12-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे शिक्षण जे बाबा शिकवत आहेत, यामध्ये भरपूर कमाई आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करत रहा, कधीही लिंक तुटू नये”

प्रश्न:-
जे विनाशकाले विपरीत बुद्धी आहेत, त्यांना तुमच्या कोणत्या गोष्टीसाठी हसू येते?

उत्तर:-
तुम्ही जेव्हा म्हणता की, ‘आता विनाश काळ जवळ आला आहे’; तेव्हा त्यांना हसू येते. तुम्ही जाणता बाबा इथे काही बसून तर राहणार नाहीत, बाबांची ड्युटी आहे पावन बनविणे. जेव्हा पावन बनाल तेव्हा ही जुनी दुनिया नष्ट होईल, नवीन येईल. ही लढाई आहेच विनाशाकरिता. तुम्ही देवता बनता तर या कलियुगी घाणेरड्या (विकारी) सृष्टीवर येऊ शकत नाही.

ओम शांती।
रुहानी (आत्मिक) बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. मुले समजतात आम्ही खूप बेसमज (अडाणी) बनलो होतो. माया रावणाने अडाणी बनवले होते. मुले हे देखील समजतात की, बाबांना जरूर यायचेच आहे, तर नवीन सृष्टी स्थापन होणार आहे. त्रिमूर्तीचे चित्र देखील आहे - ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णू द्वारे पालना, शंकर द्वारे विनाश कारण करनकरावनहार तर बाबा आहेत ना. एकच आहेत जे करतात आणि करवून घेतात. पहिले कोणाचे नाव येईल? जे करतात आणि नंतर ज्यांच्या द्वारे करवून घेतात. करनकरावनहार म्हटले जाते ना. ब्रह्मा द्वारे नवीन दुनियेची स्थापना करतात. हे देखील मुले जाणतात आमची जी नवीन दुनिया आहे, जी आपण स्थापन करत आहोत, याचे नावच आहे देवी-देवतांची दुनिया. सतयुगामध्येच देवी-देवता असतात. आणखी कोणाला देवी-देवता म्हटले जात नाही. तिथे मनुष्य नसतात. आहेच एक देवी-देवता धर्म, दुसरा कोणता धर्मच नाही. आता तुम्हा मुलांच्या लक्षात आले आहे की खरोखर आपण देवी-देवता होतो, निशाण्या देखील आहेत. इस्लामी, बौद्धी, ख्रिश्चन इत्यादी सर्वांची आपली-आपली निशाणी आहे. आपले जेव्हा राज्य होते तेव्हा इतर कोणीही नव्हते. आता मग बाकीचे सर्व धर्म आहेत, आपला देवता धर्म नाही आहे. गीतेमध्ये खूप छान-छान शब्द आहेत परंतु कोणी समजू शकत नाहीत. बाबा म्हणतात - ‘विनाश काले विपरीत बुद्धी आणि विनाश काले प्रीत बुद्धी’. विनाश तर या वेळीच होणार आहे. बाबा येतात देखील संगमावर, जेव्हा परिवर्तन होते . बाबा तुम्हा मुलांना त्याच्या बदल्यामध्ये सर्व काही नवीन देतात. ते सोनार देखील आहेत, धोबी देखील आहेत, मोठे व्यापारी देखील आहेत. विरळाच कोणी बाबांसोबत व्यापार करेल. या व्यापारामध्ये तर प्रचंड फायदा आहे. शिक्षणामध्ये फायदा खूप असतो. महिमा देखील केली जाते की, शिक्षण कमाई आहे, ती देखील जन्म-जन्मांतरीसाठी कमाई आहे. तर असे शिक्षण चांगल्या रीतीने शिकले पाहिजे ना आणि मी शिकवतो देखील खूप सहज. फक्त एक आठवडा समजून घेऊन नंतर भले कुठेही जा, तुमच्याकडे अभ्यास येत राहील अर्थात मुरली मिळत राहील त्यामुळे मग कधीही लिंक तुटणार नाही. ही आहे आत्म्यांची परमात्म्या सोबत लिंक. गीतेमध्ये देखील हे शब्द आहेत - ‘विनाश काले विप्रीत बुद्धि विनशन्ती, प्रीत बुद्धि विजयन्ती.’ तुम्ही जाणता यावेळी मनुष्य एकमेकांना मारत-ओरबाडत राहतात. यांच्या सारखा क्रोध अथवा विकार इतर कोणामध्ये असत नाही. हे देखील गायन आहे की, द्रौपदीने धावा केला. बाबांनी सांगितले आहे - तुम्ही सर्व द्रौपदी आहात. भगवानुवाच, बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता विकारामध्ये जाऊ नका. मी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो, तुम्ही फक्त मज पित्याची आठवण करा.’ आता विनाशाचा काळ आहे ना, कोणाचेच ऐकत नाहीत, भांडतच राहतात. त्यांना किती सांगतात की, शांत रहा, परंतु शांतच होत नाहीत. आपली मुले इत्यादींना सोडून युद्धाच्या मैदानामध्ये जातात. कितीतरी मनुष्य मरतच राहतात. माणसाची काहीच किंमत राहिलेली नाहीये. जर किंमत असेल, महिमा असेल तर या देवी-देवतांची. आता तुम्ही हे बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुमची महिमा वास्तवामध्ये या देवतांपेक्षा देखील जास्त आहे. आता तुम्हाला बाबा शिकवत आहेत. किती उच्च शिक्षण आहे. शिकणारे अनेक जन्मांच्या अंताला एकदमच तमोप्रधान आहेत. मी तर सदैव सतोप्रधानच आहे.

बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांचा ओबीडीयंट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवक) बनून आलो आहे’. विचार करा आपण किती घाणेरडे (विकारी) बनलो आहोत. बाबाच आम्हाला ‘वाह-वाह’ बनवतात. स्वयं भगवान मनुष्यांना शिकवून किती श्रेष्ठ बनवतात. बाबा स्वतः सांगतात - ‘मी अनेक जन्मांच्या शेवटी तुम्हा सर्वांना तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनविण्यासाठी आलो आहे. आता तुम्हाला शिकवत आहे. बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गवासी बनवले मग तुम्ही नरकवासी कसे बनलात, कोणी बनवले? गायन देखील आहे - ‘विनाश काले विप्रीत बुद्धि विनशन्ती। प्रीत बुद्धि विजयन्ती’. मग जितके म्हणून प्रीत-बुद्धी रहाल अर्थात खूप आठवण कराल, तितका तुमचाच फायदा आहे. युद्धाचे मैदान आहे ना. कोणीही हे जाणत नाहीत की, गीतेमध्ये कोणते युद्ध सांगितले आहे. त्यांनी तर कौरव आणि पांडवांचे युद्ध दाखवले आहे. कौरव संप्रदाय, पांडव संप्रदाय देखील आहे परंतु युद्ध काही कोणते नाही आहे. पांडव त्यांना म्हटले जाते - जे बाबांना जाणतात. बाबांशी प्रीत बुद्धी आहेत. कौरव त्यांना म्हटले जाते - जे बाबांशी विपरीत बुद्धी आहेत. शब्द तर खूप चांगले-चांगले समजण्यालायक आहेत.

आता आहे संगमयुग. तुम्ही मुले जाणता नवीन दुनियेची स्थापना होत आहे. बुद्धीने काम घ्यायचे आहे. आता दुनिया किती मोठी आहे. सतयुगामध्ये किती थोडे मनुष्य असणार. झाड छोटे असणार ना. तेच झाड मग मोठे होते. मनुष्य सृष्टी रुपी हे उलटे झाड कसे आहे, हे देखील कोणी समजत नाहीत. याला कल्पवृक्ष म्हटले जाते. वृक्षाचे ज्ञान देखील असायला हवे ना? इतर (स्थूल) वृक्षांचे नॉलेज तर अतिशय सोपे आहे, लगेच सांगतील. या वृक्षाचे नॉलेज देखील सोपे आहे परंतु हा आहे मानवी वृक्ष. मनुष्यांना तर आपल्या वृक्षा विषयी माहीतसुद्धा नाही आहे. म्हणतात देखील - ‘गॉड इज क्रियेटर’; तर जरूर चैतन्य आहेत ना. बाबा सत् आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. त्यांच्यामध्ये कोणते ज्ञान आहे, हे देखील कोणालाच समजत नाही. बाबाच बीजरूप, चैतन्य आहेत. त्यांच्याद्वारेच संपूर्ण रचना रचली जाते. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत, मनुष्यांना आपल्या झाडा विषयी माहिती नाही, इतर झाडांना तर चांगल्या रीतीने जाणतात. झाडाचे बीज जर चैतन्य असते तर सांगितले असते ना परंतु ते तर आहे जड. तर आता तुम्ही मुलेच रचता आणि रचनेच्या रहस्याला जाणता. हे सत् आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. चैतन्यमध्ये तर बातचीत करू शकतात ना. मनुष्याचे शरीर सर्वात श्रेष्ठ अमूल्य असल्याचे गायले गेले आहे. याचे मूल्य (महत्व) कथन करू शकत नाही. बाबा येऊन आत्म्यांना समजावून सांगतात.

तुम्ही रूप देखील आहात, बसंत देखील आहात. बाबा आहेत ज्ञानाचा सागर. त्यांच्याकडून तुम्हाला रत्ने मिळतात. ही ज्ञान रत्ने आहेत, ज्या रत्नांमुळे ती रत्ने देखील तुम्हाला पुष्कळ मिळतात. लक्ष्मी-नारायणाकडे पहा किती रत्ने आहेत. हिऱ्या-माणकांच्या महालामध्ये राहतात. नावच आहे स्वर्ग, ज्याचे तुम्ही मालक बनणार आहात. एखाद्या गरीबाला अचानक मोठी लॉटरी लागली तर वेडे होतात ना. बाबा देखील म्हणतात तुम्हाला विश्वाची बादशाही मिळते तर माया किती विरोध करते. तुम्हाला पुढे जाऊन माहिती होईल की माया किती चांगल्या-चांगल्या मुलांना देखील गिळून टाकते. एकदम खाऊनच टाकते. तुम्ही सापाला पाहिले आहे - बेडकाला कसे पकडतो, जसे हत्तीला मगर गिळून टाकते. साप बेडकाला एकदम सगळाच्या सगळा गिळून टाकतो. माया देखील अशीच आहे, मुलांना जिवंतपणी पकडून एकदम संपवून टाकते जे पुन्हा कधी बाबांचे नाव सुद्धा घेत नाहीत. तुमच्यामध्ये योगबळाची ताकत खूप कमी आहे. सर्व काही योगबळावर अवलंबून आहे. जसा साप बेडकाला गिळून टाकतो, तुम्ही मुले देखील संपूर्ण बादशाहीला गिळून टाकता. संपूर्ण विश्वाची बादशाही तुम्ही सेकंदामध्ये घेणार. बाबा किती सोपी युक्ती सांगतात. कोणतेही हत्यार इत्यादी नाही. बाबा ज्ञान-योगाची अस्त्र-शस्त्रे देतात. त्यांनी मग स्थूल शस्त्रे इत्यादी दिली आहेत.

तुम्ही मुले यावेळी म्हणता - आम्ही कोणापासून कोण बनलो होतो! जे हवे ते म्हणा, आम्ही असे होतो जरूर. होतो तर मनुष्यच परंतु गुण आणि अवगुण तर असतात ना. देवतांमध्ये दैवीगुण आहेत म्हणून त्यांची महिमा गातात - ‘आप सर्वगुण संपन्न… हम निर्गुण हारे में कोई गुण नाही’. यावेळी संपूर्ण दुनियाच निर्गुण आहे अर्थात एकही देवताई गुण नाही आहे. गुण शिकविणारे जे बाबा आहेत, त्यांनाच जाणत नाहीत म्हणून म्हटले जाते - ‘विनाश काले विपरीत बुद्धी’. आता विनाश तर होणारच आहे संगमयुगावर. जेव्हा की जुनी दुनिया नष्ट होते आणि नवीन दुनिया स्थापन होते. याला म्हटले जाते विनाशाचा काळ. हा आहे अंतिम विनाश नंतर मग अर्धा कल्प कोणतेही युद्ध इत्यादी होतच नाही, मनुष्यांना काहीच माहिती नाही आहे. विनाश काले विपरीत बुद्धी आहेत तर जरूर जुन्या दुनियेचा विनाश होणार ना. या जुन्या दुनियेमध्ये किती आपदा येतात. मरतच राहतात. बाबा यावेळची हालत सांगत आहेत. फरक तर खूप आहे ना. आज भारताची ही हालत आहे, उद्या भारत काय असेल? आज इथे आहात, उद्या तुम्ही कुठे असणार? तुम्ही जाणता नवीन दुनिया सुरुवातीला किती छोटी होती. तिथे तर महालांमध्ये किती हिरे-माणके इत्यादी असतात. भक्ती मार्गामध्ये देखील तुमचे मंदिर काही कमी थोडेच असते... फक्त एकच काही सोमनाथाचे मंदिर थोडेच असणार. एकाने कोणी बनवले तर त्यांना पाहून बाकीचे सुद्धा बनवणार. एका सोमनाथ मंदिरातूनच किती लुटून नेले आहे. आणि मग बसून आपले यादगार (स्मृतिस्थळ) बनवले आहे. तर भिंतीमध्ये जे दगड इत्यादी लावतात, या दगडांची कितीशी किंमत असणार? इतक्या छोट्याशा हिऱ्याची देखील किती किंमत आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) हिऱ्यांचे व्यापारी होते, एक रत्तीचा हिरा असायचा, ९० रुपया रत्ती. आता तर त्याची किंमत हजारो रुपये आहे. मिळत देखील नाहीत. किंमत खूप वाढली आहे. यावेळी परदेशामध्ये खूप धन आहे, परंतु सतयुगासमोर हे काहीच नाही.

आता बाबा म्हणतात - विनाश काले विपरीत बुद्धी आहेत. तुम्ही म्हणता, ‘विनाश जवळ आलेला आहे’, तर लोक हसतात. बाबा म्हणतात - ‘मी किती वेळ बसून राहणार, मला काही इथे मजा वाटते का? मी काही ना सुखी होत, ना दुःखी होत. माझी ड्युटी आहे पावन बनविण्याची. तुम्ही हे होता, आता असे बनले आहात, पुन्हा तुम्हाला असे श्रेष्ठ बनवतो’. तुम्ही जाणता - पुन्हा आपण ते देवी-देवता बनणार आहोत. आता तुम्हाला ही समज आली आहे, आम्ही या दैवी घराण्याचे सदस्य होतो. राजाई होती. मग अशी आपली राजाई गमावली. त्यानंतर अजून बाकीचे येऊ लागले. आता हे चक्र पूर्ण झाले आहे. आता तुम्ही समजता लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. हे युद्ध आहेच विनाशासाठी, त्या बाजूला (विदेशामध्ये) तर अगदी सहज मरणार आहेत, काहीच त्रास होणार नाही. हॉस्पिटल इत्यादी काहीही राहणार नाहीत. कोण बसून सेवा करेल आणि रडेल. तिथे (सतयुगामध्ये) तर ही पद्धतच नाही. त्यांचा मृत्यू सहजच होतो. इथे (भारतात) तर दुःखी होऊन मरतात कारण तुम्हाला सुख खूप मिळाले आहे तर दुःख सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. रक्ताची नदी इथेच वाहणार आहे. ते समजतात हे युद्ध नंतर शांत होईल परंतु असे शांत काही होणारच नाही. ‘मिरुआ मौत मलूका शिकार’ (प्राण्याचा जीव जातो आणि शिकाऱ्याला शिकार मिळते). तुम्ही देवता बनता, मग कलियुगी घाणेरड्या (विकारी) सृष्टीवर तर तुम्ही येऊ शकत नाही. गीतेमध्ये देखील आहे - भगवानुवाच, विनाश देखील बघा, स्थापना बघा. साक्षात्कार झाला ना! असे सर्व साक्षात्कार शेवटी होणार - अमुक-अमुक हे बनले; मग त्यावेळी रडाल, खूप पश्चाताप कराल, सजा खाल, नशिबाला दोष देत रहाल. परंतु करू काय शकणार? ही तर २१ जन्मांची लॉटरी आहे. आठवण तर येते ना. साक्षात्कारा शिवाय कोणालाही सजा मिळू शकत नाही. ट्रिब्युनल बसते ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्यामध्ये ज्ञान धारण करून रूप-बसंत बनायचे आहे. ज्ञान रत्नांनी विश्वाच्या बादशाहीची लॉटरी घ्यायची आहे.

२) या विनाश काळामध्ये बाबांसोबत प्रीत ठेवून एकाच्याच आठवणीमध्ये रहायचे आहे. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे अंत समयी पश्चाताप करावा लागेल किंवा नशीबाला दोष द्यावा लागेल.

वरदान:-
सदैव स्नेही बनून उडत्या कलेचे वरदान प्राप्त करणारे निश्चित विजयी, निश्चिंत भव

स्नेही मुलांना बापदादांद्वारे उडत्या कलेचे वरदान मिळते. उडत्या कलेद्वारे सेकंदामध्ये बापदादांकडे पोहोचा तर कोणत्याही रूपामध्ये आलेली माया तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. परमात्म छत्रछायेच्या आत मायेची सावली देखील येऊ शकत नाही. स्नेह, मेहनतीला मनोरंजनामध्ये परिवर्तन करतो. स्नेह प्रत्येक कर्मामध्ये निश्चित विजयी स्थितीचा अनुभव करवतो, स्नेही मुले प्रत्येक वेळी निश्चिंत राहतात.

बोधवाक्य:-
‘नथिंग न्यू’च्या स्मृतीद्वारे नेहमी अचल रहा तर आनंदाने नाचत रहाल.