13-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, तुम्ही
बाबांकडे आला आहात आपले जीवन हिऱ्या समान बनविण्याकरिता, बाबांच्या आठवणीद्वारेच असे
जीवन बनेल”
प्रश्न:-
नवीन
दुनियेमध्ये उच्च पद मिळविण्याकरिता कोणता एक मुख्य पुरुषार्थ करायचा आहे?
उत्तर:-
बाबा म्हणतात
- गोड मुलांनो, ज्या जुन्या नातेवाईकांनी तुम्हाला इतके दुःखी केले, आता त्यांच्या
मोहाच्या जाळ्यातून बुद्धीला काढून फक्त माझी एकाची आठवण करा. त्यांच्या सोबत राहत
असतानाही मन माझ्यामध्ये लावा. मनमनाभवचा मंत्र सदैव आठवणीत ठेवा, तर तुम्ही नवीन
दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त कराल.
गीत:-
तूने रात
गँवाई…
ओम शांती।
जसे मुलांना
सर्व शास्त्रांचे सार समजावून सांगतात, तसेच या गाण्यांचे देखील सार तुम्हाला
समजावून सांगतात. तेच सर्वांचे रुहानी बाबा, रुहानी मुलांना ब्रह्मा तना द्वारे
बसून समजावून सांगत आहेत. बाबा म्हणतात - ‘हे मुलांनो, तुम्ही जाणता आपला जन्म
हिऱ्या समान बनत आहे’. बाबांकडे तुम्ही येताच मुळी हिऱ्या समान जन्म बनविण्याकरिता.
हिऱ्या समान जन्म म्हटला जातो - स्वर्गवासीयांचा. कवडी समान जन्म आहे नरकवासीयांचा.
तुम्ही संगमयुगाला देखील जाणले आहे. आपण आता संगमयुगवासी आहोत. हे संगमयुग
सर्वांसाठी कल्याणकारी आहे. या संगमयुगामध्येच सर्वांची गती-सद्गती होते. कोण करतात?
परमधामहून येणारा मुसाफिर (प्रवासी). तो प्रवासी आहे ना. तुम्ही काही प्रवासी नाहीत,
तुम्ही येऊन परत जात नाहीत. बाबा म्हणतात - ‘जुन्या दुनियेमध्ये येऊन मग निघून जातो’.
मुले जाणतात - सेवा करणारे फक्त हेच एक प्रवासी आहेत, जे येऊन आम्हा मुलांची खूप
मोठी सेवा करतात. अशी सेवा दुसरा कोणी करू देखील शकणार नाही. सेवेसाठीच बोलावतात
की, येऊन आम्हा पतितांची सेवा करा. बाबा देखील म्हणतात, मी मुलांच्या सेवेसाठी आलो
आहे कारण मुले खूप दुःखी आहेत. बोलावतात देखील - आमचे दुःख दूर करा आणि शांती द्या.
दोन गोष्टी नेहमी लक्षात राहतात - सुख आणि शांती. इथे दुःख आणि अशांती आहे, तेव्हाच
तर बोलावतात. बाबाच येऊन सृष्टी चक्राचे संपूर्ण रहस्य मुलांना समजावून सांगतात.
मुले समजतात - आता भक्तिमार्ग संपणार आहे. कलियुगाचा अंत अर्थात भक्ती खाली उतरत
येते. ज्ञानाद्वारे तुमची चढती कला होते. तुम्ही उच्च ते उच्च पद प्राप्त करता,
हळू-हळू मग त्या प्रारब्धाचे सुख कमी होत जाते. भारतामध्ये जितकी भक्ती केली जाते,
तितकी इतर कुठेच नाही. अर्धा कल्प भक्ती चालते. जेव्हा पासून द्वापर सुरू होते आणि
इतर धर्म स्थापन होण्यास सुरुवात होते, तेव्हा पासून भक्ती सुरू होते. भक्ती देखील
सुरुवातीला खूप चांगली असते. जसे स्वर्ग सुरुवातीला खूप चांगला असतो नंतर मग हळू-हळू
कला कमी होत जातात. भक्ती सुरू होते तेव्हा सर्वप्रथम ‘शिव’चे पुजारी बनतात. अर्धे
कल्प कोणतीही पूजा केली जात नाही. त्यानंतर मग भक्तिमार्ग सुरू होतो आणि इतर धर्म
देखील सुरू होतात. इतकी भक्ती इतर कोणीही करू शकत नाही, पूर्ण अर्धा कल्प भक्ती
चालते. हे देखील तुम्ही मुलेच जाणता की बाबा, जे सर्वांना आणि खास भारताला सद्गती
देतात, स्वर्गाचा मालक बनवतात, तेच दूर देशाचे प्रवासी, आम्हा मुलांना पुन्हा
स्वर्गाची बादशाही देण्याकरिता आलेले आहेत. वारसा देखील किती जबरदस्त आहे. परंतु
एकही गोष्ट कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही. भारतामध्ये किती भक्ती करतात. किती
मंदिरे आहेत. भारत खंडामध्ये तर असंख्य मंदिरे आहेत. आता तुम्ही जाणता ही कोणाची
मंदिरे आहेत. सर्वप्रथम तर शिवबाबांचे मंदिर बनते, नंतर मग देवतांची बनतात. ती
मंदिरे देखील तुमच्या समोर उभी आहेत. एका बाजूला शिवबाबांची पूजा करत राहतात,
दुसऱ्या बाजूला शिवबाबा तुम्हाला पूज्य बनवत आहेत. तुम्ही इथे पूज्य देवता
बनण्याकरिता आले आहात. जे पण देवतांचे पुजारी आहेत - वास्तविक ते देखील इथे येऊन
ब्राह्मण बनतील. हळू-हळू वृद्धी होत जाईल. सर्वजण एकत्र तर शिकू शकणार नाहीत. वेळ
लागतो. कल्पापूर्वी देखील जे शिकले असतील तेच पुन्हा शिकतील. एकमेकांना शिकवत
राहायचे आहे. सर्वांना बाबा आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकवतात; ज्यामुळे
मनुष्य, स्वर्गाचे मालक बनू शकतात. तर येऊन समजून घ्या. तुम्हा मुलांच्या बुद्धी
मध्ये आहे की हे नाटक कसे फिरते. कहाणी काही लाखो वर्षांची तर सांगू शकत नाही.
तुम्ही जाणता ५ हजार वर्षांपूर्वी काय होते, कोणाचे राज्य होते! भारतामध्ये आम्हा
पूज्य देवी-देवतांचे राज्य होते. आठवले ना, आपण पूज्य होतो, मग पुजारी बनलो.
यापूर्वी हे माहीत नव्हते की, आपणच पूज्य देवता होतो, आणि मग आपणच ८४ जन्म घेतले.
८४ जन्मांची कहाणी लक्ष्मी-नारायणाची आहे. तुम्ही आपल्या ८४ जन्मांची कहाणी ऐकवता.
त्यांना (दुनियेतील लोकांना) तर त्यांची कहाणी (आत्मचरित्र) लिहिण्यासाठी खूप वेळ
लागतो. तुम्ही एका मिनिटामध्ये ८४ जन्मांची कथा सांगू शकता. ते तर एकाच जन्माची
कहाणी लिहितात. बालपणी काय-काय केले, ती देखील आपली कहाणी सांगतात. आपण ८४ चे चक्र
कसे फिरतो. ही गोष्ट तर एकाचीच नाही आहे, भरपूर ब्राह्मण आहेत. तुम्हीच या चक्राला
जाणता. या चक्राला जाणल्याने तुम्ही राजा-राणी बनता आणि मग इतरांना देखील बनवता.
भक्ती देखील भारतवासीयां सारखी इतर कोणीही करत नाहीत. आणि जे काही मठ-पंथ, धर्म
इत्यादी आहेत, ते आपल्या भक्तीच्या वेळी स्थापन होतात. सर्वात पहिले आपले फुलांचे
झाड किती छोटे होते, रुहानी गार्डन होते. तुम्ही चैतन्य फूल होता. याला म्हटले जाते
- फुलांचा बगीचा. नंतर मग तोच काट्यांचा बगीचा बनतो. यावेळी सर्व काटे बनले आहेत.
मग काट्यांपासून फूल कसे बनायचे, ते बाबा बसून समजावून सांगतात. एकमेकांना दुःख देणे
म्हणजे काटा लावणे आहे. स्टुडंट लाईफ इज द बेस्ट (विद्यार्थी जीवन हे सर्वोत्तम
जीवन आहे) असे म्हटले जाते. ते खूप उत्तम जीवन असते. मुले-मुली खूप आनंदाने शिकत
राहतात. लग्न झाले आणि एकमेकांना काटा लावणे सुरू केले. सतयुगामध्ये कोणीही काटा
लावत नाही. आता तुम्ही पुन्हा फूल बनत आहात. तुम्ही जाणता भारत स्वर्ग होता तेव्हा
किती अपार सुख होते. सोन्याच्या खाणी होत्या. आता त्या रिकाम्या झाल्या आहेत. नंतर
तिथे मग तुम्हाला भरपूर सोने मिळेल. भारतामध्येच सोने, हिरे, माणकांच्या खाणी होत्या.
त्या काळात अमेरिका इत्यादी काहीही नसते. बॉम्बे सुद्धा नसते. वंडर आहे ना.
कलियुगाच्या अंताला कुठेही सोने दिसत सुद्धा नाही; आता पुन्हा सतयुगाच्या सुरुवातीला
सोन्याच्या खाणी इतक्या भरपूर होतात की सोन्याचे महाल बनवले जातात. वंडर आहे ना.
तिथे खाणींमधून किती प्रचंड प्रमाणात सोने काढतात. जशा इथे मातीच्या विटा बनतात, तशा
तिथे सोन्याच्या विटा बनतात. माया मच्छंदरचा खेळ दाखवतात ना. ध्यानामध्ये पाहिले,
इथे तर सोनेच सोने आहे. खरोखर सतयुगामध्ये सोने असेल. इथे तर बघा मातीच्या विटा
सुद्धा मिळत नाहीत. इथे जितक्या किमतीत विटा मिळतात, तितक्या तिथे सोन्याच्या विटा
मोफत मिळतात. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तर मग नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त
करण्याचा पुरुषार्थ का करू नये! इथे मोहाच्या जाळ्यात कशाला अडकवून घ्यावे!
बाबा म्हणतात - जुन्या
नात्यांमध्ये तुम्ही किती दुःख सहन करता! बाबा असे म्हणत नाहीत की, यांना सोडून द्या.
फक्त बुद्धियोग एका बाबांसोबत लावा तर तुम्ही विश्वाचे मालक बनाल. मनमनाभवचा अर्थच
आहे - माझी आठवण करा आणि विष्णू चतुर्भुजची अर्थात विष्णुपुरीची आठवण करा. मूळ आहेच
एक शब्द. भक्तिमार्गामध्ये तर खूप उचापती आहेत. तुम्ही आता सर्व आत्मे एक माशूक
परमपिता परमात्म्याचे आशिक आहात. ते तुम्हाला सुखधामचा मालक बनवत आहेत. सर्व आत्मे
त्यांची आठवण करतात. तुम्ही एकदाच रुहानी माशूकचे, रुहानी आशिक बनता. बाकी तर सर्व
मनुष्य दैहिक आशिक-माशूक आहेत. आता बेहदच्या आशिकांना बेहदचे माशूक येऊन भेटले आहेत.
त्यांना म्हणतात देखील - ‘या, येऊन आम्हाला पतिता पासून पावन बनवा’. त्या एकालाच
बोलावत असतात. तुम्ही जाणता आपली आत्मा पतित बनली आहे म्हणून बोलावतात - ‘पतित-पावन
या’. कुंभमेळा भरतो, तर कित्येकजण तिथे जाऊन गंगा स्नान करतात. फायदा काहीच नाही.
कोणीही पावन बनत नाही. आता बाबा येऊन ज्ञान-वर्षा करत आहेत. तुमच्या वर ज्ञानाची
वर्षा होत आहे, ज्यामुळे मग काट्यांचे जंगल फुलांचा बगीचा बनेल.
तुम्ही जाणता - आपले
जेव्हा राज्य असेल तेव्हा तिथे कोणीही पतित असणारच नाही. साऱ्या विश्वावर
ज्ञान-वर्षा होते. सर्व काही हिरवेगार होते. हिरे-माणकांच्या नवीन खाणी तयार होतात.
आता तुम्हा मुलांना किती आनंदात राहीले पाहिजे. सन्मुख पाहता, बेहदचे बाबा बसून
समजावून सांगत आहेत की, तुम्ही माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. भले
तुम्ही कुठेही बसा - स्नान करा, बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहावी. तेव्हा तर आठवण
करण्यासाठी वेळ मिळतो. बाबांची जितकी आठवण कराल तितकी कमाई आहे. आठवणीनेच कमाई होते.
असे कधी ऐकले आहे का की, आठवणीने कमाई होते! किती मोठी कमाई आहे, तुम्ही
विष्णुपुरीचे मालक बनाल. तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांचे पिता निराकार आहेत. त्यांनी
या शरीराचा आधार घेतला आहे. ‘भागीरथ’चे देखील वर्णन आहे ना. भाग्यशाली रथ, ज्या
रथावर परमपिता परम-आत्मा स्वार होतात. आत्म्याचा रथ (गर्भ) जेव्हा तयार होतो तर
ताबडतोब आत्मा येऊन प्रवेश करते. बाबांना तर या रथामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) येऊन
फक्त नॉलेज द्यायचे आहे. यांच्या देखील अनेक जन्मांतील अंतिम जन्मामध्ये, जेव्हा
वानप्रस्थ अवस्था असते, तेव्हा बाबा सांगतात - मी येऊन यांच्यामध्ये प्रवेश करतो
अथवा या रथामध्ये विराजमान होतो. बाकी कोणत्या घोडा-गाडीच्या रथाची गोष्ट नाहीये.
आता तुम्हाला हे ज्ञान मिळाले आहे. बाबा सन्मुख बसून तुम्हा मुलांना समजावून सांगत
आहेत. तुम्हाला तर खूप आनंद झाला पाहिजे. आय. सी. एस. ची परीक्षा अभ्यास करतात
तेव्हा खूप अभिमान वाटत असतो. ती सर्वात मोठी परीक्षा असते. तुमचे देखील हे शिक्षणच
आहे. ही भगवंताची पाठशाळा आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, भगवान कोण आहे? ते
श्रीकृष्ण भगवान आहेत की शिवबाबा? सर्वांचा भगवान कोण आहे? सर्वांचा भगवान त्या एका
निराकारा व्यतिरिक्त कोणीच नाही; कारण सगळेच काही श्रीकृष्णाला मानणार नाहीत. सर्व
आत्म्यांचे पिता ते निराकार परमपिता परमात्मा आहेत. ते सदैव परमधाम मध्ये राहतात.
मुलांना स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता एकदाच येतात. तुम्ही जाणता तेच बाबा
कल्प-कल्प येऊन आपल्याला रंका पासून राव बनवतात. भारत आता रंक (गरीब) आहे ना. मग
दुसऱ्या जन्मामध्ये काय बनायचे आहे, तुम्हाला सर्व साक्षात्कार झाले आहेत. विनाशाचा
देखील साक्षात्कार केला आहे. स्थापनेचा देखील केला आहे. भगवानुवाच - मी तुम्हाला
राजांचाही राजा बनवतो. खूप दान-पुण्य केल्याने कोणाला अल्प काळाचे सुख मिळते.
राजांच्या घरी जन्म घेऊन मग लगेच मरून जातात. कोणी गर्भामध्ये सुद्धा मरतात. कोणी
लुळे-लंगडे, काणे बनतात. जसे कर्म करतात तसे पद प्राप्त करतात. आता तुम्हाला तर
राजांचाही राजा बनवतात. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही बलिहार जाणार’. तर जरूर राजाई
देखील तुम्ही प्राप्त कराल. भारताला महादानी खंड म्हटले जाते. इथे दान-पुण्य खूप
करतात. ते मग भक्तिमार्गामध्ये सुरू होते. आता बाबा तुम्हाला २१ जन्मांसाठी दान देत
आहेत. आता तुम्ही बाबांवर बलिहार जाता. तन-मन-धन सर्व काही दिले आहे. आता बाबा
सांगत आहेत - ट्रस्टी होऊन रहा. आपले घरदार सांभाळा. सर्व काही शिवबाबांचे आहे. बाबा
मी तुमचा आहे, तुमचीच आठवण करतो. मनापासून अर्पण करतात. बाबा म्हणतात - भले आलिशान
बंगल्यामध्ये रहा, हिंडा-फिरा, आनंद साजरा करा, फक्त माझी आठवण करा तर तुम्ही खूप
आनंदामध्ये राहाल. तुम्ही विश्वाचे मालक होता. आता पुन्हा तुम्ही पुरुषार्थ करून तसे
बनत आहात. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, या योगबलाद्वारेच तुम्ही
विकर्माजीत बनाल’. बाबांच्या आठवणीद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) राजाई पद
प्राप्त करण्यासाठी बाबांवर पूर्णत: बलिहार जायचे आहे. तन-मन-धन सर्व समर्पण करून
ट्रस्टी होऊन राहायचे आहे. विकर्माजीत बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
२) आठवणीमध्येच कमाई
आहे, म्हणून निरंतर आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. असे रुहानी फूल
बनायचे आहे, जेणेकरून फुलांच्या दुनियेचे अधिकारी बनाल. आतमध्ये कोणताही काटा (विकार)
राहू नये.
वरदान:-
एका बाबांमध्ये
साऱ्या संसाराचा अनुभव करणारे बेहदचे वैरागी भव
बेहदचे वैरागी तेच बनू
शकतात, जे बाबांनाच आपला संसार समजतात. ज्यांचा बाबाच संसार आहेत ते आपल्या
संसारामध्येच राहतील, दुसऱ्यामध्ये जाणारच नाहीत, तर आपोआपच किनारा होईल (दूर व्हाल).
संसारामध्ये व्यक्ती आणि वैभव सर्व काही येते. बाबांची जी संपत्ती तीच आपली संपत्ती
- याच स्मृतीमध्ये राहिल्याने बेहदचे वैरागी बनाल. कोणालाही बघत असतानाही पाहणार
नाही. ते दिसणारच नाहीत.
बोधवाक्य:-
पॉवरफुल
स्थितीचा अनुभव करण्याकरिता एकांत आणि रमणीकतेचा बॅलन्स ठेवा.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
जसे किल्ला बांधला
जातो, ज्यामुळे प्रजा किल्ल्याच्या आत सुरक्षित राहील. एका राजासाठी काही खोली बनवत
नाहीत, किल्ला बनवतात. तुम्ही देखील सर्व स्वतःसाठी, साथीदारांसाठी, इतर
आत्म्यांसाठी ज्वाला-रूप आठवणीचा किल्ला बांधा. आठवणीच्या शक्तीची ज्वाळा असेल तर
प्रत्येक आत्मा सुरक्षिततेचा अनुभव करेल.