14-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमचा चेहरा सदैव खुशनुमा (आनंददायी) असला पाहिजे ‘आम्हाला भगवान शिकवत आहेत’, हा आनंद चेहऱ्यावर झळकला पाहिजे”

प्रश्न:-
आता तुम्हा मुलांचा मुख्य पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
तुम्ही सजेपासून सुटण्याचा पुरुषार्थ करत राहता. त्यासाठी मुख्य आहे आठवणीची यात्रा, ज्यामुळे विकर्म विनाश होतात. तुम्ही प्रेमाने आठवण करा तर खूप कमाई जमा होत जाईल. पहाटे लवकर उठून आठवणीमध्ये बसल्याने जुनी दुनिया विसरली जाईल. ज्ञानाच्या गोष्टी बुद्धीमध्ये येत राहतील. तुम्ही मुलांनी मुखावाटे कोणत्याही कचरापट्टीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत.

गीत:-
तुम्हें पाके हमने…

ओम शांती।
गाणे जेव्हा ऐकतात तेव्हा काहीजणांना त्याचा अर्थ समजतो आणि तो आनंदही होतो. भगवान आम्हाला शिकवतात, भगवान आम्हाला विश्वाची बादशाही देतात. परंतु एवढा आनंद होणारा कोणी विरळाच इथे असेल. ती आठवण स्थायी राहत नाही. आपण बाबांचे बनलो आहोत, बाबा आम्हाला शिकवत आहेत. असे बरेचजण आहेत ज्यांना हा नशाच चढत नाही. त्या (दुनियेतील) सत्संग इत्यादीमध्ये कथा ऐकतात, त्यांना देखील आनंद होतो. इथे तर बाबा किती चांगल्या गोष्टी ऐकवतात. बाबा शिकवतात आणि मग विश्वाचा मालक बनवतात तर स्टुडंट्सना किती आनंद झाला पाहिजे. ते भौतिक शिक्षण शिकणाऱ्यांना जितका आनंद होत असतो, तितका आनंद इथे असणाऱ्यांना होत नाही. बुद्धीमध्ये टिकतच नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - चार-पाच वेळा अशा प्रकारची गाणी ऐका. बाबांना विसरल्यामुळे मग जुनी दुनिया आणि जुनी नाती देखील आठवू लागतात. अशा वेळेस गाणे ऐकल्याने देखील बाबांची आठवण येईल. ‘बाबा’, म्हटल्याने वारसा देखील आठवतो. शिक्षणाने वारसा मिळतो. तुम्ही शिवबाबांकडून शिकता साऱ्या विश्वाचा मालक बनण्याकरिता. तर बाकी आणखी काय पाहिजे. अशा स्टुडंटला आतून किती आनंद झाला पाहिजे! रात्रं-दिवसाची झोप सुद्धा उडाली पाहिजे. खास झोपेला उडवून देखील अशा बाबांची आणि शिक्षकाची आठवण करत राहिली पाहिजे. जसेकाही मस्ताने (ईश्वरीय नशेमध्ये मस्त होऊन राहणारे). ओहो, आपल्याला बाबांकडून विश्वाची बादशाही मिळते. परंतु माया आठवण करू देत नाही. मित्र-नातेवाईक इत्यादींची आठवण येत राहते. त्यांचेच चिंतन राहते. जुना सडलेला कचरा खूपजणांना आठवत असतो. बाबा जे सांगतात, तुम्ही विश्वाचे मालक बनता तर तो नशा चढत नाही. शाळेमध्ये शिकणाऱ्यांचा चेहरा खुशनुमा (आनंददायी) असतो. इथे भगवान शिकवतात, असा आनंद होणारा कोणी विरळाच असतो. नाहीतर आनंदाचा पारा अतिशय चढलेला असला पाहिजे. बेहदचे बाबा आपल्याला शिकवतात, हेच विसरून जातात. याची आठवण राहिली तरी देखील आनंद होत राहील. परंतु गतजन्माचा कर्मभोगच असा आहे त्यामुळे बाबांची आठवण करतच नाहीत. तरीही तोंड कचऱ्याकडेच (विकारांकडेच) जाते. बाबा सर्वांसाठी काही म्हणत नाहीत, नंबरवार आहेत. महान सौभाग्यशाली ते आहेत जे बाबांच्या आठवणीमध्ये राहतील. भगवान, बाबा आपल्याला शिकवत आहेत. जसे त्या शिक्षणामध्ये असते अमका शिक्षक आम्हाला बॅरिस्टर बनवत आहे, तसे इथे आम्हाला भगवान शिकवत आहेत - भगवान भगवती बनविण्यासाठी तर किती नशा असला पाहिजे. ऐकताना काहीजणांना नशा चढतो. बाकी मग काहीच समजत नाहीत. बस्स, गुरू केला, आणि समजतात ते आपल्याला सोबत घेऊन जातील. भगवंताशी भेट घालून देतील. हे तर स्वतः भगवान आहेत. स्वतःची भेट घडवून आणतात, सोबत घेऊन जातील. मनुष्य गुरु करतातच यासाठी की भगवंताकडे घेऊन जातील किंवा शांतीधामला घेऊन जातील. हे बाबा सन्मुख किती समजावून सांगतात. तुम्ही स्टूडंट आहात. शिकवणाऱ्या शिक्षकाची आठवण करा. अजिबातच आठवण करत नाहीत, काही विचारू नका. चांगली-चांगली मुले देखील आठवण करत नाहीत. शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत, ते ज्ञानाचे सागर आहेत, आम्हाला वारसा देतात, एवढी जरी आठवण राहिली तरी देखील आनंदाचा पारा चढलेला राहील. बाबा सन्मुख सांगतात तरी देखील तो नशा चढत नाही. बुद्धी आणखीच दुसरी-दुसरीकडे जाते. बाबा म्हणतात - माझी आठवण कराल तर तुमची विकर्म विनाश होतील. मी गॅरंटी देतो - एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण करू नका. विनाश होणाऱ्या गोष्टींची कसली आठवण करायची. इथे तर कोणी मरतात तर २-४ वर्षे झाली तरी देखील त्यांची आठवण करत राहतात. त्यांचे गुणगान गात राहतात. आता बाबा सन्मुख सांगत आहेत की, ‘मुलांनो, माझी आठवण करा. जे जितकी प्रेमाने आठवण करतात तितकी पापे नष्ट होत जातात. खूप कमाई होते. पहाटे उठून बाबांची आठवण करा. माणसे भक्ती देखील पहाटे उठून करतात. तुम्ही तर आहात ज्ञान वाले. तुम्हाला जुन्या दुनियेतील कचरापट्टीमध्ये अडकायचे नाहीये.

परंतु बरीच मुले अशी काही अडकून पडतात काही विचारू नका. कचरापट्टीतून बाहेरच पडत नाहीत. दिवसभर घाणेरडेच बोलत राहतात. ज्ञानाच्या गोष्टी बुद्धिमध्ये येतच नाहीत. बरीच मुले तर अशी देखील आहेत जी पूर्ण दिवस सेवेसाठीच धावत असतात. जे बाबांची सेवा करतात, आठवण देखील त्यांचीच येईल. यावेळी सर्वात जास्त सेवेमध्ये तत्पर मनोहर दिसून येते. आज कर्नालमध्ये गेली, आज दुसरीकडे कुठे गेली, सेवेसाठी धावत असते. जे आपसात भांडत राहतात ते सेवा काय करत असतील! बाबांना प्रिय कोण वाटणार? जे चांगली सेवा करतात, दिवस-रात्र सेवेचीच चिंता असते, बाबांच्या हृदयावर तेच चढतात. तुम्ही अशी गाणी वारंवार ऐकत रहा तरी देखील आठवण राहील, थोडातरी नशा चढेल. बाबांनी सांगितले आहे, कधी कोणाला उदासवाणे वाटते तर अशावेळी गाणी ऐकल्यामुळे आनंद वाटेल. ओहो! आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. बाबा तर फक्त एवढेच म्हणतात - ‘माझी आठवण करा’. किती सोपा अभ्यास आहे. बाबांनी चांगली-चांगली दहा-बारा गाणी निवडून काढली होती की जी प्रत्येकाकडे असली पाहिजेत. परंतु तरीही विसरून जातात. बरीच मुले तर चालता-चालता शिक्षणच सोडून देतात. माया वार करते. बाबा तमोप्रधान बुद्धीला सतोप्रधान बनविण्याची किती सोपी युक्ती सांगतात. आता तुम्हाला योग्य-अयोग्यचा विचार करण्याची बुद्धी मिळाली आहे. बाबांना बोलवतात देखील - ‘हे पतित पावन या’. आता बाबा आले आहेत तर पावन बनले पाहिजे ना. तुमच्या डोक्यावर जन्म-जन्मांतरीचे ओझे आहे, त्यासाठी जितकी आठवण कराल, पवित्र बनणार, आनंदही होईल. भले सेवा तर करत राहतात परंतु स्वतःचा देखील हिशोब ठेवायचा आहे की, आपण बाबांची किती वेळ आठवण करतो. आठवणीचा चार्ट कोणी ठेवू शकत नाही. पॉईंट्स तर भले लिहितात परंतु आठवण करायची विसरून जातात. बाबा म्हणतात - तुम्ही आठवणीमध्ये राहून भाषण कराल तर खूप बळ मिळेल. नाहीतर बाबा म्हणतात मीच जाऊन खूप जणांना मदत करतो. कोणामध्ये प्रवेश करून मीच जाऊन सेवा करतो. सेवा तर करायची आहे ना. पाहतो कोणाचे भाग्य उघडणार आहे, समजावून सांगणाऱ्यामध्ये इतकी अक्कल नसेल तर मी प्रवेश करून सेवा करतो मग कोणी-कोणी लिहितात - ‘बाबांनीच ही सेवा केली. माझ्यामध्ये काही इतकी ताकद नाहीये, बाबांनीच मुरली चालवली’. कोणाला मग स्वतःचा अहंकार येतो - ‘मी असे चांगले समजावून सांगितले’. बाबा म्हणतात - मी कल्याण करण्यासाठी प्रवेश करतो मग ते ब्राह्मणी पेक्षाही हुशार बनतात. कोणा बुद्धूला पाठवले तर ते असे समजतात याच्यापेक्षा तर आम्हीच चांगले समजावून सांगू शकतो. गुण सुद्धा नाही आहेत. यांच्यापेक्षा तर आमची अवस्था चांगली आहे. काहीजण तर हेड बनून राहतात तर खूप नशा चढतो. खूप भपक्यामध्ये राहतात. मोठ्या व्यक्तीशी सुद्धा ‘तू-तू’ असे म्हणून बोलतात. बस, त्यांना देवी-देवता असे म्हणतात तर त्यामध्येच ते खुश होतात. असे देखील बरेच आहेत. टीचर पेक्षाही स्टुडंट हुशार होतात. परीक्षा पास झालेले तर एक बाबाच आहेत, ते आहेत ज्ञानाचा सागर. त्यांच्याद्वारे शिकून मग तुम्ही इतरांना शिकवता. कोणी तर चांगल्या रीतीने धारणा करतात. कोणी विसरून जातात. मोठ्यात मोठी मुख्य गोष्ट आहे आठवणीची यात्रा. आपली विकर्म विनाश कशी होतील? काही मुलांचे असे वर्तन असते जे बस्स, या बाबांनाच माहित आणि त्या बाबांना माहित.

आता तुम्हा मुलांना सजेपासून सुटका करण्याचा मुख्य पुरुषार्थ करायचा आहे. त्यासाठी मुख्य आहे आठवणीची यात्रा, ज्यामुळेच विकर्म विनाश होतात. भले कोणी पैशाची मदत करतात, असे समजतात आपण श्रीमंत बनणार परंतु पुरुषार्थ तर सजेपासून वाचण्याचा करायचा आहे. नाहीतर बाबांच्या समोर सजा भोगावी लागेल. न्यायाधीशाचा मुलगा कोणते असे काम करेल तर न्यायाधीशाला सुद्धा लाज वाटेल ना. बाबा देखील म्हणतील - मी ज्यांची पालना करतो त्यांना मग सजा देणार! त्यावेळी खांदे पाडून हाय-हाय करत राहतील - ‘बाबांनी मला इतके समजावून सांगितले, शिकवले आणि मी लक्षच दिले नाही’. बाबांसोबत तर धर्मराज सुद्धा आहे ना. ते तर जन्मपत्रिकेला जाणतात. आता तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये बघता. दहा वर्षे पवित्रतेमध्ये चालला, अचानकच मायेने असा ठोसा मारला, केलेली कमाई नाहीशी केली, पतित बनला. अशी खूप उदाहरणे होत राहतात. खूपजण कोसळतात. दिवसभर मायेच्या वादळांमुळे हैराण होत राहतात, मग बाबांनाच विसरून जातात. बाबांकडून आपल्याला बेहदची बादशाही मिळत आहे, तो आनंद राहत नाही. काम विकाराच्या मागे मग मोह देखील आहे. यामध्ये नष्टोमोहा बनावे लागते. पतितांवर काय प्रेम करायचे आहे. होय, आपण हेच लक्षात ठेवायचे आहे की, यांना देखील आपण बाबांचा परिचय देऊन जागे करावे. यांना कसेही करून शिवालयाच्या लायक बनवावे. मनातल्या मनात ही युक्ती रचा. काही मोहाची गोष्ट नाहीये. कितीही आवडता नातेवाईक असो, त्यांना देखील समजावून सांगत रहा. कोणातही अपार प्रेमाची आसक्ती असू नये. नाही तर सुधारणार नाहीत. दयाळू बनले पाहिजे. स्वतःवर देखील दया करायची आहे आणि इतरांवर देखील दया करायची आहे. बाबांना सुद्धा दया येते. पाहायचे आहे आपण किती जणांना आप समान बनवतो. बाबांना पुरावा द्यावा लागेल की, आपण किती जणांना परिचय दिला. ते (ज्ञान घेणारे) देखील मग लिहितात - ‘बाबा, आम्हाला यांच्याद्वारे खूप चांगला परिचय मिळाला’. बाबांकडे पुरावा येईल तेव्हाच तर बाबा समजतील की होय, हे सेवा करतात. बाबांना लिहा - ‘बाबा, ही ब्राह्मणी तर खूप हुशार आहे. खूप चांगली सेवा करते, आम्हाला चांगले शिकवते’. परंतु योगामध्ये मुले नापास होतात. आठवण करण्याची अक्कल नाही आहे. बाबा समजावून सांगतात - भोजन खाताना देखील शिवबाबांची आठवण करून खा. कुठे हिंडा-फिरायाला जाता तरी देखील शिवबाबांची आठवण करा. झरमुई झगमुई (व्यर्थ गोष्टी) करू नका. भले मनामध्ये कोणत्या गोष्टीचा विचार आला तरी बाबांची आठवण करा म्हणजे कामकाजाचा देखील विचार केला आणि मग बाबांची आठवण करण्यामध्ये गुंतून गेला. बाबा म्हणतात - कर्म तर भले करा, झोप सुद्धा घ्या, त्याच सोबत हे देखील करा. कमीत-कमी आठ तासापर्यंत आले पाहिजे - हे होणार शेवटी. हळूहळू आपला चार्ट वाढवत जा. कोणी-कोणी लिहितात - ‘दोन तास आठवणीमध्ये राहिलो’, मग चालता-चालता चार्ट ढिला पडतो. ती आठवण सुद्धा माया नाहीशी करून टाकते. माया खूप बलवान आहे. जे या सेवेमध्ये दिवसभर बिझी राहतील तेच आठवण देखील करू शकतील. घडोघडी बाबांचा परिचय देत राहतील. बाबा आठवण करण्यावर खूप जोर देत राहतात. स्वतःला जाणीव देखील होते की, आपण आठवणीमध्ये राहू शकत नाही. आठवणीमध्येच माया विघ्न घालते. अभ्यास तर खूप सोपा आहे. बाबांकडून आपण शिकतो देखील. जितके धन घ्याल (ज्ञान धन गोळा कराल) तितके श्रीमंत बनाल. बाबा तर सर्वांना शिकवतात ना. वाणी (मुरली) सर्वांकडे जाते फक्त तुम्हीच नाही, सर्व शिकत आहेत. मुरली मिळाली नाही तर मग ओरडतात. बरेचजण तर असे देखील आहेत जे ऐकणारच नाहीत. असेच चालत राहतात. मुरली ऐकण्याची आवड असली पाहिजे. गाणे किती फर्स्टक्लास आहे - बाबा, आम्ही आमचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. म्हणतात देखील ना - बाबा, जशी आहे, तशी आहे, तिरळी आहे, कशी जरी असली, तुमचीच आहे. ते तर ठीक आहे परंतु छि-छि पेक्षा (विकारी पेक्षा) तर चांगले बनले पाहिजे ना. सर्वकाही योग आणि अभ्यासावर अवलंबून आहे.

बाबांचा बनल्यावर हा विचार प्रत्येक मुलाला आला पाहिजे की, आपण बाबांचे तर बनलो आहोत तर स्वर्गामध्ये तर जाणारच परंतु आपल्याला स्वर्गामध्ये काय बनायचे आहे, याचा देखील विचार करायचा आहे. चांगल्या रीतीने शिका, दैवी गुण धारण करा. माकड ते माकडच राहिलात तर काय पद मिळवणार? तिथे देखील प्रजा, नोकर-चाकर सर्व पाहिजेत ना. शिकलेल्यांकडे अशिक्षित ओझे वाहतील. जितका पुरुषार्थ कराल तितके चांगले सुख मिळवाल. चांगले श्रीमंत बनाल तर खूप आदर मिळेल. सुशिक्षित असणाऱ्यांचा चांगला आदर केला जातो. बाबा तर सल्ला देत राहतात. बाबांच्या आठवणीमध्ये शांतीमध्ये रहा. परंतु बाबा जाणतात सन्मुख राहणाऱ्यांपेक्षाही दूर राहणारे खूप आठवणीमध्ये राहतात आणि चांगले पद मिळवितात. भक्तीमार्गामध्ये देखील असे होते. काही भक्त चांगले फर्स्टक्लास असतात जे गुरु पेक्षाही जास्त आठवणीमध्ये राहतात. जे चांगली भक्ती करत असतील तेच इथे येतात. सर्व भक्त आहेत ना. संन्यासी इत्यादी काही येणार नाहीत, सर्व भक्त भक्ती करता-करता येतील. बाबा किती क्लियर करून समजावून सांगतात. तुम्ही ज्ञान घेत आहात, यावरून सिद्ध होते की तुम्ही खूप भक्ती केली आहे. जास्त भक्ती करणारे जास्त शिकतील. कमी भक्ती करणारे कमी शिकतील. मुख्य मेहनत आहे आठवणीची. आठवणीनेच विकर्म विनाश होतील आणि खूप गोड सुद्धा बनायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कितीही कोणी आवडता नातलग असेल त्यांच्यामध्ये मोहाची आसक्ती जाता कामा नये. युक्तीने समजावून सांगायचे आहे. स्वतःवर आणि दुसऱ्यांवर दया करायची आहे.

२) बाबा आणि टीचरची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. नशा असावा भगवान आपल्याला शिकवत आहेत, विश्वाची बादशाही देत आहेत! चालता-फिरता आठवणीमध्ये रहायचे आहे, झरमुई, झगमुई (व्यर्थ गोष्टी) करायच्या नाहीत.

वरदान:-
अविनाशी रुहानी रंगाच्या खऱ्या होळी द्वारे बाप समान स्थितीचे अनुभवी भव

तुम्ही परमात्म रंगामध्ये रंगलेले होली (पवित्र) आत्मे आहात. संगमयुग होली (पवित्र) जीवनाचे युग आहे. जेव्हा अविनाशी रुहानी रंग लागतो तर कायमसाठी बाप समान बनता. तर तुमची होळी आहे संगाच्या रंगाद्वारे बाप समान बनणे. असा पक्का रंग असावा जो इतरांनाही समान बनवेल. प्रत्येक आत्म्यावर अविनाशी ज्ञानाचा रंग, आठवणीचा रंग, अनेक शक्तींचा रंग, गुणांचा रंग, श्रेष्ठ वृत्ती, दृष्टी, शुभ भावना, शुभकामनेचा रुहानी रंग लावा.

बोधवाक्य:-
दृष्टीला अलौकिक, मनाला शितल, बुद्धीला दयाळू आणि वाणीला मधुर बनवा.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रूपी कल्चरला धारण करा:-

सत्यतेच्या शक्ती स्वरूप बनून, नशेमध्ये बोला, नशेने बघा, आपण ऑलमायटी गव्हर्मेंटचे अनुयायी आहोत, याच स्मृतीद्वारे अयथार्थला यथार्थमध्ये आणायचे आहे. सत्याला प्रसिद्ध करायचे आहे, ना की लपवायचे आहे परंतु सभ्यतेने. नशा असावा की आपण शिवाच्या शक्ती आहोत. ‘हिम्मते शक्तीयां, मददे सर्वशक्तिवान’.