14-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, प्राण
वाचविणारे प्राणेश्वर बाबा, तुम्हा मुलांना ज्ञानाची गोड मुरली ऐकवून प्राण
वाचविण्याकरिता आलेले आहेत”
प्रश्न:-
कोणता निश्चय
भाग्यवान मुलांनाच होतो?
उत्तर:-
आपले श्रेष्ठ
भाग्य बनविण्यासाठी स्वतः बाबा आलेले आहेत. बाबांकडून आम्हाला भक्तीचे फळ मिळत आहे.
मायेने जे पंख छाटले आहेत - ते पंख देण्यासाठी, स्वतःसोबत परत घेऊन जाण्यासाठी बाबा
आलेले आहेत. हा निश्चय फक्त भाग्यवान मुलांनाच होतो.
गीत:-
यह कौन आज आया
सवेरे…
ओम शांती।
सकाळी-सकाळी
हे कोण येऊन मुरली वाजवतात ? दुनिया तर बिलकुल घोर अंधारामध्ये आहे. तुम्ही आता
ज्ञान-सागर, पतित-पावन प्राणेश्वर बाबांकडून मुरली ऐकत आहात. ते आहेत प्राण
वाचविणारे ईश्वर. असे म्हणतात ना की, ‘हे ईश्वरा या दुःखातून वाचव’. ते हदची मदत
मागतात. आता तुम्हा मुलांना बेहदची मदत मिळते, कारण बेहदचे बाबा आहेत ना. तुम्ही
जाणता आत्मा गुप्त आहे, बाबा देखील गुप्त आहेत. जेव्हा मुलाचे शरीर प्रत्यक्ष आहे
तेव्हा बाबा देखील प्रत्यक्ष आहेत. आत्मा गुप्त आहे तर बाबा देखील गुप्त आहेत.
तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत, आम्हाला बेहदचा वारसा देण्यासाठी. त्यांचे आहे -
श्रीमत.
सर्व शास्त्रमई
शिरोमणी गीता प्रसिद्ध आहे फक्त त्यामध्ये नाव बदलले आहे. आता तुम्ही जाणता श्रीमत
भगवानुवाच आहे ना. हे देखील समजले आहे - भ्रष्टाचारीला श्रेष्ठाचारी बनविणारे एक
बाबाच आहेत. तेच नरापासून नारायण बनवतात. कथा देखील सत्य-नारायणाची आहे. गायले जाते
- अमरकथा, अमरपुरीचा मालक बनण्याची अथवा नरापासून नारायण बनण्याची कथा आहे. गोष्ट
एकच आहे. हा आहे मृत्यूलोक. भारतच अमरपुरी होता, हे कोणालाच माहिती नाहीये. इथे
देखील अमर बाबांनी भारतवासीयांनाच ऐकविले आहे. काही एक पार्वती अथवा एक द्रौपदीच
नाहीये. ही तर असंख्य मुले ऐकत आहेत. शिवबाबा ब्रह्मा द्वारे ऐकवतात. बाबा म्हणतात
- ‘मी ब्रह्मा द्वारे गोड-गोड आत्मिक मुलांना समजावून सांगतो’. बाबांनी समजावून
सांगितले आहे - मुलांना जरूर आत्म-अभिमानी बनायचे आहे. बाबाच बनवू शकतात.
दुनियेमध्ये एकही असा मनुष्य मात्र नाही ज्याला आत्म्या विषयीचे ज्ञान असेल.
आत्म्याविषयीचेच ज्ञान नाहीये तर मग परमपिता परमात्म्या विषयीचे ज्ञान कसे बरे असू
शकते. म्हणतात की, आत्मा सो परमात्मा. किती मोठ्या भ्रमामध्ये सारी दुनिया अडकलेली
आहे. यावेळी मनुष्यांची बुद्धी काहीही कामाची राहिलेली नाहीये. स्वतःच्याच
विनाशासाठी तयारी करत आहेत. तुम्हा मुलांसाठी ही काही नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही
जाणता, ड्रामा अनुसार त्यांचा देखील पार्ट आहे. ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेले
आहेत.
आज-काल दुनियेमध्ये
खूप अराजकता माजली आहे. आता तुम्ही मुले आहात विनाश काले प्रीत बुद्धी; जे
बाबांसोबत विपरीत बुद्धी आहेत, त्यांच्यासाठी विनशन्ती गायले गेले आहे. आता या
दुनियेला बदलायचे आहे. हे देखील जाणता - खरोखर महाभारत लढाई लागलेली होती, बाबांनी
राजयोग शिकवला होता. शास्त्रांमध्ये तर संपूर्ण विनाश लिहिला आहे. परंतु संपूर्ण
विनाश तर होणारच नाही; मग तर प्रलयच होईल. कोणताही मनुष्य राहणार नाही, फक्त पाच
तत्वेच राहतील. असे तर होऊ शकत नाही. प्रलय झाला तर मग मनुष्य कुठून येतील? दाखवतात
की, कृष्ण अंगठा चोखत पिंपळाच्या पानावर सागरामध्ये आला. बालक असे येऊ तरी कसे शकते?
शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत काही विचारू नका. आता तुम्हा
कुमारींद्वारे या विद्वानांना, भीष्म पितामह इत्यादींना देखील ज्ञान-बाण लागणार
आहेत. ते देखील पुढे चालून येतील. जितका-जितका तुम्ही सेवेमध्ये जोर भराल, बाबांचा
परिचय सर्वांना देत राहाल तितका तुमचा प्रभाव पडेल. होय, विघ्ने देखील येतील. हे
देखील गायले गेले आहे, आसुरी संप्रदायाची या ज्ञान-यज्ञामध्ये खूप विघ्ने पडतात.
तुम्ही शिकवू शकणार नाही. ज्ञान आणि योग बाबाच शिकवत आहेत. सद्गती दाता एक बाबाच
आहेत. तेच पतितांना पावन बनविणारे आहेत, तर जरूर पतितांनाच ज्ञान देतील ना. बाबांना
कधी सर्वव्यापी मानले जाऊ शकते काय! तुम्ही मुले समजता - आता आपण पारस-बुद्धी बनून
पारसनाथ बनतो. मनुष्यांनी असंख्य मंदिरे बनविली आहेत. परंतु ते कोण आहेत, काय करून
गेले, अर्थच समजत नाहीत. पारसनाथाचे देखील मंदिर आहे. भारत पारसपुरी होता. सोने,
हिरे, माणकांचे महाल होते. कालचीच गोष्ट आहे. ते (दुनियावाले) तर केवळ एका सतयुगाचा
कालावधी लाखो वर्षे असल्याचे सांगतात. आणि बाबा म्हणतात - संपूर्ण ड्रामाच ५ हजार
वर्षांचा आहे; म्हणून म्हटले जाते - आज भारत काय आहे आणि कालचा भारत काय होता. लाखो
वर्षांची तर कुणाला आठवणही राहू शकणार नाही. तुम्हा मुलांना आता स्मृती आली आहे.
जाणता ५ हजार वर्षांचीच गोष्ट आहे. बाबा म्हणतात - योगमध्ये बसा. स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण करा. हे ज्ञान झाले ना. ते आहेत हठयोगी. पायावर पाय चढवून (पद्मासन
घालून) बसतात. काय-काय करतात. तुम्ही माता तर असे करू शकत नाही. बसू देखील शकत नाही.
भक्तिमार्गाची किती असंख्य चित्रे आहेत. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, हे काहीही
करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही’. स्कूलमध्ये स्टुडंट नियमानुसार बसतात ना. बाबा,
ते सुद्धा सांगत नाहीत. जसे पाहिजे तसे बसा. बसून थकलात तर ठीक आहे, पडून राहा. बाबा
कोणत्याही गोष्टीसाठी मनाई करत नाहीत. ही तर बिलकुल सहज समजून घेण्याची गोष्ट आहे,
यामध्ये कोणत्याही त्रासाची गोष्टच नाही. भले कितीही आजारी असाल, असेही होऊ शकते
ऐकता-ऐकता शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहता-राहता प्राण तनामधून निघून जाईल. गायले
जाते ना - ‘गंगा जल मुख में हो… तब प्राण तन से निकले’. या तर सर्व आहेत
भक्तिमार्गाच्या गोष्टी. वास्तविक आहेत या ज्ञान-अमृताच्या गोष्टी. तुम्ही जाणता -
खरोखर, असेच प्राण तनातून निघून जाणार आहेत.
तुम्ही मुले जेव्हा
आपल्या घरून येता (परमधमहून येता) तर मला सोडून येता. बाबा म्हणतात - मी तर तुम्हा
मुलांना सोबत घेऊन जाणार. मी आलोच आहे तुम्हा मुलांना घरी घेऊन जाण्याकरिता.
तुम्हाला ना आपल्या घराचा पत्ता माहित आहे, ना आत्म्याविषयी माहिती आहे. मायेने
अगदीच पंख कापून टाकले आहेत; म्हणून आत्मा उडू शकत नाही कारण तमोप्रधान आहे.
जोपर्यंत सतोप्रधान बनत नाही तोपर्यंत शांतीधाम मध्ये जाऊ तरी कशी शकते. हे देखील
जाणता - ड्रामा प्लॅन अनुसार सर्वांना तमोप्रधान बनायचेच आहे. यावेळी संपूर्ण झाड
जडजडीभूत झाले आहे. इथे कोणाचीही सतोप्रधान अवस्था होऊ शकत नाही. आत्मा जर इथे
पवित्र बनली तर मग इथे राहू शकणार नाही, एकदम पळून जाईल. सर्वजण भक्ती करतातच
मुक्तीसाठी. परंतु कोणीही परत जाऊ शकत नाही. कायदा असे सांगत नाही. बाबा बसून ही
सर्व रहस्ये समजावून सांगतात - धारण करण्याकरिता. तरीही मुख्य गोष्ट आहे बाबांची
आठवण करणे, स्वदर्शन चक्रधारी बनणे. बीजाची आठवण केल्याने सारे झाड बुद्धीमध्ये
येईल. तुम्ही एका सेकंदामध्ये सर्व काही जाणता. दुनियेमध्ये कोणालाच हे ठाऊक नाही
की, मनुष्य सृष्टीचे बीजरूप सर्वांचे एक बाबाच आहेत. श्रीकृष्ण काही भगवान नाहीये.
श्रीकृष्णालाच शाम-सुंदर म्हणतात. असे नाही की कोणत्या तक्षक सर्पाने डंख मारला
तेव्हा काळा झाला. हे तर काम-चितेवर चढल्यामुळे मनुष्य काळा होतो. रामाला देखील काळा
दाखवतात, मग त्यांना भले कोणी डंख मारला! काहीही समजत नाहीत. तरीही ज्यांच्या
भाग्यामध्ये आहे, निश्चय आहे तर जरूर बाबांकडून वारसा घेतील. निश्चय नसेल तर कधीही
समजणार नाहीत. भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ तरी काय करतील. भाग्यामध्ये नसेल तर
मग ते बसतातच असे जसे की काहीही समजत नाही. एवढा देखील निश्चय नाहीये की, बाबा,
बेहदचा वारसा देण्यासाठी आले आहेत. जसे एखादी नवीन व्यक्ती मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन
बसली तर तिला काही समजेल तरी का, काहीच नाही. इथे देखील असे येऊन बसतात. या अविनाशी
ज्ञानाचा विनाश होत नाही. ते मग येऊन काय करतील. राजधानी स्थापन होते तर नोकर-चाकर,
प्रजा, प्रजेचे देखील नोकर-चाकर सर्व पाहिजेत ना. पुढे चालून काहीजण शिकण्याचा
प्रयत्न करतील परंतु फार मुश्किलीने; कारण त्यावेळेस खूप अंदाधुंदी माजेल.
दिवसेंदिवस वादळे वाढत जातात. इतकी सेंटर्स आहेत, बरेचजण येऊन चांगल्या रीतीने
समजून देखील घेतील. हे देखील लिहिलेले आहे - ब्रह्मा द्वारे स्थापना. विनाश देखील
समोर उभा आहे. विनाश तर होणारच आहे. म्हणतात की, जन्मदर कमी व्हावा. परंतु झाडाची
वृद्धी तर होणारच आहे. जोपर्यंत बाबा आहेत, तोपर्यंत सर्व धर्मांच्या आत्म्यांना इथे
यायचेच आहे. जेव्हा जाण्याची वेळ येईल तेव्हा आत्म्यांचे येणे बंद होईल. आता तर
सर्वांना यायचेच आहे, परंतु या गोष्टी कोणालाही समजत नाहीत. म्हणतात देखील -
भक्तांचा रक्षक एक भगवान आहे. तर जरूर भक्तांवर संकटे येतात. रावण राज्यामध्ये सगळे
अगदीच पाप-आत्मे बनले आहेत. कलियुग अंतामध्ये आहे - रावण राज्य, सतयुग आदि मध्ये आहे
- राम राज्य. यावेळी सर्व आसुरी रावण संप्रदाय आहे ना. म्हणतात की, अमका स्वर्गवासी
झाला, तर याचा अर्थ आहे - हा नरक आहे ना. स्वर्गवासी झाला तर चांगले नाव आहे. जेव्हा
इथे होता तेव्हा कोण होता, जरूर नरकवासी होता. हे देखील समजत नाहीत की आपण नरकवासी
आहोत. आता तुम्ही समजता बाबाच येऊन स्वर्गवासी बनवतील. गायले देखील जाते - हेवनली
गॉडफादर. तेच येऊन हेवन स्थापन करतील. सर्व गात राहतात - ‘पतित-पावन सीताराम’. आम्ही
पतित आहोत, पावन बनविणारे तुम्ही आहात. त्या सर्व आहेत भक्तिमार्गाच्या सीता. बाबा
आहेत राम. कोणाला सरळ सांगितले तर मानणार नाहीत. रामाला बोलावतात. आता तुम्हा
मुलांना बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही जणूकाही वेगळ्या दुनियेचे बनले आहात.
बाबा समजावून सांगत
आहेत - आता सर्वांना तमोप्रधान देखील जरूर बनायचे आहे, तेव्हाच तर बाबा येऊन
सतोप्रधान बनवतील. बाबा किती चांगल्या रीतीने बसून समजावून सांगतात. म्हणतात - भले
तुम्ही मुले आपली सर्विस देखील करत आहात, परंतु फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा - बाबांची
आठवण करा. सतोप्रधान बनण्याचा मार्ग दुसरा कोणीही सांगू शकणार नाही. सर्वांचे रुहानी
सर्जन एकच आहेत. तेच येऊन आत्म्यांना इंजेक्शन देतात, कारण आत्माच तमोप्रधान बनली
आहे. बाबांना अविनाशी सर्जन म्हटले जाते. आत्मा अविनाशी आहे, परमात्मा बाबा देखील
अविनाशी आहेत. आता आत्मा सतोप्रधानापासून तमोप्रधान बनली आहे, तिला इंजेक्शन पाहिजे.
बाबा म्हणतात - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा निश्चय करा आणि आपल्या बाबांची आठवण करा’.
बुद्धीयोग वर लावा म्हणजे मग स्वीटहोम मध्ये निघून जाल. तुमच्या बुद्धीमध्ये आहे -
आता आपल्याला आपल्या स्वीट सायलेन्स होममध्ये जायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ज्ञान आणि
योगाद्वारे बुद्धीला पारस बनवायचे आहे. कितीही आजारी असाल, त्रास होत असेल, तशा
परिस्थितीमध्ये देखील एका बाबांची आठवण राहावी.
२) आपले श्रेष्ठ
भाग्य बनविण्यासाठी पूर्णत: निश्चय बुद्धी बनायचे आहे. बुद्धियोग आपल्या स्वीट
सायलेन्स होममध्ये लावायचा आहे.
वरदान:-
त्रिकालदर्शी
बनून व्यर्थ संकल्प आणि संस्कारांना परिवर्तन करणारे विश्व कल्याणकारी भव
जेव्हा मास्टर
त्रिकालदर्शी बनून संकल्पाला कर्मामध्ये लावाल, तेव्हा कोणतेही कर्म व्यर्थ होणार
नाही. या व्यर्थला बदलून समर्थ संकल्प आणि समर्थ कार्य करणे - याला म्हटले जाते
संपूर्ण स्टेज. केवळ आपल्या व्यर्थ संकल्पांना अथवा विकर्मांना भस्म करायचे नाहीये
परंतु शक्ती रूप बनून साऱ्या विश्वाच्या विकर्मांचे ओझे हलके करा आणि अनेक
आत्म्यांच्या व्यर्थ संकल्पांना नष्ट करण्याची मशिनरी फास्ट करा, तेव्हा म्हणणार
विश्व कल्याणकारी.
बोधवाक्य:-
नष्टोमोहा
बनायचे असेल तर सेवेअर्थ स्नेह ठेवा, स्वार्थापोटी नको.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये -
- ‘ज्ञान आणि योग’
यामधील कॉन्ट्रास्ट (फरक) -
‘योग’ आणि ‘ज्ञान’ हे
दोन शब्द आहेत. ‘योग’ म्हटले जाते परमात्म्याच्या आठवणीला. इतर कोणाच्याही आठवणीसाठी
‘योग’ हा शब्द वापरला जात नाही. गुरु लोक जे पण योग शिकवतात, तो देखील
परमात्म्यासोबतच जोडण्यासाठी असतो, परंतु त्यांना फक्त परमात्म्याचा पूर्ण परिचय
नसल्यामुळे ‘योग’ पासूनची पूर्ण सिद्धी (यश) मिळत नाही. योग आणि ज्ञान या दोन्ही
शक्ती आहेत, या दोन्हींच्या पुरुषार्थाद्वारे माईट मिळते (सामर्थ्य मिळते) आणि आपण
विकर्माजीत बनून श्रेष्ठ जीवन बनवतो. ‘योग’ हा शब्द तर सर्वजण बोलतात परंतु
ज्यांच्यासोबत योग लावला जातो त्यांचा पहिला परिचय तर पाहिजे. आता हा परमात्म्याचा
परिचय देखील आपल्याला परमात्म्याद्वारेच मिळतो, आणि त्या परिचयाच्या आधारे योग
लावल्याने आपल्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते. या ‘योग’द्वारेच आम्ही आमच्या मागील
विकर्मांचे ओझे भस्म करून टाकतो. आणि ज्ञानाद्वारे हे देखील माहीत होते की, आता या
पुढे आपल्याला कोणते कर्म करायचे आहे आणि का करायचे आहे? जीवनाची मुळे आहेत - आपले
संस्कार. आत्मा देखील अनादि संस्कारांनी बनलेली आहे, परंतु कर्मामुळे ते संस्कार
बदलत राहतात. योग आणि ज्ञानाने आत्म्यामध्ये श्रेष्ठता येते आणि जीवनामध्ये बळ येते,
परंतु या दोन्ही गोष्टी परमात्म्याकडूनच प्राप्त होतात. कर्मबंधनामधून मुक्त
होण्याचा मार्ग देखील आपल्याला परमात्म्याकडूनच प्राप्त होतो. आपण विकर्म करून जी
कर्मबंधने बनविली आहेत त्यापासून मुक्त होऊन, मग अजून पुढील भविष्यासाठी आमची कर्म
विकर्म बनू नयेत तर या दोन्हींसाठीचे बळ परमात्म्याशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही.
‘योग’ आणि ‘ज्ञान’ या दोन्ही गोष्टी परमात्माच घेऊन येतात; योग-अग्नीद्वारे आम्ही
केलेली विकर्म भस्म करवितात आणि ज्ञानाद्वारे भविष्यासाठी श्रेष्ठ कर्म शिकवितात,
ज्यामुळे कर्म, अकर्म होते; तेव्हाच तर परमात्म्याने म्हटले आहे की, या
कर्म-अकर्म-विकर्माची गती अतिशय गहन आहे. आता तर आम्हा आत्म्यांना डायरेक्ट
परमात्म्याचे बळ पाहिजे, शास्त्रांद्वारे हे योग आणि ज्ञानाचे बळ काही मिळू शकणार
नाही; परंतु त्या सर्वशक्तिवान बलवानाद्वारेच बळ मिळते. आता आपल्याला आपल्या जीवनाची
मुळे (संस्कार) अशी बनवायची आहेत ज्यामुळे जीवनामध्ये सुख मिळेल. तर परमात्मा येऊन
आमच्या जीवनाच्या मुळामध्ये शुद्ध संस्कारांचे बीज टाकतात, ज्या शुद्ध संस्कारांच्या
आधारे आम्ही अर्धा कल्प जीवनमुक्त बनू. अच्छा - ओम् शांती.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
तुम्हा पूर्वज, पूज्य
आत्म्यांना अनेक आत्मे ‘शांती देवा’, ‘शक्ती देवा’ असे म्हणून आठवण करत आहेत.
अशावेळी हे शांती देवा आत्म्यांनो, मास्टर शांतीचे सागर, मास्टर शांतीचे सूर्य
आपल्या शांतीची किरणे, शांतीचे तरंग दात्याची मुले ‘देवा’ बनून सर्वांना देत राहा.
अशी सेवा करण्याच्या बाबतीत विशेष अभ्यासी बना.