15-03-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
23.03.2009 ओम शान्ति
मधुबन
बापदादांद्वारे
मिळालेल्या खजिन्यांना स्वतःमध्ये सामावून कार्यामध्ये लावा, अनुभवाची ऑथॉरिटी बना
आज चोहोबाजूंच्या
सर्व खजिने जमा करणाऱ्या संपन्न मुलांना बघत आहेत. त्याचसोबत प्रत्येक मुलाने
कुठंपर्यंत सर्व खजिने जमा केले आहेत, त्याचा रिझल्ट पहात होते. बापदादांद्वारे
अविनाशी खजिने तर भरपूर प्राप्त झाले आहेत. सर्वात पहिला मोठ्यात मोठा खजिना आहे -
ज्ञान धन, ज्याद्वारे मुक्ती आणि जीवनमुक्तीची प्राप्ती झाली आहे. जुना देह आणि
जुन्या दुनियेपासून मुक्त, जीवनमुक्त स्थितीची प्राप्ती आणि मुक्तिधाममध्ये जाण्याची
प्राप्ती, सर्व मुलांना प्राप्त आहे. त्याच बरोबर फक्त एक ज्ञानाचाच खजिना नाही
परंतु योगाचा देखील खजिना आहे ज्याद्वारे सर्व शक्तींची प्राप्ती होते. त्याचसोबत
धारणा करण्याचा खजिना, ज्याद्वारे सर्व गुणांची प्राप्ती होते. त्याच सोबत सेवेचा
खजिना ज्याद्वारे आशीर्वादांचा खजिना, खुशीचा खजिना प्राप्त होतो. त्याचबरोबर
सर्वात मोठ्यात मोठा खजिना वर्तमान संगमयुगाचा आहे, वेळेचा आहे कारण पूर्ण
कल्पामध्ये हा संगमाचा काळ अमूल्य खजिना आहे. या संगमाच्या काळातील प्रत्येक संकल्प
अथवा प्रत्येक क्षण खूप अमूल्य आहे कारण संगमाच्या काळातच बापदादा आणि मुलांचे मधुर
मिलन होते; इतर कोणत्याही युगामध्ये परमात्म पिता आणि परमात्म मुलांचे मिलन होत नाही.
त्याचसोबत हा संगमाचा काळच असा आहे ज्यामध्ये बापदादां द्वारे सर्व खजिने प्राप्त
होतात. खजिना जमा होण्याची वेळ संगमयुगच आहे इतर कोणत्याही युगामध्ये जमेचे खाते,
जमा करण्याची बँकच नाहीये. केवळ एक संगमयुगच आहे ज्यामध्ये जितका खजिना जमा करू
इच्छिता तितका करू शकता आणि या संगमातील समयाचे जे महत्त्व आहे ते हेच आहे की, एका
जन्मामध्ये अनेक जन्मांसाठी खजिना जमा करू शकता; म्हणूनच या छोट्याशा युगाचे खूप
महत्त्व आहे आणि खजिने सुद्धा बापदादांद्वारे सर्व मुलांना प्राप्त होतात. बाबा
सर्वांना देतात परंतु खजिने जमा करण्यामध्ये प्रत्येक मुल आपल्या पुरुषार्था अनुसार
जमा करते. बाबा देणारे सुद्धा एकच आहेत आणि एकसारखे सर्वांना देतात, एकाच वेळी
देतात; परंतु धारण करण्यामध्ये काय पाहिले की, बाबांनी एकसारखे दिले; परंतु धारण
करण्यामध्ये प्रत्येकाचा आपापला पुरुषार्थ दिसून आला कारण खजिन्याला धारण करण्यासाठी
एक तर आपल्या पुरुषार्थाने प्रारब्ध बनवू शकता, दुसरे सदैव स्वतः संतुष्ट राहणे आणि
सर्वांना संतुष्ट करणे; संतुष्टतेच्या विशेषतेद्वारे खजिना जमा करू शकता आणि तिसरे
सेवेद्वारे कारण सेवेमुळे सर्व आत्म्यांना आनंदाची प्राप्ती होते तर खुशीचा खजिना
प्राप्त करू शकता. आपला पुरुषार्थ आणि सर्वांना संतुष्ट करण्याचा पुरुषार्थ आणि
तिसरा सेवेचा पुरुषार्थ. या तिन्ही प्रकारे खजिने जमा करू शकता. खजिने जमा
करण्यासाठी विशेष संबंध-संपर्कामध्ये येताना एक तर निमित्त भाव, निर्माण भाव,
निःस्वार्थ भाव, प्रत्येक आत्म्याप्रति शुभ भावना आणि शुभ कामना ठेवण्याची आवश्यकता
आहे. जर सेवेमध्ये किंवा संबंध-संपर्कामध्ये हे सर्व असेल तर पुण्याचे खाते आणि
आशीर्वादांचे खाते अगदी सहज जमा करू शकता.
बापदादा सर्वांचा
पोतामेल (चार्ट) चेक करत होते, तर काय दिसून आले? चोहो बाजूंच्या मुलांमध्ये
नंबरवार पाहिले. बाबा एक आहेत, एकाच वेळी देतात परंतु जमा करण्यामध्ये दोन प्रकारची
मुले पाहिली - एक प्रकारची आहेत ज्यांनी जमा केलेला खजिना खाल्ला, जमा देखील केला
आणि खाऊन संपवून टाकतात. दुसरे आहेत ज्यांनी खाल्ला, जमा केला आणि जमा करण्यामध्ये
अटेन्शन देऊन वाढवला सुद्धा. खजिने वाढविण्याचे साधन काय आहे? वाढविण्याचे साधन आहे
- जे खजिने मिळाले ते गरजेच्या वेळी जी परिस्थिती येते त्या परिस्थितीनुसार
कार्यामध्ये लावणे. जे कार्यामध्ये लावतात स्थिती द्वारे परिस्थितीला बदलू शकतात
त्यांचे जमा होते. जे कार्यामध्ये लावत नाहीत तर ते जमा होत नाही. तर प्रत्येकाने
आपणच आपल्याला विचारा की वेळेवर स्वतः प्रति किंवा इतरां प्रति कार्यामध्ये लावता
का! जेवढे कार्यामध्ये लावाल तेवढा वाढत जाईल कारण कार्यामध्ये लावल्याने अनुभव होत
जातो. तर अनुभवाची ऑथॉरिटी ॲड होत जाते. तर चेक करा आपणच आपल्याला विचारा की हे
सर्व खजिने जमा आहेत? आणि वाढविण्याचे साधन वेळेवर कार्यामध्ये लावता का? अनुभवाची
ऑथॉरिटी वाढत आहे का? कारण सर्व ऑथॉरिटींमध्ये सर्वात जास्त अनुभवाची ऑथॉरिटी गायली
जाते. तर प्रत्येकाला आपले खाते वाढवायचे आहे. चेक करायचे आहे कारण आता अजून वेळ आहे
चेक करून अजूनही खजिने वाढवू शकता. आता चान्स आहे, नंतर चान्स मिळणे देखील बंद होईल.
वाटेल खजिना वाढवावा परंतु वाढवू शकणार नाही.
बापदादांनी बघितले की
खजिना मिळतो, आनंदाने आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न देखील करतात परंतु
जेव्हा खजिना मिळतो, मुरलीद्वारेच खजिने मिळतात तर दोन प्रकारची मुले आहेत - एक
आहेत ऐकणारे आणि दुसरे आहेत सामावून घेणारे. कित्येक मुले ऐकून खूप आनंदीत होतात
परंतु ऐकणे आणि सामावून घेणे, दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. सामावून घेणारे अनुभवी
बनतात, कारण सामावून घेतलेले वेळेवर कार्यामध्ये लावून, खजिन्याला वाढवत राहतात.
ऐकणारे केवळ वर्णन करतात की, खूप छान सांगितले, बाबांनी चांगली गोष्ट सांगितली,
परंतु सामावून घेतल्याशिवाय वेळेवर उपयोगात आणू शकत नाहीत. तर तुम्ही सर्व चेक करा
की, आपण सामावून घेणारे आहोत! थोडे देखील जरी कमी असेल, भरपूर नसेल तर डगमग होईल.
परंतु सामावून घेतलेला फुल असेल (भरपूर असेल) तर डगमगणार नाही. म्हणून आज बापदादांनी
सर्वांचे खजिने चेक केले. सांगितले ना - की दोन प्रकारची मुले आहेत, आता आपणच
आपल्याला चेक करा की, मी कोण? खजिन्याला वाढविणे अर्थात वेळेवर कार्यामध्ये वापरणे.
जितके कार्यामध्ये वापरत जाल तितका खजिना वाढत जाईल; कारण जो काही खजिना आहे,
खजिन्याचा मालक खजिन्याला कार्यामध्ये वापरतो, खजिना स्वतःला कार्यामध्ये वापरत नाही.
तर तुम्हा सर्वांना सर्व खजिने बाबांनी वारशामध्ये दिले आहेत. तर बाबांच्या
खजिन्याला आपला खजिना बनविण्यावर प्रत्येकाने लक्ष द्यायचे आहे; कारण जितका खजिना
भरपूर असेल तितकेच भरपूर अवस्थेमध्ये अचल-अडोल रहाल.
बापदादांची हीच इच्छा
आहे की प्रत्येक मुलाने संपन्न असावे, कोणती कमतरता नसावी, कारण असा चान्स
बाबांद्वारे अविनाशी खाते जमा होणे, हे केवळ आताच होऊ शकते, म्हणूनच म्हटले देखील
जाते - ‘आत्ता नाही तर कधीच नाही’. हे संगम काळासाठीच गायन आहे. भविष्यामध्ये तर जे
जमा केले आहे त्याचे फळ प्राप्त कराल परंतु प्राप्तीची वेळ फक्त आत्ता आहे. तर
प्रत्येकाने आपले खाते पाहायचे आहे. जितका ज्याचा भंडारा भरपूर आहे तेवढा त्याच्या
डोळ्यांमधून, वर्तनामधून, चेहऱ्यावरून समजून येते, त्याचे वर्तन आणि चेहरा असा
वाटेल जसे उमललेल्या गुलाबाचे फूल. बापदादा प्रत्येकाच्या वर्तनामधून आणि
चेहऱ्यावरून बघत असतात की तो किती हर्षित आणि किती खुशमिजाज (प्रसन्नचित्त) राहतो!
डोळ्यांमधून रुहानियत, चेहऱ्यावर हास्य आणि कर्मातून प्रत्येक गुण सर्वांना अनुभव
होतो! तर प्रत्येकाने आपणच आपल्याला चेक करा.
बापदादांची प्रत्येक
मुलासाठी हीच शुभ भावना आहे की प्रत्येक मुलाने अनेक आत्म्यांना अशा खजिन्यांनी
संपन्न बनवावे. आज विश्वातील सर्व आत्म्यांना हेच हवेसे वाटते आहे की काही ना काही
अध्यात्मिक बळ मिळावे. आणि अध्यात्मिक शक्तीचे दाता तुम्ही ब्राह्मण आत्मेच आहात
कारण होलीएस्ट, हाइएस्ट आणि रिचेस्ट तुम्हीच आत्मे आहात. होलीएस्ट देखील सर्व
आत्म्यांपेक्षा तुम्हीच जास्त आहात. तुम्हा आत्म्यांची पूजा जशी विधिपूर्वक होते,
तशी इतर कोणाचीही होत नाही. आता लास्ट जन्मामध्ये देखील तुम्हा आत्म्यांची पूजा इतर
कोणत्याही धर्मपिता किंवा महान आत्मे जे निमित्त बनले आहेत त्यांची होत नाही.
विधिपूर्वक पूजा, भले यादगार बनवतात परंतु विधिपूर्वक पूजा होत नाही. आणि
तुमच्यासारखा खजिना रिचेस्ट इन दी वर्ल्ड, तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचा एका जन्माचा
खजिना गॅरंटी आहे की, २१ जन्म चालणारच आहे कारण बाबांद्वारे, बाबांचा वारसा मिळाला
आहे. तर जसे बाबा अविनाशी आहेत, तसेच बाबांद्वारे मिळालेला खजिना देखील अविनाशी होतो;
म्हणून रिचेस्ट इन दी वर्ल्ड, होलीएस्ट इन दी वर्ल्ड आहात (जगातील सर्वात श्रीमंत
आणि जगातील सर्वात पवित्र आहात).
तर सर्व जण स्वतःला
असे विशेष सेवाधारी समजत आहात ना! आजच्या काळानुसार विश्वातील आत्म्यांना कोणत्या
गोष्टीची आवश्यकता आहे, हे जाणता ना! आज विश्वाला आनंद, शक्ती आणि स्नेहाची आवश्यकता
आहे. आत्मिक स्नेह हवा आहे परंतु तुम्ही ब्राह्मण आत्मे आता काळानुसार दाता बना.
मनसाद्वारे शक्ती द्या, वाचेद्वारे ज्ञान द्या आणि कर्मणाद्वारे गुणदान द्या.
ब्रह्मा बाबांनी शेवटी तीन शब्द सर्व मुलांना सौगातमध्ये दिले, आठवतात ना - या तीन
शब्दांना जर सेवेमध्ये वापराल तर अनेक आत्म्यांना संतुष्ट करू शकता. ते तीन शब्द
आहेत - निराकारी, निरहंकारी आणि निर्विकारी. तर मनसाद्वारे निराकारी, वाचेद्वारे
निरहंकारी आणि कर्मणाद्वारे निर्विकारी. हे तिन्ही शब्द सेवेमध्ये लावा. आता
विश्वाला तुमच्या शक्तीद्वारे थोडासा मानसिक आनंद, सुखाची प्राप्ती व्हावी, सर्वजण
निराश आहेत आणि तुम्ही विश्वासाठी आशेचे तारे आहात आणि बापदादा सर्व मुलांना
बाबांच्या आशेचे तारे म्हणून पाहतात. फक्त आशेचे तारे नाही परंतु आशा पूर्ण करणारे
आशेचे तारे आहात.
बापदादांपर्यंत
मुलांचा स्नेह सदैव पोहोचतो आणि सर्वात सोपा पुरुषार्थ कोणता आहे? विविध पुरुषार्थ
आहेत परंतु सर्वात सोपा पुरुषार्थ स्नेह आहे. स्नेहामुळे मेहनत देखील प्रेमाच्या
रूपामध्ये बदलून जाते. तर बाबांचे स्नेही बनणे अर्थात सहज पुरुषार्थ करणे.
स्नेहामध्ये तुम्ही सर्व स्वतःला स्नेही समजता, कधी-कधी नाही, सदैव स्नेही. जे
स्वतःला सदैव स्नेहाच्या सागरामध्ये सामावलेले समजतात, कायम स्नेहाच्या सागरामध्ये
सामावलेले. डुबकी मारणारे नाही, सामावलेले. जे स्वतःला असे स्नेहाच्या सागरामध्ये
सामावलेले समजतात त्यांनी हात वर करा. सदैव? ‘सदैव’ शब्दाला अंडरलाईन करा. हात वर
करा, सदैव, सदैव? हात तर छान वर केले आहेत. बापदादा हात पाहून खुश होतात कारण तुम्ही
हिंमत ठेवता. जर काही कमी देखील असेल तर आठवण तरी येईल की हात वर केला आहे कारण
बापदादांचे प्रत्येक मुलावर अति प्रेम आहे. का? कारण बापदादा जाणतात की ही प्रत्येक
आत्मा अनेकदा स्नेही बनली आहे, आता देखील बनली आहे आणि प्रत्येक कल्पामध्ये हेच
आत्मे स्नेही बनतील. नशा आहे, खुशी आहे की आम्हीच प्रत्येक कल्पाचे अधिकारी आत्मे
आहोत?
बापदादा अशा अधिकारी
आत्म्यांना पाहून मनापासून आशीर्वाद देत आहेत. सदैव अथक बनून उडत रहा. कधीही जर
एखादी परिस्थिती आली, तर स्व-स्थितीला खाली-वर करू नका. स्व-स्थितीसमोर परिस्थिती
काहीही करू शकत नाही.
अच्छा, पहिल्यांदाच
कोण आले आहेत, त्यांनी हात वर करा. पुष्कळ येतात. बापदादांना प्रत्येक मुलाला पाहून
अभिमान वाटतो - ‘वाह मेरे बच्चे वाह!’ जसे तुम्ही मनामध्ये ऑटोमॅटिक गाणे गाता ना -
‘वाह बाबा वाह!’ ‘माझे बाबा वाह!’ तसेच बाबा देखील मुलांप्रति हेच गाणे गातात की,
‘वाह हर एक बच्चा वाह!’ कारण बाबांना देखील कल्पानंतर तुम्ही मुले भेटता आणि
प्रत्येक जण विश्वासमोर महान आहे. तर बाबा देखील गाणे गातात - ‘वाह बच्चे वाह!’
‘वाह वाह’, आहात ना! वाह! वाह! मुले आहात ना! वाह! वाह! मुलांनो, हात वर करा.
तर कायम हेच लक्षात
ठेवा की, आम्ही वाह वाह! मुले आहोत. भले पुरुषार्थी आहोत परंतु आहोत वाह! वाह! मुले,
बाबांची वाह! वाह! मुले, बाबांसोबतच जाणार. मागे तर राहणार नाही ना! बाबा तर
म्हणतात - प्रत्येक मुलाला प्रेमाच्या मांडीवरून सोबत घेऊन जाणार. तर तयार आहात!
तयार आहात? वाटेत थांबणार तर नाही ना? सोबत येणार कारण वायदा आहे, वायदा तर
निभावणारे आहात.
आता बापदादांची हीच
इच्छा आहे की आपले फरिश्ता रूप इमर्ज करा. चालता-फिरता फरिश्ता ड्रेसधारी असल्याचा
अनुभव करवा. बापदादांनी ड्रिल ऐकवली ना. वस्त्र बदलण्याची सवय तर आहे ना! तर जसे
शरीराचा ड्रेस बदलता, तसेच आत्म्याचे स्वरूप फरिश्ता, वारंवार अनुभव करा.
फरिश्त्याचा ड्रेस आवडतो ना! जसे ब्रह्मा बाबा अव्यक्त फरिश्ता रूपामध्ये वतनमध्ये
बसले आहेत, तसे बाप समान तुम्ही देखील सर्वांनी स्वतःला चालता-फिरता फरिश्त्याच्या
रूपामध्ये अनुभव करा कारण फरिश्ता रूप असेल तेव्हाच देवता बनाल. जसे बाबांची तीन
रूपे लक्षात राहतात ना. पिता, शिक्षक आणि सद्गुरू, तशीच स्वतःची देखील तीन रूपे
लक्षात ठेवा - ब्राह्मण सो फरिश्ता आणि फरिश्ता सो देवता. ही तीन रूपे पक्की आहेत
ना! कधी ब्राह्मणाचा ड्रेस घाला, कधी फरिश्त्याचा, कधी देवतेचा. या तिन्ही
रूपांमध्ये स्वतःच त्रिकालदर्शीच्या सीटवर बसून साक्षी होऊन प्रत्येक कार्य करत
रहाल. तर सर्वांकडून बापदादांची हीच इच्छा आहे की तुम्ही सदैव बाबांसोबत रहावे, एकटे
राहू नये. सोबत राहाल तरच सोबत याल. जर आता कधी-कधी रहाल तर सोबत कसे येणार! स्नेही,
स्नेहीला कधीही विसरू शकत नाही. पूर्ण दिवसभरात हा अभ्यास करत रहा. आत्ता-आत्ता
ब्राह्मण, आत्ता-आत्ता फरिश्ता, आत्ता-आत्ता देवता. अच्छा.
चोहो बाजूंच्या सर्व
मुलांना जे सदैव खजिन्यांनी संपन्न आहेत, सदैव आपले वर्तन आणि चेहऱ्याने सेवाधारी
आहेत कारण तुम्हा सर्वांचा वायदा आहे की आम्ही विश्व परिवर्तक बनून विश्वाचे
परिवर्तन करणार, तर चालता-फिरता सुद्धा सेवाधारी सेवेमध्ये तत्पर राहतात. अशा विश्व
सेवाधारी, विश्व परिवर्तक, प्रत्येकाला बाबांच्या खजिन्यांनी भरपूर करणाऱ्या
बापदादांच्या चोहो बाजूंच्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण मनापासून
आशीर्वाद आणि नमस्ते. अच्छा.
वरदान:-
मास्टर
त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म युक्तियुक्त करणारे कर्मबंधन मुक्त भव
जो काही संकल्प, बोल
अथवा कर्म करता - ते मास्टर त्रिकालदर्शी बनून करा म्हणजे मग कोणतेही कर्म व्यर्थ
अथवा अनर्थ होऊ शकणार नाही. त्रिकालदर्शी अर्थात साक्षीपणाच्या स्थितीमध्ये स्थित
होऊन, कर्मांच्या गुह्य गतीला जाणून या कर्मेंद्रियांद्वारे कर्म करवून घ्या तर
कधीही कर्माच्या बंधनामध्ये अडकणार नाही. प्रत्येक कर्म करताना कर्मबंधन मुक्त,
कर्मातीत स्थितीचा अनुभव करत रहाल.
सुविचार:-
ज्यांच्याकडे हदच्या
इच्छांची अविद्या आहे तेच महान संपत्तीवान आहेत.
हे अव्यक्त इशारे:-
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
जसा पहारा देणारा
चौकीदार जर शस्त्रधारी असेल आणि त्याला निश्चय असतो की, माझे शस्त्र शत्रूला पळवून
लावणारे आहे, पराभूत करणारे आहे तर तेव्हा तो किती निर्भय होऊन चालत राहतो. तर
तुमच्याकडे देखील सर्व शक्ती रूपी शस्त्रे सदैव सोबत आहेत, फक्त आवाहन करा अर्थात
मालक बनून ऑर्डर करा तर सफलता सदैव झालेलीच आहे.