15-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता परत घरी जायचे आहे त्यामुळे देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून एका बाबांची आठवण करा, हेच आहे खऱ्या गीतेचे सार”

प्रश्न:-
तुम्हा मुलांचा सहज पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
बाबा म्हणतात तुम्ही एकदम मौनमध्ये रहा, मौनमध्ये राहिल्यानेच बाबांचा वारसा घ्याल. बाबांची आठवण करायची आहे आणि सृष्टीचक्राला फिरवायचे आहे. बाबांच्या आठवणी द्वारे तुमची विकर्मे विनाश होतील, आयुष्य वाढेल आणि चक्राला जाणल्यामुळे चक्रवर्ती राजा बनाल - हाच आहे सहज पुरुषार्थ.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रति रुहानी बाबा पुन्हा समजावून सांगत आहेत. दररोज शिकवण देतात. मुले तर समजतात बरोबर, आम्ही कल्पापूर्वीप्रमाणे गीतेचे ज्ञान शिकत आहोत. परंतु श्रीकृष्ण शिकवत नाही, परमपिता परमात्मा आम्हाला शिकवत आहेत. तेच आम्हाला पुन्हा राजयोग शिकवत आहेत. तुम्ही आता डायरेक्ट भगवंताकडून ऐकत आहात. भारतवासीयांचा सर्व आधार गीतेवरच आहे, त्या गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे की, ‘रुद्र ज्ञान यज्ञ’ रचला. हा यज्ञ देखील आहे तर पाठशाळा सुद्धा आहे. बाबा जेव्हा येऊन खरी गीता ऐकवतात तेव्हा आम्ही सद्गती प्राप्त करतो. मनुष्य हे समजत नाहीत. बाबा जे सर्वांचे सद्गती दाता आहेत, त्यांचीच आठवण करायची आहे. गीता भले वाचत आले आहेत परंतु रचयिता आणि रचनेला न जाणल्याकारणाने नेती-नेती करत आले आहेत. खरी गीता तर खरे बाबाच येऊन ऐकवतात, या आहेत विचार सागर मंथन करण्याच्या गोष्टी. जे सेवेवर असतील त्यांचे चांगल्या प्रकारे लक्ष जाईल. बाबांनी सांगितले आहे - प्रत्येक चित्रामध्ये जरूर लिहिलेले असावे की, ‘ज्ञान सागर पतित-पावन, गीता ज्ञान दाता परमप्रिय परमपिता, परमशिक्षक, परम सद्गुरु शिव भगवानुवाच’. असे शब्द तर अवश्य लिहा जेणेकरून मनुष्य समजतील - त्रिमूर्ती शिव परमात्माच गीतेचे भगवान आहेत, ना की श्रीकृष्ण. यावर ओपिनियन (अभिप्राय) देखील लिहून घेतात. आपली मुख्य आहे - गीता. बाबा दिवसेंदिवस नवीन-नवीन पॉईंट्स देखील देत राहतात. असा विचार येता कामा नये की, बाबांनी अगोदर का नाही सांगितले? ड्रामामध्ये नव्हते. बाबांच्या मुरली मधून नवीन-नवीन पॉईंट्स काढले पाहिजेत. लिहितात देखील - राइज आणि फॉल (उत्थान आणि पतन). हिंदीमध्ये म्हणतात भारताचे उत्थान आणि पतन. उत्थान अर्थात दैवी घराण्याची स्थापना, १०० प्रतिशत पवित्रता, शांती, समृद्धीची स्थापना होते मग अर्ध्या कल्पानंतर फॉल (पतन) होते. आसुरी घराण्याचे पतन. राइज अँड कन्स्ट्रक्शन डीटी डिनायस्टीचे होते (उत्थान आणि स्थापना दैवी घराण्याची होते). फॉलच्या सोबत डिस्ट्रक्शन (पतनच्या सोबत विनाश) लिहायचे आहे.

तुमचा सर्व आधार गीतेवर आहे. बाबाच येऊन खरी गीता ऐकवतात. बाबा रोज याच्यावरतीच समजावून सांगतात. मुले तर आत्मेच आहेत. बाबा म्हणतात - ‘या देहाच्या साऱ्या विस्ताराला विसरून स्वतःला आत्मा समजा’. आत्मा शरीरापासून वेगळी होते तेव्हा सर्व संबंध विसरून जाते. तर बाबा देखील म्हणतात - देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. आता घरी जायचे आहे ना! अर्धा कल्प परत जाण्यासाठीच इतकी भक्ति इत्यादी केली आहे. सतयुगामध्ये तर कोणी परत जाण्याचा पुरुषार्थ करत नाहीत. तिथे तर सुखच सुख आहे. गातात देखील दुःख में सिमरण सब करें, सुख में करे न कोई. परंतु सुख केव्हा आहे, दुःख केव्हा आहे - हे समजत नाहीत. आपल्या सर्व गोष्टी आहेत गुप्त. आम्ही देखील रुहानी मिलेट्री (आत्मिक सेना) आहोत ना. शिवबाबांची शक्ति सेना आहे. यांचा अर्थ देखील कोणी समजू शकत नाहीत. देवी इत्यादींची इतकी पूजा होते परंतु कोणाच्याही बायोग्राफीला जाणत नाहीत. ज्यांची पूजा करतात, त्यांच्या बायोग्राफीला जाणले पाहिजे ना. सर्व श्रेष्ठ पूजा आहे शिवाची त्यानंतर आहे ब्रह्मा-विष्णु-शंकराची नंतर मग लक्ष्मी-नारायण, राधे-कृष्णाची मंदिरे आहेत. आणखी तर कोणी नाही आहे. एकाच शिवबाबांसाठी किती वेगवेगळी नावे ठेऊन मंदिरे बांधली आहेत. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र आहे. ड्रामामध्ये मुख्य ॲक्टर्स देखील असतात ना. तो आहे हदचा ड्रामा. हा आहे बेहदचा ड्रामा. यामध्ये मुख्य कोण-कोण आहेत, हे तुम्ही जाणता. मनुष्य तर म्हणतात - ‘राम जी संसार बनलेलाच नाही आहे’. यावर देखील एक शास्त्र (ग्रंथ) बनवलेले आहे. काहीच अर्थ समजत नाहीत.

बाबांनी तुम्हा मुलांना अतिशय सोपा पुरुषार्थ शिकवला आहे. सर्वात सोपा पुरुषार्थ आहे - तुम्ही एकदम मौनमध्ये रहा. मौनमध्ये राहिल्यानेच बाबांचा वारसा घ्याल. बाबांची आठवण करायची आहे. सृष्टी चक्राची आठवण करायची आहे. बाबांच्या आठवणीने तुमची विकर्मे विनाश होतील. तुम्ही निरोगी बनाल. आयुष्य वाढेल. चक्राला जाणल्याने चक्रवर्ती राजा बनाल. आता आहात नरकाचे मालक मग स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्गाचे मालक तर सर्व बनतात आणि नंतर त्यामध्ये आहेत पदे. जितके आप समान बनवाल तितके उच्च पद मिळेल. अविनाशी ज्ञान रत्नांचे जर दानच केले नाहीत तर मग रिटर्नमध्ये काय मिळणार. कोणी श्रीमंत बनतात तर म्हटले जाते - यांनी मागील जन्मामध्ये चांगले दान-पुण्य केले आहे. आता मुले जाणतात रावण राज्यामध्ये तर सर्व पापच करतात, सर्वात पुण्य आत्मा आहेत श्री लक्ष्मी-नारायण. हां, ब्राह्मणांना देखील उच्च स्थानीच ठेवणार जे सर्वांना श्रेष्ठ बनवतात. ते तर प्रारब्ध आहे. हे ब्रह्मामुखवंशावळी ब्राह्मण कुलभूषण श्रीमतावर असे श्रेष्ठ कर्तव्य करतात. ब्रह्माचे नाव आहे मुख्य. त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात ना. आता तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ‘त्रिमूर्ती शिव’ म्हणावे लागेल. ब्रह्मा द्वारे स्थापना, शंकराद्वारे विनाश - हे तर गायन आहे ना. विराट रूप सुद्धा बनवतात, परंतु त्यामध्ये ना शिवाला दाखवत, ना ब्राह्मणांना दाखवत. हे देखील तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे. तुमच्यामध्ये देखील यथार्थ रित्या फार मुश्कीलीने कोणाच्या बुद्धीमध्ये राहते. मुद्दे तर पुष्कळ आहेत ना, ज्याला टॉपिक्स (विषय) असेही म्हणतात. किती टॉपिक्स मिळतात. खरी गीता भगवंता द्वारे ऐकल्याने मनुष्यापासून देवता, विश्वाचे मालक बनता. विषय किती चांगला आहे. परंतु समजावून सांगण्यासाठी देखील डोके पाहिजे ना. ही गोष्ट क्लियर लिहिली पाहिजे जेणेकरून मनुष्य समजतील आणि विचारतील. किती सोपे आहे. ज्ञानाचा एक-एक पॉईंट लाखो-करोडो रुपयांचा आहे, ज्याद्वारे तुम्ही कशापासून काय बनता! तुमच्या पावला-पावलामध्ये पदम आहेत म्हणून देवतांना देखील कमळाचे फूल दाखवतात. तुम्हा ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मणांचे नावच गायब केले आहे. ते ब्राह्मण लोक बगलेमध्ये शास्त्र, गीता पकडतात. आता तुम्ही आहात खरे ब्राह्मण, तुमच्या बगलेमध्ये (बुद्धीमध्ये) आहे सत्यम्. त्यांच्या बगलेमध्ये आहे शास्त्र. तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे - आम्ही तर श्रीमतावर स्वर्ग बनवत आहोत, बाबा राजयोग शिकवत आहेत. तुमच्या जवळ कोणते पुस्तक नाही आहे. परंतु हा साधा बॅजच तुमची खरी गीता आहे, यामध्ये त्रिमूर्तीचे देखील चित्र आहे. तर सारी गीता यामध्ये येते. सेकंदामध्ये संपूर्ण गीता समजावून सांगितली जाते. या बॅज द्वारे तुम्ही सेकंदामध्ये कोणालाही समजावून सांगू शकता - ‘हे तुमचे पिता आहेत, यांची आठवण केल्याने तुमची पापे नष्ट होतील’. ट्रेनमधून जाताना, चालता-फिरता कोणीही भेटले, तुम्ही त्यांना चांगल्या रीतीने समजावून सांगा. कृष्णपुरी मध्ये तर सगळेच जाऊ इच्छितात ना. या शिक्षणाद्वारे असे बनू शकता. शिक्षणाद्वारे राजाई स्थापन होते. इतर धर्म स्थापक काही राजाई स्थापन करत नाहीत. तुम्ही जाणता - आपण भविष्य २१ जन्मांसाठी राजयोग शिकत आहोत. किती सुंदर शिक्षण आहे. फक्त रोज एक तास शिका. बस. ते शिक्षण तर ४-५ तासांचे असते. याला एक तास सुद्धा पुरेसा आहे. तशीही सकाळची वेळ अशी आहे जी सर्वांना फ्री आहे. बाकी कोणी बंधनात असलेल्या, सकाळी येऊ शकत नाहीत तर त्यांच्यासाठी अजून दुसऱ्या वेळा दिलेल्या आहेत. बॅज लावलेला असावा, कुठेही जा, हा संदेश देत जा. वर्तमानपत्रांमध्ये तर बॅजचा फोटो टाकू शकत नाही, एका बाजूचा देऊ शकता. परंतु हे समजावून सांगितल्याशिवाय मनुष्य काही समजू देखील शकणार नाही. आहे खूप सोपे. हा धंदा तर कोणीही करू शकतात. ठीक आहे, भले स्वतः जरी आठवण करत नसाल निदान दुसऱ्यांना आठवण करून द्या. ते देखील चांगले आहे. दुसऱ्यांना सांगणार देही-अभिमानी बना आणि स्वतः देह-अभिमानी असतील तर काही ना काही विकर्म होत राहील. सर्वात पहिली वादळे येतात मनसामध्ये, नंतर मग कर्मामध्ये येतात. मनसामध्ये खूप येतील, त्यावर मग बुद्धीने काम करायचे आहे, कधीही वाईट कर्म करायचे नाही. चांगले कर्म करायचे आहे. संकल्प चांगले देखील असतात, वाईट देखील येतात. वाईट संकल्पांना थांबवले पाहिजे. ही बुद्धी बाबांनी दिलेली आहे. दुसरे कोणी हे समजू शकणार नाही. ते तर चुकीचीच कामे करत राहतात. तुम्हाला आता राईट (योग्य तेच) काम करायचे आहे. चांगल्या पुरुषार्थाने योग्य काम होते. बाबा तर प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हे एक-एक अविनाशी ज्ञानाचे रत्न लाखो-करोडो रुपयांचे आहे, यांचे दान करून पावला-पावलावर पद्मांची कमाई जमा करायची आहे. आप समान बनवून उच्च पद प्राप्त करायचे आहे.

२) विकर्मांपासून बचाव करण्यासाठी देही-अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. मनसामध्ये कधी वाईट संकल्प आले तर त्यांना रोखायचे आहे. चांगले संकल्प चालवायचे आहेत. कर्मेंद्रियांद्वारे कधी कोणते उलटे कर्म करायचे नाही.

वरदान:-
रुहानियतच्या प्रभावाद्वारे फरिश्तेपणाचा मेकप करणारे सर्वांचे स्नेही भव

जी मुले सदैव बापदादांच्या संगामध्ये राहतात - त्यांना संगाचा रंग असा लागतो जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रुहानियतचा प्रभाव दिसून येतो. ज्या रुहानियतमध्ये राहिल्याने फरिश्तेपणाचा मेकअप आपोआप होऊन जातो. जसे मेकप केल्यानंतर कोणी कसाही असला तरी बदलून जातो, मेकअप केल्याने सुंदर दिसू लागतो. इथे देखील फरिश्तेपणाच्या मेकअपमुळे चमकू लागाल आणि हा रुहानी मेकअप सर्वांचा स्नेही बनवेल.

बोधवाक्य:-
ब्रह्मचर्य, योग तथा दिव्य गुणांची धारणा हाच खरा पुरुषार्थ आहे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये -

“कर्म-बंधन तोडण्याचा पुरुषार्थ”

बरीच माणसे प्रश्न विचारतात की, आम्हाला काय केले पाहीजे, आमचे कर्म-बंधन कसे तोडावे? आता प्रत्येकाच्या जन्मपत्रीकेला तर बाबा जाणतात. मुलांचे काम आहे - एकदाच आपल्या अंतःकरणापासून बाबांवर समर्पित व्हावे, आपली जबाबदारी त्यांच्या हाती द्यावी. म्हणजे मग ते प्रत्येकाला बघून सल्ला देतील की तुम्हाला काय केले पाहीजे, आधार देखील प्रॅक्टिकलमध्ये घ्यायचा आहे, बाकी असे नाही फक्त ऐकत रहा आणि आपल्याच मतावर चालत रहा. बाबा साकार आहेत तर मुलांनी देखील स्थूलमध्ये पिता, गुरु, टीचर यांचा आधार घ्यायचा आहे. असेही नाही आज्ञा मिळाली परंतु आज्ञेचे पालन करू शकलो नाही तर अजूनच अकल्याण होईल. तर आदेशाचे पालन करण्यामध्ये देखील हिंमत पाहिजे, चालविणारे तर रमजबाज (चतुर) आहेत, ते जाणतात याचे कल्याण कशामध्ये आहे, तर ते तसे डायरेक्शन देतील की कसे कर्म-बंधन तोडायचे. कोणालाही मग असा विचारसुद्धा येता कामा नये की, मग मुले इत्यादींचे काय होईल? यामध्ये काही घरदार सोडण्याची गोष्ट नाही आहे, हा तोडण्याचा (घरदार सोडण्याचा) पार्ट तर या ड्रामामध्ये थोड्याशा मुलांचा होता, जर हा पार्ट नसता तर तुमची जी आता सेवा होत आहे ती मग कोणी केली असती? आता तर सोडण्याचा प्रश्नच नाही आहे, परंतु परमात्म्याचे बनायचे आहे, घाबरू नका, हिंमत ठेवा. बाकी जे घाबरतात ते ना स्वतः आनंदामध्ये रहात आणि ना बाबांचे मदतगार बनत. इथे तर त्यांचे पूर्ण मदतगार बनायचे आहे, जेव्हा जिवंतपणी मराल तेव्हाच मदतगार बनू शकता. कुठेही अडकून पडाल तर मग ते मदत देऊन पार करतील. तर बाबांसोबत मनसा-वाचा-कर्मणा मदतगार व्हायचे आहे, यामध्ये जरासुद्धा मोहाची आसक्ती असेल तर ती खाली पाडेल. तर हिंमत ठेवा पुढे जात रहा. कुठे हिंमतीमध्ये कमजोर पडतात तर मग गोंधळून जातात म्हणून आपल्या बुद्धीला एकदम पवित्र बनवायचे आहे, विकाराचा जरासुद्धा अंश नसावा, ध्येय काही दूर आहे काय! परंतु चढण थोडी वाकडी-तिकडी आहे, परंतु समर्थचा आधार घ्याल तर ना भीती आहे, ना थकावट आहे. अच्छा. ओम् शांती.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

तुमचे बोल आणि स्वरूप दोन्ही एकसारखे असावे - बोल स्पष्ट देखील असावेत, त्यामध्ये स्नेह सुद्धा असावा, नम्रता, मधुरता आणि सत्यता देखील असावी परंतु स्वरूपाची नम्रता देखील असावी, याच रूपा द्वारे बाबांना प्रत्यक्ष करू शकाल. निर्भय असावे परंतु बोल मर्यादेच्या आतमध्ये असावेत, म्हणजे मग तुमचे शब्द कडवट नाहीत परंतु गोड वाटतील.