14-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - निरंतर हे लक्षात ठेवा कि आमचे बाबा, बाबा देखील आहेत, टीचर देखील आहेत तर सद्गुरु देखील आहेत, हि आठवणच मनमनाभव आहे”

प्रश्न:-
मायेची धूळ जेव्हा डोळ्यामध्ये जाते तेव्हा सर्वात पहिली चूक कोणती होते?

उत्तर:-
माया पहिली चूक हि करायला लावते कि शिकायचेच सोडून देतात. स्वयं भगवान शिकवतात, याचाच विसर पडतो. बाबांची मुलेच शिक्षण सोडून देतात, हे देखील आश्चर्य आहे. नाहीतर हे नॉलेज असे आहे जे आतल्या आत आनंदाने नाचत रहावे, परंतु मायेचा प्रभाव काही कमी नाहीये. ती शिक्षणच सोडायला लावते. शिक्षण सोडले जणू काही गैरहजर झाले.

ओम शांती।
आत्मिक बाबा बसून आत्मिक मुलांना समजावून सांगत आहेत. समजावून तर त्याला सांगावे लागते ज्याला कमी समजले आहे. काही खूप हुशार होतात. मुले जाणतात हे बाबा तर खूप वंडरफूल आहेत. जरी तुम्ही इथे बसला आहात परंतु आतून समजता, हे आमचे बेहदचे बाबा देखील आहेत, बेहदचे टीचर देखील आहेत. बेहदची शिकवण देतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. स्टुडंटच्या बुद्धीमध्ये तर हे असायला हवे ना. आणि मग सोबत जरूर घेऊन जातील. बाबा जाणतात, हि जुनी घाणेरडी दुनिया आहे, इथून मुलांना घेऊन जायचे आहे. कुठे? घरी. जसे मुलीचे लग्न झाले कि सासरचे येऊन मुलीला आपल्या घरी घेऊन जातात. आता तुम्ही इथे बसले आहात. बाबा समजावून सांगत आहेत मुलांना आतमध्ये जरूर हा विचार येत असेल कि हे आमचे बेहदचे बाबा देखील आहेत, बेहदची शिकवण सुद्धा देतात. जितके श्रेष्ठ बाबा तितकी शिकवण देखील श्रेष्ठ बेहदची देतात. रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य देखील तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. जाणता बाबा या खराब दुनियेतून आम्हाला परत घेऊन जाणार. हे देखील आतल्या आत आठवत राहिले तर ते सुद्धा मनमनाभवच आहे. चालता-फिरता, उठता-बसता बुद्धीमध्ये हेच लक्षात रहावे. वंडरफुल (आश्चर्यकारक) गोष्टीला लक्षात ठेवायचे असते ना. तुम्ही जाणता चांगल्या रीतीने अभ्यास केल्याने, आठवण केल्याने आपण विश्वाचे मालक बनतो. हे तर जरूर बुद्धीमध्ये असायला हवे. पहिली तर बाबांची आठवण करावी लागेल. टीचर नंतर भेटतात. मुले जाणतात, आमचे बेहदचे रुहानी बाबा आहेत. सहज आठवण करण्यासाठी बाबा युक्त्या सांगत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ज्या आठवणीद्वारेच अर्ध्या कल्पाची विकर्म विनाश होतील. पावन बनण्यासाठी तुम्ही जन्म-जन्मांतर भक्ती, जप, तप इत्यादी खूप केले आहे. मंदिरामध्ये जातात, भक्ती करतात, समजतात आम्ही परंपरेने करत आलो आहोत. शास्त्र कधीपासून ऐकत आहात? म्हणतील परंपरेने. लोकांना काहीच माहित नाही. सतयुगामध्ये तर शास्त्र असतही नाहीत. तुम्हा मुलांना तर आश्चर्य वाटले पाहिजे. या गोष्टी बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकणार नाही. हे बाबा देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. हे तर आमचे बाबा आहेत. यांना आपले कोणी आई-वडील नाहीत. कोणी म्हणू शकत नाही कि शिवबाबा कोणाचा मुलगा आहे? या गोष्टी बुद्धीमध्ये सतत लक्षात राहणे - हेच मनमनाभव आहे. टीचर शिकवतात परंतु ते स्वतः कुठून शिकलेले नाहीत. यांना कोणी शिकवले नाही. ते नॉलेजफुल आहेत, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. चैतन्य असल्या कारणाने सर्वकाही ऐकवतात. म्हणतात - मुलांनो, मी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या द्वारे मी तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत सर्व रहस्ये समजावून सांगतो. अंता विषयी तर मागाहून सांगतील. त्यावेळी तुम्ही सुद्धा समजून जाल - आता शेवट आला आहे. कर्मातीत अवस्थेला देखील नंबरवार पोहोचणार. तुम्हाला ती लक्षणे सुद्धा दिसतील. जुन्या सृष्टीचा विनाश तर होणारच आहे. हा तर अनेकदा पाहिला आहे आणि पाहणार आहात. शिकतातही असे जसे कल्पापूर्वी शिकले होते. राज्य घेतले आणि मग गमावले आता पुन्हा घेत आहात. बाबा पुन्हा शिकवत आहेत. किती सोपे आहे. तुम्ही मुले समजता आपण खरोखरच विश्वाचे मालक होतो. तर आता बाबा येऊन आम्हाला ते ज्ञान देत आहेत. बाबा मत देतात अशा प्रकारे आतमध्ये चिंतन चालले पाहिजे.

बाबा आमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत. टीचरला कधी विसरणार का! टिचर कडून तर अभ्यास शिकत राहतात. काही-काही मुलांना माया खूप चुका करायला लावते. एकदम जसे डोळ्यात धूळ फेकते. शिकायचेच सोडून देतात. स्वयं भगवान शिकवतात आणि अशा शिक्षणाला सोडून देतात! शिक्षणच मुख्य आहे. ते देखील सोडतात कोण? बाबांची मुले. तर मुलांना आतमध्ये किती आनंद झाला पाहिजे. बाबा नॉलेज देखील प्रत्येक गोष्टीचे देतात, जे कल्प-कल्प देतात. बाबा म्हणतात - कमीत-कमी या पद्धतीने माझी आठवण करा. कल्प-कल्प तुम्हीच समजून घेता आणि धारण करता. यांचे तर कोणी पिता नाहीत, तेच बेहदचे बाबा आहेत. वंडरफुल बाबा झाले ना. माझा (शिवबाबांचा) कोणी पिता असेल तर सांगा? शिवबाबा कोणाचा मुलगा आहे? हे शिक्षण सुद्धा वंडरफुल आहे जे या वेळेशिवाय बाकी कधी शिकू शकत नाही आणि फक्त तुम्ही ब्राह्मणच शिकता. तुम्ही हे देखील जाणता कि बाबांची आठवण करता-करता आम्ही पावन बनणार. नाहीतर मग सजा खावी लागेल. गर्भ-जेलमध्ये खूप सजा खावी लागते. तिथे मग ट्रिब्युनल बसते. सगळे साक्षात्कार होतात. साक्षात्कार घडवल्या शिवाय कोणालाही सजा देऊ शकत नाही. गोंधळून जातात कि हि सजा आम्हाला का मिळत आहे! बाबांना माहीत असते की याने हे पाप केले आहे, हि चूक केली आहे. सगळे साक्षात्कार घडवतात. त्यावेळी असे वाटते जसे इतक्या सर्व जन्मांची सजा मिळत आहे. हि जशी सर्व जन्मांची इज्जत गेली. तर बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनी चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा आहे. १६ कला संपूर्ण बनण्यासाठी आठवण करण्याची मेहनत करायची आहे. बघायचे आहे कि, मी कोणाला दुःख तर देत नाही ना? सुखदाता बाबांची आपण मुले आहोत ना? खूप गुल-गुल (फूल) बनायचे आहे. हे शिक्षणच तुमच्या सोबत जाणार आहे. शिक्षणानेच मनुष्य बॅरिस्टर इत्यादी बनतात. बाबांचे हे ज्ञान वेगळे आणि सत्य आहे. आणि हे आहे पांडव गव्हर्मेंट, गुप्त. तुमच्या शिवाय दुसरा कोणीही समजू शकणार नाही. हे शिक्षण वंडरफुल आहे. आत्माच ऐकते. बाबा वारंवार समजावून सांगतात - शिक्षण कधीही सोडू नका. माया सोडायला लावते. बाबा म्हणतात, असे करू नका, शिक्षण सोडू नका. बाबांकडे रिपोर्ट तर येतो ना. रजिस्टर वरून सर्व काही समजून येते. हा किती दिवस गैरहजर राहिला. शिक्षण सोडतात तर बाबांना सुद्धा विसरून जातात. वास्तविक हि विसरण्याची तर गोष्ट नाहीये. हे तर वंडरफुल बाबा आहेत. समजावून देखील सांगतात. जसा एक खेळ आहे. खेळाची गोष्ट कोणालाही ऐकवली तर लगेच लक्षात राहते ना. ती कधी विसरली जात नाही. हे (ब्रह्मा बाबा) आपला अनुभव सुद्धा सांगतात - ‘बालपणातच वैराग्याचे विचार येत असत. म्हणत होते, दुनियेमध्ये तर खूप दुःख आहे. आता माझ्याकडे फक्त १० हजार गोळा झाले कि मग ५० रुपये व्याज मिळेल, इतके पुरेसे आहेत. स्वतंत्र राहीन. घरदार सांभाळणे तर त्रासाचे आहे’. ठीक आहे, मग एक दिवस सौभाग्य सुंदरीचा… एक चित्रपट पाहिला; बस वैराग्याच्या सर्व गोष्टी निघून गेल्या. विचार केला लग्न करायचे, हे करायचे. मायेने एकच थप्पड मारले, कला काया (विशेषता आणि शरीरच) नष्ट केले. तर आता बाबा म्हणतात - मुलांनो, हि दुनिया तर दोजक (नरक) आहे आणि त्यामध्ये मग हे जे चित्रपट आहेत ते देखील नरक समान आहेत. हे पाहिल्यानेच सर्वांची वृत्ती खराब होते. वृत्तपत्र वाचतात, त्यामध्ये चांगल्या-चांगल्या महिलांची चित्रे बघतात त्यामुळे वृत्ती त्या बाजूला जाते. ‘हि खूप छान सुंदर आहे’, विचार तर आला ना. वास्तविक हा विचार देखील येता कामा नये. बाबा म्हणतात - हि तर दुनियाच नष्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही इतर सर्व विसरून मामेकम् (मज एकाची) आठवण करा, अशा प्रकारची चित्रे बघताच कशासाठी? या सर्व गोष्टी वृत्तीला खाली घेऊन येतात (वृत्तीला खराब करतात). हे जे काही पाहता हे तर कब्रदाखल होणार आहे. जे काही या डोळ्यांनी पाहता त्याची आठवण सुद्धा करू नका, यातून मोह काढून टाका. हि सर्व शरीरे तर जुनी घाणेरडी आहेत. भले आत्मा शुद्ध बनते परंतु शरीर तर घाणेरडे आहे ना. त्याच्याकडे काय म्हणून लक्ष द्यायचे. एका बाबांनाच बघायचे आहे.

बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो ध्येय खूप उच्च आहे. विश्वाचा मालक बनण्यासाठी दुसरे कोणी तर प्रयत्न सुद्धा करू शकणार नाही. कोणाच्याही बुद्धीमध्ये येणार नाही. मायेचा प्रभाव काही कमी नाहीये. वैज्ञानिकांची किती बुद्धी चालते; तुमची मग आहे सायलेन्सची शक्ती. सर्वांची इच्छा देखील आहे - आम्हाला मुक्ती मिळावी. तुमचे तर एम आहे जीवनमुक्तीचे. हे देखील बाबांनी सांगितले आहे. गुरु इत्यादी कोणीही असे नॉलेज देऊ शकत नाहीत. तुम्हाला गृहस्थीमध्ये राहून पवित्र बनायचे आहे, राजाई घ्यायची आहे. भक्तीमध्ये खूप वेळ वाया घालवला आहे. आता समजता, आम्ही किती चुका केल्या. चुका करता-करता अडाणी, एकदम पत्थर बुद्धी बनलो आहोत. आतमधे येते, हे तर खूप वंडरफुल नॉलेज आहे ज्याद्वारे आपण काय होतो आणि काय बनतो, पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी. तर आनंदाचा पारा सुद्धा चढतो कि आमचे बाबा बेहदचे बाबा आहेत. त्यांना आपले कोणी पिता नाहीत. ते टीचर आहेत, त्यांचा कोणी टीचर नाही. म्हणतील, कुठून शिकला! आश्चर्यचकित होतील ना! बरेच लोक असे समजतात की, हे तर कोणत्या गुरु कडून शिकले. तर मग गुरूचे अजूनही कोणी शिष्य असतील ना. फक्त एक शिष्य होता का? गुरूंचे शिष्य तर पुष्कळ असतात. आगाखान यांचे बघा किती शिष्य आहेत. गुरूंविषयी आतमध्ये किती आदर असतो, त्यांचे हिऱ्यांनी वजन करतात. तुम्ही अशा सद्गुरूचे कशामध्ये वजन कराल. हे तर बेहदचे सद्गुरू आहेत. यांचे वजन किती आहे! एक हिरा सुद्धा घालू शकणार नाही.

अशा अनेक गोष्टींचा तुम्हा मुलांना विचार करायचा आहे. हि तर सूक्ष्म गोष्ट झाली. भले हे तर सर्वजण म्हणत असतात - ‘हे ईश्वर’. परंतु हे थोडेच समजतात कि ते पिता, टीचर आणि गुरु देखील आहेत. हे तर साधारण रीतीने बसलेले असतात. इथे वर या संदलीवर देखील यासाठी बसतात कि सर्वांचा चेहरा पाहू शकतील. मुलांवर प्रेम तर असते ना! या मदतगार मुलांशिवाय स्थापना थोडीच करतील. जास्त मदत करणाऱ्या मुलांवर नक्कीच जास्त प्रेम करतील. जास्त कमावणारा मुलगा चांगला असेल तर जरूर उच्च ते उच्च पद घेणार. त्याच्यावर प्रेम सुद्धा असते. मुलांना पाहून हर्षित होतात. आत्मा खूप आनंदीत होते. कल्प-कल्प मुलांना पाहून खुश होतो. कल्प-कल्प मुलेच मदतगार बनतात. खूप प्रिय वाटतात. कल्प-कल्पांतराचे प्रेम एकत्र येते. भले कुठेही बसा, बुद्धीमध्ये बाबांची आठवण रहावी. हे बेहदचे बाबा आहेत, यांना कोणी आपला पिता नाही, यांचा कोणी टीचर नाही. स्वतःच सर्व काही आहेत ज्यांची सर्वजण आठवण करतात. सतयुगामध्ये तर कोणी आठवण करणार नाही, २१ जन्मांसाठी बेडा (जीवन रुपी नाव) पार झाला तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. बस, संपूर्ण दिवस बाबांची सेवा करावी. अशा बाबांचा परिचय द्यावा. बाबांकडून हा वारसा मिळतो. बाबा आम्हाला राजयोग शिकवतात आणि मग सर्वांना सोबत देखील घेऊन जातात. संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये आहे. असे चक्र तर कोणी बनवू शकणार नाही. अर्थ तर कोणालाच माहित नाही. तुम्ही आता समजता - बाबा आमचे बेहदचे बाबा देखील आहेत, बेहदचे राज्य देखील देतात आणि मग सोबत देखील घेऊन जातात. अशा प्रकारे तुम्ही समजावून सांगाल तर मग कोणीही सर्वव्यापी म्हणू शकणार नाही. ते बाबा आहेत, टीचर आहेत तर मग ते सर्वव्यापी कसे होऊ शकतील बरे.

बेहदचे बाबाच नॉलेजफुल आहेत. साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - या अभ्यासाला विसरू नका. हे खूप श्रेष्ठ शिक्षण आहे. बाबा परमपिता आहेत, परम टीचर आहेत, परम गुरु देखील आहेत. या सर्व गुरूंना देखील घेऊन जाणार. अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी ऐकवल्या पाहिजेत. तुम्ही बोला, हा बेहदचा खेळ आहे. प्रत्येक ॲक्टरला आपला पार्ट मिळालेला आहे. बेहदच्या बाबांकडून आम्हीच बेहदची बादशाही घेतो. आम्हीच मालक होतो. वैकुंठ होऊन गेले आहे, पुन्हा जरूर होणार. श्रीकृष्ण नवीन दुनियेचा मालक होता. आता जुनी दुनिया आहे मग पुन्हा नवीन दुनियेचा मालक बनेल. चित्रामध्ये देखील क्लियर आहे. तुम्ही जाणता - आता आमचे पाय नरकाच्या दिशेने आणि मुख स्वर्गाच्या दिशेने आहे, तोच लक्षात राहतो. असे आठवण करत-करत अंत मती सो गती होईल. किती चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत ज्यांचे चिंतन करत राहिले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या डोळ्यांनी जे काही दिसते, त्यातून मोह काढून टाकायचा आहे, एका बाबांनाच बघायचे आहे. वृत्तीला शुद्ध बनविण्यासाठी या घाणेरड्या शरीरांकडे जरा देखील लक्ष जाता कामा नये.

२) बाबा जे अतिशय वेगळे आणि सत्य ज्ञान ऐकवतात, ते चांगल्या पद्धतीने शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. मुरली क्लास कधीही चुकवायचा नाही.

वरदान:-
शांतीच्या शक्तीच्या प्रयोगाद्वारे प्रत्येक कार्यामध्ये सहज सफलता प्राप्त करणारे प्रयोगी आत्मा भव

आता समयाच्या परिवर्तनानुसार शांतीच्या शक्तीचे साधन प्रयोगामध्ये आणून प्रयोगी आत्मा बना. जसे वाणी द्वारे आत्म्यांमध्ये स्नेहाच्या सहयोगाची भावना उत्पन्न करता तसे शुभ भावना, स्नेहाच्या भावनेच्या स्थितीमध्ये स्थित होऊन त्यांच्यामध्ये श्रेष्ठ भावना उत्पन्न करा. जसे दिवा, दिव्याला पेटवतो तसे तुमची शक्तिशाली शुभ भावना इतरांमध्ये सर्वश्रेष्ठ भावना उत्पन्न करेल. या शक्तीने स्थूल कार्यामध्ये देखील खूप सहज सफलता प्राप्त करू शकता, फक्त प्रयॊग करून पहा.

बोधवाक्य:-
सर्वांचे प्रिय बनायचे असेल तर उमललेले रुहानी गुलाब बना, कोमेजू नका (उदास होऊ नका).