14-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे पुरुषोत्तम संगमयुग कल्याणकारी युग आहे, यामध्येच परिवर्तन होते, तुम्ही कनिष्ठ पासून उत्तम पुरुष बनता”

प्रश्न:-
या ज्ञानमार्गामध्ये कोणती एक गोष्ट आहे जिचा विचार केल्याने अथवा बोलल्याने कधीही उन्नती होऊ शकत नाही?

उत्तर:-
ड्रामामध्ये असेल तर पुरुषार्थ करू. ड्रामा करवेल तर करू. असा विचार करणाऱ्यांची किंवा बोलणाऱ्यांची कधीही उन्नती होऊ शकत नाही. असे म्हणणेच चुकीचे आहे. तुम्ही जाणता आता आपण जो पुरुषार्थ करत आहोत, तो देखील ड्रामामध्ये नोंदलेला आहे. पुरुषार्थ करायचाच आहे.

गीत:-
यह कहानी है दीये और तूफान की…

ओम शांती।
ही आहेत कलियुगी लोकांची गाणी. परंतु याचा अर्थ ते जाणत नाहीत. तो तुम्हीच जाणता. तुम्ही आहात आता पुरुषोत्तम संगम-युगी. ‘संगमयुगा’च्या सोबत ‘पुरुषोत्तम’ देखील लिहायला हवे. मुलांना ज्ञानाचे पॉईंट्स लक्षात नसल्याने मग अशा प्रकारचे शब्द लिहायला विसरून जातात. हे शब्द मुख्य आहेत, याचा अर्थ देखील तुम्हीच समजू शकता. पुरुषोत्तम मास देखील असतो. हे मग आहे पुरुषोत्तम संगमयुग. या संगमाचा देखील एक सण आहे. हा सण सर्वात उच्च आहे. तुम्ही जाणता आता आपण पुरुषोत्तम बनत आहोत. उत्तम ते उत्तम पुरुष. उच्च ते उच्च श्रीमंताहून श्रीमंत नंबर वन म्हणणार लक्ष्मी-नारायण यांना. शास्त्रांमध्ये दाखवतात - मोठा प्रलय झाला. मग नंबर वन श्रीकृष्ण पिंपळाच्या पानावर सागरामध्ये आला. आता तुम्ही काय म्हणणार? नंबर वन आहे हा श्रीकृष्ण, ज्याला आज श्याम-सुंदर म्हणतात. दाखवतात - अंगठा चोखत आला. मूल तर गर्भातच राहते. तर सर्वप्रथम ज्ञानसागरातून निघालेला उत्तम ते उत्तम पुरुष श्रीकृष्ण आहे. ज्ञान सागराद्वारे स्वर्गाची स्थापना होते. त्यामध्ये नंबरवन पुरुषोत्तम हा श्रीकृष्ण आहे आणि हे आहेत ज्ञानाचा सागर, पाण्याचा नाही. प्रलय देखील काही होत नाही. काही नवीन-नवीन मुले येतात तर बाबांना मग जुने पॉईंट्स रिपीट करावे लागतात. सतयुग-त्रेता-द्वापर-कलियुग… ही ४ युगे तर आहेत. पाचवे मग आहे पुरुषोत्तम संगमयुग. या युगामध्ये मनुष्यांचे परिवर्तन होते. कनिष्ठ पासून सर्वोत्तम बनतात. जसे शिवबाबांना देखील पुरुषोत्तम अथवा सर्वोत्तम म्हणतात ना. ते आहेतच परम-आत्मा, परमात्मा. मग पुरुषांमध्ये उत्तम आहेत हे लक्ष्मीनारायण. यांना असे कोणी बनवले? हे तुम्ही मुलेच जाणता. मुलांना देखील समजले आहे. यावेळी आपण पुरुषार्थ करतो असे बनण्यासाठी. पुरुषार्थ काही मोठा नाहीये. अतिशय सोपा आहे. शिकणाऱ्या देखील आहेत अबला, कुब्जा, ज्या काहीही शिकल्या-सवरलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी किती सोपे करून सांगितले जाते. बघा अहमदाबाद मध्ये एक साधू होता, म्हणत असे मी काहीही खात-पीत नाही. अच्छा कोणी संपूर्ण आयुष्य खात-पीत नाही पण मग पुढे काय? प्राप्ती तर काहीच नाही ना. झाडाला देखील खाणे तर मिळते ना. खत पाणी इत्यादी नॅचरल त्याला मिळते, ज्याने झाडाची वृद्धी होते. त्याने देखील कोणती रिद्धी-सिद्धी प्राप्त केली असेल. असे अनेक आहेत जे आगीवरून, पाण्यावरून चालत जातात. याने फायदा तरी काय होणार. तुमचा तर या सहज राजयोगाने जन्म-जन्मांतरीचा फायदा आहे. तुम्हाला जन्म-जन्मांतरासाठी दुःखी पासून सुखी बनवतात. बाबा म्हणतात - मुलांनो, ड्रामा अनुसार मी तुम्हाला गूढ गोष्टी सांगतो.

जसे बाबांनी सांगितले आहे शिव आणि शंकराला का एकत्र केले आहे? शंकराचा तर या सृष्टीवर पार्टच नाहीये. शिवाचा, ब्रह्माचा, विष्णूचा पार्ट आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांचा ऑलराऊंड पार्ट आहे. शिवबाबांचा देखील यावेळी पार्ट आहे, जे येऊन ज्ञान देतात. आणि मग निर्वाणधाममध्ये निघून जातात. मुलांना संपत्ती देऊन स्वतः वानप्रस्थमध्ये निघून जातात, वानप्रस्थी बनणे अर्थात गुरुद्वारे वाणी पासून परे (दूर) जाण्याचा पुरुषार्थ करणे. परंतु असे परत तर कोणी जाऊ शकत नाही कारण विकारी भ्रष्टाचारी आहेत. विकारातून जन्म तर सर्वांचा होतो. हे लक्ष्मी-नारायण निर्विकारी आहेत, त्यांचा विकारातून जन्म होत नाही म्हणून श्रेष्ठाचारी म्हटले जाते. कुमारी देखील निर्विकारी आहेत - म्हणून त्यांच्यासमोर डोके टेकवतात. तर बाबांनी समजावून सांगितले आहे की शंकराचा काहीही पार्ट नाही, बाकी प्रजापिता ब्रह्मा तर जरूर प्रजेचा पिता झाला ना. शिवबाबांना तर आत्म्यांचा पिता म्हणणार. ते आहेत अविनाशी पिता, या गूढ गोष्टी चांगल्या रीतीने धारण करायच्या आहेत. जे मोठ-मोठे फिलॉसॉफर (तत्वज्ञानी) असतात, त्यांना अनेक टायटल्स (उपाध्या) मिळतात. श्री श्री १०८ चे टायटल देखील विद्वानांना मिळते. बनारसच्या कॉलेजमधून पास होऊन टायटल घेऊन येतात. बाबांनी गुप्ताजींना यासाठी बनारसला पाठवले होते की त्यांना जाऊन समजावून सांगा की बाबांचे देखील टायटल स्वतःला ठेवून बसले आहात. बाबांना श्री श्री १०८ जगद्गुरु म्हटले जाते. माळाच १०८ ची असते. ८ रत्न गायली जातात. ते पास विथ ऑनर होतात म्हणून त्यांच्या नावाचा जप करतात. मग त्यांच्याहून कमी १०८ ची पूजा करतात. जेव्हा यज्ञ रचतात तेव्हा कोणी १००० शाळीग्राम बनवतात, कोणी १० हजार, कोणी ५० हजार, कोणी लाख देखील बनवतात. मातीचे बनवून मग यज्ञ रचतात. जेवढा शेठ चांगल्यात चांगला, मोठा शेठ असेल तर लाख शाळीग्राम बनवेल. बाबांनी समजावून सांगितले आहे माळा तर मोठी आहे ना - १६१०८ ची माळा बनवतात. हे तुम्हा मुलांना बाबा बसून समजावून सांगतात. तुम्ही सर्व भारताची सेवा करत आहात बाबांसोबत. बाबांची पूजा होते तर मुलांची सुद्धा पूजा व्हायला हवी, हे जाणत नाहीत की रुद्र पूजा का होते. मुले तर सर्व शिवबाबांची आहेत. यावेळी सृष्टीची किती जनसंख्या आहे यामध्ये सर्व आत्मे शिवबाबांची मुले झाली ना. परंतु सगळेच मदतगार बनत नाहीत. यावेळी तुम्ही जितकी आठवण करता तितके उच्च बनता. पूजन लायक बनता. अशी दुसऱ्या कोणाची ताकद नाही जो ही गोष्ट समजावून सांगेल म्हणून म्हणतात ईश्वराचा अंत कोणीही जाणत नाही. बाबाच येऊन समजावून सांगतात, बाबांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते तर जरूर ज्ञान देतील ना. प्रेरणेची तर गोष्ट नसते. ईश्वर काही प्रेरणेने समजावून सांगतात काय. तुम्ही जाणता त्यांच्याजवळ सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. ते मग तुम्हा मुलांना ऐकवतात. हा तर निश्चय आहे - निश्चय असून देखील तरीही बाबांना विसरून जातात. बाबांची आठवण, हेच अभ्यासाचे सार आहे. आठवणीच्या यात्रेने कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, यामध्येच मायेची विघ्न पडतात. अभ्यासामध्ये इतकी विघ्न येत नाहीत. आता शंकरासाठी म्हणतात, शंकर डोळा उघडतो आणि विनाश होतो, हे म्हणणे देखील बरोबर नाही. बाबा म्हणतात - ना मी विनाश करवितो, ना ते करतात, हे चुकीचे आहे. देवता थोडेच पाप करतील. आता शिवबाबा बसून या गोष्टी समजावून सांगतात. हे शरीर आत्म्याचा रथ आहे. प्रत्येक आत्म्याची आपल्या रथावर स्वारी आहे. बाबा म्हणतात मी यांचे (ब्रह्मा तनाचे) लोन घेतो, म्हणून माझा दिव्य अलौकिक जन्म म्हटला जातो. आता तुमच्या बुद्धीमध्ये ८४ चे चक्र आहे. जाणता आता आपण घरी जात आहोत, मग स्वर्गामध्ये येणार. बाबा खूप सोपे करून सांगतात, यामध्ये हार्ट-फेल (निराश) व्हायचे नाही. म्हणतात - ‘बाबा, आम्ही शिकले-सवरलेले नाही आहोत. मुखातून काही शब्दच निघत नाही. परंतु असे तर होत नाही. मुख तर जरूर चालतेच. जेवण जेवता तेव्हा मुख चालते ना. वाणी निघणार नाही असे तर होऊच शकत नाही. बाबांनी खूप सोपे करून सांगितले आहे. कोणी मौनामध्ये राहतात तरीही वरच्या दिशेने इशारा करतात की त्याची आठवण करा. दुःख-हर्ता, सुख-कर्ता ते एकच दाता आहेत. भक्तिमार्गामध्ये देखील दाता आहेत तर यावेळी देखील दाता आहेत आणि मग वानप्रस्थामध्ये तर आहेच शांती. मुले देखील शांतीधाम मध्ये राहतात. पार्ट नोंदलेला आहे, जो ॲक्टमध्ये (कृतीमध्ये) येतो. आता आमचा पार्ट आहे - विश्वाला नवीन बनविणे. त्यांचे नाव खूप सुंदर आहे - ‘हेवनली गॉड फादर’. बाबा रचयिता आहेत स्वर्गाचे. बाबा नरक थोडाच रचतील. जुनी दुनिया कुणी रचते का. घर नेहमी नवीनच बनवले जाते. शिवबाबा नवीन दुनिया रचतात ब्रह्मा द्वारे. यांना पार्ट मिळालेला आहे - इथे जुन्या दुनियेमध्ये जे काही मनुष्य आहेत, सर्व एकमेकांना दुःख देत राहतात.

तुम्ही जाणता आम्ही आहोत शिवबाबांची संतान. मग शरीरधारी प्रजापिता ब्रह्माची मुले झाली दत्तकमुले. आम्हाला ज्ञान ऐकविणारे आहेत शिवबाबा रचयिता. जे आपल्या रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. तुमचे एम ऑब्जेक्टच आहे हे (लक्ष्मी-नारायण) बनणे. मनुष्य बघा किती खर्च करून मार्बल इत्यादींच्या मुर्त्या बनवतात. हे आहे ईश्वरीय विश्वविद्यालय, वर्ल्ड युनिव्हर्सिटी. साऱ्या युनिव्हर्सला चेंज केले जाते. त्यांचे जे काही आचरण आहे ते सर्व आहे आसुरी. आदि-मध्य-अंत दुःख देणारे आहेत. ही आहे ईश्वरीय युनिव्हर्सिटी. ईश्वरीय विश्वविद्यालय एकच असते, जे ईश्वर येऊन उघडतात, ज्याने साऱ्या विश्वाचे कल्याण होते. तुम्हा मुलांना आता राईट आणि रॉंग (योग्य आणि अयोग्यची) समज मिळते दुसरा कोणीही मनुष्य नाही जो समजत असेल. राईट-रॉंगला समजावून सांगणारा एकच राइटियस (नीतिमान) असतो, ज्याला ट्रुथ (सत्य) म्हणतात. बाबाच येऊन प्रत्येकाला राइटियस (नीतिमान) बनवतात. नीतिमान बनतील तर मग मुक्ती मध्ये जाऊन जीवनमुक्तीमध्ये येतील. ड्रामाला देखील तुम्ही मुलेच जाणता. आदि पासून अंतापर्यंत पार्ट बजावण्यासाठी नंबरवार येतात. हा खेळ चालूच राहतो. ड्रामा शूट होत जातो. हा एव्हर न्यू (नित्य नवा) आहे. हा ड्रामा कधीही जुना होत नाही, बाकी सर्व नाटके इत्यादी नष्ट होतात. हा बेहदचा अविनाशी ड्रामा आहे. यामध्ये सर्व अविनाशी पार्टधारी आहेत. अविनाशी खेळ किंवा मांडव बघा किती मोठा आहे. बाबा येऊन जुन्या सृष्टीला पुन्हा नवीन बनवतात. तो सर्व तुम्हाला साक्षात्कार होईल. जितके जवळ याल तितका मग तुम्हाला आनंद होईल. साक्षात्कार कराल. म्हणाल आता पार्ट पूर्ण झाला. ड्रामाला पुन्हा रिपीट करायचे आहे. पुन्हा नव्याने पार्ट बजावणार, जो कल्पा पूर्वी बजावला आहे. यामध्ये थोडासुद्धा फरक होऊ शकत नाही. म्हणून जितके होऊ शकेल तुम्हा मुलांना उच्च पद मिळवायचे आहे. पुरुषार्थ करायचा आहे, गोंधळून जायचे नाही. ड्रामाला जे करायचे असेल ते करवून घेईल - असे म्हणणे देखील चुकीचे आहे. आम्हाला तर पुरुषार्थ करायचाच आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अभ्यासाचे सार बुद्धीमध्ये ठेवून आठवणीच्या यात्रेने कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. श्रेष्ठ, पूजनीय बनण्याकरिता बाबांचे संपूर्ण मदतगार बनायचे आहे.

२) सत्य बाबांद्वारे राईट-रॉंग ची जी समज मिळाली आहे, त्याद्वारे राइटियस (नीतिमान) बनून जीवन बंधातून मुक्त व्हायचे आहे. मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वारसा घ्यायचा आहे.

वरदान:-
आपसामध्ये स्नेहाच्या देवाण-घेवाणी द्वारे सर्वांना सहयोगी बनविणारे सफलता मूर्त भव

आता ज्ञान देणे आणि घेण्याची स्टेज पास केली, आता स्नेहाची देवाण-घेवाण करा. जो कोणी समोर येईल, संबंधामध्ये येईल तर स्नेह द्यायचा आणि घ्यायचा आहे - याला म्हटले जाते सर्वांचे स्नेही आणि लवली. ज्ञान दान अज्ञानींना करायचे आहे परंतु ब्राह्मण परिवारामध्ये या दानाचे महादानी बना. संकल्पामध्ये देखील कोणा प्रती स्नेहाशिवाय दुसरी कोणतीही उत्पत्ती होऊ नये. जेव्हा सर्वांप्रती स्नेह होतो तेव्हा स्नेहाचा प्रतिसाद सहयोग असतो आणि सहयोगाचा रिझल्ट सफलता प्राप्त होते.

बोधवाक्य:-
एका सेकंदामध्ये व्यर्थ संकल्पांवर फुल स्टॉप लावा - हाच तीव्र पुरुषार्थ आहे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-

आजकाल मनुष्य मुक्तीलाच मोक्ष म्हणतात, ते असे समजतात की, जे मुक्ती मिळवतात ते जन्म-मरणातून सुटतात. ते लोक तर जन्म-मरणामध्ये न येणे यालाच उच्च पद समजतात, तेच प्रारब्ध मानतात. आणि मग जीवनमुक्तीला समजतात - जे जीवनामध्ये राहून चांगले कर्म करतात, जसे धर्मात्मा लोक आहेत, त्यांना जीवनमुक्त समजतात. बाकी कर्मबंधनातून मुक्त होणे ते तर कोटींमध्ये कोणी विरळाच समजू शकतो, आता हे आहे त्यांचे स्वतःचे मत. परंतु आम्ही तर परमात्म्याद्वारे जाणले आहे की जोपर्यंत मनुष्य अगोदर विकारी कर्मबंधनातून मुक्त होत नाही तोपर्यंत आदि-मध्य-अंत दुःखातून सुटू शकत नाही, तर यातून सुटणे ही देखील एक स्टेज आहे. ते देखील पहिले जेव्हा ईश्वरीय ज्ञानाला धारण करतील तेव्हाच त्या स्टेजवर पोहोचू शकतात आणि त्या स्टेजवर पोहोचविणारे स्वयं परमात्मा पाहिजेत; कारण मुक्ती-जीवनमुक्ती तेच देतात, ते देखील एकाच वेळी येऊन सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती देतात. बाकी परमात्मा काही अनेक वेळा येत नाहीत आणि असेही समजू नका की परमात्माच सर्व अवतार धारण करतात. ओम् शांती.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

मनसा सेवा बेहदची सेवा आहे. जितके तुम्ही मनसाद्वारे, वाणीद्वारे स्वतः सॅम्पल (उदाहरण) बनाल, तर सॅम्पलला पाहून आपणच आकर्षित होतील. फक्त दृढ संकल्प ठेवा तर सहज सेवा होत राहील. जर वाणीसाठी वेळ नसेल तर वृत्तीद्वारे, मनसाद्वारे परिवर्तन करण्यासाठी तर वेळ आहे ना. आता सेवेशिवाय वेळ घालवायचा नाही. निरंतर योगी, निरंतर सेवाधारी बना. जर मनसा सेवा करता येत नसेल तर आपल्या संपर्काद्वारे, आपल्या चलनद्वारे (वर्तनाद्वारे) देखील सेवा करू शकता.