12-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हा मुलांचा शृंगार करण्यासाठी, सर्वात चांगला शृंगार आहे पवित्रतेचा”

प्रश्न:-
पूर्ण ८४ जन्म घेणाऱ्यांचे मुख्य लक्षण काय असेल?

उत्तर:-
१) ते बाबांच्या सोबतच शिक्षक व सद्गुरु तिघांचीही आठवण करतील. असे नाही, बाबांची आठवण आली की टीचरचा विसर पडेल. जेव्हा तिघांचीही आठवण करतील तेव्हाच कृष्णपुरीमध्ये जाऊ शकतील अर्थात सुरुवातीपासून पार्ट बजावू शकतील. २) त्यांना कधीही मायेची वादळे हरवू शकणार नाहीत.

ओम शांती।
बाबा पहिले मुलांना विचारतात की, ‘हे विसरून तर जात नाही ना की आपण बाबांच्या समोर, टिचरच्या समोर आणि सद्गुरूच्या समोर बसलो आहोत’. बाबांना वाटत नाही की सर्वजण या आठवणीमध्ये बसलेले आहेत. तरीही बाबांचे कर्तव्य आहे समजावून सांगणे. हे आहे अर्थासहित आठवण करणे - आमचे बाबा बेहदचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि त्याच सोबत आमचे सद्गुरु देखील आहेत जे मुलांना सोबत घेऊन जातील. बाबा आलेच आहेत मुलांचा शृंगार करण्याकरिता. पवित्रतेने शृंगार करत राहतात. धन देखील अमाप देतात. धन देतातच नवीन दुनियेसाठी, जिथे तुम्हाला जायचे आहे. याची मुलांनी आठवण करायची आहे. मुले चूक करतात जे विसरून जातात. तो जो भरपूर आनंद व्हायला हवा तो कमी होतो. असे बाबा तर कधी मिळतही नाहीत. तुम्ही जाणता आपण बाबांची मुले जरूर आहोत. ते आपल्याला शिकवतात त्यामुळे ते जरूर शिक्षक देखील आहेत. आपले शिक्षण आहेच नवी दुनिया अमरपुरीसाठी. आता आपण संगमयुगावर बसलो आहोत. ही आठवण तर नक्कीच मुलांना असायला हवी. पक्की-पक्की आठवण करायची आहे. हे देखील जाणता यावेळी कंसपुरी आसुरी दुनियेमध्ये आहोत. समजा कोणाला साक्षात्कार होतो परंतु साक्षात्काराने कोणी कृष्णपुरी, त्यांच्या डिनायस्टीमध्ये जाऊ शकणार नाही. जाऊ तेव्हाच शकतील जेव्हा पिता, टीचर, गुरु तिघांचीही आठवण करत राहतील. हे आत्म्यांसोबत बोलले जाते. आत्माच म्हणते - ‘हो बाबा. बाबा, तुम्ही तर खरे बोलत आहात. तुम्ही पिता देखील आहात, शिकवणारे शिक्षक देखील आहात’. सुप्रीम आत्मा शिकवते. लौकिक शिक्षण देखील आत्माच शरीरासोबत शिकते. परंतु ती आत्मा देखील पतित तर शरीर देखील पतित आहे. दुनियेतील लोकांना हे माहीतच नाही आहे की आपण नरकवासी आहोत.

आता तुम्ही समजता आम्ही तर आता चाललो आपल्या वतनमध्ये (आपल्या देशामध्ये). हे (साकारी दुनिया) काही तुमचे वतन नाही आहे. हे आहे रावणाचे परके वतन. तुमच्या वतनमध्ये तर अथाह सुख आहे. इथले लोक असे समजत नाहीत की आम्ही परक्या राज्यामध्ये आहोत. आधी मुसलमानांच्या राज्यामध्ये बसलो होतो नंतर मग ख्रिश्चनांच्या राज्यामध्ये बसलो. आता तुम्ही जाणता आपण आपल्या राज्यामध्ये जाणार आहोत. आधी रावण राज्याला आपण आपले राज्य समजून बसलो होतो. हे विसरून गेलो आहोत आपण पहिले राम राज्यामध्ये होतो. आणि मग ८४ जन्मांच्या फेऱ्यामध्ये आल्यामुळे रावण राज्यामध्ये, दुःखामध्ये येऊन पडलो आहोत. परक्या राज्यामध्ये तर दुःखच असते. हे सारे ज्ञान डोक्यात आले पाहिजे. बाबांची तर नक्कीच आठवण येईल. परंतु तिघांचीही आठवण करायची आहे. हे ज्ञान देखील मनुष्यच घेऊ शकतात. पशू तर शिकणार नाहीत. हे देखील तुम्ही मुले समजता तिथे कोणते बॅरिस्टरी इत्यादीचे शिक्षण नसते. बाबा इथेच तुम्हाला मालामाल करत आहेत परंतु सगळेच काही राजा बनत नाहीत. व्यापार देखील चालत असेल परंतु तिथे तुमच्याकडे अथाह धन असते. तोटा इत्यादी होण्याचा नियमच नाही. लूट-मार इत्यादी तिथे होत नाही. नावच आहे स्वर्ग. आता तुम्हा मुलांना स्मृती आली आहे की, आम्ही स्वर्गामध्ये होतो आणि मग पुनर्जन्म घेत-घेत खाली उतरतो. बाबा गोष्ट देखील त्यांनाच सांगतात. जर ८४ जन्म घेतले नसतील तर माया तुम्हाला पराभूत करेल. हे देखील बाबा समजावून सांगत राहतात. मायेचे किती मोठे वादळ आहे. बऱ्याच जणांना माया पराभूत करण्याचा प्रयत्न करते, पुढे गेल्यावर तुम्ही अशा गोष्टी खूप पहाल आणि ऐकालही. बाबांकडे सर्वांची चित्रे असती तर तुम्हाला आश्चर्य दाखवले असते - हा अमका इतके दिवस आला, बाबांचा बनला मग मायेने खाऊन टाकले. मेला, मायेशी हातमिळवणी केली. इथे यावेळी कोणी शरीर सोडतात तर याच दुनियेमध्ये येऊन जन्म घेतात. तुम्ही शरीर सोडाल तर बाबांसोबत बेहद घरामध्ये जाल. तिथे बाबा, मम्मा, मुले सर्व आहेत ना. परिवार असाच असतो. मूल वतनमध्ये बाबा आणि भाऊ-भाऊ आहेत, दुसरे कोणतेही नाते नाही. इथे (साकार वतनमध्ये) तर पिता आणि भाऊ-बहिणी आहेत नंतर वृद्धी होते. काका, मामा इत्यादी अनेक नाती होतात. या संगमावर तुम्ही प्रजापिता ब्रह्माचे बनता तर भाऊ-बहिणी आहात. शिवबाबांची आठवण करता तर भाऊ-भाऊ आहात. या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. बरीच मुले विसरून जातात. बाबा तर समजावून सांगत राहतात. बाबांचे कर्तव्य आहे मुलांना डोक्यावर उचलून घेणे, तेव्हाच तर नमस्ते-नमस्ते करत राहतात. अर्थ देखील समजावून सांगतात. भक्ती करणारे साधु-संत इत्यादी काही तुम्हाला जीवनमुक्तीचा रस्ता सांगत नाहीत, ते मुक्तीसाठीच पुरुषार्थ करत राहतात. ते आहेतच निवृत्ती मार्ग वाले. ते राजयोग कसा शिकवतील. राजयोग आहेच प्रवृत्ती मार्गाकरिता. प्रजापिता ब्रह्माला ४ भुजा दाखवल्या आहेत तर प्रवृत्ती मार्ग झाला ना. इथे बाबांनी यांना ॲडॉप्ट केले आणि नाव दिले आहे ब्रह्मा आणि सरस्वती. ड्रामामध्ये नोंद बघा कशी आहे. वानप्रस्थ अवस्थेमध्येच मनुष्य गुरू करतात, ६० वर्षानंतर. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) देखील ६० वर्षानंतर बाबांनी प्रवेश केला आणि पिता, टीचर, गुरु बनले. आता तर नियम सुद्धा बिघडले आहेत. लहान मुलाला देखील गुरु करून देतात. हे तर आहेतच निराकार. तुमच्या आत्म्याचे हे पिता देखील बनतात, शिक्षक, सद्गुरु सुद्धा बनतात. निराकारी दुनियेला म्हटले जाते आत्म्यांची दुनिया. असे तर म्हणणार नाही की दुनियाच नाही आहे. शांतीधाम म्हटले जाते. तिथे आत्मे निवास करतात. जर म्हटले परमात्म्याचे नाव, रूप, देश, काळ नाही आहे तर मग मुले कुठून येतील.

तुम्ही मुले आता समजता या दुनियेचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो. इतिहास चैतन्यामध्ये असणाऱ्यांचा असतो, भूगोल तर जड वस्तूचा आहे. तुमची आत्मा जाणते आपण कधीपर्यंत राज्य करतो. इतिहास गायला जातो ज्याला कहाणी म्हटले जाते. भूगोल देशाचा असतो. चैतन्याने राज्य केले जड काही राज्य करणार नाहीत. किती काळापासून अमक्याचे राज्य होते, ख्रिश्चनांनी भारतावर कधीपासून कधीपर्यंत राज्य केले. तर या दुनियेच्या इतिहास-भूगोलाला कोणी जाणतच नाहीत. म्हणतात सतयुगाला तर लाखो वर्षे झाली. त्यात कोण राज्य करून गेले, किती काळ राज्य केले - हे कोणीही जाणत नाही. याला म्हटला जातो इतिहास. आत्मा चैतन्य आहे, शरीर जड आहे. सारा खेळच जड आणि चैतन्यचा आहे. मनुष्य जीवनच उत्तम म्हणून गायले जाते. जनगणना देखील मनुष्यांची केली जाते. पशूंची काही कोणी मोजदात करू सुद्धा शकणार नाही. सर्व खेळ तुमच्यावर आहे. इतिहास-भूगोल देखील तुम्ही ऐकता. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगतात, याला म्हटले जाते बेहदचा इतिहास-भूगोल. हे ज्ञान नसल्याकारणाने तुम्ही किती अडाणी बनले आहात. मनुष्य असूनही दुनियेच्या इतिहास-भूगोलाला जाणत नसेल तर तो मनुष्यच काय कामाचा. आता बाबांद्वारे तुम्ही दुनियेचा इतिहास-भूगोल ऐकत आहात. हे शिक्षण किती चांगले आहे, कोण शिकवतात? बाबा. बाबाच उच्च ते उच्च पद प्राप्त करून देणारे आहेत. या लक्ष्मी-नारायणाचे आणि त्यांच्यासोबत स्वर्गामध्ये जे राहतात त्यांचे उच्च ते उच्च पद आहे ना. तिथे वकीली इत्यादी काही करत नाहीत. तिथे तर फक्त शिकायचे आहे. कोणतेही कला-कौशल्य शिकला नाहीत तर घरे इत्यादी कशी बांधणार. एकमेकांना कौशल्य शिकवतात. नाहीतर इतकी घरे इत्यादी कोण बनवणार. आपोआप तर बनणार नाहीत. ही सर्व रहस्ये आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. तुम्ही जाणता हे चक्र फिरत राहते, इतका वेळ आम्ही राज्य करत होतो मग रावणाच्या राज्यामध्ये येतो. दुनियेला या गोष्टींची माहितीसुद्धा नाही आहे की आपण रावण राज्यामध्ये आहोत. म्हणतात - ‘बाबा, आम्हाला रावण राज्यामधून मुक्त करा’. भारतवासीयांनी ख्रिश्चन राज्यातून स्वतःला मुक्त केले. आता पुन्हा म्हणतात - ‘ओ गॉड फादर आम्हाला लिब्रेट करा’. स्मृती जागृत होते ना, कोणीही हे जाणत नाहीत की असे का म्हणतात. आता तुम्हाला समजले आहे साऱ्या सृष्टीवरच रावण राज्य आहे, सर्वजण म्हणतात रामराज्य हवे तर मग लिब्रेट कोण करणार? समजतात की गॉड फादर लिब्रेट करून गाईड बनून घेऊन जातील. भारतवासीयांना इतकी समज नाही आहे. हे तर एकदम तमोप्रधान आहेत. त्यांना ना इतके दुःख भोगावे लागत आणि ना इतके सुख प्राप्त होत. भारतवासी सर्वात जास्त सुखी बनतात तर दुःखी सुद्धा बनले आहेत. हिशोब आहे ना. आता किती दुःख आहे! जे रिलीजस मा&