14-10-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ‘हियर नो इव्हिल…’ इथे तुम्ही सत्संगामध्ये बसले आहात, तुम्ही मायावी कुसंगतीमध्ये जाता कामा नये, वाईट संगत लागल्यामुळेच संशयाच्या रूपामध्ये घुसमट होते”

प्रश्न:-
यावेळी कोणत्याही मनुष्याला स्पिरिच्युअल (अध्यात्मिक) म्हणू शकत नाही - असे का?

उत्तर:-
कारण सर्व देह-अभिमानी आहेत. देह-अभिमान असणाऱ्यांना अध्यात्मिक कसे म्हणता येईल. अध्यात्मिक पिता तर एक निराकार बाबाच आहेत जे तुम्हाला देखील देही-अभिमानी बनण्याची शिकवण देतात. सुप्रीम (सर्वोच्च) ही उपाधी देखील एका बाबांनाच दिली जाऊ शकते, बाबांशिवाय इतर कोणालाही ‘सुप्रीम’ म्हणता येणार नाही.

ओम शांती।
मुलांनो जेव्हा इथे बसता तेव्हा जाणता की बाबा आमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि सद्गुरू सुद्धा आहेत. तिघांची आवश्यकता असते. अगोदर पिता, नंतर शिकवणारा शिक्षक आणि शेवटी मग गुरू. इथे आठवण देखील अशीच करायची आहे कारण नवीन गोष्ट आहे ना. बेहदचे बाबासुद्धा आहेत, बेहदचे अर्थात सर्वांचे. इथे जे कोणी येतील त्यांना म्हणतील - ‘हे आठवा, यामध्ये कोणाला संशय असेल तर हात वर करा’. ही किती आश्चर्यजनक गोष्ट आहे ना. जन्म-जन्मांतर असा कोणी कधी मिळाला असेल ज्याला तुम्ही पिता, टीचर, सद्गुरु मानाल. आणि तो देखील सुप्रीम; बेहदचा पिता, बेहदचा टीचर, बेहदचा सद्गुरु. असा कधी कोणी मिळाला? या पुरुषोत्तम संगम युगाव्यतिरिक्त असा कधीही मिळू शकणार नाही. यामध्ये कोणाला संशय असेल तर हात वर करा. इथे सर्व निश्चयबुद्धी होऊन बसले आहेत. मुख्य आहेतच हे तीन. बेहदचे बाबा नॉलेज देखील बेहदचे देतात. बेहदचे नॉलेज तर हे एकच आहे. हदचे नॉलेज तर तुम्ही अनेक प्रकारचे शिकत आला आहात. कोणी वकील बनतात, कोणी सर्जन बनतात, कारण इथे तर डॉक्टर, जज, वकील वगैरे सर्व पाहिजेत ना. तिथे (सुखधाममध्ये) तर या सर्वांची गरजही नाही. तिथे दुःखाची कोणती गोष्टच नाही. तर आता बाबा बसून मुलांना बेहदचे शिक्षण देत आहेत. बेहदचे बाबाच बेहदचे शिक्षण देतात मग अर्धा कल्प कोणतेही शिक्षण शिकण्याची गरज नाही. एकदाच शिक्षण मिळते जे २१ जन्मांसाठी फलीभूत होते अर्थात त्याचे फळ मिळते. तिथे तर डॉक्टर, बॅरिस्टर, जज इत्यादी असत नाहीत. हा तर निश्चय आहे ना. खरोखर असे आहे ना? तिथे दुःख असत नाही. कर्मभोग असत नाहीत. बाबा बसून कर्मांची गती समजावून सांगत आहेत. ते गीता ऐकवणारे काय असे सांगतात का? बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना राजयोग शिकवतो’. त्यामध्ये (गीतेमध्ये) तर लिहिले आहे - श्रीकृष्ण भगवानुवाच. परंतु तो आहे दैवीगुणवाला मनुष्य. शिवबाबा तर कोणते नाव धारण करत नाहीत. त्यांचे दुसरे कोणते नावही नाही. बाबा म्हणतात - ‘मी हे शरीर लोनवर घेतो. हे शरीररूपी घर माझे नाही, हे देखील यांचे (ब्रह्मा बाबांचे) घर आहे. खिडक्या इत्यादी सर्व आहेत’. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘मी तुमचा बेहदचा पिता अर्थात् सर्व आत्म्यांचा पिता आहे, शिकवतो देखील आत्म्यांनाच’. यांना म्हटले जाते अध्यात्मिक पिता अर्थात् रूहानी बाबा; इतर कोणालाही रूहानी बाबा म्हणणार नाही. इथे तुम्ही मुले जाणता हे बेहदचे बाबा आहेत. आता अध्यात्मिक परिषद होत आहे. खरेतर ही काही अध्यात्मिक परिषदच नाही आहे. ते काही खऱ्या अर्थाने अध्यात्मिक नाहीत. देह-अभिमानी आहेत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी भव. देहाचा अभिमान सोडा’. असे थोडेच तुम्ही कोणाला म्हणाल. ‘अध्यात्मिक’ शब्दाचा वापर आत्ता करत आहेत. पूर्वी फक्त ‘धार्मिक परिषद’ म्हणत होते. स्पिरिच्युअल (अध्यात्मिक) याचा अर्थच कोणाला समजत नाही. स्पिरिच्युअल फादर अर्थात् निराकार बाबा. तुम्ही आत्मे आहात स्पिरिच्युअल मुले. स्पिरिच्युअल फादर येऊन तुम्हाला शिकवत आहेत. ही समज इतर कोणालाही असू शकत नाही. बाबा स्वतः बसून सांगतात की मी कोण आहे. गीतेमध्ये हे नाहीये. मी तुम्हाला बेहदचे शिक्षण देतो. याच्यामध्ये वकील, जज, सर्जन इत्यादींची आवश्यकता नाही कारण तिथे तर एकदम सुखच सुख आहे. दुःखाचे नामोनिशाण सुद्धा नसते. इथे मग सुखाचे नामोनिशाण नाही, याला म्हटले जाते प्रायःलोप. सुख तर कागविष्ठासमान आहे. थोडेसे सुख आहे तर बेहद सुखाचे नॉलेज कसे देऊ शकणार. पूर्वी जेव्हा देवी-देवतांचे राज्य होते तेव्हा सत्यता १०० टक्के होती. आता तर खोटेच खोटे आहे.

हे आहे बेहदचे नॉलेज. तुम्ही जाणता, हे मनुष्य सृष्टीरूपी झाड आहे, ज्याचे बीजरूप मी आहे. यांच्यात झाडाचे सर्व नॉलेज आहे. मनुष्यांना हे नॉलेज नाही आहे. मी चैतन्य बीजरूप आहे. मला म्हणतातच ज्ञानाचा सागर. ज्ञानामुळे सेकंदामध्ये गती-सद्गती होते. मी सर्वांचा पिता आहे. मला ओळखल्याने तुम्हा मुलांना वारसा मिळतो. परंतु राजधानी आहे ना. स्वर्गामध्ये सुद्धा पदे तर क्रमवारीने खूप आहेत. बाबा सर्वांना एकच शिक्षण देतात. शिकणारे मात्र क्रमवारीनेच असतात. यामध्ये मग दुसऱ्या कोणत्याही शिक्षणाची आवश्यकता राहत नाही. तिथे कोणी आजारी पडत नाही, कोणीही पै-पैशाच्या कमाईसाठी शिक्षण घेत नाहीत. तुम्ही इथून बेहदचा वारसा घेऊन जाता. तिथे हे कळणारही नाही की हे पद आपल्याला कोणी तरी दिले आहे. हे तुम्ही आत्ता समजता. हदचे नॉलेज तर तुम्ही शिकत आला आहात. बेहदचे नॉलेज शिकविणाऱ्याला तुम्ही आता पाहिले आहे आणि ओळखले आहे. जाणता की बाबा, पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, येऊन आम्हाला शिकवत आहेत. सर्वोच्च टीचर आहेत, राजयोग शिकवत आहेत. खरे सद्गुरु सुद्धा आहेत. हा आहे बेहदचा राजयोग. ते (लौकिक टीचर) बॅरिस्टरी, डॉक्टरकीच शिकवतील कारण हे जगच दुःखाचे आहे. ते सर्व आहे हदचे शिक्षण, हे आहे बेहदचे शिक्षण. बाबा तुम्हाला बेहदचे शिक्षण शिकवतात. हेसुद्धा जाणता हे बाबा, शिक्षक, सद्गुरु कल्प-कल्प येतात आणि सतयुग-त्रेतासाठी हेच शिक्षण शिकवतात. मग हे प्रायःलोप होते. सुखाचे प्रारब्ध ड्रामा अनुसार पूर्ण होते. हे बेहदचे बाबा बसून समजावून सांगत आहेत, त्यांनाच पतित-पावन म्हटले जाते. श्रीकृष्णाला ‘त्वमेव माता च पिता’ अथवा ‘पतित-पावन’ म्हणणार का? यांच्या पदामध्ये आणि त्यांच्या पदामध्ये दिवस-रात्रीचा फरक आहे. आता बाबा म्हणतात - ‘मला ओळखल्यामुळे तुम्ही सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करू शकता’. जर श्रीकृष्ण भगवान असेल तर कोणीही लगेच ओळखेल. श्रीकृष्णाचा जन्म काही दिव्य-अलौकिक म्हणून गायला जात नाही. त्याचा जन्म फक्त पवित्रतेने होतो इतकेच. बाबा काही कोणाच्या गर्भातून जन्म घेत नाहीत. समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड रूहानी मुलांनो, रूह (आत्माच) शिकते. चांगले किंवा वाईट सर्व संस्कार आत्म्यामध्येच असतात. जस-जशी कर्म करते, त्यानुसार तिला शरीर मिळते’. कोणी खूप दुःख भोगतात. कोणी आंधळे, कोणी बहिरे असतात. तर म्हटले जाईल की मागील जन्मामध्ये अशी कर्म केली आहेत ज्याचे हे फळ आहे. आत्म्याच्या कर्मानुसारच रोगी शरीर इत्यादी मिळते.

आता तुम्ही मुले जाणता - आम्हाला शिकविणारे आहेत - गॉडफादर. गॉड टीचर, गॉड प्रिसेप्टर (सद्गुरु) आहेत. त्यांना म्हणतात - ‘गॉड परम आत्मा’. याला मिळून ‘परमात्मा’ म्हणतात, ‘सुप्रीम सोल’ म्हणतात. ब्रह्माला तर सुप्रीम म्हणणार नाही. सुप्रीम अर्थात् उच्च ते उच्च, पवित्र ते पवित्र. पदे तर प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. श्रीकृष्णाची जी पद-प्रतिष्ठा आहे ती दुसऱ्या कोणालाही मिळू शकत नाही. पंतप्रधानांची पद-प्रतिष्ठा इतर कोणाला थोडीच देतो. बाबांची देखील पद-प्रतिष्ठा वेगळी आहे. ब्रह्मा-विष्णू-शंकराची देखील वेगळी आहे. ब्रह्मा-विष्णू-शंकर देवता आहेत, शिव तर परमात्मा आहेत. दोघांना एकत्र करून शिव-शंकर कसे म्हणणार. दोघेही वेगवेगळे आहेत ना. समजत नसल्यामुळे शिव-शंकराला एकच आहेत असे म्हणतात. अशी नावे देखील ठेवतात. या सर्व गोष्टी बाबाच येऊन समजावून सांगतात. तुम्ही जाणता हे बाबा देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु सुद्धा आहेत. प्रत्येक मनुष्याला पिता सुद्धा असतो, शिक्षक सुद्धा असतो आणि सद्गुरु सुद्धा असतो. जेव्हा वृद्ध होतात तेव्हा गुरू करतात. आजकाल तर लहानपणीच गुरू करून देतात, असे मानतात की गुरू केला नाही तर अवज्ञा होईल. पूर्वी वयाच्या साठी नंतर गुरू करत होते. ती असते वानप्रस्थ अवस्था. निर्वाण अर्थात् वाणीच्याही पलिकडे स्वीट सायलेन्स होम, जिथे जाण्यासाठी अर्धाकल्प तुम्ही मेहनत केली आहे. परंतु माहितीच नाही त्यामुळे कोणी जाऊ शकत नाही. कोणाला रस्ता तरी कसा सांगू शकतील. या एका शिवाय तर कोणीही रस्ता सांगू शकणार नाही. सर्वांची बुद्धी एकसारखी नसते. कोणी तर जणू कथा ऐकतात, फायदा तर काहीच नाही. उन्नती काहीच नाही. तुम्ही आता बगीच्यातील फूल बनत आहात. फुलाचे काटे बनलात, आता पुन्हा बाबा काट्या पासून फूल बनवत आहेत. तुम्हीच पूज्य मग पुजारी बनलात. ८४ जन्म घेता-घेता सतोप्रधाना पासून तमोप्रधान पतित बनलात. बाबांनी शिडी विषयी सर्व समजावून सांगितले आहे. आता पतिता पासून पावन कसे बनतात, हे मात्र कोणालाच माहिती नाही. गातात देखील ना - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’; मग पाण्याच्या नद्या, समुद्र इत्यादींना पतित-पावन समजून तिथे जाऊन स्नान का करतात. गंगेला पतित-पावनी म्हणतात. परंतु नद्या देखील कुठून निघाल्या आहेत? सागरातूनच उगम पावतात ना. या सर्व सागराची संतान आहेत तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यावी लागते.

इथे तर तुम्ही मुले सत्संगामध्ये बसला आहात. बाहेर कुसंगामध्ये जाता तर तुम्हाला खूप उलट्या गोष्टी ऐकवतील. मग या इतक्या सर्व गोष्टी विसरायला होतील. वाईट संगतीमध्ये गेल्यामुळे घुसमट होऊ लागते, तेव्हाच निश्चयावर संशय येऊ लागतो. परंतु या गोष्टी तर विसरता कामा नयेत. बाबा आमचे बेहदचे बाबा देखील आहेत, टीचर देखील आहेत, पैलतिरी देखील घेऊन जातात, या निश्चयाने तुम्ही आला आहात. ते सर्व आहे भौतिक लौकिक शिक्षण, लौकिक भाषा. हे आहे अलौकिक. बाबा म्हणतात - ‘माझा जन्म देखील अलौकिक आहे. मी लोन घेतो. जुनी जुत्ती (ब्रह्मा बाबांचे शरीर) घेतो. ते सुद्धा जुन्यात जुने, सर्वात जुने आहे हे शरीर. बाबांनी जे घेतले आहे, त्याला ‘लाँग बूट’ म्हणतात. ही किती सोपी गोष्ट आहे. ही काही विसरण्यासारखी तर नाहीये. परंतु माया इतक्या सोप्या गोष्टी विसरायला लावते. बाबा, पिता देखील आहेत, बेहदचे शिक्षण देणारे सुद्धा आहेत, जे दुसरे कोणीही देऊ शकत नाही. बाबा म्हणतात - ‘पाहिजे तर जाऊन बघा कुठे मिळते का’. सर्व आहेत मनुष्य. ते काही हे ज्ञान देऊ शकणार नाहीत. भगवान एकच रथ घेतात, ज्याला भाग्यशाली रथ म्हटले जाते, ज्यामध्ये पद्मा-पदम भाग्यशाली बनविण्यासाठी बाबांची प्रवेशता होते. अगदी जवळचा मणी आहेत. ब्रह्मा सो विष्णू बनतात. शिवबाबा यांना देखील विश्वाचा मालक बनवतात आणि मग यांच्याद्वारे तुम्हाला देखील विश्वाचे मालक बनवतात. विष्णूची पुरी स्थापन होते, याला म्हटले जाते राजयोग, राज्य स्थापन करण्याकरिता. आता इथे ऐकत तर सर्वच आहेत, परंतु बाबा जाणतात की बऱ्याचजणांच्या कानातून वाहून जाते, काहीजण धारण करून मग दुसऱ्यांना ऐकवू शकतात. त्यांना म्हटले जाते - महारथी. ऐकून मग धारण करतात, इतरांना देखील आवडीने समजावून सांगतात. समजावून सांगणारा जर महारथी असेल तर समोरच्याला लगेच समजेल, घोडेस्वाराकडून कमी, प्याद्याकडून अजूनच कमी. कोण महारथी आहेत, कोण घोडेस्वार आहेत, ते तर बाबा जाणतात. आता यामध्ये गोंधळून जाण्याचा काही प्रश्नच नाही. परंतु बाबा बघत असतात मुले गोंधळून जातात आणि मग डुलक्या काढत राहतात. डोळे बंद करून बसतात. कमाई करताना कधी डुलकी येते का? डुलकी काढत रहाल तर मग धारणा कशी होईल. जांभईवरून बाबा समजतात हा थकलेला आहे. कमाई करताना कधी थकवा येत नाही. जांभई हे उदासीनतेचे लक्षण आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या बाबतीत आतल्या आत घुसमटत राहणाऱ्यांना जांभया खूप येतात. आता तुम्ही बाबांच्या घरात बसलेले आहात, तर हा परिवार सुद्धा आहे, टीचर सुद्धा बनतात, मार्ग दाखविण्यासाठी गुरु सुद्धा बनतात. मास्टर गुरू म्हटले जाते. तर आता बाबांचा राइट हँड बनले पाहिजे ना. जेणेकरून अनेकांचे कल्याण करू शकाल. नरा पासून नारायण बनण्याचा हा एक धंदा सोडून बाकी सर्व धंद्यामध्ये नुकसान होते. सर्वांची कमाई नष्ट होते. नरा पासून नारायण बनण्याचा धंदा बाबाच शिकवतात. तर मग कोणते शिक्षण शिकले पाहिजे. ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, ते समजतात स्वर्ग तर इथेच आहे. गांधीजीनी रामराज्य स्थापन केले का? अरे, ही दुनिया तर जुनी तमोप्रधान आहे ना दुःख अजूनच वाढत जाते, याला रामराज्य कसे म्हणणार. मनुष्य किती बे-अक्कल बनले आहेत, बे-अक्कल असणाऱ्याला तमोप्रधान म्हटले जाते. ज्ञानी सतोप्रधान असतात. हे चक्र फिरत राहते, यामध्ये बाबांना काहीही विचारण्याची आवश्यकताच राहत नाही. बाबांचे कर्तव्य आहे रचयिता आणि रचना यांचे ज्ञान देणे. ते तर देत राहतात. मुरली मधून सर्व समजावून सांगत राहतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. आणखी काय विचारणार? बाबांशिवाय कोणीही समजावून सांगूच शकत नाहीत तर मग विचारणार तरी कसे. हे देखील तुम्ही बोर्डावर लिहू शकता - ‘२१ जन्मांसाठी एव्हरहेल्दी, एव्हरवेल्दी बनायचे असेल तर येऊन समजून घ्या’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबा जे सांगतात ते चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे. दुसऱ्यांना आवडीने ऐकवायचे आहे. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे नाही. कमाईच्या वेळी कधी जांभया द्यायच्या नाहीत.
२) बाबांचा राइट हँड बनून अनेकांचे कल्याण करायचे आहे. नरा पासून नारायण बनण्याचा आणि बनविण्याचा धंदा करायचा आहे.

वरदान:-
कोणाचा व्यर्थ समाचार ऐकून त्यात रुची घेण्याऐवजी फुलस्टॉप लावणारे पर-मतापासून मुक्त भव

कितीतरी मुले चालता-चालता श्रीमतामध्ये आत्म्यांचे परमत मिक्स करतात. जेव्हा कोणी ब्राह्मण संसारातील समाचार ऐकवतात तर फार आवडीने ऐकतात. काही मदत तर करू शकत नाही आणि ऐकून घेतले तर ती बातमी बुद्धीमध्ये जाते, मग वेळ वाया जातो; म्हणून बाबांची आज्ञा आहे की ऐकून देखील न ऐकल्यासारखे करा. जर कोणी ऐकवलेच तर तुम्ही फुलस्टॉप लावा. ज्या व्यक्ती बद्दल ऐकले तिच्याप्रती दृष्टीमध्ये किंवा संकल्पामध्ये देखील घृणाभाव नसावा, तेव्हा म्हणणार परमतापासून मुक्त.

बोधवाक्य:-
ज्यांचे मन मोठे आहे त्यांच्या स्वप्नामध्ये देखील हदचे संस्कार इमर्ज होऊ शकत नाहीत.