13-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - रक्षाबंधनाचा सण प्रतिज्ञा करण्याचा सण आहे, जो संगमयुगापासूनच सुरू होतो, आता तुम्ही पवित्र बनण्याची आणि बनविण्याची प्रतिज्ञा करता”

प्रश्न:-
तुमची सर्व कार्ये कोणत्या आधारावर यशस्वी होऊ शकतात? नाव मोठे कसे होईल?

उत्तर:-
ज्ञानबळा सोबत योगाचे सुद्धा बळ असेल तर सर्व कार्ये स्वतःहून करण्यासाठी तयार होतील. योग अतिशय गुप्त आहे याद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. योगामध्ये राहून समजावून सांगाल तर वृत्तपत्रवाले स्वतःहून तुमचा संदेश छापतील. वृत्तपत्रांद्वारेच नाव मोठे होणार आहे, या द्वारेच अनेकांना संदेश मिळेल.

ओम शांती।
आज मुलांना रक्षाबंधना विषयी समजावून सांगत आहेत कारण आता जवळ आले आहे. मुले राखी बांधण्यासाठी जातात. आता जी गोष्ट होऊन जाते तिचा उत्सव साजरा करतात. हे तर मुलांना माहीत आहे आजपासून ५ हजार वर्षांपूर्वीसुद्धा हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले होते, ज्याला बरीच नावे दिली गेली आहेत. ही आहे पवित्रतेची खूण. सर्वांना सांगावे लागते पवित्र बनण्याची राखी बांधा. हे सुद्धा जाणता की पवित्र दुनिया सतयुग आदिमध्येच (सुरवातीलाच) असते. या पुरुषोत्तम संगमयुगातच राखी उत्सव सुरू होतो, जो नंतर साजरा केला जाणार जेव्हा भक्ती सुरू होईल, याला म्हटले जाते अनादि सण. तो सुद्धा केव्हापासून सुरू होतो? भक्तीमार्गापासून; कारण सतयुगामध्ये तर हे सण इत्यादी असतच नाहीत. हे होतातच इथे. सर्व सण-उत्सव इत्यादी संगमयुगावर असतात, तेच मग भक्तीमार्गापासून सुरू होतात. सतयुगामध्ये कोणताही सण असत नाही. तुम्ही विचाराल दीपावली असेल? नाही. ती सुद्धा इथेच साजरी करतात, दीपावली तिथे साजरी करू नये. जे सण इथे साजरे करतात ते तिथे साजरे करू शकत नाही. हे सर्व कलियुगातील सण आहेत. रक्षाबंधन साजरे करतात, आता हे कसे कळणार की हे रक्षाबंधन कशासाठी साजरे केले जाते? तुम्ही सर्वांना राखी बांधता, म्हणता, ‘पावन बना, कारण आता पावन दुनिया स्थापन होत आहे’. त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये देखील लिहिलेले आहे - ‘ब्रह्मा द्वारे पावन दुनियेची स्थापना होते’, म्हणून पवित्र बनविण्यासाठी रक्षाबंधन साजरे केले जाते. आता आहे ज्ञानमार्गाची वेळ. तुम्हा मुलांना समजावून सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला भक्तीची कोणतीही गोष्ट कोणी सांगितली तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे - ‘आम्ही आता ज्ञानमार्गामध्ये आहोत’. ज्ञानसागर एक भगवानच आहेत, जे साऱ्या दुनियेला पावन बनवतात. भारत पावन होता तेव्हा सारी दुनिया पावन होती. भारताला पावन बनविल्याने सारी दुनिया पावन होते. भारताला काही दुनिया म्हणणार नाही. भारत तर या दुनियेतील एक खंड आहे. मुले जाणतात नवीन दुनियेमध्ये फक्त एक भारत खंड असतो. भारत खंडामध्ये नक्की मनुष्य सुद्धा राहत असतील. भारत सचखंड होता, सृष्टीच्या आदिला (सुरुवातीला) देवता धर्मच होता, त्यालाच म्हटले जाते निर्विकारी पवित्र धर्म, ज्याला ५ हजार वर्षे झाली. आता या जुन्या दुनियेचे थोडेच दिवस बाकी आहेत. पावन बनण्यासाठी किती दिवस लागतात? वेळ तर लागतो. इथे सुद्धा पवित्र बनण्याचा पुरुषार्थ करतात. सर्वात मोठा उत्सव तर हा आहे. प्रतिज्ञा केली पाहिजे - ‘बाबा, आम्ही पवित्र तर जरूर बनणार’. हा उत्सव सर्वात मोठा समजला पाहिजे. सर्वजण बोलावतात देखील - ‘हे परमपिता परमात्मा’, असे म्हणत असताना सुद्धा ‘परमपिता’ बुद्धीत येत नाही. तुम्ही जाणता परमपिता परमात्मा येतात जीव-आत्म्यांना ज्ञान देण्यासाठी. ‘आत्मा-परमात्मा अलग रहे बहुकाल…’. हा मेळावा या संगमयुगावरच होतो. याला कुंभमेळासुद्धा म्हटले जाते, जो दर ५ हजार वर्षांनी एकदा असतो. तो पाण्यामध्ये स्नान करण्याचा मेळावा तर अनेक वेळा साजरा करत आले आहात, तो आहे भक्तीमार्ग. हा आहे ज्ञानमार्ग. संगमाला देखील कुंभ म्हटले जाते. वास्तविक तीन नद्या काही नाही आहेत, पाण्याची गुप्त नदी कशी असू शकते! बाबा म्हणतात - ‘तुमची ही गीता गुप्त आहे’. तर समजावून सांगितले जाते की, तुम्ही योगबलाने विश्वाची बादशाही घेता, यामध्ये नाच-तमाशा इत्यादी काहीही नाहीये. तो भक्तीमार्ग पूर्ण अर्धाकल्प चालतो आणि हे ज्ञान चालते एक जन्म. मग दोन युगे आहे ज्ञानाचे प्रारब्ध, ज्ञान चालत नाही. भक्ती तर द्वापर-कलियुगापासून चालत आली आहे. ज्ञान फक्त एकदाच मिळते मग त्याचे प्रारब्ध २१ जन्म चालते. आता तुमचे डोळे उघडले आहेत. आधी तुम्ही अज्ञानाच्या झोपेमध्ये होता. आता रक्षाबंधनाला ब्राह्मण लोक राखी बांधतात. तुम्ही देखील ब्राह्मण आहात. ते आहेत कुख वंशावली, तुम्ही आहात मुख वंशावली. भक्तीमार्गामध्ये किती अंधश्रद्धा आहे. दलदलीमध्ये अडकले आहेत. दलदलीमध्ये पाय अडकून पडतात ना. तर भक्तीच्या दलदलीमध्ये मनुष्य अडकतात आणि एकदम गळ्यापर्यंत खोल जातात, आणि जेव्हा शेंडी बाकी राहते तेव्हा मग बाबा वाचविण्यासाठी येतात; पकडण्यासाठी काही तरी पाहिजे ना? मुले समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत करतात. करोडोंनी मनुष्य आहेत, प्रत्येकाकडे जाण्यासाठी कष्ट पडतात. तुमची बदनामी वर्तमानपत्रातून झाली आहे की, ‘हे पळवून नेतात, घर-दार सोडायला लावतात, भाऊ-बहीण बनवतात’. सुरवातीची गोष्ट किती फैलावली. वृत्तपत्रांमध्ये गदारोळ माजला. आता प्रत्येकाला तर समजावून सांगू शकत नाही. नंतर तुम्हाला वृत्तपत्रेच उपयोगी पडतील. वृत्तपत्रांमुळेच तुमचे नाव प्रसिद्ध होईल. आता विचार करायचा आहे की, असे काय करावे जेणेकरून व्यवस्थित समजतील. रक्षाबंधनाचा अर्थ काय आहे? तर आता बाबा आले आहेत पावन बनविण्यासाठी, त्यामुळे बाबांनी मुलांकडून पवित्रतेची प्रतिज्ञा करून घेतली आहे. पतितांना पावन बनविणाऱ्याने राखी बांधली आहे.

श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात तर जरूर राजसिंहासनावर बसला असेल. राज्याभिषेक कधी दाखवत नाहीत. सतयुगाच्या सुरुवातीला लक्ष्मी-नारायण होते. त्यांचा राज्याभिषेक झाला असेल. राजकुमाराचा जन्मदिन साजरा करतात मग राज्याभिषेक कुठे आहे? दीपावलीला राज्याभिषेक होतो, फार मोठा थाट-माट असतो, तो आहे सतयुगाचा. संगमयुगामध्ये जी गोष्ट आहे ती तिथे नसते. घरा-घरात प्रकाश इथेच होणार आहे. तिथे (सतयुगामध्ये) दीपावली इत्यादी साजरी करत नाहीत. तिथे तर आत्म्यांची ज्योत जागृत असते. तिथे मग राज्याभिषेक साजरा केला जातो, दीपावली नाही. जोपर्यंत आत्म्यांची ज्योत जागृत होत नाही तोपर्यंत परत जाऊ शकत नाही. आणि आता हे तर सर्व पतित आहेत, त्यांना पावन बनविण्यासाठी विचार करायचा आहे. मुले विचार करून मोठ-मोठ्या व्यक्तींकडे जातात. मुलांची बदनामी झाली वृत्तपत्रांद्वारे, तर नाव देखील यांच्याद्वारेच होईल. थोडे पैसे दिले तर चांगले छापतील. आता तुम्ही पैसे किती म्हणून देणार. पैसे देणे सुद्धा लाच आहे. बेकायदेशीर आहे. आजकाल तर लाच दिल्याशिवाय कामच होत नाही. तुम्ही सुद्धा लाच दिली, त्यांनी सुद्धा लाच दिली तर दोघे एकसारखेच होतील. तुमची गोष्ट आहे योगबलाची. योगबल इतके पाहिजे की तुम्ही कोणाकडूनही काम करून घेऊ शकाल. भूँ-भूँ करत रहायचे आहे. ज्ञानाचे बळ तर तुमच्यामध्ये देखील आहे. हि चित्रे इत्यादीं मध्ये ज्ञान आहे, योग गुप्त आहे. बेहदचा वारसा घेण्यासाठी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. ते आहेतच गुप्त, ज्यांच्यामुळे तुम्ही विश्वाचे मालक बनता, कुठेही बसून तुम्ही आठवण करू शकता. फक्त इथे बसून योग लावायचा नाहीये. ज्ञान आणि आठवण दोन्ही सोपे आहेत. फक्त ७ दिवसांचा कोर्स केला, बस्स. जास्त आवश्यकताच नाही. मग तुम्ही जाऊन इतरांना आप समान बनवा. बाबा ज्ञानाचा, शांतीचा सागर आहेत. या दोन गोष्टी मुख्य आहेत. यांच्याकडून तुम्ही शांतीचा वारसा घेत आहात. आठवण देखील अति सूक्ष्म आहे.

तुम्ही मुले भले बाहेर फिरा, परंतु बाबांची आठवण करा. पवित्र बनायचे आहे, दैवी गुणसुद्धा धारण करायचे आहेत. कोणताही अवगुण असता कामा नये. काम विकार हा देखील खूप मोठा अवगुण आहे. बाबा म्हणतात - ‘आता तुम्ही पतित बनू नका. भले पत्नी समोर असेल, तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. दिसत असतानाही पाहू नका’. आम्ही तर आमच्या बाबांची आठवण करतो, ते ज्ञानाचा सागर आहेत. तुम्हाला आप समान बनवतात तर तुम्ही देखील ज्ञानाचा सागर बनता. यामध्ये गोंधळून जाता कामा नये. ते आहेत परम आत्मा. परमधाममध्ये राहतात म्हणून ‘परम’ म्हटले जाते. तिथे तर तुम्ही सुद्धा राहता. आता नंबरवार पुरुषार्थानुसार तुम्ही ज्ञान घेत आहात. जे पास विद ऑनर होतात त्यांना म्हणणार - पूर्ण ज्ञान सागर बनले आहेत. बाबा देखील ज्ञान सागर, तुम्ही देखील ज्ञान सागर. आत्मा काही छोटी-मोठी असत नाही. परमपिता देखील काही आकाराने मोठे असत नाहीत. हे जे म्हणतात, ‘हजारो सूर्यांपेक्षा तेजोमय आहेत’ या सर्व थापा आहेत. बुद्धीने ज्या रूपामध्ये आठवण करतात, त्याचा साक्षात्कार होतो. यासाठी समज आवश्यक आहे. आत्म्याचा साक्षात्कार किंवा परमात्म्याचा साक्षात्कार, गोष्ट एकच होईल. बाबांनी जाणीव करून दिलेली आहे - मीच पतित-पावन, ज्ञानाचा सागर आहे. ठरलेल्या वेळी येऊन सर्वांची सद्गती करतो. सर्वात जास्त भक्ती तुम्ही केली आहे मग बाबा तुम्हालाच शिकवतात. रक्षाबंधनाच्या नंतर कृष्ण जन्माष्टमी असते. त्यानंतर मग आहे दसरा. खरे तर दसऱ्याच्या आधी तर कृष्ण येऊ शकत नाही. दसरा आधी झाला पाहिजे, आणि मग कृष्ण आला पाहिजे. हा हिशोब सुद्धा तुम्ही काढाल. आधी तर तुम्हाला काहीच समजत नव्हते. आता बाबा किती हुशार बनवतात. टीचर हुशार बनवतात ना. आता तुम्ही जाणता की भगवान बिंदूस्वरूप आहेत. केवढे मोठे झाड आहे. आत्मे वरती बिंदू रूपामध्ये राहतात. गोड-गोड मुलांना समजावून सांगितले जाते, खरे तर एका सेकंदात हुशार बनले पाहिजे. परंतु असे पत्थर बुद्धी आहेत की समजतच नाहीत. नाही तर आहे एका सेकंदाची गोष्ट. हदचे पिता तर जन्म-जन्मांतर नवीन मिळतात. हे बेहदचे बाबा तर एकदाच येऊन २१ जन्मांचा वारसा देतात. आता तुम्ही बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहात. आयुष्य देखील वाढते. असे देखील नाही की, २१ जन्म एकच पिता असेल. नाही, तुमचे आयुर्मान मोठे होते. तुम्ही कधी दुःख बघणार नाही. नंतर तुमच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान राहील. बाबांची आठवण करायची आहे आणि वारसा घ्यायचा आहे. बस्स, बाळ जन्माला आले आणि वारसदार बनले. बाबांना जाणले तर बस्स बाबा आणि वारशाची आठवण करा, पवित्र बना. दैवी गुण धारण करा. बाबा आणि वारसा किती सोपे आहे. एम ऑब्जेक्ट सुद्धा समोर आहे.

आता मुलांनी विचार करायचा आहे - आपण लोकांना वृत्तपत्रांद्वारे कसे समजावून सांगावे. त्रिमूर्तीचे चित्र सुद्धा छापावे लागेल; कारण समजावून सांगताना ‘ब्रह्मा द्वारे स्थापना’ असे सांगितले जाते. ब्राह्मणांना पावन बनविण्यासाठी बाबा आले आहेत म्हणून राखी बांधायला लावतात. पतित-पावन बाबा, भारताला पावन बनवत आहेत, प्रत्येकाला पावन बनायचे आहे कारण आता पावन दुनिया स्थापन होत आहे. आता तुमचे ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. ज्यांनी जास्त जन्म घेतले असतील ते चांगल्या प्रकारे समजतील. नंतर येणाऱ्यांना इतका आनंद होणार नाही कारण भक्ती कमी केली आहे. भक्तीचे फळ देण्यासाठी बाबा येतात. भक्ती कोणी जास्त केली आहे हे देखील आता तुम्ही जाणता. पहिल्या नंबरला तुम्हीच आले आहात, तुम्हीच अव्यभिचारी भक्ती केली आहे. तुम्ही देखील स्वतःला विचारा की, ‘मी जास्त भक्ती केली आहे की या ब्रह्माने?’ जे सर्वात शक्तीशाली सेवा करतात नक्कीच त्यांनी जास्त भक्तीसुद्धा केली आहे. बाबा नावे तर लिहितात - कुमारका आहे, जनक आहे, मनोहर आहे, गुलजार आहे. नंबरवार तर असतात. इथे नंबरानुसार बसवू शकत नाही. तर विचार करायचा आहे - रक्षाबंधन बद्दल वर्तमानपत्रामध्ये काय-काय लिहावे. ते तर ठीक आहे, मंत्री इत्यादींकडे जातात, राखी बांधतात, परंतु पवित्र तर बनत नाहीत. तुम्ही म्हणता - ‘पवित्र बना तर पवित्र दुनिया स्थापन होईल. ६३ जन्म विकारी बनलात, आता बाबा सांगत आहेत हा शेवटचा जन्म पवित्र बना. ईश्वराची आठवण करा तर तुमच्या डोक्यावर जी पापे आहेत ती नष्ट होतील’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पास विद ऑनर होण्यासाठी बाप समान ज्ञान सागर बनायचे आहे. आतमध्ये कोणताही अवगुण असेल तर त्याला तपासून काढून टाकायचा आहे. शरीराकडे बघत असताना देखील न बघता, आत्मा निश्चय करून आत्म्याशी बोलायचे आहे.

२) योगबल इतके जमा करायचे आहे की आपले प्रत्येक काम सोपे होईल. वृत्तपत्रांद्वारे प्रत्येकाला पावन बनण्याचा संदेश द्यायचा आहे. आप समान बनविण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
देह-भानाला देही-अभिमानी स्थितीमध्ये परिवर्तन करणारे बेहदचे वैरागी भव

चालता-चालता जर वैराग्य भंग होत असेल तर त्याचे मुख्य कारण आहे - देह-भान. जोपर्यंत देह-भानाचे वैराग्य येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी बद्दलचे वैराग्य कायमचे टिकू शकणार नाही. नातेसंबंधांपासून वैराग्य - ही काही मोठी गोष्ट नाहीये, ते तर दुनियेमध्ये सुद्धा कितीतरीजणांना वैराग्य येते परंतु इथे देह-भानाची जी वेगवेगळी रूपे आहेत, त्यांना समजून घेऊन, देह-भानाला देही-अभिमानी स्थितीमध्ये परिवर्तन करणे - ही आहे बेहदचे वैरागी बनण्याची विधी.

बोधवाक्य:-
संकल्परूपी पाय मजबूत असेल तर काळ्या ढगांसारख्या गोष्टींचे देखील परिवर्तन होईल.