13-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - बाबा जे आहेत, जसे आहेत, त्यांना यथार्थ रीतीने जाणून आठवण करणे, हीच मुख्य गोष्ट आहे, लोकांना ही गोष्ट अतिशय युक्तीने समजावून सांगायची आहे”

प्रश्न:-
संपूर्ण विश्वासाठी कोणते शिक्षण आहे जे तुम्ही इथेच शिकता?

उत्तर:-
संपूर्ण विश्वासाठी हेच शिक्षण आहे की तुम्ही सर्व आत्मा आहात. आत्मा समजून बाबांची आठवण करा तर पावन बनाल. संपूर्ण विश्वाचे जे पिता आहेत ते एकदाच येतात सर्वांना पावन बनविण्यासाठी. तेच रचता आणि रचनेचे नॉलेज देतात त्यामुळे खरे तर ही एकच युनिव्हर्सिटी आहे, ही गोष्ट मुलांनी स्पष्ट करून समजावून सांगायची आहे.

ओम शांती।
भगवानुवाच - आता हे तर रुहानी मुले समजतात की भगवान कोण आहेत. भारतामध्ये कोणीही यथार्थ रीतीने जाणत नाहीत. म्हणतात देखील - ‘मी जो आहे, जसा आहे, मला यथार्थ रीतीने कोणीही जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत’. नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात. भले इथे राहतात परंतु यथार्थ रीतीने जाणत नाहीत. यथार्थ रीतीने जाणून मग बाबांची आठवण करणे, हीच मोठी अडचण आहे. भले मुले म्हणतात की खूप सोपे आहे परंतु मी जो आहे, मला निरंतर बाबांची आठवण करायची आहे, ही युक्ती लक्षात राहते. मी आत्मा अतिशय छोटी आहे. आपले बाबा देखील छोटा बिंदू आहेत. अर्धाकल्प तर कोणी भगवंताचे नावसुद्धा घेत नाहीत. दुःखामध्येच आठवण करतात - हे भगवान. आता भगवान कोण आहे, हे तर काही माणसाला समजत नाही. आता लोकांना कसे समजावून सांगावे - यावर विचार सागर मंथन चालले पाहिजे. नाव देखील लिहिलेले आहे - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. यावरून देखील समजत नाहीत की हे रूहानी बेहदच्या पित्याचे ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. आता कोणते नाव ठेवावे जेणेकरून लोक लगेच समजतील? लोकांना कसे समजवावे की ही युनिव्हर्सिटी आहे? युनिव्हर्स वरून युनिव्हर्सिटी नाव निघाले आहे. युनिव्हर्स अर्थात सारे विश्व, त्याचे नाव ठेवले आहे - युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये सर्व मनुष्य शिकू शकतात. युनिव्हर्स विषयी (विश्वा विषयी) शिकण्यासाठी युनिव्हर्सिटी आहे. आता खरे तर युनिव्हर्स करिता तर एक बाबाच येतात, त्यांचीही एकच युनिव्हर्सिटी आहे. एम ऑब्जेक्ट देखील एकच आहे. बाबाच येऊन संपूर्ण युनिव्हर्सला (विश्वाला) पावन बनवतात, योग शिकवतात. हे तर सर्व धर्मवाल्यांकरिता आहे. म्हणतात - स्वतःला आत्मा समजा, साऱ्या युनिव्हर्सचा (विश्वाचा) पिता आहे - इनकारपोरियल गॉड फादर (निराकारी ईश्वरीय पिता) तर का नाही याचे नाव ‘स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी ऑफ स्पिरिच्युअल इनकारपोरियल गॉड फादर’ (अध्यात्मिक निराकार ईश्वर पित्याचे अध्यात्मिक विश्वविद्यालय) ठेवावे. विचार केला जातो ना. मनुष्य असे आहेत जे संपूर्ण विश्वामध्ये बाबांना एकही ओळखत नाहीत. रचयित्याला जाणतील तरच रचनेला देखील जाणतील. रचयित्याद्वारेच रचनेला ओळखले जाऊ शकते. बाबाच मुलांना सर्व काही समजावून सांगतील. इतर कोणीही जाणत नाही. ऋषी-मुनी देखील नेती-नेती करून गेले. तर बाबा म्हणतात - अगोदर तुम्हाला हे रचता आणि रचनेचे नॉलेज नव्हते. आता रचयित्याने समजावून सांगितले आहे. बाबा म्हणतात - मला सर्वजण बोलावतात देखील की, येऊन आम्हाला सुख-शांती द्या कारण आता दुःख अशांती आहे. त्यांचे नावच आहे दुःखहर्ता सुखकर्ता. ते कोण आहेत? भगवान. ते कसे दुःख हरण करून सुख देतात, हे कोणीच जाणत नाहीत. तर असे स्पष्ट करून लिहा जेणेकरून मनुष्य समजतील की, निराकार गॉडफादरच हे नॉलेज देत आहेत. अशा प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे. बाबा समजावून सांगत आहेत - सर्व मनुष्य आहेत पत्थर-बुद्धी. आता तुम्हाला पारस-बुद्धी बनवत आहेत. वास्तविक पारस-बुद्धी त्यांना म्हटले जाईल जे कमीत-कमी ५० पेक्षा अधिक मार्क्स घेतील. नापास होणारे पारस-बुद्धी नाहीत. हे देखील कोणी समजत नाहीत की रामाला धनुष्य बाण का दाखविले आहे? श्रीकृष्णाला स्वदर्शन चक्र दाखविले आहे की त्याने सर्वांना मारले आणि रामाला धनुष्य बाण दाखवले आहे. एक खास मासिक निघते, ज्यामध्ये दाखवले आहे - श्रीकृष्णाने कसे स्वदर्शन चक्राने अकासुर-बकासुर इत्यादींना मारले. दोघांनाही हिंसक बनवले आहे आणि अजूनच डबल हिंसक बनवले आहे. म्हणतात त्यांना देखील मुले झाली ना. अरे, ते आहेतच निर्विकारी देवी-देवता. तिथे रावण राज्यच नाही. यावेळी रावण संप्रदाय म्हटले जाते.

आता तुम्ही समजता आपण योगबलाद्वारे विश्वाची बादशाही घेतो तर काय योगबलाने मुले होऊ शकत नाहीत. ती आहेच निर्विकारी दुनिया. आता तुम्ही शूद्रापासून ब्राह्मण बनले आहात. असे चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे ज्यामुळे मनुष्य समजतील की यांच्याकडे पूर्ण ज्ञान आहे. थोडेसे जरी या गोष्टींना समजला तरी समजले जाईल हा ब्राह्मण कुळाचा आहे. कोणाच्या बाबतीत तर लगेच समजून येईल की हा ब्राह्मण कुळाचाच नाही आहे. येतात तर अनेक प्रकारचे. तर तुम्ही स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी ऑफ स्पिरिच्युअल इनकारपोरिअल गॉड फादर लिहून तर पहा, काय होते ते? विचार सागर मंथन करून शब्द जुळवायचे असतात, यासाठी लिहिण्याची चांगली कला पाहिजे. ज्यामुळे मनुष्य समजतील इथे हे नॉलेज गॉडफादर समजावून सांगतात किंवा राजयोग शिकवतात. हे शब्द देखील कॉमन आहेत. जीवनमुक्ती, डीटी सावरन्टी (दैवी साम्राज्य) एका सेकंदामध्ये. अशा प्रकारचे शब्द असावेत जे मनुष्यांच्या बुद्धीमध्ये घर करतील. ब्रह्मा द्वारे विष्णुपुरीची स्थापना होते. मनमनाभवचा अर्थ आहे - बाबांची आणि वारशाची आठवण करा. तुम्ही आहात ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुल भूषण, स्वदर्शन चक्रधारी. आता ते तर स्वदर्शन चक्र विष्णूला दाखवतात. श्रीकृष्णाला देखील ४ भुजा दाखवतात. आता त्याला ४ भुजा कशा असू शकतील? बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. मुलांना अतिशय विशाल-बुद्धी, पारस-बुद्धी बनायचे आहे. सतयुगामध्ये यथा राजा-राणी तथा प्रजा पारस-बुद्धी म्हटले जाईल ना. ती आहे पारस दुनिया, ही आहे दगडांची दुनिया. तुम्हाला हे मनुष्यापासून देवता बनण्याचे नॉलेज मिळते. तुम्ही श्रीमतावर आपले राज्य पुन्हा स्थापन करत आहात. बाबा आपल्याला युक्ती सांगतात की राजा-महाराजा कसे बनू शकता? तुमच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान भरले जाते इतरांना समजावून सांगण्याकरिता. गोळ्याच्या चित्रावर (सृष्टी चक्राच्या चित्रावर) समजावून सांगणे देखील खूप सोपे आहे. यावेळी लोकसंख्या पहा किती आहे! सतयुगामध्ये किती थोडे असतात. संगम तर आहे ना. ब्राह्मण तर थोडे असतील ना. ब्राह्मणांचे युगच मुळी छोटे आहे. ब्राह्मणांच्या नंतर आहेत देवता, आणि मग वृद्धी होत जाते. बाजोली असते ना. तर शिडीच्या चित्रासोबत विराट रूपाचे चित्र देखील असेल तर जास्त चांगले स्पष्ट करून सांगण्यासाठी सोपे होईल. जे तुमच्या कुळाचे असतील त्यांच्या बुद्धीमध्ये रचता आणि रचनेचे नॉलेज सहजच लक्षात येईल. त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा समजून येते की हे आपल्या कुळाचे आहेत की नाही? जर नसेल तर वेड्यासारखा ऐकेल. जो बुद्धिमान असेल तो लक्ष देऊन ऐकेल. एकदा कोणाला पूर्ण तीर लागला की मग पुन्हा येत राहतील. कोणी प्रश्न विचारेल आणि कोणी चांगले फूल असेल तर रोज आपणहून येऊन पूर्ण नीट समजून घेईल आणि जाईल. चित्रांवरून तर कोणीही समजू शकते. ही तर खरोखरच बाबा देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. कोणीही न सांगता देखील आपणच समजत जातील. कोणी तर खूप शंका विचारत राहतात, समजून तर काहीच घेणार नाहीत. मग आपल्याला समजावून सांगावे लागते, हंगामा तर करायचा नाहीये. नाहीतर मग म्हणतील ईश्वर तुमची रक्षा सुद्धा करत नाहीत! आता ते रक्षा कशी करतात ते तर तुम्हीच जाणता. कर्माचा हिशोब तर प्रत्येकाला आपला चुकता करायचा आहे. असे बरेच आहेत, तब्येत खराब होते तर म्हणतात रक्षा करा. बाबा म्हणतात - ‘मी तर येतो पतितांना पावन बनविण्यासाठी. हा धंदा तुम्ही देखील शिका’. बाबा ५ विकारांवर विजय प्राप्त करून देतात तर ते अजूनच जास्त सामना करतील. विकाराचे वादळ खूप जोराने येते. बाबा तर म्हणतात - बाबांचे बनल्याने हे आजार उफाळून येतील, जोराने वादळे येतील. पूर्ण बॉक्सिंग आहे. चांगल्या-चांगल्या पैलवानांना देखील हरवतात. म्हणतात - इच्छा नसताना देखील कु-दृष्टी होते, तर मग रजिस्टर खराब होईल. कु-दृष्टी वाल्याशी बोलता कामा नये. बाबा सर्व सेंटर्सच्या मुलांना समजावून सांगत आहेत की, कु-दृष्टी वाले तर भरपूर आहेत, नाव घेतल्याने आणखीनच ट्रेटर बनतील. आपला सत्यानाश करणारे उलटी कामे करू लागतात. काम विकार नाकालाच पकडतो. माया सोडत नाही, कु-कर्म, कु-दृष्टी, कु-वचन निघू लागतात, कु-चलन होते त्यामुळे अतिशय सावध रहायचे आहे.

तुम्ही मुले जेव्हा प्रदर्शनी इत्यादी करता तर अशी युक्ती रचा जेणेकरून कोणीही सहजच समजू शकेल. हे गीता ज्ञान स्वतः बाबा शिकवत आहेत, यामध्ये कोणते शास्त्र इत्यादीची गोष्ट नाहीये. हे तर शिक्षण आहे. कोणते पुस्तक, गीता तर इथे नाही आहे. बाबा शिकवतात. पुस्तक थोडेच हातामध्ये घेतात. मग हे ‘गीता’ नाव कुठून आले? ही सर्व धर्मशास्त्रे बनतातच नंतर. कित्येक मठ-पंथ आहेत. सर्वांचे आपापले धर्मशास्त्र आहेत. शाखा-उपशाखा जे पण आहेत, छोटे-छोटे मठ-पंथ, त्यांची देखील धर्मशास्त्रे इत्यादी आपापली आहेत. तर ती सर्व झाली मुले-बाळे. त्याद्वारे तर मुक्ती काही मिळू शकणार नाही. सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता गायली गेली आहे. गीतेचे देखील ज्ञान ऐकविणारे असतील ना. तर हे नॉलेज बाबाच येऊन देतात. कोणतेही शास्त्र इत्यादी हातामध्ये थोडेच आहे. मी देखील धर्मग्रंथ वाचलेले नाहीत, तुम्हाला देखील शिकवत नाही. ते (दुनियावाले) शिकतात आणि मग शिकवतात. इथे तर काही शास्त्रांची गोष्ट नाही. बाबा आहेतच नॉलेजफुल. मी तुम्हाला सर्व वेद-शास्त्रांचे सार ऐकवतो. मुख्य आहेतच ४ धर्मांची ४ धर्मशास्त्रे. ब्राह्मण धर्माचे कोणते पुस्तक आहे का? किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. हे सर्व बाबा बसून डिटेलमध्ये समजावून सांगतात. सर्व मनुष्य पत्थर-बुद्धी आहेत तेव्हाच तर इतके कंगाल बनले आहेत. देवता होते गोल्डन एज मध्ये, तिथे सोन्याचे महाल बनत होते, सोन्याच्या खाणी होत्या. आता तर खरे सोनेच राहिलेले नाहीये. सर्व कहाणी भारतावरच आहे. तुम्ही देवी-देवता पारस-बुद्धी होता, विश्वावर राज्य करत होता. आता स्मृती आली आहे, आपण स्वर्गाचे मालक होतो आणि आता नरकाचे मालक बनलो आहोत. आता पुन्हा पारस-बुद्धी बनत आहोत. हे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे जे मग इतरांना समजावून सांगायचे आहे. ड्रामा अनुसार पार्ट चालत राहतो, जो क्षण पास होतो तो ॲक्युरेट आहे परंतु तरीही तुमच्याकडून पुरुषार्थ तर करून घेतीलच ना. ज्या मुलांना नशा आहे की, स्वयं भगवान आम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी पुरुषार्थ करून घेत आहेत तर त्यांचा चेहरा एकदम प्रफुल्लित असतो. बाबा येतातच मुळी मुलांच्या प्रारब्धा करिता पुरुषार्थ करवून घेण्यासाठी. हे देखील तुम्ही जाणता, दुनियेमध्ये थोडेच कोणी हे जाणतात. स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी भगवान पुरुषार्थ करवून घेत आहेत तर आनंद झाला पाहिजे. चेहरा एकदम फर्स्ट क्लास, प्रफुल्लित असला पाहिजे. बाबांच्या आठवणीने तुम्ही सदैव हर्षित रहाल. बाबांना विसरल्यानेच उदासी येते. बाबांची आणि वारशाची आठवण केल्याने प्रफुल्लित होतात. प्रत्येकाच्या सेवेवरूनच समजून येते. बाबांना मुलांचा सुगंध (गुण रुपी सुगंध) तर येतो ना. सपूत (लायक) चांगल्या मुलांकडून सुगंध येतो, कपूत (वाईट) मुलाकडून दुर्गंधी येते. बगीच्यातील कधीही सुगंधित फुलच उचलावेसे वाटते. धोत्र्याला कोण उचलेल! बाबांची यथार्थ रीतीने आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मायेच्या बॉक्सिंगमध्ये हार खायची नाही. लक्ष असावे की, कधी मुखावाटे कु-वचन निघू नये, कु-दृष्टी, कु-चलन, कु-कर्म होऊ नये.

२) फर्स्टक्लास सुगंधित फूल बनायचे आहे. नशा रहावा की, स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत. बाबांच्या आठवणीमध्ये राहून सदैव हर्षित रहायचे आहे, कधीही उदास व्हायचे नाही.

वरदान:-
चॅलेंज आणि प्रॅक्टिकल यांच्या समानतेद्वारे स्वतःला पापापासून सुरक्षित ठेवणारे विश्व सेवाधारी भव

तुम्ही मुले जे चॅलेंज करता ते चॅलेंज आणि प्रॅक्टिकल जीवन यामध्ये समानता असावी, नाही तर पुण्य-आत्मा बनण्याऐवजी ओझेवाली आत्मा बनाल. या पाप आणि पुण्याच्या गतीला जाणून स्वतःला सुरक्षित ठेवा कारण संकल्पामध्ये देखील विकाराची कमजोरी, व्यर्थ बोल, व्यर्थ भावना, घृणा किंवा इर्षेची भावना पापाच्या खात्याला वाढवते त्यामुळे ‘पुण्य-आत्मा भव’च्या वरदाना द्वारे स्वतःला सुरक्षित ठेवून विश्व सेवाधारी बना. संघटित रूपामध्ये एकमत, एकरस स्थितीचा अनुभव करवा.

बोधवाक्य:-
पवित्रतेचा दिवा चारही दिशांना पेटवा तेव्हाच बाबांना सहज पाहू शकाल.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-

प्रत्यक्षतेचा झेंडा फडकविण्यापूर्वी फक्त हे दोन शब्द प्रत्येक कर्मामध्ये आणा. एक - सर्व संबंध, संपर्कामध्ये आपसामध्ये एकता. अनेक संस्कार असताना, अनेकतेमध्ये एकता आणि दृढता हेच सफलतेचे साधन आहे. कधी-कधी एकता डगमगते. ‘हा करेल, तेव्हा मी करेन…’ असे नको. तुमचे स्लोगन आहे - ‘स्व-परिवर्तन से विश्व परिवर्तन’, विश्व परिवर्तनाद्वारे स्व-परिवर्तन नाही.