12-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमच्या शिक्षणाचा सर्व आधार योगावर अवलंबून आहे, योगाद्वारेच आत्मा
पवित्र बनते, विकर्म विनाश होतात”
प्रश्न:-
बरीच मुले
बाबांचे बनून नंतर हात सोडून देतात, याचे कारण काय?
उत्तर:-
१ - बाबांना पूर्णपणे न ओळखल्यामुळे, पूर्ण निश्चय-बुद्धी नसल्या कारणाने ८-१०
वर्षांनंतर बाबांना सोडचिठ्ठी देतात, हात सोडून देतात. पद भ्रष्ट होते. २ -
क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) झाल्यामुळे मायेची गृहचारी बसते, अवस्था वर-खाली होत
राहते त्याने देखील शिक्षण सुटते.
ओम शांती।
रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत. आता आता तुम्ही समजता की, आपण
सर्वजण रुहानी बेहदच्या बाबांची मुले आहोत, यांना बापदादा म्हटले जाते. जसे तुम्ही
रुहानी मुले आहात तसा हा (ब्रह्मा) देखील रुहानी मुलगा आहे शिवबाबांचा. शिवबाबांना
रथ तर जरूर पाहिजे ना त्यामुळे जसे तुम्हा मुलांना ऑर्गन्स मिळाले आहेत कर्म
करण्यासाठी, तसे शिवबाबांचा देखील हा रथ आहे कारण हे कर्मक्षेत्र आहे जिथे कर्म
करायचे असते. ते आहे घर जिथे आत्मे राहतात. आत्म्याने जाणले आहे आपले घर शांतीधाम
आहे, तिथे हा खेळ असत नाही. दिवे इत्यादी काहीच असत नाहीत, फक्त आत्मे राहतात. इथे
येतात पार्ट बजावण्यासाठी. तुमच्या बुद्धीमध्ये आहे - हा बेहदचा ड्रामा आहे. जे ॲक्टर्स
आहेत, त्यांची ॲक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्थानुसार
जाणता. इथे कोणी साधू-संत इत्यादी समजावून सांगत नाहीत. इथे आपण मुले बेहदच्या
बाबांजवळ बसलो आहोत, आता आपल्याला परत जायचे आहे, जरूर पवित्र तर बनायचे आहे -
आत्म्याला. असे नाही की शरीर देखील इथे पवित्र बनणार आहे, नाही. आत्मा पवित्र बनते.
शरीर तर पवित्र तेव्हा बनेल जेव्हा ५ तत्व देखील सतोप्रधान असतील. आता तुमची आत्मा
पुरुषार्थ करून पावन बनत आहे. तिथे आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. इथे असू
शकत नाहीत. आत्मा पवित्र बनते तेव्हा मग जुने शरीर सोडते, मग नवीन तत्वांनी नवीन
शरीर बनते. तुम्ही जाणता - आपली आत्मा बेहदच्या बाबांची आठवण करते का नाही करत? हे
तर प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहे. शिक्षणाचे सर्व काही अवलंबून आहे योगावर.
शिक्षण तर सोपे आहे, समजले आहे की चक्र कसे फिरते, मुख्य आहेच आठवणीची यात्रा. ती
आतमध्ये गुप्त आहे. दिसण्यात थोडीच येते. बाबा सांगू शकत नाहीत की हे खूप आठवण
करतात का कमी करतात. हां, ज्ञानासाठी सांगू शकतात की हे ज्ञानामध्ये खूप हुशार आहेत.
आठवण तर काही दिसून येत नाही. ज्ञान मुखाद्वारे बोलले जाते. आठवण आहे अजपाजप. ‘जप’
शब्द भक्ती मार्गातील आहे, जप अर्थात कोणाचेतरी नाम जपणे. इथे तर आत्म्याला आपल्या
बाबांची आठवण करायची आहे.
तुम्ही जाणता आपण
बाबांची आठवण करता-करता पवित्र बनता-बनता मुक्तिधाम-शांतीधाममध्ये जाऊन पोहोचणार.
असे नाही की ड्रामामधून मुक्त होणार. मुक्तीचा अर्थ आहे - दुःखातून मुक्त होऊन,
शांतीधाममध्ये जाऊन मग सुखधाममध्ये येणार. पवित्र जे बनतात ते सुख भोगतात. अपवित्र
मनुष्य त्यांची सेवा करतात. पवित्र असणाऱ्यांची महिमा आहे, यातच मेहनत आहे. डोळे
खूप धोका देतात, खाली कोसळतात (विकारी बनतात). वर-खाली तर सर्वांनाच व्हावे लागते.
गृहचारी सर्वांवर बसते. भले बाबा म्हणतात, मुले देखील समजावून सांगू शकतात. आणि मग
म्हणतात माता गुरु पाहिजे, कारण आता माता गुरुची सिस्टीम चालते. आधी पित्यांची होती.
आता सर्वप्रथम कलश मातांना मिळतो. माता मेजॉरिटीमध्ये आहेत, कुमारी राखी बांधतात,
पवित्रतेसाठी. भगवान म्हणतात - काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त करा. रक्षाबंधन
पवित्रतेची निशाणी आहे, ते लोक (दुनियावाले) राखी बांधतात. पवित्र काही बनत नाहीत.
ती सर्व आहे आर्टीफिशियल राखी, कोणीही पावन बनविणारे नाहीत, यासाठी तर ज्ञान पाहिजे.
आता तुम्ही राखी बांधता. अर्थ देखील समजावून सांगता. ही प्रतिज्ञा करवून घेतात. जसे
शीख लोकांची निशाणी कडे असते परंतु पवित्र काही बनत नाहीत. पतिताला पावन बनविणारे,
सर्वांचे सद्गती दाता एक आहेत, ते देखील देहधारी नाहीत. पाण्याची गंगा तर या
डोळ्यांनी दिसते. बाबा जे सद्गती दाता आहेत, त्यांना या डोळ्यांनी बघू शकत नाही.
आत्म्याला कोणीही बघू शकत नाही की ती काय चीज आहे. म्हणतात देखील - आमच्या
शरीरामध्ये आत्मा आहे, तिला बघितले आहे का? म्हणतील - नाही. बाकी सर्व गोष्टी
ज्यांना नावे आहेत त्या जरूर दिसून येतात. आत्म्याचे देखील नाव तर आहे. म्हणतात
देखील - ‘भ्रकुटी के बीच चमकता है अजब सितारा’. परंतु दिसून येत नाही. परमात्म्याची
देखील आठवण करतात, दिसणार तर काहीच नाही. लक्ष्मी-नारायणाला या डोळ्यांनी पाहू शकतो.
लिंगाची भले पूजा करतात परंतु ते काही यथार्थ रीतीने तर नाही आहे ना. बघत असताना
देखील जाणत नाहीत की, परमात्मा काय आहेत? हे कोणीही जाणू शकत नाहीत. आत्मा तर खूप
छोटा बिंदू आहे. दिसून येत नाही. ना आत्म्याला, ना परमात्म्याला बघू शकतो, जाणले
जाऊ शकते.
आता तुम्ही जाणता आपले
बाबा आलेले आहेत यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये). या शरीराची स्वतःची आत्मा
देखील आहे, मग परमपिता परमात्मा म्हणतात - मी यांच्या रथावर विराजमान आहे म्हणून
तुम्ही ‘बाप-दादा’ म्हणता. आता दादांना (ब्रह्मा बाबांना) तर या डोळ्यांनी बघता (दिसतात),
बाबा दिसत नाहीत. जाणता बाबा ज्ञानाचा सागर आहेत, ते या शरीराद्वारे आपल्याला ज्ञान
ऐकवत आहेत. ते ज्ञानाचे सागर पतित-पावन आहेत. निराकार रस्ता कसा सांगतील? प्रेरणेने
तर कोणतेही काम होत नाही. भगवान येतात हे कोणालाही ठाऊक नाही आहे. शिव जयंती देखील
साजरी करतात तर जरूर इथे येत असतील ना. तुम्ही जाणता आता ते आपल्याला शिकवत आहेत.
बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन शिकवतात. बाबांना पूर्ण रीतीने ओळखत
नसल्याकारणाने, निश्चय-बुद्धी न झाल्याकारणाने ८-१० वर्षा नंतर सुद्धा सोडचिठ्ठी
देतात. माया एकदम आंधळे बनवते. बाबांचे बनून मग त्यांना सोडून देतात तर मग पद
भ्रष्ट होते. आता तुम्हा मुलांना बाबांचा परिचय मिळाला आहे तर इतरांना देखील द्यायचा
आहे. ऋषी-मुनी इत्यादी सर्वजण नेती-नेती (माहित नाही) करत गेले. आधी तुम्ही देखील
जाणत नव्हता. आता तुम्ही म्हणाल - ‘होय, आम्ही जाणतो’; तर आस्तिक झालात. सृष्टीचे
चक्र कसे फिरते, हे देखील तुम्हीच जाणता. सर्व दुनिया आणि तुम्ही स्वतः या
शिक्षणाअगोदर नास्तिक होता. आता बाबांनी समजावून सांगितले आहे तर तुम्ही म्हणता - ‘
आम्हाला परमपिता परमात्मा बाबांनी समजावून सांगितले आहे, आस्तिक बनवले आहे’. आपण
रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नव्हतो. बाबा आहेत रचता, बाबाच संगमावर
येऊन नवीन दुनियेची स्थापना देखील करतात आणि जुन्या दुनियेचा विनाश देखील करतात.
जुन्या दुनियेच्या विनाशासाठी ही महाभारत लढाई आहे, ज्याच्यासाठी असे समजतात की,
त्यावेळेस श्रीकृष्ण होता. आता तुम्ही समजता - निराकार बाबा होते, त्यांना बघितले
जाऊ शकत नाही. श्रीकृष्णाचे तर चित्र आहे, बघितले जाऊ शकते. शिवाला बघू शकत नाही.
श्रीकृष्ण तर आहे सतयुगाचा प्रिन्स. तिच फिचर्स पुन्हा असू शकत नाहीत. श्रीकृष्ण
देखील केव्हा, कसा आला, हे देखील कोणीही जाणत नाहीत. श्रीकृष्णाला कंसाच्या जेलमध्ये
दाखवतात. कंस सतयुगामध्ये होता काय? हे कसे होऊ शकते. कंस असुराला म्हटले जाते.
यावेळी सर्व आसुरी संप्रदाय आहे ना. एकमेकांना मारत-कत्तल करत राहतात. दैवी दुनिया
होती, हेच विसरले आहेत. ईश्वरीय दैवी दुनिया ईश्वराने स्थापन केली आहे. हे देखील
तुमच्या बुद्धीमध्ये नंबरवार पुरुषार्थानुसार आहे. आता तुमचा आहे ईश्वरीय परिवार,
नंतर तिथे असणार दैवी परिवार. यावेळी ईश्वर तुम्हाला लायक बनवत आहेत स्वर्गातील
देवी-देवता बनण्यासाठी. बाबा शिकवत आहेत. या संगमयुगाला कोणीही जाणत नाहीत.
कोणत्याही शास्त्रामध्ये या पुरुषोत्तम युगा बद्दल काहीच माहिती नाहीये. पुरुषोत्तम
युग अर्थात जिथे पुरुषोत्तम बनायचे असते. सतयुगाला म्हणणार पुरुषोत्तम युग. यावेळी
मनुष्य काही पुरुषोत्तम नाही आहेत. यांना तर कनिष्ठ तमोप्रधान म्हणणार, या सर्व
गोष्टी तुम्हा ब्राह्मणांशिवाय आणखी कोणीही समजू शकत नाहीत. बाबा म्हणतात - ही आहे
आसुरी भ्रष्टाचारी दुनिया. सतयुगामध्ये असे कोणते वातावरण नसते. ती होती
श्रेष्ठाचारी दुनिया. त्यांची चित्रे आहेत. खरोखर हे श्रेष्ठाचारी दुनियेचे मालक
होते. भारतामध्ये असे राजे होऊन गेले आहेत ज्यांची पूजा केली जाते. पूज्य पवित्र
होते, जे नंतर मग पुजारी बनले. ‘पुजारी’ भक्ती मार्गाला, ‘पूज्य’ ज्ञान मार्गाला
म्हटले जाते. पूज्य सो पुजारी, पुजारी परत पूज्य कसे बनतात. हे देखील तुम्ही जाणता
या दुनियेमध्ये एकही पूज्य असू शकत नाही. पूज्य, परमपिता परमात्मा आणि देवतांनाच
म्हटले जाते. परमपिता परमात्मा आहेत सर्वांचे पूज्य. सर्व धर्माचे लोक त्यांची पूजा
करतात. अशा बाबांचा जन्म इथेच गायला जातो. परंतु लोकांना काहीच माहिती नाही की
त्यांचा जन्म भारतामध्ये होतो, आजकाल तर शिवजयंतीची सुट्टी सुद्धा देत नाहीत. जयंती
साजरी करा, अथवा नका करू, तुमची मर्जी. ऑफिशियल हॉली डे नाही आहे. जे शिवजयंतीला
मानत नाहीत, ते तर आपल्या कामावर निघून जातात. अनेक धर्म आहेत ना. सतयुगामध्ये अशा
गोष्टी असत नाहीत. तिथे हे वातावरणच नाहीये. सतयुग आहेच नवीन दुनिया, एक धर्म. तिथे
हे समजतही नाही की आपल्या नंतर चंद्रवंशी राज्य असेल. इथे तुम्ही सर्व जाणता -
हे-हे पास्ट झाले (घडून गेले) आहे. सतयुगामध्ये तुम्ही असणार, तिथे कोणत्या पास्टची
(भूतकाळाची) आठवण करणार? पास्ट तर कलियुग झाले. त्याचा इतिहास-भूगोल ऐकून काय फायदा.
इथे तुम्ही जाणता आपण
बाबांजवळ बसलो आहोत. बाबा टीचर देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत. बाबा आले आहेत
सर्वांची सद्गती करण्यासाठी. सर्व आत्म्यांना जरूर घेऊन जातील. मनुष्य तर
देह-अभिमानामध्ये येऊन म्हणतात - सर्वकाही मातीत मिसळून जाणार आहे. हे समजत नाहीत
की, आत्मे तर निघून जाणार, बाकी हे शरीर मातीचे बनलेले आहे, हे जुने शरीर नष्ट होते.
आपण आत्मा एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेतो. हा या दुनियेमध्ये आपला अंतिम जन्म आहे,
सर्व पतित आहेत, सदैव पावन तर कोणीही राहू शकत नाहीत. सतोप्रधान, सतो, रजो, तमो
असतातच. ते लोक तर म्हणतात - सर्व ईश्वराचीच रूपे आहेत, ईश्वराने आपली अनेक रूपे
बनविली आहेत, खेळ-क्रीडा करण्यासाठी. हिशोब काहीच जाणत नाहीत. जो खेळ-क्रीडा
करणाऱ्याला जाणत नाहीत. बाबाच बसून वर्ल्डचा इतिहास-भूगोल समजावून सांगतात.
खेळामध्ये प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा आहे. सर्वांची पोझिशन वेगळी-वेगळी आहे, जो जसा
पोझिशनवाला असतो, त्याची महिमा होते. या सर्व गोष्टी बाबा संगमावरच समजावून सांगतात.
सतयुगामध्ये मग सतयुगाचा पार्ट चालणार. तिथे या गोष्टी नसतील. इथे तुमच्या
बुद्धीमध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान फिरत राहते. तुमचे नावच आहे स्वदर्शन चक्रधारी.
लक्ष्मी-नारायणाला थोडेच स्वदर्शन चक्र दिले जाते. ते आहेतच इथले. मूलवतनमध्ये फक्त
आत्मे राहतात, सूक्ष्मवतन मध्ये काहीही नाहीये. मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी इत्यादी
सर्व इथे असतात. सतयुगामध्ये मोर इत्यादी दाखवतात. असे नाही की तिथे मोराची पिसे
काढून परिधान करतात, मोराला असे थोडेच दुःख देतील. असे देखील नाही की, मोराचे खाली
पडलेले पिस मुकुटामध्ये लावणार. नाही, मुकुटामध्ये देखील खोटी निशाणी दाखवली आहे.
तिथे सर्व सुंदर गोष्टी असतात. कोणत्याही घाणेरड्या वस्तूचे नामोनिशाण सुद्धा नसते.
अशी कोणतीही वस्तू नसते ज्याला पाहून घृणा येईल. इथे तर घृणा येते ना. तिथे पशूंना
देखील दुःख होत नाही. सतयुग किती फर्स्टक्लास असेल. नावच आहे स्वर्ग, हेवन, नवीन
दुनिया. इथे तर जुन्या दुनियेमध्ये बघा पावसामुळे घरे कोसळत असतात. माणसे मरतात.
भूकंप झाला तर सर्वजण गाडले जाऊन मरतील. सतयुगामध्ये फार थोडे असतील नंतर मग वृद्धी
होत राहील. पहिले सूर्यवंशी असतील. जेव्हा दुनिया २५ टक्के जुनी होईल तेव्हा
मागाहून मग चंद्रवंशी असतील. सतयुग १२५० वर्षांचे आहे, ती आहे १०० प्रतिशत नवीन
दुनिया. जिथे देव-देवता राज्य करतात. तुमच्यामध्ये देखील खूपजण या गोष्टींना विसरून
जातात. राजधानी तर स्थापन होणारच आहे. हार्ट फेल (निराश) व्हायचे नाही. पुरुषार्थाची
गोष्ट आहे. बाबा सर्व मुलांकडून एकसारखा पुरुषार्थ करवून घेतात. तुम्ही स्वतःसाठी
विश्वावर स्वर्गाची बादशाही स्थापन करत आहात. स्वतःला बघायचे आहे आपण काय बनणार?
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
पुरुषोत्तम युगामध्ये स्वर्गातील देवी-देवता बनण्याचे शिक्षण शिकून स्वतःला लायक
बनवायचे आहे. पुरुषार्थामध्ये हार्ट फेल (निराश) व्हायचे नाही.
२) या बेहदच्या
खेळामध्ये प्रत्येक ॲक्टरचा पार्ट आणि पोझिशन वेगवेगळी आहे, जशी ज्याची पोझिशन तसा
त्याला मान मिळतो, हे सर्व रहस्य समजून घेऊन वर्ल्डच्या इतिहास-भूगोलाचे मनन करून
स्वदर्शनचक्रधारी बनायचे आहे.
वरदान:-
बाबांच्या
प्रत्येक श्रीमताचे पालन करणारे सच्चे स्नेही आशिक भव
जी मुले सदैव एका
बाबांच्या स्नेहामध्ये लवलीन राहतात, त्यांना बाबांचा प्रत्येक शब्द आवडतो, प्रश्न
समाप्त होतात. ब्राह्मण जन्माचे फाउंडेशन आहे - प्रेम. जे प्रेमळ आशिक आत्मे आहेत
त्यांना बाबांच्या श्रीमताचे पालन करणे अवघड वाटत नाही. प्रेमामुळे नेहमी हाच
उत्साह असतो की बाबांनी जे सांगितले आहे ते माझ्यासाठी सांगितले आहे - मला करायचे
आहे. प्रेमळ आत्मे मोठ्या मनाचे असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक मोठी गोष्ट
छोटी होते.
बोधवाक्य:-
कोणत्याही
गोष्टीबद्दल फील करणे (वाईट वाटणे) - हे देखील फेल झाल्याचे लक्षण आहे.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
ज्वाला स्वरूपाच्या
स्थितीचा अनुभव करण्यासाठी निरंतर आठवणीची ज्वाळा प्रज्वलित रहावी. याची सहज विधी
आहे - सदैव स्वतःला “सारथी” आणि “साक्षी” समजून चला. आत्मा या रथाचा सारथी आहे - ही
स्मृती स्वतःच या रथापासून (देहापासून) किंवा कोणत्याही प्रकारच्या देहभानापासून
न्यारे बनविते. स्वतःला सारथी समजल्यामुळे सर्व कर्मेंद्रिये आपल्या कंट्रोलमध्ये
राहतात. सूक्ष्म शक्ती “मन-बुद्धी-संस्कार” देखील ऑर्डर प्रमाणे राहतात.