14-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - जसे
बाबा प्रेमाचा सागर आहेत, त्यांच्या सारखे प्रेम दुनियेमध्ये कोणीही करू शकत नाही,
असे तुम्ही मुले देखील पित्या समान बना, कोणालाही नाराज करू नका”
प्रश्न:-
कोणत्या
प्रकारचे विचार चालत राहतील तर आनंदाचा पारा चढलेला राहील?
उत्तर:-
१) आता आपण
ज्ञान रत्नांनी आपली झोळी भरत आहोत नंतर मग या सर्व खाणी इत्यादी भरपूर होतील. तिथे
सतयुगामध्ये आपण सोन्याचे महाल बांधणार. २) आपले हे ब्राह्मण कुळ उत्तम कुळ आहे,
आपण खरी-खरी सत्यनारायणाची कथा, अमरकथा ऐकतो आणि ऐकवितो… अशा प्रकारचे विचार
मनामध्ये चालत राहतील तर आनंदाचा पारा चढलेला राहील.
ओम शांती।
मुले बाबांच्या आठवणी मध्ये बसली आहेत, हे श्रीमत अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत
मिळते. आठवणीची यात्रा खूप गोड आहे. मुले नंबरवार पुरुषार्था नुसार जाणतात की जितकी
बाबांची आठवण कराल तितकेच बाबा गोड वाटतील. सैक्रीन आहे ना. एक बाबाच प्रेम करतात
बाकी तर सर्व मारून टाकतात. साऱ्या दुनियेमध्ये सर्वजण एकमेकांना झिडकारून टाकतात.
बाबा प्रेम करतात, त्यांना फक्त तुम्ही मुलांनीच ओळखले आहे. बाबा म्हणतात - मी जो
आहे, जसा आहे, किती महान आहे, सांगा बरं आमचे बाबा किती महान आहेत? तर म्हणतात -
बिंदू आहेत बाकीचे तर काही जाणत नाहीत. मुले देखील वारंवार विसरून जातात. म्हणतात
भक्तीमार्गामध्ये तर मोठ-मोठ्या मुर्त्यांची पूजा करत होतो. आता बिंदूची कशी आठवण
करावी? बिंदू, बिंदूचीच आठवण करेल ना. आत्मा जाणते आपण बिंदू आहोत. आपले पिता देखील
असेच आहेत. आत्माच प्रेसिडेंट आहे, आत्माच नोकर आहे. पार्ट आत्माच बजावते. बाबा
आहेत सर्वात स्वीट. सर्व जण आठवण करतात - ‘हे पतित-पावन, दुःखहर्ता-सुखकर्ता या’.
आता तुम्हा मुलांना हा निश्चय आहे आपण ज्यांना बिंदू म्हणतो, ते अति सूक्ष्म आहेत
परंतु महिमा किती जबरदस्त आहे. भले महिमा गातात देखील ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर
आहे, परंतु समजत नाहीत की ते कसे येऊन सुख देतात. गोड-गोड मुले प्रत्येक जण समजू
शकतात - कोण-कोण किती श्रीमतावर चालतात. सेवा करण्यासाठीच श्रीमत मिळते. अनेक
मनुष्य आजारी रोगी आहेत, पुष्कळजण असेही आहेत जे निरोगी देखील आहेत. भारतवासी
जाणतात - सतयुगामध्ये सरासरी आयुर्मान खूपच जास्त, म्हणजे १२५ ते १५० वर्षे होते.
प्रत्येकजण आपले पूर्ण आयुष्य जगतात. ही तर अगदीच घाणेरडी दुनिया आहे जी आता फार
थोडा काळच बाकी आहे.
मनुष्य मोठ-मोठ्या
धर्मशाळा इत्यादी आता देखील बनवत राहतात. त्यांना ठाऊक नाही की, आता किती वेळ उरला
आहे. मंदिरे इत्यादी बांधतात, लाखो रुपये खर्च करतात. त्यांचा कालावधी बाकी किती
वेळ असेल? तुम्ही जाणता ही मंदिरे तर तुटून कोसळून पडली की पडली. तुम्हाला बाबा घरे
इत्यादी बनविण्यासाठी कधी मनाई करत नाही. तुम्ही तुमच्याच घरामध्ये एका खोलीमध्ये
हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी बनवा. या नॉलेज द्वारे बिना खर्च २१ जन्मांकरिता हेल्थ,
वेल्थ, हॅपीनेस मिळवायचा आहे. हे देखील सांगितले आहे - तुम्हाला सुख खूप मिळते.
जेव्हा तमोप्रधान बनता तेव्हा जास्त दुःख होते. जितके-जितके तमोप्रधान बनत जाल तितकी
दुनियेमध्ये दुःख-अशांती वाढत जाईल. मनुष्य खूप दुःखी होतील. मग पुन्हा जय-जयकार
होईल. तुम्ही मुलांनी दिव्य दृष्टीद्वारे जो विनाश, पाहिला आहे तो पुन्हा
प्रॅक्टिकल मध्ये पाहायचा आहे. स्थापनेचा साक्षात्कार देखील अनेकांनी केला आहे.
लहान मुली खूप साक्षात्कार करत होत्या. ज्ञान तर काहीच नव्हते. जुन्या दुनियेचा
विनाश देखील जरूर होणार आहे. तुम्ही मुले जाणता - बाबाच येऊन स्वर्गाचा वारसा देतात.
परंतु मुलांना मग उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. तुम्हा मुलांना
बाबा बसून या सर्व गोष्टी समजावून सांगत आहेत, ते (दुनियावाले) थोडेच जाणतात की बाकी
थोडा वेळ उरला आहे. बाबा म्हणतात - मी आहे दाता, मी तुम्हाला देण्याकरिता आलो आहे.
मनुष्य म्हणतात - ‘पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’.
बाबा म्हणतात - पहिले
तुम्ही किती हुशार होता, सतोप्रधान होता. आता तर तमोप्रधान बनले आहात. तुमच्या
देखील आता हे बुद्धीमध्ये आले आहे, पहिले थोडेच समजत होते की आपण विश्वावर राज्य
करत होतो. तुम्ही विश्वाचे मालक होता आता पुन्हा जरूर बनणार आहात. इतिहास-भूगोल
रिपीट होईल. बाबांनी सांगितले आहे - ५ हजार वर्षांपूर्वी मी आलो होतो, तुम्हाला
स्वर्गाचा मालक बनविले होते. तुम्ही मग ८४ जन्मांची शिडी उतरता. हा विस्तार
कोणत्याही शास्त्रामध्ये नाही. शिवबाबांनी कोणते शास्त्र इत्यादी वाचले आहे काय?
त्यांना तर ज्ञानाची ऑथॉरिटी म्हटले जाते. ते (दुनियेतील) लोक सुद्धा शास्त्र
इत्यादी शिकून शास्त्रांची ऑथॉरिटी बनतात. ते देखील गातात - ‘पतित पावन या’. गंगा
स्नान करण्याकरिता जातात. वास्तविक ही भक्ती आहेच मुळी गृहस्थींकरिता. बाबा बसून
समजावून सांगतात, त्यांना देखील ठाऊक नाही की, सद्गती दाता कोण आहेत. बाबा म्हणतात,
मला बोलावताच मुळी - ‘हे पतित-पावन या’. मी तुम्हाला पावन बनवितो. मी तुम्हाला
शिकविण्याकरिता येतो, असे नाही की, आमच्यावर कृपा करा. मी तर टीचर आहे, तुम्ही कृपा
इत्यादी का मागता? आशीर्वाद तर अनेक जन्म घेत आले आहात. आता येऊन माता-पित्याच्या
संपत्तीचे मालक बना, अजून आशीर्वाद ते काय करणार! बाळ जन्माला आले आणि पित्याच्या
संपत्तीचा मालक बनले. लौकिक पित्याला म्हणतात की, कृपा करा. इथे तर कृपा इत्यादीचा
प्रश्नच नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे. हे देखील कोणाला ठाऊक नाहीये की बाबा
बिंदू आहेत. आता तुम्हाला बाबांनी सांगितले आहे; सर्वजण म्हणतात देखील - परमपिता
परमात्मा, गॉड फादर, सुप्रीम सोल. तर परम-आत्मा झाले ना. ते आहेत सुप्रीम. बाकी
सर्व आत्मे आहेत ना. सुप्रीम बाबा येऊन आप समान बनवितात बाकी काहीही नाही. कोणाच्या
बुद्धीमध्ये तरी असेल काय की, बेहदचे बाबा जे स्वर्गाचे रचयिता आहेत, ते येऊन
स्वर्गाचा मालक बनवितात! तुम्ही आता जाणता, श्रीकृष्णाच्या हातामध्ये स्वर्गाचा गोळा
आहे. गर्भातून बाळ बाहेर पडते तेव्हा पासूनच आयुष्य सुरू होते. श्रीकृष्ण तर पूर्ण
८४ जन्म घेतात. गर्भातून बाहेर आले, त्याच दिवसा पासून ८४ जन्म मोजले जातील.
लक्ष्मी-नारायणाला तर मोठे होण्यासाठी ३०-३५ वर्षे लागली ना. तर ती ३०-३५ वर्षे ५
हजारामधून कमी करावी लागतील. शिवबाबांचे तर वय मोजू शकत नाही. शिवबाबा कधी आले,
त्यांची वेळ सांगू शकत नाहीत. सुरुवातीपासून साक्षात्कार होत होते. मुस्लिम लोक
देखील बगीचा इत्यादी पहात होते. ही नवधा भक्ती तर कोणीच केलेली नाही. घर बसल्या
स्वतःच ध्यानामध्ये जात होते. ते (भक्त लोक) तर किती नवधा भक्ती करतात.
आता बाबा बसून सन्मुख
समजावून सांगत आहेत. बाबा दूर देशातून आलेले आहेत, हे मुले जाणतात. यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) प्रवेश करून आपल्याला शिकवत आहेत. परंतु बाहेर गेल्यावर मग नशा कमी होतो.
आठवण राहील तर आनंदाचा पारा देखील चढलेला राहील आणि कर्मातीत अवस्था होईल, परंतु
त्यालाही वेळ लागतो. आता पहा, श्रीकृष्णाच्या आत्म्याला अंतिम जन्मामध्ये संपूर्ण
ज्ञान आहे, नंतर गर्भातून जेव्हा बाहेर पडतील तेव्हा पैशाचे देखील ज्ञान नसेल. बाबा
येऊन समजावून सांगतात - श्रीकृष्णाने काही मुरली वाजवलेली नाही. तो तर ज्ञानाला
जाणतच नाही. लक्ष्मी-नारायणच जर जाणत नाहीत तर मग ऋषी, मुनी, संन्यासी इत्यादी तरी
कसे जाणतील. विश्वाचे मालक लक्ष्मी-नारायणच जिथे हे ज्ञान जाणत नाहीत तर मग हे
संन्याशी लोक तरी कसे जाणतील. म्हणतात - श्रीकृष्ण सागरामध्ये पिंपळाच्या पानावर आले,
असे केले… या सर्व कथा आहेत, ज्या बसून लिहिल्या आहेत. म्हणतात - यमुना नदीला पायाचा
स्पर्श झाला तर ती खाली गेली; विचार करा - मनुष्य काय-काय गोष्टी बनवू शकतात. आता
बाबा समजावून सांगत आहेत, कोणत्याही उलट्या-सुलट्या गोष्टीवर कधी विश्वास ठेऊ नका.
मनुष्य शास्त्र इत्यादी किती वाचतात. बाबा म्हणतात - वाचलेले सर्व काही विसरून जा.
या देहाला सुद्धा विसरून जा. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेऊन पार्ट बजावते.
वेगवेगळे नाव, रूप, देश, शरीर रुपी वस्त्र धारण करून पार्ट बजावते. आता बाबा
म्हणतात - हे छी-छी वस्त्र (पतित शरीर) आहे. आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत.
आत्म्यालाच श्याम आणि सुंदर म्हटले जाते. आत्मा पवित्र होती तेव्हा ती सुंदर होती
मग काम-चितेवर बसल्याने काळी बनली आहे. आता मग बाबा ज्ञान-चितेवर बसवत आहेत.
पतित-पावन बाबा म्हणतात - माझी आठवण करा तेव्हाच ही आत्म्यातील भेसळ निघून जाईल.
आत्म्यामध्येच भेसळ पडते. कलियुग अंतामध्ये तुम्ही गरीब आहात. तिथे सतयुगामध्ये मग
तुम्ही सोन्याचे महाल बनवाल. आश्चर्य आहे, इथे बघा हिऱ्यांना किती किंमत आहे. तिथे
तर दगडा सारखे असतील. आता तुम्ही बाबांकडून ज्ञान रत्नांनी झोळी भरत आहात. लिहिलेले
आहे - सागराकडून रत्नांच्या थाळ्या भरून घेऊन येत होते. सागराकडून जितके पाहिजे
तितके घ्या. खाणीच भरून जातात. तुम्ही साक्षात्कार केलेला आहे. माया मच्छिंदरचा खेळ
देखील दाखवतात. त्याने पाहिले सोन्याच्या विटा पडलेल्या आहेत, तर म्हणाला - घेऊन
जातो. खाली आला तर काहीच नव्हते. तिथे तर सोन्याच्या विटांचे महाल बनवतील. अशा
प्रकारचे विचार आले पाहिजेत म्हणजे मग आनंदाचा पारा चढेल. बाबांचा परिचय द्यायचा आहे.
शिवबाबा ५ हजार वर्षांपूर्वी देखील आले होते, हे कोणालाच माहित नाही. तुम्ही जाणता
- ५ हजार वर्षांपूर्वी येऊन तुम्हाला राजयोग शिकवला होता, कल्प-कल्प तुम्हालाच
शिकवतील. जे-जे येऊन ब्राह्मण बनतील ते मग देवता बनतील. विराट रूप देखील बनवतात.
त्यामध्ये ब्राह्मणांची शिखा गायब केली आहे. ब्राह्मणांचे कुळ अति उत्तम गायले जाते.
ते ब्राह्मण आहेत देहधारी, तुम्ही आहात रूहानी. तुम्ही खरी-खरी कथा ऐकवता. ही
सत्यनारायणाची कथा, अमर कथा आहे. तुम्हाला अमरकथा ऐकवून अमर बनवत आहेत. हा
मृत्यूलोक नष्ट होणार आहे.
शिवबाबा म्हणतात - मी
तुम्हाला नेण्याकरिता आलो आहे. किती असंख्य आत्मे असतील. आत्मा परत आपल्या घरी जाते
तेव्हा कोणता आवाज थोडाच होतो. मधमाश्यांचा थवा जातो तेव्हा आवाज किती होतो.
राणीमाशीच्या मागे सर्व मधमाश्या पळतात. त्यांची आपसामध्ये किती एकता आहे. भ्रामरीचे
देखील उदाहरण इथलेच आहे. तुम्ही मनुष्यापासून देवता बनविता. पतितांना तुम्ही
ज्ञानाची भूं-भूं करता तेव्हा ते पावन विश्वाचे मालक बनतात. तुमचा आहे प्रवृत्ती
मार्ग, त्यामध्ये देखील मेजॉरिटी मातांची आहे म्हणून ‘वंदे मातरम्’ म्हटले जाते.
ब्रह्माकुमारी ती आहे जी बाबांद्वारे २१ जन्मांचा वारसा देते. बाबा नेहमी सुखाचा
वारसा देतात. जे सेवा करतील, लिखेंगे-पढ़ेंगे होंगे नवाब… (चांगला अभ्यास करतील आणि
करवून घेतील ते राजा बनतील). राजा बनणे चांगले की नोकर बनणे चांगले. शेवटी तुम्हाला
सर्वकाही माहित होईल. आपण काय बनणार? मग पश्चात्ताप करतील - आपण श्रीमतावर का नाही
चाललो! बाबा म्हणतात - फॉलो करा. असे देखील नाही की, कोणी सेंटर उघडण्यासाठी एक खोली
देतील आणि स्वतः मात्र मांस-मटण इत्यादी खात राहतील. एक पुण्य-आत्मा, दुसरा
पाप-आत्मा, मग तर तो आश्रमच राहणार नाही. घरामध्ये स्वर्ग बनवतात तर स्वतः देखील
स्वर्गामध्ये असले पाहिजेत ना. केवळ आशीर्वादावरच थांबायचे नाहीये. बाबांची आठवण
करायची आहे. पवित्र बनवूनच सोबत घेऊन जातील. तुम्हाला तर खूप आनंद झाला पाहिजे, किती
मोठी लॉटरी मिळते आहे. जितकी बाबांची आठवण कराल, तितकी विकर्म विनाश होतील.
बाबांइतके प्रेम दुनियेमध्ये कोणीच करू शकत नाही. त्यांना म्हटलेच जाते - प्रेमाचा
सागर. तुम्ही देखील असेच बना. जर कोणाला दुःख दिले, नाराज केले तर नाराज होऊन मराल.
बाबा काही हा शाप देत नाहीत, समजावून सांगत आहेत. सुख द्याल तर सुखी व्हाल,
सर्वांवर प्रेम करा. बाबा देखील प्रेमाचा सागर आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
उलट्या-सुलट्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. जे काही उलटे वाचलेले आहे (भक्तीमध्ये
वाचलेले आहे) त्याला विसरून अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे.
२) फक्त आशीर्वादावरच
अवलंबून राहायचे नाही. स्वतःला पवित्र बनवायचे आहे. बाबांना प्रत्येक पावलांमध्ये
फॉलो करायचे आहे, कोणालाही दुःख द्यायचे नाही. नाराज करायचे नाही.
वरदान:-
खऱ्या
प्रेमाच्या आधारे इतर सर्व संग तोडून एक संग जोडणारे संपूर्ण वफादार भव
संपूर्ण वफादार (प्रामाणिक)
त्यांना म्हटले जाते - ज्यांच्या संकल्पामध्ये अथवा स्वप्नामध्ये देखील एक बाबा आणि
बाबांचे कर्तव्य, बाबांची महिमा, बाबांचे ज्ञान यांच्या व्यतिरिक्त इतर काहीच दिसू
नये. ‘एक बाबा दुसरे ना कोणी…’ बुद्धीची तार सदैव एका सोबत रहावी तेव्हाच अनेक
संगतीचा रंग लागू शकणार नाही; म्हणून पहिले जे वचन आहे की, ‘और संग तोड एक संग जोड़’
- या वचनाला निभावणे अर्थात संपूर्ण प्रामाणिक बनणे.
बोधवाक्य:-
सत्यतेची
स्व-स्थिती परिस्थितीमध्ये देखील संपूर्ण बनवेल.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
आपण सर्वश्रेष्ठ
बाबांची मुले आहोत, ही आठवण राहिल्याने एकरस अवस्था राहील. जेव्हा एकाशीच नाते असते
तेव्हा अवस्था देखील एकरस राहते. जर इतर कुठे नात्याची रग (आसक्ती) जात असेल तर
एकरस अवस्था राहणार नाही. तर एकरस अवस्था बनविण्यासाठी एका बाबांच्या व्यतिरिक्त
इतर काहीही दिसत असताना देखील पाहू नका.