14-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - देवता बनायचे असेल तर अमृत प्या आणि इतरांना देखील पाजा, अमृत पिणारेच श्रेष्ठाचारी बनतात”

प्रश्न:-
यावेळी सतयुगी प्रजा कोणत्या आधारावर तयार होत आहे?

उत्तर:-
जे या ज्ञानाने प्रभावित होतात, ‘खूप चांगले, खूप चांगले’ असे म्हणतात परंतु शिकत नाहीत, मेहनत करू शकत नाहीत, ते प्रजा बनतात. प्रभावित होणे अर्थात प्रजा बनणे. सूर्यवंशी राजा-राणी बनण्याकरिता तर मेहनत पाहिजे. शिक्षणावर पूर्ण अटेंशन असावे. आठवण करत रहाल आणि इतरांनाही करवून देत रहाल तर उच्च पद प्राप्त होऊ शकते.

गीत:-
तूने रात गॅवाई सो के….

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले की आपले जीवन हिऱ्याप्रमाणे होते. आता कवडी प्रमाणे झाले आहे. ही तर कॉमन गोष्ट आहे. बाबा खूप सोप्या रीतीने समजावून सांगतात, ज्यामुळे एखादे छोटे मूल देखील समजू शकेल. सत्य नारायणाची कथा ऐकवतात तेव्हा लहान-लहान मुले देखील बसतात. परंतु त्या सत्संग इत्यादीमध्ये जे ऐकवतात त्या सर्व आहेत कथा. कथेमध्ये ज्ञान अजिबात नाहीये, कपोलकल्पित कथा आहेत. गीतेची कथा, रामायणाची कथा विविध शास्त्रे आहेत, ज्यांच्या कथा बसून ऐकवतात. त्या सर्व आहेत कथा. कथा-कहाण्या पासून काही फायदा होतो का! ही आहे सत्य नारायणाची अर्थात नरा पासून नारायण बनण्याची सत्य कथा. ही ऐकल्याने तुम्ही नरा पासून नारायण बनाल. ही अमर कथा देखील झाली. तुम्ही निमंत्रण देता की, ‘या, आम्ही तुम्हाला अमर कथा ऐकवतो ज्याद्वारे तुम्ही अमर लोकमध्ये निघून जाल’. तरी देखील कोणी समजत नाहीत. शास्त्रांच्या कथा ऐकत राहतात, मिळत काहीच नाही. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जातील म्हणतील - चला दर्शन करून यावे. महात्माजींचे दर्शन करून यावे, असा एक रिवाज चालत आला आहे. ऋषी-मुनी इत्यादी जे होऊन गेले आहेत त्यांच्या समोर डोके टेकवत आले आहेत. त्यांना विचाराल - ‘रचता आणि रचनेच्या कहाणी विषयी तुम्हाला काही ठाऊक आहे का?’ तर म्हणतील - नाही. आता तुम्ही मुले समजता की ही रचता आणि रचनेची कहाणी तर खूप सोपी आहे. अल्फ आणि बे ची कहाणी आहे. भले प्रदर्शनीमध्ये जे येतात ते ती कहाणी तर चांगल्या रीतीने ऐकतात परंतु पवित्र बनत नाहीत. समजतात हा विकारांमध्ये जाण्याचा रिती-रिवाज देखील अनादि आहे (चिरंतन आहे). मंदिरामध्ये देवतां समोर जाऊन गातात - ‘तुम्ही संपूर्ण निर्विकारी आहात…’ आणि मग बाहेर येऊन म्हणतात विकारामध्ये जाणे तर अनादि आहे. या विकारा शिवाय दुनिया कशी चालेल? लक्ष्मी-नारायण इत्यादींना देखील मुले होती ना, असे म्हणतात तर असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे बरें! मनुष्याचा मर्तबा तर देऊ शकत नाही. देवता देखील मनुष्य होते, किती सुखी होते - लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये. तुम्हा मुलांना बाबा खूप सोपी गोष्ट सांगत आहेत - खरोखर, इथे भारतामध्येच स्वर्ग होता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. चित्र देखील आहेत, असे तर सगळेच मान्य करतील की, सतयुगामध्ये त्यांचे राज्य होते. तिथे कोणीही दुःखी नव्हते, संपूर्ण निर्विकारी होते, त्यांची मंदिरे देखील अति भव्य बनवलेली होती. त्यांना ५ हजार वर्षे झाली. आता ते नाही आहेत. आता तर कलियुगाचा अंत आहे. मनुष्य आपसामध्ये भांडण-तंटे करत राहतात. भगवान तर वर निर्वाणधाम मध्येच राहतात. खरे तर आपण आत्मे देखील तिथेच राहतो, इथे आपण पार्ट बजावण्याकरिता येतो. अगदी सुरवातीला आपण लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये होतो. तिथे खूप सुख-आनंद होता, त्यानंतर मग आपल्याला ८४ जन्म घ्यावे लागले. गायले देखील जाते - ८४ जन्मांचे चक्र. आपण सूर्यवंशी मध्ये १२५० वर्षे राज्य केले. तिथे अथाह सुख होते, संपूर्ण निर्विकारी होते, हिरे-माणकांचे महाल होते. आपण राज्य केले, नंतर मग ८४ जन्मांमध्ये यावे लागेल. हे दुनियेचे इतिहास-भूगोलाचे चक्र फिरत राहते. अर्धा कल्प सुख होते. राम-राज्यामध्ये होतो, मग मनुष्यांची वृद्धी होत गेली. सतयुगामध्ये ९ लाख होते, सतयुग अंतामध्ये वृद्धी होऊन ९ लाखा पासून २ करोड झाले. नंतर मग १२ जन्म त्रेतामध्ये अतिशय सुख-शांती मध्ये होतो. एकच धर्म होता. मग पुढे काय झाले? पुढे मग रावण राज्य सुरू झाले. रामराज्य आणि रावणराज्य बघा, खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहे. लहान-लहान मुलांना देखील असे सांगितले पाहिजे - ‘मग पुढे काय झाले?’ मोठ-मोठे सोन्याचे हिरे-माणकांचे महाल धरणीकंपामध्ये खाली जमिनीत गाडले गेले. भारतवासी विकारी बनल्यामुळेच धरणीकंप झाला, आणि मग रावण राज्य सुरू झाले. पवित्र असलेले अपवित्र बनले. म्हणतात देखील सोन्याची लंका गाडली गेली. काही तरी शिल्लक राहिलेच असेल ना, ज्यावरून मग मंदिरे इत्यादी बांधली असतील. भक्ती मार्ग सुरू झाला - मनुष्य विकारी बनू लागले. आणि मग रावण राज्य सुरू झाले तर आयुर्मान देखील कमी झाले. आपण निर्विकारी योगी पासून विकारी भोगी बनलो, यथा राजा-राणी तथा प्रजा सर्व विकारी बनले. ही कहाणी किती सोपी आहे. छोट्या-छोट्या मुली देखील ही कहाणी जर ऐकवतील तर मोठ-मोठ्या व्यक्तींची मान खाली होईल. आता बाबा बसून सांगत आहेत - तेच ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत. अच्छा, द्वापरमध्ये भोगी पतित बनलो तर मग इतर धर्म येणे देखील सुरू झाले. अमृताचा जो नशा होता तो खलास झाला. भांडण-तंटे होऊ लागले. द्वापर पासून आपण घसरलो (अधोगती झाली), कलियुगामध्ये आपण अजूनच विकारी बनलो. दगडाच्या मुर्त्या बनवत राहिलो. हनुमान, गणेश इत्यादींच्या मुर्त्या… पत्थर-बुद्धी बनू लागले तर दगडाची पूजा करू लागले. समजत होते की, भगवान दगड-धोंड्यामध्ये आहेत. असे करता-करता आता भारताची ही अवस्था झाली आहे; आता पुन्हा बाबा सांगत आहेत - विष सोडून अमृत पिऊन पवित्र बना आणि पुन्हा राजाई घ्या. विष सोडाल तर पुन्हा तुम्ही मनुष्या पासून देवता बनाल. परंतु विष सोडतच नाहीत. विषासाठी (विकारासाठी) किती मारतात, हैराण करतात तेव्हाच तर द्रौपदीने बोलावले ना. तुम्ही समजता की अमृत पिल्याशिवाय आपण देवता कसे बनणार. सतयुगामध्ये तर रावण असतही नाही. बाबा म्हणतात - जोपर्यंत श्रेष्ठाचारी बनणार नाही, तोपर्यंत स्वर्गामध्ये येऊ शकणार नाही. जे श्रेष्ठाचारी होते, ते आता भ्रष्टाचारी बनले आहेत. पुन्हा आता अमृत पिऊन श्रेष्ठाचारी बनायचे आहे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. गीता विसरून गेला आहात काय? गीता रचली आहे मी आणि नाव दिले आहे कृष्णाचे. या लक्ष्मी-नारायणाला ही राजाई कोणी दिली? जरूर भगवंतानेच दिली असेल. अगोदरच्या जन्मामध्ये भगवंताने राजयोग शिकवला, आणि मग नाव टाकले कृष्णाचे. तर समजावून सांगण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. अतिशय सोपी कहाणी आहे. बाबांना किती वेळ लागला? अर्ध्या तासामध्ये इतकी सोपी गोष्ट देखील समजू शकत नाहीत; म्हणून बाबा म्हणतात - बसून फक्त एक छोटीशी कहाणी कोणालाही सांगा. हातामध्ये चित्र घ्या. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, मग त्रेतामध्ये राम-सीतेचे राज्य… त्यानंतर मग द्वापरमध्ये रावणाचे राज्य सुरू झाले. किती सोपी कहाणी आहे. खरोखर, आपण देवता होतो मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. आता स्वतःला देवता समजत नसल्या कारणाने हिंदू म्हणतात. धर्म श्रेष्ठ, कर्म श्रेष्ठ पासून धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनले आहेत. असे छोट्या-छोट्या मुली बसवून भाषण करतील तर साऱ्या सभेमध्ये ‘पुन्हा बोला-पुन्हा बोला’ असे म्हणतील.

बाबा सर्व सेंटर्सवाल्यांना सांगत आहेत की, आता हे मोठे-मोठे जर शिकत नसतील तर छोट्या-छोट्या कुमारींना शिकवा. कुमारींचे नाव देखील आहे. दिल्ली, मुंबईमध्ये खूप चांगल्या-चांगल्या कुमारी आहेत. शिकलेल्या आहेत. त्यांनी तर पुढे झाले पाहिजे. किती काम करू शकतात. कुमारी जर ज्ञान सांगण्यासाठी पुढे झाल्या तर नाव प्रसिद्ध होईल. श्रीमंताच्या घरची जी असते ती मुश्किलीने हिंमत ठेवते. श्रीमंतीचा नशा असतो. हुंडा इत्यादी मिळतो तर बस्स. कुमारी लग्न करून तोंड काळे करतात आणि मग सर्वांच्या समोर वाकावे लागते. तर बाबा किती सोपे करून सांगत आहेत. परंतु पारस-बुद्धी बनवण्याचा विचारच येत नाही. आता बघा, जे शिकत नाहीत ते देखील आज-काल एम. पी., एम.एल.ए. इत्यादी बनले आहेत. शिक्षणाने तर काय-काय बनतात. हे शिक्षण तर खूप सोपे आहे. इतरांना देखील जाऊन शिकवले पाहिजे. परंतु श्रीमतावर चालत नाहीत तर अभ्यास सुद्धा करत नाहीत. खूप चांगल्या-चांगल्या कुमारी आहेत परंतु स्वतःचाच नशा चढलेला आहे. थोडे काम केले तर समजतात आम्ही खूप काम केले आहे. आता तर खूप काम करायचे आहे. आज-काल कुमारी फॅशनमध्येच रमलेल्या असतात. तिथे तर नॅचरल शृंगार असतो. इथे तर किती कृत्रिम शृंगार करतात. फक्त हेअर स्टाईल करण्यासाठी किती पैसे देतात. हे आहे मायाचे आकर्षण. फॉल ऑफ माया रावण राज्य (माया रावण राज्याचे पतन), मग राईज ऑफ राम राज्य (राम राज्याचे उत्थान). आता राम राज्य स्थापन होत आहे. परंतु तुम्ही मेहनत तर करा ना. तुम्ही काय बनाल! जर आता अभ्यास केला नाहीत तर तिथे जाऊन पै-पैशाची प्रजा बनाल. आजकालच्या मोठ-मोठ्या व्यक्ती तिथल्या प्रजेमध्ये येतील. श्रीमंत लोक फक्त चांगले-चांगले म्हणून आपल्या धंद्याला लागतात. खूप चांगले प्रभावित होतात आणि मग पुढे काय! शेवटी काय होईल! तिथे जाऊन प्रजा बनतील. प्रभावित होणे अर्थात प्रजा बनणे. जे मेहनत करतात ते रामराज्यामध्ये येतील. स्पष्टीकरण तर खूप सोपे आहे. या कहाणीच्या नशेमध्ये कोणी राहील तर बेडाच पार होईल. आपण शांतीधाममध्ये जाणार आणि मग सुखधाममध्ये येणार, बस्स आठवण करत रहायची आहे आणि इतरांना आठवण करून देत रहायची आहे, तेव्हाच उच्च पद मिळवाल. लक्ष अभ्यासावर द्यायचे आहे. चित्र हातामध्ये असावे. जसे बाबा जेव्हा लक्ष्मी-नारायणाची पूजा करत होते तेव्हा चित्र खिशामध्ये ठेवलेले असायचे. चित्रे छोटी देखील आहेत, लॉकेटमध्ये देखील आहेत. त्यावर समजावून सांगायचे आहे. हे आहेत बाबा, यांच्या द्वारे वारसा मिळत आहे. आता पवित्र बना, बाबांची आठवण करा. या बॅजमध्ये किती नॉलेज आहे. यामध्ये सगळे ज्ञान आहे. यावर समजावून सांगणे खूप सोपे आहे. सेकंदामध्ये बाबांकडून स्वर्गाच्या जीवनमुक्तीचा वारसा मिळतो. हे जर कोणीही समजावून सांगेल तर जीवनमुक्ती पदाचा अधिकारी बनेल. बाकी अभ्यासानुसार उच्च पद मिळेल. स्वर्गामध्ये तर येतील ना. सरतेशेवटी येतील तर खरे ना. वृद्धी तर होणारच आहे. देवी-देवता धर्म श्रेष्ठ आहे, ते देखील बनतील ना. प्रजा तर लाखोंनी बनेल. सूर्यवंशी बनण्यामध्ये मेहनत आहे. सेवा करणारेच चांगले पद मिळवतील. त्यांचे नाव देखील प्रसिद्ध आहे - कुमारका (दादी प्रकाशमणी) आहे, जनक आहे जी चांगले सेंटर सांभाळत आहे. कोणतीच कटकट नाही.

बाबा म्हणतात - ‘सी नो ईव्हिल, टॉक नो ईव्हिल’; तरी देखील अशा प्रकारच्या गोष्टी करत राहतात. असे मग काय जाऊन बनतील. इतकी सोपी सेवा देखील करत नाहीत. छोट्या-छोट्या मुली देखील हे समजावून सांगू शकतात. हे ज्ञान ऐकवू शकतात. वानर सेना देखील प्रसिद्ध आहे. सीता, ज्या रावणाच्या जेलमध्ये अडकलेल्या आहेत त्यांना सोडवायचे आहे. कथा तर काय-काय बनवल्या आहेत. अशा पद्धतीने कोणी भाषण तर करावे. बाकी फक्त म्हणतात - अमका खूप प्रभावित झाला. तर त्याला विचारा - ‘तुम्ही कोण बनवू इच्छिता?’ फक्त दुसऱ्यांना सांगतील की, यांचे ज्ञान खूप चांगले आहे. स्वत: काहीच समजत नाहीत, मग याने काय फायदा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पारस-बुद्धी बनण्याकरिता पूर्णत: अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. श्रीमतानुसार शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. हदच्या श्रीमंतीचा नशा, फॅशन इत्यादी सोडून या बेहदच्या सेवेला लागायचे आहे.

२) ‘हियर नो ईव्हिल, सी नो ईव्हिल…’ कोणत्याही व्यर्थ गोष्टी करायच्या नाहीत. कोणावरही प्रभावित व्हायचे नाही. सर्वांना सत्यनारायणाची छोटीशी कथा ऐकायची आहे.

वरदान:-
नवीन जीवनाच्या स्मृती द्वारे कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करणारे मरजीवा भव

जी मुले पूर्णपणे मरजीवा बनली आहेत त्यांना कर्मेंद्रियांचे आकर्षण वाटू शकत नाही. मरजीवा बनले अर्थात सर्व बाजूंनी मेले, जुने आयुष्य समाप्त झाले. जेव्हा नवीन जन्म झाला, तर नवीन जन्म, नवीन जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या अधीन कसे होऊ शकतात बरें. ब्रह्माकुमार-कुमारीच्या नवीन जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या अधीन होणे म्हणजे काय गोष्ट असते - या नॉलेज पासूनही दूर. शूद्रपणाचा थोडा सुद्धा श्वास अर्थात संस्कार कुठे अडकलेला नसावा.

बोधवाक्य:-
अमृतवेलेला हृदयामध्ये परमात्म प्रेमाला सामावून घ्या म्हणजे मग दुसरे कोणतेही प्रेम तुम्हाला आकर्षित करू शकणार नाही.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

संघटनमध्ये सफलता प्राप्त करण्याकरिता नेहमी नम्रचित्ताच्या तख्तावर विराजमान होऊन रहा. याच तख्तावर बसून जबाबदारीचा मुकुट धारण करून भविष्याची पदवी तयार करा. तख्तावरून उतरायचे नाही, यावरच बसून काम करा तेव्हाच सफलता मिळत राहील. यासाठी ‘पहिले तुम्ही’ हा पाठ पक्का असावा, यामुळे तुमचे संस्कार सर्वांच्या संस्कारांसोबत सहजच जुळतील.