14-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - एक बाबाच नंबर वन ॲक्टर आहेत जे पतितांना पावन बनविण्याची ॲक्ट करत आहेत,
बाबांसारखी ॲक्ट कोणीही करू शकत नाही”
प्रश्न:-
संन्याशांचा
योग हा भौतिक योग आहे, रूहानी (आत्मिक) योग फक्त बाबाच शिकवतात, तो कसा?
उत्तर:-
संन्यासी ब्रह्म तत्वाशी योग लावायला शिकवतात. आता ते तर राहण्याचे ठिकाण आहे. तर
तो भौतिक योग झाला. तत्वाला सुप्रीम म्हटले जात नाही. तुम्ही मुले सुप्रीम रूह सोबत
(परम आत्म्याशी) योग लावता म्हणून तुमचा योग रूहानी योग आहे. हा योग बाबाच शिकवू
शकतात, दुसरा कोणीही शिकवू शकत नाही कारण तेच तुमचे रूहानी पिता आहेत.
गीत:-
तू प्यार का
सागर है...
ओम शांती।
मुलांनो, खूप लोक म्हणतात की, ओम् शांती अर्थात आपल्या आत्म्याची ओळख देतात. परंतु
स्वतः समजू शकत नाहीत. ‘ओम् शांती’ या शब्दाचे अनेक अर्थ काढतात. कोणी म्हणतात
‘ओम्’ अर्थात भगवान. परंतु नाही, (pasue घेणे) हे आत्मा म्हणते - ओम् शांती. मज
आत्म्याचा स्वधर्म आहेच मुळी शांत, म्हणूनच म्हणतात - ‘मी शांत स्वरूप आहे. हे माझे
शरीर आहे ज्याद्वारे मी कर्म करतो’. किती सोपे आहे. त्याचप्रमाणे बाबा देखील
म्हणतात - ‘ओम् शांती’. परंतु मी सर्वांचा पिता असल्यामुळे, बीजरूप असल्यामुळे
देखील जे रचना रुपी झाड आहे, ज्याला कल्पवृक्ष म्हटले जाते त्याच्या आदि-मध्य-अंताला
मी जाणतो. जसे तुम्ही कोणतेही झाड बघाल तर त्याच्या आदि-मध्य-अंता विषयी माहित असते,
ते बीज तर जड आहे. तर बाबा समजावून सांगतात की हा कल्पवृक्ष आहे, याच्या
आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणू शकत नाही, मी जाणतो. मला म्हणतातच ज्ञानाचा सागर. मी
तुम्हा मुलांना बसून आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहे. हे जे नाटक आहे,
ज्याला ड्रामा म्हटले जाते, ज्याचे तुम्ही ॲक्टर्स आहात बाबा म्हणतात मी देखील ॲक्टर
आहे. मुले म्हणतात - ‘ओ बाबा, पतित-पावन ॲक्टर बनून या, येऊन पतितांना पावन बनवा’.
आता बाबा म्हणतात - ‘मी ॲक्ट करत आहे. माझा पार्ट फक्त या संगमाच्या वेळीच आहे.
त्यातही मला स्वतःचे शरीर नाही. मी या शरीराद्वारे ॲक्ट करतो. माझे नाव शिव आहे.
मुलांनाच तर समजावून सांगतील ना. पाठशाळा काही माकडांची किंवा प्राण्यांची नसते.
परंतु बाबा म्हणतात की या ५ विकारांमुळे रूप तर मानवासारखे आहे परंतु कर्तव्ये
मर्कटासमान आहेत. मुलांना बाबा समजावून सांगतात की, सर्वजण स्वतःला पतित तर म्हणवून
घेतातच. परंतु हे जाणत नाहीत की आपल्याला पतित कोण बनवतात आणि मग पावन कोण येऊन
बनवतात? पतित-पावन कोण आहे? ज्याला बोलावतात, काहीही समजू शकत नाहीत. हे देखील जाणत
नाहीत की आपण सर्व ॲक्टर्स आहोत. आपण आत्मे हे वस्त्र (शरीर) धारण करून पार्ट बजावतो.
आत्मा परमधाममधून येते, येऊन पार्ट बजावते. सारा खेळ भारतावरच बनलेला आहे. पावन
भारताला पतित भारत कोणी बनवले? रावणाने. गातात देखील की, रावणाचे लंकेवर राज्य होते.
बाबा बेहदमध्ये घेऊन जातात. माझ्या मुलांनो, ही सर्व सृष्टी बेहदचे बेट आहे. ती तर
हदची लंका आहे. या बेहदच्या बेटावर रावणाचे राज्य आहे. आधी रामराज्य होते, आता रावण
राज्य आहे. मुले विचारतात - ‘बाबा, रामराज्य कुठे होते?’ बाबा म्हणतात - ‘मुलांनो,
ते तर इथेच होते ना, हे सर्वांना हवेसे वाटते.
तुम्ही भारतवासी आदि
सनातन देवी-देवता धर्माचे आहात, हिंदू धर्माचे नाही. गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर
भेटलेल्या लाडक्या मुलांनो, सर्वात आधी तुम्हीच भारतामध्ये होतात. तुम्हाला ते
सतयुगाचे राज्य कोणी दिले होते? जरूर हेवनली गॉड फादरच हा वारसा देतील. बाबा
समजावून सांगतात की कित्येकजण वेगवेगळ्या धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत.
मुसलमानांचे जेव्हा राज्य होते तेव्हा अनेकांना मुसलमान बनवले. ख्रिश्चनांचे राज्य
होते, तेव्हा अनेकांना ख्रिश्चन बनवले. बौद्धांचे तर येथे राज्य सुद्धा नव्हते तरीही
अनेकांना बौद्ध बनवले. आपल्या धर्मा मध्ये कन्व्हर्ट केले आहे. आदि सनातन धर्म
जेव्हा प्रायः लोप होईल तेव्हाच तर पुन्हा त्या धर्माची स्थापना होईल. तर बाबा
तुम्हा सर्व भारतवासियांना म्हणतात की गोड-गोड मुलांनो, तुम्ही सर्व आदि सनातन
देवी-देवता धर्माचे होतात. तुम्ही ८४ जन्म घेतले. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय...
वर्णांमध्ये आलात. आता पुन्हा ब्राह्मण वर्णामध्ये आला आहात देवता वर्णामध्ये
जाण्यासाठी. गातात देखील - ‘ब्राह्मण देवताय नमः’, आधी ब्राह्मणांचे नाव घेतात.
ब्राह्मणांनीच भारताला स्वर्ग बनवले आहे. हा आहेच भारताचा प्राचीन योग. सर्वात आधी
जो राजयोग होता, ज्याचे गीतेमध्ये वर्णन आहे. गीतेचा योग कोणी शिकवला होता? हेच
भारतवासी विसरले आहेत. बाबा समजावून सांगत आहेत की, ‘मुलांनो, योग तर मी शिकवला होता’.
हा आहे रूहानी योग. बाकी सर्व आहेत भौतिक योग. संन्यासी इत्यादी भौतिक योग शिकवतात
की ब्रह्म तत्वाशी योग लावा. ते तर चुकीचे ठरते. ब्रह्म तत्व तर राहण्याचे ठिकाण आहे,
ते काही सुप्रीम रूह (परमात्मा) होत नाही. बाबांना विसरून गेले आहेत. तुम्ही देखील
विसरला होता. तुम्ही आपल्या धर्माला विसरला आहात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
परदेशात तर योग नव्हताच मुळी. हठयोग आणि राजयोग इथेच आहे. ते निवृत्ती मार्गवाले
संन्यासी कधीही राजयोग शिकवू शकत नाहीत. शिकवू तोच शकतो जो जाणतो. संन्यासी लोक तर
राज्य देखील सोडून देतात. गोपीचंद राजाचे उदाहरण आहे ना. राज्य सोडून जंगलात निघून
गेला. त्याची देखील एक कहाणी आहे. संन्यासी तर राज्यपद सोडायला लावणारे आहेत, ते मग
राजयोग कसा शिकवू शकतील. या वेळी संपूर्ण झाड जडजडीभूत झाले आहे. आता कोसळले की
कोसळले. कोणतेही झाड जेव्हा जडजडीभूत होते तेव्हा शेवटी त्याला तोडावे लागते. तसेच
हे मनुष्य सृष्टीरूपी झाड देखील तमोप्रधान आहे, यामध्ये काहीही सार उरलेले नाही.
याचा जरूर विनाश होईल. त्याच्या अगोदरच इथे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना
करावी लागेल. सतयुगामध्ये कोणीही दुर्गती झालेला नसतो. हे (संत-मुनी) परदेशामध्ये
जाऊन योग शिकवतात परंतु तो आहे हठयोग. ज्ञान मुळीच नाही. अनेक प्रकारचे हठयोग आहेत.
हा आहे राजयोग, याला ‘रूहानी योग’ म्हटले जाते. ते सर्व आहेत भौतिक योग. मनुष्य,
मनुष्याला शिकविणारे आहेत.
बाबा मुलांना समजावून
सांगतात की मी तुम्हाला एकदाच हा राजयोग शिकवतो इतर कोणी कदापि शिकवू शकणार नाही.
रूहानी बाबा रूहानी मुलांना शिकवितात की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची
सर्व पापे नष्ट होतील. हठयोगी कधीही असे म्हणू शकणार नाहीत. बाबा आत्म्यांना
समजावून सांगतात. ही नवीन गोष्ट आहे. बाबा तुम्हाला आता देही-अभिमानी बनवत आहेत.
बाबांना तर देहच नाही. ते यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) तनामध्ये येतात, यांचे नाव
बदलतात कारण मरजीवा बनले आहेत. जसे गृहस्थी जेव्हा संन्यासी बनतात तेव्हा मरजीवा
बनतात, गृहस्थ आश्रम सोडून निवृत्ती मार्ग स्वीकारतात. तसेच तुमचे देखील मरजीवा
बनल्यामुळे नाव बदलते. आधी सुरुवातीला सर्वांची नावे आणली होती मग जे आश्चर्यवत
सुनन्ती, कथन्ती, भागन्ती झाले तर नावे येणे बंद झाले म्हणूनच आता बाबा म्हणतात की,
मी नाव दिले आणि मग सोडून गेला तर ते व्यर्थ ठरते. सुरुवातीला येणाऱ्यांची जी नावे
ठेवली ती खूप रमणीक होती. आता ठेवत नाही. त्यांचेच ठेवावे जे सदैव कायम देखील
राहतील. अनेकांची नावे ठेवली मग ते बाबांना सोडचिठ्ठी देऊन निघून गेले म्हणून आता
नाव बदलत नाहीत. बाबा समजावून सांगतात की हे ज्ञान ख्रिश्चनांच्या बुद्धीमध्ये
देखील बसेल. एवढे मात्र नक्की समजतील की, भारताचा योग निराकार पित्यानेच येऊन शिकवला
होता. बाबांची आठवण केल्यानेच पाप भस्म होतील आणि आपण आपल्या घरी निघून जाऊ. जो या
धर्माचा असेल आणि कन्व्हर्ट झाला असेल तर तो इथे टिकेल. तुम्ही जाणता की मनुष्य,
मनुष्याची सद्गती करू शकत नाही. हे दादा (ब्रह्मा बाबा) देखील मनुष्य आहेत, ते
म्हणतात की मी कोणाचीही सद्गती करू शकत नाही. हे तर बाबा आम्हाला शिकवत आहेत की
तुमची सद्गती देखील आठवण केल्यानेच होईल. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, माझ्या
आत्म्यांनो माझ्याशी योग लावा तर तुमची विकर्म विनाश होतील’. तुम्ही आधी गोल्डन
एज्ड शुद्ध होता नंतर मग त्यात भेसळ पडली आहे. जे आधी देवी-देवता २४ कॅरेट सोने होते,
ते आता आयर्न एज्ड मध्ये येऊन पोहोचले आहेत. हा योग कल्प-कल्प तुम्हाला शिकावा लागतो.
तुम्ही जाणता की त्यामध्ये देखील कोणी पूर्णपणे जाणतात, कोणी कमी जाणतात. कोणी तर
असेच बघण्याकरिता येतात की इथे काय शिकवतात. ब्रह्माकुमार-कुमारी इतकी असंख्य मुले
आहेत. जरूर प्रजापिता ब्रह्मा असतील ना ज्यांची इतकी मुले येऊन बनली आहेत, जरूर
काहीतरी असेल तर जाऊन त्यांना विचारावे तरी. तुम्हाला प्रजापिता ब्रह्मा
यांच्याकडून काय मिळते? विचारले पाहिजे ना! परंतु इतकी बुद्धी देखील नाहीये.
भारतासाठी खास म्हटले जाते. गायले देखील जाते - पत्थर-बुद्धी सो पारस-बुद्धी.
पारस-बुद्धी सो पत्थर-बुद्धी. सतयुग-त्रेतायुगात पारस-बुद्धी गोल्डन एज्ड होते मग
सिल्व्हर एज्ड मध्ये दोन कला कमी झाल्या म्हणून नाव पडले चंद्रवंशी, कारण नापास झाले
आहेत. ही देखील पाठशाळा आहे. ३३ मार्कांपेक्षा जे खाली असतात ते नापास होतात.
राम-सीता मग त्यांची डिनायस्टी संपूर्ण नाहीये, म्हणून सूर्यवंशी बनू शकत नाहीत.
नापास तर कोणीतरी होणार ना कारण परीक्षा देखील खूप मोठी आहे. पूर्वी गव्हर्नमेंटची
आय.सी.एस. ची मोठी परीक्षा असायची. सर्व थोडेच शिकू शकत होते. कोटींमध्ये कोणी
निघतात. कोणाला वाटेल की आपण सूर्यवंशी महाराजा-महाराणी बनावे तर त्यामध्ये देखील
खूप मेहनत पाहिजे. मम्मा-बाबा देखील श्रीमतावर चालून शिकत आहेत. ते प्रथम क्रमांकाने
शिकतात आणि मग जे मात-पित्याला फॉलो करतात तेच त्यांच्या तख्तावर बसतील. सूर्यवंशीची
८ डिनायस्टी (घराणी) चालतात. जसे एडवर्ड द फर्स्ट, द सेकंड चालते. तुमचे कनेक्शन या
ख्रिश्चनांशी जास्त आहे. ख्रिश्चन घराण्याने भारताची राजाई हडप केली. भारताचे अथाह
धन घेऊन गेले मग विचार करा की सतयुगामध्ये किती अथाह धन असेल. तिथल्या तुलनेत तर इथे
काहीच नाहीये. तिथे सर्व खाणी भरलेल्या असतात. आता तर प्रत्येक गोष्टीच्या खाणी
रिकाम्या होत चालल्या आहेत. पुन्हा चक्र रिपीट होईल तेव्हा मग सर्व खाणी पुन्हा
भरल्या जातील.
गोड-गोड मुलांनो,
तुम्ही आता रावणावर विजय प्राप्त करून राजाई घेत आहात मग अर्ध्या कल्पानंतर हा रावण
येईल पुन्हा तुम्ही राज्य गमावून बसाल. आता भारतवासी तुम्ही कवडी तुल्य बनला आहात.
मी तुम्हाला हिऱ्या समान बनविले होते. रावणाने तुम्हाला कवडी समान बनविले आहे. समजत
नाहीत की हा रावण कधी आला? आपण त्याला का जाळतो? म्हणतात की, हा रावण तर परंपरेने
चालत आला आहे. बाबा समजावून सांगतात की अर्ध्या कल्पानंतर हे रावण राज्य सुरू होते.
विकारी बनल्यामुळे स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाहीत. वास्तविक तुम्ही देवी-देवता
धर्माचे होता. तुमच्या इतके सुख कोणीही पाहू शकत नाही. सर्वात जास्त गरीब देखील
तुम्हीच बनला आहात. इतर धर्मातील लोकांची नंतर वृद्धि होते. क्राईस्ट आला, आधी तर
खूप थोडे होते. जेव्हा खूप होतील तेव्हाच तर राज्य करू शकतील. तुम्हाला तर आधी
राज्य मिळते. या तर सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत. बाबा म्हणतात - ‘माझ्या आत्म्यांनो,
मज पित्याची आठवण करा’. अर्धा कल्प तुम्ही देह-अभिमानी होऊन राहिला आहात. आता
देही-अभिमानी बना. वेळोवेळी हे विसरून जाता कारण अर्ध्या कल्पाचा कट (गंज) चढलेला
आहे. या वेळी तुम्ही ब्राह्मण चोटी (शिखर) आहात. तुम्ही आहात सर्वात उच्च. संन्यासी
ब्रह्मासोबत योग लावतात त्याने विकर्म विनाश होत नाहीत. प्रत्येकाला सतो, रजो,
तमोमध्ये यायचेच आहे. परत कोणीही जाऊ शकत नाहीत. जेव्हा सर्वजण तमोप्रधान बनतात
तेव्हा बाबा येऊन सर्वांना सतोप्रधान बनवितात अर्थात सर्वांची ज्योत जागृत होते.
प्रत्येक आत्म्याला आपला-आपला पार्ट मिळालेला आहे. तुम्ही आहात हीरो-हीरोइन
पार्टधारी. तुम्ही भारतवासी सर्वात श्रेष्ठ आहात जे राज्य मिळवता आणि मग गमावता;
इतर कोणीही राज्य मिळवत नाही. ते राज्य मिळवतात बाहुबळाने. बाबांनी समजावून सांगितले
आहे जे विश्वाचे मालक होते तेच बनतील. तर खरा राजयोग बाबांव्यतिरिक्त कोणीही शिकवू
शकत नाही. जे शिकवतात तो सर्व अयथार्थ (चुकीचा) योग आहे. परत तर कोणीही जाऊ शकत नाही.
आता आहे शेवट. सर्वजण दुःखातून मुक्त होतात मग नंबरवार यायचे आहे. आधी सुख पहायचे
आहे आणि मग दुःख पहायचे आहे. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हटले जाते -
‘हथ कार डे दिल यार डे’ (हाताने काम करत रहा आणि मनातून प्रियकराची म्हणजेच
परमात्म्याची आठवण करत रहा). काम करत रहा बाकी बुद्धियोग बाबांसोबत असावा.
तुम्ही आत्मे आशिक
आहात एका माशूकचे. आता तो माशूक आलेला आहे. सर्व आत्म्यांना (सजणींना) गुल-गुल (फूल)
बनवून घेऊन जातील. बेहदचा साजण बेहदच्या सजण्या आहेत. म्हणतात - ‘मी सर्वांना घेऊन
जाईन’. मग नंबरवार पुरुषार्था अनुसार जाऊन पद प्राप्त करतील. भले गृहस्थ
व्यवहारामध्ये रहा, मुलांचा सांभाळ करा. हे आत्म्या, तुझे मन बाबांकडे असावे. याच
आठवणीची प्रॅक्टिस करत रहा. मुले जाणतात की, आता आपण बाबांची आठवण केल्याने
स्वर्गवासी बनत आहोत. स्टुडंटने तर खूप आनंदात राहिले पाहिजे. हे तर खूप सोपे आहे.
ड्रामा अनुसार सर्वांना मार्ग सांगायचा आहे. कोणाशीही वाद घालण्याची गरज नाही. आता
तुमच्या बुद्धीमध्ये सर्व नॉलेज आले आहे. मनुष्य आजारातून बरे होतात तेव्हा अभिनंदन
करतात. इथे तर संपूर्ण दुनिया रोगी आहे. थोड्याच काळात जयजयकार होईल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सच्चा-सच्चा
आशिक बनून हाताने काम करत असताना बुद्धीने माशूकची (परमात्म्याची) आठवण करण्याची
प्रॅक्टिस करायची आहे. बाबांच्या आठवणीने आम्ही स्वर्गवासी बनत आहोत, या आनंदात
राहायचे आहे.
२) सूर्यवंशी
डिनायस्टीमध्ये तख्तनशीन बनण्यासाठी मात-पित्याला पूर्णपणे फॉलो करायचे आहे. बाप
समान नॉलेजफुल बनून सर्वांना मार्ग दाखवायचा आहे.
वरदान:-
ताज आणि तिलक
धारण करून बापदादांचे मदतगार बनणारे दिलतख्तनशीन भव
जेव्हा कोणी
सिंहासनावर बसतात तेव्हा तिलक आणि ताज ही त्यांची निशाणी असते. अगदी तसेच जे दिल
तख्तनशीन आहेत त्यांच्या मस्तकावर सदैव अविनाशी आत्मिक स्थितीचा तिलक दुरूनच चमकत
असल्याचा दिसून येतो. सर्व आत्म्यांच्या कल्याणाची शुभ भावना त्यांच्या डोळ्यांमधून
आणि चेहऱ्यावरून दिसून येते. त्यांचा प्रत्येक संकल्प, वचन आणि कर्म बाबांसमान असते.
बोधवाक्य:-
सोप्या
आठवणीसाठी साधेपणाचा गुण धारण करा, संस्कारांना सरळ बनवा.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
विजयी बनण्याचे
फाउंडेशन आहे ‘निश्चय’. फाउंडेशन जर पक्के असेल तर बिल्डिंग हलू शकत नाही, निश्चिंत
राहतात. परंतु केवळ बाबांवर निश्चय नाही, स्वतःवर देखील निश्चय आणि ड्रामावर देखील
निश्चय. वाह ड्रामा वाह! जर ड्रामावर निश्चय असेल तर अकल्याणाची गोष्ट देखील
कल्याणामध्ये बदलून जाईल.