14-09-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.2007 ओम शान्ति
मधुबन
“आता स्वतःला मुक्त
करून मास्टर मुक्तीदाता बनून सर्वांना मुक्ती देण्यासाठी निमित्त बना”
आज स्नेहाचे सागर
बापदादा चोहो बाजूच्या स्नेही मुलांना बघत आहेत. दोन प्रकारची मुले पाहून हर्षित
होत आहेत. एक आहेत लवलीन मुले आणि दुसरी आहेत लवली मुले, दोघांच्याही स्नेहाचे तरंग
बाबांपाशी अमृतवेलेच्याही आधीपासून पोहोचत आहेत. प्रत्येक मुलाच्या हृदयामध्ये
ऑटोमॅटिक गाणे वाजत आहे - “माझे बाबा”. बापदादांच्या हृदयातूनही हेच गाणे वाजत आहे
- “माझी मुले, लाडकी मुले, बापदादांची सुद्धा सिरताज मुले”.
आज स्मृती दिवस असल्या
कारणाने सर्वांच्या मनामध्ये स्नेहाचे तरंग जास्त आहेत. अनेक मुलांच्या स्नेहाच्या
मोत्यांच्या माळा बापदादांच्या गळ्यामध्ये ओवल्या जात आहेत. बाबा देखील आपल्या
स्नेहमयी बाहूंच्या माळा मुलांना घालत आहेत. बेहदच्या बापदादांच्या बेहदच्या
बाहूंमध्ये सामावून गेले आहेत. आज सर्व विशेष स्नेहाच्या विमानामधून पोहोचले आहेत
आणि दूरदूरहून सुद्धा मनाच्या विमानातून अव्यक्त रूपामध्ये, फरिश्त्यांच्या
रूपामध्ये पोहोचले आहेत. सर्व मुलांना बापदादा आज स्मृती दिवस सो समर्थ दिवसाची
पद्मापद्म आठवण देत आहेत. हा दिवस कित्येक स्मृतींची आठवण करून देतो आणि प्रत्येक
स्मृती सेकंदामध्ये समर्थ बनविते. स्मृतींची लिस्ट सेकंदामध्ये आठवणीमध्ये येते ना.
स्मृती समोर येताच समर्थिचा नशा चढतो. सर्वात पहिली स्मृती लक्षात आहे ना! जेव्हा
बाबांचे बनलात तर बाबांनी कोणती स्मृती दिली? तुम्ही कल्पापूर्वीचे भाग्यवान आत्मे
आहात. आठवा या पहिल्या स्मृतीने कोणते परिवर्तन आले? आत्म-अभिमानी बनल्याने परमात्म
बाबांच्या स्नेहाचा नशा चढला. का नशा चढला? हृदयातून पहिला स्नेहाचा शब्द कोणता
निघाला? “मेरा मीठा बाबा” आणि हा एक गोल्डन शब्द निघाल्याने नशा कोणता चढला? सर्व
प्रकारची परमात्म प्राप्ती ‘माझे बाबा’ म्हटल्याने, जाणल्याने, मानल्याने तुमची
स्वतःची प्राप्ती झाली. अनुभव आहे ना! ‘माझे बाबा’ म्हटल्याने किती प्राप्ती तुमची
स्वतःची झाली! जिथे प्राप्ती असते तिथे आठवण करावी लागत नाही परंतु आपोआपच येते,
सहजच येते कारण माझी झाली ना! बाबांचा खजिना माझा खजिना झाला, तर जे ‘माझे’ आहे ते
आठवावे लागत नाही, त्याची आठवण राहतेच. ‘माझे’ विसरणे अवघड असते, आठवण करणे अवघड
नसते. जसा अनुभव आहे - ‘माझे शरीर’, तर विसरायला होते का? विसरावे लागते, कशासाठी?
माझे आहे ना! तर जिथे ‘माझे’पणा येतो तिथे सहज लक्षात राहते. तर स्मृतीने समर्थ
आत्मा बनवले - “माझे बाबा” या एकाच शब्दाने. भाग्य विधाता अखूट खजिन्यांच्या
दात्याला माझे बनवले. असा चमत्कार करणारी मुले आहात ना! परमात्म पालनेचे अधिकारी
बनला, जी परमात्म पालना साऱ्या कल्पामध्ये एकदाच मिळते, आत्म्यांची आणि देव
आत्म्यांची पालना तर मिळते परंतु परमात्म पालना केवळ एका जन्मासाठी मिळते.
तर आजच्या स्मृती सो
समर्थी दिवशी परमात्म पालनेचा नशा आणि आनंद सहज लक्षात राहिला ना! कारण आजचे
वायुमंडळ सहज आठवणीचे होते. तर आजच्या दिवशी सहजयोगी राहिलात की आजच्या दिवशी सुद्धा
आठवण करण्यासाठी युद्ध करावे लागले? कारण आजचा दिवस स्नेहाचा दिवस म्हणाल ना, तर
स्नेह मेहनतीला नष्ट करतो. स्नेह सर्व गोष्टी सोप्या करतो. तर सर्वजण आजच्या दिवशी
विशेष सहजयोगी राहिलात का अडचण आली? ज्यांना आजच्या दिवशी अडचण आली आहे त्यांनी हात
वर करा. कोणालाही आलेली नाही? सगळे सहजयोगी राहिलात. अच्छा जे सहजयोगी राहिले
त्यांनी हात वर करा. (सर्वांनी हात वर केला) अच्छा - सहजयोगी राहिलात? आज मायेला
सुट्टी दिली होती. आज माया नाही आली का? आज मायेला निरोप दिला का? ठीक आहे, आज तर
निरोप दिलात, त्याची मुबारक असो, जर असेच स्नेहामध्ये सामावून रहाल तर मग मायेला तर
कायमसाठी निरोप मिळेल कारण आता ७० वर्षे पूर्ण होत आहेत, तर बापदादा या वर्षाला
न्यारे वर्ष, सर्वांचे आवडते वर्ष, मेहनती पासून मुक्त वर्ष, समस्येपासून मुक्त
वर्ष साजरे करू इच्छित आहेत. तुम्हा सर्वांना पसंत आहे? पसंत आहे का? मुक्त वर्ष
साजरे करणार? कारण मुक्तिधाम मध्ये जायचे आहे, अनेक दुःखी-अशांत आत्म्यांना
मुक्तिदाता बाबांद्वारे सोबती बनून मुक्ती द्यायची आहे. तर मास्टर मुक्तिदाता जेव्हा
स्वतः मुक्त बनाल तेव्हाच तर मुक्ती वर्ष साजरे कराल ना! कारण तुम्ही ब्राह्मण आत्मे
स्वतः मुक्त बनून अनेकांना मुक्ती देण्यासाठी निमित्त आहात. एक भाषा जी मुक्ती
देण्याऐवजी बंधनामध्ये बांधते, समस्येच्या अधीन बनवते, ती आहे - ‘असे नाही, तसे; तसे
नाही, असे’. जेव्हा समस्या येते तेव्हा हेच म्हणतात - ‘बाबा, असे नव्हते, तसे होते
ना. असे झाले नसते, असे झाले असते ना’. हा आहे बहाणेबाजी करण्याचा खेळ.
बापदादांनी सर्वांची
फाईल बघितली, तर फाईल मध्ये काय पाहिले? मेजॉरिटींची फाईल प्रतिज्ञा केलेल्या पेपरनी
भरलेली आहे. प्रतिज्ञा करतेवेळी अगदी मनापासून करतात, विचार देखील करतात परंतु आज
पर्यंत पाहिले आहे की फाईल मोठी होत जात आहे परंतु फायनल झालेले नाही. दृढ
प्रतिज्ञेसाठी म्हटले गेले आहे - ‘प्राण गेला तरी चालेल परंतु प्रतिज्ञा मोडता कामा
नये’. तर बापदादांनी आज सर्वांच्या फाईली बघितल्या. खूप चांगल्या-चांगल्या प्रतिज्ञा
केल्या आहेत. मनातल्या मनात देखील केल्या आहेत आणि लेखी देखील केल्या आहेत. तर या
वर्षी काय करणार? फाईलमध्ये अजून भर घालणार की प्रतिज्ञेला फायनल करणार? काय करणार?
पहिल्या लाईनवाले बोला, पांडव सांगा, टीचर्स सांगा. या वर्षी बापदादांकडील फाईल जी
मोठी होत जात आहे, तिला फायनल करणार की या वर्षी सुद्धा फाईलमध्ये अजून पेपर ॲड
करणार? काय करणार? बोला पांडव, फायनल करणार का? जे समजतात - झुकावे लागेल, बदलावे
लागेल, सहन देखील करावे लागेल, ऐकावे सुद्धा लागेल, परंतु बदलायचेच आहे, त्यांनी
हात वर करा. बघा टी. व्ही. मध्ये सर्वांचा फोटो काढा. सर्वांचा फोटो काढा, दोन, तीन,
चार टी. व्ही. आहेत, सर्व बाजूंचे फोटो काढा. हे रेकॉर्ड ठेवा, बाबांना हे फोटो
काढून द्या. कुठे आहेत टी. व्ही. वाले? बापदादांना सुद्धा फाईलचा फायदा तर घेऊ दे.
मुबारक असो, मुबारक असो, आपल्या स्वतःसाठीच टाळ्या वाजवा.
पहा, जसे एका बाजूला
सायन्स, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी, तिसऱ्या बाजूला पापाचारी, सगळे आपापल्या
कार्यामध्ये आणखी वृद्धी करत जात आहेत. खूप नवीन-नवीन प्लॅन बनवत जात आहेत. मग
तुम्ही तर वर्ल्ड क्रियेटरची (विश्व निर्मात्याची) मुले आहात, मग तुम्ही यावर्षी अशी
नवीनतेची साधने आत्मसात करा ज्याने प्रतिज्ञा दृढ होईल कारण सगळे प्रत्यक्षतेचे
इच्छुक आहेत. किती खर्च करत आहेत, जागोजागी मोठे-मोठे प्रोग्रॅम करत आहेत. प्रत्येक
वर्ग (विंगवाले) मेहनत चांगली करत आहेत परंतु आता यावर्षी हे ॲडिशन करा की जी काही
सेवा कराल, समजा मुखाने सेवा करता, तर केवळ मुखाने सेवा नको, मनसा, वाचा आणि स्नेह
सहयोग रुपी कर्म एकाचवेळी तिन्ही सेवा एकत्र व्हाव्यात. वेगवेगळ्या नसाव्यात.
सेवेमध्ये एक दिसून येते की, बापदादा जो रिझल्ट पाहू इच्छित आहेत तसा नाही आहे. जे
तुम्हाला देखील हवे आहे की प्रत्यक्षता व्हावी. आतापर्यंत पहिल्यापेक्षा हा रिझल्ट
खूप चांगला आहे - सगळे ‘चांगले-चांगले, खूप छान’ एवढे तर म्हणून जातात. परंतु चांगले
बनणे अर्थात प्रत्यक्षता होणे. तर आता ॲडिशन करा की एकाचवेळी मनसा-वाचा, कर्मणामध्ये
स्नेही सहयोगी बनणे, प्रत्येक साथीदार भले मग ब्राह्मण साथीदार आहे, किंवा बाहेरचे
सेवेच्या निमित्त जे बनतात, ते साथी असोत परंतु सहयोग आणि स्नेह देणे - हे आहे
कर्मणा सेवेमध्ये नंबर घेणे. अशी भाषा बोलू नका, ‘हे असे केले ना, म्हणून असे करावे
लागले’. ‘स्नेहाऐवजी थोडे-थोडे बोलावे लागले’, बाबा शब्द बोलत नाहीत. ‘असे करावेच
लागते, बोलावेच लागते, बघावेच लागते…’ असे नको. ‘इतकी वर्षे बघितले, बापदादांनी सूट
दिली. असे नाही तसे करत राहीलो, परंतु आता कधी पर्यंत?’ बापदादांशी सगळे
रुहरिहानमध्ये मेजॉरिटी म्हणतात - ‘बाबा, शेवटी पडदा कधी उघडणार? कधी पर्यंत चालणार?’
तर बापदादा तुम्हाला सांगत आहेत की, ही जुनी भाषा, जुने वर्तन, निष्काळजीपणाचे,
कडवटपणाचे कधी पर्यंत? बापदादांचा देखील प्रश्न आहे - ‘कधी पर्यंत?’ तुम्ही उत्तर
द्या तर बापदादा सुद्धा उत्तर देतील कधी पर्यंत विनाश होईल; कारण बापदादा विनाशाचा
पडदा तर आता सुद्धा याच सेकंदामध्ये उघडू शकतात परंतु अगोदर राज्य करणारे तर तयार
व्हावेत. तर आतापासून तयारी कराल तेव्हा समाप्ती समीप आणाल. कोणत्याही कमजोरीच्या
गोष्टीमध्ये कारण सांगू नका, निवारण करा, असे कारण होते ना. बापदादा संपूर्ण
दिवसभरामध्ये मुलांचा खेळ तर बघतात ना, मुलांवर प्रेम आहे ना, तर पुन्हा-पुन्हा खेळ
बघत राहतात. बापदादांचा टी. व्ही. खूप मोठा आहे. एकावेळी सारे जग दिसू शकते, चोहो
बाजूची मुले दिसू शकतात. भले मग अमेरिका असेल, किंवा गुडगाव असेल, सगळे दिसतात. तर
बापदादा खेळ खूप बघतात. टाळण्याची भाषा खूप चांगली आहे, असे कारण होते ना, बाबा माझी
चूक नाहीये, याने असे केले ना. त्याने तर केले, परंतु तुम्ही समाधान केलेत का?
कारणाला कारणच बनू दिलेत की कारणाला निवारण मध्ये बदली केलेत? तर सगळे विचारता ना
की, बाबा तुमची काय आशा आहे? तर बापदादा आपली आशा ऐकवत आहेत. बापदादांची एकच आशा आहे
- निवारण दिसून यावे, कारण नष्ट व्हावे. समस्या समाप्त व्हावी, समाधान होत रहावे.
होऊ शकते का? होऊ शकते? पहिली लाइन - होऊ शकते? मान तर हलवा. मागे बसणारे होऊ शकते
का? (सर्वांनी हात वर केला) अच्छा. तर उद्या जर टी. व्ही. लावतील, टी. व्ही. मध्ये
बघतील तर जरूर ना. तर उद्या टी. व्ही. बघतील तेव्हा भले मग फॉरेन असो किंवा इंडिया
असो, किंवा छोटी गावे असोत, नाहीतर खूप मोठे राज्य असो, कुठेही कारण दिसून येणार
नाही ना? पक्के? यामध्ये ‘हो’ म्हणत नाही आहेत? होईल का? हात वर करा. हात खूप चांगले
वर करता, बापदादा खुश होतात. कमाल आहे हात वर करण्याची. खुश करणे तर मुलांना येते
कारण बापदादा बघतात, विचार करा - जे तुम्ही कोटी मध्ये कोणी, कोणी मध्ये कोणी
निमित्त बनले आहात, आता या मुलांशिवाय दुसरे कोण करेल? तुम्हालाच तर करायचे आहे ना!
तर बापदादांची तुम्हा मुलांमध्ये आशा आहे. आणि जे येतील ना, ते तर तुमची अवस्था
पाहूनच ठीक होतील, त्यांना मेहनत करावी लागणार नाही. तुम्ही बना, बस्स, कारण तुम्हा
सर्वांनी जन्म घेताच बाबांशी वायदा केला आहे - ‘सोबत राहणार, सोबती बनणार आणि सोबत
येणार आणि ब्रह्मा बाबांसोबत राज्यामध्ये येणार’. हा वायदा केला आहे ना? जर सोबत
राहणार, सोबत येणार तर सोबत सेवेचे साथी सुद्धा आहात ना!
तर आता काय करणार?
हात तर खूप छान वर केला, बापदादा खुश झाले परंतु जेव्हापण कोणती अशी गोष्ट आली ना
तर हा दिवस, ही तारीख, ही वेळ आठवा की आपण कशासाठी हात वर केला होता. मदत मिळेल.
तुम्हाला बनावे तर लागेल. आता फक्त लवकरात लवकर बना. तुम्ही विचार करता ना, आम्हीच
कल्पापूर्वी सुद्धा होतो, आता देखील आहोत आणि प्रत्येक कल्प आम्हालाच बनायचे आहे,
हे तर पक्के आहे ना का दोन वर्ष बनणार आणि तिसऱ्या वर्षी निसटून जाणार! असे तर
होणार नाही ना? तर कायम हे लक्षात ठेवा की, आम्हीच निमित्त आहोत, आम्हीच कोटींमध्ये
कोणी, कोणी मध्ये कोणी आहोत. कोटींमध्ये कोणीतरी येतीलच परंतु तुम्ही कोणी मध्येही
कोणी आहात.
तर आज स्नेहाचा दिवस
आहे, तर स्नेहामध्ये काहीही करणे अवघड वाटत नसते म्हणून बापदादा आजच सर्वांना आठवण
करून देत आहेत. ब्रह्मा बाबांवर मुलांचे किती प्रेम आहे - हे पाहून शिवबाबांना खूप
आनंद होतो. चोहो बाजूला बघितले भले ७ दिवसांचा स्टुडंट आहे, किंवा ७० वर्षांचा आहे.
७० वर्षांचा आणि ७ दिवस झालेला सुद्धा आजच्या दिवशी प्रेमामध्ये सामावलेला आहे. तर
शिवबाबा सुद्धा ब्रह्माबाबांवरील मुलांचे प्रेम पाहून हर्षित होत आहेत.
आजच्या दिवसाचा आणखी
समाचार ऐकवू. आजच्या दिवशी ॲडव्हान्स पार्टी सुद्धा बापदादांपाशी इमर्ज होते. तर ॲडव्हान्स
पार्टी सुद्धा तुमची आठवण करत होती की कधी बाबांसोबत मुक्तिधामचा दरवाजा उघडणार! आज
सर्व ॲडव्हान्स पार्टी बापदादांना हेच विचारत होती की, आम्हाला तारीख सांगा. तर काय
उत्तर देऊ? सांगा काय उत्तर देऊ? उत्तर देण्यामध्ये कोण हुशार आहे? बापदादांना तर
हेच उत्तर देतात की लवकरात लवकर तयार होतीलच. परंतु यामध्ये तुम्हा मुलांचा बाबांना
सहयोग हवा आहे. सगळे सोबत येणार ना! सोबत येणारे आहात की थांबत-थांबत येणारे आहात?
सोबत येणारे आहात ना! सोबत येणे पसंत आहे ना? तर समान बनावे लागेल. जर सोबत यायचे
असेल तर समान तर बनावेच लागेल ना! म्हण काय आहे? ‘हाथ में हाथ हो, साथ में साथ हो’.
तर हातामध्ये हात अर्थात समान. तर बोला दादीजी बोला, तयारी होईल ना? सर्व दादीजी
बोला. दादी हात वर करा. सर्व दादाजी हात वर करा. तुम्हाला म्हटले जाते ना मोठे
दादाजी. तर सांगा दादीजी, दादाजी तारीख आहे का कोणती? (आता नाही तर कधीच नाही) आता
नाही तर कधीच नाही याचा अर्थ काय झाला? आता तयार आहात ना! उत्तर तर छान दिलेत.
दादीजी? पूर्ण तर होणारच आहे. छोटे-मोठे प्रत्येकाने यामध्ये स्वतःला जबाबदार समजा.
यामध्ये छोटे व्हायचे नाही. ७ दिवसांचा मुलगा सुद्धा जबाबदार आहे कारण सोबत यायचे
आहे ना. एकट्या बाबांना जायचे असते तर गेले सुद्धा असते परंतु बाबा जाऊ शकत नाहीत.
सोबत जायचे आहे. वायदा आहे बाबांचा सुद्धा आणि तुम्हा मुलांचा देखील. वायदा तर
पाळायचा आहे ना! पाळायचा आहे ना? अच्छा.
चोहो बाजूंची पत्रे,
आठवण-पत्र ई-मेल, चोहो बाजूचे फोन भरपूर आले आहेत, इथे मधुबनमध्ये सुद्धा आले आहेत
तर वतनमध्ये देखील पोहोचले आहेत. आजच्या दिवशी ज्या बंधनात असणाऱ्या माता आहेत,
त्यांच्या देखील अति स्नेहाने ओथंबलेल्या मनातील आठवणी बापदादांपाशी पोहोचल्या.
बापदादा अशा स्नेही मुलांची खूप आठवण सुद्धा करतात आणि आशीर्वाद देखील देतात. अच्छा.
चोहो बाजूच्या स्नेही
मुलांना लवली आणि लवलीन दोन्ही मुलांना, सदैव बाबांच्या श्रीमत प्रमाणे प्रत्येक
पावलामध्ये पद्म जमा करणाऱ्या नॉलेजफुल पॉवरफुल मुलांना, सदैव स्नेही देखील आणि
स्वमानधारी सुद्धा, सम्मानधारी सुद्धा, अशा सदैव बाबांच्या श्रीमताचे पालन करणाऱ्या
विजयी मुलांना, सदैव बाबांच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवणाऱ्या सहजयोगी मुलांना
बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
क्लिअर
लाइनच्या आधारे नंबरवन ने पास होणारे एव्हररेडी भव
सदैव एव्हररेडी राहणे
- ही ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे. आपल्या बुद्धीची लाइन अशी क्लियर असावी
जेणेकरून बाबांचा कोणताही इशारा मिळाला - एव्हररेडी. त्यावेळी काहीही विचार करण्याची
गरज नसावी. अचानक एकच प्रश्न येईल - ऑर्डर होईल - ‘इथेच बसा’, ‘इथे पोहोचा’ तर
कोणतीही गोष्ट अथवा नाते आठवू नये; तेव्हाच नंबरवन पास होऊ शकाल. परंतु हा सर्व
अचानकचा पेपर असेल - म्हणून एव्हररेडी बना.
सुविचार:-
मनाला शक्तीशाली
बनविण्याकरिता आत्म्याला ईश्वरीय स्मृतीचे आणि शक्तीचे भोजन द्या.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. बरीच मुले
असे म्हणतात की, जेव्हा योगामध्ये बसतो तर आत्म-अभिमानी होण्याऐवजी सेवेची आठवण येते.
परंतु असे होता कामा नये कारण शेवटच्या वेळी जर अशरीरी बनण्याऐवजी सेवेचा जरी
संकल्प चालला तरीही सेकंदाच्या पेपरमध्ये फेल व्हाल. त्यावेळी निराकारी, निर्विकारी,
निरहंकारी बाबांशिवाय दुसऱ्या कशाचीही आठवण नको. सेवेमध्ये तरीही साकारमध्ये याल
त्यामुळे ज्यावेळी जी स्थिती हवी आहे ती झाली नाही तर फसगत होईल.