13-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबांद्वारे तुम्हाला जे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान मिळाले आहे, ते तुम्ही बुद्धीमध्ये ठेवता म्हणून तुम्ही आहात स्वदर्शन चक्रधारी”

प्रश्न:-
आत्म्याला पावन बनविण्यासाठी रूहानी बाबा कोणते इंजेक्शन देतात?

उत्तर:-
‘मनमनाभव’चे. हे इंजेक्शन रूहानी बाबांशिवाय दुसरे कोणीही देऊ शकत नाही. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा. बस्स. आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल. यामध्ये संस्कृत इत्यादी शिकण्याची सुद्धा गरज नाही. बाबा तर हिंदीमध्ये सोप्या शब्दात ऐकवतात. आत्म्याला जेव्हा हा निश्चय होतो की, रूहानी बाबा आम्हाला पावन बनण्याची युक्ती सांगत आहेत तर आत्मा विकारांना सोडत जाते.

ओम शांती।
‘ओम् शांती’ याचा अर्थ तर मुलांना समजावून सांगितला आहे. आत्मा आपला स्वतःचा परिचय देते. माझे स्वरूप शांत आहे आणि माझे राहण्याचे ठिकाण शांतीधाम आहे, ज्याला परमधाम, निर्वाणधाम असेही म्हटले जाते. बाबा देखील म्हणतात - की देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना, बाबांची आठवण करा. ते आहेत पतित-पावन. हे कोणालाही माहीत नाही की आपण आत्मा आहोत. इथे पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. आता ड्रामा पूर्ण होत आहे, परत जायचे आहे; म्हणून म्हणतात - ‘माझी आठवण करा म्हणजे तुमची विकर्म विनाश होतील’. यालाच संस्कृतमध्ये म्हणतात, ‘मनमनाभव’. बाबांनी काही संस्कृतमध्ये सांगितले नाही. बाबा तर या हिंदी भाषेतून समजावून सांगतात. जसे सरकार म्हणते, एकच हिंदी भाषा असायला हवी. बाबांनी देखील खरे तर हिंदीमध्येच सांगितले आहे. परंतु या वेळी अनेक धर्म, मठ, पंथ असल्यामुळे भाषा देखील अनेक प्रकारच्या झाल्या आहेत. सतयुगामध्ये इतक्या भाषा नसतात, जितक्या इथे आहेत. गुजरातमध्ये राहणाऱ्यांची भाषा वेगळी. जे ज्या गावात राहतात, ते तिथली भाषा जाणतात. अनेक मनुष्य आहेत, अनेक भाषा आहेत. सतयुगामध्ये तर एकच धर्म आणि एकच भाषा होती. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे, हे कोणत्याही शास्त्रामध्ये नाही. असे कोणतेही शास्त्र नाही ज्यामध्ये हे ज्ञान असेल. ना कल्पाच्या कालावधी विषयी कुठे लिहिले आहे, ना कोणाला ते माहीत आहे. सृष्टी तर एकच आहे. सृष्टीचे चक्र फिरत राहते. नव्या पासून जुनी, जुन्या पासून पुन्हा नवीन होते, यालाच म्हटले जाते - स्वदर्शन चक्र. ज्याला या चक्राचे ज्ञान आहे, त्याला म्हटले जाते - स्वदर्शन चक्रधारी. आत्म्याला ज्ञान असते की, हे सृष्टी चक्र कसे फिरते, ते (भक्त) मग श्रीकृष्णाला, विष्णूला स्वदर्शन चक्र देऊन टाकतात. आता बाबा समजावून सांगत आहेत - त्यांना तर हे ज्ञानच नव्हते. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज बाबाच देतात. हे आहे स्वदर्शन चक्र. बाकी हिंसेची काही गोष्टच नाही, ज्यामुळे गळा कापला जाईल. हे सर्व खोटे लिहून ठेवले आहे. हे ज्ञान बाबांशिवाय दुसरा कोणताही मनुष्यमात्र देऊ शकत नाही. मनुष्याला कधीही भगवान म्हणू शकत नाही, जेव्हा की ब्रह्मा-विष्णु-शंकर यांना देखील देवता म्हटले जात आहे. जी बाबांची महिमा आहे, ती देवतांची देखील नाहीये. बाबा तर राजयोग शिकवत आहेत. असे म्हणता येणार नाही की, मुलांची देखील तीच महिमा आहे, जी बाबांची आहे. मुले तरीही पुनर्जन्म घेतात, बाबा काही पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. मुले, बाबांची आठवण करतात. उच्च ते उच्च आहे भगवान, ते सदैव पावन आहेत. मुले पावन बनून मग पुन्हा पतित बनतात. बाबा तर आहेतच पावन. बाबांचा वारसा देखील जरूर मुलांना पाहिजे. एक तर मुक्ती पाहिजे, आणि दुसरी जीवनमुक्ती पाहिजे. शांतीधामला मुक्ती, सुखधामला जीवनमुक्ती म्हटले जाते. मुक्ती तर सर्वांना मिळते. जीवनमुक्ती जे अभ्यास करतील त्यांनाच मिळेल. भारतामध्ये खरोखरच जीवनमुक्ती होती, बाकीचे इतके सारे मुक्तिधाम मध्ये होते. सतयुगामध्ये फक्त एकच भारत खंड होता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. बाबांनी समजावून सांगितले आहे, लक्ष्मी-नारायणाची मंदिरे सर्वात जास्त बनवली जातात. बिर्ला इत्यादी जे कोणी मंदिरे बनवतात, ते हे जाणत नाहीत की, लक्ष्मी-नारायणाला ही बादशाही कोठून मिळाली, त्यांनी किती काळ राज्य केले. आणि नंतर मग ते कुठे निघून गेले, काहीच जाणत नाहीत. तर ही जणू काही बाहुल्यांची पूजा झाली ना, यालाच म्हटले जाते भक्ती. आपेही पूज्य आणि मग आपेही पुजारी बनतात. पूज्य आणि पुजारी यामध्ये खूप फरक आहे, त्याचा देखील काहीतरी अर्थ असेलच ना. पतित त्यांना म्हटले जाते, जे विकारी आहेत. क्रोधीला पतित म्हणणार नाही, जे विकारामध्ये जातात त्यांना पतित म्हटले जाते. या वेळी तुम्हाला ज्ञान-अमृत मिळत आहे. ज्ञानाचे सागर आहेतच एक बाबा. बाबांनी समजावून सांगितले आहे की, हा भारतच सतोप्रधान, सर्वश्रेष्ठ होता, आता तमोप्रधान आहे; हे तुमच्याच बुद्धीमध्ये आहे. इथे काही राजाई तर नाहीये. हे तर आहेच प्रजेचे प्रजेवर राज्य. सतयुगामध्ये फार थोडे असतात, आता तर कित्ती जनसंख्या झाली आहे. विनाशाची तयारी देखील होत आहे. दिल्ली परिस्तान तर बनणारच आहे. परंतु हे कोणीही जाणत नाही. ते तर समजतात की, ही न्यू दिल्ली आहे. या जुन्या दुनियेला परिवर्तन करणारा कोणीतरी आहे! हे कोणालाच ठाऊक नाहीये. कोणत्याही शास्त्रामध्ये देखील नाही. समजावून सांगणारे एक बाबाच आहेत.

आता तुम्ही मुले नवीन दुनियेसाठी तयारी करत आहात. कवडी पासून हिऱ्यासमान बनत आहात. भारत किती सॉल्व्हंट (समृद्ध) होता, दुसरा कोणताही धर्म नव्हता. आता तर अनेक धर्म आहेत. आता दयाळू बाबांची आठवण करतात. भारत सुखधाम होता, हे विसरले आहेत. आता तर भारताची काय अवस्था झाली आहे. नाहीतर भारत हेवन (स्वर्ग) होता. बाबांचे जन्मस्थान आहे ना. तर ड्रामानुसार त्यांना (बाबांना) दया येते. भारत हा प्राचीन देश आहे. म्हणतात देखील - खरोखर क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता इतर कोणताही धर्म नव्हता. आता हा भारत पूर्णपणे रसातळाला गेला आहे. गातात तर खरे - आमचा भारत देश सर्वात श्रेष्ठ होता. नावच होते हेवन, स्वर्ग. भारताच्या महिमेबद्दल कोणालाच काही माहीत नाही. बाबाच येऊन भारताची कहाणी समजावून सांगतात. भारताची कहाणी अर्थात दुनियेची कहाणी, यालाच सत्यनारायणाची कथा म्हटले जाते. बाबाच बसून समजावून सांगत आहेत - पूर्ण ५ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, ज्यांची चित्रे देखील आहेत. परंतु त्यांना हे राज्य कसे मिळाले? सतयुगाच्या अगोदर काय होते? संगमाच्या पूर्वी काय होते? कलियुग. हे आहे संगमयुग, ज्यामध्ये बाबांना यावे लागते; कारण जेव्हा जुन्या दुनियेला नवीन बनवायचे असते तेव्हा मला यावे लागते - पतित दुनियेला पावन बनविण्याकरिता. मग माझ्याविषयी म्हटले आहे - सर्वव्यापी आहे. युगे-युगे येतात, त्यामुळे माणसेच स्वतः गोंधळून गेली आहेत. संगमयुगाला फक्त तुम्हीच जाणता. तुम्ही कोण आहात - बोर्डवर लिहिलेले आहे, प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. ब्रह्माचा पिता कोण? सर्वश्रेष्ठ शिव. त्यानंतर आहेत ब्रह्मा आणि मग ब्रह्माद्वारे रचना होते. प्रजापिता तर जरूर ब्रह्मालाच म्हटले जाते. शिवाला प्रजापिता म्हणणार नाही. शिव सर्व आत्म्यांचा निराकार पिता आहे. मग इथे येऊन प्रजापिता ब्रह्माद्वारे ॲडॉप्ट करतात. बाबा म्हणतात - मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याद्वारे तुम्ही मुखवंशावळी ब्राह्मण बनला आहात. ब्रह्माद्वारेच तुम्हाला ब्राह्मण बनवून मग देवता बनवितो. आता तुम्ही ब्रह्माची संतान बनला आहात. ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे? ब्रह्माच्या पित्याचे काही नाव आहे का? ते आहेत ‘शिव’, निराकार पिता. ते येऊन यांच्यामध्ये प्रवेश करून ॲडॉप्ट करतात, मुखवंशावळी बनवतात. बाबा म्हणतात, मी यांच्या अनेक जन्मांतील अंतिम जन्माच्या अंतामध्ये प्रवेश करतो. हे (ब्रह्मा बाबा) माझे बनतात, संन्यास धारण करतात. कशाचा संन्यास? ५ विकारांचा. घरदार सोडण्याची गरज नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र राहायचे आहे. मामेकम् (मज एकाची) आठवण करा, म्हणजे तुमची विकर्म विनाश होतील. हाच योग आहे, ज्याद्वारे भेसळ निघून जाते आणि तुम्ही सतोप्रधान बनता. भक्तीमध्ये तर भले कितीही गंगा स्नान करा, जप-तप इत्यादी करा, खाली उतरणे निश्चित आहे (अधोगती होणारच आहे). सतोप्रधान होता, आता तमोप्रधान आहात, मग पुन्हा सतोप्रधान कसे बनायचे? तर बाबांशिवाय कोणीही मार्ग सांगू शकणार नाही. बाबा तर अगदी सोप्या पद्धतीने सांगतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हे आत्म्यांसोबत बोलत आहेत. कोणा गुजराती किंवा सिंधी लोकांशी बोलत नाहीत, हे आहे रूहानी ज्ञान. शास्त्रांमध्ये आहे भौतिक ज्ञान. आत्म्यालाच ज्ञान हवे, आत्माच पतित बनली आहे, तीलाच रूहानी इंजेक्शन पाहिजे. बाबांना म्हटले जाते - ‘रूहानी अविनाशी सर्जन’. ते येऊन आपला परिचय देतात की, मी तुमचा रूहानी सर्जन आहे. तुमची आत्मा पतित झाल्याकारणाने शरीर देखील रोगी झाले आहे. या वेळी भारतवासी तसेच संपूर्ण दुनिया नरकवासी आहे; मग स्वर्गवासी कशी बनू शकते, ते बाबा समजावून सांगतात. बाबा म्हणतात - मीच येऊन सर्व मुलांना स्वर्गवासी बनवितो. तुम्हाला देखील समजते की, खरोखरच आपण नरकवासी होतो. कलियुगाला नरक म्हटले जाते. आता नरकाचा देखील अंत होणार आहे. भारतवासी या वेळी रौरव नरकामध्ये पडले आहेत, याला सावरेन्टी (साम्राज्य) देखील म्हणता येणार नाही. भांडण-तंटे करत राहतात. आता बाबा स्वर्गामध्ये घेऊन जाण्याच्या लायक बनवत आहेत, तर त्यांचे म्हणणे मानले पाहिजे. आपल्या धर्म-शास्त्राला सुद्धा जाणत नाहीत, बाबांनाच जाणत नाहीत.

बाबा म्हणतात – मी तुम्हाला पतितापासून पावन बनवले होते; श्रीकृष्णाने नाही. श्रीकृष्ण तर नंबर वन पावन होता. त्याला म्हणतात देखील - श्याम-सुंदर. श्रीकृष्णाची आत्मा पुनर्जन्म घेत-घेत आता श्याम (काळी) बनली आहे. काम-चितेवर बसून काळे बनले आहेत. जगत-अंबेला काळी का दाखवतात? हे कोणीच जाणत नाहीत. जसे श्रीकृष्णाला काळे दाखवले आहे तसे जगत-अंबेला देखील काळे दाखवतात. आता तुम्ही काळे आहात मग पुन्हा सुंदर बनता. तुम्ही समजावून सांगू शकता भारत खूप सुंदर होता. सुंदरता पाहायची असेल तर अजमेरमध्ये (सोन्याची द्वारका) पाहा. स्वर्गामध्ये सोन्या-हिऱ्याचे महाल होते. आता तर दगड-विटांचे आहेत, सर्व काही तमोप्रधान आहे. तर मुले जाणतात - शिवबाबा, ब्रह्मा दादा दोघेही एकत्र आहेत, म्हणून म्हणतात - बाप-दादा. वारसा शिवबाबांकडून मिळतो. जर दादांकडून म्हटले तर मग शिवाकडे काय आहे? वारसा शिवबाबांकडून मिळतो, ब्रह्मा द्वारे. ब्रह्मा द्वारे विष्णुपुरीची स्थापना. आता तर रावण राज्य आहे तुमच्याशिवाय सर्व नरकवासी आहेत. तुम्ही आता संगमावर आहात. आता पतितापासून पावन बनत आहात नंतर मग विश्वाचे मालक बनाल. हे कोणी मनुष्य शिकवत नाही. तुम्हाला मुरली कोण ऐकवतात? शिवबाबा. जुनी दुनिया, जुन्या शरीरामध्ये, परमधामहून येतात. कोणाला हा निश्चय झाला, तर तो बाबांना भेटल्याशिवाय राहूच शकणार नाही. म्हणेल, पहिले त्या बेहदच्या बाबांना तर भेटू द्या, थांबूच शकणार नाहीत. म्हणतील, बेहदचे बाबा, जे स्वर्गाचा मालक बनवतात, त्यांच्याकडे आम्हाला त्वरित घेऊन चला. बघूया तरी, शिवबाबांचा रथ कोणता आहे! ते लोक सुद्धा घोड्याला सजवतात, निशाणी म्हणून पटका ठेवतात. तो रथ होता मुहम्मदचा, ज्याने धर्म स्थापना केला. भारतवासी मग नंदीला टिळा लावून मंदिरामध्ये ठेवतात. समजतात, यावर ‘शिवबाबा’ स्वार झाले होते. आता नंदीवर ना शिव स्वार झाले, ना शंकर स्वार झाले. अजिबात समजत नाहीत. शिव निराकार आहेत, ते कसे स्वार होतील? नंदीवर बसण्यासाठी पाय हवेत. ही आहे अंधश्रद्धा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांकडून जे ज्ञान-अमृत मिळते, त्या अमृताला प्यायचे आहे आणि पाजायचे आहे. पुजारी पासून पूज्य बनण्यासाठी विकारांचा त्याग करायचा आहे.

२) बाबा जे स्वर्गामध्ये जाण्यायोग्य बनवत आहेत, त्यांची प्रत्येक गोष्ट मानायची आहे, पूर्ण निश्चयबुद्धी बनायचे आहे.

वरदान:-
अनुभवाच्या विल-पॉवर द्वारे (इच्छाशक्ती द्वारे) मायेच्या शक्तीशी सामना करणारे अनुभवीमूर्त भव

सर्वात पॉवरफुल स्टेज आहे स्वतःचा अनुभव. अनुभवी आत्मा आपल्या अनुभवाच्या विल-पॉवरद्वारे (इच्छा शक्तीद्वारे) मायेच्या कोणत्याही शक्ती सोबत, सर्व गोष्टींसोबत, सर्व समस्यांसोबत सहजच सामना करू शकते आणि सर्व आत्म्यांना संतुष्ट देखील करू शकते. सामना करण्याच्या शक्तीद्वारे सर्वांना संतुष्ट करण्याची शक्ती अनुभवाच्या विल-पॉवरने (इच्छा शक्तीने) सहज प्राप्त होते, म्हणून प्रत्येक खजिन्याला अनुभवामध्ये आणून अनुभवीमूर्त बना.

बोधवाक्य:-
दुसऱ्यांकडे बघण्याऐवजी स्वतःकडे बघा आणि परिवर्तन करा.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

स्वतःला चेक करा प्रत्येक शक्तीचा, प्रत्येक प्राप्तीचा, प्रत्येक गुणाचा अनुभव आहे का? जर अनुभवाची ऑथॉरिटी असेल तर कोणतीही परिस्थिती अनुभवाच्या ऑथॉरिटी समोर अजिबात प्रभाव पाडू शकत नाही. अनुभवी मूर्त कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये अचल, अडोल राहतात. अशांतीमध्ये येत नाहीत कारण सर्वात मोठी ऑथॉरिटी अनुभव आहे. ज्या वेळी ज्या शक्तीचे आवाहन कराल ती सेकंदामध्ये सहयोगी बनेल.