13-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला देवता बनायचे आहे त्यामुळे मायेच्या अवगुणांचा त्याग करा,
रागावणे, मारहाण करणे, त्रास देणे, वाईट काम करणे, चोऱ्यामाऱ्या करणे ही सर्व
महापाप आहेत”
प्रश्न:-
या ज्ञानामध्ये
कोणती मुले तीव्र गतीने जाऊ शकतात? कोणाचा घाटा होतो?
उत्तर:-
जे आपला पोतामेल ठेवतात ते या ज्ञानामध्ये खूप तीव्र गतीने पुढे जाऊ शकतात. घाटा
त्यांचा होतो जे देही-अभिमानी राहत नाहीत. बाबा म्हणतात व्यापारी लोकांना पोतामेल
काढण्याची सवय असते, ते इथे देखील तीव्र गतीने जाऊ शकतात.
गीत:-
मुखड़ा देख ले
प्राणी…
ओम शांती।
रुहानी पार्टधारी मुलांप्रती बाबा समजावून सांगत आहेत कारण रुहच (आत्माच) बेहदच्या
नाटकामध्ये पार्ट बजावत आहे. आहे तर मनुष्यांचाच ना. मुले यावेळी पुरुषार्थ करत
आहेत. भले वेद-शास्त्र शिकतात, शिवाची पूजा करतात परंतु बाबा म्हणतात यांच्या पैकी
कोणीही मला प्राप्त करू शकत नाहीत कारण भक्ती आहेच उतरती कला. ज्ञानानेच सद्गती होते
तर जरूर कोणाद्वारे उतरत देखील असतील. हा एक खेळ आहे, ज्याला कोणीही जाणत नाहीत.
शिवलिंग जेव्हा पूजतात तेव्हा त्याला ब्रह्म म्हणणार नाही. तेव्हा ते कोण आहेत
ज्याची पूजा करतात. त्याला देखील ईश्वर समजून त्याची पूजा करतात. तुम्ही सर्वप्रथम
जेव्हा भक्तीची सुरुवात करता तेव्हा शिवलिंगाला हिऱ्याचे बनवता. आता तर गरीब बनले
आहात तर दगडाचे बनवता. हिऱ्याचे लिंग त्या काळामध्ये ४-५ हजाराचे असेल. आता तर
त्याची किंमत ५-७ लाख रुपये असेल. असे हिरे आता मुश्किलीने मिळतात. पत्थर-बुद्धी
बनले आहेत त्यामुळे ज्ञानाशिवाय पूजा देखील दगडाची करतात. जेव्हा ज्ञान असते तेव्हा
तुम्ही पूजा करत नाही. चैतन्य सन्मुख आहेत, त्यांचीच तुम्ही आठवण करता. जाणता
आठवणीने विकर्म विनाश होतील. गाण्यामध्ये देखील सांगतात - माझ्या मुलांनो, प्राणी
म्हटले जाते आत्म्याला. प्राण निघून गेला तर जणू प्रेत आहे. आत्मा निघून जाते. आत्मा
अविनाशी आहे. आत्मा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा चैतन्य आहे. बाबा म्हणतात
- ‘हे आत्म्यांनो - स्वतःला तपासून पहा की, माझ्यामध्ये कितपत दैवी गुणांची धारणा
झाली आहे ? कोणता विकार तर नाही आहे ना? चोरीमारी इत्यादीचा कोणता आसुरी गुण तर नाही
आहे ना? आसुरी काम केल्यामुळे कोसळाल. इतका दर्जा (पद) मिळवू शकणार नाही. खराब
सवयीला जरूर काढून टाकायचे आहे. देवता कधी कोणावर रागावत नाहीत. इथे असुरांकडून किती
मार खातात कारण तुम्ही दैवी संप्रदाय बनता तर माया किती शत्रू बनते. मायेचे अवगुण
काम करतात. मारणे, त्रास देणे, वाईट काम करणे ही सर्व पापे आहेत. तुम्हा मुलांना तर
खूप शुद्ध राहिले पाहिजे. चोरीमारी इत्यादी करणे तर महान पाप आहे. बाबांकडे तुम्ही
प्रतिज्ञा करत आला आहात - ‘बाबा, माझे तर एक तुम्हीच दुसरे कोणीही नाही. मी तुमचीच
आठवण करणार’. भक्ती मार्गामध्ये भले गातात परंतु त्यांना हे माहित नाही आहे की,
आठवणीने काय होते. ते तर बाबांना जाणतच नाहीत. एकीकडे म्हणतात नावा-रुपापासून न्यारे
आहेत, आणि दुसरीकडे मग लिंगाची पूजा करतात. तुम्हाला नीट समजून घेऊन मग इतरांना
समजावून सांगायचे आहे. बाबा म्हणतात - हे देखील जज करा ठरवा की, महान-आत्मा कोणाला
म्हणावे? श्रीकृष्ण जो छोटा मुलगा स्वर्गाचा प्रिन्स आहे, तो महात्मा आहे का आजकालचे
कलियुगी मनुष्य? तो विकारातून जन्म घेत नाही ना. ती आहे निर्विकारी दुनिया. ही आहे
विकारी दुनिया. निर्विकारीला अनेक टायटल (उपाध्या देऊ शकतात). विकारीचे काय टायटल
आहे? श्रेष्ठाचारी तर एक बाबाच बनवतात. ते आहेत सर्वात उच्च ते उच्च आणि सर्व
मनुष्य पार्टधारी आहेत तर पार्टमध्ये जरूर यावे लागेल. सतयुग आहे श्रेष्ठ मनुष्यांची
दुनिया. पशु-प्राणी इत्यादी सगळे श्रेष्ठ आहेत. तिथे माया रावणच नाहीये. तिथे असे
कोणी तमोगुणी पशु-प्राणी असत नाहीत. सतयुगामध्ये तर विकाराचे नावही नाही. मग तिथे
मुले कशी जन्माला येतात! हे देखील तुम्ही मुले जाणता. तिथे विकार असत नाहीत, तिथे
आहे योगबल, बाबा म्हणतात - तुम्हाला देवता बनवितो तर स्वतःची पूर्ण तपासणी करा.
मेहनती शिवाय विश्वाचा मालक थोडेच बनू शकाल.
जशी तुमची आत्मा बिंदू
आहे तसे बाबा देखील बिंदू आहेत. यामध्ये गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. कोणी
म्हणतात - आपण पहावे. बाबा म्हणतात - पाहणाऱ्यांची तर तुम्ही खूप पूजा केलीत. काहीच
फायदा झाला नाही. आता यथार्थ रीतीने मी तुम्हाला समजावून सांगतो. माझ्यामध्ये सर्व
पार्ट भरलेला आहे. सुप्रीम सोल आहे ना, सुप्रीम फादर. कोणताही मुलगा आपल्या लौकिक
पित्याला असे म्हणणार नाही. एकालाच म्हटले जाते. संन्याशांना तर मुलेच नसतात जी पिता
म्हणतील. हे तर सर्व आत्म्यांचे पिता आहेत, जे वारसा देतात. त्यांचा तर काही गृहस्थ
आश्रम नाही आहे. बाबा बसून समजावून सांगतात - तुम्हीच ८४ जन्म भोगले आहेत.
सर्वप्रथम तुम्ही सतोप्रधान होता मग खाली उतरत आला आहात. आता कोणी स्वतःला सुप्रीम
थोडेच म्हणतील, आता तर नीच समजतात. बाबा वारंवार समजावून सांगतात मूळ गोष्ट आहे की
स्वतःमध्ये तपासून बघा की, माझ्यामध्ये कोणते विकार तर नाहीत ना? रोज रात्री आपला
पोतामेल काढा. व्यापारी नेहमी पोतामेल काढतात. गव्हर्मेंट सर्व्हंट पोतामेल काढू
शकत नाहीत. त्यांना तर ठराविक पगार मिळतो. या ज्ञान मार्गामध्ये देखील व्यापारी लोक
तीव्र गतीने पुढे जातात, शिकले-सवरलेले ऑफिसर्स इतके जात नाहीत. व्यापारामध्ये तर
आज ५० कमावले, उद्या ६० कमावतील. कधी घाटा देखील होईल. गव्हर्मेंट नोकरदारांचा
फिक्स पगार असतो. या कमाईमध्ये सुद्धा जर देही-अभिमानी बनला नाहीत तर घाटा होईल.
माता काही व्यापार करत नाहीत. त्यांच्यासाठी मग आणखीनच सोपे आहे. कन्यांसाठी देखील
सोपे आहे कारण मातांना तर शिडी उतरावी लागते. बलिहारी त्यांची ज्या मेहनत करतात.
कन्या तर विकारामध्ये गेल्याच नाहीत तर मग सोडायचे तरी काय. पुरुषांना तर मेहनत
करावी लागते. कुटुंब परिवाराचा सांभाळ करावा लागतो. शिडी जी चढले आहेत ती उतरावी
लागते. सारखे-सारखे माया थप्पड मारून खाली पाडते. आता तुम्ही बी.के. बनले आहात.
कुमारी तर पवित्रच असतात. सर्वात जास्त असते पतीचे प्रेम. तुम्हाला तर पतींचाही पती
(परमात्म्या) ची आठवण करायची आहे आणि सर्वांना विसरायचे आहे. आई-वडिलांचा मुलांमध्ये
मोह असतो. मुले तर आहेतच अजाण. लग्नानंतर मोह सुरु होतो. आधी पत्नी वर प्रेम जडते
आणि मग विकारांमध्ये ढकलण्याच्या शिडीची सुरुवात होते. कुमारी निर्विकारी असते तर
पुजली जाते. तुमचे नाव आहे बी. के. तुम्ही महिमा लायक बनून पूजन लायक बनता. बाबाच
तुमचे टीचर देखील आहेत. तर तुम्हा मुलांना नशा असला पाहिजे, आपण स्टुडंट आहोत.
भगवान जरूर भगवान-भगवतीच बनवतील. फक्त समजावून सांगितले जाते - भगवान एकच आहेत. बाकी
सर्व आहेत भाऊ-भाऊ. दुसरे कोणतेही नाते नाही. प्रजापिता ब्रह्माद्वारे रचना होते
नंतर मग वृद्धी होते. आत्म्यांची वृद्धी म्हणता येणार नाही. वृद्धी मनुष्यांची होते.
आत्म्यांची संख्या तर लिमिटेड आहे. भरपूर येत राहतात. जोपर्यंत तिथे (परमधाममध्ये
आत्मे) आहेत, तोपर्यंत येत राहतील. झाड वाढत राहील. असे नाही की वाळून जाईल. याची
तुलना वडाच्या झाडासोबत केली जाते. फाऊंडेशन राहिलेले नाही. बाकी पूर्ण झाड उभे आहे.
तुमचे देखील असेच आहे. फाऊंडेशन राहिलेले नाही. काही ना काही निशाण्या बाकी आहेत.
अजूनपर्यंत देखील मंदिरे बनवत राहतात. लोकांना थोडेच ठाऊक आहे की, देवतांचे राज्य
कधी होते. आणि मग कुठे गेले? हे नॉलेज तुम्हा ब्राह्मणांनाच आहे. मनुष्यांना हे
माहित नाहीये की, परमात्म्याचे स्वरूप बिंदू आहे. गीतेमध्ये लिहिले आहे की, ते अखंड
ज्योती स्वरूप आहेत. पूर्वी अनेकांना साक्षात्कार होत असे, भावने अनुसार. खूप
लाल-लाल होत असत. बस्स, आम्ही सहन करू शकत नाही. आता तो तर साक्षात्कार होता. बाबा
म्हणतात साक्षात्काराने काही कल्याण होत नाही. इथे तर मुख्य आहे आठवणीची यात्रा. जसा
पारा निसटून जातो ना. आठवण देखील सारखी-सारखी निसटून जाते. किती इच्छा असते की
बाबांची आठवण करावी परंतु दुसरे-दुसरे विचार येत राहतात. यामध्येच तुमची रेस (शर्यत)
आहे. असे नाही की एका झटक्यात पापे नष्ट होतील. वेळ लागतो. कर्मातीत अवस्था झाली तर
मग हे शरीरच राहणार नाही. परंतु आता कोणी कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहचू शकत नाहीत.
मग त्यांना सतयुगी शरीर पाहिजे. तर तुम्हा मुलांना आता बाबांचीच आठवण करायची आहे.
स्वतःला बघायचे आहे - माझ्याकडून कोणते वाईट काम तर होत नाही ना? पोतामेल जरूर
ठेवायचा आहे. असे व्यापारी एका झटक्यात श्रीमंत बनू शकतात.
बाबांकडे जे नॉलेज आहे
ते देत आहेत. बाबा म्हणतात माझ्या आत्म्यामध्ये हे ज्ञान नोंदलेले आहे. हुबेहुब
तुम्हाला तेच सांगतील जे कल्पापूर्वी ज्ञान दिले होते. मुलांनाच समजावून सांगतील,
बाकीचे काय जाणणार. तुम्ही या सृष्टीचक्राला जाणता, यामध्ये सर्व ॲक्टर्सचा पार्ट
नोंदलेला आहे. अदला-बदली होऊ शकत नाही. ना कोणाची सुटका होऊ शकते. हा, बाकीचा वेळ
मुक्ती मिळते. तुम्ही तर ऑलराउंडर आहात. ८४ जन्म घेता. बाकी सर्वजण आपल्या घरी (परमधाम
मध्ये) असतील नंतर मागाहून येतील. मोक्षाची इच्छा ठेवणारे इथे येणारही नाहीत. ते मग
शेवटी निघून जातील. ज्ञान कधी ऐकणारही नाहीत. मच्छरांप्रमाणे आले आणि गेले. तुम्ही
तर ड्रामा अनुसार शिकता. तुम्ही जाणता बाबांनी ५००० वर्षांपूर्वी देखील असा राजयोग
शिकवला होता. तुम्ही मग इतरांना समजावून सांगता की शिवबाबा असे म्हणतात. आता तुम्ही
जाणता आपण किती उच्च होतो, आता किती नीच बनलो आहोत. पुन्हा बाबा उच्च बनवत आहेत तर
असा पुरुषार्थ तर केला पाहिजे ना. इथे तुम्ही येता रिफ्रेश होण्यासाठी. याचे नावच
पडले आहे मधुबन. तुमच्या कलकत्त्यामध्ये अथवा मुंबईमध्ये थोडीच मुरली चालते.
मधुबनमधेच मुरली वाजते. मुरली ऐकण्यासाठी बाबांकडे यावे लागते रिफ्रेश होण्यासाठी.
नवीन-नवीन पॉईंट्स निघत राहतात. सन्मुख ऐकल्याने तर फील करता, खूप फरक पडतो. पुढे
चालून अनेक पार्ट बघायचे आहेत. बाबांनी आधीच सर्व सांगितले तर त्यातील टेस्ट (मजा)
निघून जाईल. हळू-हळू इमर्ज होत जाते. एक सेकंद देखील दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही.
बाबा आले आहेत रुहानी सेवा करण्यासाठी तर मुलांचे देखील रुहानी सेवा करणे हे
कर्तव्य आहे. कमीतकमी एवढे तर सांगा - ‘बाबांची आठवण करा आणि पवित्र बना’.
पवित्रतेमध्येच फेल होतात कारण आठवण करत नाहीत. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे.
आपण बेहदच्या बाबांच्या सन्मुख बसलो आहोत ज्यांना कोणीही जाणत नाहीत. ज्ञानाचा सागर
ते शिवबाबाच आहेत. देहधारी मधून बुद्धीयोग काढून टाकला पाहिजे. शिवबाबांचा हा रथ आहे.
याचा रिगार्ड (आदर) ठेवला नाहीत तर धर्मराजाकडून खूप दांडे खावे लागतील. मोठयांचा
रिगार्ड तर ठेवायचा आहे ना. आदि देवाचा किती रिगार्ड ठेवतात. जड चित्राचा एवढा
रिगार्ड आहे तर चैतन्यचा किती ठेवला पाहिजे. अच्छा !
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आतमध्ये
स्वतःची तपासणी करून दैवी गुण धारण करायचे आहेत. वाईट सवयींना काढायचे आहे.
प्रतिज्ञा करायची आहे - ‘बाबा, आम्ही कधीही वाईट काम करणार नाही’.
२) कर्मातीत अवस्थेला
प्राप्त करण्यासाठी आठवणीची रेस करायची आहे. रुहानी सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे.
मोठ्यांचा रिगार्ड ठेवायचा आहे.
वरदान:-
फॉलो फादरच्या
पाठाद्वारे अवघड गोष्टीला सोपे बनविणारे तीव्र पुरुषार्थी भव
अवघड गोष्टीला सोपे
बनविण्यासाठी किंवा लास्ट पुरुषार्थामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी पहिला पाठ आहे
“फॉलो फादर”, हा पहिला पाठच लास्ट स्टेजला समीप आणणारा आहे. या पाठामुळे अभूल, एकरस
आणि तीव्र पुरुषार्थी बनाल कारण कोणत्याही गोष्टीमध्ये अवघड तेव्हा वाटते जेव्हा
फॉलो करण्याऐवजी आपलेच डोके चालवता. यामुळे आपल्याच संकल्पाच्या जाळ्यामध्ये अडकून
पडता आणि मग वेळही लागतो आणि शक्ती देखील लागते. जर फॉलो करत जाल तर वेळ आणि शक्ती
दोन्ही वाचतील, जमा होतील.
बोधवाक्य:-
सच्चाई, सफाईला
धारण करण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
जितके स्वतःला मनसा
सेवेमध्ये बिझी ठेवाल तितके सहजच मायाजीत बनाल. फक्त स्वतःप्रति भावुक बनू नका परंतु
दुसऱ्यांना देखील शुभ भावना आणि शुभ कामनेद्वारे परिवर्तित करण्याची सेवा करा. भावना
आणि ज्ञान, स्नेह आणि योग दोघांचाही बॅलन्स असावा. कल्याणकारी तर बनला आहात आता
बेहद विश्व कल्याणकारी बना.