12-10-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा नावाडी बनून आले आहेत तुम्हा सर्वांची नाव विषयसागरातून बाहेर काढून
क्षीरसागरामध्ये घेऊन जाण्यासाठी, आता तुम्हाला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर
जायचे आहे”
प्रश्न:-
१:- तुम्ही
मुले प्रत्येकाचा पार्ट बघत असूनही कोणाचीही निंदा करू शकत नाही - असे का?
उत्तर:-
कारण तुम्ही जाणता हा अनादि पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामध्ये प्रत्येक ॲक्टर आपापला
पार्ट बजावत आहे. कोणाचाही काहीही दोष नाही. हा भक्तीमार्ग देखील पुन्हा पार करावा
लागणार आहे, यामध्ये थोडा देखील बदल होऊ शकत नाही.
प्रश्न:-
२:- कोणत्या
दोन शब्दांमध्ये संपूर्ण चक्राचे ज्ञान सामावलेले आहे?
उत्तर:-
‘आज’ आणि ‘उद्या’. काल आपण सतयुगामध्ये होतो, आज ८४ जन्मांचे चक्र पूर्ण करून नरकात
पोहोचलो, उद्या पुन्हा स्वर्गामध्ये जाणार.
ओम शांती।
आता मुले समोर बसली आहेत, जिथून येतात तिथे सेन्टर्सवर जेव्हा असतात तर तिथे असे
समजणार नाहीत की आम्ही उच्च ते उच्च बाबांच्या सन्मुख बसलो आहोत. तेच आमचे टीचर
सुद्धा आहेत, तेच आमची नाव पैलतिरी नेणारे आहेत, ज्यांना गुरू म्हणतात. इथे (मधुबनमध्ये)
तुम्ही समजता आम्ही सन्मुख बसलो आहोत, आम्हाला या विषय सागरातून काढून
क्षीरसागरामध्ये घेऊन जातात. पैलतिरी नेणारे बाबा देखील सन्मुख बसले आहेत. ती एकच
शिवबाबांची आत्मा आहे, जिला सुप्रीम किंवा उच्च ते उच्च भगवान म्हटले जाते. आता
तुम्ही मुले समजता आम्ही उच्च ते उच्च भगवान शिवबाबांच्या सन्मुख बसलो आहोत. ते
यांच्यामध्ये (ब्रह्मातनामध्ये) बसले आहेत, ते तुम्हाला पैलतिरी देखील पोहोचवतात.
त्यांना रथ देखील अवश्य पाहिजे ना. नाही तर श्रीमत कसे देतील. आता तुम्हा मुलांना
निश्चय आहे - बाबा आमचे पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, पैलतिरी नेणारे नावाडी
सुद्धा आहेत. आता आपण आत्मे आपल्या घरी शांतिधामला जाणार आहोत. ते बाबा आम्हाला
रस्ता दाखवत आहेत. तिथे सेंटर्सवर बसण्यामधे आणि इथे सन्मुख बसण्यामधे दिवस-रात्री
एवढा फरक आहे. तिथे (सेंटरवर) असे नाही समजणार की आम्ही सन्मुख बसलो आहोत. इथे ती
अनुभूती येते. आता आम्ही पुरुषार्थ करत आहोत. पुरुषार्थ करून घेणाऱ्याला आनंद होतो.
आता आम्ही पावन बनून घरी जात आहोत. जसे नाटकातले ॲक्टर्स असतात ते समजतात आता नाटक
पूर्ण झाले. आता बाबा आले आहेत आम्हा आत्म्यांना घेऊन जाण्यासाठी. हे देखील समजावून
सांगतात की, तुम्ही घरी कसे जाऊ शकाल, ते पिता देखील आहेत, नाव पैलतिरी नेणारे
नावाडी सुद्धा आहेत. ते लोक भलेही गातात परंतु समजत काहीच नाहीत की ‘नाव’ कशाला
म्हटले जाते, ते शरीराला घेऊन जातील का? आता तुम्ही मुले जाणता आमच्या आत्म्यांना
पैलतिरी घेऊन जातात. आता आत्मा या शरीरासोबत वेश्यालयामध्ये विषय वैतरणी नदीमध्ये
अडकून पडली आहे. आम्ही मूळ शांतीधामचे रहिवासी होतो, आम्हाला पैलतिरी घेऊन जाणारे
अर्थात् घरी घेऊन जाणारे बाबा मिळाले आहेत. तुमचे राज्य होते, जे सर्व माया-रावणाने
हिसकावून घेतले आहे. ते राज्य पुन्हा जरूर मिळवायचे आहे. बेहदचे बाबा म्हणतात -
मुलांनो, आता आपल्या घराची आठवण करा. तिथे जाऊन मग क्षीरसागरामध्ये यायचे आहे. इथे
आहे विषाचा सागर, तिथे आहे क्षीरसागर आणि मूलवतन आहे शांतीचा सागर. तीन धाम आहेत.
हे तर आहे दुःखधाम.
बाबा समजावून सांगत
आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’. सांगणारे कोण
आहेत, कोणाद्वारे सांगतात? पूर्ण दिवस ‘गोड-गोड मुलांनो’ म्हणत राहतात. आता आत्मा
पतित आहे, ज्यामुळे मग शरीर देखील तसेच मिळते. आता तुम्ही समजता आम्ही अस्सल
सोन्याचा दागिना होतो आणि नंतर भेसळ पडता-पडता खोटे बनलो आहोत. आता ती भेसळ निघणार
कशी, यासाठी ही आठवणीच्या यात्रेची भट्टी आहे. अग्नीमध्ये सोने शुद्ध होते ना. बाबा
पुन्हा-पुन्हा समजावून सांगत राहतात, हे स्पष्टीकरण जे तुम्हाला देतो, ते प्रत्येक
कल्पामध्ये देत आलो आहे. माझा पार्ट आहे तर पुन्हा ५ हजार वर्षांनंतर येऊन म्हणतो -
‘मुलांनो, पावन बना’. सतयुगामध्ये देखील तुमची आत्मा पावन होती, शांतीधाममध्ये
देखील आत्मा पावन असते. ते तर आपले घर आहे. किती गोड घर आहे. जिथे जाण्यासाठी
मनुष्य किती डोकेफोड करतात. बाबा समजावून सांगत आहेत की, आता सर्वांना जायचे आहे आणि
पुन्हा पार्ट बजावण्यासाठी यायचे आहे. हे तर मुलांना समजले आहे. मुले जेव्हा दुःखी
होतात तेव्हा म्हणतात - ‘हे भगवान, आम्हाला तुमच्याकडे बोलवा. आम्हाला इथे
दुःखामध्ये का सोडून दिले आहे?’ जाणतात की बाबा परमधाममध्ये राहतात. तर म्हणतात -
हे भगवान, आम्हाला परमधाममध्ये बोलवा. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही. तिथे तर सुखच
सुख आहे. इथे अनेक दुःखे आहेत तेव्हाच तर बोलावतात - हे भगवान! आत्म्याला लक्षात
असते. परंतु भगवंताला अजिबात जाणत नाहीत. आता तुम्हा मुलांना बाबांचा परिचय मिळाला
आहे. बाबा राहतातच परमधाममध्ये. सर्व घराचीच आठवण करतात. असे कधीही म्हणणार नाही की
राजधानीमध्ये बोलवा. राजधानीसाठी कधी असे म्हणणार नाहीत. बाबा तर कधी राजधानीमध्ये
राहत देखील नाहीत. ते राहतातच शांतिधाममध्ये. सर्वजण शांती मागतात. परमधाममध्ये
भगवंताकडे तर जरूर शांतीच असेल, ज्याला मुक्तिधाम म्हटले जाते. ते आहे आत्म्यांचे
राहण्याचे स्थान, जिथून आत्मे येतात. सतयुगाला घर म्हणणार नाही, ती आहे राजधानी. आता
तुम्ही कुठून-कुठून आला आहात. इथे येऊन सन्मुख बसले आहात. बाबा, ‘मुलांनो-मुलांनो’
असे म्हणत बोलतात. पित्याच्या रूपामध्ये ‘मुलांनो-मुलांनो’ म्हणतात आणि मग शिक्षक
बनून सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य किंवा इतिहास-भूगोल समजावून सांगतात. या
गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. तुम्ही मुले जाणता मूलवतन आहे आम्हा
आत्म्यांचे घर. सूक्ष्मवतन तर आहेच दिव्य दृष्टीची गोष्ट. बाकी सतयुग, त्रेता,
द्वापर, कलियुग तर इथेच असते. पार्ट देखील तुम्ही इथे बजावता. सूक्ष्मवतनचा काहीही
पार्ट नसतो. ही साक्षात्काराची गोष्ट आहे. ‘काल’ आणि ‘आज’, हे तर चांगल्या प्रकारे
बुद्धीत ठेवले पाहिजे. काल आम्ही सतयुगामध्ये होतो मग ८४ जन्म घेता-घेता आज
नरकामध्ये आलो आहोत. बाबांना बोलावतात देखील नरकामध्ये. सतयुगामध्ये तर अथाह सुख आहे,
त्यामुळे कोणी बोलावत सुद्धा नाही. इथे तुम्ही शरीरामध्ये आहात तेव्हा बोलता. बाबा
देखील म्हणतात - ‘मी जानी जाननहार आहे अर्थात सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतो.
परंतु ऐकवू कसे!’ विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना म्हणून लिहिलेले आहे - ‘बाबा रथ
घेतात’. म्हणतात - माझा जन्म तुमच्यासारखा नाहीये. मी यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) प्रवेश करतो. रथाचा सुद्धा परिचय देतात. ही आत्मा देखील नाव-रूप धारण
करत-करत तमोप्रधान बनली आहे. या वेळी सगळे अनाथ आहेत, कारण बाबांना जाणत नाहीत. तर
सर्व मुले अनाथ आहेत. आपापसात भांडतात तेव्हा म्हणतात ना - अनाथ मुलांनो भांडता
कशासाठी! तर बाबा म्हणतात मला तर सर्व विसरले आहेत. आत्माच म्हणते अनाथ मुलगे-मुली.
लौकिक पिता देखील असे म्हणतात, बेहदचे बाबा देखील म्हणतात - अनाथ मुलांनो, ही अवस्था
का झाली आहे? कोणी मालक आहे का? तुम्हाला बेहदचे बाबा जे स्वर्गाचा मालक बनवतात,
ज्यांना तुम्ही अर्ध्या कल्पापासून बोलावत आले आहात, त्यांना म्हणता दगड-धोंड्यात
आहेत. बाबा आता सन्मुख बसून समजावून सांगत आहेत. आता तुम्ही मुले समजता आम्ही
बाबांकडे आलो आहोत. हे बाबाच आम्हाला शिकवतात. आमची नाव पैलतिरी नेतात कारण ही नाव
खूप जुनी झाली आहे. तर म्हणतात हिला पैलतिरी न्या आणि आम्हाला नवीन द्या. जुनी नाव
धोकादायक असते. कुठे वाटेत मोडून पडेल, अपघात होईल. तर तुम्ही म्हणता आमची नाव जुनी
झाली आहे, आता आम्हाला नविन द्या. याला वस्त्र देखील म्हणतात, नाव देखील म्हणतात.
मुले म्हणतात - ‘बाबा, आम्हाला तर अशी (लक्ष्मी-नारायणासारखी) वस्त्रे पाहिजेत’.
बाबा म्हणतात -
‘गोड-गोड मुलांनो, स्वर्गवासी बनण्याची इच्छा आहे? दर ५ हजार वर्षांनंतर तुमचे हे
कपडे (शरीरे) जुने होतात मग मी नवीन देतो. हे आहे आसुरी वस्त्र. आत्मा देखील आसुरी
आहे. मनुष्य गरीब असेल तर गरीबा सारखे कपडे वापरेल. श्रीमंत असेल तर कपडे देखील
श्रीमंता सारखे परिधान करेल. या गोष्टी आता तुम्ही जाणता. इथे तुम्हाला नशा चढतो की
आम्ही कोणासमोर बसलो आहोत. सेंटर्सवर बसता तर तिथे तुम्हाला हा अनुभव येणार नाही.
इथे सन्मुख असल्यामुळे आनंद होतो कारण बाबा प्रत्यक्ष बसून समजावून सांगतात. तिथे (सेंटरवर)
कोणी समजावून सांगत असेल तर बुद्धियोग कुठे-कुठे भटकत राहील. म्हणतात ना -
गोरखधंद्यामध्ये (कटकटींमध्ये) अडकून राहतात. वेळ कुठे मिळतो. मी तुम्हाला समजावून
सांगत आहे. तुम्ही देखील समजता - बाबा या (ब्रह्मा) मुखाद्वारे आम्हाला समजावून
सांगत आहेत. या मुखाची देखील किती महिमा आहे. गोमुखातून अमृत पिण्यासाठी त्रास सहन
करून कुठे-कुठे जातात. किती कष्टाने जातात. मनुष्य समजतच नाहीत की हे गोमुख काय आहे?
किती मोठे हुशार मनुष्य तिथे जातात, त्यात फायदा काय? अजूनच वेळ वाया जातो. बाबा
म्हणतात - हा सूर्यास्त (सनसेट) वगैरे काय बघायचा. यामध्ये फायदा तर काहीच नाही.
फायदा होतोच अभ्यासामध्ये. गीतेमध्ये अभ्यास आहे ना. गीतेमध्ये काही हठयोग इत्यादीची
गोष्ट नाहीये. त्यामध्ये तर राजयोग आहे. तुम्ही येता देखील राज्य घेण्यासाठी. तुम्ही
जाणता या आसुरी दुनियेमध्ये तर किती भांडण-तंटे इत्यादी आहेत. बाबा तर आम्हाला
योगबलाने पावन बनवून विश्वाचा मालक बनवतात. देवींच्या हातामध्ये शस्त्रे दाखवली
आहेत परंतु खरे तर यामध्ये शस्त्रे इत्यादीची काही गोष्टच नाही. कालीला बघा किती
भयानक बनवले आहे. हे सर्व प्रकार आपापल्या मनाच्या भ्रमातून बसून बनवले आहेत. देवी
काही अशी ४-८ भुजावाली थोडीच असेल. हा सर्व भक्तीमार्ग आहे. म्हणून बाबा समजावून
सांगत आहेत - ‘हे एक बेहदचे नाटक आहे. यामध्ये कोणाची निंदा इत्यादीची गोष्ट नाही.
अनादि ड्रामा पूर्वनियोजित आहे. यामध्ये काहीही बदल होत नाही’. ज्ञान कशाला म्हटले
जाते, भक्ती कशाला म्हटली जाते, ते बाबा समजावून सांगतात. तरीसुद्धा तुम्हाला
भक्तीमार्गातून जावे लागेल. असेच तुम्ही ८४ चे चक्र फिरत-फिरत खाली येणार. हे अनादि,
पूर्वनियोजित अतिशय सुंदर नाटक आहे जे बाबा समजावून सांगतात. या ड्रामाचे रहस्य
समजून घेतल्याने तुम्ही विश्वाचे मालक बनता. आश्चर्य आहे ना! भक्ती कशी चालते,
ज्ञान कसे चालते, हा अनादि खेळ बनलेला आहे. याच्यात काहीही बदल होऊ शकत नाही. ते (साधू-संन्यासी)
तर म्हणतात ब्रह्ममध्ये लीन झाला, ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली; ही संकल्पाची
दुनिया आहे, ज्याला जे येते ते सांगत राहतात, हा तर पूर्वनियोजित खेळ आहे. मनुष्य
चित्रपट बघून येतात त्याला संकल्पाचा खेळ म्हणणार काय? बाबा बसून समजावून सांगत
आहेत - ‘मुलांनो, हे बेहदचे नाटक आहे ज्याची हुबेहूब पुनरावृत्ती होईल’. बाबाच येऊन
हे ज्ञान देतात कारण ते नॉलेजफुल आहेत, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत, चैतन्य आहेत,
सारे नॉलेज त्यांनाच आहे. मनुष्यांनी तर आयुर्मान (कार्यकाळ) लाखो वर्षे दाखवला आहे.
बाबा म्हणतात, इतके आयुर्मान थोडेच असू शकते. सिनेमा लाखो वर्षांचा असेल तर कोणाच्या
बुद्धीत बसणारच नाही. तुम्ही तर सर्व वर्णन करता. लाखो वर्षांच्या गोष्टींचे वर्णन
कसे कराल. तर तो सर्व आहे भक्तीमार्ग. तुम्हीच भक्तीचा पार्ट बजावला आहे. अशी-अशी
दुःखे भोगत-भोगत आता अंताला आला आहात. संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेमध्ये आहे. आता
तिथे जायचे आहे. स्वतःला हलके बनवा. याने (ब्रह्मा बाबांनी) देखील हलके केले ना. तर
सर्व बंधने तुटतील. नाहीतर मुले, संपत्ती, कारखाने, ग्राहक, श्रीमंत व्यक्ती इत्यादी
आठवत राहतील. धंदाच सोडून दिला तर मग आठवण का येईल. इथे तर सर्वकाही विसरायचे आहे.
या सर्वांना विसरून आपल्या घराची आणि राजधानीची आठवण करायची आहे. शांतीधाम आणि
सुखधामची आठवण करायची आहे. शांतीधामहून मग आपल्याला इथे यावे लागेल. बाबा म्हणतात -
‘माझी आठवण करा, यालाच योग-अग्नी म्हटले जाते. हा राजयोग आहे ना. तुम्ही राजऋषी
आहात. ‘ऋषी’, पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. तुम्ही पवित्र बनता राज्य
मिळविण्यासाठी. बाबाच तुम्हाला सर्व सत्य सांगतात. तुम्ही देखील समजता हे नाटक आहे.
सर्व ॲक्टर्स जरूर इथे असले पाहिजेत. मग बाबा सर्वांना घेऊन जातील. ही ईश्वराची
वरात (शोभा यात्रा) आहे ना. तिथे (परमधाममध्ये) बाबा आणि मुले राहतात मग इथे पार्ट
बजावण्यासाठी येतात. बाबा तर कायमच तिथे राहतात. जेव्हा दुःखी होतात तेव्हाच माझी
आठवण करतात. तिथे मग मी काय करणार? तुम्हाला शांतीधाम, सुखधाममध्ये पाठविल्यानंतर
बाकी काय हवे! तुम्ही सुखधाममध्ये होता बाकी सर्व आत्मे शांतीधाममध्ये होते नंतर मग
नंबरवार येत राहिले. आता नाटक पूर्ण झाले. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता
निष्काळजीपणा करू नका. पावन तर जरूर बनायचे आहे’. बाबा म्हणतात - हा त्याच
ड्रामाअनुसार पार्ट बजावला जात आहे. तुमच्याकरिता ड्रामा अनुसार मी कल्प-कल्प येतो.
आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता हे जुने
झाड जडजडीभूत झाले आहे, आत्म्याला परत घरी जायचे आहे त्यामुळे स्वतःला सर्व
बंधनांपासून मुक्त करून हलके बनवायचे आहे. इथले सर्व काही बुद्धीने विसरायचे आहे.
२) अनादि ड्रामा
बुद्धीमध्ये ठेवून कोणत्याही पार्टधारीची निंदा करायची नाही. ड्रामाच्या रहस्याला
समजून विश्वाचा मालक बनायचे आहे.
वरदान:-
शांतीच्या
शक्तीद्वारे आत्मशक्तीची झेप घेण्याची गती तीव्र करणारे विश्व परिवर्तक भव
विज्ञानाच्या साधनांची
गती विज्ञानाच्या सहाय्याने कमी देखील करू शकतो तसेच वाढवू देखील शकतो परंतु
आजपर्यंत आत्म्याच्या गतीशी कोणीही बरोबरी करू शकलेले नाही, ना करू शकणार; या
बाबतीत सायन्स स्वतःला फेल समजते. जिथे विज्ञान फेल होते तिथे शांतीच्या शक्तीद्वारे
जे पाहिजे ते करू शकता. तर आत्मशक्तीची झेप तीव्र गतीची करा; या शक्तीद्वारे स्व
परिवर्तन, कोणाच्याही वृत्तीचे परिवर्तन, वातावरणाचे परिवर्तन करून विश्व परिवर्तक
बनू शकता. तीव्रगतीची खूण आहे - विचार केला आणि पूर्ण झाले.
बोधवाक्य:-
शिक्षक
दात्यासोबत दयाळू बनून सहयोगी बना.