13-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पद प्राप्त करण्याचा आधार आहे अभ्यास, जे जुने भक्त असतील ते चांगले शिकतील आणि पद देखील चांगले प्राप्त करतील'’

प्रश्न:-
जे बाबांच्या आठवणी मध्ये राहतात त्यांचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
आठवणी मध्ये राहणाऱ्यांचे चांगले गुण असतील. ते पवित्र बनत जातील. रॉयल्टी येत जाईल. आपसामध्ये गोड क्षीरखंड होऊन राहतील, इतरांना न पाहता स्वतःला पाहतील. त्यांच्या बुद्धीमध्ये राहते - ‘जो करेगा वह पायेगा’ (जो करेल तो प्राप्त करेल).

ओम शांती।
मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, हा भारताचा जो आदि सनातन देवी-देवता धर्म आहे, त्याचे शास्त्र आहे - गीता. ही गीता कोणी गायली, हे कोणीही जाणत नाहीत. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. बाकी हा होळी इत्यादी काही आपला सण नाहीये, हे सर्व आहेत भक्ति मार्गाचे सण. सण आहे तो केवळ एक त्रिमूर्ती शिवजयंती. बस्स. फक्त शिवजयंती असे कधीही म्हणता कामा नये. त्रिमूर्ती शब्द घातला नाही तर मनुष्य समजणार नाहीत. जसे त्रिमूर्तीचे चित्र आहे, खाली लिहिलेले असावे की, ‘दैवी स्वराज्य तुमचा जन्म सिद्ध अधिकार आहे’. शिव भगवान पिता देखील आहेत ना. जरूर येतात, येऊन स्वर्गाचे मालक बनवितात. स्वर्गाचे मालक बनलेच आहेत राजयोग शिकल्याने. चित्रांमध्ये तर खूप ज्ञान आहे. चित्रे अशी बनवायची आहेत जी पाहूनच मनुष्य आश्चर्यचकित होतील. ते देखील ज्यांनी खूप भक्ती केली असेल, तेच खूप चांगल्या रीतीने ज्ञान घेतील. कमी भक्ती करणारे ज्ञान देखील कमी घेतील तर पद देखील कमी दर्जाचे प्राप्त करतील. दास-दासींमध्ये देखील नंबरवार असतात ना. सर्व काही अवलंबून आहे अभ्यासावर. तुमच्यामध्ये फार थोडे आहेत जे चांगल्या रीतीने युक्तीने बोलू शकतात. चांगल्या मुलांची ॲक्टिव्हिटी देखील चांगली असेल. गुण देखील सुंदर असले पाहिजेत. जितके बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तितके पवित्र बनत जाल आणि रॉयल्टी देखील येत जाईल. काही-काही तर शूद्रांची वर्तणूक खूप चांगली असते आणि इथे ब्राह्मण मुलांची वर्तणूक अशी आहे की काही विचारू नका; म्हणूनच ते लोक देखील म्हणतात - यांना ईश्वर शिकवतात काय! तर मुलांची अशी वर्तणूक असता कामा नये. अतिशय गोड क्षीरखंड असायला हवे, ‘जो करेंगे सो पायेंगे’ (जे करतील ते मिळवतील). करणार नाहीत तर मिळणारही नाही. बाबा तर चांगल्या प्रकारे समजावून सांगत राहतात. सर्व प्रथम तर बेहदच्या बाबांचा परिचय देत रहा. त्रिमूर्तीचे चित्र तर खूप चांगले आहे - स्वर्ग आणि नरक देखील दोन्ही बाजूला आहे. गोळ्यामध्ये (सृष्टीचक्राच्या चित्रामध्ये) देखील क्लिअर आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला तुम्ही या गोळ्याच्या आणि झाडाच्या चित्रावर समजावून सांगू शकता- या हिशेबाने तुम्ही स्वर्ग नवीन दुनियेमध्ये येऊ शकणार नाहीत. जो सर्वात श्रेष्ठ धर्म होता, सर्वात श्रीमंत होते, तेच सर्वात गरीब बनले आहेत, जे सर्वात पहिले-पहिले होते, संख्या देखील त्यांची जास्त असली पाहिजे परंतु बरेच हिंदू लोक बाकी इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. आपल्या धर्माला न जाणल्याकारणाने इतर धर्मांमध्ये गेले आहेत किंवा मग हिंदू धर्म म्हणतात. आपल्या धर्माला देखील समजत नाहीत. ईश्वराला खूप आळवतात - शांती देवा, परंतु शांतीचा अर्थ समजत नाहीत. एकमेकांना शांतीचे प्राईज देत राहतात. इथे तुम्ही विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त बनलेल्या मुलांना बाबा विश्वाची बादशाही प्राईजमध्ये देतात. हे इनाम देखील नंबरवार पुरुषार्थानुसार मिळते. देणारे आहेत ईश्वर पिता. इनाम किती मोठे आहे - सूर्यवंशी विश्वाची राजाई! आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण विश्वाचा इतिहास-भूगोल, वर्ण इत्यादी सर्व आहे. विश्वाची राजाई घ्यायची आहे तर थोडी मेहनत सुद्धा करायची आहे. पॉईंट तर खूप सोपे आहेत. टीचर जे काम देतात ते करून दाखवले पाहिजे. म्हणजे बाबा बघतील की कोणामध्ये पूर्ण ज्ञान आहे. बरीच मुले तर मुरलीवर देखील लक्ष देत नाहीत. रेग्युलर मुरली वाचत नाहीत. जे मुरली वाचत नाहीत ते काय कोणाचे कल्याण करत असतील! अशी भरपूर मुले आहेत जी काहीच कल्याण करत नाहीत. ना आपले, ना दुसऱ्यांचे कल्याण करत म्हणून घोडेस्वार, प्यादे म्हटले जाते. काही थोडे महारथी आहेत, स्वतः देखील समजू शकतात - कोण-कोण महारथी आहेत. म्हणतात - बाबा, गुलजारला, कुमारकाला मनोहरला पाठवा… कारण स्वतः घोडेस्वार आहेत, ते महारथी आहेत. बाबा तर सर्व मुलांना चांगल्या रीतीने ओळखू शकतात. कोणावर ग्रहचारी देखील बसते ना. काही वेळा चांगली-चांगली मुले देखील मायेची वादळे आल्याने बेताल बनतात. ज्ञानाकडे लक्षच जात नाही. बाबांना प्रत्येकाच्या सेवेवरून माहित तर होते ना. सेवा करणारे आपला पूर्ण समाचार बाबांना देत राहतील.

तुम्ही मुले जाणता गीतेचे भगवान आपल्याला विश्वाचा मालक बनवत आहेत. असे खूप आहेत जे ती गीता देखील तोंडपाठ करतात, हजारो रुपये कमावतात. तुम्ही आहात ब्राह्मण संप्रदाय आणि मग दैवी संप्रदाय बनता. सर्वजण स्वतःला ईश्वराची संतान देखील म्हणतात आणि मग म्हणतात आपण सर्व ईश्वर आहोत, ज्याला जे वाटते ते बोलत राहतात. भक्तिमार्गामध्ये मनुष्यांची हालत कशी झाली आहे. ही दुनिया आयरन एजेड पतित आहे. या चित्राद्वारे खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकाल. सोबत दैवी गुण देखील पाहिजेत. आतून-बाहेरून सच्चाई पाहिजे. आत्माच खोटी बनली आहे तीला मग सत्य पिता सत्य बनवत आहेत. बाबाच येऊन स्वर्गाचा मालक बनवतात. दैवी गुण धारण करवितात. तुम्ही मुले जाणता आपण असे (लक्ष्मी-नारायणासारखे) गुणवान बनत आहोत. आपली तपासणी करत रहा - माझ्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही ना? चालता-चालता मायेची चापट अशी बसते जे खूपजण कोसळतात (अधोगती होते).

तुमच्यासाठी हे ज्ञान आणि विज्ञानच होळी-रंगपंचमी आहे. ते लोक देखील होळी आणि रंगपंचमी साजरी करतात परंतु त्याचा अर्थ काय आहे, हे सुद्धा कोणीही जाणत नाहीत. वास्तविक हे ज्ञान आणि विज्ञान आहे, ज्या द्वारे तुम्ही स्वतःला खूप उच्च बनवता. ते तर काय-काय करतात, धूळ टाकतात; कारण हा आहे रौरव नरक. नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेच्या विनाशाचे कार्य सुरू आहे. तुम्हा ईश्वरीय संतांनाला देखील माया असा ठोसा लगावते जे जोराने दलदलीमध्ये कोसळतात. मग त्याच्यातून निघणे खूप कठीण होते, यामध्ये मग आशिर्वाद इत्यादीचा काही सवालच राहत नाही. मग पुन्हा या बाजूला मुश्किलीने चढू शकतात म्हणून खूप खबरदारी पाहिजे. मायेच्या वारापासून वाचण्यासाठी कधी देह-अभिमानामध्ये फसू नका. नेहमी खबरदार, सर्व भाऊ-बहीणी आहोत. बाबांनी जे शिकवले आहे तेच बहिणी शिकवतात. बलिहारी बाबांची आहे, ना की बहिणींची. ब्रह्माची देखील बलिहारी नाही. हे (ब्रह्मा बाबा) देखील पुरुषार्थाने शिकले आहेत. पुरुषार्थ चांगला केला आहे अर्थात आपले कल्याण केले आहे. आपल्याला देखील शिकवतात तर आपण आपले कल्याण करावे.

आज होळी आहे, तर आता होळीचे ज्ञान देखील ऐकवत राहतात. ज्ञान आणि विज्ञान. शिक्षणाला नॉलेज म्हटले जाते. विज्ञान काय गोष्ट आहे हे कोणालाच माहित नाहीये. विज्ञान आहे ज्ञानापेक्षाही परे (वेगळे). ज्ञान तुम्हाला इथे मिळत आहे, ज्या द्वारे तुम्ही प्रारब्ध प्राप्त करता. बाकी ते आहे शांतीधाम. इथे पार्ट बजावून थकून जातात तेव्हा मग शांतीमध्ये जावू इच्छितात. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे चक्राचे ज्ञान आहे. आता आपण स्वर्गामध्ये जाणार मग ८४ जन्म घेत नरकामध्ये येणार. आणि पुन्हा तीच हालत होईल, हे चालतच राहील. यापासून कोणीही सुटू शकत नाही. कोणी म्हणतात हा ड्रामा बनलाच कशासाठी? अरे, हा तर नवीन दुनिया आणि जुन्या दुनियेचा खेळ आहे. अनादि बनलेला आहे. झाडाच्या चित्रावर समजावून सांगणे खूप चांगले आहे. सर्वात पहिली मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करा तर पावन बनाल. पुढे चालून समजत जाईल - कोण-कोण या कुळाचे आहेत जे इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत, ते देखील निघत जातील. जेव्हा सर्व येतील तेव्हा मनुष्य आश्चर्यचकित होतील. सर्वांना हेच सांगायचे आहे की, देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना. तुमच्यासाठी शिक्षणच मोठा सण आहे, ज्याद्वारे तुमची किती कमाई होते. ते लोक तर या सणांना साजरे करण्यासाठी किती पैसे इत्यादी बरबाद करतात, किती भांडणे इत्यादी होतात. पंचायती राज्यामध्ये तर किती भांडणेच भांडणे आहेत, कोणाला सुपारी देऊनही खून करायला लावतात असेही प्रयत्न करतात. अशी खूप उदाहरणे होत राहतात. मुले जाणतात सतयुगामध्ये कोणताही त्रास होत नाही. रावण राज्यामध्ये तर खूपच त्रास आहे. आता तर तमोप्रधान आहेत ना. एकमेकांचे मत एक न झाल्याने किती भांडण-तंटे होतात म्हणून बाबा समजावून सांगत असतात - या जुन्या दुनियेला विसरून एकटे बना, घराची आठवण करा. आपल्या सुखधामची आठवण करा, कोणाशी जास्त बोलू देखील नका, नाही तर नुकसान होते. अतिशय गोड, शांतीने, प्रेमाने बोलणे चांगले आहे. जास्त न बोलणे चांगले आहे. शांतीमध्ये राहणे सर्वात चांगले आहे. तुम्ही मुले तर शांतीनेच विजय प्राप्त करता. एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणावरही प्रेम करायचे नाही. जितकी बाबांकडून प्रॉपर्टी घेऊ इच्छिता तेवढी घ्या. नाहीतर लौकिक पित्याच्या प्रॉपर्टीवरून किती भांडण होत असते. यामध्ये तर काहीच कटकट नाही. जितके पाहिजे तितके आपण आपला अभ्यास करून घेऊ शकता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सत्य पिता सत्य बनविण्याकरिता आले आहेत म्हणून सत्याने चालायचे आहे. आपली तपासणी करायची आहे - माझ्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही ना? मी जास्त बोलत तर नाही? अतिशय गोड बनून शांतीने आणि प्रेमाने बोलायचे आहे .

२) मुरलीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे. रोज मुरली वाचायची आहे. आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे. टीचर जे काम देतात ते करून दाखवायचे आहे.

वरदान:-
‘होली’ शब्दाच्या अर्थाला जीवनामध्ये आणून पुरुषार्थाच्या गतीला वेगवान करणारे तीव्र पुरुषार्थी भव

होली अर्थात जी गोष्ट झाली, होऊन गेली तीला पूर्णतः नष्ट करा. व्हायचे ते होऊन गेले असे म्हणून पुढे जाणे हेच होळी साजरे करणे आहे. होऊन गेलेली गोष्ट अशी अनुभव व्हावी जशी काही खूप जुन्या कोणत्यातरी जन्माची गोष्ट आहे, जेव्हा अशी स्थिती होते तेव्हा पुरुषार्थाची गती तीव्र होते. तर आपल्या अथवा दुसऱ्यांच्या होऊन गेलेल्या गोष्टींवर कधीही जास्त विचार करायचा नाही, मनामध्येही ठेवायचे नाही आणि वर्णन तर कधीच करायचे नाही, तेव्हाच तीव्र पुरुषार्थी बनू शकाल.

बोधवाक्य:-
स्नेहच सहज आठवणीचे साधन आहे त्यामुळे नेहमी स्नेही राहणे आणि स्नेही बनविणे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये -

“गुप्त बांधेली गोपिकांचे गायन कशासाठी आहे”

गीत:- बिन देखे प्यार करूँ, घर बैठे याद करूँ...

आता हे गाणे बंधनात असलेल्या बेफिकीर गोपीने गायलेले आहे, हा आहे कल्प-कल्पाचा विचित्र खेळ. न पाहता प्रेम करतात, बिचाऱ्या दुनियेला काय कळणार, कल्पापूर्वीचा पार्ट हुबेहूब रिपीट होत आहे. भले त्या गोपीने घरदार सोडलेले नाहीये परंतु आठवणीमध्ये कर्मबंधन चुकते करत आहे, त्यामुळे किती आनंदाने नाचत-नाचत मस्तीमध्ये हे गाणे गात आहे. तर खऱ्या अर्थाने घर सोडण्याची तर गोष्ट नाहीये. घरी असताना न पाहता त्या सुखामध्ये राहून सेवा करायची आहे. कोणती सेवा करायची आहे? पवित्र बनून पवित्र बनविण्याची, तुम्हाला तिसरा नेत्र आता मिळाला आहे. आदिपासून अंतापर्यंत बीजाचे आणि झाडाचे रहस्य तुमच्या डोळ्यांसमोर आहे. तर बलिहारी या जीवनाची आहे, या नॉलेजद्वारे २१ जन्मांसाठी सौभाग्य बनवत आहात, यामध्ये जर कोणतीही लोक-लाज विकारी कुळाची मर्यादा असेल तर ती सेवा करू शकणार नाहीत, ही आहे आपली स्वतःची कमजोरी. अनेकांना विचार येतो की, या ब्रह्माकुमारी घरामध्ये अशांती निर्माण करण्यासाठी आल्या आहेत परंतु यामध्ये घर अशांत करण्याची गोष्ट नाहीये, घर बसल्या पवित्र रहायचे आहे आणि सेवा करायची आहे, यामध्ये तर अवघड काहीच नाही. पवित्र बनाल तेव्हाच तर पवित्र दुनियेमध्ये येण्याचे अधिकारी बनाल. बाकी जे येणारे नाहीत, ते तर कल्पापूर्वीचा शत्रुत्वाचा पार्ट बजावतील, यामध्ये कोणाचाही दोष नाही. जसे आपण परमात्म्याच्या कार्याला जाणतो, तसेच ड्रामातील प्रत्येकाच्या पार्टला जाणले आहे तर यामध्ये घृणा येऊ शकत नाही. अशा तीव्र पुरुषार्थी गोपीका शर्यत जिंकून विजयी माळेमध्ये येऊ शकतात. अच्छा. ओम् शांती.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:-

ज्ञानाच्या ज्यापण गूढ गोष्टी आहेत, त्यांना स्पष्ट करण्याची तुमच्याकडे खूप चांगली विधीपण आहे आणि स्पष्टीकरण सुद्धा आहे. प्रत्येक पॉईंटला तर्क संगतपणे स्पष्ट करून सांगू शकता. आपल्या ऑथॉरिटीवाले आहात. काही मनघटित अथवा काल्पनिक गोष्टी तर नाही आहेत. यथार्थ आहेत. अनुभव आहे. अनुभवाची ऑथॉरिटी, नॉलेजची ऑथॉरिटी, सत्यतेची ऑथॉरिटी… किती ऑथॉरिटीज आहेत! तर ऑथॉरिटी आणि स्नेह - दोघांनाही एकत्र कार्यामध्ये वापरा.