13-09-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही सर्व आत्म्यांना कर्मबंधनातून मुक्त करणारे सॅल्वेशन आर्मी (मुक्ती सेना) आहात, तुम्ही आता कर्मबंधनामध्ये अडकायचे नाही”

प्रश्न:-
असा कोणता सराव करत रहाल तर आत्मा खूप शक्तिशाली बनेल?

उत्तर:-
जेव्हापण वेळ मिळेल तेव्हा शरीरापासून डिटॅच (अशरीरी) बनण्याची प्रॅक्टिस करा. डिटॅच झाल्यामुळे आत्म्यामध्ये शक्ती परत येईल, त्यामध्ये बळ भरले जाईल. तुम्ही अंडरग्राउंड मिलेट्री (भूमिगत लष्कर) आहात, तुम्हाला डायरेक्शन मिळते - अटेन्शन प्लिज अर्थात एका बाबांच्याच आठवणीमध्ये रहा, अशरीरी व्हा.

ओम शांती।
‘ओम् शांती’चा अर्थ बाबांनी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितला आहे. जिथे लष्कर उभे असते ते मग म्हणतात - अटेंशन, त्या लोकांचे अटेंशन म्हणजेच सायलेन्स (शांती). इथे सुद्धा तुम्हाला बाबा म्हणतात - अटेंशन, अर्थात एका बाबांच्या आठवणीमध्ये रहा. मुखाने बोलावे लागते, नाहीतर वास्तविक बोलण्यापासून सुद्धा दूर राहिले पाहिजे. अटेंशन, बाबांच्या आठवणीमध्ये आहात? बाबांचे डायरेक्शन अथवा श्रीमत मिळते, तुम्ही आत्म्याला देखील ओळखले आहे आणि बाबांना देखील ओळखले आहे; तर बाबांची आठवण केल्याशिवाय तुम्ही विकर्माजित किंवा सतोप्रधान पवित्र बनू शकत नाही. मूळ गोष्टच ही आहे, बाबा म्हणतात - ‘गोड-गोड लाडक्या मुलांनो! स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’. या सर्व आहेत या वेळच्या गोष्टी, ज्या मग ते त्या बाजूला (कलियुगामध्ये) घेऊन गेले आहेत. ते देखील लष्करी आहेत, तुम्ही देखील लष्करी आहात. भूमिगत लष्कर देखील असते ना. गुप्त राहतात. तुम्ही देखील भूमिगत आहात. तुम्ही सुद्धा गुप्त होता अर्थात बाबांच्या आठवणीमध्ये लीन होऊन जाता. यालाच म्हटले जाते - अंडरग्राउंड (भूमिगत). कोणीही ओळखू शकत नाही कारण तुम्ही गुप्त आहात ना. तुमची आठवणीची यात्रा देखील गुप्त आहे. बाबा फक्त एवढेच सांगतात - ‘माझी आठवण करा’; कारण बाबा जाणतात आठवणीमुळेच या बिचाऱ्यांचे कल्याण होणार आहे. आता तुम्हाला ‘बिचारे’ असेच म्हणणार ना. स्वर्गामध्ये तर ‘बिचारे’ असत नाहीत. बिचारे त्यांना म्हटले जाते जे कुठे ना कुठे बंधनामध्ये अडकलेले असतात. हे देखील तुम्ही समजता, बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्हाला ‘लाईट हाऊस’ (दीपस्तंभ) सुद्धा म्हटले जाते. बाबांना देखील लाईट हाऊस म्हटले जाते. बाबा वेळोवेळी सांगत असतात - एका डोळ्यामध्ये शांतीधाम, दुसऱ्या डोळ्यामध्ये सुखधाम ठेवा. तुम्ही जणूकाही लाईट हाऊस आहात. उठता, बसता, चालता तुम्ही लाईट बनून रहा. सर्वांना सुखधाम-शांतीधामचा मार्ग दाखवत रहा. या दु:खधाममध्ये सर्वांची नाव अडकून पडली आहे म्हणूनच तर म्हणतात - ‘नईया मेरी पार लगाओ, ओ मांझी’. सर्वांची नाव अडकून पडली आहे, त्यांना कोण सोडवणार? ते (दुनियावाले) काही ‘मुक्ती सेना’ तर नाही आहेत. असेच नाव ठेवले आहे. वास्तविक ‘मुक्ती सेना’ तर तुम्ही आहात जे सर्वांना सॅलवेज करता (वाचवता). सर्वजण पाच विकारांच्या बेड्यांमध्ये अडकून पडले आहेत म्हणूनच म्हणतात - ‘आम्हाला लिबरेट करा (मुक्त करा), वाचवा’. तर बाबा म्हणतात - ‘या आठवणीच्या यात्रेमुळे तुम्ही पार व्हाल (पलीकडे जाल)’. आता तर सगळेच अडकून पडलेले आहेत. बाबांना बागवान (माळी) देखील म्हणतात. या सर्व या वेळच्याच गोष्टी आहेत. तुम्हाला फूल बनायचे आहे, आता तर सर्वजण काटे आहेत कारण हिंसक आहेत. आता अहिंसक बनायचे आहे. पावन बनायचे आहे. जे धर्म स्थापन करण्यासाठी येतात, ते तर पवित्र आत्मेच असतात. ते काही अपवित्र असू शकत नाहीत. सुरुवातीला जेव्हा येतात तेव्हा पवित्र असल्यामुळे त्यांच्या आत्म्याला किंवा शरीराला दुःख भोगावे लागत नाही कारण त्यांच्यावर कुठल्याही पापाचे ओझे नसते. आपण जेव्हा पवित्र असतो तर तेव्हा कुठलेही पाप होत नाही दुसऱ्यांचे सुद्धा होत नाही. प्रत्येक गोष्टीवर विचार करायचा आहे. आत्मे तिथून (शांतीधाम मधून) येतात धर्म स्थापन करण्यासाठी. ज्यांची मग डिनायस्टी (घराणे) सुद्धा चालू होते. शीख धर्माची सुद्धा डिनायस्टी आहे. संन्याशांची डिनायस्टी (घराणे) थोडेच चालते, ते राजा थोडेच बनले आहेत. शीख धर्मामध्ये महाराजा वगैरे आहेत तर ते जेव्हा स्थापना करण्यासाठी येतात ती नवीन आत्मा येते. क्राईस्टने येऊन ख्रिश्चन धर्माची स्थापना केली, बुद्धाने बौद्ध धर्म, इब्राहिम ने इस्लाम धर्म - सर्वांची नाव-रास जुळते. देवी-देवता धर्माचे नाव जुळत नाही. निराकार बाबाच येऊन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. ते देहधारी नाहीत. बाकीचे जे धर्मस्थापक आहेत त्यांच्या देहाची नावे आहेत, हे (शिवबाबा) काही देहधारी नाहीत. डिनायस्टी (घराणे) नवीन दुनियेमध्ये चालते. तर बाबा म्हणतात - ‘मुलांनो, स्वतःला रूहानी मिलिटरी (आत्मिक सेना) जरूर समजा’. त्या लष्कराचे कमांडर वगैरे येतात आणि म्हणतात - ‘अटेन्शन’, तर लगेच उभे राहतात. आता ते तर प्रत्येकजण आपापल्या गुरूची आठवण करतील किंवा शांतीमध्ये राहतील. परंतु ती खोटी शांती होते. तुम्ही जाणता - आपण आत्मा आहोत, आमचा धर्मच शांत आहे. मग आठवण कोणाची करायची आहे. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे. ज्ञाना सहित आठवणीमध्ये राहिल्याने पापे भस्म होतात. हे ज्ञान दुसऱ्या कोणालाच नाही आहे. मनुष्य (दुनियावाले) हे थोडेच समजतात की, आपण शांत स्वरूप आत्मा आहोत आणि आपल्याला शरीरापासून डिटॅच होऊन बसायचे आहे. इथे तुम्हाला ते बळ मिळते ज्यामुळे तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये बसू शकता. बाबा समजावून सांगतात की, कसे स्वतःला आत्मा समजून डिटॅच होऊन बसावे.

तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांना आता परत जायचे आहे. आम्ही तिथले (शांतीधामचे) रहिवासी आहोत. इतके दिवस घराला विसरून गेलो होतो, दुसरे कोणी थोडेच समजतात की, आपल्याला आता घरी जायचे आहे. पतित आत्मा तर परत जाऊ शकणार नाही. ना कोणी असे समजावून सांगणारा आहे की कोणाची आठवण करावी. बाबा समजावून सांगत आहेत - एकाचीच आठवण करायची आहे. दुसऱ्या कोणाची आठवण करून काय उपयोग! समजा, भक्ती मार्गामध्ये ‘शिव-शिव’ म्हणत राहतात, माहित तर कोणालाच नाही की यामुळे काय होईल. ‘शिव’ची आठवण केल्याने पापे भस्म होतील - हे कोणालाच माहित नाही आहे. फक्त आवाज ऐकू येईल. तो आवाज तर होणारच. या सर्व गोष्टींमुळे काहीच फायदा नाही. बाबा तर या सर्व गुरूंपेक्षा अनुभवी आहेत ना.

बाबांनी सांगितले आहे ना - ‘हे अर्जुन, या सगळ्यांना सोड…’ सद्गुरु मिळाला तर आता या सर्वांची आवश्यकता नाही. सद्गुरू तारणारे आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला आसुरी संसारामधून पैलतीरावर घेऊन जातो. विषय सागरा पासून पार पलीकडे जायचे आहे. या सर्व गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. तसे तर ‘नावाडी’ नाव चालविणारा असतो परंतु समजावून सांगण्यासाठी हे नांव पडले आहे. त्यांना म्हटले जाते - प्राणेश्वर बाबा अर्थात प्राणांचे दान देणारे बाबा, ते अमर बनवतात. ‘प्राण’ आत्म्याला म्हटले जाते. आत्मा शरीरातून निघून जाते तेव्हा म्हणतात प्राण निघून गेला. मग शरीराला ठेवायला सुद्धा देत नाहीत. आत्मा आहे तर शरीर सुद्धा तंदुरुस्त आहे. आत्म्याशिवाय तर शरीर सुद्धा सडायला लागते मग त्याला ठेवून तरी काय करणार. प्राणी सुद्धा असे करत नाहीत. फक्त एक माकड आहे, त्याचे जर पिल्लू मेले आणि सडले तरीसुद्धा मृत शरीर सोडत नाही, तसेच घेऊन फिरतील. तो तर प्राणी आहे, तुम्ही तर मनुष्य आहात ना. जर कोणी शरीर सोडले तर म्हणतात हि डेड बॉडी लवकरात लवकर बाहेर काढा. मनुष्य म्हणतील - स्वर्गवासी झाला. जेव्हा प्रेताला उचलतात तर सुरुवातीला पाय स्मशानाच्या दिशेने करतात. मग जेव्हा स्मशानात आत जातात, सर्व क्रियाकर्म इत्यादी करून मग समजतात आता हा स्वर्गामध्ये जात आहे तर त्याला फिरवून तोंड स्मशानाच्या दिशेने करतात. तुम्ही श्रीकृष्णाला सुद्धा अतिशय अचूक दाखवले आहे, नरकाला लाथ मारत आहे. श्रीकृष्णाचे हे शरीर तर नाही आहे, त्याचे नाव-रूप तर बदलते. कितीतरी गोष्टी बाबा समजावून सांगतात आणि मग म्हणतात - मनमनाभव.

इथे (सेंटरवर) येऊन जेव्हा बसता तेव्हा अटेन्शन (शांतीमध्ये बसा). बुद्धी बाबांमध्ये लागलेली असावी. तुमचे हे अटेन्शन कायमसाठी आहे. जोपर्यंत जगायचे आहे, बाबांची आठवण करायची आहे. आठवणीद्वारेच जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतात. जर आठवणच केली नाहीत तर पापे सुद्धा भस्म होणार नाहीत. बाबांची आठवण करायची आहे, आठवण करताना डोळे कधीही बंद करायचे नाहीत. संन्यासी लोक डोळे बंद करून बसतात. काहीजण तर स्त्रीचे तोंडही बघत नाहीत. डोळ्यावर पट्टी बांधून बसतात. तुम्ही जेव्हा इथे बसता तेव्हा रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे स्वदर्शन चक्र फिरवायचे आहे. तुम्ही ‘लाईट हाऊस’ आहात ना. हे आहे दुःखधाम, एका डोळ्यामध्ये दुःखधाम, दुसऱ्या डोळ्यामध्ये सुखधाम. उठता-बसता स्वतःला लाईट हाऊस समजा. बाबा वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. तुम्ही आपली देखील काळजी घेता. लाईट हाऊस बनल्याने आपले कल्याण करता. बाबांची जरूर आठवण करायची आहे, जेव्हा कोणी रस्त्यामध्ये भेटते तर त्यांना सुद्धा हे सांगायचे आहे. ओळखीचे देखील खूप भेटतात, ते (दुनियावाले) तर एकमेकांना राम-राम करतात, त्यांना सांगा - तुम्हाला माहित आहे हे दु:खधाम आहे, ते आहे शांतीधाम आणि सुखधाम. तुम्ही शांतीधाम-सुखधाम मध्ये येऊ इच्छिता का? हि ३ चित्रे कोणालाही समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. तुम्हाला इशारा करतात. लाईट हाऊस सुद्धा इशारा देते (दिशा दाखवते). ही जीवनरुपी नाव आहे जी रावणाच्या जेलमध्ये अडकून पडली आहे. मनुष्य, मनुष्याला सॅलवेज करू शकत नाही (मुक्ती देऊ शकत नाही). त्या तर सर्व कृत्रिम हदच्या गोष्टी आहेत. ही आहे बेहदची गोष्ट. ती देखील काही समाजसेवा नाही आहे. किंबहुना खरी सेवा ही आहे कि सर्वांचा बेडा (जिवनरुपी नाव) पार करणे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, लोकांची कोणती सेवा करायची आहे.

सर्वप्रथम तर हे सांगायचे आहे की, ‘तुम्ही गुरु करता मुक्तीधाममध्ये जाण्यासाठी, पित्याला भेटण्यासाठी’. परंतु असे कोणी भेटू शकत नाही. भेटण्याचा रस्ता बाबाच सांगतात. ते (दुनियावाले) समजतात - ही शास्त्र इत्यादि वाचल्याने ईश्वर भेटतो, आशेवर राहिल्याने सरतेशेवटी मग कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटेल. केव्हा भेटणार - हे बाबांनी तुम्हाला सर्वकाही समजावून सांगितले आहे. तुम्ही चित्रामध्ये दाखवले आहे - एकाचीच आठवण करायची आहे. जे कोणी धर्म संस्थापक आहेत ते देखील असा वरती इशारा करतात कारण तुम्हीच शिकवले आहे त्यामुळे ते देखील असा वर इशारा करतात. ‘साहेब को जपो’, ते बाबा सद्गुरु आहेत. बाकीचे तर अनेक प्रकारचे शिक्षण देणारे आहेत. त्यांना म्हटले जाते - गुरु. अशरीरी बनण्याचे शिक्षण कोणीही जाणत नाहीत. तुम्ही म्हणाल - ‘शिवबाबांची आठवण करा’. ते लोक शिवाच्या मंदिरामध्ये जातात त्यामुळे नेहमी शिवाला ‘बाबा’ म्हणण्याची सवय लागली आहे दुसऱ्या कोणाला ‘बाबा’ म्हणत नाहीत, परंतु ते काही निराकार तर नाही आहेत, शरीरधारी आहेत. शिव तर आहेत निराकार, सच्चे बाबा, तर ते सर्वांचे पिता झाले. सर्व आत्मे अशरीरी आहेत.

तुम्ही मुले जेव्हा इथे बसता तर या धुंदीमध्ये (नशेमध्ये) बसा. तुम्ही जाणता की आपण कसे अडकून पडलो होतो. आता बाबांनी येऊन मार्ग दाखवला आहे, बाकीचे सर्वजण अडकून पडले आहेत, सुटतच नाहीत. सजा भोगून मग सर्वांची सुटका होईल. तुम्हा मुलांना समजावून सांगत राहतात, मोचरा (सजा) खाऊन थोडेच मानी (पद) घ्यायचे आहे. खूप सजा खातात तर पद भ्रष्ट होते, मानी (पद) कमी मिळते! जेवढी कमी सजा तेवढे पद चांगले मिळेल. हे आहे काट्यांचे जंगल. सर्व एकमेकांना काटा टोचत राहतात (दुःख देत राहतात). स्वर्गाला म्हटले जाते - गार्डन ऑफ अल्लाह. ख्रिश्चन लोक देखील म्हणतात - पॅराडाईज (स्वर्ग) होता. कधीतरी साक्षात्कार सुद्धा घडू शकतो, असेही होऊ शकते की या धर्माचा असेल, जो पुन्हा आपल्या धर्मामध्ये येऊ शकतो. बाकी फक्त बघितले तर त्याने काय होणार! जोपर्यंत बाबांना ओळखत नाहीत आणि ज्ञान घेत नाहीत तोपर्यंत केवळ पाहिल्याने कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. सर्वच काही येऊ शकणार नाहीत. तिथे (सतयुगामध्ये) देवता तर खूप थोडे असतात. आता इतके हिंदू आहेत, खरेतर ते देवता होते ना. परंतु ते होते - पावन, हे आहेत - पतित. पतित असणाऱ्याला देवता म्हणणे शोभणार नाही. हा एकच धर्म आहे, ज्याला धर्म-भ्रष्ट, कर्म-भ्रष्ट म्हटले जाते. आदि सनातन हिंदू धर्म म्हणतात. देवता धर्माचा कॉलमच फॉर्ममध्ये ठेवत नाहीत.

आम्हा मुलांचे मोस्ट बिलवेड बाबा आहेत, जे तुम्हाला कोणापासून कोण बनवतात. तुम्ही हे समजावून सांगू शकता की बाबा कसे येतात, जेव्हा की देवतांचे पाय देखील जुन्या तमोप्रधान सृष्टीवर पडत नाहीत, तर मग बाबा कसे येणार? बाबा तर निराकार आहेत, त्यांना तर आपले पायच नाहीत म्हणूनच यांच्यामध्ये (ब्रह्मातनामध्ये) प्रवेश करतात.

आता तुम्ही मुले ईश्वरीय दुनियेमध्ये बसले आहात, ते सर्व आहेत आसुरी दुनियेमध्ये. हे संगमयुग खूप छोटे आहे. तुम्ही समजता - आम्ही ना दैवी संसारामध्ये आहोत, ना आसुरी संसारामध्ये आहोत. आम्ही ईश्वरीय संसारामध्ये आहोत. बाबा आले आहेत आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात - ‘ते (शांतीधाम) माझे घर आहे. तुमच्यासाठी मी आपले घर सोडून येतो. भारत सुखधाम बनतो तेव्हा मी थोडाच येतो. मी विश्वाचा मालक बनत नाही, तुम्ही बनता. मी ब्रह्मांडाचा मालक आहे’. ब्रह्मांडामध्ये सर्व येतात. आता सुद्धा तिथे मालक बनून बसले आहेत, जे यायचे अजून बाकी आहेत, परंतु ते येऊन विश्वाचे मालक बनत नाहीत. समजावून तर खूप सांगतात. काही स्टुडंट खूप हुशार असतात ते स्कॉलरशिप घेतात. आश्चर्य आहे की इथे सांगतात देखील की, आम्ही पवित्र बनू आणि मग जाऊन पतित बनतात. असे कच्चे असणाऱ्यांना घेऊन येऊ नका. ब्राह्मणीचे काम आहे चेक करून आणणे. तुम्ही जाणता की आत्माच शरीर धारण करून पार्ट बजावते, तिला अविनाशी पार्ट मिळालेला आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) लाईट हाऊस बनून सर्वांना शांतीधाम, सुखधामचा मार्ग सांगायचा आहे. सर्वांची नाव दु:खधाम मधून काढण्याची सेवा करायची आहे. आपले देखील कल्याण करायचे आहे.

२) आपल्या शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थित होऊन शरीरापासून डिटॅच होण्याचा (अशरीरी बनण्याचा) अभ्यास करायचा आहे. आठवणीमध्ये डोळे उघडे ठेवून बसायचे आहे. बुद्धीने रचता आणि रचनेचे चिंतन करायचे आहे.

वरदान:-
आपल्या संकल्पांना शुद्ध, ज्ञानस्वरूप आणि शक्ती स्वरूप बनविणारे संपूर्ण पवित्र भव

बाप समान बनण्यासाठी पवित्रतेचे फाउंडेशन पक्के करा. फाउंडेशनमध्ये ब्रह्मचर्य व्रत धारण करणे ही तर सामान्य गोष्ट आहे, फक्त एवढ्यावरच खुश होऊ नका. दृष्टी, वृत्तीच्या पवित्रतेवर जास्त भर द्या त्याच सोबत आपल्या संकल्पांना शुद्ध, ज्ञान स्वरूप, शक्ती स्वरूप बनवा. संकल्पामध्ये अजूनही बरीच कमजोरी आहे. या कमजोरीला सुद्धा नाहीसे करा तेव्हा म्हणणार संपूर्ण पवित्र आत्मा.

बोधवाक्य:-
दृष्टीमध्ये सर्वांप्रती दया आणि शुभ भावना असेल तर अभिमान किंवा अपमानाचा अंश देखील उत्पन्न होऊ शकणार नाही.