सभा. जर कोणी सैतानाचे काम करतात तर स्वतःला श्रापित करतात. पत्थर-बुद्धि बनतात. ते काही सोन्याची-बुद्धि नरा पासून नारायण बनणारे तर नाही आहेत हा पुरावा मिळतो. जाऊन थर्ड ग्रेड दास-दासी बनतील. आता देखील राजांकडे दास-दासी आहेत. असे गायन देखील आहे - ‘किनकी दबी रहेगी धूल में…’. आगीचे गोळे देखील येतील तर विषारी वायूचे गोळे देखील येतील. मृत्यू तर येणार आहे जरूर. अशी काही साधने तयार करत आहेत जेणेकरून कोणत्याही मनुष्याची किंवा शस्त्रास्त्रे इत्यादीची गरजच भासणार नाही. तिथे बसल्या-बसल्या असे बॉम्ब सोडतील, त्यांची हवा अशी पसरेल जी ताबडतोब खलास करून टाकेल. इतक्या करोडो मनुष्यांचा विनाश होणार आहे, काही साधी गोष्ट आहे का! सतयुगामध्ये किती थोडे असतात. बाकीचे सारे निघून जातील शांतीधामला, जिथे आपण आत्मे राहतो. सुखधाम मध्ये आहे - स्वर्ग, दुःखधाम मध्ये आहे - नरक. हे चक्र फिरतच राहते. पतित बनल्याने दुःखधाम बनते मग बाबा सुखधाम मध्ये घेऊन जातात. परमपिता परमात्मा आता सर्वांची सद्गती करत आहेत तर आनंद झाला पाहिजे ना. मनुष्य घाबरतात, हे समजत नाहीत की, मृत्यूनेच गती-सद्गती होणार आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) फुलांच्या बगीच्यामध्ये येण्यासाठी आतमध्ये जे काम-क्रोधाचे काटे आहेत, त्यांना काढायचे आहे. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे शाप मिळेल.

२) सत्य-खंडाचे मालक बनण्यासाठी सत्य-नारायणाची सत्य कथा ऐकायची आहे आणि ऐकवायची आहे. या खोट्या खंडापासून दूर रहायचे आहे.

वरदान:-
लाईटच्या आधारावर ज्ञान-योगाच्या शक्तींचा प्रयोग करणारे प्रयोगशाली आत्मा भव

ज्याप्रमाणे प्रकृतीची लाईट विज्ञानाचे अनेक प्रकारचे प्रयोग प्रॅक्टिकलमध्ये करून दाखवते, तसे तुम्ही ‘अविनाशी परमात्मा लाईट’, ‘आत्मिक लाईट’ आणि त्याच सोबत प्रॅक्टिकल स्थितीच्या लाईट द्वारे ज्ञान-योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. जर स्थिती आणि स्वरूप ‘डबल लाईट’ असेल तर प्रयोगामध्ये यशस्वी होणे खूप सोपे होते. जेव्हा प्रत्येकजण स्वयंप्रति प्रयोग करू लागेल तेव्हा प्रयोगशाली आत्म्यांचे पावरफुल संघटन बनेल.

बोधवाक्य:-
विघ्नांच्या अंश आणि वंशाला नाहीसे करणारेच विघ्न-विनाशक आहेत.