13-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आपले लक्ष्य (एम ऑब्जेक्ट) आणि लक्ष्य-दाता बाबांची आठवण करा तर दैवी गुण
येतील, कोणाला दुःख देणे, निंदा करणे, ही सर्व आसुरी लक्षणे आहेत”
प्रश्न:-
बाबांचे तुम्हा
मुलांवर खूप उत्कट प्रेम आहे, त्याची निशाणी काय आहे?
उत्तर:-
बाबांकडून जी गोड-गोड शिकवण मिळते, ही शिकवण देणे हीच त्यांच्या उत्कट प्रेमाची
निशाणी आहे. बाबांची पहिली शिकवण आहे - ‘गोड मुलांनो, श्रीमत सोडून इतर कोणतेही
उलटे-सुलटे काम करायचे नाही. २. तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही कधीही कायदा आपल्या
हातामध्ये घ्यायचा नाही. तुम्ही आपल्या मुखातून सदैव रत्न काढा, दगड नाही.
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. आता यांना (लक्ष्मी-नारायणाला) तर चांगल्या
रीतीने पाहता. हे आहे एम ऑब्जेक्ट अर्थात तुम्ही या घराण्याचे होता. किती
रात्रं-दिवसाचा फरक आहे म्हणूनच वारंवार यांना पहायचे आहे; मला असे बनायचे आहे.
यांची महिमा तर चांगल्या रीतीने जाणता. हे (लक्ष्मी-नारायणाचा फोटो) पॉकेटमध्ये
ठेवल्यानेच आनंद होईल. मनामध्ये जो संदेह राहतो, तो राहता कामा नये, याला
देह-अभिमान म्हटले जाते. देही-अभिमानी बनून या लक्ष्मी-नारायणाला पहाल तर समजेल की
आपण असे बनत आहोत, तर जरूर यांना पाहावे लागेल. बाबा समजावून सांगत आहेत तुम्हाला
असे बनायचे आहे. मध्याजी भव, यांना पहा, आठवा. दृष्टांतामध्ये सांगतात ना - त्याला
वाटले मी म्हैस आहे तर तो स्वतःला म्हैसच समजू लागला. तुम्ही जाणता हे (लक्ष्मी-नारायण
बनणे) आपले एम ऑब्जेक्ट आहे. असे बनायचे आहे. कसे बनणार? बाबांच्या आठवणीने.
प्रत्येकाने स्वतःला विचारा - खरोखरच मी यांना पाहून बाबांची आठवण करतोय का? हे तर
समजता की, बाबा आम्हाला देवता बनवतात. जितके शक्य होईल तेवढी आठवण केली पाहिजे. हे
तर बाबा म्हणतात की निरंतर आठवण राहू शकत नाही. परंतु पुरुषार्थ करायचा आहे. भले
गृहस्थ व्यवहारातील काम करताना यांची (लक्ष्मी-नारायणाची) आठवण कराल तर नक्कीच
बाबांची आठवण येईल. बाबांची आठवण कराल तर यांची जरूर आठवण येईल. आपल्याला असे बनायचे
आहे. संपूर्ण दिवस हाच ध्यास लागून रहावा. म्हणजे मग कधीही एकमेकांची निंदा करणार
नाही. हा असा आहे, अमका असा आहे… जे या गोष्टींच्या मागे लागतात ते कधीही उच्च पद
प्राप्त करू शकणार नाहीत. तसेच राहून जातात. किती सोपे करून सांगितले जाते. यांची (लक्ष्मी-नारायण)
आठवण करा, बाबांची आठवण करा म्हणजे तुम्ही नक्कीच असे बनाल. इथे तर तुम्ही समोर बसला
आहात, सर्वांच्या घरी हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र जरूर असले पाहिजे. किती अचूक
चित्र आहे. यांची आठवण कराल तर बाबांची आठवण येईल. संपूर्ण दिवस इतर गोष्टीं ऐवजी
हेच ऐकवत रहा. ‘अमका असा आहे, हे आहे…’ कोणाची निंदा करणे - याला द्विधा मनःस्थिती
म्हटले जाते. तुम्हाला आपली दैवी बुद्धी बनवायची आहे. कोणाला दुःख देणे, निंदा करणे,
चंचलपणा करणे - असा स्वभाव असता कामा नये. यामध्ये तर अर्धा कल्प राहिले आहात. आता
तुम्हा मुलांना किती गोड शिकवण मिळत आहे, यापेक्षा उच्च प्रेम दुसरे कुठलेच नाही.
श्रीमताला सोडून इतर कोणतेही उलटे-सुलटे काम करता कामा नये. बाबा ध्यानामध्ये
जाणाऱ्यांसाठी देखील डायरेक्शन देतात - ‘फक्त भोग लावून या’. बाबा असे तर सांगत
नाहीत की, वैकुंठामध्ये जा, रासक्रीडा इत्यादी करा. दुसऱ्या ठिकाणी गेलात तर समजा
की मायेची प्रवेशता झाली. मायेचे पहिल्या नंबरचे कर्तव्य आहे पतित बनविणे.
नियमबाह्य वर्तनाने खूप नुकसान होते. जर स्वतःला सावरले नाहीत, तर असे होऊ शकते की
खूप कडक सजा भोगावी लागेल. बाबा, बाबा आहेत तसेच धर्मराज सुद्धा आहेत. त्यांच्याकडे
बेहदचा हिशोब असतो. रावणाच्या जेलमध्ये किती वर्षे शिक्षा भोगावी लागली आहे. या
दुनियेमध्ये किती अपार दुःख आहे. आता बाबा म्हणतात बाकी सर्व गोष्टी विसरून एका
बाबांची आठवण करा बाकी सर्व शंका मनातून काढून टाका. विकारामध्ये कोण घेऊन जातात?
मायेची भुते. तुमचे एम ऑब्जेक्ट आहेच मुळी हे. राजयोग आहे ना. बाबांची आठवण
केल्यानेच हा वारसा मिळेल. तर मग या धंद्याला लागले पाहिजे. सर्व कचरा (विकार) आतून
काढून टाकले पाहिजेत. मायेने देखील कळस गाठला आहे. परंतु तिला उडवून लावत रहा. जितके
शक्य आहे तितके आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे. सध्या तरी निरंतर आठवण राहू शकत
नाही. शेवटी निरंतर अवस्थेपर्यंत याल तेव्हाच उच्च पद प्राप्त कराल. जर द्विधा
मन:स्थिती आहे, घाणेरडे विचार आहेत, तर उच्च पद मिळू शकणार नाही. मायेच्या आहारी
गेल्यानेच हार खातात.
बाबा समजावून सांगत
आहेत - ‘मुलांनो, खराब काम करून पराभूत होऊ नका. निंदा इत्यादी करता त्यामुळे तुमची
अतिशय वाईट गती झाली आहे. आता सद्गती होत आहे तर वाईट कर्म करु नका. बाबा बघतात की,
मायेने अगदी गळ्यापर्यंत गिळंकृत केले आहे. कळत देखील नाही. स्वतःला समजतात की आपण
खूप चांगल्या प्रकारे पुढे जात आहोत, परंतु नाही. बाबा समजावून सांगत आहेत - मनसा,
वाचा, कर्मणा मुखावाटे रत्नेच निघाली पाहिजेत. वाईट गोष्टी बोलणे दगडा समान आहे. आता
तुम्ही दगडापासून पारस बनत आहात तर मुखातून कधीही दगड (वाईट शब्द) निघता कामा नयेत.
बाबांना समजावून सांगावे लागते. बाबांचा अधिकार आहे मुलांना समजावून सांगणे. असे तर
नाही, भाऊ भावाला सावधान करतील. टीचरचे काम आहे शिकवण देणे. त्या काहीही सांगू
शकतात. विद्यार्थ्यांनी कायदा हातात घ्यायचा नाही. तुम्ही विद्यार्थी आहात ना. बाबा
समजावून सांगू शकतात, बाकी मुलांना तर बाबांचे डायरेक्शन आहे - एका बाबांची आठवण करा.
तुमचे नशीब आता उघडले आहे. श्रीमतावर चालला नाही तर तुमचे भाग्य बिघडून जाईल मग खूप
पश्चाताप करावा लागेल. बाबांच्या श्रीमतावर न चालल्याने एक तर सजा भोगाव्या लागतील,
आणि दुसरे पद सुद्धा भ्रष्ट होईल. जन्म-जन्मांतर, कल्प-कल्पांतराची बाजी (डाव) आहे.
बाबा येऊन शिकवत आहेत तर बुद्धीमध्ये रहायला हवे - बाबा आमचे टीचर आहेत,
ज्यांच्याकडून हे नवीन ज्ञान मिळत आहे की, स्वतःला आत्मा समजा. ‘आत्म्यांचे आणि
परमात्म्याचे मिलन’ असे म्हटले जाते. ५००० वर्षानंतर पुन्हा भेटणार, यामध्ये जितका
वारसा घेऊ इच्छिता तेवढा घेऊ शकता. नाहीतर पुष्कळ पश्चाताप होईल, रडाल. सर्व
साक्षात्कार होतील. शाळेमध्ये मुले ट्रान्सफर होतात (पुढे जातात) तर मागे
राहिलेल्यांना सर्वजण पाहतात. इथे देखील ट्रान्सफर होतात. तुम्ही जाणता इथून शरीर
सोडून मग सतयुगामध्ये जाऊन राजकुमारांच्या कॉलेजमध्ये भाषा शिकणार. तेथील (सतयुगामधील)
भाषा तर सर्वांनाच शिकावी लागते, मातृभाषा. बऱ्याचजणांना संपूर्ण ज्ञान नाही आहे आणि
नियमित अभ्यास सुद्धा करत नाहीत. एक-दोन वेळेला क्लास चुकवला तर मग क्लासला दांडी
मारण्याची सवय लागून जाते. मायेच्या गुलामांची संगत आहे ना. शिवबाबांचे भक्त थोडेच
आहेत. बाकी सर्व आहेत मायेचे गुलाम. तुम्ही शिवबाबांचे भक्त बनता तर माया सहन करू
शकत नाही, त्यामुळे अतिशय सावध राहिले पाहिजे. घाणेरड्या (विकारी) लोकांपासून खूप
जपून रहायचे आहे. हंस आणि बगळे आहेत ना. बाबांनी रात्री सुद्धा शिकवले आहे - दिवसभर
कोणाची ना कोणाची निंदा करणे, परचिंतन करणे, याला काही दैवी गुण म्हटले जात नाही.
देवता अशी कामे करत नाहीत. बाबा म्हणतात - ‘बाबा आणि वारशाची आठवण करा’; तरी देखील
निंदा करत राहतात. निंदा तर जन्म-जन्मांतर करत आले आहात. द्विधा मनःस्थिती तर असतेच.
हे देखील आतल्या आत द्वंद आहे. फुकटचा आपला खून करतात. अनेकांचे नुकसान करतात. अमका
असा आहे, यामध्ये तुमचे काय जाते. सर्वांचे मदतगार एक बाबा आहेत. आता तर श्रीमतावर
चालायचे आहे. मनुष्य मत एकदम घाणेरडे (विकारी) बनवते. एकमेकांची निंदा करत राहतात.
निंदा करणे हे आहे मायेचे भूत. ही आहेच पतित दुनिया. तुम्ही समजता की आता आपण
पतितापासून पावन बनत आहोत. तर हे सर्व अवगुण आहेत. समजावले जाते - आजपासून आपला कान
पकडायला पाहिजे की कधीही असे काम करणार नाही. जर काहीही असे पाहता तर बाबांना कळवले
पाहिजे. तुमचे काय जाते! तुम्ही एकमेकांची निंदा का करता! बाबा सर्व काही ऐकतात ना.
बाबांनी कानांचे आणि डोळ्यांचे लोन घेतले आहे ना. बाबा देखील पाहतात त्याच बरोबर हे
दादा (ब्रह्माबाबा) सुद्धा पाहतात. काही-काही जणांचे वर्तन, वातावरण तर एकदम
बेकायदेशीर असते. ज्याला वडील नसतात त्याला अनाथ म्हटले जाते. ते आपल्या पित्याला
सुद्धा जाणत नाहीत, आठवण सुद्धा करत नाहीत. सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडतात, त्यामुळे
आपलेच पद गमावून बसतात. जर तुम्ही श्रीमतावर चालत नसाल तर अनाथ आहात.
माता-पित्याच्या श्रीमतावर चालत नाहीत. ‘त्वमेव माताश्च पिता… बन्धू’ इत्यादी सर्व
बनतात.
परंतु ग्रेट-ग्रेट
ग्रँड फादरच (ब्रह्मा बाबाच) नसतील तर मग आई कुठून असणार, एवढे सुद्धा डोके नाही.
माया एकदम डोकेच फिरवून टाकते. बेहदच्या बाबांची आज्ञा मानत नाहीत तर सजा भोगावी
लागते. जरा सुद्धा सद्गती होत नाही. बाबा बघतात तर म्हणतील ना - यांची किती वाईट गती
होईल. ही तर तगर, रुईची फुले आहेत. ज्यांना कोणीही पसंत करत नाही. तर सुधारायला हवे
ना. नाहीतर पद-भ्रष्ट व्हाल. जन्म-जन्मांतरासाठी नुकसान होईल. परंतु देह-अभिमानी
असणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये जातच नाही. आत्म-अभिमानी मुलेच बाबांवर प्रेम करू शकतात.
बलिहार जाणे (आत्मसमर्पण करणे) काही मावशीचे घर नाहीये. मोठ-मोठ्या व्यक्ती काही
आत्मसमर्पण करू शकत नाहीत. त्यांना आत्मसमर्पण याचा अर्थ सुद्धा समजत नाही. हृदय
विदीर्ण होते. बरेच जण असे बंधनमुक्त सुद्धा आहेत. मुले इत्यादी कोणीही नाही.
म्हणतात - ‘बाबा, तुम्हीच आमचे सर्व काही आहात.’ असे फक्त तोंडाने बोलतात परंतु खरे
नाहीये. बाबांशी देखील खोटे बोलतात. समर्पित झालात तर आपला मोह काढून टाकला पाहिजे.
आता तर शेवट आहे त्यामुळे श्रीमतावर चालावे लागेल. संपत्ती इत्यादी पासून मोह काढून
टाकला पाहिजे. बरेच जण असे बंधन मुक्त आहेत. शिवबाबांना आपले बनवले आहे, दत्तक
घेतात ना. हे आमचे पिता, टीचर, सद्गुरु आहेत. आम्ही त्यांना आपले बनवतो, त्यांची
सर्व संपत्ती घेण्याकरिता. जे संतान बनले आहेत ते घराण्यामध्ये जरूर येतात. परंतु
त्यामध्ये मग पदे किती आहेत. किती दास-दासी आहेत. एकमेकांवर हुकूमत गाजवतात.
दासींमध्ये देखील नंबरवार बनतात. राज घराण्यामध्ये बाहेरचे दास-दासी तर येणार नाहीत.
जे बाबांचे बनले आहेत, त्यांनाच बनायचे आहे. अशीपण काही मुले आहेत ज्यांना एका
पैशाची सुद्धा अक्कल नाहीये.
बाबा असे तर म्हणत
नाहीत की मम्माची आठवण करा किंवा माझ्या रथाची (ब्रह्मा बाबांची) आठवण करा. बाबा
म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा
समजा’. बाबा समजावून सांगत आहेत की प्रीत ठेवायची आहे तर एकाशीच ठेवा तेव्हाच बेडा
(जीवनरुपी नाव) पार होईल. बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चाला. मोहोजीत राजाची एक कथा
सुद्धा आहे ना! पहिल्या नंबरवर आहेत मुले, मुलगा तर संपत्तीचा मालक बनेल. पत्नी तर
हाफ पार्टनर (अर्धांगिनी) आहे, मुलगा तर संपूर्ण मालक बनतो. तर बुद्धी त्या दिशेने
जाते, बाबांना संपूर्ण मालक बनवाल तर हे सर्व काही तुम्हाला देतील. देण्या-घेण्याची
गोष्टच नाही. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. भले तुम्ही ऐकता परंतु दुसऱ्या दिवशी
सर्व काही विसरायला होते. लक्षात राहील तर इतरांना सुद्धा समजावून सांगू शकाल.
बाबांची आठवण केल्यानेच तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. हे तर खूप सोपे आहे, फक्त बोलत
रहा; सर्वांना एम ऑब्जेक्ट सांगत रहा. विशाल बुद्धी असणारे तर लगेच समजून जातील.
शेवटी ही चित्रे इत्यादीच कामी येतील. या चित्रांमध्येच सर्व ज्ञान भरलेले आहे.
लक्ष्मी-नारायण आणि राधे-कृष्ण यांचा आपसात काय संबंध आहे? हे कोणीही जाणत नाहीत.
लक्ष्मी-नारायण तर जरूर अगोदर राजकुमार असतील. ‘बेगर टू प्रिन्स’ आहे ना! ‘बेगर टू
किंग’ असे म्हटले जात नाही. राजकुमारच नंतर राजा बनतात. हे तर खूप सोपे आहे परंतु
माया कोणालाही पकडते, कोणाची निंदा करणे, दोषारोप करणे, ही तर पुष्कळ जणांची सवय आहे.
दुसरे तर काही कामच नाही. बाबांची कधी आठवण करणार नाहीत. एकमेकांची निंदा करण्याचाच
उद्योग करतात. हा आहे मायेचा धडा. बाबांचा धडा तर एकदम सरळ आहे. शेवटी-शेवटी हे
संन्यासी इत्यादी जागे होतील, म्हणतील की, ‘ज्ञान आहे तर ते या बी. कें. कडेच आहे’.
कुमार-कुमारी तर पवित्र असतात. प्रजापिता ब्रह्माची मुले आहेत. आम्हाला कोणतेही
वाईट (विकारी) विचार सुद्धा येता कामा नयेत. पुष्कळ जणांना अजूनही वाईट (विकारी)
विचार येतात, मग याची सजा देखील खूप कडक आहे. बाबा समजावून तर खूप सांगतात. जर तुमचे
कुठलेही खराब वर्तन दिसले, तर इथे (मधुबनला) राहू शकणार नाही. तू लायक नाही आहेस
म्हणून थोडी सजा सुद्धा द्यावी लागते. बाबांना फसवतोस. तू बाबांची आठवण करू शकणार
नाहीस. संपूर्ण अवस्था कोलमडून जाते. अवस्था कोलमडून जाणे हीच सजा आहे. श्रीमतावर न
चालल्यामुळे आपले पद भ्रष्ट करतात. बाबांच्या डायरेक्शनवर न चालल्याने अजूनच भुताची
प्रवेशता होते. बाबांना तर कधी-कधी विचार येतो, की कुठे खूप कडक सजा आत्ताच सुरू
होऊ नये. सजा देखील खूप गुप्त असतात ना. कुठे तीव्र वेदना होऊ नयेत. खूप कोसळतात (अधोगती
होते), सजा भोगतात. बाबा तर सर्व इशाऱ्यांद्वारे सांगत असतात. आपल्याच नशिबाला नाट
लावतात (अडथळा निर्माण करतात), म्हणून बाबा सतर्क करत राहतात, आता चुका करण्याची
वेळ नाही आहे, स्वतःला सुधारा. अंतिम घडी येण्यासाठी वेळ उरलेला नाहीये. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणतेही
नियमबाह्य, श्रीमताविरुद्ध वर्तन करायचे नाही. स्वतःच स्वतःला सुधारायचे आहे.
घाणेरड्या (विकारी) लोकांपासून स्वतःला सांभाळायचे आहे.
२) बंधनमुक्त असाल तर
संपूर्ण आत्मसमर्पण करायचे आहे. आपला मोह काढून टाकायचा आहे. कधीही कोणाची निंदा
किंवा परचिंतन करायचे नाही. घाणेरड्या (विकारी) विचारांपासून स्वतःला दूर ठेवायचे
आहे.
वरदान:-
समर्थ स्थितीचा
स्विच ऑन करून व्यर्थच्या अंध:काराला समाप्त करणारे अव्यक्त फरिश्ता भव
जसे स्थूल दिव्याचा
स्विच ऑन केल्याने काळोख नाहीसा होतो. असाच ‘समर्थ स्थिती’ हा स्विच आहे. या स्विचला
ऑन करा तर व्यर्थचा काळोख नाहीसा होईल. एक-एक व्यर्थ संकल्प नष्ट करण्याच्या मेहनती
पासून मुक्त व्हाल. जेव्हा स्थिती समर्थ होईल तर महादानी-वरदानी बनाल कारण ‘दाता’चा
अर्थच आहे समर्थ असणे. जो समर्थ आहे तोच देऊ शकतो आणि जिथे समर्थ आहे तिथे व्यर्थ
नष्ट होते. तर हेच अव्यक्त फरिश्त्यांचे श्रेष्ठ कार्य आहे.
बोधवाक्य:-
सत्यतेच्या
आधारावर सर्व आत्म्यांचे अंत:करणापासूनचे आशीर्वाद प्राप्त करणारेच भाग्यवान आत्मा
आहेत.