14-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमच्याजवळ ‘मनमनाभव’ आणि ‘मध्याजीभव’चे तीक्ष्ण बाण आहेत, याच बाणांनी तुम्ही मायेवर विजय प्राप्त करू शकता”

प्रश्न:-
मुलांना बाबांची मदत कोणत्या आधारावर मिळते? मुले बाबांचे आभार कोणत्या रूपामध्ये मानतात?

उत्तर:-
जी मुले जितकी बाबांची प्रेमाने आठवण करतात तितकी बाबांची मदत मिळते. प्रेमाने बोला. आपले कनेक्शन चांगले ठेवा, श्रीमतावर चालत रहा तर बाबा मदत करत राहतील. मुले बाबांचे आभार मानतात, ‘बाबा, तुम्ही परमधाम वरून येऊन आम्हाला पतितापासून पावन बनविता, तुमच्याकडून आम्हाला किती सुख मिळते’. प्रेमाने अश्रू देखील येतात.

ओम शांती।
मुलांना सर्वात प्रिय असतात आई आणि वडील. आणि मग आई वडिलांना मुले जास्त प्रिय वाटतात. आता बाबा, ज्यांना ‘त्वमेव माताश्च पिता’ म्हणतात. लौकिक माता-पित्याला काही कोणी असे म्हणू शकत नाही. ही महिमा आहे जरूर, परंतु कोणाची आहे - हे मात्र कोणीही जाणत नाहीत. जर जाणत असेल तर तिथे जावे आणि अजूनही बऱ्याच जणांना घेऊन जावे. परंतु ड्रामाची भावीच अशी आहे. जेव्हा ड्रामा पूर्ण होतो तेव्हाच येतात. पूर्वी थिएटरमध्ये नाटके व्हायची, जेव्हा नाटक पूर्ण होत असे तेव्हा मग सर्व ॲक्टर्स स्टेजवर येऊन उभे राहत असत. हे देखील बेहदचे मोठे नाटक आहे. हे देखील मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व आले पाहिजे - सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग. हे साऱ्या सृष्टीचे चक्र आहे. असे नाही मूलवतन, सूक्ष्मवतन मध्ये चक्र फिरते. सृष्टीचे चक्र इथेच फिरते.

गायले देखील जाते - ‘इक ओंकार सतनाम…’ ही महिमा कोणाची आहे? भले ग्रंथामधून देखील शीख लोक महिमा करतात. गुरुनानक उवाच… आता ‘एक ओंकार’ ही महिमा तर त्या एका निराकार परमात्म्याचीच आहे परंतु हे लोक परमात्म्याच्या महिमेला विसरून गुरुनानकांची महिमा करू लागतात. सद्गुरु देखील नानक यांनाच समजतात. वास्तविक साऱ्या सृष्टीवर जी काही महिमा आहे ती त्या एकाचीच आहे इतर कोणाचीच महिमा नाही आहे. आता बघा ब्रह्मामध्ये जर बाबांची प्रवेशता झाली नसती तर हे कवडी तुल्य आहेत. आता तुम्ही परमपिता परमात्म्याद्वारे कवडी तुल्य पासून हिरे तुल्य बनता. आता आहे पतित दुनिया, ब्रह्माची रात्र. पतित दुनियेमध्ये जेव्हा बाबा येतात आणि जे त्यांना ओळखतात ते त्यांच्यावर कुर्बान जातात. आजच्या दुनियेमध्ये मुले देखील आंधळी बनतात. देवता किती चांगले होते, ते आता पुनर्जन्म घेत-घेत तमोप्रधान बनले आहेत. संन्यासी देखील आधी खूप चांगले होते, पवित्र होते. भारताला मदत देत होते. भारतामध्ये जर पवित्रता नसेल तर काम चितेवर जळून जातील. सतयुगामध्ये काम कटारी असत नाही. या कलियुगामध्ये सर्वजण काम-चितेच्या काट्यांवर बसले आहेत. सतयुगामध्ये तर असे म्हणणार नाही. तिथे हे विष असतच नाही. म्हणतात ना - ‘अमृत छोड़ विष काहे को खाए’. विकारीलाच पतित म्हटले जाते. आजकाल तर मनुष्य बघा दहा-बारा मुले जन्माला घालतात. काही कायदाच राहिलेला नाही. सतयुगामध्ये जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा आधीच साक्षात्कार होतो. शरीर सोडण्यापूर्वी देखील साक्षात्कार होतो की आपण हे शरीर सोडून जाऊन लहान बाळ बनणार. आणि एकच मुलगा असतो, जास्ती नाहीत. कायद्यानुसार चालते. वृद्धी तर होणार आहे जरूर. परंतु तिथे विकार असत नाही. खूप जण विचारतात तिथे मग जन्म कसे घेतात? बोलले पाहिजे - ‘तिथे योग बलाने सर्व काम होते’. योगबलानेच आम्ही सृष्टीची राजाई घेतो. बाहूबळाने सृष्टीची राजाई मिळू शकत नाही.

बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘जर ख्रिश्चन लोक आपसामध्ये मिळाले तर साऱ्या सृष्टीचे राज्य घेऊ शकतात परंतु आपसामध्ये एकी करणार नाहीत, कायदा असे म्हणत नाही; म्हणून दोन बोके आपसात भांडतात आणि लोणी तुम्हा मुलांना मिळते. श्रीकृष्णाच्या मुखामध्ये लोणी दाखवले आहे. हे सृष्टी रुपी लोणी आहे.

बेहदचे बाबा म्हणतात - हे योगबलाचे युद्ध शास्त्रांमध्ये गायले गेले आहे, बाहूबळाचे नाही. त्यांनी मग शास्त्रांमध्ये हिंसक युद्ध दाखवले आहे. त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही. पांडव-कौरवांचे काही युद्ध नाहीये. हे अनेक धर्म ५००० वर्षांपूर्वी देखील होते, जे आपसामध्ये युद्ध करून नष्ट झाले. पांडवांनी देवी-देवता धर्माची स्थापना केली. हे आहे योगबळ, ज्यामुळे सृष्टीचे राज्य मिळते. मायाजीत-जगतजीत बनतात. सतयुगामध्ये माया रावण असत नाही. तिथे असा थोडाच रावणाचा पुतळा बनवून जाळतील. कसे-कसे पुतळे बनवतात. असा कोणताही दैत्य अथवा असूर असत नाही. हे देखील समजत नाहीत की, ५ विकार स्त्रीचे आहेत आणि ५ विकार पुरुषाचे आहेत. त्यांची मिळून दहा डोकी असलेला रावण बनवतात. जसे विष्णूला देखील ४ भुजा देतात. मनुष्य तर ही साधी गोष्ट सुद्धा समजत नाहीत. भला मोठा रावण बनवून जाळतात. मोस्ट बिलवेड मुलांना आता बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत. बाबांना मुले नेहमीच नंबरवार प्रिय वाटतात. कोणी तर मोस्ट बिलवेड (अतिप्रिय) देखील आहेत तर कोणी कमी प्रिय आहेत. जितका सिकीलधा (खूप वर्षांनी भेटलेला) मुलगा असेल तितके जास्त प्रेम असेल. इथे देखील जे सेवेवर तत्पर राहतात, दयाळू असतात, ते प्रिय वाटतात. भक्तिमार्गामध्ये दया मागतात ना! ‘परमेश्वरा दया करा’. ‘मर्सी ऑन मी (माझ्यावर दया करा)’. परंतु ड्रामाला कोणीही जाणत नाहीत. जेव्हा अति तमोप्रधान बनतात तेव्हाच बाबांचा येण्याचा प्रोग्राम आहे. असे नाही की, ईश्वर जे हवे ते करू शकतात किंवा जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकतात. जर अशी शक्ती असली असती तर इतक्या शिव्या का मिळाल्या असत्या? वनवास का भोगावा लागला असता? या गोष्टी खूप गुप्त आहेत. श्रीकृष्णाला तर शिवी मिळू शकत नाही. म्हणतात - भगवान असे करू शकत नाही! परंतु विनाश तर होणारच आहे मग वाचवण्याची तर गोष्टच नाही. सर्वांना परत घेऊन जायचे आहे. स्थापना-विनाश करवितात तर जरूर भगवान असेल ना. परमपिता परमात्मा स्थापना करतात, कशाची? मुख्य गोष्ट तुम्ही हीच विचारा की, ‘गीतेचे भगवान कोण आहेत?’ सारी दुनिया यामध्येच गोंधळून गेली आहे. त्यांनी तर मनुष्याचे नाव घातले आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना तर भगवंताव्यतिरिक्त इतर कोणीही करू शकत नाही. मग तुम्ही कसे म्हणू शकता की श्रीकृष्ण गीतेचे भगवान आहेत? विनाश आणि स्थापना करणे कोणाचे काम आहे? गीतेच्या भगवंताला विसरल्याने गीतेचेच खंडन केले आहे. ही मोठ्यात मोठी चूक आहे. दुसरे मग जगन्नाथपुरी मध्ये देवतांची खूप घाणेरडी चित्रे बनवली आहेत. घाणेरडी चित्रे ठेवण्यासाठी गव्हर्मेंटची मनाई आहे. तर यावर समजावून सांगितले पाहिजे. या मंदिरांसाठी कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी येत नाहीत. या गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात.

बघा, मुली किती प्रतिज्ञा पत्र देखील लिहितात. रक्ताने सुद्धा लिहितात. एक कहाणी देखील आहे ना - श्रीकृष्णाचे रक्त निघाले तर द्रौपदीने आपला पदर फाडून त्याला बांधला. हे प्रेम आहे ना. तुमचे प्रेम आहे शिवबाबांवर. यांचे (ब्रह्मा बाबांचे) रक्त निघू शकते, यांना दुःख होऊ शकते परंतु शिवबाबांना कधी दुःख होऊ शकत नाही कारण त्यांना स्वतःचे शरीरच नाही आहे. श्रीकृष्णाला जर काही लागले तर दुःख होईल ना. तर त्यांना मग परमात्मा कसे म्हणू शकता. बाबा म्हणतात - ‘मी तर सुख-दुःखापासून न्यारा आहे. हां, मुलांना येऊन कायमचे सुखी बनवितो’. ‘सदा शिव’ गायले जाते. सदा शिव, सुख देणारे म्हणतात - ‘माझी गोड-गोड सिकीलधी मुले जी सपूत (लायक) आहेत, ज्ञान धारण करून पवित्र राहतात, खरी योगी आणि ज्ञानी असतात, ती मला प्रिय वाटतात. लौकिक पित्याकडे देखील कोणी चांगली, कोणी वाईट मुले असतात. कोणी मग कुळाला कलंक लावणारे निघतात. खूप घाणेरडे (विकारी) बनतात. इथे देखील असेच आहे. ‘आश्चर्यवत् बच्चा बनन्ती, सुनन्ती, कथन्ती फिर फारकती देवन्ती…’ म्हणूनच निश्चय पत्र लिहून घेतले जाते. जेणेकरून तसे काही झाल्यास ते लिहिलेले समोर ठेवले जाईल. रक्ताने देखील लिहून देतात. रक्ताने लिहून प्रतिज्ञा करतात. आज-काल तर शपथ देखील घेतात. परंतु ती आहे खोटी शपथ. ईश्वराला हाजिर-नाजिर आहेत असे मानणे अर्थात हा देखील ईश्वर आहे, मी देखील ईश्वर शपथ घेतो. बाबा म्हणतात - आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये हाजिर-नाजिर असल्याचे जाणता (ईश्वर उपस्थित आहेत आणि साऱ्या घटना पहात देखील आहेत) हे जाणता. बाबा या नेत्ररूपी खिडक्यांद्वारे बघतात. हे शरीर परक्याचे आहे. लोनवर घेतले आहे. बाबा भाडेकरू आहेत. घराला उपयोगात आणले जाते ना. तर बाबा म्हणतात, ‘मी या तनाला उपयोगात आणतो’. बाबा या खिडक्यांद्वारे बघतात. हाजिर-नाजिर आहेत (उपस्थित आहेत आणि साऱ्या घटना पहात देखील आहेत). आत्मा जरूर कर्मेंद्रियांद्वारेच काम करेल ना. मी आलो आहे तर जरूर ऐकवणार ना. ऑर्गन्सचा (शरीराचा) वापर करतात तर जरूर भाडे देखील द्यावे लागेल.

तुम्ही मुले यावेळी नरकाला स्वर्ग बनविणारे आहात. तुम्ही प्रकाश देणारे, जागृत करणारे आहात. बाकीचे तर सगळे कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत. तुम्ही माता सर्वांना जागे करता, स्वर्गाचे मालक बनवता. यामध्ये मातांची संख्या जास्त आहे, म्हणून ‘वंदे मातरम्’ म्हटले जाते. भीष्म पितामह इत्यादींना देखील तुम्हीच बाण मारले होते. मनमनाभव-मध्याजीभवचा बाण किती सोपा आहे. याच बाणांनी तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता. तुम्हाला एका बाबांच्याच आठवणीमध्ये, एकाच्याच श्रीमतावर चालायचे आहे. बाबा तुम्हाला अशी श्रेष्ठ कर्म शिकवतात, ज्यामुळे २१ जन्म कधी कर्म कुटण्याची (पश्चाताप करण्याची) गरजच पडणार नाही. तुम्ही एव्हरहेल्दी-एव्हरवेल्दी (सदा निरोगी आणि सदा संपन्न) बनता. अनेकदा तुम्ही स्वर्गाचे मालक बनले आहात. राज्य घेतले आणि मग गमावले आहे. तुम्ही ब्राह्मण कुलभूषणच हिरो-हिरॉईनचा पार्ट बजावता. ड्रामामध्ये सर्वात श्रेष्ठ पार्ट तुम्हा मुलांचा आहे. तर असे श्रेष्ठ बनविणाऱ्या बाबांवर खूप प्रेम पाहिजे. बाबा, तुम्ही कमाल करता. ना ध्यानी, ना मनी, आम्हाला थोडेच माहित होते, हम सो नारायण होतो. बाबा म्हणतात - ‘तुम्ही सो नारायण अथवा सो लक्ष्मी देवी-देवता होता मग पुनर्जन्म घेत-घेत असूर बनले आहात. आता पुन्हा पुरुषार्थ करून वारसा मिळवा’. जितका जे पुरुषार्थ करतात, साक्षात्कार होत राहतो.

राजयोग एका बाबांनीच शिकवला होता. खरा-खरा सहज राजयोग तर तुम्ही आता शिकवू शकता. तुमचे कर्तव्य आहे - सर्वांना बाबांचा परिचय देणे. सर्व अनाथ बनले आहेत. या गोष्टी देखील कल्पा पूर्वीचेच कोटींमधून कोणीच समजतील. बाबांनी समजावून सांगितले आहे, साऱ्या दुनियेमध्ये महामूर्ख बघायचा असेल तर इथे बघा. बाबा ज्यांच्याकडून २१ जन्मांचा वारसा मिळतो, त्यांना देखील फारकती देतात (विभक्त होतात). याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. आता तुम्ही स्वतः ईश्वराची संतान आहात. मग देवता, क्षत्रिय, वैश्य, शुद्राची संतान बनणार. आता आसूरी संतानापासून ईश्वरीय संतान बनले आहात. बाबा परमधाम वरून येऊन पतिता पासून पावन बनवतात तर किती आभार मानले पाहिजेत. भक्ती मार्गामध्ये देखील आभार मानत राहतात. दुःखामध्ये थोडेच आभार मानतील. आता तुम्हाला किती सुख मिळते तर खूप प्रेम असले पाहिजे. आपण बाबांसोबत प्रेमाने बोललो तर का नाही ऐकणार. कनेक्शन आहे ना. पहाटे उठून बाबांसोबत गप्पा मारल्या पाहिजेत. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतःचा अनुभव सांगत राहतात - ‘मी खूप आठवण करतो. बाबांच्या आठवणीमध्ये अश्रू देखील येतात. मी काय होतो, बाबांनी काय बनवले आहे - तत्वम्. तुम्ही देखील तेच बनता’. योगमध्ये राहणाऱ्यांना बाबा मदत देखील देतात. आपणहून डोळे उघडतील. पलंग हलेल. बाबा खूप जणांना उठवतात. बेहदचे बाबा किती दया करतात. तुम्ही इथे का आले आहात? म्हणता - ‘बाबा, भविष्यामध्ये श्री नारायणाला वरण्याचे शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत अथवा लक्ष्मीला वरण्यासाठी ही परीक्षा देत आहोत’. किती वंडरफुल स्कूल आहे. किती वंडरफुल गोष्टी आहेत. मोठ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे. परंतु ‘गॉडली युनिव्हर्सिटी’ असे नाव ठेवायला देत नाहीत. एक दिवस जरूर मानतील. येत राहतील. म्हणतील खरोखर किती मोठी युनिव्हर्सिटी आहे. बाबा तर आपल्या डोळ्यांच्या पापण्यांवर बसून तुम्हाला शिकवतात. म्हणतात - तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचवणार. तर अशा बाबांसोबत किती गोष्टी केल्या पाहिजेत. मग बाबा खूप मदत करतील. ज्यांचे गळे बंद आहेत (जे इतरांना ज्ञान सांगू शकत नाहीत), त्यांचे कुलूप उघडतील. रात्री बसून आठवण केल्याने खूप आनंद होईल. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतःचा अनुभव सांगतात - ‘मी बाबांसोबत अमृतवेलेला कशा गप्पा मारतो’.

बाबा मुलांना समजावून सांगतात सावध रहा. कुळाला कलंकीत करायचे नाही. ५ विकारांचे दान देऊन परत घ्यायचे नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांचे प्रिय बनण्यासाठी दयाळू बनून सेवेवर तत्पर रहायचे आहे. सपूत (लायक), आज्ञाधारक बनून खरा योगी आणि ज्ञानी बनायचे आहे.

२) अमृतवेलेला उठून बाबांसोबत खूप गोड-गोड गोष्टी करायच्या आहेत, बाबांचे आभार मानायचे आहेत. बाबांच्या मदतीचा अनुभव करण्यासाठी मोस्ट बिलवेड बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे.

वरदान:-
सदैव उमंग-उत्साहामध्ये राहून मनामध्ये आनंदाची गाणी गाणारे अविनाशी भाग्यशाली भव

तुम्ही भाग्यशाली मुलेच अविनाशी विधीद्वारे अविनाशी सिद्धी प्राप्त करता. तुमच्या मनामध्ये सदैव ‘वाह-वाह’ची आनंदाची गाणी वाजत राहतात. वाह बाबा! वाह भाग्य! वाह गोड परिवार! वाह श्रेष्ठ संगमाचा सुंदर वेळ! प्रत्येक कर्म वाह-वाह आहे म्हणून तुम्ही अविनाशी भाग्यशाली आहात. तुमच्या मनामध्ये कधी ‘व्हाय’, ‘आय’ (‘का’, ‘मी’) असे शब्द येऊ शकत नाहीत. ‘व्हाय’ ऐवजी ‘वाह-वाह’ आणि ‘आय’ च्या ऐवजी ‘बाबा-बाबा’ हेच शब्द येतात.

बोधवाक्य:-
जो संकल्प करता त्याला अविनाशी गव्हर्मेंटचा स्टॅम्प लावा तर खंबीर रहाल.