14-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
आठवणीच्या यात्रेमध्ये कधीही थकू नका, देह-अभिमानाची वादळे थकवा निर्माण करतात,
देही-अभिमानी बना म्हणजे मग थकवा दूर होईल”
प्रश्न:-
कोणता संस्कार
२१ जन्मांच्या श्रेष्ठ भाग्याला बिघडवणारा आहे?
उत्तर:-
जर कोणामध्ये
रुसण्याचा संस्कार असेल. बाबांवर अथवा अभ्यासावर रुसतात तर २१ जन्मांचे भाग्य बिघडते.
म्हणून बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, देह-अभिमानाच्या वश होऊन कधीही असा उल्टा नशा
(अहंकार) बाळगायचा नाही की, मी इतक्या जणांना ज्ञान समजावून सांगितले, इतकी मदत केली.
बघा, बाबा किती मोठी ऑथॉरिटी आहेत, तरीही किती निरहंकारी आहेत, त्यामुळे - ‘सी फादर’.
गीत:-
रात के राही
थक मत जाना...
ओम शांती।
गोड-गोड
सिकीलध्या मुलांनी गाणे ऐकले आणि जी योगयुक्त, सेवाभावी मुले आहेत, ती याचा अर्थ
लगेच समजून घेतात. आपण रात्रीचे प्रवासी अर्थात ब्राह्मणांची आता रात्र पूर्ण झाली
आहे. भक्तिमार्गाला रात्र म्हटले जाते. अर्धा कल्प रात्रीचा काळ आता पूर्ण होत आहे.
हदचा देखील दिवस आणि रात्र असते. हा मग ब्राह्मणांचा अर्धा कल्प दिवस आणि अर्धा
कल्प रात्र असते. यावेळी जेव्हा बाबा येतात तेव्हा सर्वत्र अज्ञानरुपी अंधार असतो.
पहाटेची पहिली घटिका आहे, सकाळ होत आहे. मुले जाणतात, आता बाबा सांगत आहेत -
गोड-गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये थकू नका. जशी भौतिक यात्रा असते. पूर्वीच्या
काळी यात्रेला पायी जात असत. अतिशय संथ गतीने जात असत, आणि वाटेत विश्रांतीची ठिकाणे
ठरलेली असायची. माहीत असे की, आपल्याला अमुक-अमुक ठिकाणी थांबायचे आहे. पूर्वी
अतिशय श्रद्धेने पायी जात होते, त्यामध्ये खूप मेहनत आहे. आता ही यात्रा तर खूप सोपी
आहे. याला म्हटले जाते सहज आठवण अथवा योग. फक्त बाबांची आठवण करायची आहे, थकण्याचा
अर्थच आहे देह-अभिमानी असणे. हो, यामध्ये काहीच शंका नाही, मायेची विघ्ने येतील.
परंतु यामध्ये थकायचे नाही. थकल्याने देह-अभिमान येतो. बाबा म्हणतात - मुलांनो,
शरीर निर्वाहासाठी काम तर करायचे आहे, त्यासाठी सूट आहे. ८ तास शरीर निर्वाह, ८ तास
विश्रांती, बाकी ८ तास यासाठी द्या. अजून तरी पूर्ण ८ तास कोणीही देत नाहीत. अंतिम
काळामध्ये ८ तासांपर्यंत आठवणीमध्ये राहतील. चार्ट वाढवत रहा. इथे जेव्हा येऊन बसता
तेव्हा आठवण करून दिली जाते, ज्याला तुम्ही नेष्ठा म्हणता. बाबांच्या आठवणीमध्ये
येऊन बसता. याचा अर्थ असा नाही की फक्त इथे येऊन आठवणीमध्ये बसायचे आहे. असे
भरपूरजण आहेत की जे समजतात ५-१० मिनिटे योग करून उठू. परंतु बाबा तर सांगतात,
कामधंदा करत असताना, कुठे येता-जाता तेव्हा देखील तुम्ही ‘योग’मध्ये (आठवणीमध्ये)
रहा. अशा कोणत्या ठिकाणी गंगास्नान इत्यादी करण्यासाठी जातात तेव्हा ‘राम-राम’ असा
जप करत असतात ना. इथे तुम्हाला कशाचाही जप करायचा नाहीये, फक्त बाबांची आठवण करायची
आहे. हे बाबा मुलांशीच बोलत आहेत. तुमचे कल्याण आहेच आठवणीच्या यात्रेमध्ये, यामध्ये
थकायचे नाही. यामध्ये वादळे खूप येतील. वादळे काही माती इत्यादीची नाहीत. मायेची
वादळे आल्याने बुद्धीचा योग तुटतो. मग देह-अभिमानामध्ये आल्याने कामधंदा, मुले यांची
आठवण येते. बाबा म्हणतात - आता तर हा कामधंदा इत्यादी सर्व नष्ट होणार आहे. तुमची
मुले वारसदार बनणारच नाहीत. सर्व नष्ट होणार आहे. आता तर बेहदच्या बाबांचे वारसदार
उभे आहेत. हदचा वारसा मुर्दाबाद होणार आहे. श्रीमंत लोक समजतात - आता मुलगा मोठा
होईल, लग्न करेल, मग असे होईल. बाबा म्हणतात - आता इतका वेळ राहिलेला नाही आहे
त्यामुळे दुनियेमधून पूर्णपणे मोह काढून टाका. हे तर कब्रस्तान आहे. कामधंदा, मुले
इत्यादींच्या चिंतनामध्ये मराल तर फुकटची आपली बरबादी (नुकसान) करून घ्याल.
शिवबाबांची आठवण कराल तर खूप आबादी (भरभराट) होईल. देह-अभिमानामध्ये आल्याने बरबादी
होते. देही-अभिमानी बनल्याने आबादी होते. जितकी आठवण कराल तितका भविष्यामध्ये २१
जन्मांचा वारसा प्राप्त कराल. आठवण केली नाहीत तर खूप मोठे नुकसान होईल. ते मग
कल्प-कल्पांतरासाठी होईल. इतकी मोठी नुकसानाची गोष्ट आहे. विचार केला पाहिजे - आपण
पूर्ण वारसा कसा घ्यावा. धनाचा देखील अतिलोभ सुद्धा बाळगू नये. टू मच मध्ये जाऊ नये
(अतिरेक करू नये). कोणाचे दिवाळे निघते तर खूप चिंता वाटू लागते. शिवबाबांना
पूर्णपणे विसरून जातात. मग दोष देतात की ज्ञानामध्ये आलो म्हणून दिवाळे निघाले,
आजारी पडलो. असे कधीही समजायचे नाही; आजारपण इत्यादी येते, हा तर कर्मभोग आहे. उलट
चांगले आहे, यामुळे विकर्म विनाश होतील. धर्मराजाचे फटके खाण्यापेक्षा आजारपण चांगले
आहे ना. कर्मभोग चुकता करायचा आहे. हे शरीर तर महारोगी आहे. किती काळजी घेतली जाते.
चालता-चालता अचानक कोसळतात. हार्ट फेल होते. अशा जुन्या दुनियेला तर बुद्धीने
पूर्णपणे विसरून गेले पाहिजे. मुले बघतात की वडील नवीन घर बांधत आहेत तर जुन्या
घरातून मन पूर्णपणे उडून जाते. म्हणतात - बाबा, लवकर घर बांधा. जुन्या घरामध्ये खूप
त्रास होत आहे. तुम्ही देखील जाणता - ही जुनी दुनिया तर खूप घाणेरडी आहे. तुमचा हा
आहे बेहदचा संन्यास. ते संन्यास करतात घरादाराचा. त्याला हदचा संन्यास म्हटले जाते.
तुम्ही संन्यास करता - विकारांचा.
बाबा म्हणतात - देहा
सहित देहाची जी काही तुमची नाती आहेत, त्या सर्वांना तोडून मामेकम् (मज एकाची) आठवण
करा. ही दुनिया जी या डोळ्यांनी पाहता, तिला विसरून जा. आता तुमची बुद्धी जाणते,
आपण स्वर्गाच्या राजधानीसाठी पुरुषार्थ करत आहोत. ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे.
हे सर्व कब्रस्तान होणार आहे, यावर जीव लावायचा नाही. आजकाल लोकांकडे पैसे खूप आहेत
त्यामुळे विकार देखील खूप बळावले आहेत. काम विकार किती बोकाळला आहे. काम
विकाराशिवाय राहू शकत नाहीत. ४-५ वर्षे पवित्र राहतात, आणि मग लिहितात - ‘बाबा, आज
याला भूत लागले, तोंड काळे केले’. केवढा मोठा फटका बसला. एकदम ५ व्या मजल्यावरून
खाली पडले. सर्वात पहिला आहे देह-अभिमान. वरून पडला आणि ठक, तुकडे-तुकडे झाले. खलास,
हाडन्-हाड तुटून जातात. मग पुन्हा पुरुषार्थ करण्यामध्ये वेळ जातो. हा सर्वात मोठा
आघात आहे; म्हणून बाबा सांगतात - काम महाशत्रू आहे. विकारालाच पतितपणा म्हटले जाते.
म्हणतात - ‘बाबा, आम्हाला पतितापासून पावन बनवा’. भारतामध्येच संपूर्ण निर्विकारी
होते ना. भारतच निर्विकारी होता. आता भारत विकारी आहे. संपूर्ण निर्विकारी
सूर्यवंशींना म्हणणार. भले रामचंद्राच्या राज्यामध्ये देखील विकाराची गोष्ट नसते.
परंतु कला तर कमी होते. १२५० वर्षे कमी झाली तर ती दुनियेची ताकद तर कमी झाली ना,
म्हणून त्यांना (सूर्यवंशींना) ‘सतोप्रधान’ आणि यांना (चंद्रवंशींना) ‘सतो’ म्हटले
जाते. तुम्हाला वाटते की आपण मम्मा-बाबांना फॉलो करून सूर्यवंशी महाराजा-महाराणी
बनावे. यामध्ये त्रास होण्याचा किंवा खर्च इत्यादीचा तर प्रश्नच नाही, यामध्ये
मुखाने काही बोलायचे देखील नाहीये. फक्त आठवण करायची आहे, यालाच सहज योग म्हटले जाते,
यासाठी खूप मेहनत पाहिजे. बाबांसमोर तर सर्व महारथी आहेत, यामध्ये योग पूर्ण पाहिजे
तेव्हाच कुठे तीर लागेल. योगबल आहे ना. ‘योग’ची खूप कमतरता आहे. ‘योग’ मध्ये विघ्ने
देखील खूप येतात.
बेहदचे बाबा गोड-गोड
मुलांना बसून समजावून सांगत आहेत - मुलांनो, बाबांवर किंवा अभ्यासावर कधीही रुसायचे
नाही. रुसाल तर २१ जन्मांच्या भाग्यावर रुसाल. चांगली-चांगली मुले देखील रुसतात.
देह-अभिमानाचा नशा चढतो. मी इतक्या जणांना ज्ञान सांगितले आहे. देह-अहंकार आल्याने
खाली कोसळतात. यामध्ये अहंकार येता कामा नये. शिवबाबांना कोणता अहंकार आहे का? किती
निरहंकारी आहेत आणि किती मोठी ऑथॉरिटी आहेत. सांगतात देखील - मी साधारण तनामध्ये,
साधारण घरामध्ये येतो. श्रीमंताच्या घरी थोडाच येतो. तर आता मुलांनी जागे व्हायचे
आहे. बाबा तर खूप चांगल्या युक्त्या सांगत राहतात. तुम्हा मुलांनाच वेळ लागत आहे.
ड्रामा अनुसार अजून अवस्थांमध्ये जोर भरलेला नाही. पुढे चालून जोर भरेल. आपण
गव्हर्मेंटला माहिती देतो की, इतक्या-इतक्या वर्षांमध्ये स्वर्गाची स्थापना होईल.
मनुष्य हे जेव्हा वर्तमानपत्र इत्यादीमध्ये वाचतील तर येऊन तुम्हाला विचारतील.
थोड्याच वर्षांमध्ये स्थापना होईल तर मग विनाश देखील जरूर होईल. पुष्कळ प्रमाणात
येतील. ही प्रॉपर्टी इत्यादी थोड्या काळासाठी आहे. या प्रॉपर्टीला तुम्ही काही
प्रॉपर्टी थोडीच समजता. तुम्ही जाणता, हे तर थोड्या दिवसांसाठी आहे. ही घरे इत्यादी
राहण्यासाठी बनवली आहेत कारण मधुबनमध्ये रिफ्रेश होण्यासाठी भरपूर मुले येतात. हेड
ऑफिस मधुबन आहे. आज तुम्ही काय करत आहात, उद्या काय कराल. इथे तपस्या करता, मग
दिल्ली, वृंदावन इत्यादीमध्ये जाऊन राज्य कराल. आपले यादगार कसे उभे आहे, हे
व्यवस्थित दाखवायचे आहे. जे काम आम्ही आता करत आहोत - ५ हजार वर्षांपूर्वी देखील
केले होते. सर्वप्रथम शिवबाबांची मंदिरे बांधतात. बाकी दिलवाडा मंदिर इत्यादी तर
नंतर बांधली आहेत. बुद्धीने विचार करायचा असतो. दिलवाडा मंदिराचा देखील हिशोब काढला
तर निघू शकतो. पूर्णपणे आपले यादगार आहे. तुम्ही जाणता हे स्थापनेचे यादगार आहे.
तुम्हा गोड-गोड
मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. सेवा वाढविण्याच्या या सर्व युक्त्या शोधून काढायच्या
आहेत. राम गयो, रावण गयो... ज्यांचा मोठा परिवार आहे. रावणाचा बघा किती मोठा परिवार
आहे. रामाचा किती छोटा परिवार आहे, गायन बरोबर आहे. परंतु कोणी समजू शकत नाही. बाबा
बसून समजावून सांगतात तरीही निश्चय बसत नाही. शरीर निर्वाहासाठी देखील तुम्हाला
कर्म जरूर करायचे आहे. हो, जी सेवाभावी मुले आहेत - पांडव, ते तर गव्हर्मेंट कडून
पालना घेऊ शकतात. त्यांची सर्व जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. मुलांची अवस्था अशी
असली पाहिजे की, बाबांच्या आठवणीमध्ये या दुनियेतील सर्व काही विसरायचे आहे.
आठवणीच्या यात्रेमध्ये जो दृढतेने मग्न राहील, त्याची अवस्था देखील खूप मजबूत असते.
जणू काही शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहून तुम्ही शरीर सोडता. संन्यासी ‘ब्रह्म’च्या
आठवणीमध्ये शरीर सोडतात, तेव्हा देखील वायुमंडळामध्ये पूर्णपणे सन्नाटा होतो (नीरव
शांतता पसरते). बाबांना (ब्रह्मा बाबांना) अनुभव आहे. व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा
घरामध्ये सन्नाटा होतो ना, इथे देखील तसेच होते. जणू काही भूतकाळातील सर्व विसरून
जातो. आता आपल्याला परत घरी जायचे आहे. देह-अभिमान हळू-हळू निघून जातो. शेवटी,
आनंदाने, हर्षितमुखाने शरीर सोडले पाहिजे. ‘बस्स, आपण कुठे जात आहोत’, अशी अवस्था
जेव्हा होईल तेव्हा विजय माळेमध्ये ओवण्यालायक बनाल. तुमच्यामध्ये शांतीचा करंट आहे.
कोणीही येतात तर ते म्हणतात - इथे खूप शांती आहे. ही आहे खरी शांती. आत्मा शरीरा
पासून डिटॅच होते. तुम्ही जाणता - आपण आत्मा शांती स्वरूप आहोत. आपण आपल्या
स्वधर्मामध्ये बसतो. कर्मा शिवाय तर कोणीही मनुष्य राहू शकत नाही. ते लोक हठयोगाने
किती काय-काय करत असतात. तुम्ही आता समजता, आपला स्वधर्मच शांती आहे. इथे आपण पार्ट
बजावण्यासाठी आलो आहोत. आता परत घरी जायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा आणि
घराची देखील आठवण करा. बाबांची आठवण केल्याने वारसा मिळेल. बाबा सांगतात - माझी
देखील घरीच (परमधाम मध्येच) आठवण करा. इथे तर मी टेम्पररी येतो. तुमची बुद्धी
बाबांच्या आठवणीमध्ये शांतीधाममध्ये टिकली पाहिजे. घराचा देखील वारसा घ्यायचा आहे
ना. ते आहे आत्म्यांचे घर. हे आहे जीव-आत्म्यांचे घर. आपल्या घराला देखील विसरू नका.
बाबांना देखील विसरू नका. बाबांची आठवण केल्यानेच पवित्र बनून घरी निघून जाल. ज्ञान
धारण केल्याने मग नवीन दुनियेमध्ये राज्य करण्यासाठी याल. जितके होईल तितके इतरांना
मार्ग सांगत जा. ऑलवेज सी फादर. तुम्ही जाणता बाबांनी काय केले! सर्व काही मातांना
देऊन टाकले. त्यांनीच डायरेक्शन दिले की सर्व काही मातांच्या सेवेमध्ये लावा. एकाला
पाहून दुसऱ्यांनी फॉलो केले. स्वाहा झाले. परंतु मग टिकून देखील राहिले पाहिजेत ना.
ड्रामा अनुसार भट्टी देखील बनायची होती. पाकिस्तान - हिंदुस्तान विभाजन झाले. तुमची
पहिल्या भट्टीला सुरुवातच झाली पाकिस्तानमध्ये. तुम्ही नदी क्रॉस केली -
शास्त्रांमध्ये तर काय-काय गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. प्रॅक्टिकल मध्ये तर तुम्ही
आता ऐकत आहात ना. मग पुन्हा कल्पा नंतर तुम्हीच ऐकाल. आता बाबा म्हणतात - ‘हियर नो
ईव्हिल, धंदा इत्यादी भले करा, परंतु हियर नो ईविल’. बाबा म्हणतात - प्रत्येक
गोष्टीमध्ये श्रीमत घ्या. ‘बाबा, या परिस्थितीमध्ये मी काय करावे’, तर बाबा सर्व
सांगतील. कोणतीही गोष्ट विचारायची असेल तर तुम्ही बाबांकडे या. तुम्ही घाबरता कशाला?
पावला-पावलावर विचारायचे आहे. श्रीमतावर चालल्याने पावला-पावलामध्ये पदम आहेत. तुमचा
सेकंद बाय सेकंद जो पास होतो त्यामध्ये पदम आहेत. तर किती कमाई होत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) विजयी
माळेमध्ये ओवले जाण्यासाठी या शरीरा पासून डिटॅच होण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा
आहे. देह-अभिमान सोडत जायचा आहे. या दुनियेला बुद्धीने विसरायचे आहे.
२) टू मच धनाचा लोभ
करायचा नाही. बाबांच्या आठवणी शिवाय दुसरे कोणतेही चिंतन राहू नये. कधीही बाबांवर
किंवा अभ्यासावर रुसायचे नाही.
वरदान:-
मालकीपणाच्या
स्मृतीद्वारे हाईएस्ट ऑथॉरिटीचा अनुभव करणारे कंबाइंड स्वरूपधारी भव
सर्व प्रथम आपले शरीर
आणि आत्म्याच्या कंबाइंड रूपाला स्मृतीमध्ये ठेवा. शरीर रचना आहे, आत्मा रचयिता आहे.
यामुळे मालकीपणा आपोआप स्मृतीमध्ये राहील. मालकीपणाच्या स्मृतीमुळे स्वतःला हाईएस्ट
ऑथॉरिटी अनुभव कराल. तुम्ही शरीराला चालविणारे असाल. दुसरे, बाबा आणि मुलगा (शिव-शक्तीच्या)
कंबाइंड स्वरूपाच्या या स्मृतीमुळे मायेच्या विघ्नांना ऑथॉरिटीने पार कराल.
बोधवाक्य:-
विस्ताराला
सेकंदामध्ये सामावून ज्ञानाच्या साराचा अनुभव करा आणि करवून द्या.
हे अव्यक्त इशारे:-
ज्वाला स्वरूप स्थिती मध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा
पाप कटेश्वर अथवा पाप
हारिणी तेव्हाच बनू शकाल जेव्हा आठवण ज्वाला स्वरूप असेल. याच आठवणी द्वारे अनेक
आत्म्यांची निर्बलता दूर होईल. यासाठी प्रत्येक सेकंद, प्रत्येक श्वास बाबा आणि
तुम्ही कंबाइंड होऊन रहा. कधीही साधारण आठवण नसावी. ‘स्नेह’ आणि ‘शक्ती’ दोन्ही रूपे
कंबाइंड असावीत.