15-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - ही
दुनिया कब्रस्तान होणार आहे त्यामुळे या दुनियेवर मन जडू देऊ नका, परिस्तानची आठवण
करा”
प्रश्न:-
तुम्हा
मुलांसारखा भाग्यशाली दुनियेमध्ये इतर कोणीही नाही, असे का?
उत्तर:-
कारण तुम्ही
गरीब मुलेच डायरेक्ट त्या बाबांचे बनला आहात ज्यांच्याकडून सद्गतीचा वारसा मिळतो.
गरीब मुलेच शिकतात. श्रीमंत जर थोडेसे शिकले जरी, तरी त्यांना बाबांची आठवण
मुश्किलीने राहील. तुम्हाला अखेरच्या वेळी बाबांशिवाय इतर काहीही आठवणीत येणार नाही.
म्हणून तुम्ही सर्वात भाग्यशाली आहात.
गीत:-
दिल का सहारा
टूट ना जाये…
ओम शांती।
मुलांप्रती बाबा समजावून सांगत आहेत आणि मुले समजून घेत आहे की बरोबर, हा जमाना आता
कब्रस्तान होणार आहे. पहिले हा जमाना परिस्तान होता, आता जुना झाला आहे म्हणून याला
कब्रस्तान म्हणतात. सर्वांना कब्रदाखल व्हायचे आहे. जुनी वस्तू कब्रदाखल होते
अर्थात मातीमध्ये मिसळून जाते. इथे देखील केवळ तुम्ही मुलेच जाणता, दुनिया जाणत नाही.
काही विदेशातील लोकांना लक्षात येते की कब्रदाखल होण्याची चिन्हे आता दिसत आहेत.
तुम्ही मुले देखील जाणता की परिस्तान स्थापन करणारे आपले बाबा पुन्हा आलेले आहेत.
मुले हे देखील समजतात, जर या कब्रस्तानवर मन जडले तर घाटा होईल. आता तुम्ही बेहदच्या
बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेत आहात, तो देखील कल्पापूर्वी प्रमाणे. ही गोष्ट
प्रत्येक पावलाला तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये राहिली पाहिजे, तर हेच मनमनाभव आहे.
बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यानेच परिस्तानी बनाल. भारत परिस्तान होता परंतु इतर
खंड परिस्तान बनत नाहीत. हा आहे माया रावणाचा डामडौल. हा फार थोडा काळ चालणार आहे.
इथे आहे खोटा दिखावा. खोटी माया, खोटी काया आहे ना. हा शेवटचा भपका आहे. हा भपका
पाहून समजतात की, स्वर्ग तर आताच आहे, अगोदर नरक होता. मोठमोठे बंगले बनवत राहतात.
हा १०० वर्षांचा शो आहे. टेलिफोन, बिजली, एरोप्लेन इत्यादी हे सर्व या १००
वर्षांच्या आतच बनते. किती शो आहे? म्हणून समजतात स्वर्ग तर आताच आहे. जुनी दिल्ली
कशी होती? आता नवीन दिल्ली किती सुंदर बनली आहे? नावच ठेवले आहे - ‘न्यू दिल्ली’.
बापूजींना देखील वाटत होते नवीन दुनिया रामराज्य असावे, परिस्तान असावे. हा तर
तात्पुरता डामडौल आहे. किती मोठमोठे बंगले, कारंजे इत्यादी बनवतात, यालाच अल्पकालीन
कृत्रिम स्वर्ग म्हटले जाते. तुम्ही जाणता या जुन्या दुनियेचे नाव काही स्वर्ग
नाहीये. याचे नाव नरक आहे. नरकाचा देखील एक डामडौल आहे. हा आहे अल्पकाळाचा दिखावा.
हा आता गेला की गेला.
आता बाबा मुलांना सांगत आहेत - एक तर शांतिधामची आठवण करा. सर्व मनुष्य मात्र शांती
शोधत आहेत, शांती कुठून मिळेल? आता हा प्रश्न तर साऱ्या दुनियेचा आहे की,
दुनियेमध्ये शांती कशी होईल? मनुष्यांना हे ठाऊक नाही की, खरेतर आपण सर्व शांतीधामचे
रहिवासी आहोत. आपण आत्मे शांतीधाममध्ये शांत असतो, मग इथे येतो पार्ट बजावण्याकरिता.
ते देखील तुम्हा मुलांनाच ठाऊक आहे. आता तुम्ही व्हाया शांतीधाम सुखधाम मध्ये
जाण्याचा पुरुषार्थ करत आहात. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आहे आपण आत्मे आता आपल्या
घरी शांतीधामला जाणार. इथे तर शांतीची गोष्ट असूच शकत नाही. हे आहेच दुःख धाम.
सतयुग पावन दुनिया, कलियुग आहे पतित दुनिया. या गोष्टी तुम्हा मुलांना आत्ता कुठे
समजल्या आहेत. दुनियावाले तर अजिबात जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे -
बेहदचे बाबा आपल्याला सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत.
तर कसे धर्म स्थापक येऊन धर्म स्थापन करतात. आता या सृष्टीवर किती असंख्य मनुष्य
आहेत. भारतामध्ये देखील प्रचंड लोकसंख्या आहे, भारत जेव्हा स्वर्ग होता तर खूप
श्रीमंत होता इतर कोणताच धर्म नव्हता. तुम्हा मुलांना रोज रिफ्रेश केले जाते.
बाबांची आणि वारशाची आठवण करा. भक्ती मार्गामध्ये देखील हे चालत आलेले आहे. कायम
बोटाने वर इशारा करुन दाखवतात की परमात्म्याची आठवण करा. परमात्मा अर्थात अल्लाह
तिथे आहेत. परंतु फक्त असेच आठवण केल्याने थोडेच काही होते. त्यांना हे देखील माहित
नाही की आठवण केल्याने काय फायदा होईल! त्यांच्याशी आपले काय नाते आहे? जाणतच नाहीत.
दुःखाच्या वेळी बोलावतात - ‘हे राम…’, आत्मा आठवण करते. परंतु त्यांना हे ठाऊक नाही
की सुख-शांती कशाला म्हटली जाते. तुमच्या बुद्धीमध्ये येते की आपण सर्व एका पित्याची
संतान आहोत तर मग दुःख का झाले पाहिजे? बेहदच्या बाबांकडून कायम सुखाचा वारसा मिळाला
पाहिजे. हे देखील चित्रामध्ये क्लियर दाखवले आहे. भगवान आहेतच स्वर्गाची स्थापन
करणारे, हेवनली गॉडफादर. ते येतातच भारतामध्ये. परंतु हे कोणीही समजत नाहीत.
देवी-देवता धर्माची स्थापना जरूर संगमावरच होईल, सतयुगामध्ये कशी होईल! म्हणून या
गोष्टी इतर धर्माचे जाणत नाहीत. हे तर बाबाच नॉलेजफुल आहेत, समजावून सांगतात - आदि
सनातन देवी-देवता धर्म कसा स्थापन झाला. सतयुगाचा कालावधी लाखो वर्षे म्हटल्याने
खूप दूर नेतात. तुम्हा मुलांनी या चित्रांवरूनच समजावून सांगायचे आहे. भारतामध्ये
या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. यांनी कसे आणि केव्हा हे राज्य मिळवले, हे कोणीही
जाणत नाही. फक्त म्हणतात - ‘हे सतयुगाचे मालक होते’. त्यांच्या समोर जाऊन भीक
मागतात तर अल्पकाळासाठी काही ना काही मिळते. कोणी दान-पुण्य करतात, त्यांना देखील
अल्पकाळाकरिता फळ मिळते. गरीब पंचायतच्या मुखियाला देखील तेवढाच आनंद होत असतो जेवढा
श्रीमंत मुखियाला होत असतो. गरीब देखील स्वतःला सुखी समजतात. मुंबईमध्ये बघा - गरीब
लोक कशा ठिकाणी राहतात. तुम्ही मुले आता समजता - भले करोडपती आहेत परंतु किती दुःखी
आहेत.
आता तुम्ही म्हणाल
आमच्या सारखा नशीबवान दुसरा कोणीच नाही. आम्ही डायरेक्ट बाबांचे बनलो आहोत,
ज्यांच्याकडून सद्गतीचा वारसा मिळतो. मोठ-मोठ्या व्यक्ती तिथे (सतयुगामध्ये) कधीही
उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. जे गरीब आहेत, ते श्रीमंत बनतात. तुम्ही शिकता
(हे ज्ञान घेता), ते तर अशिक्षित आहेत. आणि थोडे फार शिकले जरी तरीही बाबांच्या
आठवणीमध्ये राहू शकत नाहीत. अखेरच्या वेळी तुम्हाला बाबांव्यतिरिक्त इतर कशाचीही
आठवण राहता कामा नये. तुम्ही जाणता हे सर्व कब्रस्तान होणार आहे. बुद्धीमध्ये राहिले
पाहिजे की, हा जो आपण धंदा इत्यादी करत आहोत तो थोड्या वेळासाठीच आहे. श्रीमंत लोक
धर्मशाळा इत्यादी बांधतात. ते काही धंदा इत्यादीसाठी बांधत नाहीत. जिथे तीर्थ स्थान
असेल तिथे धर्मशाळा नसतील तर कुठे राहतील, म्हणून श्रीमंत लोक धर्मशाळा बांधतात. असे
नाही की व्यापारी लोक येऊन व्यापार करतील. धर्मशाळा तीर्थ स्थानांवर बांधल्या जातात.
आता तुमचे सेंटर मोठ्यात मोठे तीर्थ आहे. जिथे-जिथे तुमची सेंटर्स आहेत ती सर्व
मोठ्यात मोठी तीर्थे आहेत, जिथून लोकांना सुख-शांती मिळते. तुमची ही गीता पाठशाळा
खूप महान आहे. हे सोर्स ऑफ इन्कम आहे, यामुळे तुमची खूप कमाई होते. तुम्हा
मुलांकरिता ही धर्मशाळा देखील आहे. मोठ्यात मोठे तीर्थ आहे. तुम्ही बेहदच्या
बाबांकडून बेहदचा वारसा घेता. याच्यासारखे मोठ्यात मोठे तीर्थ इतर कोणतेच नाही. त्या
(दुनियेतील) तीर्थ क्षेत्रांवर गेल्याने तर तुम्हाला काहीच मिळत नाही. हे देखील
तुम्हीच समजता. भक्त लोक खूप प्रेमाने मंदिर इत्यादी ठिकाणी चरणामृत घेतात. समजतात
यामुळे आपले मन पवित्र होईल. परंतु ते तर पाणी आहे. इथे तर बाबा म्हणतात - माझी
आठवण करा तर वारसा मिळेल. आता बेहदच्या बाबांकडून तुम्हाला अविनाशी ज्ञान रत्नांचा
खजिना मिळतो. जास्त करून शंकराकडे जातात, समजतात अमरनाथने पार्वतीला कथा ऐकवली; तर
म्हणतात - भर दे झोली… तुम्ही अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरता. बाकी अमरनाथ काही
एकाला थोडेच बसून कथा ऐकवतील. जरूर भरपूरजण असतील आणि ते देखील मृत्यूलोकमध्येच
असतील. सूक्ष्मवतनमध्ये तर कथा ऐकवण्याची गरजच नाही. अनेक तीर्थ-क्षेत्र बनवली आहेत.
साधु-संत, महात्मा इत्यादी पुष्कळ जातात. अमरनाथला लाखो मनुष्य जातात.
कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान करण्यासाठी सर्वात जास्त जातात. समजतात, आपण पावन बनणार.
कुंभचा मेळावा खरेतर हाच आहे. ते मेळावे तर जन्म-जन्मांतर करत आला आहात. परंतु बाबा
म्हणतात - याद्वारे परत आपल्या घरी कोणीही जाऊ शकत नाही; कारण आत्मा जेव्हा पवित्र
बनेल तेव्हाच तर जाऊ शकेल. परंतु अपवित्र असल्या कारणाने सर्वांचे पंख तुटलेले आहेत.
आत्म्याला पंख मिळाले आहेत, योगामध्ये राहिल्याने आत्मा सर्वात तीव्र गतीने उडते.
कोणत्या आत्म्यांचे हिशोब लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये असतील तर ताबडतोब उडून जातील.
तिथे सेकंदामध्ये पोहोचतात. परंतु मुक्तिधाम मध्ये मात्र जेव्हा कर्मातीत होतील
तेव्हाच जाऊ शकतील, तोपर्यंत इथेच जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येतात. जसा ड्रामा
टिक-टिक करत चालत राहतो. आत्मा देखील अशीच आहे, टिक झाले आणि ही गेली. हिच्या सारखी
वेगवान वस्तू दुसरी कोणतीच नाही. सर्व आत्मे लोंढेच्या लोंढे मूलवतनमध्ये जाणार
आहेत. आत्म्याला कुठल्या कुठे पोहोचायला वेळ लागत नाही. लोकांना या गोष्टी समजत
नाहीत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये येते की नवीन दुनियेमध्ये जरूर थोडेच आत्मे
असतील आणि तिथे खूप सुखी असतील. तेच आत्मे आता ८४ जन्म भोगून खूप दुःखी झाले आहेत.
तुम्हाला संपूर्ण चक्रा विषयी ठाऊक झाले आहे. तुमची बुद्धी चालते इतर कोणत्याही
मनुष्य मात्राची बुद्धी चालत नाही. प्रजापिता ब्रह्माचे देखील गायन आहे. कल्पापूर्वी
देखील तुम्ही असेच ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी बनला होता. तुम्ही जाणता की आपण
प्रजापिता ब्रह्माची मुले आहोत. आमच्याद्वारे बाबा स्वर्गाची स्थापना करवून घेत
आहेत. जेव्हा नंबरवार पुरुषार्था नुसार लायक बनाल तेव्हा मग जुन्या दुनियेचा विनाश
होईल. त्रिमूर्तीचे देखील इथेच गायन आहे. त्रिमूर्तीचे चित्र देखील ठेवतात.
त्यामध्ये शिवाला दाखवत नाहीत. म्हटले देखील जाते - ब्रह्मा द्वारे स्थापना, कोण
करवून घेतात? शिवबाबा. विष्णू द्वारा पालना.
तुम्ही ब्राह्मण आता
देवता बनण्याकरिता लायक बनत आहात. आता तुम्ही तो पार्ट बजावत आहात. कल्पा नंतर
पुन्हा बजावाल. तुम्ही पवित्र बनता. म्हणता - ‘बाबांचा आदेश आहे - काम रुपी शत्रूला
जिंका, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. खूप सोपे आहे. भक्तिमार्गामध्ये तुम्ही मुलांनी
खूप दुःख पाहिले आहे. जे काही थोडे फार सुख आहे ते देखील अल्पकालीन आहे. भक्तीमध्ये
साक्षात्कार घडतो. ती देखील अल्पकाळाकरिता तुमची इच्छा पूर्ण होते; हा साक्षात्कार
जो होतो तो देखील मीच घडवतो. ड्रामामध्ये तशी नोंद आहे. जे पास्ट झाले, त्याचा
सेकंद बाय सेकंद, ड्रामा शूट केलेला आहे. असे म्हणत नाहीत की - आत्ता शूट झाला. नाही,
हा तर अनादि पूर्व-नियोजित ड्रामा आहे. जितके पण ॲक्टर्स आहेत - सर्वांचा पार्ट
अविनाशी आहे. कोणालाही मोक्ष मिळत नाही. संन्याशी लोक म्हणतात - ‘आम्ही ब्रह्ममध्ये
लीन होतो’. बाबा समजावून सांगतात - तुम्ही अविनाशी आत्मा आहात. आत्मा बिंदू आहे,
इतक्या छोट्याशा बिंदूमध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. हे चक्र चालतच राहते.
जे सर्वात पहिले पार्ट बजावण्याकरिता येतात, तेच ८४ जन्म घेतात, सगळेच काही घेऊ शकत
नाहीत. तुम्ही सोडून इतर कोणाच्याच बुद्धीमध्ये हे नॉलेज नाही. ज्ञानाचा सागर एक
बाबाच आहेत. तुम्ही जाणता आपण बाबांकडून वारसा घेत आहोत. बाबा आम्हाला पतितापासून
पावन बनवतात. सुख आणि शांतीचा वारसा देतात. सतयुगामध्ये दुःखाचे नामो-निशाणही नसते.
बाबा आशीर्वाद देतात - ‘आयुष्यवान भव’, ‘धनवान भव…’ निवृत्तीमार्गवाले असे आशीर्वाद
देऊ शकत नाहीत. तुम्हा मुलांना बाबांकडून वारसा मिळत आहे. सतयुग-त्रेता आहे सुखधाम,
मग दुःख कसे होते, हे देखील कोणीही जाणत नाही. देवता वाममार्गामध्ये कसे जातात,
त्याच्या खाणाखुणा आहेत. जगन्नाथपुरी मध्ये देवतांची चित्रे, मुकुट इत्यादी घातलेले
दाखवतात आणि मग घाणेरडी चित्रे देखील बनवली आहेत, त्यामुळे जगन्नाथाची मूर्ती देखील
काळी बनवून ठेवली आहे; ज्यावरून हे सिद्ध होते की देवता वाममार्गामध्ये जातात, आणि
अखेरीला तर पूर्णपणे काळे बनतात. आता तुम्ही जाणता की, भारत किती सुंदर होता, मग
ड्रामा प्लॅन अनुसार परत तमोप्रधान बनणारच आहे. आता संगमावर तुम्हाला हे नॉलेज
मिळाले आहे. बाबा आहेत नॉलेजफुल. तुमचे एकच बाबा - पिता, टीचर, गुरु तिन्ही आहेत.
हे कायम लक्षात रहावे की, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. हे बेहदचे शिक्षण आहे,
ज्याद्वारे तुम्ही नॉलेजफुल बनले आहात. तुम्ही सर्व काही जाणता. दुनियावाले म्हणतात
- ते सर्वव्यापी आहेत, तुम्ही म्हणता - ते पतित-पावन आहेत. किती रात्रं-दिवसाचा फरक
आहे. आता तुम्ही मास्टर नॉलेजफुल बनले आहात, नंबरवार. जे बाबांकडे आहे, ते तुम्हाला
शिकवत आहेत. तुम्ही देखील सर्वांना हेच सांगता की, बाबांची आठवण करा तर २१
जन्मांकरिता वारसा मिळेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपण
रिफ्रेश राहून इतरांना रिफ्रेश करण्याकरिता बाबांच्या आणि वारशाच्या आठवणीमध्ये
राहायचे आहे आणि सर्वांना आठवण करून द्यायची आहे.
२) या जुन्या
दुनियेवर, या कब्रस्तानावर प्रेम करायचे नाही. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची
आहे. स्वतःला देवता बनण्या योग्य बनवायचे आहे.
वरदान:-
ईश्वरीय
ऑथॉरिटी द्वारे संकल्प किंवा बुद्धीला ऑर्डर प्रमाणे चालविणारे मास्टर सर्वशक्तिवान
भव
जसे स्थूल हाता-पायाला
अगदी सहज रीतीने जिथे पाहिजे तिथे वापरता अथवा कर्म करून घेता, अगदी तसेच संकल्प
किंवा बुद्धीला जिथे लावू इच्छिता तिथे लावू शकाल - यालाच म्हणतात, ‘ईश्वरीय ऑथॉरिटी’.
जसे वाणीमध्ये येणे सहज वाटते तसेच वाणी पासून परे जाणे देखील तितकेच सहज व्हावे,
याच अभ्यासाद्वारे साक्षात्कार मूर्त बनाल. तर आता या अभ्यासाला सहज आणि निरंतर बनवा,
तेव्हा म्हटले जाईल - मास्टर सर्वशक्तिवान.
बोधवाक्य:-
स्वस्थिती
शक्तिशाली असेल तर परिस्थिती त्याच्यापुढे काहीच नाही.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
तुमच्या एकरस अचल
स्थितीचेच यादगार (स्मृती स्थळ) हे ‘अचलघर’ आहे. जसे बापदादा एकरस राहतात तसेच
मुलांनी देखील एकरस राहायचे आहे. जेव्हा एकाच्याच रसामध्ये राहाल तेव्हाच एकरस
अवस्थेमध्ये राहाल. ‘का’ शब्दाची निशाणी आहे - क्वेश्चन मार्क, जो सर्वात वाकडा आहे.
जेव्हा हा ‘का’, ‘काय’ शब्द बंद होईल तेव्हाच ड्रामाच्या भावी वर एकरस स्थेरीयम राहू
शकाल.