15-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - मायाजीत बनण्यासाठी चुका करणे सोडून द्या, दु:ख देणे आणि दु:ख घेणे - ही खूप मोठी चुक आहे, जी तुम्हा मुलांनी करता कामा नये’’

प्रश्न:-
बाबांची आम्हा सर्व मुलांप्रती कोणती एक आशा आहे?

उत्तर:-
बाबांची आशा आहे की माझी सर्व मुले माझ्या समान एव्हर प्युअर (सदा पवित्र) बनावीत. बाबा सदैव गोरे आहेत, ते आले आहेत मुलांना काळ्या पासून गोरे बनविण्यासाठी. माया काळे बनवते आणि बाबा गोरे बनवतात. लक्ष्मी-नारायण गोरे आहेत, तेव्हाच तर काळे पतित मनुष्य जाऊन त्यांची महिमा गातात, स्वतःला नीच समजतात. बाबांचे आता श्रीमत मिळत आहे - ‘गोड मुलांनो, आता गोरे सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करा .

ओम शांती।
बाबा काय करत आहेत आणि मुले काय करत आहेत? बाबा देखील जाणतात आणि मुले देखील जाणतात की आपली आत्मा जी तमोप्रधान बनली आहे, तिला सतोप्रधान बनवायचे आहे. ज्याला गोल्डन एजड म्हटले जाते. बाबा आत्म्यांना बघतात. आत्म्यालाच विचार असतो, आपली आत्मा काळी बनली आहे. आत्म्यामुळे मग शरीर देखील काळे बनले आहे. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जातात, आधी तर थोडे देखील ज्ञान नव्हते. पाहत होते हे तर सर्व गुण संपन्न आहेत, गोरे आहेत, आपण तर काळे भूत आहोत. परंतु ज्ञान नव्हते. आता जर लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जाल तर समजाल आपण तर पहिले असे सर्व गुण संपन्न होतो, आता काळे पतित बनलो आहोत. त्यांच्या समोर म्हणतात - आम्ही काळे विकारी, पापी आहोत. लग्न करतात तर सर्वात पहिले लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये घेऊन जातात. दोघेही पहिले निर्विकारी असतात, नंतर मग विकारी बनतात. तर निर्विकारी देवतां समोर जाऊन स्वतःला विकारी, पतित म्हणतात. लग्ना अगोदर असे म्हणणार नाहीत. विकारामध्ये गेल्यानेच मग मंदिरामध्ये जाऊन त्यांची महिमा करतात. आजकाल तर लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये, शिवाच्या मंदिरामध्ये लग्न लावतात. पतित बंधन बनण्यासाठी कांकण बांधतात. आता तुम्ही गोरे बनण्यासाठी कांकण बांधता म्हणून गोरे बनविणाऱ्या शिवबाबांची आठवण करता. जाणता या रथामध्ये भृकुटीच्या मध्यभागी शिवबाबा आहेत, ते एव्हर-प्युअर (सदा पावन) आहेत. त्यांची हीच अपेक्षा असते की मुलांनी देखील प्युअर गोरे (पवित्र गोरे) बनावे. मामेकम् (मज एकाची) आठवण करून पवित्र व्हावे. आत्म्याने आठवण करायची आहे बाबांची. बाबा देखील मुलांना पाहून हर्षित होतात. तुम्ही मुले देखील बाबांना पाहून समजता पवित्र बनावे. म्हणजे मग आपण असे लक्ष्मी-नारायण बनू. हे एम ऑब्जेक्ट मुलांनी खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहे. असे नाही की, फक्त बाबांकडे आलो आहे. मग तिथे (घरी) गेल्यावर आपल्याच कामधंदयामध्ये व्यस्त व्हाल म्हणून इथे सन्मुख बसून बाबा मुलांना समजावून सांगतात. भृकुटीच्या मध्यभागी आत्मा राहते. अकाल आत्म्याचे हे तख्त आहे, जे आत्मे माझी मुले आहेत, ती या तख्तावर बसली आहेत. स्वतः आत्मा तमोप्रधान आहे, तर तख्त देखील तमोप्रधान आहे. या व्यवस्थितरित्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. असे लक्ष्मी-नारायण बनणे काही मावशीचे घर नाहीये (काही सोपी गोष्ट नाहीये). आता तुम्ही समजता आपण यांच्या सारखे बनत आहोत. आत्मा पवित्र बनूनच जाणार. मग देवी-देवता म्हटले जाणार. आपण अशा स्वर्गाचे मालक बनतो. परंतु माया अशी आहे जे विसरायला लावते. बरेचजण इथे ऐकून बाहेर गेले की मग विसरून जातात म्हणून बाबा चांगल्या प्रकारे पक्के करून घेतात की, स्वतःला पहायचे आहे, श्रीमतावर चालून जितके या देवतांमध्ये गुण आहेत ते मी धारण केले आहेत का? चित्रे देखील समोर आहेत. तुम्ही जाणता आपल्याला हे बनायचे आहे. बाबाच बनवतील. दुसरा कोणीही तुम्हाला मनुष्या पासून देवता बनवू शकणार नाही. एक बाबाच बनविणारे आहेत. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता…’ तुमच्यामध्ये देखील नंबरवार जाणतात. या गोष्टी भक्त लोक जाणत नाहीत. जोपर्यंत भगवंताचे श्रीमत घेणार नाही, काहीच समजू शकणार नाही. तुम्ही मुले आता श्रीमत घेत आहात. हे चांगल्या रीतीने लक्षात ठेवा की आपण शिवबाबांच्या मतावर बाबांची आठवण करत-करत हे बनत आहोत. आठवणीनेच पापे भस्म होतील, दुसरा कोणताही उपाय नाही.

लक्ष्मी-नारायण तर गोरे आहेत ना. मंदिरामध्ये मग त्यांना सावळे बनवून ठेवले आहे. रघुनाथ मंदिरामध्ये रामाला काळे बनवले आहे - कशासाठी? कोणालाच माहित नाही. गोष्ट किती छोटी आहे. बाबा समजावून सांगतात, सुरुवातीला हे सतोप्रधान सुंदर होते. प्रजा देखील सतोप्रधान बनते परंतु सजा खाऊन बनते. जितकी जास्त सजा, तितके पद देखील कमी होते. मेहनत करत नाहीत तर पापे नष्ट होत नाहीत. पद कमी होते. बाबा तर क्लीयर करून समजावून सांगतात. तुम्ही इथे बसले आहात गोरे बनण्यासाठी. परंतु माया महा शत्रू आहे, जिने काळे बनवले आहे. बघते आता गोरा बनविणारे आले आहेत तर माया विरोध करते. बाबा म्हणतात - ‘हे तर ड्रामा अनुसार तिला अर्धाकल्प पार्ट बजावायचा आहे’. माया वारंवार तोंड फिरवून दुसरीकडे घेऊन जाते. मुले लिहितात - ‘बाबा, आम्हाला माया खूप त्रास देते’. बाबा म्हणतात - ‘हेच युद्ध आहे’. तुम्ही गोऱ्या पासून काळे मग काळ्या पासून गोरे बनता, हा खेळ आहे. बाबा सांगतात देखील त्याला ज्याने पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत. त्यांची पावले भारतामध्येच पडतात. असे देखील नाही, भारतामध्ये सर्वच ८४ जन्म घेणारे आहेत.

आता तुम्हा मुलांचा हा वेळ अति मौल्यवान आहे. पुरुषार्थ पूर्णपणे केला पाहिजे, आपल्याला असे बनायचे आहे. जरूर बाबांनी म्हटले आहे - फक्त माझी आठवण करा आणि दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. कोणालाही दुःख द्यायचे नाही. बाबा म्हणतात - मुलांनो, आता अशी चूक करू नका. बुद्धियोग एका बाबांसोबत लावा. तुम्ही प्रतिज्ञा केली होती, आम्ही तुमच्यावर बलिहार जाऊ. जन्म-जन्मांतर प्रतिज्ञा करत आले आहात - ‘बाबा, तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्याच मतावर चालणार, पावन बनून देवता बनणार’. जर युगल तुम्हाला सहयोग देत नसेल तर तुम्ही तुमचा पुरुषार्थ करा. युगल सहयोगी बनत नाही तर जोडी बनणार नाही. ज्याने जितकी आठवण केली असेल, दैवी गुण धारण केले असतील, त्यांचीच जोडी बनेल. जसे पहा ब्रह्मा-सरस्वतीने चांगला पुरुषार्थ केला आहे तर जोडी बनते. हे खूप चांगली सेवा करतात, आठवणीमध्ये राहतात, हे देखील गुण आहेत ना. गोपांमध्ये देखील चांगली-चांगली पुष्कळ मुले आहेत. काही तर आपणच समजतात देखील की, मायेचे आकर्षण होते. या बेड्या तुटत नाहीत. वेळो-वेळी नावा-रूपामध्ये अडकवते. बाबा म्हणतात नावा-रूपामध्ये गुंतू नका. माझ्यामध्ये गुंता ना. जसे तुम्ही निराकार आहात, मी देखील निराकार आहे. तुम्हाला आप समान बनवतो. टीचर आप समान बनवतील ना. सर्जन, सर्जन बनवतील. हे तर बेहदचे बाबा आहेत, त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या.’ आत्मा बोलावते, शरीरा द्वारे - ‘बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा’. तुम्ही जाणता आपल्याला कसे पावन बनवत आहेत. ज्याप्रमाणे हिरे असतात, त्यामध्ये देखील काही काळे डागवाले असतात. आता आत्म्यामध्ये भेसळ पडली आहे. त्याला काढून मग खरे सोने बनवतात. आत्म्याला अतिशय प्युअर बनायचे आहे. तुमचे एम ऑब्जेक्ट क्लियर आहे. इतर सत्संगांमध्ये असे कधीच सांगणार नाहीत.

बाबा समजावून सांगत आहेत की, तुमचा उद्देश आहे हे बनण्याचा. हे देखील जाणता ड्रामा अनुसार आपण अर्धाकल्प रावणाच्या संगतीमुळे विकारी बनलो आहोत. आता हे बनायचे आहे. तुमच्याकडे बॅज देखील आहे. यावर समजावून सांगणे खूप सोपे आहे. हे आहेत त्रिमूर्ती. ब्रह्माद्वारे स्थापना परंतु ब्रह्मा काही स्थापना करत नाही. ते तर पतिता पासून पावन बनतात. मनुष्यांना हेच माहीत नाही आहे की, हे पतितच मग पावन बनतात. आता तुम्ही मुले समजता शिक्षणाचे ध्येय उच्च आहे. बाबा येतात शिकविण्यासाठी. ज्ञान आहेच बाबांमध्ये, ते कोणाकडून शिकलेले नाहीत. ड्रामाच्या प्लॅन अनुसार त्यांच्यामध्ये ज्ञान आहे. असे म्हणता येणार नाही की यांच्यामध्ये ज्ञान कुठून आले? नाही, ते आहेतच नॉलेजफुल. तेच तुम्हाला पतिता पासून पावन बनवितात. मनुष्य तर पावन बनण्यासाठी गंगा इत्यादीमध्ये स्नान करतच राहतात. समुद्रामध्ये देखील स्नान करतात. मग पूजा देखील करतात, सागराला देवता समजतात. खरेतर नद्या ज्या वाहतात त्या तर आहेतच. त्यांचा कधी विनाश होत नाही. बाकी पूर्वी या नद्या नियमानुसार वाहत होत्या. पूर इत्यादीचे नावही नव्हते. कधी मनुष्य बुडत नव्हते. तिथे तर मनुष्यच थोडे होते, मग वृद्धी होत राहते. कलियुग अंता पर्यंत किती मनुष्य होतात. तिथे (सतयुगामध्ये) तर आयुष्य देखील खूप जास्त असते. किती कमी मनुष्य असतील. मग २५०० वर्षांमध्ये किती वृद्धी होते. झाडाचा किती विस्तार होतो. अगदी सुरुवातीला भारतामध्ये केवळ आपलेच राज्य होते, तुम्ही असे म्हणाल. तुमच्यामध्ये देखील असे कोणी आहेत ज्यांच्या लक्षात असते की आम्ही आपले राज्य स्थापन करत आहोत. आम्ही रूहानी योद्धे योगबळावाले आहोत. हे देखील विसरतात. आपण मायेसोबत युद्ध करणारे आहोत. आता ही राजधानी स्थापन होत आहे. जितकी बाबांची आठवण कराल तितके विजयी बनाल. एम ऑब्जेक्ट आहेच असे बनण्यासाठी. यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) बाबा आपल्याला हे देवता बनवितात. तर मग काय करायला हवे? बाबांची आठवण करायला हवी. हे (ब्रह्मा बाबा) तर झाले दलाल. गायन देखील आहे - ‘जब सतगुरु मिला दलाल के रूप में’. बाबा हे शरीर घेतात तर हे मधले दलाल झाले ना. मग तुमचा योग जोडतात शिवबाबांसोबत, बाकी सगाई इत्यादीचे नाव घेऊ नका. शिवबाबा यांच्याद्वारे आमच्या आत्म्याला पावन बनवतात. म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, मज पित्याची आठवण करा’. तुम्ही तर असे म्हणणार नाही - ‘मज पित्याची आठवण करा’. तुम्ही तर बाबांचे ज्ञान ऐकवाल की, बाबा असे म्हणतात. हे देखील बाबा चांगल्या रीतीने समजावून सांगतात. पुढे चालून अनेकांना साक्षात्कार होतील मग मन आतमध्ये खात राहील. बाबा म्हणतात आता वेळ खूप थोडा राहिलेला आहे. या डोळ्यांनी तुम्ही विनाश बघाल. जेव्हा रिहर्सल होईल तर तुम्ही पहाल की, असा विनाश होणार आहे. या डोळ्यांनी देखील खूप काही पहाल. अनेकांना वैकुंठाचा साक्षात्कार देखील होईल. हे सर्व लवकर-लवकर होत राहील. ज्ञान मार्गामध्ये सर्व रियल आहे (वास्तव आहे), भक्तीमध्ये आहे इमिटेशन (नकली) आहे. केवळ साक्षात्कार केला परंतु तसा बनला थोडाच. तुम्ही तर बनता. जो साक्षात्कार घडला आहे तो मग या डोळ्यांनी पहाल. विनाश बघणे काही मावशीचे घर नाहीये (इतके सोपे नाहीये), काही विचारू नका. एकमेकांसमोर खून करतात. दोन हाताने टाळी वाजेल ना. दोन भावांना वेगळे करतात - आपसामध्ये बसून भांडत रहा. हा देखील ड्रामा बनलेला आहे. या रहस्याला ते समजतही नाहीत. दोघांना वेगळे केल्याने भांडण करत राहतात. तर त्यांचा दारू-गोळा विकला जात राहील. कमाई झाली ना. परंतु शेवटी याच्याद्वारे काम होणार नाही. घरी बसून बॉम्ब फेकतील आणि खल्लास. त्यामध्ये ना मनुष्यांची, ना हत्यारांची गरज आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, स्थापना तर जरूर होणार आहे. जितके जे पुरुषार्थ करतील तितके प्राप्त करतील’. बाबा समजावून सांगतात तर खूप, भगवान म्हणतात - ‘ही काम कटारी चालवू नका’. काम विकाराला जिंकल्याने जगत जीत बनायचे आहे. शेवटी कोणाला तरी बाण लागेल जरूर. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हा समय अति मौल्यवान आहे, यामध्येच पुरुषार्थ करून बाबांवर पूर्ण बलिहार जायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. कोणतीही चूक करायची नाही. एका बाबांच्या मतावर चालायचे आहे.

२) एम ऑब्जेक्टला समोर ठेवून अतिशय काळजीपूर्वक चालायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान पवित्र बनविण्याची मेहनत करायची आहे. आतमध्ये जे काही डाग आहेत, त्यांना शोधून मग काढून टाकायचे आहेत.

वरदान:-
ब्राह्मण जीवनामध्ये प्रत्येक सेकंद सुखमय स्थितीचा अनुभव करणारे संपूर्ण पवित्र आत्मा भव

पवित्रतेलाच सुख शांतीची जननी म्हटले जाते. कोणत्याही प्रकारची अपवित्रता हि दुःख, अशांतीचा अनुभव करविते. ब्राह्मण जीवन अर्थात प्रत्येक सेकंद सुखमय स्थितीमध्ये राहणारे. भले दुःखाचे दृश्य असेलही परंतु जिथे पवित्रतेची शक्ती आहे तिथे दुःखाचा अनुभव होऊ शकत नाही. पवित्र आत्मे मास्टर सुखकर्ता बनून दुःखाला रूहानी सुखाच्या वायुमंडळामध्ये परिवर्तित करतात.

बोधवाक्य:-
साधनांचा प्रयोग करत साधनेला वाढविणे हिच बेहदची वैराग्य वृत्ती आहे.