12-10-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
17.03.2007 ओम शान्ति
मधुबन
“श्रेष्ठ वृत्तीद्वारे
शक्तीशाली व्हायब्रेशन आणि वायुमंडळ बनविण्याचा तीव्र पुरुषार्थ करा, आशीर्वाद द्या
आणि आशीर्वाद घ्या”
आज प्रेम आणि शक्तीचे
सागर बापदादा आपल्या स्नेही, सिकीलध्या (खूप खूप वर्षांनी भेटलेल्या), लाडक्या
मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. सर्व मुले देखील दूरदूरहून प्रेमाच्या ओढीने मिलन
साजरे करण्यासाठी पोहोचली आहेत. भले मग सन्मुख बसले आहेत, किंवा देश-विदेशामध्ये
बसून प्रेमाचे मिलन साजरे करत आहेत. बापदादा चोहो बाजूच्या सर्व स्नेही, सर्व सहयोगी
सोबती मुलांना पाहून हर्षित होत आहेत. बापदादा बघत आहेत मेजॉरिटी मुलांच्या मनामध्ये
एकच संकल्प आहे की आता लवकरात लवकर बाबांना प्रत्यक्ष करू. बाबा म्हणत आहेत सगळ्या
मुलांचा उमंग खूप चांगला आहे, परंतु बाबांना प्रत्यक्ष तेव्हाच करू शकाल जेव्हा
पहिले स्वतःला बाप समान संपन्न संपूर्ण प्रत्यक्ष कराल. तर मुले बाबांना विचारत
आहेत की केव्हा प्रत्यक्ष होणार? आणि बाबा मुलांना विचारत आहेत की तुम्ही सांगा
तुम्ही कधी स्वतःला बाप समान प्रत्यक्ष कराल? आपली संपन्न बनण्याची डेट फिक्स केली
आहे? फॉरेनवाले तर म्हणतात एक वर्ष अगोदर डेट फिक्स केली जाते. तर स्वतःला बाप समान
बनण्याची डेट आपसात मिटिंग करून फिक्स केली आहे का?
बापदादा बघत आहेत
आजकाल तर प्रत्येक वर्गाच्या (विंगच्या) सुद्धा मिटिंग खूप होत आहेत. डबल फॉरेनर्सची
सुद्धा मिटिंग बापदादांनी ऐकली. खूप छान वाटली. सर्व मिटींग बापदादांपर्यंत तर
पोहोचतातच. तर बापदादा विचारत आहेत की याची डेट कधी फिक्स केली आहे? का ही डेट
ड्रामा फिक्स करणार की तुम्ही फिक्स करणार? कोण करणार? लक्ष्य तर तुम्हाला ठेवावेच
लागेल. आणि लक्ष्य खूप चांगल्यात चांगले, खूप-खूप छान ठेवले देखील आहे, आता फक्त जसे
लक्ष्य ठेवले आहे त्यानुसार लक्षण, श्रेष्ठ लक्ष्या समान बनवायचे आहे. आता ‘लक्ष्य’
आणि ‘लक्षण’ यामध्ये अंतर आहे. जेव्हा लक्ष्य आणि लक्षण समान होतील तेव्हा लक्ष्य
प्रॅक्टिकलमध्ये येईल. सर्व मुले जेव्हा अमृतवेलेला मिलन साजरे करतात आणि संकल्प
करतात तर ते खूप चांगले करतात. बापदादा चोहो बाजूच्या प्रत्येक मुलाची रुहरिहान (आत्मिक
बातचीत) ऐकतात. खूप छान गोष्टी करतात. पुरुषार्थ देखील खूप चांगला करतात परंतु
पुरुषार्थामध्ये एका गोष्टीची तीव्रता हवी आहे. पुरुषार्थ आहे परंतु तीव्र
पुरुषार्थ हवा आहे. तीव्रतेची दृढता याची ॲडिशन (जोड) हवी आहे.
बापदादांची प्रत्येक
मुलाप्रती हीच आशा आहे की, समयानुसार प्रत्येकाने तीव्र पुरुषार्थी बनावे. भले
नंबरवार जरी आहेत, बापदादा जाणतात परंतु नंबरवारमध्ये देखील तीव्र पुरुषार्थ सदैव
रहावा, याची गरज आहे. काळ संपन्न होण्यामध्ये तीव्रतेने वाटचाल करत आहे परंतु आता
मुलांना बाप समान बनायचेच आहे, हे देखील सुनिश्चित आहेच फक्त यामध्ये तीव्रता हवी
आहे. प्रत्येकाने स्वतःला चेक करावे की, मी सदैव तीव्र पुरुषार्थी आहे का? कारण
पुरुषार्थामध्ये पेपर तर खूप येतातच आणि येणारच आहेत परंतु तीव्र पुरुषार्थी साठी
पेपर मध्ये पास होणे इतके निश्चित आहे की तीव्र पुरुषार्थी पेपर मध्ये पास झालेलाच
आहे. होणार आहे नाही, झालेलाच आहे, हे निश्चित आहे. सेवा देखील सगळे खूप आवडीने करत
आहेत परंतु बापदादांनी या अगोदर सुद्धा सांगितले आहे की, वर्तमान वेळेनुसार एकाचवेळी
मनसा-वाचा आणि कर्मणा अर्थात चलन आणि चेहेऱ्याद्वारे तिन्ही प्रकारची सेवा हवी. मनसा
द्वारे अनुभव करविणे, वाणी द्वारे ज्ञानाच्या खजिन्याचा परिचय करविणे, आणि चलन व
चेहऱ्याद्वारे संपूर्ण योगी जीवनाच्या प्रॅक्टिकल रूपाचा अनुभव करविणे, तिन्ही सेवा
एकाच वेळी करायच्या आहेत. वेगवेगळ्या नाहीत, वेळ कमी आहे आणि सेवा अजूनही खूप करायची
आहे. बापदादांनी पाहिले आहे की सर्वांत सोपे सेवेचे साधन आहे - वृत्ती द्वारे
व्हायब्रेशन बनविणे आणि व्हायब्रेशन द्वारे वायुमंडळ बनविणे कारण वृत्ती सर्वात
वेगवान साधन आहे. जसे विज्ञानाचे रॉकेट फास्ट जाते तशी तुमची आत्मिक शुभ-भावना,
शुभ-कामनेची वृत्ती, दृष्टीला आणि सृष्टीला बदलून टाकते. एका ठिकाणी बसून देखील
वृत्ती द्वारे सेवा करू शकता. ऐकलेली गोष्ट तरीसुद्धा विसरली जाऊ शकते परंतु जो
वायुमंडळाचा अनुभव असतो, तो विसरला जात नाही. जसे मधुबनमध्ये अनुभव केला आहे की
ब्रह्मा बाबांच्या कर्म-भूमी, योग-भूमी, चरित्र-भूमीचे वायुमंडळ आहे. आज देखील
प्रत्येकजण त्या वायुमंडळाचा जो अनुभव करतात तो विसरत नाहीत. वायुमंडळाचा अनुभव
मनामध्ये छापला जातो. तर वाणी द्वारे मोठे-मोठे प्रोग्राम तर करताच परंतु
प्रत्येकाने आपल्या श्रेष्ठ रुहानी वृत्तीद्वारे, व्हायब्रेशन द्वारे वायुमंडळ
बनवायचे आहे, परंतु वृत्ती रुहानी आणि शक्तीशाली तेव्हा होईल जेव्हा आपल्या
अंतःकरणामध्ये, मनामध्ये कोणाच्याही प्रति उलट्या वृत्तीचे व्हायब्रेशन नसेल. आपल्या
मनाची वृत्ती सदैव स्वच्छ असावी कारण कोणत्याही आत्म्याप्रती जर कोणती व्यर्थ वृत्ती
किंवा ज्ञानाच्या हिशोबाने निगेटिव्ह वृत्ती असेल तर निगेटिव्ह अर्थात कचरा, जर
मनामध्ये कचरा असेल तर शुभ वृत्तीने सेवा करू शकणार नाही. तर पहिले आपण स्वतःला चेक
करा की माझ्या मनाची वृत्ती शुभ रुहानी आहे? निगेटिव्ह वृत्तीला देखील आपल्या शुभ
भावना, शुभ कामनेद्वारे निगेटिव्हला सुद्धा पॉझिटीव्ह मध्ये चेंज करू शकता कारण
निगेटिव्हने आपल्याच मनाला त्रास तर होतो ना! वेस्ट थॉट तर चालतात ना! तर अगोदर
स्वतःला चेक करा की, माझ्या मनामध्ये काही चिडचिड तर नाहीये ना? नंबरवार तर आहेत,
चांगले सुद्धा आहेत तर त्या सोबत चिडचिड करणारे सुद्धा आहेत, परंतु ‘हा असाच आहे’
हे समजणे ठीक आहे. जो रॉंग आहे त्याला रॉंग समजायचे आहे, जो राइट आहे त्याला राइट
समजायचे आहे परंतु मनामध्ये ठेवायचे नाही. समजणे वेगळे आहे, नॉलेजफूल बनणे चांगले
आहे, रॉंगला रॉंग तर म्हणणारच ना! बरीच मुले म्हणतात - ‘बाबा, तुम्हाला माहित नाही
हा कसा आहे! तुम्ही बघाल ना तेव्हा समजेल’. बाबा मानतात तुम्ही सांगण्याच्या अगोदरच
मानतात की असे आहेत, परंतु अशा गोष्टींना आपल्या मनामध्ये वृत्तीमध्ये ठेवल्याने तर
स्वतः देखील हैराण होता. आणि खराब गोष्ट जर मनामध्ये आहे, अंतःकरणात आहे, तर जिथे
खराब गोष्ट आहे, वेस्ट थॉट आहेत, ते विश्व कल्याणकारी कसे बनतील? तुम्हा सर्वांचे
ऑक्युपेशन काय आहे? कोणी म्हणेल आम्ही लंडनचे कल्याणकारी आहोत, दिल्लीचे कल्याणकारी
आहोत, यु.पी. चे कल्याणकारी आहोत? किंवा जिथेपण राहता, चला देश नाही तर सेंटरचे
कल्याणकारी आहोत, ऑक्युपेशन सगळे हेच सांगतात की, विश्व कल्याणकारी आहे. तर तुम्ही
सर्वजण कोण आहात? विश्व कल्याणकारी आहात? असाल तर हात वर करा. (सर्वांनी हात वर केला)
विश्व कल्याणकारी! विश्व कल्याणकारी! अच्छा. तर मनामध्ये कोणतीही खराबी तर नाही आहे?
समजणे वेगळी गोष्ट आहे, भले समजा, हे राईट आहे हे रॉंग आहे, परंतु मनामध्ये ठेवू नका.
मनामध्ये वृत्ती ठेवल्याने दृष्टी आणि सृष्टी सुद्धा बदलते.
बापदादांनी होमवर्क
दिला होता - काय दिला होता? सर्वात सोपा पुरुषार्थ आहे जो सगळे करू शकतात, माता
देखील करू शकतात, वृद्ध देखील करू शकतात, युवा सुद्धा करू शकतात, मुले देखील करू
शकतात, ती हीच विधी आहे फक्त एक काम करा कोणाच्याही संपर्कामध्ये याल - “आशीर्वाद
द्या आणि आशीर्वाद घ्या.” भले तो शाप देत असेल, परंतु तुम्ही कोर्स काय करविता?
निगेटिव्हला पॉझिटीव्हमध्ये बदलण्याचा, तर स्वतःचा सुद्धा त्यावेळी कोर्स करवा.
चॅलेंज काय आहे? चॅलेंज आहे की, प्रकृतीला सुद्धा तमोगुणी पासून सतोगुणी बनवायचेच
आहे. असे चॅलेंज आहे ना! आहे? तुम्ही सर्वांनी हे चॅलेंज केले आहे की प्रकृतीला
सुद्धा सतोप्रधान बनवायचे आहे? बनवायचे आहे ना? मान हलवा, हात हलवा. बघा, दुसऱ्याला
पाहून हात हलवू नका. मनापासून हलवा, कारण आता समयानुसार वृत्ती द्वारे वायुमंडळ
बनविण्यासाठी तीव्र पुरुषार्थाची गरज आहे. तर वृत्तीमध्ये जर थोडा सुद्धा कचरा असेल,
तर वृत्तीद्वारे वायुमंडळ कसे बनवाल? प्रकृती पर्यंत तुमचे व्हायब्रेशन जाईल, वाणी
तर जाणार नाही. व्हायब्रेशन जाईल आणि व्हायब्रेशन बनते वृत्ती द्वारे, आणि
व्हायब्रेशनने वायुमंडळ बनते. मधुबनमध्ये सुद्धा सगळे एकसारखे तर नाही आहेत. परंतु
ब्रह्मा बाबा आणि अनन्य मुलांच्या वृत्तीद्वारे, तीव्र पुरुषार्थाद्वारे वायुमंडळ
बनले आहे.
आज तुमच्या दादीची
आठवण येत आहे, दादीची विशेषता काय बघितली? कसे कंट्रोल केले? कधीही कशीही वृत्ती
असणाऱ्याची कमी दादीने मनामध्ये ठेवली नाही. सर्वांमध्ये उमंग भरला. तुमच्या जगदंबा
माँ ने वायुमंडळ बनवले. जाणत असताना देखील आपली वृत्ती सदैव शुभ ठेवली, ज्याच्या
वायुमंडळाचा अनुभव तुम्ही सर्वजण करत आहात. भले फॉलो फादर आहेत परंतु बापदादा नेहमी
सांगतात की, प्रत्येकाच्या विशेषतेला जाणून त्या विशेषतेला आपले बनवा. आणि प्रत्येक
मुलामध्ये हे नोट करा, बापदादांचा जो-जो मुलगा बनला आहे त्या प्रत्येक मुलामध्ये,
मग तिसऱ्या नंबरवर जरी आहे परंतु ड्रामाची विशेषता आहे, बापदादांचे वरदान आहे, सर्व
मुलांमध्ये भले ९९ चुका सुद्धा असतील परंतु एक विशेषता जरूर आहे. ज्या विशेषतेमुळे
‘माझे बाबा’ म्हणण्याचा अधिकारी आहे. परवश (अधीन) आहे परंतु बाबांवर अतूट प्रेम असते,
म्हणून बापदादा आता काळाच्या समीपतेनुसार बाबांची जी काही ठिकाणे आहेत ते प्रत्येक
स्थान, भले मग गावामध्ये आहे, किंवा मोठ्या झोन मध्ये आहे, सेंटर्सवर आहे परंतु
प्रत्येक स्थान आणि साथीदारांमध्ये श्रेष्ठ वृत्तीचे वायुमंडळ आवश्यक आहे. बस एक
शब्द लक्षात ठेवा जरी कोणी शाप जरी देत असेल, तरी घेणारा कोण आहे? काय देणारा,
घेणारा एक असतो की दोन? जरी कोणी तुम्हाला खराब वस्तू दिली, तुम्ही काय कराल?
स्वतःजवळ ठेवाल? की परत कराल का फेकून द्याल की कपाटात सांभाळून ठेवाल? तर मनामध्ये
सांभाळून ठेवू नका कारण तुमचे हृदय बापदादांचे तख्त आहे, त्यामुळे एक शब्द आता
मनामध्ये पक्का लक्षात ठेवा, फक्त तोंडात नको मनामध्ये लक्षात ठेवा - ‘आशीर्वाद
द्यायचे आहेत, आशीर्वाद घ्यायचे आहेत’. कोणतीही निगेटिव्ह गोष्ट मनामध्ये ठेवू नका.
ठीक आहे, एका कानाने ऐकले, दुसऱ्या कानाने काढून टाकण्याचे काम तर तुमचे आहे की
दुसऱ्याचे काम आहे? तेव्हाच विश्वामध्ये, आत्म्यांमध्ये वृत्तीने वायुमंडळ
बनविण्याची सेवा फास्ट गतीने करू शकाल. विश्व परिवर्तन करायचे आहे ना! तर काय
लक्षात ठेवाल? लक्षात ठेवले मनाने? आशीर्वाद शब्द लक्षात ठेवा, बस्स, कारण तुमची जड
चित्रे (मुर्त्या) काय देतात? आशीर्वाद देतात ना! मंदिरामध्ये जातात तर काय मागतात?
आशीर्वाद मागतात ना! आशीर्वाद मिळतात तेव्हाच तर आशीर्वाद मागतात. तुमच्या जड
मुर्त्या लास्ट जन्मामध्ये सुद्धा आशीर्वाद देत आहेत, वृत्तीने त्यांच्या कामना
पूर्ण करत आहेत. तर तुम्ही असे निरंतर आशीर्वाद देणारे बनला आहात तेव्हाच तर तुमच्या
मुर्त्या देखील आज पर्यंत आशीर्वाद देत आहेत. चला, परवश आत्म्यांना जर थोडीशी
क्षमेच्या सागरच्या मुलांनी क्षमा केली तर चांगलेच आहे ना! तर तुम्ही सर्व क्षमेचे
मास्टर सागर आहात? आहात की नाही आहात? आहात ना! म्हणा - अगोदर मी. यामध्ये हे
अर्जुन बना. असे वायुमंडळ बनवा जो कोणीही समोर येईल तो काही ना काही स्नेह घेईल,
सहयोग घेईल, क्षमेचा अनुभव करेल, हिंमतीचा अनुभव करेल, सहयोगाचा अनुभव करेल,
उमंग-उत्साहाचा अनुभव करेल. असे होऊ शकते का? होऊ शकते? पहिल्या लाईनमध्ये बसलेले
होऊ शकते? हात वर करा. पहिले करावे लागेल. तर तुम्ही सर्व करणार ना? टीचर्स करणार
का? अच्छा.
अनेक ठिकाणावरून
मुलांची ई-मेल आणि पत्रे तर येतातच. तर ज्यांनी पत्र सुद्धा लिहिलेले नाही परंतु
संकल्प केला आहे तर नुसता संकल्प करणाऱ्यांची देखील प्रेमपूर्वक आठवण बापदादांपाशी
पोहोचली आहे. पत्रे खूप गोड-गोड लिहितात. अशी पत्रे लिहितात जणू असे वाटते की हे
उमंग-उत्साहामध्ये उडतच राहणार. तरीही चांगले आहे, पत्र लिहिल्याने स्वतःला
बंधनामध्ये बांधून घेतात, वायदा करतात ना! तर चोहो बाजूचे जे जिथून बघत आहेत किंवा
ऐकत आहेत, त्या सर्वांनाही बापदादा सन्मुख असणाऱ्यांपेक्षाही अगोदर प्रेमपूर्वक
आठवण देत आहेत कारण बापदादा जाणतात की कुठे कोणती वेळ आहे, कुठे कोणती वेळ आहे परंतु
सगळे मोठ्या उत्साहाने बसले आहेत, आठवणीमध्ये ऐकत देखील आहेत. अच्छा.
सर्वांनी संकल्प केला,
तीव्र पुरुषार्थ करून नंबरवन बनायचेच आहे. केला? हात वर करा. अच्छा आता टीचर्स हात
वर करत आहेत. पहिली लाईन तर आहेच ना. चांगले आहे - बापदादांनी हे देखील डायरेक्शन
दिले आहे की पूर्ण दिवसभरामध्ये मधून-मधून ५ मिनिटे जरी मिळाली, त्यामध्ये मनाची
एक्सरसाईज करा कारण आज-कालचा जमाना एक्सरसाईजचा आहे. तर ५ मिनिटामध्ये मनाची
एक्सरसाईज करा, मनाला परमधाममध्ये घेऊन जा, सूक्ष्मवतनमध्ये फरिश्तेपणाची आठवण करा
मग पूज्य रूपाची आठवण करा, नंतर ब्राह्मण रूपाची आठवण करा, मग देवता रूपाची आठवण करा.
किती झाले? पाच. तर ५ मिनिटामध्ये ५ अशी एक्सरसाईज करा आणि पूर्ण दिवसामध्ये
चालता-फिरता असे करू शकता. यासाठी मैदानाची गरज नाही, धावायचे नाहीये, ना खुर्ची
पाहिजे, ना सीट पाहिजे, ना मशीन हवे. जसे इतर एक्सरसाईज करणे शरीराची गरज आहे, त्या
जरूर करा, त्याची मनाई नाही. परंतु ही मनाची ड्रिल, एक्सरसाईज मनाला सदैव आनंदी
ठेवेल. उमंग-उत्साहामध्ये ठेवेल, उडत्या कलेचा अनुभव करवेल. तर आता-लगेच ही ड्रिल
सर्वांनी सुरु करा - परमधामपासून देवता पर्यंत. (बापदादांनी ड्रिल करवून घेतली)
अच्छा!
चोहो बाजूच्या सदैव
आपल्या वृत्तीने रुहानी शक्तीशाली वायुमंडळ बनविणाऱ्या तीव्र पुरुषार्थी मुलांना,
सदैव आपल्या स्थान आणि स्थितीला शक्तीशाली व्हायब्रेशनमध्ये अनुभव करविणाऱ्या दृढ
संकल्पवाल्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव आशीर्वाद देणाऱ्या आणि आशीर्वाद घेणाऱ्या
दयाळू आत्म्यांना, सदैव स्वतःला उडत्या कलेचा अनुभव करणाऱ्या डबल लाईट आत्म्यांना
बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
विशाल बुद्धी
द्वारे संघटनच्या शक्तीला वाढविणारे सफलता स्वरूप भव संघटनच्या शक्तीला वाढविणे -
हे ब्राह्मण जीवनाचे सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. यासाठी जेव्हा कोणतीही गोष्ट
मेजॉरिटी व्हेरिफाय करतात, तर जिथे मेजॉरिटी आहे तिथे मी - हेच आहे संघटनच्या
शक्तीला वाढविणे. यामध्ये अशी बढाई दाखवू नका की माझा विचार तर खूप चांगला आहे. भले
कितीही चांगला असेल परंतु जिथे संघटन तुटते तिथे चांगले देखील साधारण होऊन जाईल.
त्यावेळी आपल्या विचारांचा त्याग जरी करावा लागला तरी त्या त्यागामध्येच भाग्य आहे.
असे केल्यानेच सफलता स्वरूप बनाल. समीप संबंधामध्ये याल.
सुविचार:-
सर्व प्रकारच्या
सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेला वाढवा.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. समयानुसार आता
मनसा आणि वाचा सेवा एकत्र करा. परंतु वाचा सेवा सोपी आहे, मनसा मध्ये अटेंशन
देण्याची गोष्ट आहे त्यामुळे सर्व आत्म्यांप्रति मनसा मध्ये शुभ भावना, शुभ कामनेचे
संकल्प असावेत. तुमच्या शब्दांमध्ये मधुरता, संतुष्टता, सरळपणा यांची नवीनता असावी
तर सेवेमध्ये सहज सफलता मिळत राहील.