15-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला स्वच्छ बुद्धी (निर्मळ) बनविण्यासाठी, जेव्हा स्वच्छ बनाल तेव्हाच तुम्ही देवता बनू शकाल”

प्रश्न:-
या ड्रामाचा पूर्वनियोजित प्लॅन कोणता आहे, ज्यातून बाबा सुद्धा सुटू शकत नाहीत?

उत्तर:-
प्रत्येक कल्पामध्ये बाबांना आपल्या मुलांकडे यायचेच आहे, पतित दुःखी मुलांना सुखी बनवायचेच आहे - हा ड्रामाचा प्लॅन पूर्वनियोजित आहे, या बंधनातून बाबा सुद्धा सुटू शकत नाहीत.

प्रश्न:-
शिकवणाऱ्या बाबांची मुख्य विशेषता कोणती आहे?

उत्तर:-
ते अतिशय निरहंकारी बनून पतित दुनियेमध्ये, पतित तनामध्ये येतात. बाबा या वेळी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवितात, तर तुम्ही मग द्वापरमध्ये त्यांच्यासाठी सोन्याचे मंदिर बनवता.

गीत:-
इस पाप की दुनिया से...

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी हे गाणे ऐकले की दोन दुनिया आहेत - एक पापाची दुनिया, एक पुण्याची दुनिया. दुःखाची दुनिया आणि सुखाची दुनिया. सुख जरूर नवीन दुनियेमध्ये, नवीन घरामध्ये असू शकते. जुन्या घरामध्ये दुःखच असते म्हणूनच ते मोडले जाते. मग नवीन घरामध्ये सुखात बसायचे असते. आता मुले जाणतात भगवंताला कोणीही मनुष्य मात्र जाणत नाहीत. रावण राज्य असल्यामुळे अगदी पत्थर-बुद्धी, तमो-बुद्धी झाले आहेत. बाबा येऊन समजावून सांगत आहेत - मला ईश्वर तर म्हणतात परंतु जाणत कोणीही नाही. जर भगवंतालाच जाणत नसतील तर काहीच कामाचे राहिलेले नाहीत. दुःखामध्येच हे प्रभू, हे ईश्वर असे म्हणून बोलावतात. परंतु आश्चर्य आहे, एकही मनुष्यमात्र बेहदच्या रचयिता बाबांना जाणत नाही. म्हणतात सर्वव्यापी आहे, कूर्म अवतारामध्ये, मत्स्य अवतारामध्ये परमात्मा आहे. ही तर परमात्म्याची निंदा करतात. बाबांची कीती बदनामी करतात म्हणूनच भगवानुवाच आहे - जेव्हा भारतामध्ये माझी आणि देवी-देवतांची निंदा करत-करत शिडी खाली उतरत तमोप्रधान बनतात, तेव्हा मी येतो. मुले म्हणतात तरी देखील ड्रामा अनुसार या पार्टमध्ये यावे लागेल. बाबा म्हणतात हा ड्रामा पूर्वनियोजित आहे. मी सुद्धा ड्रामाच्या बंधनामध्ये बांधील आहे. या ड्रामामधून मी देखील सुटू शकत नाही. पतितांना पावन बनविण्यासाठी मला सुद्धा यावेच लागते. नाहीतर नवीन दुनिया कोण स्थापन करणार? मुलांना रावण राज्यातील दुःखांपासून सोडवून नवीन दुनियेमध्ये कोण घेऊन जाणार? भले या जगामध्ये अशी खूप श्रीमंत माणसे आहेत, समजतात आम्ही तर स्वर्गामध्येच बसलो आहोत, धन आहे, बंगले आहेत, स्वतःची विमाने आहेत परंतु अचानक कोणी आजारी पडतात आणि बसल्याजागी मृत्यू होतो, किती दुःख होते. त्यांना (दुनियावाल्यांना) हे माहीतच नाही की, सतयुगामध्ये कधी अकाली मृत्यू होत नाही, दुःखाची गोष्टच नाही. तिथे आयुष्यमान देखील मोठे असते. इथे तर अचानक मृत्यूमुखी पडतात. सतयुगामध्ये अशा गोष्टी होत नाहीत. तिथे काय होते? हे देखील कोणी जाणत नाहीत म्हणूनच बाबा म्हणतात किती तुच्छ-बुद्धी (बुद्धिहीन) आहेत. मी येऊन यांना स्वच्छ-बुद्धी बनवतो. रावण पत्थर-बुद्धी, तुच्छ-बुद्धी बनवतो. भगवान आपल्याला स्वच्छ-बुद्धी बनवत आहेत. बाबा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहेत. सर्व मुले म्हणतात सूर्यवंशी महाराजा-महाराणी बनण्यासाठी आलो आहोत. एम ऑब्जेक्ट समोर आहे. नरा पासून नारायण बनायचे आहे. ही आहे सत्यनारायणाची कथा. मग भक्तीमध्ये ब्राह्मण कथा ऐकवत राहतात. खरेच असे कोणी नरापासून नारायण बनतात थोडेच. तुम्ही तर खरोखर नरापासून नारायण बनण्यासाठी आले आहात. काहीजण विचारतात तुमच्या संस्थेचे उद्दिष्ट काय आहे? सांगा - नरापासून नारायण बनणे - हे आमचे उद्दिष्ट आहे. परंतु ही काही संस्था नाही आहे. हा तर परिवार आहे. आई, वडील आणि मुले बसली आहेत. भक्तिमार्गामध्ये तर गात होता - ‘तुम मात-पिता…’ हे मात-पिता जेव्हा तुम्ही येता तेव्हा आम्ही तुमच्याकडून भरभरून सुख घेतो, आम्ही विश्वाचे मालक बनतो. आता तुम्ही विश्वाचे मालक बनता ना, ते देखील स्वर्गाचे मालक. आता अशा बाबांना पाहिल्यावर आनंदाचा पारा किती चढला पाहिजे. ज्यांची अर्धाकल्प आठवण केली - हे ईश्वरा या, तुम्ही याल तेव्हा आम्हाला तुमच्याकडून खूप सुख मिळेल. हे बेहदचे बाबा तर बेहदचा वारसा देत आहेत, तो देखील २१ जन्मांसाठी. बाबा म्हणतात - मी तुम्हाला दैवी संप्रदायी बनवितो, रावण आसुरी संप्रदायी बनवतो. मी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो. तिथे (सतयुगामध्ये) पवित्रतेमुळे आयुष्य देखील मोठे असते. इथे आहेत भोगी, अचानक मृत्यु होत राहतात. तिथे योगाद्वारे वारसा मिळालेला असतो. आयुष्य देखील १५० वर्षे असते. आपल्या ठरलेल्या वेळेवर एक शरीर सोडून दुसरे घेतात. तर हे ज्ञान बाबाच बसून देतात. भक्त भगवंताला शोधत असतात, समजतात की शास्त्र पठण करणे, तीर्थयात्रा इत्यादी करणे - हे सर्व भगवंताला भेटण्याचे मार्ग आहेत. बाबा म्हणतात - असे काही मार्गच नाहीत. मार्ग तर मीच सांगणार. तुम्ही तर म्हणत होता - हे प्रभू आंधळ्याची काठी या, आम्हाला शांतीधाम-सुखधाम मध्ये घेऊन चला. तर बाबाच सुखधामचा रस्ता सांगतात. बाबा कधीही दुःख देत नाहीत. हे तर बाबांवर खोटे आरोप करतात. कोणी मेले तर ईश्वराला भलेबुरे बोलू लागतात. बाबा म्हणतात - मी थोडेच कोणाला मारतो किंवा दुःख देतो. हा तर प्रत्येकाचा आपापला पार्ट आहे. मी जे राज्य स्थापन करतो, तिथे कधी अकाली मृत्यू, दुःख इत्यादी असतही नाही. मी तुम्हाला सुखधाममध्ये घेऊन जातो. मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहायला हवेत. ओहो, बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत. मनुष्यांना हे माहित नाही आहे की, संगमयुगालाच पुरुषोत्तम युग म्हटले जाते. भक्तीमार्गामध्ये भक्तांनी मग पुरुषोत्तम मास इत्यादी बनवले आहेत. वास्तविक आहे पुरुषोत्तम युग, जेव्हा बाबा येऊन उच्च ते उच्च बनवतात. आता तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. सर्वात उच्च ते उच्च पुरुषोत्तम, लक्ष्मी-नारायणच आहेत. मनुष्य तर काहीच समजत नाहीत. चढत्या कलेमध्ये (उन्नतीमध्ये) घेऊन जाणारे एक बाबाच आहेत. शिडीच्या चित्रावर समजावून सांगणे खूप सोपे आहे. बाबा म्हणतात - ‘आता खेळ पूर्ण झाला, घरी चला’. आता हे जुने घाणेरडे वस्त्र (पतित शरीर) सोडायचे आहे. तुम्ही आधी नवीन दुनियेमध्ये सतोप्रधान होता मग ८४ जन्म भोगून तमोप्रधान शूद्र बनले आहात. आता पुन्हा शूद्रापासून ब्राह्मण बनले आहात. आता बाबा आले आहेत भक्तीचे फळ देण्यासाठी. बाबांनी सतयुगामध्ये प्रारब्ध दिले होते. बाबा आहेतच सुखदाता. पतित-पावन बाबा येतात तेव्हा संपूर्ण दुनियेतील मनुष्य मात्रच काय परंतु प्रकृतीलासुद्धा सतोप्रधान बनवतात. आता तर प्रकृती सुद्धा तमोप्रधान आहे. धान्य इत्यादी मिळतच नाही, ते समजतात आम्ही हे-हे करतो, तर पुढील वर्षी भरपूर पिक होईल. परंतु काहीही होत नाही. नैसर्गिक आपत्तींना कोणी काय करू शकणार! दुष्काळ पडेल, धरणीकंप होईल, रोगराई येईल. रक्ताच्या नद्या वाहतील. ही तीच महाभारत लढाई आहे. आता बाबा म्हणतात - तुम्ही आपला वारसा घ्या. मी तुम्हा मुलांना स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आलो आहे. माया रावण शाप देते, नरकाचा वारसा देते. हा खेळ देखील पूर्वनियोजित आहे. बाबा म्हणतात ड्रामा अनुसार मी देखील शिवालय स्थापन करतो. हा भारत शिवालय होता, आता वेश्यालय झाला आहे. विषय सागरामध्ये गोते खात राहतात.

आता तुम्ही मुले जाणता बाबा आम्हाला शिवालयामध्ये घेऊन जात आहेत तर तो आनंद झाला पाहिजे ना. आम्हाला बेहदचे भगवंत शिकवत आहेत. बाबा म्हणतात - मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. भारतवासी तर आपल्या धर्मालाच जाणत नाहीत. आमचे कुळ तर सर्वात मोठे कुळ आहे ज्यापासून अनेक जाती निर्माण होतात. आदि सनातन कोणता धर्म होता, कोणते कुळ होते - हेच समजत नाहीत. आदि सनातन देवी-देवता धर्माचे कुळ, त्यानंतर मग दुसऱ्या नंबरवर चंद्रवंशी कुळ, मग इस्लाम वंशाचे कुळ. या संपूर्ण झाडाचे रहस्य दुसरे कोणीही सांगू शकत नाही. आता तर पहा किती जाती-धर्म आहेत. शाखा-उपशाखा किती आहेत. हे आहे विविध धर्मांचे झाड, या सर्व गोष्टी बाबाच येऊन बुद्धीमध्ये टाकतात. हे शिक्षण आहे, याचा तर दररोज अभ्यास केला पाहिजे. भगवानुवाच - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. पतित राजा तर विनाशी धन-दान करून तर बनू शकतात. मी तुम्हाला असे पावन बनवितो ज्यामुळे तुम्ही २१ जन्मांसाठी विश्वाचे मालक बनता. तिथे (सतयुगामध्ये) कधीही अकाली मृत्यू होत नाही. नियोजित वेळेवरच शरीर सोडतात. तुम्हा मुलांना ड्रामाचे रहस्य देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. हे चित्रपट, नाटके इत्यादी निघाली आहेत त्याच्या आधारे हे समजावून सांगणे सुद्धा सोपे होते. आजकाल तर भरपूर ड्रामा (नाटके) इत्यादी बनवतात. लोकांना खूप छंद जडला आहे. ते सर्व आहेत हदचे ड्रामा, हा आहे बेहदचा ड्रामा. या समयी मायेची प्रलोभने तर खूप आहेत. मनुष्य समजतात की आता तर स्वर्ग बनला आहे. अगोदर थोड्याच एवढ्या मोठ्या इमारती इत्यादी होत्या. तर किती विरोध केला जात आहे. भगवान स्वर्ग रचतात तर माया देखील आपला स्वर्ग दाखवते. हा सर्व आहे मायेचा भपका. याचे पतन तर होणारच आहे माया किती बलवान आहे. तुम्हाला त्यापासून दूर रहायचे आहे. बाबा आहेतच गरीब निवाज. श्रीमंतांसाठी स्वर्ग आहे, गरीब बिचारे नरकामध्ये आहेत. तर आता नरकवासींना स्वर्गवासी बनवायचे आहे. गरीबच वारसा घेतील, श्रीमंत लोक तर समजतात आम्ही आता स्वर्गातच बसलो आहोत. स्वर्ग-नरक इथेच आहेत. या सर्व गोष्टी आता तुम्हाला समजल्या आहेत. भारत किती भिकारी बनला आहे. भारतच किती श्रीमंत होता. एकच आदि सनातन धर्म होता. आता देखील किती पुरातन वस्तू खोदून बाहेर काढतात. म्हणतात इतक्या वर्षांची पुरातन वस्तू आहे. हाडांचे अवशेष काढतात आणि म्हणतात - कितीतरी लाखो वर्षां पूर्वीचे आहेत. आता लाखो वर्षांची हाडे कुठून बरे बाहेर येणार. त्याची किंमत देखील किती ठेवतात.

बाबा समजावून सांगत आहेत मी येऊन सर्वांची सद्गती करतो, यांच्यामध्ये (ब्रह्मातनामध्ये) प्रवेश करून येतो. हे ब्रह्मा साकारी आहेत, हेच नंतर मग सूक्ष्मवतनवासी फरिश्ता बनतात. ते अव्यक्त, हे व्यक्त. बाबा म्हणतात मी अनेक जन्मांच्या अंतिम जन्माच्या सुद्धा अंताला येतो, जो नंबरवन पावन तोच मग नंबरवन पतित. मी यांच्यामध्ये येतो कारण यांनाच मग नंबरवन पावन बनायचे आहे. हे (ब्रह्माबाबा) स्वतःला कुठे म्हणतात की मी भगवान आहे, अमका आहे. बाबा देखील समजतात मी यांच्या तनामध्ये प्रवेश करून यांच्याद्वारे सर्वांना सतोप्रधान बनवतो. आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - तुम्ही अशरीरी आला होता मग ८४ जन्म घेऊन पार्ट बजावलात, आता परत जायचे आहे. स्वतःला आत्मा समजा, देह अभिमान सोडा. फक्त आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे दुसरा काहीही त्रास नाही. जे पवित्र बनतील, ज्ञान ऐकतील तेच विश्वाचे मालक बनतील. किती मोठी शाळा आहे. शिकवणारे बाबा किती निरहंकारी बनून पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये येतात. भक्तिमार्गामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी किती सुंदर सोन्याचे मंदिर बनवता. या समयी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो त्यासाठी पतित शरीरामध्ये येऊन बसतो. मग भक्तीमार्गामध्ये तुम्ही मला सोमनाथ मंदिरामध्ये बसवता. सोन्या-हिऱ्यांचे मंदिर बनवता कारण तुम्ही जाणता हे आम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात म्हणून खातिरदारी करतात. हे सारे रहस्य बाबांनी सांगितले आहे. भक्ती सुरुवातीला अव्यभिचारी नंतर व्यभिचारी होते. आजकाल पहा मनुष्यांची सुद्धा पूजा करत असतात. गंगातीरी पहा शिवोहम् म्हणत बसून असतात. माता जाऊन दूध अर्पण करतात, पूजा करतात. या दादाने (ब्रह्मा बाबांनी) स्वतः सुद्धा केले आहे, एक नंबरचा पुजारी बनला आहे ना. आश्चर्य आहे ना. बाबा म्हणतात ही वंडरफुल दुनिया आहे. स्वर्ग कसा बनतो, नरक कसा बनतो - हे सर्व रहस्य मुलांना समजावून सांगत असतात. हे ज्ञान काही शास्त्रांमध्ये तर नाही आहे. ती आहेत फिलॉसॉफीची (तत्वज्ञानाची) शास्त्रे. हे आहे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान) जे रुहानी बाबांशिवाय किंवा तुम्हा ब्राह्मणांशिवाय कोणी देऊ शकत नाही. आणि तुम्हा ब्राह्मणांशिवाय हे रुहानी ज्ञान दुसऱ्या कोणाला मिळू शकत नाही. जोपर्यंत ब्राह्मण बनत नाही तोपर्यंत देवता बनू शकत नाही. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे की, स्वयं भगवंत आम्हाला शिकवत आहेत, श्रीकृष्ण नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मायेचे खूप मोठे प्रलोभन आहे, त्यापासून आपले तोंड फिरवायचे आहे. सदैव याच आनंदाने रोमांच उभे रहावेत की आम्ही तर आता पुरुषोत्तम बनत आहोत, स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत.

२) विश्वाचे राज्य-भाग्य प्राप्त करण्यासाठी फक्त पवित्र बनायचे आहे. जसे बाबा निरहंकारी बनून पतित दुनियेमध्ये, पतित तनामध्ये येतात, तसेच बाप समान निरहंकारी बनून सेवा करायची आहे.

वरदान:-
एकासोबतच सर्व नाती निभावणारे सर्व किनाऱ्यांपासून (आधारांपासून) मुक्त संपूर्ण फरिश्ता भव

जसे एखादा पदार्थ बनवतात आणि जेव्हा तो बनून तयार होतो तेव्हा काठ सोडून देतो, असेच जितके संपन्न स्थितीच्या जवळ येत जाल तितके सर्वांपासून दूर होत जाल. जेव्हा सर्व बंधनांपासून वृत्तीने दूर जाल अर्थात कशातही मोह राहणार नाही तेव्हाच संपूर्ण फरिश्ता बनाल. एकासोबतच सर्व नाती निभावणे - हेच अंतिम ध्येय आहे, यामुळेच अंतिम फरिश्ता जीवनाचे ध्येय समीप अनुभव कराल. बुद्धीचे भटकणे बंद होईल.

बोधवाक्य:-
स्नेह असा चुंबक आहे जो निंदा करणाऱ्याला देखील जवळ घेऊन येतो.

आपल्या शक्तिशाली मनसा शक्ती द्वारा सकाश देण्याची सेवा करा:-

मन्सा सेवेसाठी मन, बुद्धी व्यर्थ विचारांपासून मुक्त असायला हवी. मनमनाभव च्या मंत्राचे सहज स्वरूप असले पाहिजे. ज्या श्रेष्ठ आत्म्यांची श्रेष्ठ मन्सा अर्थात संकल्प शक्तिशाली आहेत, शुभ-भावना, शुभ-कामनावाले आहेत ते मन्साद्वारा शक्तींचे दान देऊ शकतात.