13-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वात अगोदर हाच विचार करा की मज आत्म्यावर जो कट (गंज) चढला आहे, तो कसा निघेल, सुईवर जोपर्यंत गंज असेल तोपर्यंत चुंबक खेचू शकत नाही”

प्रश्न:-
पुरुषोत्तम संगमयुगावर तुम्हाला पुरुषोत्तम बनण्यासाठी कोणता पुरुषार्थ करायचा आहे?

उत्तर:-
कर्मातीत बनण्याचा. कोणत्याही कर्म संबंधींकडे बुद्धी जाऊ नये अर्थात कर्मबंधन आपल्याकडे आकर्षित करू नये. संपूर्ण कनेक्शन एका बाबांसोबत रहावे. कोणातही मन गुंतलेले नसावे. असा पुरुषार्थ करा, झरमुई-झगमुई मध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) आपला वेळ वाया घालवू नका. आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करा.

गीत:-
जाग सजनियाँ जाग…

ओम शांती।
रुहानी मुलांनो (आत्म्यांनो), शरीराद्वारे गाणे ऐकलेत? कारण बाबा आता मुलांना आत्म-अभिमानी बनवत आहेत. तुम्हाला आत्म्याचे देखील ज्ञान मिळते. दुनियेमध्ये एकही मनुष्य नाहीये, ज्याला आत्म्याचे योग्य ज्ञान असेल. तर मग परमात्म्याचे ज्ञान कसे बरे असू शकते? हे बाबाच बसून समजावून सांगतात. समजावून सांगणे शरीराद्वारेच आहे. शरीराशिवाय तर आत्मा काहीही करू शकत नाही. आत्मा जाणते आपण कुठले निवासी आहोत, कोणाची संतान आहोत. आता तुम्ही योग्य रीतीने जाणता. सर्व ॲक्टर्स पार्टधारी आहेत. विभिन्न धर्माचे आत्मे कधी येतात, हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबा डिटेलमध्ये सांगत नाहीत, घाऊक (होलसेलमध्ये) समजावून सांगतात. ‘होल-सेल’, अर्थात एका सेकंदामध्ये असे स्पष्टीकरण देतात जे सतयुग आदि पासून अंतापर्यंत माहिती होते की कसा आमचा पार्ट नोंदलेला आहे. आता तुम्ही जाणता बाबा कोण आहेत, त्यांचा या ड्रामामध्ये काय पार्ट आहे? हे देखील जाणता उच्च ते उच्च बाबा आहेत, सर्वांचे सद्गती दाता, दुःख हर्ता सुख कर्ता आहेत. शिवजयंती गायली गेली आहे. तर जरूर शिवजयंती सर्वात उच्च आहे असे म्हणणार. खास भारतामध्येच जयंती साजरी करतात. ज्यांच्या-ज्यांच्या राज्यामध्ये ज्या महान पुरुषाची पास्टची हिस्ट्री (भूतकाळातील इतिहास) चांगली असते तर त्यांचा स्टॅम्प सुद्धा बनवतात. आता शिवजयंती सुद्धा साजरी करतात. समजावून सांगितले पाहिजे सर्वात श्रेष्ठ जयंती कोणाची झाली? कोणाचा स्टॅम्प बनवला पाहिजे? कोणी साधू-संत किंवा शिखांचा, मुस्लिमांचा अथवा इंग्रजांचा, कोणी फिलॉसॉफर चांगला असेल तर त्यांचा स्टॅम्प बनवत राहतात. जसे राणा प्रताप इत्यादींचा सुद्धा बनवतात. आता वास्तविक स्टॅम्प असायला हवा बाबांचा, जे सर्वांचे सद्गती दाता आहेत. यावेळी बाबा आले नाहीत तर सद्गती कशी होईल कारण सगळे रौरव नरकामध्ये गटांगळ्या खात आहेत. सर्वात उच्च ते उच्च आहेत शिवबाबा, पतित-पावन. शिवाची मंदिरे देखील खूप उंच ठिकाणी बांधतात कारण उच्च ते उच्च आहेत ना.

बाबाच येऊन भारताला स्वर्गाचा मालक बनवतात. जेव्हा ते येतात तेव्हा सद्गती करतात, तर त्या बाबांचीच आठवण राहिली पाहिजे. शिवबाबांचा स्टॅम्प तरी कसा बनवावा? भक्ती मार्गामध्ये तर शिवलिंग बनवतात. तेच उच्च ते उच्च आत्मा झाले. उच्च ते उच्च मंदिर देखील शिवाचेच मानतील. सोमनाथ शिवाचे मंदिर आहे ना. भारतवासी तमोप्रधान झाल्याकारणाने हे देखील जाणत नाहीत की शिव कोण आहेत ज्यांची पूजा करतात, त्यांचे ऑक्युपेशन काही जाणत नाहीत. राणा प्रतापने देखील युद्ध केले, ती तर हिंसा झाली. यावेळी तर सर्व आहेत डबल हिंसक. विकारामध्ये जाणे, काम कटारी चालवणे ही सुद्धा हिंसा आहे ना. डबल अहिंसक तर हे लक्ष्मी-नारायण आहेत. लोकांना जेव्हा पूर्णपणे ज्ञान असेल तेव्हाच अर्थासहित स्टॅम्प काढले जातील. सतयुगामध्ये स्टॅम्प निघतातच या लक्ष्मी-नारायणाचे. शिवबाबांचे ज्ञान तर तिथे असत नाही तर जरुर उच्च ते उच्च लक्ष्मी-नारायणाचेच स्टॅम्प लागत असतील. आता देखील भारताचा तो स्टॅम्प असायला हवा. उच्च ते उच्च आहेत त्रिमूर्ती शिव. ते तर अविनाशी राहिले पाहिजेत कारण भारताला अविनाशी राज-सिंहासन देतात. परमपिता परमात्माच भारताला स्वर्ग बनवतात. तुमच्यामध्ये देखील असे पुष्कळ आहेत जे हे विसरून जातात की, बाबा आपल्याला स्वर्गाचा मालक बनवत आहेत. हे माया विसरायला लावते. बाबांना न जाणल्या कारणाने भारतवासी किती चुका करत आले आहेत. शिवबाबा काय करतात, हे कोणालाच ठाऊक नाहीये. शिवजयंतीचा सुद्धा अर्थ समजत नाहीत. हे नॉलेज बाबांशिवाय इतर कोणालाच नाहीये.

आता तुम्हा मुलांना बाबा म्हणतात - तुम्ही इतरांवर देखील दया करा, आपल्यावर सुद्धा आपणच दया करा. टीचर शिकवतात, ही सुद्धा दया करतात ना. हे देखील म्हणतात मी टीचर आहे. तुम्हाला शिकवतो. वास्तविक याचे नाव पाठशाळा देखील म्हणणार नाही. ही तर खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. बाकी तर सर्व आहेत खोटी नावे. ती (दुनियेतील) कॉलेजेस काही संपूर्ण युनिव्हर्ससाठी तर नाही आहेत. तर युनिव्हर्सिटी आहेच एका बाबांची, जे साऱ्या विश्वाची सद्गती करतात. वास्तविक युनिव्हर्सिटी ही एकच आहे. याद्वारेच सगळे मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये जातात अर्थात शांती आणि सुखाची प्राप्ती करतात. युनिव्हर्स तर हे झाले ना, म्हणून बाबा म्हणतात घाबरू नका. ही तर समजून सांगण्याची गोष्ट आहे. असे देखील होते इमर्जन्सीच्या वेळी कोणी कोणाचे ऐकत सुद्धा नाही. प्रजेचे प्रजेवर राज्य चालते इतर कोणत्याही धर्मामध्ये सुरुवातीपासून राज्य चालत नाही. ते तर धर्म स्थापन करण्यासाठी येतात. मग जेव्हा लाखोंच्या घरात होतील तेव्हा राज्य करू शकतील. इथे तर बाबा राजाई स्थापन करत आहेत - युनिव्हर्ससाठी. ही देखील समजावून सांगण्याची गोष्ट आहे. दैवी राजधानी या पुरुषोत्तम संगमयुगावर स्थापन करत आहोत. बाबांनी सांगितले आहे - श्रीकृष्ण, श्रीनारायण, श्रीराम इत्यादींची काळी चित्रे देखील तुम्ही हातात पकडून त्यावर मग समजावून सांगा की, श्रीकृष्णाला श्याम-सुंदर का म्हणतात? सुंदर होता मग श्याम (काळा) कसा बनतो? भारतच हेवन होता, आता हेल आहे. हेल अर्थात काळा, हेवन अर्थात गोरा. राम-राज्याला दिवस, रावण-राज्याला रात्र म्हटले जाते. तर तुम्ही समजावून सांगू शकता - देवतांना काळे का बनवले आहे. बाबा बसून समजावून सांगत आहेत - आता तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगावर. ते नाही आहेत, तुम्ही तर इथे बसले आहात ना. इथे तुम्ही आहातच संगमयुगावर, पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. विकारी पतित मनुष्यांशी तुमचे काहीही कनेक्शनच नाही आहे, हां, अजून कर्मातीत अवस्था झालेली नाहीये म्हणून कर्म संबंधांशी देखील मन गुंतते. कर्मातीत बनणे, यासाठी पाहिजे आठवणीची यात्रा. बाबा समजावून सांगतात की, तुम्ही आत्मा आहात, तुमचे परमात्मा पित्यावर किती प्रेम असले पाहिजे. ओहो! बाबा आम्हाला शिकवत आहेत. तो उमंग कोणालाच राहत नाही. माया घडोघडी देह-अभिमानामध्ये घेऊन येते. जेव्हा समजता की, शिवबाबा आम्हा आत्म्यांशी बोलत आहेत, तर ती कशिश, तो आनंद कायम राहिला पाहिजे ना. ज्या सुईवर जरा सुद्धा गंज चढलेला नसेल, आणि तिला जर तुम्ही चुंबकासमोर ठेवाल तर पटकन चिकटेल. थोडा जरी गंज असेल तर चिकटणार नाही. कशिश (आकर्षण) वाटणार नाही. ज्या बाजूला गंज नसेल त्या बाजूने मग चुंबक खेचेल. मुलांना कशिश तेव्हा होईल जेव्हा आठवणीच्या यात्रेवर असतील. कट (गंज) असेल तर खेचू शकणार नाही. प्रत्येकजण समजू शकतात आमची सुई एकदम पवित्र होईल तेव्हा कशिश सुद्धा होईल. कशिश वाटत नाही कारण कट (गंज) चढलेली आहे. तुम्ही खूप आठवणीमध्ये राहता तर विकर्म भस्म होतात. अच्छा, आणि मग जर का कोणी पाप करतात तर त्याचा शंभर पटीने दंड होतो. गंज चढते, आठवण करू शकत नाहीत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, आठवण विसरल्यामुळे गंज चढते. तर ती कशिश, ते प्रेम रहात नाही. गंज उतरलेली असेल तर प्रेम वाटेल, आनंद सुद्धा होईल. चेहरा प्रफुल्लित राहील. तुम्हाला भविष्यामध्ये असे बनायचे आहे. सेवा करत नसाल तर जुन्या सडलेल्या गोष्टी करत राहता. बाबांसोबत असलेला बुद्धियोगच तोडून टाकतात. जी काही चमक होती, ती सुद्धा गायब होते. बाबांवर जरा सुद्धा प्रेम राहत नाही. बाबांवर प्रेम त्यांचे जडेल जे चांगल्या रीतीने बाबांची आठवण करत असतील. बाबा देखील त्यांच्याकडे आकर्षित होतील. हा मुलगा सेवा देखील छान करतो आणि आठवणीमध्ये देखील राहतो. तर बाबांचे प्रेम त्यांच्यावर राहते. स्वतःवर लक्ष ठेवतात, आपल्याकडून कोणते पाप तर नाही झाले. जर आठवण केली नाहीत तर गंज कशी उतरेल. बाबा म्हणतात - चार्ट ठेवा तर गंज उतरेल. तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे असेल तर गंज उतरला पाहिजे. उतरतो देखील आणि पुन्हा चढतो सुद्धा. शंभर पटीने दंड होतो. बाबांची आठवण करत नाहीत तर काही ना काही पाप करतात. बाबा म्हणतात - गंज उतरल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येऊ शकणार नाही. नाही तर मग सजा खावी लागेल. सजा देखील मिळते, पद सुद्धा भ्रष्ट होते. बाकी बाबांकडून वारसा तरी काय मिळाला? असे कर्म करता कामा नये ज्यामुळे आणखीनच गंज चढेल. पहिले तर आपल्यावरील गंज काढून टाकण्याची काळजी घ्या. काळजी घेत नसतील तर मग बाबा समजतील यांच्या नशिबामध्ये नाही आहे. क्वालिफिकेशन (पात्रता) पाहिजे. चांगले चारित्र्य पाहिजे. लक्ष्मी-नारायणाच्या चरित्राचे तर गायन केले गेले आहे. या वेळचे मनुष्य त्यांच्या समोर आपल्या चारित्र्याचे वर्णन करतात. शिवबाबांना जाणतच नाहीत, सद्गति करणारे तर तेच आहेत, संन्याशांकडे जातात. परंतु सर्वांचा सद्गती दाता आहेच एक. बाबाच स्वर्गाची स्थापना करतात त्या नंतर तर मग खालीच उतरायचे आहे. बाबांशिवाय इतर कोणीही पावन बनवू शकत नाही. मनुष्य खड्डा खणून त्यामध्ये जाऊन बसतात, यापेक्षा तर गंगेमध्ये जाऊन बसेल तर साफ तरी होईल कारण की पतित-पावनी गंगा म्हणतात ना. लोकांना शांती हवी आहे, ती तर जेव्हा घरी जाल तेव्हाच पार्ट पूर्ण होईल. आम्हा आत्म्यांचे घर आहेच मुळी निर्वाण धाम. इथे (या जुन्या दुनियेमध्ये) शांती कुठून आली? तपस्या करतात, हे देखील कर्मच करतात ना, नाही म्हणायला शांतीमध्ये बसतील. शिवबाबांना तर जाणतच नाहीत. तो सर्व आहे भक्तिमार्ग, पुरुषोत्तम संगमयुग एकच आहे, जेव्हा बाबा येतात. आत्मा स्वच्छ बनून मुक्ति-जीवनमुक्ती मध्ये निघून जाते. जे मेहनत करतील ते राज्य करतील, बाकी जे मेहनत करणार नाहीत ते सजा खातील. सुरुवातीला होणाऱ्या सजे विषयी साक्षात्कार घडवला होता. नंतर शेवटी देखील साक्षात्कार होईल. बघतील आपण श्रीमतावर चाललो नाही त्यामुळे हे हाल झाले आहेत. मुलांना कल्याणकारी बनायचे आहे. बाबा आणि रचनेचा परिचय द्यायचा आहे. जसे सुईला रॉकेलमध्ये टाकल्याने गंज उतरते, तशी बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने देखील गंज उतरते. नाही तर ती कशिश, ते प्रेम बाबांवर रहात नाही. सारे प्रेम निघून जाते मित्र-नातेवाईक इत्यादींमध्ये, मित्र-नातेवाईकांकडे जाऊन राहतात. कुठे तो गंजाने भरलेला संग आणि कुठे हा संग. गंजाने भरलेल्या वस्तूच्या संगतीने त्यांना देखील गंज चढेल. गंज उतरवण्यासाठीच बाबा येतात. आठवणीनेच पावन बनाल. अर्ध्या कल्पापासून खूप वेगाने गंज चढलेली आहे. आता बाबा चुंबक म्हणतात की, ‘माझी आठवण करा’. बुद्धीचा योग जितका माझ्याशी असेल तितकी गंज उतरेल. नविन दुनिया तर बनणारच आहे, सतयुगामध्ये सुरुवातीला देवी-देवतांचे खूप छोटेसे झाड असते, नंतर वृद्धी होते. इथूनच (या साकार दुनियेतूनच) तुमच्याकडे येऊन पुरुषार्थ करत राहतात. वरून (परमधामहून) कोणीही येत नाहीत, जसे इतर धर्मांचे वरून येतात. इथे तुमची राजधानी तयार होत आहे. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. बाबांच्या श्रीमतानुसार चालण्यावर आहे, बुद्धियोग बाहेर जात राहत असेल, तरी देखील गंज लागते. इथे येतात तर सर्व हिशोब चुकते करून, जिवंतपणी सर्व ओझे नष्ट करून येतात. संन्यासी देखील संन्यास घेतात तरी देखील किती काळपर्यंत त्यांना पूर्वीचे सर्व आठवत असते.

तुम्ही मुले जाणता आता आपल्याला सत् चा संग मिळत आहे. आम्ही आमच्या बाबांच्याच आठवणीमध्ये राहतो. मित्र-नातेवाईक इत्यादींना जाणता तर आहात ना. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून, कर्म करत असताना बाबांची आठवण करता, पवित्र बनायचे आहे, इतरांना देखील शिकवायचे आहे. आणि मग नशिबामध्ये असेल तर चालू लागतील. ब्राह्मण कुळाचाच नसेल तर देवता कुळामध्ये कसा येईल? खूप सोपे पॉईंट्स दिले जातात, जे लगेच कोणाच्याही बुद्धीमध्ये पक्के बसतील. विनाश काले विपरीत बुद्धीवाले चित्र देखील अगदी क्लियर आहे. आता ती सावरेंटी (राज्य) तर नाही आहे. दैवी सावरेंटी (राज्य) होती, ज्याला स्वर्ग म्हटले जात होते. आता तर पंचायती राज्य आहे, समजावून सांगण्यामध्ये काहीच हरकत नाही. परंतु गंज निघालेला असेल तर कोणालातरी तीर लागेल. अगोदर गंज काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले चारित्र्य बघायचे आहे. दिवस-रात्र आपण काय करत आहोत? किचनमध्ये देखील भोजन बनवताना, चपाती भाजताना जितके शक्य असेल तितके आठवणीमध्ये रहा, फिरायला जाता तेव्हा देखील आठवणीमध्ये. बाबा सगळ्यांच्या अवस्थेला तर जाणतात ना. झरमुई-झगमुई करतात (व्यर्थ गोष्टी बोलतात) तर मग गंज अजूनच चढतो. परचिंतनवाली कोणतीही गोष्ट ऐकू नका. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जसे बाबा टीचर रूपामध्ये शिकवून सर्वांवर दया करतात, तशी आपणच आपल्यावर आणि इतरांवर देखील दया करायची आहे. अभ्यास आणि श्रीमतावर पूर्णत: लक्ष द्यायचे आहे, आपले चारित्र्य सुधारायचे आहे.

२) आपसामध्ये कोणत्या जुन्या सडलेल्या परचिंतनाच्या गोष्टी करून बाबांपासून बुद्धीयोग तोडायचा नाहीये. कोणतेही पाप कर्म करायचे नाहीये, आठवणीमध्ये राहून गंज उतरवायचा आहे.

वरदान:-
दृढतेद्वारे नापीक जमिनीमध्ये देखील फळ पैदा करणारे सफलता स्वरूप भव

कोणत्याही गोष्टीमध्ये सफलता स्वरूप बनण्यासाठी दृढता आणि स्नेहाचे संघटन हवे. ही दृढता नापीक जमिनीमध्ये देखील फळ पैदा करते. जसे आजकाल वैज्ञानिक वाळूमध्ये देखील फळे पैदा करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे तुम्ही सायलेन्सच्या शक्तीद्वारे स्नेहाचे पाणी देऊन फलदायी बना. दृढतेद्वारे निराश असणाऱ्यामध्ये सुद्धा आशेचा दीपक जागृत करू शकता कारण हिंमत ठेवल्याने बाबांची मदत मिळते.

बोधवाक्य:-
स्वतःला नेहमी प्रभूची ठेव समजून रहा तर कर्मामध्ये रूहानियत येईल.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

सारथी अर्थात आत्म-अभिमानी कारण आत्माच सारथी आहे. ब्रह्मा बाबांनी याच विधीद्वारे नंबरवनची सिद्धी प्राप्त केली, तर फॉलो फादर करा. जसे बाबा देहाला अधीन करून प्रवेश होतात अर्थात सारथी बनतात देहाच्या अधीन होत नाहीत, त्यामुळे वेगळे आणि प्रिय आहेत. असेच तुम्ही सर्व ब्राह्मण आत्मे सुद्धा बाप समान सारथीच्या स्थितीमध्ये रहा. सारथी आपोआप साक्षी होऊन काहीही करतील, पाहतील, ऐकतील आणि सर्व काही करत असताना देखील मायेच्या लेप-छेप पासून (कर्माच्या प्रभावापासून) निर्लेप रहाल.