15-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हाला दैवी धर्म आणि श्रेष्ठ धर्म शिकवत आहेत त्यामुळे तुमच्याकडून कोणतेही आसुरी कर्म होता कामा नयेत, बुद्धी अतिशय शुद्ध पाहिजे”

प्रश्न:-
देह-अभिमानामध्ये आल्याने पहिले पाप कोणते होते?

उत्तर:-
जर देह-अभिमान असेल तर बाबांच्या आठवणी ऐवजी देहधारीची आठवण येईल, कु-दृष्टी जात राहील, वाईट विचार येतील. हे खूप मोठे पाप आहे. समजले पाहिजे, माया वार करत आहे. ताबडतोब सावध झाले पाहिजे.

ओम शांती।
रूहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. रूहानी बाबा कुठून आले आहेत? रूहानी दुनियेमधून. ज्याला निर्वाणधाम अथवा शांतीधाम देखील म्हणतात. ही तर आहे गीतेची गोष्ट. तुम्हाला जेव्हा विचारतात की, ‘हे ज्ञान कुठून आले?’ बोला, हे तर तेच गीतेचे ज्ञान आहे. गीतेचा पार्ट चालू आहे आणि बाबा शिकवत आहेत. भगवानुवाच आहे ना आणि भगवान तर एकच आहे. ते आहेत शांतीचा सागर. राहतात देखील शांतिधाममध्ये, जिथे आपण देखील राहतो. बाबा समजावून सांगतात की, ही आहेच पतित दुनिया, पाप आत्म्यांची तमोप्रधान दुनिया. तुम्ही देखील जाणता बरोबर आपण आत्मे यावेळी तमोप्रधान आहोत. ८४ चे चक्र फिरवून सतोप्रधानापासून आता तमोप्रधानतेमध्ये आलो आहोत. ही जुनी अथवा कलियुगी दुनिया आहे ना. ही सर्व नावे यावेळचीच आहेत. जुन्या दुनियेनंतर मग पुन्हा नवीन दुनिया होते. भारतवासी हे देखील जाणतात की महाभारत लढाई देखील तेव्हा लागली होती जेव्हा दुनिया बदलणार होती, तेव्हाच बाबांनी येऊन राजयोग शिकवला होता. फक्त काय चूक झाली आहे? एक तर कल्पाची आयु विसरले आहेत आणि गीतेच्या भगवंताला देखील विसरले आहेत. श्रीकृष्णाला काही गॉडफादर म्हणू शकत नाही. आत्मा म्हणते गॉडफादर, मग ते निराकार झाले ना. निराकार बाबा आत्म्यांना म्हणतात की, माझी आठवण करा. मी आहेच पतित-पावन, मला बोलावतात देखील - हे पतित-पावन. श्रीकृष्ण तर देहधारी आहे ना. मला तर कोणते शरीर नाही आहे. मी निराकार आहे, मनुष्यांचा पिता नाही, आत्म्यांचा पिता आहे. हे तर पक्के केले पाहिजे. आपण आत्मे वारंवार या बाबांकडून वारसा घेतो. आता ८४ जन्म पूर्ण झाले आहेत, बाबा आलेले आहेत. ‘बाबा-बाबा’च करत रहायचे आहे. बाबांची खुप आठवण करायची आहे. सारे कल्प देहधारी पित्याची आठवण केली. आता बाबा आलेले आहेत आणि मनुष्य सृष्टीमधून सर्व आत्म्यांना परत घेऊन जातात कारण रावण राज्यामध्ये मनुष्यांची दुर्गती झाली आहे म्हणून आता बाबांची आठवण करायची आहे. हे देखील कोणी मनुष्य समजत नाही की आता रावण राज्य आहे. रावणाचा अर्थ देखील समजत नाहीत. बस एक रिवाज झाला आहे दसरा साजरा करण्याचा. तुम्हाला थोडाच काही अर्थ कळत होता. आता समज मिळाली आहे (ज्ञान मिळाले आहे) इतरांना ज्ञान देण्यासाठी. जर इतरांना समजावून सांगू शकत नसाल तर याचा अर्थ स्वतःलाच समजलेले नाही आहे. बाबांमध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान आहे. आपण त्यांची मुले आहोत तर मुलांमध्ये देखील हे नॉलेज असले पाहिजे.

तुमची ही आहे गीता पाठशाळा. उद्देश काय आहे? हे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. हा राजयोग आहे ना. नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनण्याचे हे नॉलेज आहे. ते लोक बसून कथा ऐकवतात. इथे तर आपण शिकतो, आपल्याला बाबा राजयोग शिकवतात. हे शिकवतातच कल्पाच्या संगमयुगावर. बाबा म्हणतात - मी जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया बनविण्यासाठी आलो आहे. नवीन दुनियेमध्ये यांचे राज्य होते, जुन्या दुनियेमध्ये नाही, पुन्हा जरूर झाले पाहिजे. चक्राला जाणले आहे. मुख्य धर्म आहेत चार. आता डिटीज्म (देवी-देवता धर्म) नाही आहे. दैवी धर्म भ्रष्ट आणि दैवी कर्म भ्रष्ट बनले आहेत. आता पुन्हा तुम्हाला श्रेष्ठ दैवी धर्म आणि श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत. तर स्वतःवर लक्ष ठेवायचे आहे, आपल्याकडून कोणती आसुरी कर्म तर होत नाहीत ना? मायेमुळे कोणते खराब विचार तर बुद्धीमध्ये येत नाहीत ना? कु-दृष्टी तर नाही ना? जेव्हा बघाल, यांची कु-दृष्टी जाते आहे अथवा वाईट विचार येत असतील तर त्यांना लगेच सावध केले पाहिजे. त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देता कामा नये. त्यांना सावधान केले पाहिजे - तुमच्यामध्ये मायेची प्रवेशता झाल्यामुळे हे वाईट विचार येत आहेत. योगामध्ये बसून बाबांच्या आठवणी ऐवजी कोणाच्या देहाकडे विचार जात असेल तर समजले पाहिजे हा मायेचा वार होत आहे, मी पाप करत आहे. यामध्ये तर बुद्धी अतिशय शुद्ध असली पाहिजे. चेष्टा-मस्करी केल्याने देखील खूप नुकसान होते त्यामुळे तुमच्या मुखावाटे सदैव शुद्ध वचने निघाली पाहिजेत, कु-वचन नाही. चेष्टा-मस्करी इत्यादी सुद्धा नाही. असे नाही की, आम्ही तर चेष्टा केली… ती देखील नुकसानकारक होते. चेष्टा देखील अशी करता कामा नये ज्यामध्ये विकारांचा वास असेल. अतिशय सावध रहायचे आहे. तुम्हाला माहित आहे नागा लोक आहेत त्यांचे विचार विकारांकडे जात नाहीत. राहतात देखील वेगळे. परंतु कर्मेंद्रियांची चंचलता योगा शिवाय कधीही जात नाही. काम शत्रू असा आहे जो कोणालाही बघितले, आणि जर पूर्णतः योगामध्ये नसाल तर चंचलता जरूर होईल. आपले परीक्षण करायचे असते. बाबांच्या आठवणीमध्येच रहा तर असा कोणत्याही प्रकारचा रोग राहणार नाही. योगामध्ये राहिल्याने असे होत नाही. सतयुगामध्ये तर कोणत्याही प्रकारची घाण (विकार) नसतात. तिथे रावणाची चंचलताच नाहीये ज्यामुळे विचलित होतील. तिथे तर योगी जीवन असते. इथे देखील अवस्था अतिशय मजबूत पाहिजे. योगबलाने हे सर्व रोग संपुष्टात येतात. यामध्ये खूप मेहनत आहे. राज्य घेणे काही मावशीचे घर नाहीये. पुरुषार्थ तर करायचा आहे ना. असे नाही की बस जे भाग्यामध्ये असेल ते मिळेल. धारणाच करत नाहीत म्हणजे पै-पैशाचे पद मिळविण्याच्या लायक आहेत. सब्जेक्ट तर खूप असतात ना. कोणी ड्रॉइंगमध्ये, कोणी खेळामध्ये मार्क्स घेतात. ते आहेत कॉमन सब्जेक्ट. तसेच इथे देखील सब्जेक्ट आहेत. काही ना काही मिळणार. बाकी बादशाही मिळू शकणार नाही. ते तर जेव्हा सेवा कराल तेव्हाच बादशाही मिळेल. त्यासाठी खूप मेहनत पाहिजे. बऱ्याच जणांच्या बुद्धीमध्येच येत नाही. जणूकाही खाल्लेले पचतच नाही. उच्च पद मिळवण्याची हिंमत नाही, याला देखील रोग म्हणणार ना. तुम्ही कोणतीही गोष्ट दिसत असताना बघू नका. रुहानी बाबांच्या आठवणीमध्ये राहून इतरांना रस्ता सांगायचा आहे, आंधळ्यांची काठी बनायचे आहे. तुम्ही तर रस्ता जाणता ना. रचयिता आणि रचनेचे ज्ञान, मुक्ती आणि जीवनमुक्तीचे ज्ञान तुमच्यापैकी जे महारथी आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये फिरत राहते. मुलांच्या अवस्थेमध्ये देखील रात्रं-दिवसाचा फरक असतो. कुठे खूप श्रीमंत बनतात, कुठे एकदम गरीब. राज्यपदामध्ये फरक तर आहे ना. बाकी होय, तिथे रावण नसल्यामुळे दुःख होत नाही. बाकी संपत्तीमध्ये तर फरक आहे. संपत्तीमुळे सुख मिळते.

जितके योगामध्ये रहाल तितकी हेल्थ खूप चांगली मिळेल. मेहनत करायची आहे. खूप जणांचे वर्तन तर असे असते जसे अज्ञानी लोकांचे असते. तर ते कोणाचे कल्याण करू शकणार नाहीत. जेव्हा परीक्षा होते तेव्हा समजते की कोण किती मार्कांनी पास होतील, मग त्यावेळी हाय-हाय करावे लागेल. बापदादा दोघेही किती समजावून सांगत राहतात. बाबा आलेच आहेत कल्याण करण्यासाठी. आपले देखील कल्याण करायचे आहे तर दुसऱ्यांचे देखील करायचे आहे. बाबांना बोलावले देखील आहे की, ‘येऊन आम्हा पतितांना पावन होण्याचा रस्ता सांगा’. तर बाबा श्रीमत देतात - ‘तुम्ही स्वतःला आत्मा समजून देह-अभिमान सोडून माझी आठवण करा’. किती सोपे औषध आहे. बोला, आम्ही फक्त एक भगवान बाबांना मानतो. ते बाबा म्हणतात - ‘मला बोलावता की, येऊन पतितांना पावन बनवा, तर मला यावे लागते’. ब्रह्मांकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही. ते तर दादा आहेत, बाबासुद्धा नाहीत. बाबांकडून तर वारसा मिळतो. ब्रह्मा कडून वारसा थोडाच मिळतो. निराकार बाबा, यांच्याद्वारे (ब्रह्माद्वारे) ॲडॉप्ट करून आम्हा आत्म्यांना शिकवतात, यांना देखील शिकवतात. ब्रह्मांकडून तर काहीही मिळणार नाही. यांच्याद्वारे वारसा तर बाबांकडूनच मिळतो. देणारा एक आहे. त्यांचीच महिमा आहे. तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. हे (ब्रह्मा बाबा) तर पूज्य पासून मग पुजारी बनतात. सतयुगामध्ये होते, मग ८४ जन्म भोगून आता पतित बनले आहेत आता पुन्हा पूज्य पावन बनत आहेत. आपण बाबांकडून ऐकत आहोत. कोणा मनुष्याकडून ऐकत नाही. मनुष्यांचा आहेच भक्तिमार्ग. हा आहे रूहानी ज्ञानमार्ग. ज्ञान केवळ एका ज्ञानसागर बाबांकडेच आहे. बाकी ही शास्त्रे इत्यादी सर्व भक्तीमार्गाची आहेत. शास्त्र इत्यादी वाचणे - हा सर्व आहे भक्ती मार्ग. ज्ञानसागर तर एक बाबाच आहेत, आपण ज्ञान नद्या ज्ञानसागरातून निघालेल्या आहोत. बाकी तो आहे पाण्याचा सागर आणि नद्या. या सर्व गोष्टी मुलांच्या लक्षात राहिल्या पाहिजेत. अंतर्मुखी होऊन डोके चालवले पाहिजे. स्वतःला सुधारण्यासाठी अंतर्मुखी होऊन स्वतःचे परीक्षण करा. जर मुखावाटे कोणते कु-वचन निघाले किंवा कु-दृष्टी गेली तर स्वतःला फटकारले पाहिजे की, माझ्या मुखातून कु-वचन का निघाले, माझी कु-दृष्टी का गेली? स्वतःला थोबाडीत सुद्धा मारले पाहिजे, वारंवार सावध केले पाहिजे तेव्हाच उच्च पद मिळवू शकाल. मुखावाटे कटू वचन निघू नयेत. बाबांना तर सर्व प्रकारची शिकवण द्यावे लागते. कुणाला वेडा म्हणणे हे देखील कु-वचन आहे.

मनुष्य तर कोणालाही जे येते ते बोलत राहतात. जाणत तर काहीच नाहीत की, आपण कोणाची महिमा गात आहोत. महिमा नंतर केली पाहिजे एकाच पतित-पावन बाबांची. आणखी तर कोणी नाही आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील पतित-पावन म्हटले जात नाही; हे काही कोणाला पावन बनवत नाहीत. पतितापासून पावन बनविणारे तर एक बाबाच आहेत. पावन सृष्टी आहेच नवीन दुनिया. ती तर आता नाही आहे. प्युरिटी (पवित्रता) आहेच स्वर्गामध्ये. पवित्रतेचे सागर देखील आहेत. हे तर आहेच रावण राज्य. मुलांना आता आत्म-अभिमानी बनण्याची खूप मेहनत केली पाहिजे. मुखावाटे कोणतेही दगड अथवा कु-वचन निघता कामा नये. अतिशय प्रेमाने चालायचे आहे. कु-दृष्टी देखील खूप नुकसान करते. खूप मेहनत केली पाहिजे. आत्म-अभिमान आहे अविनाशी अभिमान. देह तर विनाशी आहे. आत्म्याला कोणीच जाणत नाहीत. आत्म्याचा देखील पिता तर जरूर कोणी असेल ना. म्हणतात देखील - ‘आपण सर्व बांधव आहोत’. तर मग सर्वांमध्ये परमात्मा पिता कसे विराजमान असू शकतील? सगळेच पिता कसे असू शकतात? एवढी सुद्धा अक्कल नाही! सर्वांचा पिता तर एकच आहेत, त्यांच्याकडूनच वारसा मिळतो. त्यांचे नावच आहे शिव. शिवरात्री देखील साजरी करतात. ‘रुद्र-रात्री’ अथवा ‘श्रीकृष्ण-रात्री’ असे कधी म्हणत नाहीत. मनुष्य तर काहीच समजत नाहीत, म्हणतील की, ही सर्व त्यांची रूपे आहेत, त्यांचीच लीला आहे.

तुम्ही आता समजता बेहदच्या बाबांकडून तर बेहदचा वारसा मिळतो तर मग त्या बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. लेबर्सना देखील ज्ञान दिले पाहिजे ज्यामुळे त्यांचे देखील काही कल्याण होईल. परंतु स्वतःच आठवण करू शकत नाहीत तर दुसऱ्यांना काय आठवण करून देतील. रावण एकदम पतित बनवतो मग बाबा येऊन परीस्तानी बनवतात. आश्चर्य आहे ना. कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी नाही आहेत. लक्ष्मी-नारायण किती उच्च परिस्तान पासून मग किती पतित बनतात म्हणूनच ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र गायली गेली आहे. शिवाच्या मंदिरामध्ये तुम्ही खूप सेवा करू शकता. बाबा म्हणतात तुम्ही माझी आठवण करा. दारोदार भटकणे सोडून द्या. हे ज्ञानच आहे शांतीसाठी. बाबांची आठवण केल्याने तुम्ही सतोप्रधान बनाल. बस हाच मंत्र देत रहा. कोणाकडूनही पैसे घेता कामा नयेत, जोपर्यंत ते पक्के होत नाहीत. बोला प्रतिज्ञा करा की आम्ही पवित्र राहणार, तेव्हाच आम्ही तुमच्या हातचे खाऊ शकतो, काहीही घेऊ शकतो. भारतामध्ये मंदिरे तर पुष्कळ आहेत. फॉरेनर्स इत्यादी जे कोणी येतील त्यांना हा संदेश तुम्ही देऊ शकता की, ‘बाबांची आठवण करा’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कधीही अशी चेष्टा-मस्करी करायची नाही ज्यामध्ये विकारांची हवा असेल. स्वतःला खूप सावध ठेवायचे आहे, मुखावाटे कटूवचन काढायची नाहीत.

२) आत्म-अभिमानी बनण्याची खूप-खूप प्रॅक्टिस करायची आहे. सर्वांसोबत प्रेमाने चालायचे आहे. कु-दृष्टी ठेवायची नाही. कु-दृष्टी गेली तर आपणच आपल्याला दंड करायचा आहे.

वरदान:-
निरंतर आठवण आणि सेवा यांच्या बॅलन्सद्वारे बालपणाच्या नखऱ्यांना समाप्त करणारे वानप्रस्थी भव

छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये संगमाच्या अमूल्य वेळेला वाया घालवणे म्हणजे बालपणीचे नखरे आहेत. आता हे नखरे शोभत नाहीत, वानप्रस्थीमध्ये केवळ एकच कार्य राहते - बाबांची आठवण आणि सेवा. याशिवाय इतर कशाचीही आठवण येऊ नये, उठाल तरीही आठवण आणि सेवा, झोपाल तरी देखील आठवण आणि सेवा - हा बॅलन्स निरंतर टिकून रहावा. त्रिकालदर्शी बनून बालपणीच्या गोष्टी अथवा बालपणीच्या संस्कारांचा समाप्ती समारोह साजरा करा, तेव्हा म्हणणार वानप्रस्थी.

बोधवाक्य:-
सर्व प्राप्तींनी संपन्न आत्म्याची निशाणी आहे - संतुष्टता; संतुष्ट रहा आणि संतुष्ट करा.

अव्यक्त इशारे - एकांत प्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-

एकांत एक तर स्थूल असतो, दुसरा सूक्ष्म देखील असतो. एकांताच्या आनंदाचे अनुभवी बना तर बाह्यमुखता चांगली वाटणार नाही. अव्यक्त स्थितीला वाढविण्यासाठी एकांतामध्ये रुची ठेवायची आहे. एकतेसोबत एकांतप्रिय बनायचे आहे.