14-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमची नजर शरीरांवर जाऊ नये, स्वतःला आत्मा समजा शरीराला पाहू नका”

प्रश्न:-
प्रत्येक ब्राह्मण मुलाला विशेष कोणत्या दोन गोष्टींवर लक्ष द्यायचे आहे?

उत्तर:-
१. शिक्षणावर, २. दैवी गुणांवर. बऱ्याच मुलांमध्ये क्रोधाचा अंश देखील नाही आहे, काही तर क्रोधामध्ये येऊन खूप भांडतात. मुलांनी विचार केला पाहिजे की आपल्याला दैवी गुण धारण करून देवता बनायचे आहे. कधीही रागाच्या भरात येऊन बोलता कामा नये. बाबा म्हणतात - कोणत्या मुलांमध्ये क्रोध आहे तर ते भूतनाथ-भूतनाथिनी आहेत. असे भूत असणाऱ्यांशी तर तुम्ही बोलायचे देखील नाही.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ…

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. दुसऱ्या कोणत्याही सत्संगामध्ये असे गाण्यांवरून कधी समजावणार नाहीत. तिथे शास्त्र ऐकवतात. जसे गुरुद्वारेमध्ये ग्रंथामधून दोन श्लोक काढतात आणि मग कथा सांगणारा बसून त्याचे विश्लेषण करत असतो. गाण्यांवरून कोणी समजावेल, असे कुठे होत नाही. आता बाबा समजावून सांगतात की, ही सर्व गाणी आहेत भक्ती मार्गाची. मुलांना समजावले गेले आहे, ज्ञान वेगळी गोष्ट आहे, जे एका निराकार शिवबाबांकडून मिळू शकते. याला म्हटले जाते रूहानी ज्ञान. ज्ञान तर अनेक प्रकारचे असते ना. कोणाला विचारले गेले की, हा गालीचा कसा बनतो, तुम्हाला माहित आहे? प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असते. त्या आहेतच भौतिक गोष्टी. मुले जाणतात आम्हा आत्म्यांचे रूहानी पिता ते एक आहेत, त्यांचे रूप दिसून येत नाही. त्या निराकाराचे चित्र देखील शाळीग्राम प्रमाणे आहे. त्यांनाच परमात्मा म्हणतात. त्यांना म्हटलेच जाते निराकार. मनुष्यासारखा आकार नाही आहे. प्रत्येक वस्तूचा आकार जरूर असतो. त्या सर्वांमध्ये छोट्यात छोटा आकार आहे आत्म्याचा. याला प्रकृतीचा चमत्कारच म्हणणार. आत्मा खूप लहान आहे जी या डोळ्यांनी दिसू शकत नाही. तुम्हा मुलांना दिव्यदृष्टी मिळते ज्याद्वारे सर्व साक्षात्कार करता. जे होऊन गेले आहेत त्यांना दिव्य दृष्टीद्वारे पाहिले जाते. सर्वात पहिला तर हा (ब्रह्मा बाबा) होऊन गेला आहे. आता पुन्हा आले आहेत तर त्याचा देखील साक्षात्कार होतो. आहे अति सूक्ष्म. यावरून समजू शकता की, आत्म्याचे ज्ञान परमपिता परमात्म्याशिवाय दुसरा कोणीही देऊ शकणार नाही. मनुष्य, आत्म्याला यथार्थ रीतीने जाणत नाहीत तसेच परमात्म्याला देखील यथार्थ रीतीने जाणू शकत नाहीत. दुनियेमध्ये मनुष्यांची अनेक मते आहेत. कोणी म्हणतात, आत्मा परमात्म्यामध्ये लीन होते, कोणी काय म्हणतात. आता तुम्हा मुलांनी जाणले आहे, ते देखील नंबरवार पुरुषार्था नुसार, सर्वांच्याच बुद्धीमध्ये काही एकसमान राहू शकत नाही. वारंवार बुद्धीमध्ये पक्के करावे लागते. आपण आत्मा आहोत, आत्म्यालाच ८४ जन्मांचा पार्ट बजावायचा आहे. आता बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मज परमपिता परमात्म्याला ओळखा आणि आठवण करा. बाबा म्हणतात - मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून तुम्हा मुलांना नॉलेज देतो. तुम्ही मुले स्वतःला आत्मा समजत नाही म्हणून तुमची नजर या शरीरावर जाते. खरेतर तुमचे याच्याशी काहीच काम नाहीये. सर्वांचे सद्गती दाता तर ते शिवबाबा आहेत, त्यांच्या मतावर आम्ही सर्वांना सुख देतो. यांना देखील अहंकार येत नाही की मी सर्वांना सुख देतो. जे बाबांची पूर्ण आठवण करत नाहीत त्यांच्यामधील अवगुण जात नाहीत. स्वतःला आत्मा निश्चय करत नाहीत. मनुष्य तर ना आत्म्याला, ना परमात्म्याला जाणत. सर्वव्यापीचे ज्ञान देखील भारतवासीयांनीच पसरवले आहे. तुमच्यामध्ये देखील जी सेवाभावी मुले आहेत ते समजतात, बाकी सगळेच काही इतके समजत नाहीत. जर बाबांची संपूर्ण ओळख मुलांना असेल तर बाबांची आठवण करतील, आपल्यामध्ये दैवी गुण धारण करतील.

शिवबाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात. या आहेत नवीन गोष्टी. ब्राह्मण देखील जरूर हवेत. प्रजापिता ब्रह्माची संतान केव्हा असतात, हे दुनियेमध्ये कोणालाच माहित नाही आहे. ब्राह्मण तर खंडीभर आहेत. परंतु ते आहेत कुख वंशावळी. ते काही मुख वंशावळी ब्रह्माची संतान नाही आहेत. ब्रह्माच्या संतानाला तर ईश्वर पित्याकडून वारसा मिळतो. तुम्हाला आता वारसा मिळत आहे ना. तुम्ही ब्राह्मण वेगळे आहात, ते वेगळे आहेत. तुम्ही ब्राह्मण असताच मुळी संगमावर. ते असतात द्वापर-कलियुगामध्ये. हे संगमयुगी ब्राह्मणच वेगळे आहेत. प्रजापिता ब्रह्माची पुष्कळ मुले आहेत. भले हदच्या पित्याला देखील ब्रह्मा म्हटले जाईल कारण मुले जन्माला घालतात. परंतु ती आहे भौतिक गोष्ट. हे पिता तर म्हणतील सर्व आत्मे माझी मुले आहेत. तुम्ही आहात गोड-गोड रूहानी मुले. हे कोणाला समजावून सांगणे सोपे आहे. शिवबाबांना स्वतःचे शरीर नाही आहे. शिवजयंती साजरी करतात, परंतु त्यांचे शरीर दिसून येत नाही. बाकी सर्वांचे शरीर आहे. सर्व आत्म्यांचे आपापले शरीर आहे. शरीराला नाव दिले जाते, परमात्म्याचे आपले शरीरच नाही म्हणून त्यांना परमात्मा म्हटले जाते. त्यांच्या आत्म्याचेच नाव ‘शिव’ आहे, ते कधीही बदलत नाही. शरीर बदलते तर नाव सुद्धा बदलते. शिवबाबा म्हणतात मी तर सदैव निराकार परम आत्माच आहे. ड्रामा प्लॅन अनुसार आता हे शरीर घेतले आहे. संन्याशांचे देखील नाव बदलते. गुरुचे बनतात तर नाव बदलते. तुमची देखील नावे बदलली होती. परंतु कुठवर नाव बदलत राहणार. किती भागन्ती झाले. जे त्यावेळी होते त्यांचे नाव ठेवले. आता नाव ठेवत नाहीत. कोणावरही विश्वास नाही आहे. माया अनेकांना पराजित करते तर भागन्ती होतात म्हणून बाबा कोणाचेच नाव ठेवत नाहीत. कोणाचे ठेवले, कोणाचे नाही, तर ते देखील योग्य नाही. म्हणतात तर सर्वजण - बाबा, आम्ही तुमचे बनलो आहोत, परंतु यथार्थ रित्या माझे बनतात थोडेच. असे बरेच आहेत जे वारसदार बनण्याच्या रहस्याला सुद्धा जाणत नाहीत. बाबांकडे भेटण्यासाठी येतात परंतु वारसदार नाही आहेत. विजयमाळेमध्ये येऊ शकत नाहीत. काही चांगली-चांगली मुले समजतात की, आम्ही तर वारसदार आहोत. परंतु बाबा समजतात हे वारसदार नाही आहेत. वारसदार बनण्यासाठी ईश्वराला आपला वारस बनवावे लागेल, हे रहस्य समजावणे देखील कठीण आहे. बाबा समजावतात वारसदार कोणाला म्हटले जाते. ईश्वराला कोणी वारसदार बनवले तर त्यांना आपली मालमत्ता द्यावी लागेल; तेव्हा मग बाबा वारसदार बनवतील. आपली मालमत्ता तर गरिबांशिवाय इतर कोणताही श्रीमंत देऊ शकणार नाही. माळा किती थोड्या जणांची बनते. हे देखील कोणी बाबांना विचारले तर बाबा सांगू शकतात - तू वारसदार बनण्यासाठी अधिकारी आहेस की नाही? हे देखील बाबा सांगू शकतात. ही सामान्य गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. वारसदार बनवण्यासाठी देखील खूप चांगली बुद्धी पाहिजे. बघतात लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते, परंतु तो अधिकार कसा घेतला - हे कोणीही जाणत नाहीत. आता तुमचे एम ऑब्जेक्ट तर समोर आहे. तुम्हाला हे बनायचे आहे. मुले देखील म्हणतात - आम्ही तर सूर्यवंशी लक्ष्मी-नारायण बनणार, ना की चंद्रवंशी राम-सीता. राम-सीतेची देखील शास्त्रांमध्ये निंदा केलेली आहे. लक्ष्मी-नारायणाची कधीही निंदा केलेली ऐकणार नाही. शिवबाबांची, श्रीकृष्णाची सुद्धा निंदा केलेली आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना इतके उच्च ते उच्च बनवतो. मुले माझ्यापेक्षाही हुशार बनून पुढे जातात. लक्ष्मी-नारायणाची देखील कोणी निंदा करणार नाही. भले श्रीकृष्णाची आत्मा तर तीच आहे, परंतु न जाणल्याकारणाने निंदा केली आहे. लक्ष्मी-नारायणाचे मंदिर देखील मोठ्या आनंदाने बनवतात. वास्तविक बनवले पाहिजे राधे-कृष्णाचे, कारण ते सतोप्रधान आहेत. ही त्यांची युवा अवस्था असते तेव्हा त्यांना सतो म्हणतात. ते लहान आहेत म्हणून त्यांना सतोप्रधान म्हणणार. लहान मूल महात्म्यासमान असते. जसे लहान मुलांना विकार इत्यादी बद्दल माहीत नसते, तसे तिथे मोठ्यांना देखील माहित नसते की विकार काय गोष्ट आहे. ही ५ भुते तिथे असतच नाहीत. विकारांबद्दल जणू काही माहीतच नाही आहे. यावेळी आहेच रात्र. काम विकाराचे काम देखील रात्रीचेच केले जाते. देवता आहेत दिवसामध्ये तर काम विकाराचे काम केले जात नाही. कोणतेही विकार असत नाहीत. आता रात्रीमध्ये सर्वजण विकारी आहेत. तुम्ही जाणता दिवस होताच आमचे सर्व विकार निघून जातील. माहित नसते की विकार काय गोष्ट आहे. हे रावणाचे विकारी गुण आहेत. हे आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). व्हाईसलेस वर्ल्डमध्ये (निर्विकारी दुनियेमध्ये) विकाराची कोणतीही गोष्टच नसते. त्याला म्हटलेच जाते ईश्वरीय राज्य, आता आहे आसुरी राज्य, हे कोणीही जाणत नाहीत. तुम्ही सर्वकाही जाणता, नंबरवार पुरुषार्थानुसार. पुष्कळ मुले आहेत. कोणीही मनुष्य समजू शकत नाहीत की हे सर्व बी.के. कोणाची मुले आहेत.

सर्वजण आठवण करतात - शिवबाबांची, ब्रह्माची देखील नाही. हे स्वतः म्हणतात शिवबाबांची आठवण करा, ज्याने विकर्म विनाश होतील, इतर कोणाचीही आठवण केल्याने विकर्म विनाश होणार नाहीत. गीतेमध्ये देखील म्हटले आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. श्रीकृष्ण तर असे म्हणू शकत नाही. वारसा मिळतोच निराकार बाबांकडून. स्वतःला जेव्हा आत्मा समजतील तेव्हा निराकार बाबांची आठवण करतील. अगोदर ‘मी आत्मा आहे’, हा निश्चय पक्का करावा लागेल. माझे पिता परमात्मा आहेत, ते म्हणतात - माझी आठवण करा तर मी तुम्हाला वारसा देईन. मी सर्वांना सुख देणारा आहे. मी सर्व आत्म्यांना शांतीधामला घेऊन जातो. ज्यांनी कल्पापूर्वी बाबांकडून वारसा घेतला असेल तेच येऊन वारसा घेतील, ब्राह्मण बनतील. ब्राह्मणांमध्ये देखील काही मुले पक्की आहेत. सख्खे देखील बनतील, सावत्र देखील बनतील. आम्ही निराकार शिवबाबांची वंशावळी आहोत. जाणतात कुळ कसे वाढत जाते. आता ब्राह्मण बनल्यानंतर आपल्याला परत जायचे आहे. सर्व आत्मे शरीर सोडून परत जाणार आहेत. पांडव आणि कौरव दोघांनाही शरीर सोडायचे आहे. तुम्ही हे ज्ञानाचे संस्कार घेऊन जाता मग त्यानुसार प्रारब्ध मिळते. ते देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे मग ज्ञानाचा पार्टच संपून जातो. तुम्हाला ८४ जन्मानंतर पुन्हा ज्ञान मिळाले आहे. नंतर मग प्राय: लोप होऊन जाते. तुम्ही प्रारब्ध भोगता. तिथे इतर कोणत्याही धर्मवाल्यांची चित्रे इत्यादी नसतात. तुमची तर भक्तिमार्गामध्ये देखील चित्रे असतात. सतयुगामध्ये कोणाचेही चित्र इत्यादी नसते. तुमची चित्रे संपूर्ण भक्तिमार्गामध्ये असतात. तुमच्या राज्यामध्ये इतर कोणाचेही चित्र नाही आहे, फक्त देवी-देवताच राहतात. यावरूनच समजतात की, आदि सनातन देवी-देवताच आहेत. मागाहून सृष्टीची वृद्धी होत जाते. तुम्हा मुलांना हे ज्ञानाचे चिंतन करून अतींद्रिय सुखामध्ये रहायचे आहे. अनेक पॉईंट्स आहेत. परंतु बाबा समजतात माया घडो-घडी विसरायला लावते. तर हे लक्षात राहिले पाहिजे की शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. ते आहेत उच्च ते उच्च. आपल्याला आता घरी परत जायचे आहे. किती सोप्या गोष्टी आहेत. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. आपल्याला आता देवता बनायचे आहे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. ५ विकार आहेत भुते. काम विकाराचे भूत, क्रोधाचे भूत, देह-अभिमानाचे भूत देखील असते. हो, कोणामध्ये जास्त भुते असतात कोणामध्ये कमी. तुम्हा ब्राह्मण मुलांनाच माहीत आहे ही ५ मोठी भुते आहेत. पहिल्या नंबरचे आहे काम विकाराचे भूत, दुसऱ्या नंबरचे आहे क्रोधाचे भूत. कोणी कठोरपणे बोलत असेल तर बाबा म्हणतात - हा क्रोधी आहे. हे भूत निघून गेले पाहिजे. परंतु भूत निघणे खूप कठीण आहे. क्रोध एकमेकांना दुःख देतो. मोहामुळे बाकीच्यांना दुःख होणार नाही, ज्याला मोह आहे त्यालाच दुःख होईल म्हणून बाबा समजावून सांगतात या भुतांना पळवून लावा.

प्रत्येक मुलाने विशेषत: अभ्यास आणि दैवी गुणांवर लक्ष द्यायचे आहे. बऱ्याच मुलांमध्ये तर क्रोधाचा अंश सुद्धा नाही आहे. काहीजण तर रागाच्या भरात येऊन खूप भांडतात. मुलांनी विचार केला पाहिजे की, आपल्याला दैवी गुण धारण करून देवता बनायचे आहे. कधीही रागावून बोलता कामा नये. कोणी राग करत असेल तर समजा त्यांच्यामध्ये क्रोधाचे भूत आहे. ते जसे भूतनाथ-भूतनाथिनी बनतात, अशा भुतांशी कधीही बोलता कामा नये. एक क्रोधामध्ये येऊन बोलला मग दुसऱ्यामध्ये सुद्धा भूत आले तर भुते आपापसात भांडण करतील. भूतनाथिनी शब्द अतिशय वाईट आहे. भुताचा प्रवेश होऊ नये म्हणून मनुष्य त्याच्यापासून दूर राहतात. भुता समोर तर उभे सुद्धा राहता कामा नये, नाहीतर तुमच्या मध्ये प्रवेशता होईल. बाबा येऊन आसुरी गुण काढून टाकून दैवी गुण धारण करायला शिकवतात. बाबा म्हणतात मी आलो आहे दैवी गुण धारण करवून देवता बनविण्यासाठी. मुले जाणतात - आम्ही दैवी गुण धारण करत आहोत. देवतांची चित्रे देखील समोर आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे की, क्रोधी व्यक्तीपासून एकदम दूर राहा. स्वतःला वाचविण्यासाठी युक्ती केली पाहिजे. आपल्यामध्ये क्रोध येऊ नये, नाहीतर १०० पटीने पाप होईल. किती चांगले स्पष्टीकरण बाबा मुलांना देतात. मुले देखील समजतात - बाबा हुबेहूब कल्पा पूर्वीप्रमाणे समजावून सांगत आहेत, नंबरवार पुरुषार्थानुसार समजून घेतच राहतील. आपल्यावर सुद्धा दया करायची आहे, दुसऱ्यावर देखील दया करायची आहे. कोणी स्वतःवर दया करत नाहीत, दुसऱ्यांवर करतात तर ते पुढे जातात, स्वतः मात्र मागेच राहून जातात. स्वतः विकारांवर विजय मिळवत नाहीत, दुसऱ्यांना सांगतात, मग ते विजय मिळवतात. असे देखील आश्चर्य होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानाचे चिंतन करून अतींद्रिय सुखामध्ये रहायचे आहे. कोणाशीही कठोरपणे बोलायचे नाही. कोणी रागाने बोलत असेल तर त्याच्यापासून दूर रहायचे आहे.

२) ईश्वराचा वारसदार बनण्याकरिता पहिले त्यांना आपला वारस बनवायचे आहे. हुशार बनवून आपले सर्व बाबांच्या हवाली करून मोह नष्ट करायचा आहे. आपणच आपल्यावर दया करायची आहे.

वरदान:-
साक्षी होऊन उच्च स्थितीद्वारे सर्व आत्म्यांना सकाश देणारे बाप समान अव्यक्त फरिश्ता भव

चालता-फिरता नेहमी स्वतःला निराकारी आत्मा आणि कर्म करत असताना अव्यक्त फरिश्ता समजा तर नेहमीच आनंदाने वर उडत रहाल. फरिश्ता अर्थात उच्च स्थितीमध्ये राहणारा. या देहाच्या दुनियेमध्ये काहीही होत राहो परंतु साक्षी होऊन सर्व पार्ट बघत रहा आणि सकाश देत रहा. सीट वरून उतरून सकाश दिली जात नाही. उच्च स्थितीमध्ये स्थित होऊन वृत्तीने, दृष्टीने सहयोगाची, कल्याणाची सकाश द्या, मिक्स होऊन नाही तेव्हाच कोणत्याही प्रकारच्या वातावरणापासून सुरक्षित राहून बाप समान अव्यक्त फरिश्ता भवचे वरदानी बनाल.

बोधवाक्य:-
आठवणीच्या बळाद्वारे दुःखाला सुखामध्ये आणि अशांतीला शांतीमध्ये परिवर्तन करा.

आपल्या शक्तिशाली मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

आपली शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वृत्ती, श्रेष्ठ व्हायब्रेशन द्वारे कोणत्याही ठिकाणी राहून मनसाद्वारे अनेक आत्म्यांची सेवा करू शकता. याची विधी आहे - लाईट हाऊस, माइट हाऊस बनणे. यामध्ये स्थूल साधन, चान्स किंवा वेळेचा प्रश्नच नाही आहे. फक्त लाईट-माईट ने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे.