14-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला श्रीमत मिळाले आहे की आत्म-अभिमानी बनून बाबांची आठवण करा, तुम्ही कोणत्याही गोष्टीवरून वाद घालायचा नाही”

प्रश्न:-
बुद्धियोग स्वच्छ बनून बाबांमध्ये मन रमू शकेल, यासाठी कोणती युक्ती रचलेली आहे?

उत्तर:-
७ दिवसांची भट्टी. कोणीही नवीन आला तर त्याला ७ दिवसांसाठी भट्टीमध्ये बसवा ज्यामुळे बुद्धीतील कचरा निघून जाईल आणि गुप्त बाबा, गुप्त शिक्षण आणि गुप्त वारशाला ओळखू शकतील. जर असेच बसले तर गोंधळून जातील, काहीच समजू शकणार नाहीत.

गीत:-
जाग सजनियां जाग...

ओम शांती।
मुलांना ज्ञानी तू आत्मा बनविण्याकरिता अशा प्रकारची काही गाणी जी आहेत ती ऐकवून मग त्याचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे तेव्हा बोलू लागेल आणि मग कळून येईल की सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान कितपत बुद्धीमध्ये आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये तर वरपासून मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतनाच्या आदि-मध्य-अंताचे सारे रहस्य जणूकाही झळकते आहे. बाबांकडे देखील हे ज्ञान आहे जे तुम्हाला ऐकवतात. हे अगदी नवीन ज्ञान आहे. भले शास्त्र इत्यादींमध्ये नाव आहे, परंतु ते नाव घेतल्यामुळे अडून बसतील आणि वाद घालू लागतील. इथे तर एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगतात - ‘भगवानुवाच, माझी आठवण करा, मीच पतित-पावन आहे’. कधीही श्रीकृष्णाला अथवा ब्रह्मा, विष्णू, शंकर इत्यादींना पतित-पावन म्हणणार नाही. सूक्ष्मवतनवासींना देखील तुम्ही पतित-पावन म्हणत नाही तर स्थूलवतनमधले मनुष्य पतित-पावन कसे असू शकतील? हे ज्ञान देखील तुमच्याच बुद्धीमध्ये आहे. शास्त्रांवर जास्त वाद घालणे चांगले नाही. त्याने खूप वाद-विवाद होतो. एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारायला लागतात. तुम्हाला तर खूप सोपे करून समजावून सांगितले जाते. शास्त्रांच्या गोष्टींमध्ये जास्त जाऊ नका. मूळ गोष्ट आहेच आत्म-अभिमानी बनण्याची. स्वतःला आत्मा समजायचे आहे आणि बाबांची आठवण करायची आहे, हेच मुख्य श्रीमत आहे; बाकी आहे विस्तार. बीज किती छोटे आहे, बाकी झाडाचा विस्तार आहे. जसे बीजामध्ये सर्व ज्ञान सामावलेले आहे तसे हे ज्ञान देखील बीजामध्ये सामावलेले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये बीज आणि झाड आलेले आहे. ज्या प्रकारे तुम्ही जाणता तसे दुसरे कोणी समजू शकत नाही. झाडाचे आयुष्यच मोठे लिहून ठेवले आहे. बाबा बसून बीज आणि झाड किंवा ड्रामाच्या चक्राचे रहस्य समजावून सांगतात. तुम्ही आहात स्वदर्शन चक्रधारी. नवीन कोणी आले आणि बाबांनी महिमा केली की, ‘स्वदर्शन चक्रधारी मुलांनो’, तर कोणाला समजू शकणार नाही. ते तर स्वतःला मुलेच समजत नाहीत. हे बाबा देखील गुप्त आहेत तसे नॉलेज देखील गुप्त आहे, वारसा सुद्धा गुप्त आहे. नवा कोणीही ऐकून गोंधळून जाईल म्हणून ७ दिवसांच्या भट्टीमध्ये बसवले जाते. हे जे ७ दिवस भागवत किंवा रामायण वगैरे ठेवतात, वास्तविक हे तर या वेळी ७ दिवसांसाठी भट्टीमध्ये ठेवले जाते ज्यामुळे बुद्धीमध्ये जो कचरा आहे तो काढावा आणि बाबांशी बुद्धियोग लागावा. इथे सर्व आहेत रोगी. सतयुगामध्ये हे रोग असत नाहीत. हा अर्ध्याकल्पाचा रोग आहे, ५ विकारांचा रोग खूप गंभीर आहे. तिथे तर देही-अभिमानी असतात; तिथे तुम्ही जाणता की, मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते; आधीपासूनच साक्षात्कार होतो. कधीही अकाली मृत्यू होत नाही. तुम्हाला काळावर विजय मिळवून दिला जातो. काळ-काळ महाकाळ म्हणतात. महाकाळाचे देखील मंदिर असते. शीख लोकांचे मग अकालतख्त असते. खरे तर अकालतख्त ही भृकुटी आहे, जिथे आत्मा विराजमान असते. सर्व आत्मे या अकालतख्तावर बसले आहेत. हे बाबा बसून समजावून सांगत आहेत. बाबांना त्यांचे आपले तख्त तर नाहीये. ते येऊन यांचे हे तख्त घेतात (ब्रह्मा बाबांच्या भृकुटीमध्ये बसतात). या तख्तावर बसून तुम्हा मुलांना ताऊसी तख्तनशीन बनवतात (मयूर हृदय सिंहासनावर बसवतात). तुम्ही जाणता ते मयूर सिंहासन कसे असेल ज्याच्यावर लक्ष्मी-नारायण विराजमान होत असतील. मयूर सिंहासन तर प्रसिद्ध आहे ना.

विचार करायचा आहे, त्यांना भोलानाथ भगवान का म्हटले जाते? ‘भोलानाथ भगवान’ म्हटल्याने बुद्धी वरती (परमधाम मध्ये) निघून जाते. साधू-संत वगैरे बोटाने इशारा सुद्धा करतात ना की त्याची आठवण करा. यथार्थ रित्या तर कोणीही समजू शकत नाही. आता पतित-पावन बाबा सन्मुख येऊन म्हणतात माझी आठवण करा तर तुमची विकर्मे विनाश होतील. गॅरंटी आहे. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे परंतु तुम्ही गीतेमधून एक उदाहरण दिलेत तर ते १० देतील त्यामुळे गरजच नाही. ज्यांनी शास्त्रे इत्यादी वाचलेली आहेत ते समजतील आम्ही सामना करू शकतो. तुम्ही मुले जी ही शास्त्रे वगैरे जाणतच नाहीत, त्यांनी तर त्या शास्त्रांचे नाव सुद्धा घेता कामा नये. फक्त एवढेच बोला भगवान म्हणतात - ‘मज आपल्या बाबांची आठवण करा, त्यांनाच पतित-पावन म्हटले जाते’. गातात देखील - ‘पतित-पावन सीताराम…’ संन्यासी लोक सुद्धा जिथे-तिथे हीच धून गात राहतात. अशी मतमतांतरे तर पुष्कळ आहेत ना. हे गीत किती सुंदर आहे, ड्रामा प्लॅन अनुसार कल्प-कल्प अशी गाणी बनतात जणूकाही तुम्हा मुलांसाठीच बनवली आहेत. अशी सुंदर-सुंदर गाणी आहेत. जसे ‘नयनहीन को राह दिखाओ प्रभू’. प्रभू काही श्रीकृष्णाला थोडेच म्हणतात. प्रभू किंवा ईश्वर निराकारलाच म्हणणार. इथे तुम्ही म्हणता बाबा परमपिता परमात्मा आहेत. आहेत तर ते देखील आत्माच ना! भक्तीमार्गामध्ये फारच अतिमध्ये गेले आहेत. इथे तर अगदी सोपी गोष्ट आहे. अल्फ आणि बे. अल्फ अल्लाह आणि बे बादशाही - एवढीशी तर सोपी गोष्ट आहे. बाबांची आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. खरोखर हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक, संपूर्ण निर्विकारी होते. तर बाबांची आठवण केल्यानेच तुम्ही असे संपूर्ण बनाल. जितके जे आठवण करतात आणि सेवा करतात तितके ते उच्च पद प्राप्त करतात. हे लक्षात सुद्धा येते, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना समजत नाही का की आपण कमी अभ्यास करतो! जे पूर्ण लक्ष देत नाहीत ते मागे बसून राहतात, तर जरूर नापास होतील.

आपणच आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी ज्ञानाची जी चांगली-चांगली गाणी बनलेली आहेत ती ऐकली पाहिजेत. अशा प्रकारची गाणी आपल्या घरी ठेवली पाहिजेत. कोणालाही या गाण्यांवर समजावून सांगू देखील शकाल. कशी मायेची पुन्हा सावली पडते. शास्त्रांमध्ये तर या गोष्टींचा उल्लेखही नाहीये की, कल्पाचा कालावधी ५ हजार वर्षे आहे. ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र अर्धे-अर्धे आहेत. ही गाणी देखील कोणीतरी बनवून तर घेतली आहेत. बाबा बुद्धीवानांची बुद्धी आहेत तर अशी गाणी कोणाच्या तरी डोक्यात आली आहेत जी बसून बनवली आहेत. ही गाणी ऐकून देखील तुमच्यामधले किती ध्यानामध्ये जात होते. एक दिवस असा देखील येईल की ही ज्ञानाची गाणी गाणारे देखील तुमच्याकडे येतील. बाबांच्या महिमेची अशी गाणी गातील जी घायाळ करतील. असेही येतील. स्वरांवर सुद्धा अवलंबून असते. गायन कलेचे सुद्धा खूप नाव आहे. आता तर असा कोणी राहिलेला नाही. फक्त एक गाणे बनवले होते - ‘कितना मीठा कितना प्यारा…’ बाबा किती गोड किती प्रेमळ आहेत म्हणूनच तर सगळे त्यांची आठवण करतात. असे नाही की देवता त्यांची आठवण करतात. चित्रांमध्ये रामाच्या पुढ्यात देखील शिवलिंग दाखवले आहे, राम पूजा करत आहे. हे चुकीचे आहे. देवता थोडीच कोणाची आठवण करतात? आठवण मनुष्य करतात. तुम्ही देखील आता मनुष्य आहात आणि मग देवता बनाल. देवता आणि मनुष्यांमध्ये रात्रं-दिवसा इतका फरक आहे. तेच देवता मग मनुष्य बनतात. चक्र कसे फिरत राहते हे कोणालाच माहीत नाही आहे. तुम्हाला आत्ता माहीत झाले आहे की, आपण खरे-खुरे देवता बनत आहोत. आता आम्ही ब्राह्मण आहोत, नव्या दुनियेमध्ये देवता म्हणून संबोधले जाणार. आता तुम्हाला आश्चर्य वाटते. हे स्वतः ब्रह्माच जे या जन्मामध्ये आधी पुजारी होते, श्री नारायणाची स्तुती करत होते, नारायणावर खूप प्रेम होते. आता आश्चर्य वाटते, आता आपण सो बनत आहोत. तर आनंदाचा किती पारा चढला पाहिजे! तुम्ही आहात अननोन वॉरियर्स (गुप्त योद्धे), अहिंसक. खरोखरच तुम्ही डबल अहिंसक आहात. ना कामविकार, ना ते युद्ध. काम विकार वेगळी गोष्ट आहे, क्रोध वेगळी गोष्ट आहे. तर तुम्ही आहात डबल अहिंसक. अहिंसक सेना. ‘सेना’ या शब्दावरून त्यांनी (दुनियावाल्यानी) मग सेना उभी दाखवली आहे. महाभारत युद्धामध्ये पुरुषांची नावे दाखवली आहेत. स्त्रिया नाही आहेत. वास्तविक तुम्ही आहात शिवशक्ती. तुम्ही बहुसंख्य असल्यामुळे शिवशक्ती सेना म्हटले जाते. या गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात.

आता तुम्ही मुले नवयुगाची आठवण करत आहात. दुनियेमध्ये कोणालाही नवयुगा विषयी माहित नाही आहे. ते तर समजतात नवयुग ४० हजार वर्षानंतर येईल. सतयुग नवयुग आहे हे तर एकदम स्पष्ट आहे. तर बाबा सल्ला देतात अशा प्रकारची गाणी ऐकून सुद्धा रिफ्रेश व्हाल आणि कोणाला समजावून सांगाल देखील. या सर्व युक्त्या आहेत. या गाण्यांचा अर्थ देखील फक्त तुम्हीच समजू शकता. आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी खूप चांगली-चांगली गाणी आहेत. ही गाणी खूप मदत करतात. अर्थ समजून घेतला तर तोंड सुद्धा उघडेल (दुसऱ्यांना या गाण्याच्या माध्यमातून ज्ञान देखील सांगू शकाल), आनंद सुद्धा होईल. बाकी जे जास्त धारणा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी बाबा म्हणतात घरी बसून बाबांची आठवण करत रहा. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त हा मंत्र लक्षात ठेवा - बाबांची आठवण करा आणि पवित्र बना. पूर्वी पती आपल्या पत्नीला म्हणायचे - ‘परमेश्वराची आठवण तर घरात बसून सुद्धा करू शकतेस मग मंदिरे इत्यादी ठिकाणी भटकण्याची काय गरज आहे? मी तुला घरात मूर्ती आणून देतो, इथे बसून आठवण कर, ठोकरा खायला कशाला जातेस?’ अशी बरीच पुरुष मंडळी स्त्रियांना जाऊ देत नव्हती. गोष्ट तर एकच आहे - पूजा करायची आहे आणि आठवण करायची आहे. जर का एकदा बघितले आहे तर मग अशी सुद्धा आठवण करू शकतात. श्रीकृष्णाचे चित्र तर सर्वश्रुत आहे - मोर-मुकुटधारी. तुम्ही मुलांनी साक्षात्कार केला आहे - तिथे (स्वर्गामध्ये) कसा जन्म होतो तो देखील साक्षात्कार केला आहे, परंतु तुम्ही त्याचा फोटो काढू शकता का? अचूक फोटो कोणीही काढू शकत नाही. दिव्य दृष्टीने फक्त पाहू शकता, तसे बनवू शकत नाही; हो, पाहून मग वर्णनमात्र करू शकता, बाकी त्याचे पेंटिंग बनवू शकत नाही. भले हुषार पेंटर असला, साक्षात्कार देखील झाला तरीही अचूकपणे फिचर्स काढू शकत नाही. तर बाबांनी समजावून सांगितले आहे, कोणाशी जास्त वाद घालायचा नाही. बोला, तुम्हाला पावन बनण्याशी मतलब आहे. आणि शांती मागता तर बाबांची आठवण करा आणि पवित्र बना. पवित्र आत्मा इथे राहू शकत नाही. ती परत निघून जाईल. आत्म्यांना पावन बनविण्याची शक्ती एका बाबांमध्येच आहे, दुसरा कोणीही पावन बनवू शकत नाही. तुम्ही मुले जाणता हा सर्व रंगमंच आहे, त्यावर नाटक होते. या वेळी संपूर्ण रंगमंचावर रावणाचे राज्य आहे. सारी सृष्टी समुद्रावर उभी आहे. हे बेहदचे बेट आहे. ती आहेत हदची बेटे. ही बेहदची गोष्ट आहे जिच्यावर अर्धे कल्प दैवी राज्य, अर्धे कल्प आसुरी राज्य असते. तसे खंड तर वेगवेगळे आहेत, परंतु या सर्व बेहदच्या गोष्टी आहेत. तुम्ही जाणता आपण गंगा-यमुना नदीच्या गोड पाण्याच्या काठावरच असू. समुद्र इत्यादी ठिकाणी जाण्याची गरजच नसते. ही जी द्वारका म्हणतात, ती काही समुद्रामध्ये नसते. द्वारका काही वेगळी चीज नाहीये. तुम्ही मुलांनी सर्व साक्षात्कार केलेले आहेत. सुरवातीला या संदेशी आणि गुलजार खूप साक्षात्कार करत होत्या. यांनी मोठे पार्ट बजावले आहेत कारण भट्टीमध्ये मुलांचे मनोरंजन करायचे होते. तर साक्षात्कारामुळे खूपच मनोरंजन झाले आहे. बाबा म्हणतात - पुन्हा शेवटी असेच खूप मनोरंजन होईल. तो पार्ट मग वेगळा आहे. गाणे देखील आहे ना - ‘हमने जो देखा सो तुमने नहीं देखा…’ तुम्हाला फार वेगाने साक्षात्कार घडत राहतील. जसे परीक्षेचे दिवस जवळ येतात तेव्हा समजून येते की आपण किती मार्कांनी पास होणार. तुमचे देखील हे शिक्षण आहे. आत्ता तुम्ही जणू नॉलेजफुल होऊन बसला आहात. सर्वच काही संपूर्ण तर असत नाहीत. शाळेमध्ये नेहमी नंबरवार असतात. हे देखील नॉलेज आहे - मूल वतन, सूक्ष्म वतन, तिन्ही लोकांचे तुम्हाला ज्ञान आहे. या सृष्टीच्या चक्राला तुम्ही जाणता, हे फिरतच राहते. बाबा म्हणतात - तुम्हाला जे नॉलेज दिले आहे, हे दुसरे कोणीही सांगू शकत नाही. तुमच्यावर आहे बेहदची दशा. कोणावर गुरूची दशा, कोणावर राहूची दशा असते तर ते जाऊन चांडाळ इत्यादी बनतील. ही आहे बेहदची दशा, ती असते हदची दशा. बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी ऐकवतात, बेहदचा वारसा देतात. तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे! तुम्ही अनेकदा बादशाही घेतली आहे आणि गमावली आहे, ही गोष्ट तर अगदी पक्की आहे. नथिंग न्यू (काहीही नवीन नाही), तेव्हाच तुम्ही सदैव आनंदात राहू शकाल. नाहीतर माया घुसमट करते.

तर तुम्ही सर्व आशिक आहात एका माशूकचे. सर्व आशिक त्या एका माशूकचीच आठवण करतात. ते येऊन सर्वांना सुख देतात. अर्धेकल्प त्यांची आठवण केली आहे, आता ते मिळाले आहेत तर किती आनंद झाला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव हर्षित राहण्यासाठी ‘नथिंग न्यू’चा पाठ पक्का करायचा आहे. बेहदचे बाबा आम्हाला बेहदची बादशाही देत आहेत, याच आनंदात रहायचे आहे.

२) ज्ञानाची चांगली-चांगली गाणी ऐकून स्वतःला रिफ्रेश करायचे आहे. त्यांचा अर्थ काढून दुसऱ्यांना ऐकवायचा आहे.

वरदान:-
मायेच्या नात्यांना घटस्फोट देऊन बाबांशी नात्याचा करार करणारे मायाजीत, मोहजीत भव

आता आठवणीतून जुना करार रद्द करून एकटे बना. आपसात एकमेकांचे सहयोगी भले रहा, परंतु जोडीदार नाही. एकालाच जोडीदार बनवा तर मायेच्या नात्यांशी घटस्फोट होईल. मायाजीत, मोहजीत विजयी रहाल. जर थोडासुद्धा कोणामध्ये मोह असेल तर ‘तीव्र पुरुषार्थी’ ऐवजी ‘पुरुषार्थी’ बनाल, त्यामुळे कसेही झाले, काहीही झाले तरीही आनंदाने नाचत रहा, ‘मिरुआ मौत मलूका शिकार’ - याला म्हणतात नष्टोमोहा. असे नष्टोमोहा राहणारेच विजयी माळेचे मणी बनतात.

बोधवाक्य:-
सत्यतेच्या विशेषतेद्वारे हिऱ्याचे तेज वाढवा.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना आणि एकाग्रतेला धारण करा:-

बापदादांची इच्छा आहे की, प्रत्येक मुलाने एकरस श्रेष्ठ स्थितीचा आसनधारी, एकांतवासी, अशरीरी, एकता स्थापक, एकनामी आणि इकॉनॉमीचा अवतार बनावे. एकमेकांचे विचार समजून घेऊन, सन्मान द्यावा, एकमेकांना इशारा द्यावा, देवाण-घेवाण करून आपसामध्ये संघटनच्या शक्तीचे स्वरूप प्रत्यक्ष करावे; कारण तुमच्या संघटनच्या एकतेची शक्ती साऱ्या ब्राह्मण परिवाराला संघटनमध्ये आणण्यासाठी निमित्त बनेल.