15-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुमचा
स्वधर्म शांती आहे, खरी शांती शांतीधाम मध्येच मिळू शकते, ही गोष्ट सर्वांना
सांगायची आहे, स्वधर्मामध्ये राहायचे आहे”
प्रश्न:-
कोणते नॉलेज
फक्त एका बाबांकडेच आहे जे आताच तुम्ही शिकत आहात?
उत्तर:-
पाप आणि पुण्याचे नॉलेज. भारतवासी जेव्हा भगवंताची निंदा करण्यास सुरू करतात, तेव्हा
पाप-आत्मा बनतात आणि जेव्हा बाबांना आणि ड्रामाला जाणतात तेव्हा पुण्य-आत्मा बनतात.
हे शिक्षण तुम्ही मुले आताच शिकता. तुम्ही जाणता सर्वांना सद्गती देणारे एक बाबाच
आहेत. मनुष्य, मनुष्याला सद्गती अर्थात मुक्ती-जीवनमुक्ती देऊ शकत नाहीत.
गीत:-
इस पाप की
दुनिया से…
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत की, ही आहे पाप आत्म्यांची दुनिया किंवा
भारतालाच म्हणणार की भारत पुण्य-आत्म्यांची दुनिया होती. जिथे देवी-देवतांचे राज्य
होते. हा भारत सुखधाम होता इतर कोणताच खंड नव्हता, एक भारतच होता. चैन अथवा सुख त्या
सतयुगामध्ये होते, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. हा आहे नरक. भारतच स्वर्ग होता, आता
नरक बनला आहे. नरकामध्ये चैन अर्थात सुख-शांती कुठून येईल. कलियुगाला नरक म्हटले
जाते. कलियुगाच्या अंताला अजूनच जास्त रौरव नरक म्हटले जाते. दुःखधाम म्हटले जाते.
भारतच सुखधाम होता, जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. भारतवासीयांचा
गृहस्थ-धर्म पवित्र होता. प्युरिटी देखील होती, सुख-शांती देखील होती, संपत्ती
सुद्धा पुष्कळ होती. आता तोच भारत पतित बनला आहे, सर्व विकारी बनले आहेत. हे आहे
दुःखधाम. भारत सुखधाम होता. आणि जिथे आपण आत्मे निवास करतो - ते आहे शांतीधाम. शांती
तिथे शांतीधाममध्येच मिळू शकते. तिथेच आत्मा शांत राहू शकते, ज्याला स्वीट होम,
निराकारी दुनिया म्हटले जाते. ते आहे आत्म्यांचे घर. तिथे जेव्हा राहतात तेव्हा
आत्मा शांतीमध्ये असते. बाकी शांती काही जंगल इत्यादी ठिकाणी गेल्याने मिळत नाही.
शांतीधाम तर तेच आहे. सतयुगामध्ये सुख देखील आहे, शांती देखील आहे. इथे दुःखधाम
मध्ये शांती असू शकत नाही. शांतीधाम मध्ये मिळू शकते. सुखधाम मध्ये देखील कर्म केले
जाते, शरीरा द्वारे पार्ट बजावायचा असतो. या दुःखधाममध्ये असा एकही मनुष्य नाही,
ज्याला सुख-शांती असेल. हे आहे भ्रष्टाचारी पतित धाम, तेव्हाच तर पतित-पावनला
बोलावतात. परंतु त्या पित्याला कोणीही जाणत नाहीत. म्हणून निधनके बनले आहेत. ऑरफन (अनाथ)
असल्या कारणाने आपसामध्ये भांडण-तंटे करतात. किती दुःख-अशांती, मारामारी आहे. हे
आहेच रावण राज्य. रामराज्य मागतात. रावण राज्यामध्ये ना सुख आहे, ना शांती आहे.
रामराज्यामध्ये सुख-शांती दोन्ही होते. आपसामध्ये कधी भांडण-तंटे करत नव्हते, तिथे
५ विकारच नाहीत. इथे ५ विकार आहेत. पहिला मुख्य आहे - देह-अभिमान. आणि मग काम,
क्रोध आहेत. भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा हे विकार नव्हते. तिथे देही-अभिमानी
होते. आता सर्व मनुष्य देह-अभिमानी आहेत. देवता देही-अभिमानी होते. देह-अभिमानवाले
मनुष्य कधी कोणाला सुख देऊ शकत नाहीत, एकमेकांना दुःखच देतात. असे समजू नका - कोणी
लखपती, करोडपती, पदमपती आहे तर तो सुखी आहे. नाही, हा तर सर्व आहे मायेचा भपका.
मायेचे राज्य आहे. आता त्याच्या विनाशासाठीच ही महाभारत लढाई समोर उभी आहे. या नंतर
मग स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहेत. अर्ध्या कल्पा नंतर मग नरकाचे दरवाजे उघडतात. या
गोष्टी कोणत्याच शास्त्रांमध्ये नाहीत. भारतवासी म्हणतात - ‘जेव्हा भक्ती कराल
तेव्हा भगवंत भेटेल’. बाबा म्हणतात - ‘जेव्हा भक्ती करत-करत एकदम खाली येतात, तेव्हा
मला यावे लागते, स्वर्गाची स्थापना करण्याकरिता अर्थात भारताला स्वर्ग बनविण्याकरिता’.
भारत जो स्वर्ग होता, तो नरक कसा बनला? रावणाने बनवला. गीतेच्या भगवंताद्वारे
तुम्हाला राज्य मिळाले, २१ जन्म स्वर्गामध्ये राज्य केले. नंतर मग भारत द्वापरमधून
कलियुगामध्ये आला अर्थात उतरती कला झाली म्हणून सर्वजण बोलावत राहतात - ‘हे
पतित-पावन या’. पतित मनुष्याला पतित दुनियेमध्ये सुख-शांती मिळूच शकत नाही. किती
दुःख झेलतात. आज पैसे चोरीला गेले, उद्या दिवाळे निघाले, आज आजारी पडले. दुःखच दुःख
आहे ना. आता तुम्ही सुख-शांतीचा वारसा मिळविण्याचा पुरुषार्थ करत आहात, बाबांकडून
स्वर्गाचा वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत आहात. कायमचे सुखी बनविणारे एक बाबाच आहेत.
कायमचे दुःखी बनविणारा रावण आहे. या गोष्टी भारतवासी जाणत नाहीत. सतयुगामध्ये
दुःखाच्या गोष्टी असत नाहीत. कधी रडावे लागत नाही. नेहमी सुखच सुख आहे. तिथे
देह-अभिमान अथवा काम, क्रोध इत्यादी असत नाहीत. जोपर्यंत ५ विकारांचे दान देत नाहीत
तोपर्यंत दुःखाचे ग्रहण सुटू शकणार नाही. म्हणतात ना - ‘दे दान तो छुटे ग्रहण’.
यावेळी साऱ्या भारताला ५ विकारांचे ग्रहण लागलेले आहे. जोपर्यंत या ५ विकारांचे दान
देत नाही तोपर्यंत १६ कला संपूर्ण देवता बनू शकणार नाहीत. बाबाच सर्वांचे सद्गती
दाता आहेत. म्हटले जाते - गुरु शिवाय गति नाही. परंतु गतिचा देखील अर्थ समजत नाहीत.
मनुष्याची गती-सद्गती अर्थात मुक्ती-जीवनमुक्ती. ती तर बाबाच देऊ शकतात. यावेळी
सर्वांची सद्गती होणार आहे.
दिल्लीला म्हटले जाते
- न्यू दिल्ली, जुनी दिल्ली. परंतु आता नवीन काही नाहीये, नवीन दुनियेमध्ये नवीन
दिल्ली असते. जुन्या दुनियेमध्ये जुनी दिल्ली असते. बरोबर, यमुनेचा तीर होता, दिल्ली
परिस्तान होती. सतयुग होते ना. देवी-देवता राज्य करत होते. आता तर जुन्या
दुनियेमध्ये जुनी दिल्ली आहे. नवीन दुनियेमध्ये तर या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.
भारतवासी हे विसरून गेले आहेत. नवीन भारत, नवीन दिल्ली होती तेव्हा त्यांचे राज्य
होते, दुसरा कोणताही खंड नव्हता. हे देखील कोणी जाणत नाहीत. गव्हर्मेंट हे शिकवत
नाहीत. जाणतात की ही तर अर्धवट हिस्ट्री आहे. जेव्हा पासून इस्लामी, बौद्धी आले
आहेत. लक्ष्मी-नारायणाच्या राज्याविषयी कोणालाच ठाऊक नाहीये. हे बाबाच बसून समजावून
सांगत आहेत की, साऱ्या सृष्टीचे चक्र कसे फिरते. जेव्हा भारत स्वर्ग होता तेव्हा
गोल्डन एज्ड होता. आता तोच भारत बघा काय बनला आहे. मग भारताला हिऱ्या प्रमाणे कोण
बनवेल? बाबा म्हणतात - जेव्हा तुम्ही जास्तच पाप-आत्मा बनता तेव्हा मी पुण्य-आत्मा
बनविण्याकरिता येतो. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे, ज्याला कोणीही जाणत नाही. हे
नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. बाबाच नॉलेजफुल आहेत, तेच येऊन
शिकवतात. मनुष्य, मनुष्याला कधीही सद्गती देऊ शकत नाहीत. जेव्हा देवी-देवता होते
तेव्हा सर्वजण एकमेकांना सुख देत होते. कोणीही आजारी, रोगी नव्हते. इथे तर सर्वजण
रोगी आहेत. आता बाबा आले आहेत पुन्हा स्वर्ग बनविण्याकरिता. बाबा स्वर्ग बनवतात,
रावण नरक बनवतो. हा खेळ आहे ज्याला कोणीही जाणत नाही. शास्त्रांचे ज्ञान आहे -
फिलॉसफी (तत्वज्ञान), भक्तिमार्ग. तो काही सद्गती मार्ग नाहीये. हे काही शास्त्रांचे
तत्वज्ञान नाहीये. बाबा कोणते शास्त्र ऐकवत नाहीत. इथे आहे स्पिरिच्युअल नॉलेज.
बाबांना स्पिरिच्युअल फादर म्हटले जाते. ते आहेत आत्म्यांचे पिता. बाबा म्हणतात -
मी मनुष्य सृष्टीचे बिज रूप आहे म्हणून नॉलेजफुल आहे. या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचा
कालावधी किती आहे. कसे वृद्धीला प्राप्त होते, पुन्हा भक्ती मार्ग कसा सुरू होतो,
हे मीच जाणतो. तुम्हा मुलांना हे नॉलेज देऊन स्वर्गाचा मालक बनवतो पुन्हा तुम्ही
मालक बनता. हे नॉलेज तुम्हाला एकदाच मिळते नंतर मग नष्ट होते. पुन्हा मग
सतयुग-त्रेतामध्ये या नॉलेजची गरजच राहत नाही. हे नॉलेज केवळ तुम्हा ब्राह्मणांनाच
आहे. देवतांमध्ये हे नॉलेज नाही आहे. तर परंपरेने हे नॉलेज येऊ शकत नाही. हे तुम्हा
मुलांना फक्त एकदाच मिळते, ज्याद्वारे तुम्ही जीवनमुक्त बनता. बाबांकडून वारसा
प्राप्त करता. तुमच्याकडे असे भरपूर लोक येतात, बोलतात मनाची शांती कशी मिळेल? परंतु
असे बोलणे चुकीचे आहे. मन-बुद्धी ही आत्म्याची कर्मेंद्रिये आहेत, जसे शरीराचे
ऑर्गन्स आहेत. आत्म्याला पत्थर-बुद्धि पासून पारस-बुद्धी बाबाच येऊन बनवतात - जे
सतयुग-त्रेता पर्यंत चालते. मग पुन्हा पत्थर-बुद्धी बनतात. आता मग तुम्ही
पत्थर-बुद्धि पासून पारस-बुद्धी बनता. तुमची जी पारस-बुद्धी होती त्यामध्ये भेसळ
मिसळत गेली आहे. मग आता पारस-बुद्धी कसे बनणार? बाबा म्हणतात, ‘हे आत्मा, माझी आठवण
कर’. आठवणीच्या यात्रेद्वारेच तुम्ही पवित्र बनाल आणि माझ्याकडे याल. बाकी जे
म्हणतात की, मनाची शांती कशी मिळेल? त्यांना सांगा की, इथे शांती कशी मिळू शकणार.
हे आहेच दुःखधाम कारण विकारांची प्रवेशता आहे. हा तर बेहदच्या बाबांकडूनच वारसा मिळू
शकतो. मग रावणाची संगत मिळाल्यामुळे पतित बनता; पुन्हा बाबांद्वारे पावन बनण्यासाठी
सेकंद लागतो. आता तुम्ही आला आहात बाबांकडून जीवनमुक्तीचा वारसा घेण्याकरिता. बाबा
जीवनमुक्तीचा वारसा देतात आणि रावण जीवनबंधचा शाप देतात म्हणून दुःखच दुःख आहे.
ड्रामाला देखील जाणून घ्यायचे आहे. दुःख धामामध्ये कोणाला सुख-शांती मिळू शकत नाही.
शांती तर आम्हा आत्म्यांचा स्वधर्म आहे, शांतीधाम आत्म्याचे घर आहे. आत्मा म्हणते -
‘माझा स्वधर्म शांत आहे’. हा बाजा वाजवणारच नाही (हे शरीर वापरणार नाही), बसून
राहणार. परंतु कधीपर्यंत बसून रहाल. कर्म तर करायचेच आहे ना. जोपर्यंत मनुष्य
ड्रामाला समजत नाहीत तोपर्यंत दुःखीच राहतात. बाबा म्हणतात, मी आहेच गरीब निवाज. इथे
गरीबच येतील. श्रीमंतांसाठी तर स्वर्ग इथेच आहे. त्यांच्या भाग्यामध्ये स्वर्गाचे
सुखच नाही आहे. बाबा म्हणतात - मी गरीब निवाज आहे. श्रीमंतांना गरीब आणि गरिबांना
श्रीमंत बनवतो. श्रीमंत इतके उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत कारण इथे श्रीमंतांना
वृथा अभिमान आहे. हो, प्रजेमध्ये येतील. स्वर्गामध्ये तर जरूर येतील. परंतु उच्च पद
गरीब प्राप्त करतात. गरीब, मग श्रीमंत बनतात, त्यांना (श्रीमंतांना) देह-अभिमान आहे
ना की आपण श्रीमंत आहोत. परंतु बाबा म्हणतात - ही धन-संपत्ती सगळे माती मध्ये
मिसळणार आहे. विनाश होणार आहे, देही-अभिमानी बनण्यामध्ये खूप मेहनत आहे. यावेळी
सर्व देह-अभिमानी आहेत. आता तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. आत्मा म्हणते मी ८४
जन्म पूर्ण केले. नाटक पूर्ण होत आहे, आता परत घरी जायचे आहे. आता कलियुगाचा अंत आणि
सतयुगाच्या सुरुवातीचा संगम आहे. बाबा म्हणतात, भारताला पुन्हा हिऱ्या समान
बनविण्याकरिता दर ५ हजार वर्षानंतर येतो. हा इतिहास-भूगोल बाबाच सांगू शकतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडून
जीवनमुक्तीचा वारसा घेण्यासाठी पावन जरूर बनायचे आहे. ड्रामाच्या नॉलेजला
बुद्धीमध्ये ठेवून दुःखधाममध्ये राहत असताना देखील दुःखा पासून मुक्त व्हायचे आहे.
२) धन-संपत्ती अथवा
श्रीमंतीचा अभिमान सोडून देही-अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
विकारांच्या
वंशाच्या अंशाला देखील नष्ट करणारे सर्व समर्पण अथवा ट्रस्टी भव
जे आयवेल (गरजेच्या
वेळेसाठी) जुन्या संस्कारांची प्रॉपर्टी बाजूला करून जपून ठेवतात. तर त्यांना माया
कोणत्या ना कोणत्या रीतीने पकडतेच. जुन्या रजिस्टरच्या छोट्याशा तुकड्यावरून देखील
पकडले जाल, माया खूप हुशार आहे, तिची कॅचिंग पावर काही कमी नाहीये म्हणून
विकारांच्या वंशाच्या अंशाला देखील नष्ट करा. जरासुद्धा कोणत्या कोपऱ्यामध्ये जुन्या
खजिन्याची खुण सुद्धा नसावी - याला म्हटले जाते सर्व समर्पण, ट्रस्टी अथवा यज्ञाचे
स्नेही सहयोगी.
बोधवाक्य:-
कोणाच्या
विशेषतेपोटी त्याच्या बाबतीत विशेष स्नेह वाटणे - हा देखील लगाव आहे (आकर्षण आहे).
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
मधुरताच महानता आहे,
याच्यामुळे मनाचा आणि मुखाचा कडवटपणा नाहीसा होतो. क्रोध अग्नी शीतल होतो. बापदादा
आपल्या प्रत्येक मुलाला शीतल देवता बनवू इच्छित आहेत त्यामुळे मधुरतेच्या गुणाला
धारण करा. तुमचा चेहरा देखील गोड असावा. मधुरतेच्या गुणाने भरपूर व्हा, जो कोणी
संपर्कामध्ये येईल त्याला मधुर बोल किंवा शक्तिशाली दृष्टीद्वारे भरपूर करा.