13-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता तुम्ही अशा दुनियेचे मालक बनता जिथे कोणतीच हद नाही, योगबळाद्वारे संपूर्ण विश्वाची राजाई घेणे हे देखील एक मोठे आश्चर्य आहे”

प्रश्न:-
ड्रामाच्या कोणत्या बंधनामध्ये (नियमामध्ये) बाबा देखील बांधलेले आहेत?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मला तुम्हा मुलांच्या सन्मुख यायचेच आहे, मी या बंधनामध्ये बांधलेला आहे. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत गुंतलेले सूत व्यवस्थित होणार नाही. बाकी मी तुमच्यावर काही कृपा किंवा आशीर्वाद करण्याकरिता येत नाही. मी काही मेलेल्याला जिवंत करत नाही. मी तर येतो, तुम्हाला पतितापासून पावन बनविण्याकरिता.

गीत:-
तुम्हें पाके हमने…

ओम शांती।
गाण्याचे शब्द ऐकून तुम्हा मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत कारण सन्मुख बसले आहात. साऱ्या दुनियेमध्ये भले कितीही विद्वान, पंडित, आचार्य आहेत, कोणत्याही मनुष्यमात्राला हे ठाऊक नाही आहे की बेहदचे पिता दर ५ हजार वर्षानंतर येतात. मुलेच जाणतात. मुले म्हणतात देखील - ‘जसा आहे, तसा आहे, तुमचाच आहे’. बाबा देखील असेच म्हणतात - ‘जसे आहात, तसे आहात, माझी मुले आहात’. तुम्ही देखील जाणता ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्वजण बोलावतात. बाबा समजावून सांगत आहेत - बघा रावणाची किती पडछाया आहे, एकही कोणी समजू शकत नाही की, ज्यांना आपण परमपिता परमात्मा म्हणतो, मग बाबा म्हटल्याने आनंद का होत नाही, हे विसरले आहेत. ते बाबाच आपल्याला वारसा देतात. बाबा स्वतःच समजावून सांगतात, या इतक्या सोप्या गोष्टी देखील कोणी समजू शकत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत - हे तर तेच आहेत, ज्यांना सारी दुनिया बोलावत आहे - ‘ओ खुदा, हे राम…’ असे बोलावत-बोलावत प्राण सोडतात. इथे ते बाबा तुम्हाला शिकवत आहेत. तुमची बुद्धी आता तिथे गेली आहे. बाबा आले आहेत - कल्पापूर्वी प्रमाणे. कल्प-कल्प बाबा येऊन पतितापासून पावन बनवून दुर्गती मधून सद्गतीमध्ये घेऊन जातात. गातात देखील - सर्वांचे पतित-पावन बाबा. आता तुम्ही मुले त्यांच्या सन्मुख बसले आहात. तुम्ही आहात मोस्ट बिलवेड स्वीट चिल्ड्रेन (अतिप्रिय गोड मुले). भारतवासीयांचीच तर गोष्ट आहे. बाबा देखील भारतामध्येच जन्म घेतात. बाबा म्हणतात, मी भारतामध्ये जन्म घेतो तर जरूर तेच प्रिय वाटतील. आठवण देखील सर्व त्यांचीच करतात, जे ज्या धर्माचे आहेत ते आपल्या धर्म स्थापकाची आठवण करतात. भारतवासीच जाणत नाहीत की आपण आदि सनातन धर्माचे होतो. बाबा समजावून सांगतात की, ‘भारतच प्राचीन देश आहे’, तर म्हणतात की, ‘कोणी सांगितले आहे की भारतच फक्त होता’. अनेक गोष्टी ऐकतात. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. कोणी म्हणतात - कोण म्हणते की गीता शिव परमात्म्याने गायली आहे. श्रीकृष्ण देखील परमात्माच तर होते, त्यांनीच गायली आहे. परमात्मा सर्वव्यापी आहेत. त्यांचाच हा सारा खेळ आहे. ही सर्व रूपे भगवंताचीच आहेत. भगवंतच अनेक रूपे धारण करून लीला करतात. भगवान जे पाहिजे ते करू शकतात. आता तुम्ही मुले जाणता, माया देखील किती बलवान आहे. आज म्हणतात - ‘बाबा, आम्ही जरूर वारसा घेणार, नरा पासून नारायण बनणार’. आणि उद्या ते असणारही नाहीत. तुम्ही जाणता देखील की, कित्येक निघूनही गेले, सोडचिठ्ठी देतात. मम्माला मोटर गाडीतून फिरवत असायचे, आज तेच राहिलेले नाही आहेत. असे चांगले-चांगले असणारे देखील मायेच्या संगतीमध्ये येऊन असे कोसळतात जे एकदम खालीच पडतात (पूर्ण पतित बनतात). ज्यांना कल्पापूर्वी समजले होते त्यांनाच समजेल. आजकाल दुनियेमध्ये काय-काय चालू आहे आणि तुम्ही मुले स्वतःला पहा, काय बनत आहात! गाणे ऐकलेत ना. म्हणतात, आम्ही असा वारसा घेतो ज्यामध्ये साऱ्या विश्वाचे मालक बनतो. तिथे कुठेही हदची गोष्टच नसते. इथे प्रत्येक ठिकाणी हद्दी लावलेल्या आहेत. म्हणतात - आमच्या क्षेत्रामध्ये तुमचे विमान आले तर आम्ही उडवून टाकू. तिथे तर कोणतीही हदची गोष्टच नसते. हे गाणे देखील गातात परंतु त्यांना अर्थ थोडाच समजतो. तुम्ही तर जाणता बरोबर बाबांकडून पुन्हा आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. अनेकदा हे ८४ जन्मांचे चक्र फिरलो आहोत. थोड्या वेळापुरते दुःख भोगले आहे, सुख तर भरपूर आहे; म्हणून बाबा म्हणतात तुम्हा मुलांना भरभरून सुख देतो. आता माये कडून हार खाऊ नका. बाबांची मुले तर असंख्य आहेत, सगळेच काही एक सारखे सपूत असू शकणार नाहीत. कोणाला ५-७ मुले असतात, त्यामध्ये एक-दोन कपूत असतात तर डोकेच फिरवतात. लाखो-करोडो रुपये उडवतात. पिता एकदम धर्मात्मा असतो, आणि मुले तर एकदम घाट्याच्या खात्यामध्ये असतात. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत.

तुम्ही मुले जाणता, ही सारी दुनिया या बेहद बाबांची संतान आहेत. बाबा म्हणतात - माझी बर्थ प्लेस हा भारत आहे. प्रत्येकाला आपल्या जन्मभूमीचा आदर असतो. जेव्हा कोणी बाहेरच्या ठिकाणी शरीर सोडतात तेव्हा मग त्यांचे शव त्यांच्या गावाच्या ठिकाणी घेऊन येतात. बाबा देखील भारतामध्येच येतात. तुम्हा भारतवासीयांना पुन्हा बेहदचा वारसा देतात. तुम्ही मुले म्हणाल आम्ही पुन्हा सो देवता विश्वाचे मालक बनत आहोत. आम्ही मालक होतो, आता तर काय हालत झाली आहे. कुठून कुठे येऊन पडलो आहोत. ८४ जन्म भोगता-भोगता आता हे हाल झाले आहेत. ड्रामाला तर समजून घ्यायचे आहे ना. याला म्हटले जाते - जय आणि पराजयाचा खेळ. भारताचाच हा खेळ आहे, यामध्ये तुमचा पार्ट आहे. तुम्हा ब्राह्मणांचा या ड्रामामध्ये सर्वात उच्च ते उच्च पार्ट आहे. तुम्ही सर्व विश्वाचे मालक बनता, खूप सुख भोगता. तुमच्या इतके सुख इतर कोणीही भोगू शकत नाही. नावच आहे स्वर्ग. हा आहे नरक. इथली सुखे कागविष्ठे समान आहेत. आज लखपती आहेत, दुसऱ्या जन्मामध्ये काय बनतील? काही ठाऊक थोडेच आहे. ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. सतयुग आहे पुण्य आत्म्यांची दुनिया. तुम्ही पुण्य आत्मा बनत आहात, तर कधीही पाप करता कामा नये. नेहमी बाबांशी सरळ वागले पाहिजे. बाबा म्हणतात - माझ्या सोबत द्वापर पासून नेहमीच धर्मराज आहेच आहे. सतयुग-त्रेतामध्ये माझ्या सोबत धर्मराज नसतात. द्वापर पासून तुम्ही माझ्या करिता दान-पुण्य करत आला आहात. ‘ईश्वर अर्पण’ असे म्हणतात ना. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातल्याने लिहिले आहे - ‘श्रीकृष्ण अर्पणम्’. रिटर्न देणारे तर एक बाबाच आहेत त्यामुळे ‘श्रीकृष्ण अर्पणम्’ म्हणणे चुकीचे आहे. ‘ईश्वर अर्पण’ म्हणणे ठीक आहे. ‘श्रीगणेश अर्पण’ असे म्हटल्याने देखील काहीच मिळणार नाही. तरी देखील भावनेपोटी सर्वांना काही ना काही देत आलो आहे. मला तर कोणी ओळखतही नाहीत. आता तुम्ही मुलेच जाणता की, आपण सर्व काही शिवबाबांना समर्पण करत आहोत. बाबा देखील म्हणतात - मी आलो आहे तुम्हाला २१ जन्मांचा वारसा देण्याकरिता. आता आहेच उतरती कला. रावण राज्यामध्ये जे काही दान-पुण्य इत्यादी करतात, ते पाप आत्म्यांनाच देतात. कला उतरतच जाते. नाही म्हणायला थोडे-फार मिळते सुद्धा परंतु ते देखील अल्पकाळासाठी. आता तर तुम्हाला २१ जन्मांकरिता मिळते. त्याला म्हटले जाते - रामराज्य. असे म्हणणार नाही की तिथे ईश्वराचे राज्य आहे. राज्य तर देवी-देवतांचे आहे. बाबा म्हणतात, मी राज्य करत नाही. तुमचा जो आदि सनातन देवी-देवता धर्म होता, तो आता प्राय: लोप झाला आहे. त्याची आता पुन्हा स्थापना होत आहे. बाबा तर कल्याणकारी आहेत, त्यांना म्हटले जाते - सत्य बाबा. तुम्हाला आपले आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे सत्य नॉलेज देत आहेत. बाबा तुम्हाला बेहदचा इतिहास-भूगोल ऐकवत आहेत. किती जबरदस्त कमाई आहे. तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. त्यांनी मग ते हिंसक चक्र दाखवलेले आहे. खरे तर हे आहे ज्ञानाचे चक्र. परंतु हे ज्ञान तर प्राय: लोप होते. तुमची ही मुख्य चित्रे आहेत. एकीकडे त्रिमूर्ती, दुसरीकडे झाड आणि चक्र. बाबांनी समजावून सांगितले आहे - शास्त्रांमध्ये तर कल्पाचा कालावधी लाखो वर्षे लिहिला आहे. सगळे सूतच गुंतलेले आहे. बाबांशिवाय दुसरे कोणीही हे गुंतलेले सूत व्यवस्थित करू शकत नाही. बाबा सन्मुख स्वतः आले आहेत. म्हणतात की, मला ड्रामा अनुसार यावेच लागते. मी या ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. असे होऊ शकत नाही की मी येणारच नाही. असे देखील नाही की, मी येऊन मेलेल्यांना जिवंत करेन किंवा कोणाला आजारापासून मुक्त करेन. बरीच मुले म्हणतात - ‘बाबा, आमच्यावर कृपा करा’. परंतु इथे कृपा इत्यादीची गोष्ट नाहीये. तुम्ही मला यासाठी थोडेच बोलावले आहे की आशीर्वाद द्या जेणेकरून आमचे कोणते नुकसान होऊ नये. तुम्ही बोलावताच मुळी, ‘हे पतित-पावन या. दुःख-हर्ता सुख-कर्ता या’. शरीराचे दुःख-हर्ता तर डॉक्टर लोक देखील असतात. मी काही यासाठी येतो का! तुम्ही म्हणता - आम्हाला नवीन दुनिया स्वर्गाचे मालक बनवा अथवा शांती द्या. असे म्हणत नाहीत की, येऊन आम्हाला आजारातून बरे करा. कायमसाठी शांती अथवा मुक्ती काही मिळू शकणार नाही, पार्ट तर बजावायचाच आहे. जे शेवटी येतात त्यांना किती शांती मिळते. अजूनही येतच राहतात. इतका वेळ शांतीधाम मध्ये तर राहिले ना. ड्रामा अनुसार ज्यांचा पार्ट आहे, तेच येतील. पार्ट बदलू शकत नाही. बाबा समजावून सांगत आहेत - शांतीधाममध्ये तर असंख्य आत्मे असतात, जे शेवटी येतात. हा ड्रामा बनलेला आहे. शेवटी येणाऱ्यांना शेवटीच यायचे आहे. हे झाड बनलेले आहे. ही चित्रे इत्यादी जी बनवलेली आहेत त्या सर्वांवर तुम्हाला समजावून सांगायचे आहे. अजूनही अशी चित्रे बनत राहतील, कल्पापूर्वी प्रमाणेच तयार होतील. ८४ जन्मांचा विस्तार झाडाच्या चित्रामध्ये देखील आहे. ड्रामाच्या चक्रामध्ये देखील आहे. आता पुन्हा शिडीचे चित्र बनवले आहे. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. अगदीच जसे की बुद्धू आहेत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - परमपिता परमात्मा जे ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर आहेत, ते आपल्याला या तनाद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) शिकवत आहेत. बाबा म्हणतात, मी येतोच त्यांच्यामध्ये जे सर्वात पहिले विश्वाचे मालक होते. तुम्ही देखील जाणता - बरोबर आम्ही देखील ब्रह्मा द्वारा ब्राह्मण बनतो. गीतेमध्ये काही या गोष्टी नाही आहेत. बाबा म्हणतात - हे (ब्रह्मा बाबा) स्वतःच नारायणाची पूजा करणारे होते, ट्रेनमधून प्रवास करताना देखील, गीता वाचत होते. लोक समजतील हा तर मोठा धर्मात्मा आहे. आता त्या सर्व गोष्टी विसरून जातात. तरी देखील यांनी गीता इत्यादी वाचलेली आहे ना. बाबा म्हणतात - मी हे सर्व जाणतो. आता तुम्ही हा विचार करा की, आपण कोणाच्या समोर बसलो आहोत, ज्यांच्या कडून विश्वाचे मालक बनतो तर मग त्यांना वारंवार विसरून का जातो? बाबा म्हणतात - तुम्हाला १६ तास फ्री देतो, बाकी आपली सेवा करा. आपली सेवा करता जणू विश्वाची सेवा करता. इतका पुरुषार्थ करा जेणेकरून कर्म करताना कमीत-कमी ८ तास बाबांची आठवण कराल. आता पूर्ण दिवसभरामध्ये ८ तास आठवण करू शकत नाही. ती अवस्था जेव्हा होईल तेव्हा समजतील हे खूप सेवा करत आहेत. असे समजू नका - आम्ही खूप सेवा करतो, खूप फर्स्ट क्लास भाषण करतो, परंतु योग अजिबात नाहीये. योगाची यात्राच मुख्य आहे.

बाबा म्हणतात डोक्यावर विकर्मांचे ओझे खूप आहे त्यामुळे पहाटे उठून बाबांची आठवण करा. २ ते ५ पर्यंतचे वायुमंडळ उत्तम आहे. आत्मा रात्रीला आत्म-अभिमानी बनते, ज्याला निद्रा म्हटले जाते. म्हणून बाबा म्हणतात जितके शक्य होईल बाबांची आठवण करा. आता बाबा म्हणतात - मनमनाभव. हा आहे चढत्या कलेचा मंत्र. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांशी सरळ आणि खरे होऊन चालायचे आहे. कल्याणकारी बाबांची मुले आहोत त्यामुळे सर्वांचे कल्याण करायचे आहे. सपूत बनायचे आहे.

२) कर्म करत असताना देखील कमीत-कमी ८ तास जरूर आठवणीमध्ये राहायचे आहे. आठवणच मुख्य आहे - याद्वारेच विकर्मांचे ओझे उतरायचे आहे.

वरदान:-
दाता बनून प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक संकल्पामध्ये दान देणारे उदारचित्त, महादानी भव

तुम्ही दात्याची मुले घेणारे नाहीत परंतु देणारे आहात. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक संकल्पामध्ये द्यायचे आहे; जेव्हा असे दाता बनाल तेव्हा म्हणणार उदारचित्त, महादानी. असे महादानी बनल्याने महान शक्तीची प्राप्ती स्वतःच होते. परंतु देण्याकरिता स्वतःचा भंडारा भरपूर पाहिजे. जे घ्यायचे होते ते सर्व काही घेतले, बाकी राहिले देणे. तर देत जा, दिल्याने आणखीनच भंडारा भरत जाईल.

बोधवाक्य:-
प्रत्येक सब्जेक्टमध्ये फुल मार्क्स जमा करायचे असतील तर गंभीरतेचा गुण धारण करा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

नम्रचित्त आत्मा सहजच सुखदाता बनू शकते परंतु अभिमान नम्रचित्त बनू देत नाही. नम्रचित्त नसाल तर सेवा होऊ शकत नाही. सेवाधारीची विशेषता आहे - तो नेहमी नम्रचित्त असेल; स्वतः झुकलेला असेल तरच इतरांना झुकवू शकेल. जितके नम्रचित्त असाल तितके निर्माण कराल. जिथे निर्माणता असेल तिथे रोब नसेल, रूहानियत असेल. जसे बाबा किती नम्रचित्त बनून येतात, असे फालो फादर करा.