13-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वात पहिल्यांदा सर्वांकडून अल्फचा धडा पक्का करून घ्या, तुम्ही आत्मा भाऊ-भाऊ आहात”

प्रश्न:-
कोणत्या एका गोष्टीमध्ये श्रीमत हे मनुष्य मताच्या एकदम उलट आहे?

उत्तर:-
मनुष्य मत म्हणते की आम्ही मोक्ष प्राप्त करणार. श्रीमत म्हणते हा ड्रामा अनादि अविनाशी आहे. कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. भले कोणी म्हणेल की, हा पार्ट बजावणे मला आवडत नाही. परंतु यामध्ये काहीही करू शकत नाही. पार्ट बजावण्यासाठी यायचेच आहे. श्रीमतच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. मनुष्य मते तर अनेक प्रकारची आहेत.

ओम शांती।
आता मुले हे तर जाणतात की आम्ही बाबांच्या समोर बसले आहोत. बाबासुद्धा जाणतात की मुले माझ्या समोर बसली आहेत. तुम्ही मुले हे देखील जाणता बाबा आम्हाला शिक्षण देतात जे मग इतरांना द्यायचे आहे. सर्वात पहिले तर बाबांचाच परिचय द्यायचा आहे कारण सर्वच बाबांना आणि बाबांच्या शिक्षणाला विसरलेले आहेत. आता बाबा जे शिकवतात ते शिक्षण पुन्हा ५ हजार वर्षांनंतरच मिळेल. हे ज्ञान इतर कोणालाही नाही. मुख्य आहे बाबांचा परिचय देणे त्यानंतर हे सर्व समजावून सांगायचे आहे. आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत. संपूर्ण दुनियेतील जे सर्व आत्मे आहेत ते सर्व आपसामध्ये भाऊ-भाऊ आहेत. सर्वजण स्वतःला मिळालेला पार्ट या शरीराद्वारे बजावतात. आता तर बाबा आले आहेत नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. परंतु आता आपण सर्व भाऊ पतित आहोत, एकही पावन नाही. सर्व पतितांना पावन बनविणारे एक बाबाच आहेत. ही आहेच पतित विकारी रावणाची दुनिया. रावणाचा अर्थच आहे - ५ विकार स्त्रीमध्ये, ५ विकार पुरुषामध्ये. बाबा अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. तुम्ही देखील असे समजावून सांगू शकता. तर सर्वात पहिले हे समजावून सांगा की, ‘आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत, सर्व भाऊ-भाऊ आहेत’. आणि मग विचारा हे बरोबर आहे? तर मग लिहा - आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत. आम्हा सर्वांचे पिता देखील एकच आहेत. आम्हा सर्व आत्म्यांचे ते सुप्रीम सोल (परम आत्मा) आहेत. त्यांना फादर म्हटले जाते. हे त्यांच्या बुद्धीमध्ये पक्के बसवा तर सर्वव्यापी इत्यादीचा कचरा डोक्यातून निघून जाईल. पहिले अल्फ विषयी शिकायचे आहे. सांगा, ‘बसून पहिले हे व्यवस्थित लिहा - पूर्वी मी ईश्वराला सर्वव्यापी म्हणत होतो, आता समजलो आहे ईश्वर सर्वव्यापी नाही. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत’. सर्व आत्मे म्हणतात गॉडफादर, परमपिता परमात्मा, अल्ला. पहिला तर हा निश्चय जागृत करायचा आहे की आपण सर्व आत्मा आहोत, परमात्मा नाही. ना आमच्यामध्ये परमात्मा व्याप्त आहे, सर्वांमध्ये आत्मा व्याप्त आहे. आत्मा शरीराच्या सहाय्याने पार्ट बजावते, हे सर्व पक्के करून घ्या. अच्छा, त्यानंतर - ते बाबा सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. बाबाच शिक्षकाच्या रूपामध्ये येऊन समजावून सांगतात. लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. हे चक्र अनादि पूर्व नियोजित आहे. हे समान भागात कसे विभागलेले आहे - हे जाणून घ्यावे लागेल. सतयुग-त्रेता होऊन गेले, हे लिहून घ्या. त्याला म्हटले जाते स्वर्ग आणि सेमी स्वर्ग. तिथे देवी-देवतांचे राज्य चालते. सतयुगामध्ये आहेत १६ कला, त्रेतामध्ये आहेत १४ कला. सतयुगाचा प्रभाव खूप जास्त आहे. नावच आहे स्वर्ग, हेवन. नव्या दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. त्याचीच महिमा करायची आहे. नवीन दुनियेमध्ये आहेच मुळी एक आदि सनातन देवी-देवता धर्म. पटवून देण्यासाठी तुमच्याकडे चित्रे देखील आहेत. हे सृष्टीचे चक्र फिरत रहाते. या कल्पाचा कालावधीच ५ हजार वर्षे आहे. आता सूर्यवंशी-चंद्रवंशी तर बुद्धीमध्ये पक्के झाले. विष्णूपुरीच बदलून राम-सीता पुरी बनते. त्यांची देखील डिनायस्टी (घराणे) चालते ना. दोन युगे पूर्ण झाली नंतर येते द्वापरयुग, रावणाचे राज्य. देवता वाम मार्गामध्ये जातात त्यामुळे विकारी व्यवस्था बनते. सतयुग-त्रेतामध्ये सर्व निर्विकारी असतात. एक आदि सनातन देवी-देवता धर्म असतो. चित्र सुद्धा दाखवायचे आहे, तोंडी देखील समजावून सांगायचे आहे. बाबा आम्हाला टीचर बनून असे शिकवतात. बाबा आपला परिचय आपणच येऊन देतात. ते स्वतः म्हणतात - मी येतो पतितांना पावन बनविण्याकरिता त्यामुळे मला शरीर तर अवश्य पाहिजे. नाही तर बोलणार कसा. मी चैतन्य आहे, सत्य आहे आणि अमर आहे. सतो, रजो, तमोमध्ये आत्मा येते. आत्माच पतित, आत्माच पावन बनते. आत्म्यामध्येच सर्व संस्कार आहेत. भूतकाळातील कर्मांचे किंवा विकर्मांचे संस्कार आत्माच घेऊन येते. सतयुगामध्ये तर विकर्म होत नाहीत, कर्म करतात, पार्ट बजावतात. परंतु ते कर्म अकर्म बनते. गीतेमध्ये देखील हे शब्द आहेत. आता तुम्हाला प्रत्यक्षात समजत आहे. तुम्ही जाणता की बाबा आलेले आहेत जुन्या दुनियेला बदलून नवी दुनिया बनविण्यासाठी, जिथे कर्म अकर्म होतात. त्यालाच सतयुग म्हटले जाते आणि मग इथे कर्म विकर्म बनतात, ज्याला कलियुग म्हटले जाते. तुम्ही आता आहात संगमयुगावर. बाबा दोन्ही बाजूंच्या गोष्टी सांगतात. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या - पिता टिचरने काय समजावून सांगितले? अच्छा, बाकी राहिले गुरूचे कर्तव्य, त्यांना बोलावलेच आहे की येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. आत्मा पावन बनते मग शरीर देखील पावन बनते. जसे सोने, तसाच दागिना देखील बनतो. २४ कॅरेटचे सोने घेतले आणि त्यामध्ये मिश्रधातू मिसळला नाही तर दागिना देखील असा सतोप्रधान बनेल. मिश्रधातू मिसळल्यामुळे मग तमोप्रधान बनतो कारण अशुद्धता मिसळली जाते ना. पहिला भारत २४ कॅरेट शुद्ध सोन्याची चिडिया होता अर्थात सतोप्रधान नवी दुनिया होती आणि आता तमोप्रधान आहे. अगोदर शुद्ध सोने असतो. नवीन दुनिया पवित्र, जुनी दुनिया अपवित्र. अशुद्धता मिसळत राहते. हे बाबाच समजावून सांगतात इतर कोणीही मनुष्य, गुरू लोक जाणत नाहीत. बोलावतात येऊन पावन बनवा. सद्गुरुचे काम आहे वानप्रस्थ अवस्थेमध्ये मनुष्यांना संसारापासून विरक्त करणे. तर हे सर्व ज्ञान ड्रामा प्लॅन अनुसार बाबाच येऊन देतात. ते आहेत मनुष्य सृष्टीचे बीजरूप. तेच पूर्ण वृक्षाचे नॉलेज समजावून सांगतात. शिवबाबांचे नाव सदैव ‘शिव’च असते. बाकी सर्व आत्मे येतात पार्ट बजावण्यासाठी, त्यामुळे वेगवेगळी नावे धारण करतात. बाबांना बोलवतात, परंतु त्यांना ओळखत नाहीत - ते तुम्हाला पावन दुनियेत घेऊन जाण्यासाठी कसे भाग्यशाली रथामध्ये येतात. तर बाबा समजावून सांगतात - ‘मी त्यांच्या तनामध्ये येतो, जे अनेक जन्मांमधील शेवटच्या जन्मामध्ये आहेत आणि पूर्ण ८४ जन्म घेतात. राजांचाही राजा बनविण्यासाठी या भाग्यशाली रथामध्ये प्रवेश करावा लागतो. पहिल्या नंबरवर आहे श्रीकृष्ण. तो आहे नवीन दुनियेचा मालक. मग तोच खाली उतरतो. सूर्यवंशी, चंद्रवंशी, नंतर मग वैश्य, शूद्र वंशी आणि मग ब्रह्मा वंशी बनतात. गोल्डन पासून सिल्व्हर... आता पुन्हा तुम्ही आयर्न पासून गोल्डन बनत आहात. बाबा म्हणतात - मज एका आपल्या बाबांची आठवण करा. ज्यांच्यामध्ये मी प्रवेश केला आहे, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्यामध्ये तर थोडे देखील ज्ञान नव्हते. यांच्यामध्ये मी प्रवेश करतो, म्हणून यांना भाग्यशाली रथ म्हटले जाते. बाबा स्वतः सांगतात - ‘मी यांच्या अनेक जन्मांच्या शेवटी येतो’. गीतेमध्ये अचूक शब्द आहेत. गीतेलाच सर्वशास्त्रमई शिरोमणी म्हटले जाते.

या संगमयुगावरच बाबा येऊन ब्राह्मण कुळाची आणि देवी-देवता कुळाची स्थापना करतात. इतरांबद्दल तर सर्वांना माहिती आहेच, यांच्या बद्दल कोणाला माहिती नाही. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात संगमयुगावरच बाबा येतात. बाबा म्हणतात मी बीजरूप आहे. श्रीकृष्ण तर आहेच सतयुगाचा रहिवासी. त्याला दुसऱ्या ठिकाणी तर कोणी बघू शकणार नाही. पुनर्जन्मामध्ये तर नाव, रूप, देश, काळ सर्व बदलते. पहिल्यांदा छोटा सुंदर मुलगा असतो मग मोठा होतो मग ते शरीर सोडून दुसरे छोटे शरीर घेतो. हा पूर्वनियोजित खेळ आहे. ड्रामामध्ये फिक्स आहे. दुसऱ्या शरीरामध्ये काही त्याला श्रीकृष्ण म्हणणार नाही. त्या दुसऱ्या शरीराचे नाव इत्यादी मग दुसरे असेल. वेळ, चेहरेपट्टी, तिथी, तारीख इत्यादी सर्व बदलते. जगाच्या इतिहास-भूगोलाची हुबेहूब पुनरावृत्ती म्हटले जाते. तर हा ड्रामा रिपीट होत राहतो. सतो, रजो, तमो मध्ये यायचेच आहे. सृष्टीचे नाव, युगाचे नाव सर्व बदलत रहाते. आता हे आहे संगमयुग. मी येतोच संगमावर. हे आपल्याला आतून पक्के करायचे आहे. बाबा आमचे पिता, शिक्षक, गुरू आहेत जे मग सतोप्रधान बनण्याची खूप चांगली युक्ती सांगतात. गीतेमध्ये देखील आहे - ‘देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा’. आपल्या घरी परत जरूर जायचे आहे. भगवंताकडे जाण्याकरिता भक्तीमार्गामध्ये किती मेहनत करतात. ते आहे मुक्तीधाम. कर्मातून मुक्त होऊन आपण निराकारी दुनियेमध्ये जाऊन बसतो. पार्टधारी घरी गेला म्हणजे पार्टमधून मुक्त झाला. सर्वांची इच्छा असते आपल्याला मुक्ती मिळावी. परंतु मुक्ती तर कोणाला मिळू शकत नाही. हा ड्रामा अनादि अविनाशी आहे. कोणी म्हणेल हा पार्ट बजावणे मला आवडत नाही, परंतु यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही. हा ड्रामा अनादि बनलेला आहे. एकही मुक्तीला प्राप्त करू शकत नाही. ती सर्व आहेत अनेक प्रकारची मनुष्य मते. हे आहे श्रीमत, श्रेष्ठ बनवण्याकरिता. मनुष्याला श्रेष्ठ म्हणणार नाही. देवतांना श्रेष्ठ म्हटले जाते. त्यांच्या समोर सर्व नमस्कार करतात. म्हणजे ते श्रेष्ठ झाले ना. परंतु हे देखील कोणाला माहीत नाहीये. आता तुम्ही समजता की ८४ जन्म तर घ्यायचेच आहेत. श्रीकृष्ण देवता आहे, वैकुंठाचा राजकुमार आहे. तो इथे कसा येईल? ना त्याने गीता ऐकवली. फक्त देवता होता म्हणून सर्व लोक त्याचे पूजन करतात. देवता आहेत पावन, स्वतः पतित आहेत. म्हणतात देखील - ‘मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही…’. तुम्ही आम्हाला असे श्रेष्ठ बनवा. ‘शिव’च्या समोर जाऊन म्हणतील - आम्हाला मुक्ती द्या. ते (बाबा) कधीही जीवनमुक्त, जीवनबंधामध्ये येतच नाहीत म्हणून त्यांना बोलावतात - मुक्ती द्या. जीवनमुक्ती देखील तेच देतात.

आता तुम्ही समजता बाबा आणि मम्माची आपण सर्व मुले आहोत, त्यांच्याकडून आम्हाला अथाह धन मिळते. मनुष्य तर अडाणी असल्यासारखे मागत राहतात. अडाणी तर जरूर दुःखीच असणार ना. भरपूर दुःखे भोगावी लागतात. तर या सर्व गोष्टी मुलांनी बुद्धीत ठेवायच्या आहेत. एका बेहदच्या बाबांना न जाणल्याकारणाने आपसामध्ये भांडत राहतात. अनाथ बनले आहेत. ते असतात हदचे अनाथ, हे आहेत बेहदचे अनाथ. बाबा नवीन दुनिया स्थापन करतात. आता आहेच पतित आत्म्यांची पतित दुनिया. पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते, जुनी दुनिया कलियुगाला. तर या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये आहेत ना. जुन्या दुनियेचा विनाश होईल आणि मग आपण नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर होणार. आता आपण टेम्पररी संगमयुगावर उभे आहोत. जुन्या दुनिये पासून नवीन दुनिया बनत आहे. नवीन दुनियेबद्दल देखील माहिती आहे. तुमची बुद्धी आता नवीन दुनियेमध्ये गेली पाहिजे. उठता-बसता हेच बुद्धीमध्ये रहावे की आम्ही शिकत आहोत. बाबा आम्हाला शिकवत आहेत. विद्यार्थ्यांच्या हे लक्षात असले पाहिजे तरी देखील ती आठवण नंबरवार पुरुषार्था नुसार असते. बाबा प्रेमपूर्वक आठवण देखील नंबरवार पुरुषार्थानुसार देतात. चांगला अभ्यास करणाऱ्यावर टीचर नक्कीच जास्त प्रेम करतील. किती फरक पडतो. आता बाबा तर समजावून सांगत राहतात. मुलांनी धारणा करायची आहे. एका बाबांशिवाय इतर कुठेही बुद्धी जाऊ नये. बाबांची आठवण केली नाहीत तर पापे कशी नष्ट होतील. माया घडोघडी तुमचा बुद्धियोग तोडेल. माया फार धोका देते. ब्रह्मा बाबा आपले उदाहरण देतात - ‘भक्तीमार्गामध्ये मी लक्ष्मीची खूप पूजा करत होतो. चित्रामध्ये बघितले लक्ष्मी पाय चेपत होती तर तिला मुक्त केले (चित्रकाराकडून पाय चेपतानाचे चित्र बदलून घेतले). बाबांच्या आठवणीमध्ये बसल्यावर बुद्धी इकडे-तिकडे गेली तर स्वतःला थप्पड मारत होतो - बुद्धी अशी दुसरीकडे का जाते? शेवटी विनाश देखील पाहिला, स्थापना देखील पाहिली. साक्षात्काराची इच्छा पूर्ण झाली, समजलो आता ही नवी दुनिया आल्यावर मी हा बनणार. बाकी ही जुनी दुनिया तर नष्टच होणार आहे. निश्चय पक्का झाला. आपल्या राज्याचा देखील साक्षात्कार झाला - जर का स्वर्गाची राजाई मिळत आहे तर मग या रावणाच्या राज्याचे काय करु!’ ही झाली ईश्वरीय बुद्धी. ईश्वराने प्रवेश करून ही बुद्धी दिली. ज्ञानाचा कलश तर मातांना मिळतो, तर मातांनाच सर्व काही देऊन टाकले, तुम्ही कारभार सांभाळा, सर्वांना शिकवा. शिकवता-शिकवता इथपर्यंत आलो. एकमेकांना ज्ञान ऐकवत-ऐकवत आता बघा किती झाले आहेत. आत्मा पवित्र होत जाते मग आत्म्याला शरीर देखील पवित्र पाहिजे. समजते सुद्धा तरीही माया विसरायला लावते.

तुम्ही म्हणता ७ दिवस शिका तर म्हणतात उद्या येतो. दुसऱ्या दिवशी त्यांना माया नाहीसेच करून टाकते. येतच नाहीत. स्वयं भगवान शिकवत आहेत तरीही भगवंताकडून शिकत नाहीत! म्हणतात देखील - हो, नक्की येऊ परंतु माया दूर नेते. नियमितपणे येऊ देत नाही. ज्यांनी कल्पापूर्वी पुरुषार्थ केला होता ते नक्कीच करतील आणखी दुसरे कोणते दुकानही नाही. तुम्ही खूप पुरुषार्थ करता. मोठी-मोठी म्युझियम बनवता. ज्यांना कल्पापूर्वी समजले आहे त्यांनाच समजेल. विनाश होणारच आहे. स्थापना देखील होत जाते. आत्मा शिकून फर्स्टक्लास (पवित्र) शरीर घेईल. एम ऑब्जेक्ट हे आहे ना, हे आठवत का नाही. आता आपण आपल्या पुरुषार्था नुसार नवीन दुनियेमध्ये जातो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बुद्धीमध्ये नेहमी लक्षात रहावे की आता आपण थोड्या काळासाठी संगमयुगामध्ये बसलो आहोत, जुनी दुनिया नष्ट झाली की मग आपण नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर होणार त्यामुळे यामधून बुद्धियोग काढून टाकायचा आहे.

२) सर्व आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन कर्म, अकर्म, विकर्माची गुह्य गती ऐकवायची आहे, सर्व प्रथम अल्फ (बाबा) हाच पाठ पक्का करून घ्यायचा आहे.

वरदान:-
श्रेष्ठ प्राप्तीं च्या प्रत्यक्ष फळाद्वारे सदैव सुखसंपन्न, राहणारे एव्हरहेल्दी भव

संगमयुगावर आत्ता केले आणि आत्ता लगेच श्रेष्ठ प्राप्तीची अनुभूती झाली - हेच आहे प्रत्यक्ष फळ. सर्वात श्रेष्ठ फळ आहे समीपतेचा अनुभव होणे. आजकाल साकार दुनियेमध्ये म्हणतात की, फळ खा तर स्वस्थ रहाल. निरोगी राहण्याचे साधन फळ सांगतात आणि तुम्ही मुले प्रत्येक सेकंदाला प्रत्यक्ष फळ खातच राहता त्यामुळे कायम निरोगीच आहात. जर कोणी तुम्हाला विचारले की तुमची काय परिस्थिती आहे, तर सांगा की, ‘फरिश्त्याची चाल आहे आणि सुखसंपन्न आहोत’.

बोधवाक्य:-
सर्वांच्या आशिर्वादांच्या खजिन्याने संपन्न बना म्हणजे पुरुषार्थामध्ये मेहनत करावी लागणार नाही.